अनेक लोक अनेक वेळा अनेक ठिकाणी काहीतरी निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्खपणाची विधानं करतात. कधीकधी या 'निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्ख'पणांपायी नसताना हातापायीही होते. कधी हे प्रकरण तिथेच न थांबता दंगे होतात, ऑफिसं तोडली जातात, हल्ले होतात, बसेस जाळल्या जातात, खूनही पडतात. आजकाल या 'निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्ख'पणा करण्यात हिंदुत्ववादी, संस्कृतीरक्षक, कट्टर राष्ट्रवादी संघटनांना, आणि मोदीभक्तांना ऊत आलेला आहे. तर हा धागा अशांची विधानं, कृत्यं, घोषणा वगैरेंची चेष्टा किंवा निषेध यांचं एकत्रित संकलन करण्यासाठी काढलेला आहे. यात काही काळ जुन्या बातम्याही चालतील - गेल्या दोनतीन वर्षांतल्या - पण अगदीच काहीतरी अनमोल रत्न असल्याशिवाय त्यामागे जाऊ नये.
प्रेस्टिट्यूट्स, सिक्युलर, विचारजंती, मोदीद्वेष्टे वगैरेंनी केलेल्या 'निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्ख'पणाबद्दलच्या बातम्या इथे मांडू नये, त्यासाठी स्वतंत्र धागा काढलेला आहे.
सुरूवात मी करून देतो. नुकतंच मुस्लिम राष्ट्रीय मंचाने 'गायीच्या शेणामुळे अणुबॉंबचा प्रतिकार करता येऊ शकतो' असं म्हटलं आहे. कदाचित बाटगे अधिक कडवे असतात हे खरं आहेसं दिसतंय.