शांबरीक खरोलिका

मध्ये मी पाहिलेल्या दोन मी मूकपटाबद्दल थोडेसे येथे लिहिले होते. परवा विजय पाडळकर यांचे ‘सिनेमाचे दिवस-पुन्हा’ हे पुस्तक वाचताना मी काही वर्षापूर्वी(बहुधा २००९ मध्ये) पुण्यातल्या मध्ये शांबरीक खरोलिका ह्या कार्यक्रमाला National Film Archives of India(NFAI) मध्ये गेलो होतो त्याची आठवण झाली. त्याबद्दल थोडेसे.

शांबरीक खरोलिका म्हणजे काय, तर इंग्लिश मध्ये magic lantern. हे magic lantern यंत्र चित्रपट तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित होण्याच्या बरेच आधी हलत्या चित्रांच्या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध होते. इंग्लंड आणि फ्रान्स मध्ये कार्यक्रम होत असत. या बद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे आणि त्या यंत्राचा इतिहासही खुपच मनोरंजक आहे.

मुंबईतील पटवर्धन आणि पितळे ह्या गृहस्थांनी हे यंत्र १८८५ मध्ये मिळवले होते आणि ते त्यात भारतीयांच्या रुची नुसार काचेच्या स्लाईड्स वर पौराणिक प्रसंगावर आधारित कार्यक्रम ते करत असत. अशी त्यांनी हजारो स्लाईड्स बनवली होती. त्या यंत्राला शांबरीक खरोलिका असे भारतीय नावही त्यानीच दिले. दादासाहेब फाळके यांनी भारतातील पहिला चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ तयार करण्याच्या आधीची ही सगळी गोष्ट. पटवर्धन कुटुंबियांनी तो वारसा इतकी वर्षे जपून ठेवला आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या आत्मचरित्रात या खेळाबद्दल बद्दल विस्तृत उल्लेख आहे. ह्या विचित्र नावाबद्दल त्यांनी असे लिहून ठेवले आहे: “‘शांबरिक खरोलिका’ या विचित्र नावाबद्दल एकदा आम्ही खुद्द त्या पटवर्धनालाच विचारले. तो होता अस्सल नाकीं बोलणारा कोकण्या. त्याने खुलासा केला की, अहो, शांबरिक म्हणजे ‘मॅजिक’ आणि खरोलिका म्हणजे लॅण्टर्न. ‘मॅजि म्हणजे आपला शंबरासूर, त्यावरून ‘शांबरिक’ असा शब्द आम्ही बनवला. ‘लॅण्टर्न’ला मराठीत आपण दिवा दीप म्हणतो. पण हे शब्द फारजण वापरतात, म्हणून अमरकोशातून आम्ही ‘खरोलिका’ काढली.”

NFAI मधील या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे होते की त्या दिवशी पटवर्धन कुटुंबियांनी शांबरीक खरोलिकाचा कार्यक्रम त्यांनी प्रात्यक्षिक म्हणून केला. आणि ते यंत्र आणि त्या स्लाईड्स NFAI ला त्यांच्या संग्रहालयाला भेट म्हणून दिला.

ह्याचेच काहीसे वेगळे रूप काही वर्षापूर्वी पर्यंत गावागावात हलत्या चित्रांच्या खेळ दाखवणारी मंडळी करत असताना दिसत असत. अर्थात त्यात गाजलेल्या चित्रपटांच्या फिल्म्सच्या स्लाईड्स वापरून ती दाखवत असत. त्याला एकाच वेळी तीन चार जणांनी पाहण्याची सोय असे. त्याला bioscope box म्हणतात. तोही वारसा खरे पहिले तर जपून ठेवावा असाच आहे.

(माझ्या ब्लॉग वर पूर्वप्रकाशित)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

एक नंबर लेख, माहिती एकदम रोचक आहे! शांबरीक खरोलिका हे नावही एकदम आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छान लेख आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात खादीचा आणि त्या अनुषंगाने राष्ट्रीय भावनेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी मॅजिक लँटर्नचा वापर केला जाई असे वाचनात आले होते. खादी प्रचारक समिती अशा काहीतरी नावाच्या समितीचे लोक देशभर हिंडून खादी प्रदर्शने भरवत व लोकांना त्याकडे आकर्षित करण्यासाठी मॅजिक लँटर्न वापरून देशभक्तांची चित्रे, खादी विणण्याचे प्रात्यक्षिक वगैरे दाखवत.
तुम्ही हा कार्यक्रम प्रत्यक्ष पाहिलात, तेव्हा प्रेक्षक म्हणून तुम्हाला काय अनुभव आला ते वाचायला आवडेल.
शांबरीक खरोलिका नाव मस्तच आहे. 'केळफा'ची आठवण झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खादी प्रचार आणि राष्ट्र भावना या साठी वापरले जायचे ही माहिती मला नवीन आहे. कार्यक्रमाबद्दल पाहतो काही लिहिता येईल का, कारण त्यांनी काही रामायण आणि महाभारतातील चित्रे आणली होती आणि ते त्यांनी दाखवली होती. पेक्षकांना थोडी कल्पना यावी म्हणून.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
(माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

नावामुळे घाबरून लेख उघडला नव्हता. चूकच केली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला हे अपेक्षित नव्हते, पण आता वाटते की ही प्रतिक्रिया साहजिक आहे...नावच तसे आहे ते...
(माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

‘मॅजि म्हणजे आपला शंबरासूर

म्हणजे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रबोधनकारांच्या पुस्तकातील उताराची लिंक येथे देत आहे.

मॅजि हा शब्द मला वाटते मॅजिक असा असावा(मूळ पुस्तकात मुद्रणदोष असावा. पण मॅजिक म्हणजे शंबरासुर असे का? ते देखील पहिले पाहिजे. शम्बरासुराने काही जादू केली होती का युद्धात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

माहिती नवी आणि मनोरंजक आहे.

'शांबरीक खरोलिका' ह्या नावाच्या दिलेल्या उगमाबद्दल मात्र शंका आहे. 'शांबरीक' म्हणजे शंबरासुराशी संबंधित असा शब्द पटवर्धनांनी कल्पनेने बनविला येथपर्यंत ठीक आहे पण 'खरोलिका' अमरकोषात सापडला हे मात्र बरोबर दिसत नाही. पूर्ण अमरकोषामध्ये हा शब्द दिसत नाही, मोनियर विल्यम्स आणि आपटे कोषांमध्येहि तो नाही.

मोवि 'खर्खोद' असा शब्द आणि त्याचा अर्थ a kind of magic असा दर्शवितो. हा शब्दहि दुर्मिळच दिसतो पण कल्हणाच्या राजतरंगिणीमध्ये त्याचा एक वापर असल्याचे मोविमध्ये उल्लेखिले आहे. मात्र हाहि शब्द अमरसिंहाला माहीत नाही. असा तर्क करता येईल की उपकरणाचे मूळ नाव 'शांबरिक खर्खोदिका' असे असावे आणि त्याचे पुढील पिढ्यांच्या हातून अजाणतेपणे 'शांबरीक खरोलिका' असे रूपान्तर झाले असावे. अर्थात पटवर्धनांना 'खर्खोद - खर्खोदिका' कोठे मिळाले हा प्रश्न उरतोच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमची शंका रास्त आहे. जाणकारांनी निरसन करावे अशी अपेक्षा. प्रबोधनकारांच्या पुस्तकातील उताऱ्याची लिंक येथे देत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com