सत्तरच्या दशकातील रॉक

१९२० च्या दशकात ब्लूज आणि स्विंग , १९५० च्या दशकात रॉक अँड रोल हे नवीन जॉन्र आले,स्थिरावले आणि लोकप्रिय झाले .
रॉक म्युझिकची सुरुवात जरी १९६० च्या दशकात झाली असली तरी १९७० च्या दशकात जास्त संख्येने अत्युत्तम रॉक गाणी झाली . इथे त्यांचा थोडा परिचय देत आहे . काय ऐकताय या धाग्यावर सुरुवात केली होती . मॅनेजमेंट च्या आदेशामुळे वेगळा धागा काढत आहे .
मालक जंतू यांच्या आदेश /हुकुमावरून ख फ वरून हि गाणी धाग्यावर आणत आहे .

सत्तर च्या दशकात रॉक जॉन्र मध्ये फार थोर थोर गाणी रचली गेली . चौदाव्यानी अशी काही गाणी सुचवा म्हटले होते , म्हणून हि सत्तरच्या दशकातील माझी सगळ्यात आवडती रॉक गाण्याची लिस्ट काढली होती . या गाण्याचे मुख्य आश्रयदाते श्री श्री आचरट बाबा आहेत .
आजपासून यातील एकेक गाण्याच्या लिंक चिकटवत जाईन .
कुणी जर ऐकलीच आणि कुणाला जर इंटरेस्ट वाटलाच तर काही त्या गाण्याबद्दल काही सांगीन .
( गाणी , विशेषतः गजला या विषयी लोकांनी अमाप कचरा लिहून ठेवला आहे . त्यात भर नको म्हणून ही काळजी )
हि ती लिस्ट टॉप ची
१. स्टेअरवे टू हेवन
२. फ्री बर्ड
३. स्वीट होम अलाबामा
४. हॉटेल कॅलिफोर्निया
५. बोहेमिअन र्हाप्सोडी
६. सलटन्स ऑफ स्विंग ( हि ओरिजिनल पेक्षा अनेक लाईव्ह परफॉर्मन्सेस मधील एक्सटेंडेड व्हर्जनच ऐकणे . यु ट्यूब वर आहेत सर्व)
७. स्मोक ऑन द वॉटर
८. हायवे टू हेल
९. वि विल रॉक यु
१०. अनादर ब्रिक इन द वॉल
११. माय स्वीट लॉर्ड
१२. इमॅजिन
१३. बॉर्न टू रन
१४. ब्रिज ओव्हर ट्रबलड वॉटर्स
१५. पॅरानॉईड
१६. ले डाऊन सॅली
१७. कोकेन
१८. टॅंगल्ड अप इन ब्लू
१९. आयर्न मॅन
२०. अमेरिकन पाय
२१. हायवे स्टार

स्टेअरवे टू हेवन आणि फ्री बर्ड पूर्वी इथे लिंक दिल्यामुळे ते टाळून डायरेक्ट तीन नंबर ला जातोय .
'स्वीट होम अलाबामा'उत्तम व लोकप्रिय गाणे , सदर्न रॉक मधले , ग्रुप लिनर्डस्किनर्ड . नंतर अनेक चित्रपटात हे गाणे वापरले गेले .
विशेष श्रवणीय : एक्सटेंडेड गिटार सोलो आणि पंची बीट
दोन लिंक्स देत आहे

,आणि दुसरे , लाईव्ह ज्याच्यात ऑडिओ च मिक्सिन्ग गंडलंय , पण लाईव्ह ची मज्जा आहे . १९७७...

दुसरे मूळ गाणे लिरिक्स बरोबर

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

वाचतोय, गाणी ऐकली.
- मागच्या बाकावरचा विद्यार्थी.
----
तुमची गाणी ऐकण्याची आवड कशी आणि केव्हा लागली तेही लिहा॥

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे गाणे बहुधा या लिस्ट मधले भारतात सगळ्यात जास्त वाजवले गेलेले असावे . ईगल्स चे .

ऐशीच्या दशकात पुण्या मुंबईतल्या रॉक ग्रुप्स च्या लीड गिटारिस्ट ना हॉटेल कॅलिफोर्निया ( आणि Sultans of swing , जे उद्या लावणारे ) या दोन कठीण परीक्षा पास व्हायला लागायच्या . या दोन्ही गाण्यांना 'आरती'असे संबोधले जाई . हि आरती नेहमी कार्यक्रमात शेवटी असे . आणि या आरत्यांना लीड गिटारिस्ट कसा वाजवतोय यावर लै चर्चा होई .

एकाहुन जास्त अतिशय कुशल लीड गिटारिस्ट असलेल्या तुरळक बँड्स पैकी हा एक . ( कालचा लिनर्डस्किनर्ड मूळ संच हा अजून एक यातलाच )
अशा बँड्स च्या गाण्यांमध्ये लीड गिटार ची कमाल मजा आणते . इथे तर शेवटी डॉन फेल्डर आणि जो वॉल्श ची जुगलबंदी ...

याची दोन व्हर्जन्स प्रसिद्ध आहेत . एक मूळ १९७७ सालचे , ज्यात इलेट्रीक गिटार जास्त आहे *आणि दुसरे १९९४ सालचे ( हेल फ्रीझेस ओव्हर मधील ) ज्यात अकॉस्टिक गिटार जास्त आहे .*

अजूनही ऐकलं नसेल तर : सीट बॅक अँड एन्जॉय

प्रथम : १९७७ व्हर्जन

आणि हे १९९४ सालचे ( हेल फ्रीझेस ओव्हर मधील):

* हे मी जरा जास्तच ढोबळ लिहिलंय .पण जास्त पीळ मारण्याची इच्छा नाही म्हणून .

ईगल्स चे माझे अजून एक फेव्हरिट गाणे म्हणजे लास्ट रिसॉर्ट , संगीत आणि मुख्य म्हणजे लिरिक्स साठी .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे तिसरं व्हर्जन ऐका. Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'सलटन्स ऑफ स्विंग'
हि त्या काळातील सगळ्यात फेमस आरती . डायर स्ट्रेट्स ची . मूळ गाणे फारच 'सभ्य 'आहे पण नंतर याच ग्रुप ने बऱ्याच लाईव्ह परफॉर्मन्सेस मध्ये वाजवलेल्या एक्सटेंडेड व्हर्जन्स या कमालीच्या दिलखेचक .
मार्क नॉफलर ची गिटार वाजवण्याची वेगळी पद्धत ( इथे जास्त पिळणार नाही ) खास .
एक्सटेंडेड व्हर्जन मधील शेवटची गिटार आणि ड्रम्स ची जुगलबंदी जरूर ऐका . यातील ड्रम्स हे तबल्याच्या अंगाने वाजवले आहेत असा माझा दावा .
अवांतर उगाचच माहिती : रा रा स. रे. तेंडुलकर यांना म्हणे हे मूळ गाणे फार आवडते . ते सारखे हे गाणे स्वतःच्या वॉकमनात कि आयपोडात घेऊन हिंडतात म्हणे . असे ते त्यांच्या पिक्चरात पण म्हणाले . असो . ऐका .
हे मूळ सभ्य गाणे

अति अवांतर : हे टॉप पॉप्स /टॉप ऑफ द पॉप्स लीप सिंक असतं . रेकॉर्ड लावून तोंड हलवतात .
आणि हि लय भारी लाईव्ह व्हर्जन .

जिज्ञासूंनीं याबरोबरच त्यांनी वाजिवलेली १३ जुलै १९८५ च्या सुप्रसिद्ध 'लाईव्ह एड'कार्यक्रमातील व्हर्जन जरूर ऐकावी .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डीप पर्पल या हार्ड रॉक ग्रुप च्या अनेक उत्तम गाण्यांपैकी एक . हेही बऱ्याच रॉक कॉन्सर्ट्स मधील मँडेटरी गाणं . यांची इतर भारी गाणी म्हणजे हायवे स्टार , माय वूमन फ्रॉम टोकियो , बर्न वगैरे अनेक .
अतिशय कौशल्यपूर्ण गिटार वाजवणारा रिची ब्लॅकमोर ,इयान गिलियन चा आवाज रॉक /हार्ड रॉक करीत परिपूर्ण , (कै ) जॉन लॉर्ड हा मूळचा (पाश्चात्य ) शास्त्रीय संगीताची तालीम घेतलेला किबोर्डिस्ट , आणि इयान पेस चे ड्रम्स असा हा रॉक करता परिपूर्ण असा बँड .
जॉन लॉर्ड हार्ड रॉक मध्ये हॅमंड ऑर्गन वाजवी . काही गाण्यांमधील लॉर्ड चे ऑर्गन चे पिसेस हे अशक्य अविस्मरणीय आहेत . ( उदा . हायवे स्टार ) .
काळाच्या ओघात रिची ब्लॅकमोर बँड मधून फुटून वेगळा झाला वगैरे .
या गाण्यातील रिची ब्लॅकमोर नि केलेली गिटार रिफ अतिप्रसिद्ध आहे . प्रत्येकानी कधीतरी ऐकलेली असते . ( सध्या माझा रिंग टोन तीच आहे )

स्मोक ऑन द वॉटर हे ही रॉक अँथेम म्हणावे इतके थोर आणि लोकप्रिय गाणे . गाण्याचे लिरिक्स हे एका घटनेवर आधारित आहेत .
विडिओ च्या सुरवातीला म्हातारा जॉन लॉर्ड बोलतोय त्यानंतर मूळ विडिओ जुना लाईव्ह आहे . गिटार वर ब्लॅकमोर , दमदार आवाज इयान गिलियन चा आणि जॉन लॉर्ड नि घेतलेली ऑर्गन वरची इम्प्रोमच्यू व्हेरिएशन्स ...
ऐका ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्वीन ग्रुप चे अजून एक लोकप्रिय गाणे .
क्वीन ग्रुप ची काही अवांतर वैशिष्ट्ये :
उच्च शिक्षित मेम्ब्र असलेला बँड . रॉक वाली मंडळी म्हणजे गंजाडी , हिप्पी छाप वाया गेलेली कार्टी हा समज पुसून काढणारी ..
लीड सिंगर हा आप्रो डिकरा फारूख बलसारा जो प्रसिद्ध आहे फ्रेडी मर्क्युरी नावाने .
झांजीबार ला जन्मलेला आणि पांचगणी ला शालेय शिक्षण घेऊन ( सेंट पीटर्स . आपले छ .उदयनराजे पण याच शाळेतील .हं .) मग इंग्लडात गेलेला .
आवाजाची जातकुळी खर्ज /बॅरिटोन पण अत्यंत उंच स्वरात हि दमदार फुल थ्रोटेड गाण्याची क्षमता . रॉक करता अगदी उच्च .
कला शाखेचा पदवीधर
लीड गिटारिस्ट ब्रायन मे हे गृहस्थ ऍस्ट्रोफिजिक्स मध्ये Ph.D आहेत .
रॉजर टेलर ड्रमर जीवशास्त्रातील पदवीधर आणि
जॉन डिकन बेस गिटारिस्ट हा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर

एक शेवटचा ब्रायन मेचा गिटार पीस सोडला तर , संपूर्ण गाणे फक्त व्होकल आणि ड्रम्स वरचे .

अतिशय लोकप्रिय ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जॉर्ज हॅरिसन , जगप्रसिद्ध बीटल्स मधला तिसरा भिडू . लीड गिटारिस्ट . बीटल्समध्ये असताना बुजलेला . भारतप्रेमी . भारतीय संगीतप्रेमी.सतार शिकलेला. रविशंकरशिष्य . रॉक मध्ये सर्रास भारतीय संगीत,वाद्य आणणारा. हिंदू धर्म आणि तत्त्वज्ञानाने प्रभावित झालेला . महर्षी महेश योगी (म्हणजे तेच ते , श्री श्री रविशंकरांचे गुर्जी ) च्या नादाला लागून उरलेल्या बीटल्सना पण ऋषिकेश च्या आश्रमात घेऊन आलेला. १९७१ च्या बांगलादेश स्वातंत्र्यलढ्याकरता कॉन्सर्ट करून निधी जमा करणारा . मेल्यावर दहन करून राख गंगायमुनेत टाकायला लावणारा . भाबडा .शांतीप्रेमी.उत्तम गिटारिस्ट /कंपोजर . तरल गाणी कंपोज करणारा.
असा हा जॉर्ज. आणि त्याचे हे कृष्णभजन ( ज्यात मागे अस्पष्ट हालेलुया पण ऐकू येत ) बाकी हरे रामा हरे कृष्णा , किंवा गुरुर्ब्रह्मा गुरुर्रविष्णू वगैरे असो.
बाकी सांगायचं म्हणजे बीटल्स फुटल्यानंतर निघालेला त्याचा एकट्याचा हा पहिला सोलो सिंगल . अर्थातच चार्टस मध्ये वगैरे नंबर वन वगैरे ते सगळंच झालच .
सांगीतिक दृष्ट्या स्ट्रॉंग अकॉस्टिक कॉर्ड्स आणि अति गोड अशी स्लाईड गिटार जॉर्ज ने वाजवलेली .
कॉपीराईट इन्फरिंजमेण्ट वगैरे भानगडी झाल्या या गाण्याबाबतीत . पण ते जाऊ देत , गाणं ऐका ...
माय स्वीट लॉर्ड

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कितव्यांदा ऐकतोय कुणास ठाऊक . हे गाणं डोक्यातून जात नाही ..
कुठल्याही ग्रेट गाण्यांच्या लिस्टीत सापडेलच बघा हे तुम्हाला . "अँथेम " . रॉक ची .
आर्त सुरुवात करून माग टेम्पो वाढवल्यावर चा रॉबर्ट प्लांट चा शेवटच्या भागातला आवाज अजूनही झेपत नाही .
जिमी पेज यांची गिटार ऐकाच , विशेषतः मधला सोलो. आणि पहिल्या अर्ध्या भागात संपूर्ण ऑफ बीट कॉर्ड्स , कसं वाटतं बघा ..
या दोघांच्या थोरवी मध्ये जॉन बोनहॅम चे ड्रम उठून दिसत नाहीत , पण इतके सुयोग्य आणि कॉम्प्लेक्स ड्रम्स सापडणार नाहीत फार .
ऐकाच म्हणतो एकदा .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंग्समन , द सीक्रेट सर्विस परवा कुठल्यातरी चॅनेल वर लागलं होतं . शेवटचा धमासान कापाकापी चा सीन चालू असताना पार्श्वसंगीत म्हणून गिटार ची फास्ट टेम्पो मधील जबरदस्त जुगलबंदी चालू झाली आणि आठवणी चाळवल्या . ' फ्री बर्ड 'या खास लिनर्ड स्किनर्ड च्या गाण्याची . हेच गाणं फॉरेस्ट गम्प ( यात यांचंच स्वीट होम अलाबामा पण आहे ) , (ढेरेंचं) सिम्पसन्स , हाऊस ऑफ कार्ड्स , एव्हरीबडी लव्हज रेमंड , दॅट सेव्हन्टीज शो , फॅमिली गाय आणि इतर काही चित्रपटात आणि सिरियल्स मध्ये वापरलं गेलंय . गाणं १९७३ मधील आहे.

'लिनर्ड स्किनर्ड' म्हणजे सदर्न रॉक या रॉक च्या सबजॉनर मधील अतिशय लोकप्रिय करणारा बँड . सदर्न रॉक वाली मंडळी ( अमेरिकन स्टँडर्ड्स नी ) गरीब आर्थिक परिस्थितीतील , फारसे न शिकलेले , वर्किंग क्लास वाले . थोडक्यात न उच्चभ्रू . ( त्यामुळेच बहुधा ) यांच्या गाण्याच्या लिरिक्स मध्ये फारसे 'वैश्विक भान ', हेवी तत्वज्ञान , किंवा सराईत कवींची सफाई वगैरे शोधू नये . लिरिकली ही सिम्पलटन्स ची गाणी असतात . गिटार आणि ड्रम्स मध्ये मात्र हि मंडळी दादा . कौशल्यपूर्ण .
काही लोकांच्या मते रॉक च्या इतिहासातील स्टेअरवे टू हेवन ला टक्कर देईल इतके दमदार हे गाणे . ( पण सालं इथं पण पुण्यामुंबईचं { पक्षी : ब्रिटिशांचं } वर्चस्व . कोल्लापूर { पक्षी दक्षिणी राज्य : अलाबामा , फ्लोरिडा , टेक्सास , लुईसियाना } यांच्यावर अन्याव आणि अनुशेष . [आता अदिती तिथे गेल्या आहेत त्यामुळे लढा तीव्र होईल आणि हा अन्याय कमी होईल बहुधा . ]

१९७० साली फॉर्म झालेला पण १९७७ साली विमान अपघातात तीन मुख्य मेम्बर मृत्यू पावल्याने काही काळ थांबलेला हा ग्रुप ' लिनर्ड स्किनर्ड' म्हणजे सिग्नेचर सदर्न रॉक . इगल्स प्रमाणेच एकाहून जास्त कुशल लीड गिटारिस्ट असलेल्या या ग्रुप च्या गाण्यांमध्ये दमदार गिटार ड्रम्स आणि व्होकलस नेहमी असते . या गाण्याची एक गम्मत सांगतो . कुठल्याशा एका कॉन्सर्ट मध्ये यांनी सगळ्यात शेवटी हे गाणे एक्सटेंडेड , पंधरा मिनिटे वगैरे वाजवले . तेव्हापासून त्यांच्या कुठल्याही कॉन्सर्ट ला शेवटी हेच्च गाणे वाजवायची फर्माईश पब्लिक करून लागले . नंतर हे फॅड असे पसरले कि कुठलाही बँड परफॉर्म करत असेल तरी लोकं सगळ्यात शेवटी लोकं 'फ्री बर्ड पायजेल 'असं (त्यांच्या भाषेत आणि टोन मध्ये ) बोंबलू लागली आणि खास लोकेच्छेमुळे इतर बँड्सना ते सादर करावे लागे . म्हणे .

लिनर्ड स्किनर्ड म्हणजे सिग्नेचर सदर्न रॉक .
फ्री बर्ड म्हणजे सिग्नेचर लिनर्ड स्किनर्ड.

गाण्यात फार अर्थ वगैरे शोधू नका नका .सुरुवात स्लो टेम्पो ने . ऐका सुरुवातीचे स्लाईड गिटार आणि शेवटची इलेक्ट्रिक गिटार्स ची फास्ट टेम्पो मधील जुगलबंदी आणि त्यालासाजेशी ड्रम्स ची साथ . ( हि अशी गिटार वाजवायला लै म्हणजे लैच दम आणि कौशल्य लागतं . )
पहिला देतोय ऑफिशिअल व्हिडिओ . मस्त आहेच

पण त्याहून जास्त ही लाईव्ह व्हर्जन ऐका .. ग्रुप विमान अपघातात मरण्याआधी दोन चार महिने परफॉर्म केलेली .
दोन कारणांमुळे
१. यात बिली पॉवेल ला पियानो वर थोडे कौशल्य दाखवायची संधी मिळाली आहे .
२. अॅलन कोलीन्स आणि स्टीव्ह गेन्स ची लीड गिटारची जुगलबंदी .. विशेषतः साडेसहा मिनिटांपासून पुढे पाच मिनिटे . थोर आहे हे . फुल्ल कल्ला .

या एका गाण्यापुरतं बँड चा लिडर आणि गायक रॉनी व्हॅन ( कि फॅन ) Zannt ला विसरू शकतो . कारण हिरो गिटार्स आहेत

कॅमेरॅमन हरामखोर आहे . कॅमेरा जास्त वेळ कमी कपड्यातल्या मुलींवर फिरवलाय . खरं तर कॅमेरा फुल फ्रेम दोन्ही गिटार्स वर पाहिजे , निदान शेवटच्या जुगलबंदी च्या वेळी तरी )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संध्याकाळी, बसप्रवासात कानावर पवित्र काही न पडण्याची, आणि करमणुकीची सोय करणाऱ्या बापटांचा विजय असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अत्यंत कॉम्प्लेक्स आणि सुंदर सांगीतिक रचना . ऑल टाइम क्लासिक.
सांगीतिक दृष्ट्या ती या गाण्यात तीन भाग आहेत . पहिला Ballad ज्याच्यात स्लो टेम्पो आहे , त्यानंतर क्वासी ऑपेरा , त्यानंतर हार्ड रॉक .
तिन्ही भाग सीमलेसली एकमेकात बांधले आहेत ब्रायन मे च्या जबरदस्त गिटार सोलोज नी . विशेषतः ऑपेरा वरून हार्ड रॉक कडे जाताना वाजवलेला सोलो जरूर ऐका . थोर आहे . व्होकलस ची ही एक मोठी रेंज यात ऐकायला मिळते फ्रेडी बाबा कडून . ( गेला बिचारा १९९१ साली .... )
लिरिक्स डिप्रेसिंग आहेत... म्हणूनच काय , सुरुवातीच्या ballad मधील आर्तता जास्त अपील होते ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अण्णा रेडबोन नावाचा इंडियन मूळं असलेला बँड आणि त्यांचे हे गाणे मला खूप आवडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

गाणी , विशेषतः गजला या विषयी लोकांनी अमाप कचरा लिहून ठेवला आहे

स्ट्यांडींग ओवेशन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

यातली बहुतांश सगळी ऐकलेली आणि आवडलेली आहेत. मला उगाच वाटत होतं की मला 'इंग्लिश' गाणी अजिबातच माहिती नाहीत. बरंय म्हणजे निदान प्रसिद्ध गाणी तरी माहितीयेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप आनंद झाला या प्रतिसादात लिहिलेल्या मजकुराने.

मनापासून आभार.

पण खालील विधानाने अक्षरशः मन कडू झालं. सहज टाळता आलं असतं. तरीही तुमची रेट्रो वेस्टर्न म्युझिकविषयीची पोस्टिंग वाचत राहीन. आय डोंट हेट इन प्लुरल्स. (वुडहाउस)

विशेषतः गजला या विषयी लोकांनी अमाप कचरा लिहून ठेवला आहे . त्यात भर नको म्हणून ही काळजी

वाईट वाटलं. पण असो. तुम्ही वेस्टर्न रिट्रो क्लासिक्सवर लिहीत रहा. ठराविक जॉनर हे बकवास, कचरा असं खऱ्या दर्दी संगीतप्रेमीनं कधी म्हणू नये.

विरोध नाही.. फक्त खेद वाटतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गवि शेठ ,
++ठराविक जॉनर हे बकवास, कचरा असं खऱ्या दर्दी संगीतप्रेमीनं कधी म्हणू नये.++
नाही हो , असला काही प्रमाद मला करायचा नाहीये . मी जॉनर वाईट म्हणत नाहीये .
त्यावर अनेक लोकांनी अमाप लिहिले आहे त्याबद्दल लिहिले आहे हो .
कृपया गैरसमज करून घेऊ नका .
मी कुठल्याही जॉनर ला कचरा म्हणणार नाही. फारतर मला झेपत नाही म्हणेन .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त उपक्रम अण्णा! माहीत नसलेली गाणी हळूहळू ऐकतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप दिवसांपासून असे काहीतरी हवे होते. खफ मधे अधूनमधून वाचले पण इथे सलग असल्यामुळे माझ्यासारख्या ही सगळी गाणी अगम्य असलेल्यांना खूप सोयीचे होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगला उपक्रम. अनेक आभार!
--
कुणी जर ऐकलीच आणि कुणाला जर इंटरेस्ट वाटलाच तर काही त्या गाण्याबद्दल काही सांगीन .
.....असं का हो? लोकांना काही वाटो, न वाटो. तुम्हांला ज्या बाबींमुळे गाणं ऐकावसं वा ऐकवावसं वाटलं, त्या कृपया सांगाव्यात. इतर लोक त्यांना जे काय आवडेल-नावडेल ते सांगतीलच वाटलं तर.
---
सुचवणी: तुम्ही प्रतिसाद म्हणून दिलेल्या फिती नि मजकूर मूळ धाग्यात आला तर बरं. काही कारणाने तसं करायचं नसेल (उदा. धागा लांबवायचा नसेल), तर किमान गाण्याच्या शीर्षकाला प्रतिसादांचे दुवे जोडून धाग्यात दिलेत तर बरं होईल. उदा.
स्मोक ऑन द वॉटर
Bohemian Rhapsody : क्विन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असं का हो? लोकांना काही वाटो, न वाटो. तुम्हांला ज्या बाबींमुळे गाणं ऐकावसं वा ऐकवावसं वाटलं, त्या कृपया सांगाव्यात. इतर लोक त्यांना जे काय आवडेल-नावडेल ते सांगतीलच वाटलं तर.

अगदी अगदी. प्रेम करावं भिल्लासारखं, गाण्यांवरतीही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

आभार बापट. विशेषतः 'ब्रिक इन द वॉल'सारख्या काही गाण्यांचे म्यूझिक व्हिडिओही रोचक होते :

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बापट यांनी भारी निवडक गाणी नोंदवली आहेत. नक्कीच दर्दी आहेत. ईगल्सचं लाइंग आईजही खूप छान आहे.

कितनी देर तक या गाण्यावर लाइंग आईजचा प्रभाव आहे (पण कॉपी नाही).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे खरे तर क्लासिक रॉक नाही. सॉफ्ट रॉक आहे . धर्म, देश यावरून होणाऱ्या झगड्यांना नाकारणारं . सांगीतिक दृष्टया साधे . ( खरा तो एकची धर्म , जगाला प्रेम अर्पावे छाप स्वप्नाळू गाणं ) पण गाणं भारीये . 'गिव्ह पीस अ चान्स ', आणि ऑल यु नीड इज लव्ह 'बरोबरच अँटी वॉर चळवळीत कायम वापरले जाणारे . सर्वांच्या ऑल टाइम ग्रेट सॉंग्सच्या लिस्ट मध्ये पहिल्या पाचात असणारे. लिरिक्स जरूर बघा .
Imagine there's no heaven
It's easy if you try
No hell below us
Above us only sky
Imagine all the people living for today
Imagine there's no countries
It isn't hard to do
Nothing to kill or die for
And no religion too
Imagine all the people living life in peace, you
You may say I'm a dreamer
But I'm not the only one
I hope some day you'll join us
And the world will be as one
Imagine no possessions
I wonder if you can
No need…
You may say I'm a dreamer
But I'm not the only one
I hope some day you'll join us
And the world will be as one
Songwriters: John Winston Lennon
Imagine lyrics © Universal Music Publishing Group

कम्पोजर आणि गायक : जॉन लेनन . आमचे प्रातःस्मरणीय जॉन लेनन .
जगप्रसिद्ध बीटल्स ग्रुप चा लीडर.कवी.संगीतकार गायक. कायमस्वरूपी अँटी एस्टॅब्लिशमेंट असलेला . कोणाचीही भीडभाड न बाळगणारा असूनही MBE मिळालेला . ब्रिटनच्या युद्धखोर भूमिकेबद्दल तेच MBE अवॉर्ड वापसी करणारा . सहजतेने ऋषिकेश ला येऊन तिथे आश्रमात उत्तमोत्तम गाणीं रचणारा . पण स्वामीच्या मापात 'पाप ' आढळल्यावर त्यातून बाहेर पडणारा. धार्मिक कट्टरतेच्या विरोधात असणारा . म्हणून उगाचच कॉमी असा शिक्का खाल्लेला. कॉमी लोकांचा फालतूपणा कळाल्यावर त्यांची खिल्ली उडवणारे Revolution सारखे गाणे लिहिणारा.युद्धखोरी विरोधी कायम भूमिका घेणारा .जॉन लेनन . याच्याबद्दल मी खूप लिहू शकेन. म्हणूनच थांबतो.
ऐका: इमॅजिन . आणि दम धरा . व्हिडिओ चालू झाल्यावर गाणं ४१ व्या सेकंदाला सुरु होतं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एसीडीसी ह्या ब्यांडचा देश नी मेंबर्सबद्दल वाचायचं असेल तर त्यांचं विकीपीडीआ पान वाचा. पण कौतुकाची गोष्ट ही, की हे साठीपलिकडचे तरुण अजूनही तितक्यात उर्जेने मंच अक्षरश: डोक्यावर घेतात. पब्लिकचा ऑटाफे ॲक्सल रोझही थोडा वेळ ह्यांच्यासाठी गाऊन गेला होता.
त्यांच्या त्यातल्या त्यात अलिकडचा परफॉर्मन्स पहा. हायवे टू हेल:

आयर्न मॅन भाग १ मध्ये सैनिकांच्या जीपमध्ये हे गाणं टोनी स्टार्क रेडूवर लावतो, ते तुम्ही ऐकलं असेल. गाण्याचे शब्द गायकांच्या वयाच्या अनुषंगाने अतिशय उर्जेने भरलेले आणि उत्साहदायक आहेत. हे गाणं सदाबहार आणि ऑटाफे.
बॅक इन् ब्लॅक

Back in black I hit the sack
I've been too long I'm glad to be back
Yes I am
Let loose from the noose
That's kept me hanging about
I kept looking at the sky cause it's gettin' me high
Forget the hearse cause I'll never die
I got nine lives cat's eyes
Abusin' every one of them and runnin' wild!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

लगे रहो चौदावे !!! असंच आता उरलेल्या किमान दोन तुमच्या प्रभावक्षेत्रातल्या गाण्यांबद्दल लिहावे (ही विनंती !!!)
अवांतर : यातले व्होकल्स आपल्याला झेपत नाही , पण गिटार लीड ... काय वर्णावी त्याची ... असो ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाटाआ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0