"मार्टिनी"- अमेरिकन पेय

युरोपियन वाईन ग्लासांची स्त्रीच्या शरीराच्या मोहक गोलाईची थीम सोडून, एखाद्या गगनचुंबी बिल्डिंगसारख्या सरळसोट लाईन्सवाला मार्टिनी ग्लास तुम्हाला आधुनिक काळात पोचवितो. तुमच्या हाताची उष्णता पोचून मार्टिनीचा अती-थंडपणा बिघडू नये म्हणून त्याची बारीक दांडी ग्लासाच्या "पात्रापासून" पूर्ण वेगळी ठेवलेली असते. उत्तम प्रतीचे अल्कोहोल अतिशय थंड तपमानाला प्यायल्यास घशात अजिबात जळजळ होत नाही; चांगल्या मार्टिनीचे हे खरे लक्षण!

अमेरिकन भांडवलशाही युरोपियन भांडवलाच्या वर्चस्वातून सुटून आपले सार्वभौमत्व स्थापित करत असल्याची एक खूण म्हणजे मार्टिनी; गगनचुंबी इमारती, जाझ संगीत, बिझनेस सूट याप्रमाणेच.

मार्टिनी : अमेरिकेने जागतिक संस्कृतीला दिलेली सर्वोत्तम भेट, आणि 'सुनीत' या वृत्ताइतकी काव्यात्म.

एकोणीसशे तीस सालापासून अमेरिकेचा उदय होत होता, फ्रॉइडचे मानसशास्त्र फॅशनेबल झाले होते , "व्हिक्टोरियन" आणि "शुचितावादी" या शिव्या बनल्या होत्या. त्याच काळात डोरोथी पार्कर ही प्रसिद्ध कवियत्री लिहीत होती :

मला हवीय आता एक मार्टिनी,
हं, फार फार तर दोन,
तीन मला नेतात टेबलाच्या खाली
चारनंतर मित्राच्या अंगाखाली !

१९४३ साली जेव्हा दोस्त राष्ट्रांचे नेते नाझी जर्मनीच्या पराभवाची मोहीम आखण्यासाठी तेहरानमध्ये जमले होते, तेव्हा प्रेसिडेंट रूझव्हेल्ट यांनी जोसेफ स्टालिनना टोस्ट प्रपोझ करण्यासाठी पेय दिले, ते होते 'मार्टिनी'. स्टालिन यांनी जरा कुरकुर केली, ते पोटाला फार गार लागते वगैरे, पण शेवटी ते सामील झाले. त्या मोहिमेला मग 'चार मार्टिनींचा समझोता' असे नाव पडले. हे घडण्याच्या काळात 'मार्टिनीची करिअर' शिगेला पोचली होती. मार्टिनीने अत्युत्तम घाट, एक गूढ आकर्षण आणि लेखनाचा आवडता विषय असे टप्पे पार केले होते. 'गुंडांच्या पेया'पासून मार्टिनीने आंतरराष्ट्रीय उच्चच्भ्रू वर्तुळांपर्यंत मजल मारली होती. दोन दशकांनंतर मार्टिनी जेव्हा ख्रुश्चेव यांना दिली गेली तेव्हा त्यांनी तिचे वर्णन 'अमेरिकेचे गुप्त, महाघातक अस्त्र' असे केले.

'कसिनो रोयाल' या बॉण्डपटातली बॉन्डची मार्टिनी (हिला व्हेस्पर मार्टिनी असेही नाव आहे) :

गोर्डन्स जिन : ६० मिली
व्होडका : २० मिली
व्हरमूथ (लिलेत ब्लांक) : १० मिली

बर्फाचे तुकडेवाल्या मिक्सरमध्ये ही तिन्ही पेये खळाखळा हलवून गाळून मार्टिनी-ग्लासमध्ये भरली जाते.
शेवटी ग्लासाच्या काठाला लिंबाचा पातळ काप खोचून ठेवला जातो .

मार्टिनीत उत्तम दर्जाची जिन/व्होडका सोडल्यास बाकीचा फापटपसारा फारच कमी असतो. फ्लेव्हरसाठी व्हरमूथ ही वाईन किती वापरायची यावर तज्ज्ञांत अर्थातच कडोविकडीचे मतभेद आहेत. ती जितकी कमी, तितकी तुमची मार्टिनी अधिक प्रौढ, अधिक 'नागर'. त्यामुळे मिक्सरमध्ये जिन आणि बर्फ घालून झाकण लावा, आणि त्यावर हलकेच "व्हरमूथ" असे म्हणा (फार जोरात म्हटल्यास मार्टिनी बिघडेल!!!) अशा सूचना सापडतात. अशीच जिन भरून, मिक्सर हातात घेऊन, फ्रान्सच्या दिशेने अदबीने झुकून एक 'बो' घेतला की पुरे, असे चर्चिल यांचे म्हणणे होते.

व्हिस्की वापरून बनविल्या मार्टिनीला 'मॅनहॅटन' म्हणतात. स्कॉच वापरल्यास त्या पेयाला 'रॉब रॉय' म्हणतात. व्होडका आणि सफरचंदाची आंबट लिकर वापरून 'ऍपलटीनी' बनविली जाते.

मार्टिनीच्या बारमध्ये पोचल्यावर, तिथल्या बाटल्यांच्या दर्शनानेच तुमची मनःशांती वाढू लागेल.
आता घाई कशाचीच उरली नसेल. एखादे बारीकसे गाणे गुणगुणले तरी चालेल, पण कशाला?
शीळ मात्र घालू नका, कारण तुमचे सहप्रवासीही निघाले आहेत तंद्रीकडे.
दोन मार्टिनीनंतर आपोआपच गाणे सुरू होईल तुमच्या मनात!
----

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

मस्त लिहिले आहे हो मिलिंदशेठ . (आता हे करणे व पिणे आले)
(अर्थात एक छोटासा तांत्रिक मतभेद .... जॅझ हे अमेरिकन खरे , पण त्याचा अमेरिकन भांडवलशाही शी संबंध ज..... रा लांबचा होतोय असे नाही का वाटत )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे मान्य आहे. जाझ संगीत हे अति-गरीब कृष्णवर्णीयांचे शिकागोत जन्मलेले संगीत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

न्यू ऑर्लिन्स हो , शिकागो नाही ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी वेगळे वाचल्याचे स्मरते! असो!
मार्टिनी तर बनवा! शुभेछा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

The Martini
The quintessential classic should be
stirred, not shaken to allow the cocktail
to retain its silky texture, and not be
aerated.
2.5 oz. London Dry Gin (such as
Bombay Sapphire)
.5 oz. Dry Vermouth (such as Noilly
Pratt Original Dry)
Garnish: Olive, Twist or both
Method: Combine gin and vermouth
over a mixing glass filled with ice and
stir well for 20-30 full seconds until
very cold. Strain into a Martini glass
and garnish.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

पण मग ब्रिटिश सिक्रेट सर्व्हिसचा जासूस ही अमेरिकन ब्लास्फेमी का पीत असे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आबा , मद्य पवित्र असतं . त्यानी धर्म संस्कृती बुडत नाही . ( शिवाय ते डिसइन्फेक्शन अल्कोहोल वगैरे ...असो.)
तुमच्या विलायतेची सदाशिव पेठ हि फारशी कर्मठ राहिली नाहीये .... आता म्हणे तुमची राष्ट्रीय डीश पण वसाहतीतून आलेली आहे म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चिखन टीखा मसाला म्हणताय ना. भयप्रद डिश आहे ती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

चिखन टीखा मसाला

एका प्राचीन जोकची अआतह्वण झाली.

कॉलसेंटरच्या इंटरव्ह्यूत क्यांडिडेटला म्हणतात, "से समथिंग इन ब्रिटिश अ‍ॅक्सेंट".

"टुम को डूगना लागान डेना पडेगा!" ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Smile

माझीही एक अआतह्वण:

माझ्या कॉलेजजीवनात मनाविरुद्ध काही गोष्ट घडली की त्याला जबाबदार माणसाचा तबादला मध्य अफ्रीका के रेगिस्तानों में करायची पद्धत होती.

(उदा० "हे काय गोविंद? क्लासिक माईल्ड संपली? तुझा त० म० अ० के रे० में करायला पाहिजे...")

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

maybe he was just after a really, really big hit of alcohol. According to a recent study in the British Medical Journal, the spy drinks so much he is at risk of impotence, liver damage and early death.

Researchers worked out that across the James Bond books, the spy downs 1,150 units of alcohol in 88 days: around 92 units a week, or four times the recommended maximum intake for men in the UK.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

सोचा है ये मैने पी के अक्सर
नशे मे ये रौशनी सी क्या है (कोणीतरी बुखारी)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माशाल्ला! बहोत खूब!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

"Shaken not stirred please...!!"

छान रेसिपी. व्हरमुथची गरज नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0