"चुत्या" ठरवलं जाण्याच्या भीतीत ....

"चुत्या" ठरवलं जाण्याच्या भीतीत
कवी सतत वावरतो: ओळीच्या ताणलेल्या तारेवर
लिहीत जातो –
’तारेवरती सहा पाखरे
सुरेल पाडत चिवचिव छिद्रे आकाशाला ‘'

कधी पडू याचा नेम नाही , श्रोत्यांच्या
डोक्यांच्या उंचीचा अंदाज नाही
नकळत बम्पर टाकला गेला की पंचाईत :
‘’आणि सातवा थेंब थरारून
तारेची मोजतो भूमिती ''

हा काय लिहितो ते ह्याचे ह्यालाच
तरी कळते का?

प्रखर प्रकाश सहन करीत
एक एक ओळ लिहीत जातो,
एक एक पाऊल वरती जायचा यत्न , तिकडे
जिथे (म्हणे ) सौंदर्य वसती करते !

‘’तारेवरचे अदृश्य मजले
त्यास समजले ‘’

पण पाय निसटला तर खाली
जाळे ताणलेले नसते ,
कोणीही,
अजिबात !

‘’थेंब एकटा पुन्हा थरारे
तारेवरती सहा पाखरे ! “

"चुत्या" ठरविल्या जाण्याच्या भीतीत
कवी सतत वावरत असतो..
सतत..

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तुमच्या कविता वाचतो. काही समजतात काही नाही.

ही कविता विशेष आवडली. त्यातल्या ध्रुवपदाला माझी विशेष दाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

धन्यवाद! आणि एखादी कविता समजत नसेल तर ते अपयश कवीचे आहे, वाचकाचे नाही !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कवीने स्वतःच लिहिलय ना: हा काय लिहितो ते ह्याचे ह्यालाच तरी कळते का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवडली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

कविता आवडली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कसल्यातरी भितीच्या /ताणाच्या / अमुक तमुक ठरवले न जाण्याच्या चिंतेत कविता पाडणार्‍यांना तुम्ही कवी म्हणता?

आम्ही नाही.

त्यामुळे 'भितीत कवी सतत वावरतो' हेच चुकीचे ठरलेय.
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता "पाडणारे" म्हणालात यातच सर्व आले. त्यांना कशाचीच भीती नसते!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

“There is an anaesthetic of familiarity, a sedative of ordinariness which dulls the senses and hides the wonder of existence. For those of us not gifted in poetry, it is at least worth while from time to time making an effort to shake off the anaesthetic. What is the best way of countering the sluggish habituation brought about by our gradual crawl from babyhood? We can't actually fly to another planet. But we can recapture that sense of having just tumbled out to life on a new world by looking at our own world in unfamiliar ways.”
― Richard Dawkins, Unweaving the Rainbow: Science, Delusion and the Appetite for Wonder

____
माझ्या एका धाग्यात राघांनी हे पुस्तक रेकमेंड केले होते. आज मी ते ग्रंथालयातून घेते आहे. सांगायचे कारण की - वरील सुविचार या पुस्तकातूनच आहे. किती सुंदर शब्दात सुंदर मौलिक विचार मांडला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Yep, the simple, best advice given to poets is "Make it new!"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान.
**
पण एक सुचवणी - टाईपसेटिंग सुसूत्र करावे.
उदाहरणार्थ उद्धरण चिन्हांकरिता पुढीलप्रमाणे वेगवेगळ्या खुणा वपरलेल्या आहेत.
"
‘’

हा फरक जर थरथरणारा थेंब सुचण्याकरिता असेल, तर ठीक, परंतु अशी सूचकता सहज लक्षात येण्यासारखी नाही.

**

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"चुत्या" ठरवलं जाण्याच्या भीतीत
कवी सतत वावरतो: ओळीच्या ताणलेल्या तारेवर

नॉर्मल माणसे कवि ला घाबरुन असतात असे वाचनात आणि प्रत्यक्षात अनुभवाला आले आहे. समोरुन कवि येताना दिसला तर आपण त्याचे पैसे देणे आहोत अश्या पद्धतीने त्याला चुकवतात.

कविला कसली आलीय भिती? नंगे को तो खुदा भी डरता है.

पूर्वी ऐसीवर खूपच कमी कविता असल्यामुळे ऐसी आवडण्याचे तेही एक कारण होते, पण हल्ली ते सुख गेलय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शाळेत भिकार पद्धतीने काव्य शिकविल्यामुळे, आणि काव्य वाचायला विशेष एकाग्रता लागत असल्यामुळे सुमारे चाळिशीपर्यंत माणसे कवितेला टाळत असतात . नंतर (काहींना) काव्याचे महत्व समजते, आणि काव्याशिवाय जीवन टुकार आहे हे लक्षात येते (बहुतेकांच्या ते लक्षात येत नाही!) . अर्थात प्रसिद्ध झालेले 99% काव्यही भिकारच असते. प्रश्न मोजक्या कवितांचा आणि मोजक्या रसिकांचा असतो .

पण हल्ली ते सुख गेलय. ; भारतात डोक्याला पिस्तूल लावून काव्य वाचून घेतात हे माझ्या लक्षातच आले नव्हते !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला वाटलेच होते असा काहीतरी प्रतिसाद येईल.

जरी मी प्रतिसाद जनरीक कविं बद्दल लिहीला असला तरी तो फक्त सुमार कवि आणि कवितांबद्दल होता.

कवि आणि कवितांबद्दल बोलले की कवि लोक एकदम ज्ञानेश्वर, तुकाराम, कालीदास, गालिब, साहीर, गदिमा वगैरेंची उदाहरणे देतात. आमच्या सारख्या लोकांना ह्या कवि आणि त्यांच्या कवितांबद्दल आदर, कौतुक, प्रेम वगैरे असतेच.

वैताग बाकीच्या कविंबद्दल येतो.

पण हल्ली ते सुख गेलय. ; भारतात डोक्याला पिस्तूल लावून काव्य वाचून घेतात हे माझ्या लक्षातच आले नव्हते !

नाही असे काही वाचुन घेत नाहीत, आणि मी वाचत पण नाही शक्यतो ( प्रतिसाद मात्र नक्की वाचते ). पण "कवि" स्वताला किंवा कविंच्या एकुणच जातीला विषेश असे समजुन काही तरी लिहतो, एकुणात "कवि" हा प्रकार फार संवेदनाशील आहे ( कविमन वगैरे ) वगैरे पोट्रे करायला जातो तेंव्हा डोक्यात जाते.

--------
माझ्या बहीणीला तुमच्या सारख्याच कविता करायची उर्मी आहे, ती कधी ही विचारते, " नविन कविता केलीय, वाचुन दाखवू?" मग जी भिती माझ्यासारख्यांना वाटते तिची कल्पना तुम्हाला येणार नाही. मग तिला गंडवावे लागते, "आधी जेऊन घेऊ, मग कशी शांत पणे ऐकता येइल तुझी कविता" असे सांगुन.

नॉर्मली, थोडेफार गाणे किंवा एखादे वाद्य वगैरे शिकणारे ( प्रार्थमिक लेव्हलचे ) लोक कधी "तुला गाऊन / वाजवून दाखवते" अशी गळ घालत नाहीत. कदाचित त्यांना कविं इतकी अभिव्यक्तीची ओकारी येत नसावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोणत्याही नात्याची सुरुवात म्हणजे एम्बार्किंग या न्यू टेरिटरी म्हणण्यात मला तरी वावगे वाटत नाही. नाती आपल्यातील काळीकुट्ट बाजू बाहेर आणण्यास जशी समर्थ असतात तशीच उत्तुंगताही. अधलेमधले सर्व पडाव नाती दृष्टीटप्प्यात आणू शकतात.क्वचित काही नाती इंटेन्स, समृद्ध करणारी असतात तर बरीचशी फक्त वारंवार नखाने खरवडणारी. ना त्या खरवाडीमधून कोळसा बाहेर येतो ना हिरा. अधलीमधली, लेम नातीही असतात, खूप असतात.
मग विचार येतो नाते कशाला म्हणायचे? माझ्यापुरता मी ही व्याख्या केलेली आहे की ज्या व्यक्ती/संकल्पनेबरोबर भावनिक गुंतवणूक होते त्याला नाते म्हणतात. सूर्य/चंद्र यांच्याबरोबर आपली भावनिक गुंतवणूक असते का? तर नाही. याउलट ज्योतिष, कविता, ईश्वर आदि छंदांच्या बरोबर, संकल्पनांबरोबर असते.
.
कवितेशी नाते खूप लहानपणी जडले. मराठी विषयात एम ए केलेली माझी आई त्याच विषयाची शिक्षिका असल्याने, मला अनेक कविता ऐकवत असे, समजावून सांगे, स्वतः: लिहिलेली कविता शेअर करत असे. गदिमा, कुसुमाग्रज, शांता शेळके यामची पुस्तके तर विपुल वाचली. एक लक्षात आलं की कविता म्हणजे फक्त पद्य नाही, गद्यात, डोळ्यात, स्पर्शातही कविता असते. निसर्गात रंगाच्या लयलुटीत, जिजीविषेत, जीवनासक्तीतही कविता आहे. गदिमांच्या जोगिया सारखी उत्तुंग, करून कविता खूप लहानपणी मला स्पर्षून गेली. कवितांनी अतोनात समृद्ध केले.
.
पुढे इंग्रजी कविता वाचनात आल्या. विषयाम्च्या वैविध्याचा आवाका जाणवला. इंग्रजीत निसर्ग, अध्यात्म, प्रेम इतकेच काय मासिक पाळी, चाईल्ड इंब्युझ, प्रो-चॉईस अर्थात गर्भपाताचे समर्थन तुम्ही सांगाल त्या विषयावर कविता उपलब्ध आहेत. बर्ड लव्हर्स अ‍ॅन्थॉलॉजी मध्ये तर फक्त पक्ष्यांना कविता वाहिल्या आहेत. इरॉटिक व सेनश्युअल कवितांवरच एक आख्खे पुस्तक आहे ज्यात प्रेमाची इतकी विविध रूपे पाहायला मिळतात. रुमी वरती लिहायचे तर एक स्वतंत्र लेखाचं होईल., अनेक कविता संग्रही ठेवल्या परंतु मग जाणवले की संग्रहात कवितांचा जिवंतपणा जातो. परत परत वाचल्याने बाईट जाते, स्फुललिंग जाते. कविता वाचून दर वेळेस "हाय" मिळत नाही एक बधीरता येते. आणि मग 100-150 कविता एकदा डिलिट केल्या, परत परत विसरून नव्या मानाने, दृष्टीने उपभोगण्यासाठी.
.
सर्व कवि एकजात नामशेष झाले तर? ही माझी सर्वात मोठी भीती आहे. त्याखालोखाल दृष्टी अधू होण्याची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>कविता म्हणजे फक्त पद्य नाही, गद्यात, डोळ्यात, स्पर्शातही कविता असते.

कधीपासून होतंय असं? (ह घ्या)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.