ॐ पूर्णमद: पूर्णमिदं ...
.
ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते! पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवाविशिष्यते!
पूर्णामधुन , पूर्ण वजा जाताही जे शेष उरते ते पूर्णच असते
.
खर्या आयुष्यात प्रत्येकाला किती वेळा पूर्णत्वाचा अनुभव येतो? अगदी हातच्या बोटांवर मोजावा इतपतच. बाकी वेळ तर अपूर्णताच अनुभवास येते. द्वैत आले तेथे अपूर्णत्व आले कारण द्वैतात २ घटक असतात. दोघांची प्रकृती भिन्न, स्वभाव अगदी विकृतीही भिन्न. एकमेकांबद्दलची अनभिज्ञता, त्यातून निर्माण होणारा गोंधळ. अर्थात काही भावुक क्षण असेही क्षणिक तर जुळून अनुभवास येणारी पूर्णता! पण तो क्षण ओसरला की परत अपूर्णत्वाकडे प्रवास. एकाकीपण.
.
सार्या जीवमात्राला फक्त जगण्याचे बळ मिळावे, या दृष्टीनेच निसर्गाने कदाचित या काही परफेक्ट क्षणांची योजना केली आहे असे वाटण्यास वाव आहे. इतका प्रोफाऊंड अनुभव, काही अमूल्य प्रसंग देतात. नाहीतर कोणत्या जिजीविषेने आपण जगतो? कोणत्या जीवनेच्छेने काळ पुढे पुढे रेटत रहातो?
.
मग हे पूर्णत्वाचे क्षण तरी कोणते? अत्यंत तहानेलेल असतेवेळी थंडगार पाण्यामुळे तृषार्ताची तृष्णा निवणे, उकाड्याने हैराण झालेवेळी अचानक वार्याची थंडगार झुळून अंगावरुन जाणे. एवढेच काय आपण अतोनात विमनस्क असतेवेळी अचानक एखादी सिन्सिअर कॉम्प्लिमेन्ट मिळणे या सारखे अनुभव कोणाला नाहीत? सर्व चित्तवृत्ती अंतर्मुख होऊन, बाह्य जगताचे भान विसरण्याचे हे क्षण. अमूल्य!!
दीर्घ सुखाचे अनुभव म्हणजे निसर्गसान्नीध्यातील परिपूर्ण सुख, प्रेमात पडल्यानंतरचे दिवस.- अगदी पूर्ण, "My Cup Runneth Over" सारखे.
.
पण हे काही प्रसंग सोडता आपण सारे जिगसॉ पझलच. पार्टनर हरवलेले अधुरे, अपूर्ण!
दिल से मधील त्या मार्मिक अत्यंत इनसाईटफुल ओळीवरती जान कुर्बान -
ऐ अजनबी तू भी कभी आवाज दे कहीं से,.
मैं यहाँ टुकडो में जी रहा हूँ,.
तू कहीं टुकडो में जी रही है
मग परत आपल्याच मनाची समजूत घालायची की संपूर्ण शुभ्र कॅनव्हास सोडून, फक्त मध्यवर्ती काळा बिंदू का बघतेस?"
प्रौढ आहोत करतो काय? मनाची समजूत आपली आपण घालणे भाग आहे.
प्रतिक्रिया
मस्त,आवडले. पूर्णत्वाच्या
मस्त,आवडले. पूर्णत्वाच्या शोधात आपण अपूर्ण जीवन जगत राहतोच. हीच गम्मत आहे.
धन्यवाद पटाईतजी.पुरे पडत
धन्यवाद पटाईतजी.
पुरे पडत नसणं, थिटेपण - हे शाश्वत दु:ख आहे.
कधी हे दु:ख मनाजोगा प्रतिसाद मिळाल्याच्या आनंदातून कमी होतं, कधी सिन्सियर कॉम्प्लिमेन्ट मिळाली की.
.
मला कोणीतरी म्हणालेलं होतं , खरं तर माझे बाबाच - जर अपूर्णता नसेल तर ध्यास नसेल आणि त्यामुळे प्रगतीही नसेल. मला ते अतोनात पटते.
.
अजुन एक - कोणी एक व्यक्ती जगात आहे जी आपल्याला पूर्ण करते वगैरे बकवास्/थोतांड्/फेक आहे हे काही वयानंतर समजुन आले. पण हे पूर्णत्व निसर्गात, स्तोत्रांत, कवितेत आपल्याला सहज सापडते हेदेखील लक्षात आले.
जग कितीही बदलले तरी जगाच्या
जग कितीही बदलले तरी जगाच्या चालक भावना त्याच आहेत... माझ्या वाडवडिलांच्या प्रतिक्रिया, माझ्या मुलाबाळांच्या प्रतिक्रिया आणि माझ्या प्रतिक्रियांचे एकच असलेले मूळ जाणवते... वाहत्या चित्रांच्या नदीत आपले सगळ्यांचे चित्र आपल्याला जरी वेगळे भासले तरी त्याचा प्रवाह एकाच दिशेने होतो आणि जो तो आपापले दुःख उपभोगत असतो.. हे जाणवणे माझ्यासाठीचे पूर्णत्वाचे अनुभव आहेत.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. प्रतिसाद आवडला.
___
बाय द वे, प्रवाह्/नदी यावरुन आठवलेला हा अवांतर उतारा (साभार - http://sansmarniya.blogspot.com/2010_01_01_archive.html)-
काय सुंदर उतारा आहे...
काय सुंदर उतारा आहे... मनःपूर्वक आभार.... आणि हो, अजून वाचलं नसल्यास, हरमन हेसे चं सिध्दार्थ नावाचं पुस्तक वाचा... आवडेल तुम्हाला असं वाटतंय
नक्की वाचते पुस्तक. वाचल्यावर
नक्की वाचते पुस्तक. वाचल्यावर आपल्याला कळवेन. अॅमॅझॉन वरुन मागवते. १३८१ रिव्ह्यु आहेत, ६९% ५ स्टार्स.
बुद्धाचे जीवन व शिकवण याचे आकर्षण आहेच.
___
हा उतारा शांता शेळके यांच्या पुस्तकातील आहे असे त्या ब्लॉगवर म्हटले आहेच. ३-४ वर्षांपूर्वी उतारा वाचून एकदम आवडला होता. मध्येमध्ये आठवतच रहातो. लास्टिंग इम्पॅक्ट!!
त्याचा मराठी अनुवाद पण छान
त्याचा मराठी अनुवाद पण छान आहे... अगदी जमलाय लेखकाला... नाव आठवत नाही अनुवादकाचं... पण बुकगंगावर सिध्दार्थ आणि पूर्वेची यात्रा असं सर्च करून बघा
बघते.
बघते.
जग कितीही बदलले तरी जगाच्या
जग कितीही बदलले तरी जगाच्या चालक भावना त्याच आहेत... माझ्या वाडवडिलांच्या प्रतिक्रिया, माझ्या मुलाबाळांच्या प्रतिक्रिया आणि माझ्या प्रतिक्रियांचे एकच असलेले मूळ जाणवते... वाहत्या चित्रांच्या नदीत आपले सगळ्यांचे चित्र आपल्याला जरी वेगळे भासले तरी त्याचा प्रवाह एकाच दिशेने होतो आणि जो तो आपापले दुःख उपभोगत असतो.. हे जाणवणे माझ्यासाठीचे पूर्णत्वाचे अनुभव आहेत.
सेरेटोनीन हे आपल्या शरीरातील "पूर्ण" आहे
मेंदू मधे जेंव्हा हे वाढते तेंव्हा आपण वर उल्लेखिलेले पूर्णत्वाचे जबरा फिलिंग ते देते. ते जास्त झाले तर हे फिलिंग इतके सुखद अन प्रमाणाबाहेर आनंदी व समाधानी बनवते की संपूर्ण विरक्ती तयार होऊ शकते आणि अतीव समाधानाने जीव द्यावासा वाटतो म्हणुनच हे प्रमाणात असणे अत्यावश्यक. कदाचीत म्हणूनच शरीर पूर्णत्वाचे हे फिलिंग आपल्यात कायम ठेवत नसावे इट्स अ डिफेंस मेकेनिजम.
हे कमी झाले तर कल्पनाही शहारा उभा करेल असे डिप्रेशन निर्माण होते. अन पातळी अजुन खाली गेली तरी नैराश्याने मृत्यु होतोच. थोडक्यात थोडक्यात समाधान मानने इज आर्ट ऑफ़ सर्वायविंग
actions not reactions..!...!
हे माहीत नव्हते. याबद्दल
हे माहीत नव्हते. याबद्दल वाचायलाच हवे. माझा आवडता विषय आहे हा. प्रतिसादाबद्दल धन्यवाद. प्रतिसाद आवडला.
___
http://blog.hubbubhealth.com/2015/05/08/serotonin-and-happiness/ - Serotonin and Happiness
या विषयाव्रील अन्य लेख शोधून वाचेन.
काय मस्त प्रतिसाद आहे... एकदम
काय मस्त प्रतिसाद आहे... एकदम रेड बुल घेतल्यासारखं वाटतंय
शुचि, अमुल्य क्षण मस्त टिपले
शुचि, अमुल्य क्षण मस्त टिपले आहेस.
ह्या उकाड्यात पहिले दोन क्षण चपखल बसतात.
असाच आणखी एक क्षण...
पावसाची आतुरतेने वाट बघत असताना येणारा पहिला पाऊस!
तसंही अपूर्णत्वामुळेच पूर्णत्वाची ओढ लागते आणि महत्व पटतं.
उल्का
अहो या पूर्णामुळे एका आयडीचा
अहो या पूर्णामुळे एका आयडीचा दुसर्या जन्मात अंत झालाय तिकडे मिपावर..
मी पूर्णच्चे
अच्छा अपूर्ण लोकांना असं वाटतं होय! आभार सांगितल्याबद्दल!
मी स्वतःला पुर्णच समजतो.
माझ्यात अनुभव किंवा ज्ञानामुळे (किंवा इतरही कशाने) जी भर पडत जाईल तशी माझी पुर्णता मोठी होत जाते - वाढते- पण म्हणून मी आहे तो अपुर्ण आहे वगैरे मला अजिबात वाटत नाही!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!