Good Will Hunting

मी मानसिक आजाराच्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे, मला मानसिक आजार, त्यावरील उपचार, किंवा समाज त्या कडे असा पाहतो, त्याचे चित्रपटातून, नाटकातून कसे होते, यात मला रस असतो. ह्या पूर्वी देखील मी त्याबद्दल लिहिले आहे. त्यामुळे, जेव्हा Good Will Hunting हा चित्रपट प्रसारित केला जाणार आहे हे कळल्यानंतर तो मी पाहायला बसलो, आणि तो संपेपर्यंत उठलोच नाही. असे क्वचितच होते.

कथा घडते ती अमेरीकीतील बोस्टन ह्या शहरात. नायक गणित विषयात अतिशय बुद्धीमान आहे(प्रसिद्ध भारतीय गणिती रामानुजनसारखी प्रतिभा आहे, असेच त्यात दाखवले आहे). पण हा नायक हार्वर्ड विद्यापीठात शिकत नसतो तर, तेथे साफ-सफाई कामगार म्हणून काम करतो. विद्यापीठातील एका नामांकित गणित प्राध्यापकाला त्याची प्रतिभा उमजते. पण त्याला हेही समजते की हा काही मानसिक आजाराने ग्रासला आहे(लहानपणीच्या काही अनुभवांमुळे), आणि त्याला समुदेशन देऊन, त्याच्या प्रतिभेच्या लायकीचे त्याला काम करण्यास उद्युक्त करावे अश्या नेक विचाराने, त्याला समुदेशनासाठी वेगवेगळया ठिकाणी घेवून जातो. पण आपला नायक काही त्यांची डाळ शिजून देत नाही. त्याला एकदा तर संमोहन तज्ञाकडे देखील घेवून जातो. तेथेही नायक धमाल करतो. मग शेवटी तो त्याला त्याचा वर्गमित्र असलेल्या प्रसिद्ध समुपदेशकाकडे घेवून जातो. आणि त्यानंतर जे काही घडते ते चित्रपटात पाहायला हवे. चित्रपटात बोस्टन शहराचे छान चित्रीकरण आहे. मी कधी तेथे गेलो नाही. रॉबिन विलियम्सने त्या समुपदेशकाची भूमिका यात केली आहे. त्यासाठी त्याला ऑस्कर देखील मिळाले होते. साधारण दोन वर्षांपूर्वी रॉबिन विलियम्सचे निधन झाले. अतिशय मनस्वी असलेल्या हा कलाकाराने आत्महत्या केली होती असे नंतर समजले. हा चित्रपट पाहिल्यानंतर, आणि विशेषतः त्याची ह्या चित्रपटातील असलेली भूमिका पाहताना, त्याने आत्महत्या केली असेल यावर कसा विश्वास बसावा, नाही का?

मी मानसिक आजार क्षेत्रात Schizophrenia Awareness Association(SAA) या संस्थेतर्फे शुभांकरांचा स्वमदत गट चालवतो. त्यात सामान्य समुपदेशक(lay counselor, facilitator) म्हणून, गटाचा समन्वयक म्हणून काम करतो. येथे आमच्या स्वमदत गटाची महिन्यातून दोनदा भेट होते. त्यावेळेस वेगवेगळ्या अनुभवातून जावे लागते. या चित्रपटातून जसे दाखवले आहे, तसे, अनुभव येत असतात. आपल्याला काही झाले नाही, आपण ठिक आहोत अशी समजूत असते. कोणी तसे दाखवून दिल्यावर, किंवा समुपदेशनाची, उपचाराची गरज आहे असे सांगितल्यास, आगपाखड करणे अश्या गोष्टी घडतात. तसेच, व्यवसाईक समुपदेशकाकडे गेल्यानंतर, समुपदेशनाचा तथाकथित(?) डाव समुपदेशकावरच उलटवणे वगैरे असे प्रकार घडतात. ह्या चित्रपटाच्या निमित्ताने हे सर्व आठवले. आमच्या संस्थेच्या विविध कार्यशाळांत संमोहन, किंवा इतर तत्सम प्रकार मानसिक आजारांत कितीपत उपयोगी पडतात याची चर्चा घडत असते, आणि सर्वसाधारण मत असे असतो की त्याने विशेष फरक पडत नाही. ह्या चित्रपटातून, नायकाला मानसिक आजाराची वेगवेगळी लक्षणे जसे की mood disorder, stress, inferiority complexity, post-traumatic stress disorder इत्यादी संयत पद्धतीने दाखवली गेली आहेत. पण चित्रपटात ह्या पद्धतीने सामुदेशन करताना दाखवले आहे, ते थोडेसे फिल्मी आहे असे म्हणावे लागेल. प्रत्यक्षात, समुपदेशकाने शुभार्थीला धमकावणे, गळा पकडणे इत्यादी प्रकार कसे काय होतील, असा विचार येतो. समुपदेशक आणि शुभार्थी यांचे नाते किती वेगवेगळया पदारांवर असू शकते हे हा चित्रपट नक्कीच दाखवतो.

चित्रपटाच्या नायकाबद्दल थोडेसे. तो आहे प्रसिद्ध अभिनेता Matt Damon. ह्या चित्रपटासंदर्भात असलेल्या विकिपीडिया वर असे लिहिले आहे की Matt Damon नाट्यलेखनाचा अभ्यास करत असताना ह्या चित्रपटाची पटकथा लिहायला सुरुवात केली होती. त्याने ह्या चित्रपटात छान भूमिका केली आहे. त्याने बऱ्याच चित्रपटातून काम केले आहे. नुकतेच असे वाचनात आले की त्याचा नवीन चित्रपट Jason Bourne चीनमध्ये वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. ते कारण म्हणजे, तो 3-D चित्रपट ज्या पद्धतीने चित्रित केला आहे, त्याने प्रेक्षकांना डोकेदुखी सुरु होते म्हणे. तर ते असो. मानसिक आजार, व्यक्ती, उपचार अशा गोष्टी असलेल्या अजून बरेच चांगले(तसेच वाईटही आहेत) चित्रपट आहेत. तेही पाहायचेत केव्हातरी.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

गुड विल हंटींग - हा मास्टरपिस आहे. मी सलग ३ वेळा पाहीलेला आहे.
समुपदेशन हे पूरक असते. मेंदूतील रासायनिक बदल, औषधांनीच नियंत्रित करावे लागतात.
आपल्याला हे सर्व माहीतच असेल्/आहे मी फक्त स्वगत बोलते आहे.
____
गुड विल हंटींग मध्ये मॅट हा तरुण, वयाने लहान व त्या रिबेलस स्टेजमधील दाखविला आहे. रॉबिन विलिअम्स , मॅटच्या संदर्भत स्वतःची ऑथॉरिटी किती हळूवार आणि तरीही कणखरतेने (फर्मली) एस्टॅब्लिश करतो - ने निव्वळ अमेझिंग आहे. मॅटसमोर आदर्श फादर फिगर नसते. पण मॅट ला त्याचे आदर्श मेल मॉडेल हळूहळू रॉबिन विल्यम्स मध्ये सापडत जाते. रॉबिन विलिअम्स ची पत्नी ही त्याचा हळवा कोपरा आहे. तिथे तो कोणालाही मळक्या पावलांनी प्रवेश देत नाही. हा कोपरा मॅट जेव्हा चॅलेन्ज करतो तेव्हा, रॉबिन विलिअम्स ज्या फर्मली आणि फीअर्सली हँडल करतो - इतका छान आहे तो एपिसोड.
.
निव्वळ सुरेख सिनेमा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथा चांगली वाटती आहे.मानसिक आजार हे समाजाने काही कारणाने झिडकारल्याने मनावर जे परिणाम होतात त्यापैकी एक असावा असं वाटतंय.खट्टु/दु:खी होणे/अबोला धरणे/स्वैर वागणे याच्याही पलिकडे असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुड विल हंटिंग ह असा एक चित्रपट ज्याच्या नावावरुन त्याच्या कथानकाचा मला चित्रपट पाहिल्याशिवाय क्धीच अन्दाज आला नाही. प्रायवेट हा सैनिकी हुद्दा असल्याचे माहित नसल्याने सेविंग प्रायवेट रायन बाबतही अन इतर अनेक चित्रपटांबाबत माझी अशी गंमत होते. असो...

मला अतिहुशार लोक फार आवडत नाहीत. ते वास्तववादी वाटत नाहीत त्यात जर ते मनोरुग्ण असतील तर त्यांचे नखरे हुशारीचा शो ऑफ तर बघायलाच नको. आनी हे सर्व व्यवस्थीत गुड विल हंटींग सादर करतो ते इतक्या आदर्शपणे की मध्यालाच चित्रपटाच्या शेवटाचा अंदाज सहज येउ लागतो... स्मथिंग लाइक स्वदेस अनुभव. आता काय होणार माहीत आहे तरी आपलं बघत बसायचे अशी काहीशी वेळ स्वदेस वा गुड विल हंटरमधे येउन जाते Sad

खरे तर स्व्तःच्या हुशारीचा आपली ठळक मानसीक वैगुण्या झाकण्यासाठी वापर करणार्‍यांना दोन कानफाटात लावुन सुधरवावे हे माजे वैयक्तीक मत असल्याने आख्खा चित्रपट चांगाला अभिनय व स्टारकास्ट असुनही भंपक वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

मिळाले एखादे चांगले तर घ्या. फायदाच होईल. असो.

-मनोरुग्ण (ह्या 'मन' अन ऐसीवरील मनोबा यांचा काही संबंध नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile