मोहीम - १ पॅम्प्लेट्स इन्सर्शन

माझ्यासाठी ५.०० एएम म्हणजे लेट नाईट असते बर्‍याचदा पण अर्ली मॉर्निंग कधीच नाही. तरीही ह्या पंचपंचऊ:षकाले अ‍ॅक्टीव्हाला किका मारुन वैतागलोय. बटनस्टार्ट तर होतच नाहीये, किक अ‍ॅणि स्टॅन्डमधला फरकही कळत नाही. स्वतःची नेहमीची बाईक देऊन मागून घेतलीय मित्राची अ‍ॅक्टीव्हा. कारणही तसेच. धंदा हो. दुसरे काय. इन्सर्शन्स टाकायचेत एक लाखभर.
.........................
इन्सर्शन्स म्हणजे आपले पॅम्पलेटस हो. फ्लायरपण म्हणतात बरेच क्लायंट. ते नसतात का शन्वार रविवारच्या पेपरच्या पानात. पेपरची घडी उलगडताना सुळ्ळकन सांडतात. एकदा बघितले की पुड्या बांधायला, विमान करायला नाहीतर काचा पुसायला उपयोगी येतात ते. तेच इन्सर्शन्स. न्युजपेपरात इनसर्ट करुन पाठवतात म्हणून इन्सर्शन्स. मार्केटिंग कॅम्पेनवाले सेमिनार, इंडक्शने, वर्कशॉप, एक्झिबिटस, जायंट डिस्प्लेज, शोज आदी नखरे करुन दमले आणि तरीही धंदा होत नसेल तर केले जातात ते पॅम्पलेटस. लहानसहान स्नॅक्स सेंटरापासून आक्खा मेनू होमडिलीव्हरी नंबरासहीत छापणार्‍या हॉटेलाचे लाडके अ‍ॅडव्हर्टाझिंग हत्यार म्हणजे पॅम्पलेट्स. वजने कमीजास्त करुन देणार्‍या डॉक्टरापासून ते एमएससीआयटी वाटणार्‍या सेंटरांचे आवडते माध्यम म्हणजे पॅम्पलेटस. एवढे करुन नोकरी लागत नसल्यास एलायसी एमएलएम नायतर न्युट्रापतंजलीहर्बल्स असे कायतरी पॅम्प्लेटसाठी असतेच.
.........................
तर अशाच एका मल्टीन्याशनल कंपनीचे आम्ही लाडके व्हेंडर. लाडके म्हणजे दहा वेळा आमचे तोंड पाहण्यासाठी आमची बिले सगळ्यात उशीरा दिली जातात. त्यांचे क्रियेटिव्ह डिझाईन येते मुंबईवरुन. अर्थातच ते आम्ही न वापरत असलेल्या फॉर्म्याटात असते. साईजही इथे उपलब्ध असलेली कधीच नसते. इथली ऑफिस हेड ते पाहूनच वैतागलेली असते. कारण सोलापूरकरांना आधीची हुच्च डिझाईन न झेपल्याने धंदा थांबलेला असतो. तिला लोकल भाषेत पाहिजेत जाहीराती. आम्ही त्या बनवतो कशाबशा. त्या अ‍ॅप्रुव्ह होऊन ऑर्डर दिली जाते. कोटेशन्समधले रेट मॅडमना समजत नसतात. सोळा हजार पॅम्प्लेटसना ८७०० रुपये म्हणजे "अरे हे दोन रुपयाच्या आसपास जातेय रे" म्हणणारी ही बाई. शेवटी लाखभराची ऑर्डर झाली की घाई होते. उद्या संडेला रीडर्स जास्त असतील, मग उद्याच्या पेपरला येऊ दे असे शनवारी दुपारी सांगितले जाते. डिझाईन सेट करुन प्लेटा मारुन मशीनीवर चढायला संध्याकाळ. प्रिंट होऊन कटिंग व्हायला रात्री १२ वाजतात.
.........................
हे पॅम्पलेट्सचे रेट साईज, पेपर आणि प्रिंटिंग वर अवलंबून असतात. सगळ्यात हलका कागद तो ६० जीएसएम चा जाहीरात कागद. हा वेस्टकोस्टचा असतो पण जाहीरात कागद म्हणूनच ओळखतात. गुलाबी, पिवळा, निळा, हिरवा अशा फिक्क्या रंगात मिळतो. त्यावर एकरंगी छपाई केली जाते. हा सगळ्यात स्वस्त प्रकार. मग मॅपलिथो. ह्यावर चाररंगी/बहुरंगी छपाई केली जाते. नंतर आर्टपेपर. हा ९० जीएसएम ते १३० पर्यंत मिळतो. हा ग्लॉसी. अर्थातच महाग. साईज १/८ म्हणजे आपल्या एफोर च्या निम्मा. १/४, १/५ हे रेग्युलर चालणारे फॉर्म्याट. किंमती साधारण २५ पैसे प्रति पॅम्प्लेट ते १.२० रुपये प्रति अशी पडते.
.........................
डिझाईन, प्रिंटिंग वगैरे सोपस्कार पार पडल्यावर ते न्युजपेपरात वाटायला द्यावे लागतात. लहान सहान क्लायंटस स्वतःच नेऊन पेपरवाल्या माणसाला देउन टाकतात. ते हजारभर पॅम्प्लेटससाठी तीन चारशे रुपये घेऊन निम्मे गट्ठे रद्दीवाल्याला विकून मोकळे होतात. मोठ्या कंपन्या ही खेंगटी आमच्या गळ्यात बांधतात. बर बांधतात ते बांधतात, त्यांचा विश्वासही नसतो. एका फ्रेशर एमबीएच्या गळ्यात हे कॅम्पेन असते. "यू डोंट वरी, साहील वील म्यानेज एवरीथिंग. जस्ट कोऑपरेट हिम" असा वरुन आदेश मिळाल्यावर साहीलसाहेब फोन नंबर देऊन एकदा वॉस्सप पिंगून गुडूप झोपतात.
.........................
रविवारी पहाटे गट्ठे चार चौकात पोहोचतात. शहरांचे वृत्तपत्र विक्रेत्यांचे विभाग असतात. त्यांचे ठिय्ये ठरलेले असतात. चार साडेचारच्या सुमाराला एकेक क्रूझर, ओमनी पेपर घेऊन यायला सुरुवात होते. अर्ध्या तासात तेथे मंडईची कळा येते. साताठशे विक्रेते ठरलेल्या जागी असतात. स्ट्रीट लाईटस वगैरे लागलेले असतात. प्रेसची स्टीकरे लागलेल्या टूव्हीलर्स आणि सायकलींच्या गर्दीत स्वेटशर्ट आणि कानटोप्यांची लगबग चालू असते. वृत्तपत्राचा एजंट ठराविक प्रती त्या त्या मुख्य विक्रेत्याला वाटून पैसे घेऊन निघून जातो. लोकल छापलेले पेपर आधी येतात. एक्स्प्रेस, लोकसत्ता, हिंदू, डीसी, व्हीटी हे उशीरा येतात. मुख्य विक्रेत्याकडेच पॅम्प्लेट वाटपाची जबाबदारी दिली असल्याने आम्ही फक्त खेळ पाहात उभे असतो. त्यांचीही संघटना, अध्यक्ष, सचिव वगैरे असतात. त्यांनी ठेवलेले उपविक्रेते असतात. त्यांच्याकडची लाईन टाकणारी मुले असतात. आजही पेपरलाईन टाकून शिक्षण पूर्ण करणारी मुले आहेत. शिवाय हे पॅम्प्लेटसचे काम म्हण्जे त्यांना बोनस असतो. सगळ्यांकडे गट्ठे मिळाले की ते सोडवून त्यात पुरवण्या टाकण्याचे काम सुरु होते. त्यासोबतच ही पॅम्प्लेटस सरकवली जातात. ह्या सरकवण्याचे त्यांना प्रति पॅम्प्लेट २० ते २५ पैसे मिळतात. म्हणजे हजारी दोनशे रुपये. ते जागीच रोख द्यावे लागतात. मुख्य विक्रेत्यासोबत व्यवहार असल्यास तो वाटपाची व दोन दिवस साईडची जबाबदारी घेतो पण ५ पैसे जास्त घेतो.
अ
दहा कॉल झाल्यानंतर साहीलसाहेब जॉगींग सूट वगैरे चढवून अवतीर्ण होतात. पॅप्म्प्लेटस पेपरात घुसतानाचे स्नॅप्स मोबाईलात कैद होतात. वेगवेगळ्या हेडरचे, वेगवेगळे विक्रेते इन्सर्शन करत असताना स्नॅप्स घेतले जातात. ते त्यांना रिपोर्ट करायचे असतात. हि सगळी प्रोव्हीजन का तर ह्या धंद्यातही चालते चालूगिरी. सुरु होते प्रिंटरपासून. लाख म्हणताना पॅम्प्लेटस छापली जातात ९० हजार. कारण ही कोण मोजत बसत नाहीत. मग आम्ही आता प्रिंटर मशीन काउंटरचा पण स्नॅप देतो. नंतर हे विक्रेते. निम्मेच गट्ठे टाकले जातात. उरलेले रद्दीत जातात. ह्या रद्दीतल्या पॅम्प्लेटसचे चाहते म्हणजे पानपट्ट्या अन स्नॅक्स सेंटरवाले. पाठकोरे पॅम्प्लेटस बाइंड करुन वापरणारेही कस्टमर असतात. फोटो काढून कस्टमर सरकले की गट्ठा हळूच सरकवला जातो. मग त्यासाठी शेवटच्या गट्ठ्यापर्यंत स्नॅप करावे लागतात. वेगव्गळ्या एरीयातले, वेगवेगळ्या पेपरचे असे एजंटस स्पॉटचे स्नॅप्स एकत्र करुन बिलासोबत अ‍ॅटॅच करुन वाट पाहावी लागते ती चेकची.
.........................
हे पॅप्म्प्लेट्स साधारण डबल पेपर, डबल कस्टमर, ऑफीस, वाचनालये असा क्रॉस काउंट काढला तरी ६० टक्क्यापर्यंत सर्क्युलेट होतात. रविवारी, सुटीच्या दिवशी पडलेली पॅम्प्लेट्स वाचली जातात. ह्यांचा वाचक वर्ग मुख्यतः गृहिणी आणि पेन्शनरवर्ग. कुपन्स/व्हावचर्स /मेनू असलेली पॅम्प्लेटस जपून ठेवली जातात. पॉकेट कॅलेंडर, कटिंग केलेले स्कूटरेटचे चित्र, सुगंधी बुकलेट अशा टाइपची इन्सर्शन्स सक्सेसफुल होतात. जाहीरातदार त्याचे काम करतो अन मग ते बघायची, नीट वाचायची, वाचून त्यावर काही कृती करायची जबाबदारी मात्र ग्राहकराजाची.
.........................
(जाहिरातीची वेगवेगळी शस्त्रे वापरुन चालवल्या जाणार्‍या मोहिमेचा हा पहिला भाग. क्रमश: ह्या हत्यारखान्याची ओळख करुन देण्याचा हा प्रयत्न. धन्यवाद )

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

वा! ये बात! जबरदस्त लिहितोयस अभ्या! पुभाप्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हेही एका वेगळ्या विश्वातले सबविश्वच म्हणायचे. जबरी ओळख करून दिलास बे, अभ्याला भेटलो तेव्हा ही मेड इट साउंड सो डॅम ईझी, पण तुकोबा म्हणतात तसे करणी करता टीर कापे त्यातली गत आहे ही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ही मेड इट साउंड सो ईझी. खरोखर.
तिळा उघड म्हटल्यावर रत्नखचित गुहेचे दर्शन होऊन डोळे विस्फारावे तसे या धाग्यावर क्लिक केल्यावर झाले.
छोटी छोटी वाक्ये,सोपी अनलंकृत भाषा.अनौपचारिक. काही तरी फार मोठी धडपड वर्णन करतोय असा आव अजिबात नाही.प्रत्यक्षात तशी असूनही.
खूप आवडले.
ता.क. आजच्या लोकसत्तेत डव शाम्पू आणि कण्डिशनरचे सॅशे होते.त्यातला कण्डिशनर फुटून बाहेर येऊन पानांना चिकटला होता. पेपर हातात घेताक्षणी बोटे चिकट झाली. एका हातात चहाचा कप होता. डवच्या तीव्र दाट वासासह चहा पिणे कठिण झाले. असले अद्भुत-चिकट काही जीवघेणे पाठवून चहाचा आस्वाद बिघडवल्यामुळे थोडी चरफड झालीच. आणि पेपराची दोन पाने खराब झाली. वर कंडिशनर मिळाला नाही तो नाहीच.
जिथे चिकटवले होते तिथे मागे कुंडलकरांचा लेख होता. तो वाचण्याची वेळ आली नाही हा त्यातल्या त्यात फायदा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छोटी छोटी वाक्ये,सोपी अनलंकृत भाषा.अनौपचारिक.
+१
"कण्डिशनर फुटून बाहेर येऊन पानांना चिकटला होता." तो खास फाडलेलाच असावा. ही पण एक प्रकारची मार्केटींग टेक्निकच...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त लेख. एका नव्या विश्वाची ओळख होते आहे. प्रत्येक पेपर उलगडून त्यात पॅंप्लेटं टाकली जातात हे माहीत नव्हतं. मला वाटलं होतं की वर्तमानपत्राच्या ऑफिसातच पेपराच्या घड्या करण्याच्या यंत्रांमध्ये ते घालण्याची सोय असेल. अर्थात नक्की कुठच्या पॅंप्लेटवाले पेपर कुठचे हे कळणं कठीणच जात असेल.

पण लाखभर पॅंप्लेटं पेपर उघडून त्यात घालायची म्हणजे चिक्कार वेळ आणि पोरं लागत असतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही लेखमालिका सुरू केल्याबद्दल आभार. कुतुहल आहेच या व्यवसायाबद्दल.

>>त्यांचे क्रियेटिव्ह डिझाईन येते मुंबईवरुन. अर्थातच ते आम्ही न वापरत असलेल्या फॉर्म्याटात असते.<<
.....हे असे का व्हावे? म्हणजे १/५, १/४ या आकारात टाकले तर मुंबईवरून आलेलं डिझाइन लांबी वा रुंदीला ताणलं जातं असं का? शिवाय तुम्हांला जी समस्या येते ती मुंबईवाल्यांना येत नाही असं असतं का? कारण मुंबईतही ती पत्रकं वर्तमानपत्रांतूनच वाटली जाणार असतील, नाही का?

आणखी एक प्रश्न. पुढल्या भागांत त्याबद्दल येणार असेल तर प्रश्न आत्ता बाद समजा.
रस्त्यावर उभे राहून जाहिरातपत्रकं वाटणार्‍यांना श्रमाचा मोबदला किती मिळतो? तो कसा ठरतो?
--
तुम्ही लेखात टाकलेलं चित्र विन्डोज + क्रोम अथवा फायरफॉक्सवर दिसत नाही आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@अमुकराव
फॉर्म्याटात फरक म्हणजे फाईल फॉर्म्याटात फरक. अ‍ॅडोब इल्स्ट्रेटर आणि इन डिझाईन हे डिझाईनिंग साठी पुण्यामुंबईत वापरले जाते. रेस्ट सगळीकडे कोरल ड्रॉ वापरले जाते. फाईल्स हमखास इल्स्ट्रेटर फॉर्म्याटात येतात. अगदीच दया केली तर ईपीएस करुन सेव्ह करुन देतात. फॉन्टस कर्व्ह करुन देणे हा सोपा पर्याय टाळून फॉन्ट डिरेक्टरी पाठवली जाते. ते इन्स्टॉल करुन घ्या असे म्हणणे असते. मुंबईच्या एजन्सीचे ते क्लायंट म्हणजे बलुतं असल्यागत असते. क्लायंट डेडिकेटेड आर्टिस्ट अन पीसी असे लाड तेथे परवडतात. आम्ही एकदोन जॉबसाठी तेवढा आटापिटा का करावा? बरं आम्ही त्यात फक्त साईज चेंज करुन घेतो पण तेही पॉसिबल नसते. व्हेक्टर फाईल पाठवणार नाहीत. पीएसडी पाठवल्या तर मास्क्स वगैरे लॉक करुन पाठवणार. एक पॅम्प्लेटसाठी दिडदोन जीबीची वीट्रान्स्फर लिंक डाऊनलोड करुन घ्या, त्यातून ती फाईल हुडका आदी सोपस्कार करायला लावतात. काही काही जॉबमध्ये फरक करावा लागतो. (फ्रंटलिट फ्लेक्स जरासे १० टक्के लाईट करावे लागते, बॅकलिट जरासे डार्क करावे लागते) साईजेस पण गावागावात वेगवेगळ्या प्रचलित असतात. सोलापुरात ऑफसेटला १२ एमेम ग्रिपर असेल पुण्यात तसाच वापरतील असे शक्य नसते. तर अशा गोष्टी करताच येत नाही. मग त्यांचा एरीया एक्झिक्युटिव्ह जो फक्त कॉपीबुक असतो तो शहाणपण शिकवत बसतो. १२.५ एमेम म्हण्जे १२.५ च अशी भाषा असते. तेवढ्या वेळात आमची लोकल चार कामे आटोपतात.
एकदा काम मिळाले की कायमचे चालते, पैसे उशीरा का होईना मिळत राहतात एवढ्या गोष्टीसाठी काम करत राहणे एवढेच हातात.
.
रस्त्यावर उभे राहून जाहिरातपत्रकं वाटणार्‍यांना श्रमाचा मोबदला किती मिळतो? तो कसा ठरतो?
ते रोजंदारीचे लोक्स असतात. साधारण २०० ते ४०० रुपये प्रतिदिन असते. तो ठरण्याचे प्रकार असतात.
१) छान ड्रेसातल्या छान मुली: मॉल्स आणि कम्प्युटर इन्स्ट्यिट्युट वगैरेसाठी: ५०० रु.
२) चंट यंग स्टुडंटस टाईप पोरे: मॉल, मल्टीप्लेक्स व फिरुन करण्यासाठी: ५०० ते ७०० रु.
३) एमबीए, बीबीए, बीबीएम करणारी ब्लेझर ग्यांगः प्रोजेक्टच्या नावाखाली फुकट, नाश्ता, सर्टिफिकेट आणि पैसे देतात शक्यतो. फिक्स नाही.
४) बिहारी, युपी पोरे: कुठेही, काहीही, कसेही वाटण्यासाठी : ३०० रु.
५) नॉर्मल मुली/मुले: काहीही वाटपासाठी: ४०० रु.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सविस्तार उत्तरांसाठी ठांकू!

एका फाइलफॉर्म्याटाचे दुसर्‍यात रूपांतर करताना तोच दर्जा, रंगसंगती, छायाप्रकाशाच्या छटा टिकवणे कठीण असते हे स्वानुभवाने माहीत आहे. त्यामुळे सहानुभूती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभ्या शेठ ,
एका माहिती नसलेल्या व्यवसायाची अतिशय छान माहिती !! पुढच्या भागाची वाट बघतोय .
( अभ्याशेठ ची एकंदरीत कार्यव्यग्रता बघता ते ऍक्टिवा सोडून थोड्याच दिवसात fortunar घेणार दिसतंय !!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुठली फॉर्चुनर बापटाण्णा, अजून धडपड चालूच आहे.
आधीची बाईक मायलेज देत नव्हती. सध्याची बाईक पण आमच्या हिरॉइनने गिफ्ट दिलीय. Wink
.
मी चुकूनही फोरव्हीलर घेतली तरी बोलेरो पिकप घेईन. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच ! तुमचा लेख वाचून लहानपणचे दिवस आठवले. सक्काळी सक्काळी उठून पेपर टाकणे (महिना ४० रु. फक्त) त्यातही नगरसेवक राहत असणारी बिल्डींग माझ्याकडे होती त्यामुळे फुकटचं छाती दोन इंच फुगवून चालणं, रात्री लायटीच्या खांबांवर चढून क्लासेसचे फ्लेक्स बांधणे (हे घरच्यांच्या अपरोक्ष) अशी कामे केली ती झरकन डोळ्यासमोरुन गेली.
पुर्वीच्या काळी पेपरची लाईन टाकून मोठे होणार्‍यांना मान होता. आता काळं कुत्रं बी हिंग लावून विचारत नाही. उलट एखाद्या बिल्डींगमधे चोरीबिरी झाली तर सोसायटीवाले पहिले यांच्यावरच शक घेतात.

शिवाय असं सांगणं म्हणजे स्वतःला डाऊनमार्केट करुन घेणं. असो ! गेले ते दिन राहिल्या त्या आठवणी.

प्रिंटींगव्यवसायात देखील ४-५ वर्षे काढली असल्यामुळे लेखाशी चटकन रिलेट होता आलं. ( कालखंड : अ‍ॅल्डस पेजमेकर ५ ते अ‍ॅडोब पेजमेकर ७ आणि कोरल ४,५ वापरण्याचा. नंतर कोरल १२ पर्यंत वापरले पण आपला खरा जीव होता पेजमेकर वरच. गणेशोत्सव मंडळांचे अहवाल छापायला एकदम नामी. कोरलवाली मंडळी एकदम तोंडात बोट घालून बगायची. आता बहुधा पेजमेकर वापरणारी जमात नामशेषच झाली असावी.

जुन्या आठवणी जागवल्याबद्दल धन्यवाद !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभ्या. तुझी शैली नेहमीच उत्कृष्ट असते. तू मुळात छपाईच्या किंवा डिझाईनच्या वगैरे व्यवसायासाठी बनलेला नसून उत्तम
लिखाणासाठी बनला आहेस.

लगे रहो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'दूध पिशवीतून येतं' छापाचं अज्ञान दूर करणारा लेख. तुमची हत्यारं एकेक करून दाखवाच अभ्याशेट, बघायला मजा येत्ये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मस्त लेख. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगलं लिहिलय. लक्षपूर्वक वाचतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

नियम पाळला ह्यावेळेला मनोबानी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काये तो नियम?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख एका आयडीने, प्रतिसाद दुसर्‍या आयडीने आणि खरी मतं डुआयडीने सांगणे... Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अरारा तो नियम व्हय. आधी मनोबा इज्जतीत सांगायचा हे स्वाक्षरीत. डूआयडीचे शेपूट लावल्यापासून तेही संपले.
काय बदलतात नै मनं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि खरी मतं डुआयडीने सांगणे... (डोळा मारत)

ROFL ROFL आवरा!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरी मतं डुआयडीने सांगणे

ठ्ठो ROFL ROFL ROFL ROFL मेलो मेलो ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अभ्या शेठ , वाट बघतोय पुढच्या भागाची ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचतोय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज उशीराने वाचला.. स्वारी मालक!
पण वाचल्याचे सार्थक झाले!

मी जिथून बस पकडतो तिथला पेपरवाला मालक ओळखीचा आहे. बस येईपर्यंत त्याचे बरेचसे पेपर संपले असल्याने त्याच्या फिजुल फुका मारणे चालु असते. आमच्या रोजच्या तिथे असण्याने त्याला आमच्या निष्क्रीय इंटरेस्टची सवय झालीये.

त्यांच्या नजरेतून ही 'दुन्या' (क्लायंट, तुम्ही (म्हणजे प्रिंटरची मान्सं), साहिल, पोरे नि गिर्‍हेक ) अजून वेगळ्या कोनातून दिसते. Wink

त्या पार्श्वभूमीवर अधिकच मजा आली!

पुढिल भाग बहुदा निवडणुकांनंतरच येईल नै?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!