धुम्रपान विषयक धाग्याचा उत्तरार्ध

मागील धाग्यात आपण धुम्रपान आणि चित्रपट याविषयी चर्चा केली. या धाग्यात धुम्रपानाविषयी अधिक विचारमंथन करुया.

टीप:
१. समाजात धुम्रपान कमी व्हावे हाच या चर्चेचा उद्देश असावा.
२. अर्थातच मी स्वत: कधीही धुम्रपान केले नाही आणि करणार नाही. उलट धूम्रपानाचे वाइट परिणाम समाजाला सांगायचा माझा प्रयत्न असतो.
३. प्रतिसाद विषयाला धरून असावेत.
४.प्यासिव्ह स्मोकिंग घडवणे हे पाप असलेने, धुम्रपानाबद्दल माझी Hate the sin and not the sinner अशी भूमिका आहे.

चर्चा:

मी बऱ्याच वेळा असे निरीक्षण केले आहे की

१. शेकडो मैल गाडी चालवणारे ,रात्री गाडी चालवणारे लोक विरंगुळ्यासाठी धुम्रपानाचा आस्वाद घेतात. बस्स मग ते चेन स्मोकर व्हायला वेळ लागत नाहि.
२. भट्टीजवळ काम करणारे लोक , शवविछ्चेदन , मलनि:सारण वगैरे क्षेत्रात काम करणारे लोकही धूम्रपानाच्या सवयीत नकळत ओढले जातात आणि नंतर हे व्यसन व्हायला वेळ लागत नाही. तसेच रात्रंदिवस चित्रीकरणात घालवणारे लोक या सवयीचे गुलाम होतात.
३. निकोटिन बुद्धीला चालना देते असा (गैर) समज आहे. वस्तुस्थिती काय?
४. सोफ्टवेर क्षेत्रात काम करणारे , अतिशय दडपणाखाली काम करणारे काही कर्मचारी
धुम्रपानामुळे दडपण कमी होते म्हणुन या सवयीकडे वळतात.
५. या सर्वांना धुम्रपान इतके भयानक असूनही करावेसे का वाटते?
६. निकोटीन बद्दल शास्त्रीय माहिती जाणकारानी या चर्चेत द्यावी.
७. या सर्व लोकांना धुम्रपाना पासून परावृत्त करण्यासाठी काही सुरक्षित पर्याय असतील का?
(इ सिगारेट हा पर्याय फारसा उपयुक्त नाही आणि तो घातकच आहे)

आपले याविषयीचे अनुभव कथन करावेत.

चला परत एकदा चर्चा करुयात.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

१. समाजात धुम्रपान कमी व्हावे हाच या चर्चेचा उद्देश असावा.

काहो, का कमी व्हावे?

५. या सर्वांना धुम्रपान इतके भयानक असूनही करावेसे का वाटते?

म्हणजे त्यातुन नक्कीच काहीतरी फायदा मिळत असणार ना.

तुम्हाला नसेल करायचे तर करु नका ना स्मोकींग. करणार्‍याला का त्रास देताय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धुम्रपानाने तब्येतीवर होणारे परिणाम आपण जाणून आहात.
म्हणून एका सुद्रुढ समाजासाठी ते कमी व्हावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओम शान्ति ओम

मन मारुन राहीले तर तब्येतीवर जास्त परीणाम होतो म्हणे. तसेच दुसर्‍यांनी काही शिकवले की राग येतो आणि त्याचा पण तब्येतीवर वाईट परीणाम होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण हा धागा फार पर्सनली घेतलेला दिसतोय. तसे करु नका.
९९% स्मोकर्स ना आपण सिगरेट सोडावी असे मनापासुन वाटते.
दुर्दैवाने फार कमी लोक तसे करु शक्तात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओम शान्ति ओम

भा पो (भावना पोचल्या)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठराविक व्यवसायात असणारे लोकच धूम्रपान करतात असं वाटत नाही. सगळ्या वर्गातले, वर्णांचे लोक धूम्रपान करतात; सगळ्या वर्ण, व्यवसायांमध्ये धूम्रपान न करणारे लोक आढळतात. काही लोकांची वृत्तीच आत्मघातकी(!) असते असं म्हणता येईल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या सर्वांना धुम्रपान इतके भयानक असूनही करावेसे का वाटते?

मी धुम्रपान व्यसन म्हणून करत नाही, थोडा तिटकाराच आहे. पण तरीही कधी कधी ते करतो Smile एखाद्या विशेष कारणाने अथवा पार्टी वगैरे असेल तर धुम्रपानास मी नकार देत नाही. एकट्याने अथवा सभा लाउन मात्र धुम्रपान करायची तल्लफ येत नाही उलट अशा ग्रुपपासुन त्यावेळी मी लांबच राहतो. माझे विवेचन विरोधाभासी नक्किच वाटेल परंतु... ते असेच आहे.

पण एक गोष्ट नक्कि की सिगारेट्चे व्यसन लागले आहे हेच मुळी समजायला बराच काळ गेलेला असतो इतक्या सहजतेने ती हातात अन आयुष्यात सामावुन जाते. आणी आता यानंतर माघारी फिरणे अत्यावश्यक वाटत नसते. म्हणून हे व्यसन सुटत नाही. तसेच सेक्स झाल्यावर हलक्या आवाजात रोम्यांटीक गाणी ऐकत अधुन मधुन सिगारेट फुंकणे हा एक सुंदर अनुभव असतो, माझे मन तरी मला यामुळे शुन्यावस्था व अल्हाददायकता याच्या सिमारेषेवर बराच वेळ स्थिरतेने घोंघावत असल्या सारखे भासते. हे झाले धुम्रपान का घडते याचे स्पश्टीकरण.

धुम्रपान का सुटत नाही याचे उत्तर धुम्रपान करणार्‍या( आणी त्याच्या भोवताली असणार्‍या) व्यक्तीचा शेवट होणे मुळातच कधी टळत नसते, पण फक्त त्याने जरा वाइट प्रकारे होणारा शेवट टळावा म्हणून हे धुम्रपान सोडावे हा अट्टहास धुम्रपान करणार्‍याला कधीच पटणार नाही. कारण हा हट्ट त्या व्यक्तीच्या चांगल्या शेवटाची कोणतीही हमी देत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!