.
ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते! पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवाविशिष्यते!
पूर्णामधुन , पूर्ण वजा जाताही जे शेष उरते ते पूर्णच असते
.
खर्या आयुष्यात प्रत्येकाला किती वेळा पूर्णत्वाचा अनुभव येतो? अगदी हातच्या बोटांवर मोजावा इतपतच. बाकी वेळ तर अपूर्णताच अनुभवास येते. द्वैत आले तेथे अपूर्णत्व आले कारण द्वैतात २ घटक असतात. दोघांची प्रकृती भिन्न, स्वभाव अगदी विकृतीही भिन्न. एकमेकांबद्दलची अनभिज्ञता, त्यातून निर्माण होणारा गोंधळ. अर्थात काही भावुक क्षण असेही क्षणिक तर जुळून अनुभवास येणारी पूर्णता! पण तो क्षण ओसरला की परत अपूर्णत्वाकडे प्रवास. एकाकीपण.
.
सार्या जीवमात्राला फक्त जगण्याचे बळ मिळावे, या दृष्टीनेच निसर्गाने कदाचित या काही परफेक्ट क्षणांची योजना केली आहे असे वाटण्यास वाव आहे. इतका प्रोफाऊंड अनुभव, काही अमूल्य प्रसंग देतात. नाहीतर कोणत्या जिजीविषेने आपण जगतो? कोणत्या जीवनेच्छेने काळ पुढे पुढे रेटत रहातो?
.
मग हे पूर्णत्वाचे क्षण तरी कोणते? अत्यंत तहानेलेल असतेवेळी थंडगार पाण्यामुळे तृषार्ताची तृष्णा निवणे, उकाड्याने हैराण झालेवेळी अचानक वार्याची थंडगार झुळून अंगावरुन जाणे. एवढेच काय आपण अतोनात विमनस्क असतेवेळी अचानक एखादी सिन्सिअर कॉम्प्लिमेन्ट मिळणे या सारखे अनुभव कोणाला नाहीत? सर्व चित्तवृत्ती अंतर्मुख होऊन, बाह्य जगताचे भान विसरण्याचे हे क्षण. अमूल्य!!
दीर्घ सुखाचे अनुभव म्हणजे निसर्गसान्नीध्यातील परिपूर्ण सुख, प्रेमात पडल्यानंतरचे दिवस.- अगदी पूर्ण, "My Cup Runneth Over" सारखे.
.
पण हे काही प्रसंग सोडता आपण सारे जिगसॉ पझलच. पार्टनर हरवलेले अधुरे, अपूर्ण!
दिल से मधील त्या मार्मिक अत्यंत इनसाईटफुल ओळीवरती जान कुर्बान -
ऐ अजनबी तू भी कभी आवाज दे कहीं से,.
मैं यहाँ टुकडो में जी रहा हूँ,.
तू कहीं टुकडो में जी रही है
मग परत आपल्याच मनाची समजूत घालायची की संपूर्ण शुभ्र कॅनव्हास सोडून, फक्त मध्यवर्ती काळा बिंदू का बघतेस?"
प्रौढ आहोत करतो काय? मनाची समजूत आपली आपण घालणे भाग आहे.