भारतीय लोकशाही आणि जातजमातींच्या अस्तित्वाचा गुंता

काल वसंत व्याख्यानमालेत सुहास पळशिकरांच्या भाषणाला गेलो होतो. छोटेखानी भाषण होतं. तासभराचं असेल. विषयही घिसापिटा वाटेल असा होता. "जातजमातींच्या अस्तित्वाचा गुंता आणि भारतीय लोकशाही ". पण मला भाषण आवडलं. भाषणातला जो cosmetic भाग होता, तोसुद्धा आवडला. पळशीकरांचा आवाज, बोलण्याची लय, स्वच्छ,स्पष्ट शब्दोच्चार आणि अचूक शब्द निवड. इंग्लिश पुस्तकांच्या तुलनेत मराठी पुस्तकांमध्ये खूपदा हा दोष आढळतो की त्यांची छपाई तितकीशी भारी नसते. कागद सुमार/सर्वसाधारण असतो. फॉण्टकडे नीट लक्ष दिलेलं नसतं. भाषणाच्या बाबतीत ह्याचे समांतर मुद्दे म्हणजे आवाज, शब्दोच्चार वगैरे. मला समजलेलं भाषण हे इथं लिहून ठेवतोय आठवतय तसं. (बाय द वे सुहास पळशीकर म्हणजे "आखुड लोकांचा प्रदेश" हा लेख ज्यांनी लिहिलाय ते.) समाज माध्यमांवर ह्या विषयाबद्दल फार जास्त बोललं गेलेलं मागच्या काही वर्षांत बघतोय. त्यामुळे विषय जरासा तोच-तो वाटला. पण व्याख्यान पळशीकरांचं होतं म्हणून मग राहवलंही नाही. गेलो. निम्मं सभागृह भरलं होतं. संध्याकाळी साडेसहाला भाषण सुरु झालं. साधारण तासभर चाललं. वेळ आणि मुद्दे खुपच थोडे होते. पण तरीसुद्धा मुद्द्यांकडे ह्या नजरेनंही बघता येतं, हे समजलं..
********भाषण सुरु**********
आपल्यावर सतत अस्मितांचे हल्ले होताहेत, कधी कधी आपल्यावर विविध अस्मितांचं रोपण,आरोपण होतं. काही उदाहरणं म्हणजे समाज माध्यमांवर परवा फिरत असलेला "ब्राम्हण सांबार मसाला" हा ब्रॅण्ड, त्याचा फोटो फिरत असणं, जानवं इंग्लंडात पाच पौण्ड वगैरेला विकलं जात असणं, मराठा क्रांती मोर्चा, तमिळनाडूमधली देवेन्द्रकुळ वेळ्ळार संबंधी काहीशी गमतीशीर वाटू शकणारी बातमी (इतर जाती जमाती अहमिकेनं आरक्षण मागत असताना आणि स्वत:स मागास ठरवू पहात असताना अगदी विरुद्ध दिशेचं म्हण्णं मांडणारे "आम्हाला scheduled caste मधून वगळा" अशी मागणी करणारे लोक) , गुज्जर, जाट अशा बराच केसेस आहेत. कित्येकांत काही समान बाबी आहेत. आपल्याला मग काही एक "ओळख" असूच नये का? आपण ज्या भवतालात वाढलो , राहिलो ते सोडून मग एक निव्वळ एक पोकळी सोबत घेउन "अजून एक मानव" इतकीच ओळख घेउन आपण वावरायचं का? कुटूम्ब, विस्तारित कुटूम्ब (भौगोलिक वैषिश्ट्या, भाषिक वैशिष्ट्य ह्यामुळे जबनलेला समाज, भारतीय संदर्भात विस्तारित कुटुंब म्हणजे समाज/जात/जमात.) हे सगळं नाकारायचं का? त्यातून आलेली काही राहण्या-खाण्यातली वैशिष्ट्य, जाणीवा-श्रद्धा, भाषिक नमुने, सगळं सोडायचं का? तर तसं नाही. "ओळख" असावी, पण ओळखीची जसजशी "अस्मिता" होउ लागते तसतशी गडबड व्हयला लागते. ओळखिचा सार्वजनिक आसमंतातला आग्रह हा अस्मितेकडे झुकू लागतो. अस्मिता असण्यात वाईट काय असेल तर ते म्हणजे समुहाबद्दल काहीही चिकित्सा,भाष्य करायचीच चोरी झाल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. कारण समुहापैकी कुणी ते करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात जराही टिकात्मक सूर वाटला (किंवा "पुरेसं गौरवीकरण/उदात्तीकरण नाहिये आपल्या लोकांचं" असं वाटलं) तर थेट त्या "आतल्या"ला गद्दार,बेइमान,स्व-जनद्रोही ठरवलं जातं. आणि बाहेरचा करु गेला तर तो "आमचा अपमान करु बघतोय. खिजवतोय, हिणवतोय" असा प्रचार केला जातो.ओळख आणि अस्मिता ह्या अशा 'बायनरी' संद्न्या नाहित. तो एक स्पेक्ट्रम आहे. त्यांचा इकडून तिकडे प्रवास टप्प्या टप्प्याने होतो.

**टप्पा क्र १**
वेगळेपणाचं भान, समुह अधिक सावध होतो. वेगलेपणाचा देखावा करतो. अह्दिक प्रमाणात, ठळक़ जाहिर प्रदर्शन करतो. गंमत म्हणजे एका समूहानं हे काही कारणानं केलं म्हणुन अजून एखादा समूह प्रत्युत्तर म्हणून तसच काही करु शकतो. त्यांचं उत्तर बघून आधीचा समूह आपलं वेगळेपण जास्तच ठळक करु पाह्तो. थोडक्यात हे क्रिया-प्रतिक्रिया ह्यातूनही पुढं जाउ शकतं.
**टप्पा क्र २**
लोकं स्वत:ला एखादा बिल्ला, टॅग लावून घेउ पाहतात ह्या वेगळ्या ओळखीसाठी. ओळख अधिक ठळक होते. कधी कधी काही चिन्ह अवतरतात. जोडली जातात.
**टप्पा क्र ३**
संख्यात्मक डावपेचांचे दावे केले जातात. tactical व्युहात्मक दृष्टीनं ते केलेले असतात. अमुक राज्यात आम्ही बहुसंख्य आहोत वगैरे. तसं म्हणण्यासारखी परिस्थिती नसेल तर अमुक प्रांतापुरता आमचा प्रभाव आहे पण तोही बक्क्ळ आहे , अमुक इतक्या मतदार संघात आमची अमुक इतकी ताकत आहे असे दावे केले जातात. वोट बँक पॉलिटिक्समध्ये तेही करता येत नसेल तर मग एकूण व्यवस्थेत आमचं अमुक इतकं मॉनिटरी(किण्वा नॉन मॉनिटरी उदा मिलिटरीतला, उद्योगांतला, वैद्न्यानिकांमधला disproportionate सहभाग ) योगदान आहे, अमुक विभागात किम्वा अमुक निकषांवर आमच्याहून पुढे कुणी नाही, असे दावे केले जातात.
**टप्पा क्र ४**
आठवण, पब्लिक मेमरी,स्मृती, नॅरॅटिव्ह, इतिहास ह्यावर आपला(च) हक्क सांगणे. जे काही आहे(विशेषत: मुल्यवान,दखवलपात्र, सुंदर, सुसंस्कृत) ते आमचच आहे, तुमचं नाहिच; असे दावे केले जातात. आमचाच नॅरेटिव्ह तितका खरा, हे चढ्या आवाजात साम्गितलं जातं. त्यावरुन लढायाही होतात. एका समूहानं आपलच कौतुक सांगणारी एक टि व्ही सिरियल काढली तर दुसरा समूह आपली काढू बघतो. विचित्र चढाओढ सुरु होते. काही बाबींचं,व्यक्तींचं, मूल्यांचं अनावश्यक गौरवीकरण,उदात्तीकरण, दैवतीकरण होतं. विरुद्ध बाजूला केवळ खलनायकी,काळं ठरवलं जातं.
**टप्पा क्र ५**
गेटकीपिंग केलं जातं. रेग्युलेशन्स येतात. सरकार राहतं बाजूलाच आणि झुंडी आपली रेग्युलेशन्स अख्ख्या समाजावार थोपवू पाहतात.आमच्याबद्दल जे म्हणायचय ते आम्हाला विचारुनच म्हणायचं असं म्हटलं जातं. आणि मुळात खुपसे आयकॉन्स, इतर ठळक चिन्हं,प्रतीकं,ऐतिहासिक व्यक्ती,वारसा हा केवळ आपलाच एकट्याचा असल्याचा दावा असतोच. त्यामुळे "त्याबद्द्ल काही बोलाल तर खबरदार" असा सूर उमटतो.
**टप्पा क्र ६**
ह्या टप्प्यावर सुरु होतात सत्तेबद्दलचे दावे, सत्तेत वाटा मागणं, संसाधनातला हक्क/वाटप मागणं. अर्थात अशी मागणी करणं तत्वत: चूक नाहिच. पण बाब एक लक्षात घेतली पाहिजे की तो निसरडा उतार आहे. मुळात अशा भौतिक,ऐहिक मागण्या, वाटे मागितले जातात, तेव्हा त्याबद्दलचे निकष काय असले पाहिजेत, हे आपण पूर्वी कधीतरी मान्य केलेलं आहे ना? मग ते निकष बघायला हवेत की नकोत? वेळप्रसंगी ते निकषच बदलायची मागणी होते. निकष बदलायची मागणी हाच निसरडा उतार आहे.

**टप्पे संपले.उरलेलं भाषण सुरु** मुळात लोकशाहीचं महत्वाचं लक्षण म्हणजे कायद्याचं राज्य. काही नियम, कायदे ह्यानुसार चालणारं राज्य. नियम शक्यतो एखाद्या समूहाला टार्गेट करणारे, दुय्यम ठरवणारे असणार नाहित. ते पुरेशा संमतीनं स्थापित झालेले असतील. संविधान असेल. त्यातले कायदे असतील. त्या कायद्यासमोर सगळे समान असणं. शिवाय ज्याला जे वाटतय त्याला ते बोलायचा हक्क असणं म्हणजे लोकशाही. (त्या अर्थानं पाहिलं तर एकछत्री अथवा हुकूमशाहीच्या अगदिच विरोधात वगैरे लोकशाही नाही. लोकशाही विरुद्ध हुकुमशाही हे आपलं आजच्या काळातलं काळं-पांढरं करु पाहणारं आकलन आहे. (मला आवडलेली गोष्ट म्हणजे "लोकशाही म्हणजे निवडणूका" ह्याव्यतिरिक्त काहीतरी ऐकायला मिळालं.) जेव्हा सहाव्या टप्प्यावर समूह पोचतो तेव्हा सरळ मागणी होते की "बाकी तुमचं तुम्ही काही करा, पण आमच्याबद्दल बोलायचं काम नाही. आमच्या आतल्या बाबी आम्ही काय ते बघुन घेउत" हे काहिसं समांतर सरकार चालवल्या सारखंच होतं. पण मुळात अमुक एक बाब खटकली, ती प्रसारीत करु नये, अशी मागणी करण्यातही, इच्छा करण्यातही तसं काही चूक म्हणता येणार नाही. पण तसं करण्यासाठी एक कायदेशीर चौकट उपलब्ध आहे. काही नियम, कायदे कानून आपण सगळ्यांनी मान्य केलेले आहेत. संविधानात्मक मंडळे आहेत, सेन्सॉर बोर्ड वगैरे. ते त्यांचं काम आहे. दरवेळी झुंडिंनी त्यांना वरचढ होउन कसं चालेल? आणि अलिकडेच एका चित्रपटाच्या वेळी तर परिस्थिती अशी आली की कोर्टानं जो निर्णय दिला (चित्रपट प्रदर्शित करायचा हक्क असणं वगैरे) त्याच्या अंमलबजावणीसच राज्य सरकारांनी नकार दिला. चित्रपट प्रसारित झाला तर आम्ही कायदा सुव्यवस्था राखू शकणार नाही असं कारण दिलं. म्हणजे कायद्याचं राज्य राबवायची ज्यांची जिम्मेदारी, त्यांनीच त्यास नकार दिलेला आहे. ती जिम्मेदारी लोकशाहीत सरकारांची असते. सरकारं कोणत्या प्रकारची असू शकतात? लोकशाही कोणत्या प्रकारची असू शकते, ह्याबद्द्ल काही प्रकार दिसतात.

**पहिली वाट**
१९७०च्या दशकात ॲरन लेफार्त(Arend Lijphart) ह्यांनी कन्सोसिएशनल डेमोक्रसी (Consociational democracy) ह्या संद्न्येचा उल्लेख केला. म्हणजे काही राज्य व्यवस्थांचं वर्णन करताना त्यानं ही संद्न्या वापरली.अशा राज्य व्यवस्थांत काही वेगवेगळे आणी ठळक भाषिक, प्रांतिक अथवा वांशिक समूह असतात. धड स्पष्ट बहुसंख्या कुणाकडेच नसते. तेव्हा राज्य व्यवस्थेत दर घटकाला काही एक वाटा/हिस्सा मिळावा म्हणून वाटाघाटी केल्यासारखं राज्य चालतं. व्यवस्थेचा सूर सर्वसाधारणपणे "हा हिस्सा तुझा, तो माझा" असा असतो. जमेल तितपत लोकशाही राबवायण्यासाठी केलेली ही तडजोड असते. (लेबनॉनसारखी आणि काही बाल्कन देशांसारखी उदाहरणं मला इथं आठवली)
**दुसरी वाट**
राज्य व्यवस्थेचा दुसरा प्रकार म्हणजे majoritarian , बहुसंख्याकवाद. तांत्रिकदृष्ट्या हीदेखील लोकशाहीच असते. पण एखाद्या बहुसंख्येनं असलेल्या गटाची निर्विवाद पकड असते व्यवस्थेवर. काही वेळेस मग इतरेजन त्यात दुय्यम नागरिक ठरतात. उदाहरणार्थ इस्राइल. (आणि जेव्हा पाकीस्तानात लोकशाही असते तेव्हा ती अशीच बहुसंख्याकवादाकडे झुकणारी असते)
**तिसरी वाट**
तिसरा प्रकार जो आहे त्याबद्दल कुठे अजून पूर्ण, नेमकी,तपशीलवार मांडणी झालेली नाही, पण त्याचा उल्लेख बी एल शेठ ह्यांनी केलाय. तो म्हणजे democracy of communities. ह्यात होतं असं की व्यक्तींचा, व्यक्तीस्वातंत्र्याचा बळी जातो. तुम्ही ह्या नाहीतर त्या साचयत स्वत:ला बसवून घ्यायचं असतं. हे बसवून घ्यायचं तर तुमची झुंड तुम्हाला आपलं मानेल. इतर झुंडींपासून संरक्षण देइल. साचेही ह्या झुंडी आपापल्या बनवत असतात. त्याशिवाय जराही काही वेगळं खपवून घेतलं जात नाही. विवेक, विशेषत: सावजनिक विवेक हरवतो. कायदेच समूहनिहाय बनतात किंवा निदान तशी मागणी होते. काही अंशी हे भारताला लागू पडतय.
**********************************
अर्थात ही वर्णनं वाचून मंडल आयोगाचा काळ, Indra Sawhney विरुद्ध भारत सरकार ह्यांची सुप्रीम कोर्टातला खटला ह्याची आठवण होणार. अर्थात खऱ्या लोकशाहीवाद्याचं ह्यातून समाधान होत नाही. त्याला ह्या तिन्हीहून अधिक उन्नत व्यवस्था हवी असते. एक समाज, एक व्यवस्था म्हणून आज आपण जणू एका तिठ्यावर आहोत. इथून तीन मार्ग आहेत, तीन रस्ते आहेत. एक बहुसंख्याकवाद, दुसरा बहुसंख्यावाद आणि तिसरा म्हणजे बहुविधतेचा मार्ग. बहुविधता कायम ठेवून , हवं तर आपापल्या "ओळखी" कायम ठेवून सार्वजनिकतेच्या रस्त्यानं, विद्वेष नसलेल्या मोकळ्या वातावरणात जाणं हा तो मार्ग. तशी व्यवस्था आपण आणु शकतो का? मुळात आणू इच्छितो का , हा प्रश्न आहे.
********भाषण समाप्त*************
भाषणानंतर त्यांना भेटून मी विचारलं की ह्यातून (गटांना प्रतिनिधित्व देण्याची मागणी, गटाला व्हेटो पावर देण्याची मागणी ह्यातून) आपल्याकडचे १९४७ पूर्वीचे काही प्रसंग आठवले. गांधी-आंबेडकर ह्यांच्यातला पुणे करार, आंबेडकरांच्या मूळ मागण्या हे आठवलं. झालंच तर लखनौ करार आणि १९४०च्या दशकात एका टप्प्यावर मुस्लिम लीग अखंड भारतासाठी तयार होती. पण त्यांची ठळक मागणी खास मुस्लिमांचं वेगळं प्रतिनिधित्व, केंद्र सरकारचं विचित्र,अशक्त रुप ठेवणं अशा स्वरुपाच्या होत्या. ते आठवलं. ते म्हणाले "होय, लखनौ करार , मुस्लिम लीग बद्दल तुझं आकलन बरोबर आहे. तेव्हा कन्सोसिएशनल डेमोक्रसी वगैरे संद्न्या अशा थेट कुणी म्हटलं नव्हतं तरी त्यांचा आशय तोच होता."

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

पहिला भाग वाचला आणि फार आवडला. मीच लिहीलेलं 'सॅक्रोसॅन्क्ट' आठवतंय. सविस्तर प्रतिक्रिया देईनच.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

माझं स्याक्रोस्यांक्ट वाचलं असेल तर मी प्रस्तावनेशी, भाग १ ते ५शी शतप्रतिशत सहमत आहे हे तुमच्या लक्षात आलं असेलच.

हे आपण पूर्वी कधीतरी मान्य केलेलं आहे ना?

हे अगदीच गाढवांपुढे गीता वगैरे नाही. दणादण घटनादुरुस्त्या, कायदे बदलणे हे कालपरत्वे आलेल्या बदलाचं प्रतीक आहे. निकष बरेचदा तेच असूनही, बऱ्याच गोष्टी बदलल्या जातात. समलैंगिक विवाह, इच्छामरण, बलात्काऱ्यांना देहदंड इ.चे निकष आहेत तेच; पण त्यांत बदल मात्र आलेले आहेत, आणि ते येतच राहतील.

काही नियम, कायदे कानून आपण सगळ्यांनी मान्य केलेले आहेत.

सिस्टममध्ये विश्वास ठेवावा हे खरंच आहे. पण परतपरत असंख्य लोकांना फक्त हताश करणारी सिस्टम असल्यास लोकांनी ती उलथून टाकायची मागणी करणं ही अगदीच काही आगळीक नाही. मी अशा प्रकारांची तुलना नेहमी दोन गोष्टींशी करतो- एक म्हणजे गुलामगिरी आणि दुसरं म्हणजे सतीची प्रथा. एक सिस्टम होती. लोक्स तीत विश्वासही ठेवत होते. मुद्दा म्हणजे झुंडशाहीत इतका खोलवर विचार न करणाऱ्यांना स्वत:चं म्हणणं राबवून घ्यायचं बळ मिळतं, जे घातक आहे. त्यामुळे ह्यावर टीका झाली पाहिजे. आखून दिलेलं आयुष्य जगण्यात भारतीयांना कधीच रस नसतो. ह्यांचे हिरोच बव्हांशी कायदे तोडणारे असतात ह्यातच सगळं आलं. (अवांतर: आधी घमासान चर्चा झाल्याप्रमाणे टिळकांनाही ह्याबद्दल काही करावंसं वाटलं नाही. म्हणजे ते किती 'बरोबर' किंवा 'सर्वमान्य' होतं ह्याला मी अधोरेखित करतोय) नंतर तुमचे बेसिसच बदलले तेव्हा व्हेक्टर स्पेस बदलणं स्वाभाविक आहे ना?

कायद्याचं राज्य राबवायची ज्यांची जिम्मेदारी, त्यांनीच त्यास नकार दिलेला आहे. ती जिम्मेदारी लोकशाहीत सरकारांची असते.

हे मात्र निंद्य आहे. मी वर म्हणतोय ते झुंडशाहीच्या बाजूने नव्हे. झुंडशाही व्हावी. न्याय्य मार्गांनी, 'नैतिक' मार्गांनी. बेसिकली लोकशाही म्हणजे कायदेशीर झुंडशाहीच नव्हे काय? उद्या 'आपल्याला खुद्द सरकारचं पाठबळ आहे' असं कोणत्याही झुंडपुंडांच्या डोक्यात आलं तर जबाबदार कोण?

मी जाम आशावादी वाटेन, पण भारत तिसऱ्या लोकशाहीत पडतो ह्याच्याशी मी कधीच सहमत होणार नाही. आपण सगळेच लहानपणापासून झुंडींत वाढलोय. झुंड काय असते ते मी, आणि आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. पण भारतात बर्रंच अभिव्यक्तीस्वातंत्र्य अजून अबाधित आहे. मध्ये एक लेख वाचलेला त्यात हिंदूंची तुलना मोठ्या भावंडाशी आणि अल्पसंख्यांकांची लहान भावंडांशी केलेली आठवते. थोरल्यांना लहानांचं लाडकेपण कायमच खुपत असतं, जरा ताकद, वर्चस्व गाजवण्याची संधी हातात आल्यास त्यांनी केलेली दादागिरी ही (ह्या प्रसंगी अनैतिक असली, तरीही) नैसर्गिक आहे. मोदी पंप्र झाले, तेव्हाच हे पाहिलं नसेल तर आपण दूरदृष्टी गमावून बसलो आहोत असं म्हणावंसं वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

वाचलं. मस्तय! आणि ह्यातले सुरुवतीछे काही मुद्दे त्यात आलेले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भाषण कसं लिहून घेतलं ? छान काम केलं.
बाकी मतं मांडण्याइतका माझा अभ्यास नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अख्खं भाषण लिहून घेतलं नाही. फक्त काही महत्वाचे keywords लिहून घेतले लहान वहीच्या एका कागदावर. बाकीचं लक्षात ठेवलं. स्मृतीनुसार इथं उतरवलं. ह्यापूर्वीही असं केलंय. त्याचं उदाहरण -- http://aisiakshare.com/node/4019
अर्थात लांबीला ते भाषण जरा मोठं होतं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनेक मुद्द्यांवर चर्चा करता येऊ शकते. अनेक मस्त मुद्दे आहेत. कायद्याचं राज्य या संकल्पनेबद्दलचे विवेचन सुद्धा मस्त.

पण प्रत्येकाला कायदा समान लागू आहे हे आपण मान्य केलेलं आहे --- हे पटत नाही.

नियम शक्यतो एखाद्या समूहाला टार्गेट करणारे, दुय्यम ठरवणारे असणार नाहित. - हे तर अजिबातच न पटणारे आहे. म्हंजे वस्तूस्थिती नेमकी विरुद्ध आहे.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे तर अजिबातच न पटणारे आहे. म्हंजे वस्तूस्थिती नेमकी विरुद्ध आहे.

समजलं नाही. कुणाला टारगेट केलं गेलय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असा कोणता नियम/कायदा आहे की ज्यात गटनिरपेक्ष तरतूदी आहेत ?
भारताच्या प्रत्येक नागरीकाला (कोणत्याही गटाचा सभासद असो वा नसो) लागू पडणारा नियम कोणता ?
सगळे नियम - वय, लिंग, धर्म, जात, भाषा, कौटुंबिक स्थिती, आर्थिक स्थिती, सामाजिक स्टेटस यांच्या गटवारी केल्यानंतरच लागू आहेत.

वरील तीन वाक्ये ही एका व फक्त एकाच मुद्याबद्दल आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

समजलं नाही. कॉल करतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे वाचताना फार त्रास होतोय. प्रमाणलेखन बाजूला ठेवू, निदान दोन परिच्छेदांमध्ये एक रिकामी ओळ सोडाल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण *** वापरुन परिच्छेद वेगळे करण्याचा प्रयत्न मूळ लेखात केलाय ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

केलं थोडं तोडकाम -

काल वसंत व्याख्यानमालेत सुहास पळशिकरांच्या भाषणाला गेलो होतो. छोटेखानी भाषण होतं. तासभराचं असेल. विषयही घिसापिटा वाटेल असा होता. "जातजमातींच्या अस्तित्वाचा गुंता आणि भारतीय लोकशाही ". पण मला भाषण आवडलं. भाषणातला जो cosmetic भाग होता, तोसुद्धा आवडला. पळशीकरांचा आवाज, बोलण्याची लय, स्वच्छ,स्पष्ट शब्दोच्चार आणि अचूक शब्द निवड. इंग्लिश पुस्तकांच्या तुलनेत मराठी पुस्तकांमध्ये खूपदा हा दोष आढळतो की त्यांची छपाई तितकीशी भारी नसते. कागद सुमार/सर्वसाधारण असतो. फॉण्टकडे नीट लक्ष दिलेलं नसतं. भाषणाच्या बाबतीत ह्याचे समांतर मुद्दे म्हणजे आवाज, शब्दोच्चार वगैरे. मला समजलेलं भाषण हे इथं लिहून ठेवतोय आठवतय तसं. (बाय द वे सुहास पळशीकर म्हणजे "आखुड लोकांचा प्रदेश" हा लेख ज्यांनी लिहिलाय ते.) समाज माध्यमांवर ह्या विषयाबद्दल फार जास्त बोललं गेलेलं मागच्या काही वर्षांत बघतोय. त्यामुळे विषय जरासा तोच-तो वाटला. पण व्याख्यान पळशीकरांचं होतं म्हणून मग राहवलंही नाही. गेलो. निम्मं सभागृह भरलं होतं. संध्याकाळी साडेसहाला भाषण सुरु झालं. साधारण तासभर चाललं. वेळ आणि मुद्दे खुपच थोडे होते. पण तरीसुद्धा मुद्द्यांकडे ह्या नजरेनंही बघता येतं, हे समजलं..

भाषण सुरू

आपल्यावर सतत अस्मितांचे हल्ले होताहेत, कधी कधी आपल्यावर विविध अस्मितांचं रोपण,आरोपण होतं. काही उदाहरणं म्हणजे समाज माध्यमांवर परवा फिरत असलेला "ब्राम्हण सांबार मसाला" हा ब्रॅण्ड, त्याचा फोटो फिरत असणं, जानवं इंग्लंडात पाच पौण्ड वगैरेला विकलं जात असणं, मराठा क्रांती मोर्चा, तमिळनाडूमधली देवेन्द्रकुळ वेळ्ळार संबंधी काहीशी गमतीशीर वाटू शकणारी बातमी (इतर जाती जमाती अहमिकेनं आरक्षण मागत असताना आणि स्वत:स मागास ठरवू पहात असताना अगदी विरुद्ध दिशेचं म्हण्णं मांडणारे "आम्हाला scheduled caste मधून वगळा" अशी मागणी करणारे लोक) , गुज्जर, जाट अशा बराच केसेस आहेत. कित्येकांत काही समान बाबी आहेत. आपल्याला मग काही एक "ओळख" असूच नये का? आपण ज्या भवतालात वाढलो , राहिलो ते सोडून मग एक निव्वळ एक पोकळी सोबत घेउन "अजून एक मानव" इतकीच ओळख घेउन आपण वावरायचं का? कुटूम्ब, विस्तारित कुटूम्ब (भौगोलिक वैषिश्ट्या, भाषिक वैशिष्ट्य ह्यामुळे जबनलेला समाज, भारतीय संदर्भात विस्तारित कुटुंब म्हणजे समाज/जात/जमात.) हे सगळं नाकारायचं का? त्यातून आलेली काही राहण्या-खाण्यातली वैशिष्ट्य, जाणीवा-श्रद्धा, भाषिक नमुने, सगळं सोडायचं का? तर तसं नाही. "ओळख" असावी, पण ओळखीची जसजशी "अस्मिता" होउ लागते तसतशी गडबड व्हयला लागते. ओळखिचा सार्वजनिक आसमंतातला आग्रह हा अस्मितेकडे झुकू लागतो. अस्मिता असण्यात वाईट काय असेल तर ते म्हणजे समुहाबद्दल काहीही चिकित्सा,भाष्य करायचीच चोरी झाल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. कारण समुहापैकी कुणी ते करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात जराही टिकात्मक सूर वाटला (किंवा "पुरेसं गौरवीकरण/उदात्तीकरण नाहिये आपल्या लोकांचं" असं वाटलं) तर थेट त्या "आतल्या"ला गद्दार,बेइमान,स्व-जनद्रोही ठरवलं जातं. आणि बाहेरचा करु गेला तर तो "आमचा अपमान करु बघतोय. खिजवतोय, हिणवतोय" असा प्रचार केला जातो.ओळख आणि अस्मिता ह्या अशा 'बायनरी' संद्न्या नाहित. तो एक स्पेक्ट्रम आहे. त्यांचा इकडून तिकडे प्रवास टप्प्या टप्प्याने होतो.

**टप्पा क्र १**

वेगळेपणाचं भान, समुह अधिक सावध होतो. वेगलेपणाचा देखावा करतो. अह्दिक प्रमाणात, ठळक़ जाहिर प्रदर्शन करतो. गंमत म्हणजे एका समूहानं हे काही कारणानं केलं म्हणुन अजून एखादा समूह प्रत्युत्तर म्हणून तसच काही करु शकतो. त्यांचं उत्तर बघून आधीचा समूह आपलं वेगळेपण जास्तच ठळक करु पाह्तो. थोडक्यात हे क्रिया-प्रतिक्रिया ह्यातूनही पुढं जाउ शकतं.

**टप्पा क्र २**

लोकं स्वत:ला एखादा बिल्ला, टॅग लावून घेउ पाहतात ह्या वेगळ्या ओळखीसाठी. ओळख अधिक ठळक होते. कधी कधी काही चिन्ह अवतरतात. जोडली जातात.

**टप्पा क्र ३**

संख्यात्मक डावपेचांचे दावे केले जातात. tactical व्युहात्मक दृष्टीनं ते केलेले असतात. अमुक राज्यात आम्ही बहुसंख्य आहोत वगैरे. तसं म्हणण्यासारखी परिस्थिती नसेल तर अमुक प्रांतापुरता आमचा प्रभाव आहे पण तोही बक्क्ळ आहे , अमुक इतक्या मतदार संघात आमची अमुक इतकी ताकत आहे असे दावे केले जातात. वोट बँक पॉलिटिक्समध्ये तेही करता येत नसेल तर मग एकूण व्यवस्थेत आमचं अमुक इतकं मॉनिटरी(किण्वा नॉन मॉनिटरी उदा मिलिटरीतला, उद्योगांतला, वैद्न्यानिकांमधला disproportionate सहभाग ) योगदान आहे, अमुक विभागात किम्वा अमुक निकषांवर आमच्याहून पुढे कुणी नाही, असे दावे केले जातात.

**टप्पा क्र ४**

आठवण, पब्लिक मेमरी,स्मृती, नॅरॅटिव्ह, इतिहास ह्यावर आपला(च) हक्क सांगणे. जे काही आहे(विशेषत: मुल्यवान,दखवलपात्र, सुंदर, सुसंस्कृत) ते आमचच आहे, तुमचं नाहिच; असे दावे केले जातात. आमचाच नॅरेटिव्ह तितका खरा, हे चढ्या आवाजात साम्गितलं जातं. त्यावरुन लढायाही होतात. एका समूहानं आपलच कौतुक सांगणारी एक टि व्ही सिरियल काढली तर दुसरा समूह आपली काढू बघतो. विचित्र चढाओढ सुरु होते. काही बाबींचं,व्यक्तींचं, मूल्यांचं अनावश्यक गौरवीकरण,उदात्तीकरण, दैवतीकरण होतं. विरुद्ध बाजूला केवळ खलनायकी,काळं ठरवलं जातं.

**टप्पा क्र ५**

गेटकीपिंग केलं जातं. रेग्युलेशन्स येतात. सरकार राहतं बाजूलाच आणि झुंडी आपली रेग्युलेशन्स अख्ख्या समाजावार थोपवू पाहतात.आमच्याबद्दल जे म्हणायचय ते आम्हाला विचारुनच म्हणायचं असं म्हटलं जातं. आणि मुळात खुपसे आयकॉन्स, इतर ठळक चिन्हं,प्रतीकं,ऐतिहासिक व्यक्ती,वारसा हा केवळ आपलाच एकट्याचा असल्याचा दावा असतोच. त्यामुळे "त्याबद्द्ल काही बोलाल तर खबरदार" असा सूर उमटतो.

**टप्पा क्र ६**

ह्या टप्प्यावर सुरु होतात सत्तेबद्दलचे दावे, सत्तेत वाटा मागणं, संसाधनातला हक्क/वाटप मागणं. अर्थात अशी मागणी करणं तत्वत: चूक नाहिच. पण बाब एक लक्षात घेतली पाहिजे की तो निसरडा उतार आहे. मुळात अशा भौतिक,ऐहिक मागण्या, वाटे मागितले जातात, तेव्हा त्याबद्दलचे निकष काय असले पाहिजेत, हे आपण पूर्वी कधीतरी मान्य केलेलं आहे ना? मग ते निकष बघायला हवेत की नकोत? वेळप्रसंगी ते निकषच बदलायची मागणी होते. निकष बदलायची मागणी हाच निसरडा उतार आहे.

**टप्पे संपले.

उरलेलं भाषण सुरु**

मुळात लोकशाहीचं महत्वाचं लक्षण म्हणजे कायद्याचं राज्य. काही नियम, कायदे ह्यानुसार चालणारं राज्य. नियम शक्यतो एखाद्या समूहाला टार्गेट करणारे, दुय्यम ठरवणारे असणार नाहित. ते पुरेशा संमतीनं स्थापित झालेले असतील. संविधान असेल. त्यातले कायदे असतील. त्या कायद्यासमोर सगळे समान असणं. शिवाय ज्याला जे वाटतय त्याला ते बोलायचा हक्क असणं म्हणजे लोकशाही. (त्या अर्थानं पाहिलं तर एकछत्री अथवा हुकूमशाहीच्या अगदिच विरोधात वगैरे लोकशाही नाही. लोकशाही विरुद्ध हुकुमशाही हे आपलं आजच्या काळातलं काळं-पांढरं करु पाहणारं आकलन आहे. (मला आवडलेली गोष्ट म्हणजे "लोकशाही म्हणजे निवडणूका" ह्याव्यतिरिक्त काहीतरी ऐकायला मिळालं.) जेव्हा सहाव्या टप्प्यावर समूह पोचतो तेव्हा सरळ मागणी होते की "बाकी तुमचं तुम्ही काही करा, पण आमच्याबद्दल बोलायचं काम नाही. आमच्या आतल्या बाबी आम्ही काय ते बघुन घेउत" हे काहिसं समांतर सरकार चालवल्या सारखंच होतं. पण मुळात अमुक एक बाब खटकली, ती प्रसारीत करु नये, अशी मागणी करण्यातही, इच्छा करण्यातही तसं काही चूक म्हणता येणार नाही. पण तसं करण्यासाठी एक कायदेशीर चौकट उपलब्ध आहे. काही नियम, कायदे कानून आपण सगळ्यांनी मान्य केलेले आहेत. संविधानात्मक मंडळे आहेत, सेन्सॉर बोर्ड वगैरे. ते त्यांचं काम आहे. दरवेळी झुंडिंनी त्यांना वरचढ होउन कसं चालेल? आणि अलिकडेच एका चित्रपटाच्या वेळी तर परिस्थिती अशी आली की कोर्टानं जो निर्णय दिला (चित्रपट प्रदर्शित करायचा हक्क असणं वगैरे) त्याच्या अंमलबजावणीसच राज्य सरकारांनी नकार दिला. चित्रपट प्रसारित झाला तर आम्ही कायदा सुव्यवस्था राखू शकणार नाही असं कारण दिलं. म्हणजे कायद्याचं राज्य राबवायची ज्यांची जिम्मेदारी, त्यांनीच त्यास नकार दिलेला आहे. ती जिम्मेदारी लोकशाहीत सरकारांची असते. सरकारं कोणत्या प्रकारची असू शकतात? लोकशाही कोणत्या प्रकारची असू शकते, ह्याबद्द्ल काही प्रकार दिसतात.

**पहिली वाट**

१९७०च्या दशकात ॲरन लेफार्त(Arend Lijphart) ह्यांनी कन्सोसिएशनल डेमोक्रसी (Consociational democracy) ह्या संद्न्येचा उल्लेख केला. म्हणजे काही राज्य व्यवस्थांचं वर्णन करताना त्यानं ही संद्न्या वापरली.अशा राज्य व्यवस्थांत काही वेगवेगळे आणी ठळक भाषिक, प्रांतिक अथवा वांशिक समूह असतात. धड स्पष्ट बहुसंख्या कुणाकडेच नसते. तेव्हा राज्य व्यवस्थेत दर घटकाला काही एक वाटा/हिस्सा मिळावा म्हणून वाटाघाटी केल्यासारखं राज्य चालतं. व्यवस्थेचा सूर सर्वसाधारणपणे "हा हिस्सा तुझा, तो माझा" असा असतो. जमेल तितपत लोकशाही राबवायण्यासाठी केलेली ही तडजोड असते. (लेबनॉनसारखी आणि काही बाल्कन देशांसारखी उदाहरणं मला इथं आठवली)

**दुसरी वाट**

राज्य व्यवस्थेचा दुसरा प्रकार म्हणजे majoritarian , बहुसंख्याकवाद. तांत्रिकदृष्ट्या हीदेखील लोकशाहीच असते. पण एखाद्या बहुसंख्येनं असलेल्या गटाची निर्विवाद पकड असते व्यवस्थेवर. काही वेळेस मग इतरेजन त्यात दुय्यम नागरिक ठरतात. उदाहरणार्थ इस्राइल. (आणि जेव्हा पाकीस्तानात लोकशाही असते तेव्हा ती अशीच बहुसंख्याकवादाकडे झुकणारी असते)

**तिसरी वाट**

तिसरा प्रकार जो आहे त्याबद्दल कुठे अजून पूर्ण, नेमकी,तपशीलवार मांडणी झालेली नाही, पण त्याचा उल्लेख बी एल शेठ ह्यांनी केलाय. तो म्हणजे democracy of communities. ह्यात होतं असं की व्यक्तींचा, व्यक्तीस्वातंत्र्याचा बळी जातो. तुम्ही ह्या नाहीतर त्या साचयत स्वत:ला बसवून घ्यायचं असतं. हे बसवून घ्यायचं तर तुमची झुंड तुम्हाला आपलं मानेल. इतर झुंडींपासून संरक्षण देइल. साचेही ह्या झुंडी आपापल्या बनवत असतात. त्याशिवाय जराही काही वेगळं खपवून घेतलं जात नाही. विवेक, विशेषत: सावजनिक विवेक हरवतो. कायदेच समूहनिहाय बनतात किंवा निदान तशी मागणी होते. काही अंशी हे भारताला लागू पडतय.

अर्थात ही वर्णनं वाचून मंडल आयोगाचा काळ, Indra Sawhney विरुद्ध भारत सरकार ह्यांची सुप्रीम कोर्टातला खटला ह्याची आठवण होणार. अर्थात खऱ्या लोकशाहीवाद्याचं ह्यातून समाधान होत नाही. त्याला ह्या तिन्हीहून अधिक उन्नत व्यवस्था हवी असते. एक समाज, एक व्यवस्था म्हणून आज आपण जणू एका तिठ्यावर आहोत. इथून तीन मार्ग आहेत, तीन रस्ते आहेत. एक बहुसंख्याकवाद, दुसरा बहुसंख्यावाद आणि तिसरा म्हणजे बहुविधतेचा मार्ग. बहुविधता कायम ठेवून , हवं तर आपापल्या "ओळखी" कायम ठेवून सार्वजनिकतेच्या रस्त्यानं, विद्वेष नसलेल्या मोकळ्या वातावरणात जाणं हा तो मार्ग. तशी व्यवस्था आपण आणु शकतो का? मुळात आणू इच्छितो का , हा प्रश्न आहे.

भाषण समाप्त -
भाषणानंतर त्यांना भेटून मी विचारलं की ह्यातून (गटांना प्रतिनिधित्व देण्याची मागणी, गटाला व्हेटो पावर देण्याची मागणी ह्यातून) आपल्याकडचे १९४७ पूर्वीचे काही प्रसंग आठवले. गांधी-आंबेडकर ह्यांच्यातला पुणे करार, आंबेडकरांच्या मूळ मागण्या हे आठवलं. झालंच तर लखनौ करार आणि १९४०च्या दशकात एका टप्प्यावर मुस्लिम लीग अखंड भारतासाठी तयार होती. पण त्यांची ठळक मागणी खास मुस्लिमांचं वेगळं प्रतिनिधित्व, केंद्र सरकारचं विचित्र,अशक्त रुप ठेवणं अशा स्वरुपाच्या होत्या. ते आठवलं. ते म्हणाले "होय, लखनौ करार , मुस्लिम लीग बद्दल तुझं आकलन बरोबर आहे. तेव्हा कन्सोसिएशनल डेमोक्रसी वगैरे संद्न्या अशा थेट कुणी म्हटलं नव्हतं तरी त्यांचा आशय तोच होता."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक2
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मनोबा, धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

लेख चांगला, त्याबद्दल प्रथम मनोबांचे अभिनंदन आणि आभार. पण शंका असंख्य! त्यांतील एकच प्रमुख म्हणजे,

भाषणकर्ता आणि त्याचे विश्लेषक यांची बौद्धिक उंची आणि आपल्या देशांत वावरणारे विविध गट यांचा मेळ कधीतरी जमेल का ? म्हणजे आदर्श व्यवस्था म्हणजे काय, हे जरी मूठभर लोकांना कळले तरी या झुंडींच्या डोक्यांत कधी प्रकाश पडेल का ?
दुसरी शंका म्हणजे या गटबाजीचाच फायदा घेणारे राजकारणी यांत तेल ओतण्याचे काम करणारच. असे असता, तुमचे पुरोगामी विचार या तळागाळापर्यंत कधी पोचणार ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ॐ नमो छु छां छ

लेख वाचल्याबद्दल आभार.सगळ्या लोकांपर्यंत हे कधी पोचेल, कसं पोचेल ह्याची मला काहिच कल्पना नाही. मी निव्वळ स्वत:ची समज वाढवायला म्हणुन जातो अशा ठिकाणी. म्हणजे आसपासचा भवताल काय आहे, किंवा जसा आहे तो तसा का आहे, हे समजलं तरी पुरे. त्याउप्पर स्वत: काही प्रत्यक्ष करणं मला शक्य नाही, फारसा रसही नाही. आणि पुढे कसं पोचवायचं (उर्वरित पब्लिकपर्यंत ) ह्याचा विचार मी केला नाही.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आसपासचा भवताल काय आहे, किंवा जसा आहे तो तसा का आहे, हे समजलं तरी पुरे.

"इथे मांडणे" हा भाग विसरलास मनोबा. तुझा अतिरेकी विनय आडवा येतो.
तुला झालेले आकलन इथे मांडणे ही जबरदस्त पब्लिक सर्व्हिस आहे.
तुझा वेळ हा किमान रुपये २,००० प्रति घंटा या दराने बिलेबल आहे.
ते २,००० रुपये तू या पब्लिक सर्व्हिस ला देतो आहेस. राजीखुशीने. कोणत्याही बळजबरीविना.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुझा वेळ हा किमान रुपये २,००० प्रति घंटा या दराने बिलेबल आहे.

हे कसे काढतात प्लीज सांगा ना.
धन्यवाद्

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

POTA principle = Pulled out of thin air.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मराठीत सांगा ना. आमची इंग्लिश ची बोंब आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...त्याला 'जेथे सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणातून', असे म्हणतात.

..........

म्हणजे, मनुष्यास१अ जर का शेपूट असती, तर तिचा बुडखा जेथे असता, त्या स्थानानजीकच्या (कृष्ण)विवरातून.

१अ गब्बर हा मनुष्य आहे, असे येथे (केवळ या) उदाहरणाच्या सोयीखातर गृहीत धरले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तम, गोळीबंद लेख. ओळख आणि अस्मिता यांसंबंधी विवेचन पटलं. पळशीकरांचे इंडियन एक्स्प्रेसमधील लेख वाचनीय, मननीय असतात.
बाकी, आपल्या स्मरणशक्तीला दाद द्यावी लागेल. अश्या भाषणांविषयी इथे आगाऊ सांगत जाल का प्लीज?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

वाचल्याबद्दल आभार. कार्यक्रमाची बातमी मला वाटतं 'सकाळ'मध्ये आली होती. आणी फेसबुकवरही फिरत होती. पुढच्या वेळी असं काही सापडलं तर "उत्स्फुर्त कट्टे" ह्या धाग्यावर टाकीन म्हणतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बातमी आली तरी जायला कुठे जमतं? गेलो तरी एवढं काही लक्षात राहात नाही.
हे काम तू बेस केलंस.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तम शब्दांकन केले आहे. टप्पे व वाट ही आयडिया फार आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

मला व्याख्यानाला यायला आवडलं असतं. वृत्तांतासाठी धन्यवाद मनोबा (आणि संपादक अचरटबाबा!)
(मनोबा : फायरफॉक्स वापरलात, तर त्यात मराठी मुद्रितशोधनासाठी प्लगिन आहे. अगदी उत्तम नसलं तरी मदत होईल. शिवाय, अरुण फडक्यांचं 'शुद्धलेखन ठेवा खिशात' हे मोबाईल अॅपही आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

उत्तम भाषण आणि ते स्मृतीने उतरून काढणेही छानच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पारंपरिक भारतीय व्यवस्था (जी लोकशाही नव्हती) वाट क्र ३ वरून चालली होती.

स्वातंत्र्याच्या अलिकडे आणि त्यानंतरचा बराच काळ भारताची लोकशाही वाट क्र १ अशी चालली होती. वेगवेगळे जातीय/भाषिक गट आहेत पण पाशवी बहुसंख्या कुणाचीच नाही. त्यामुळे सर्वजण एकमेकाला सांभाळून घेऊया अशी मनोवृत्ती. "नेहरुवियन कन्सेन्सस' या संज्ञेचा हाच अर्थ होता का हे मला ठाऊक नाही.

आता वाट क्र. २ कडे वाटचाल सुरू आहे. म्हणजे वेगवेगळे भाषिक गट एकाच मोठ्या गटात असल्याचा दावा करून बहुसंख्यांकवाद. (हिंदू) पाकिस्तान होण्याच्या दिशेने वाटचाल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पाकिस्तान होण्याच्या दिशेने वाटचाल.

मनसे च्या उदयानंतर आणि विशेषत: राज सायबांनी "महाराष्ट्रावर होत असलेला अन्याय पाहून एखाद्या मराठी तरूणाचं डोकं भनकलं तर ....महाराष्ट्र वेगळा..... " चा डायलॉग मारल्यानंतर..... भारताचे बाल्कनायझेशन होणार चे भाकित वर्तवले गेले होते.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमच्या डोंबिवलीत कधी व्याख्यानमाला असल्या तर साधारण तीनजणांना बोलावतात. शुक्र/सोमवारची सुटी बघून. चंद्रशेखर टिळक हे आर्थिक विषयावर बोलतात. त्यादिवशी चाळीस - पंचवीस गटातले बय्रापैकी श्रोते येतात. शंनानवरे यांचे कथाकथन - बरीच गर्दी होते. इतर कुणी - ज्येष्ट नागरिकच अधिक. सवासहापासून जागा पकडतात. सातचा कार्यक्रम स्वागत,दीपप्रज्वलनानंतर वक्ता पावणेआठला सुरू होतो. ज्ये ना आठला उठतात "सूनबाइंनी वेळ दिलीय."
वक्त्याचा उत्साह कमी होतो.
खगोलीय घटना या विषयावर कल्याणला प्रदीप नायक यांचे भाषण. छोटासा हॅाल। सर्व ज्ये ना.
ठाण्याला मात्र सहजीवन हॅालला योग्य वयाचा श्रोतावर्ग भरपूर येतो.
हे आपलं सहज आठवलं म्हणून.
पुणे याबाबत नशिबवान असणार. मनोबा आनंद घे आणि लूट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्रुती-स्मृती-मनोक्त शब्दांकन आवडले, अनेक आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

=?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संधी साधण्यासाठी, १ हातचा धरावा वाटल्यास Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@प्रकाश घाटपांडे -- कार्यक्रमाला गेलो तेच मुळात तुमच्याकडून समजलं म्हणुन. आभार तुमचेच मानायला हवेत.
@अचरट -- फोर्मॅटींग करुन दिल्याबद्दल आभार. पुढच्या वेळेस निदान वाचवलं जाण्याइतपत सुरळीत लिखाण करायचा प्रयत्न करेन .
@थत्ते -- प्रतिक्रियेबद्दल आभार. पण समाजशास्त्रातले तपशील वापरत इतर कुणी त्याबद्दल(नेहरु पहिल्या वाटेवरुन कितपत जात होते ह्याबद्दल) बोललेलं जास्त आवडेल तुमच्याशी. मला तितकीशी कल्पना नाही.
@नंदन, @बॅटमॅन गब्बर,अदिती,तिरशिंगराव,आदुबाळ,पुंबा,१४टॅन तुम्हा सर्वांचे प्रतिक्रियेबद्दल आभार. * असे धागे काढायचं एक कारण म्हणजे फार मागे कधीतरी बॅटमॅनला खुप श्लोक लक्षात राहतात म्हणुन त्याचं कुणीतरी केलेलं कौतुक. मग मलाही स्मरणशक्ती प्रदर्शनाची लहर आली. *
@चिंतातूर जंतू -- ॲप आणि प्लगिन दोन्ही वापरुन पाहतो पुढच्यावेळी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बृहद कोष वापरून मराठी कळफलक करता येईल का..??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्या वृत्तांकनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी अंकातले राजेश्वरी देशपांडे आणि वैभव आबनावे यांचे लेख वाचावेत अशी विनंती. कारण, त्यांत ह्या मुद्द्यांचा अधिक तपशीलात विचार आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ह्या वृत्तांकनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी अंकातले राजेश्वरी देशपांडे आणि वैभव आबनावे यांचे लेख वाचावेत अशी विनंती.

.
पुढच्या वेळी रजनी बक्षी यांचे लेखन (किंवा त्यांच्या लेखनाचा मराठी अनुवाद) दिवाळी अंकात यावेत. म्हंजे सर्वोत्कृष्ठ विनोदी अंकाचे बक्षीस मिळू शकेल. त्या टीना वि. टामा बद्दल सुद्धा बोलतात असं ऐकून आहे.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्हीही लिहा की! आम्हाला आवडतो विनोद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्यापेक्षा तुम्ही तुमचेच धागे काढून वाचा. म्हंजे स्वत:च्या विनोदी लेखनावर स्वत:च पुरेसं हसून घेता येईल.
जोडीला माझ्याशी-बोलण्यात-हशील-नाही अशी स्वतःची प्रतिमा सुद्धा कुरवाळून घेता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट3
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इतकं विनोदी लिहून वाटेला लावतात त्या बक्षीबाई?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हॅ हॅ हॅ

तिसरी वाट**तिसरा प्रकार जो आहे त्याबद्दल कुठे अजून पूर्ण, नेमकी,तपशीलवार मांडणी झालेली नाही, पण त्याचा उल्लेख बी एल शेठ ह्यांनी केलाय. तो म्हणजे democracy of communities. ह्यात होतं असं की व्यक्तींचा, व्यक्तीस्वातंत्र्याचा बळी जातो. तुम्ही ह्या नाहीतर त्या साचयत स्वत:ला बसवून घ्यायचं असतं. हे बसवून घ्यायचं तर तुमची झुंड तुम्हाला आपलं मानेल. इतर झुंडींपासून संरक्षण देइल. साचेही ह्या झुंडी आपापल्या बनवत असतात. त्याशिवाय जराही काही वेगळं खपवून घेतलं जात नाही. विवेक, विशेषत: सावजनिक विवेक हरवतो. कायदेच समूहनिहाय बनतात किंवा निदान तशी मागणी होते. काही अंशी हे भारताला लागू पडतय.

उगाचच झुंड वगैरे शब्द वापरायचे... आणि निर्नायकी अराजकसदृश स्थितीचा काल्पनिक बागुलबुवा आपणच उभा करायचा, त्यावर आपणच उत्तर द्यायचे आणि तेच योग्य असल्याचे प्रमाणपत्र आपणच द्यायचे आणि स्वत:ची पाठ थोपटून घ्यायची...

वरती जे काही लेखात दिले आहे हे सर्व अतिशय चांगल्या शब्दात मांडता आले असते पण भारतातील जे काही होते ते त्याज्यच होते हा मनातला भाव उमटला नसता म्हणून झूंडीचे प्रयोग....

चालु द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मग कळप शब्द वापरा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

काका तुम्हाला समजले नाही.

कळप शब्द "हे" लोक वापरणार नाहीत. कारण कळप आला की कळपाचे नियम आणि व्यवस्था नजरेआड करता येत नाही. झूंड म्हटले की त्याच नियमांना विवेकवाद नसतो वगैरे झोडता येते. कळपात साहजिकच समुहाचे शहाणपण असते ते नाकारता येत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो ते मान्य.कळपात अस्मिता जागृत केली कि झुंड व्हायला वेळ लागत नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

अरेरे !! म्हणजे तुमच्या मताने...

म्हणजे मावळ्यांच्या समुहात शिवाजीने अस्मिता जागृत केली अन हिंदवी स्वराज्य नावाची झुंड झाली !
मो क गांधींनी इंग्रजांच्या गुलामीत असलेल्या समुहाला करेंगे या मरेंगे चामंत्र दिला अन भारतीय प्रजासत्ताक नावाची झुंड झाली !!
जॉर्ज वॉशिंग्टनने अस्मिता जागृत केली अन अमेरीकेची संयुक्त राज्ये नावाची झुंड झाली !!!

यादी खुप मोठी होईल.
मुद्दा छोटासा आहे की तुमचे आकलन हुकले आहे.

अस्मिता जगण्याला दिशा देते. अंधारात प्रकाशाची वाट दाखवते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी फक्त माझ मत मांडले.तुम्ही आकलन हुकले आहे असे समजू शकता

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

चालतंय की..!*

* राणाजींकडून उधार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मनोबा, तुला प्रश्न.

जर असा कायदा आणला की ज्यायोगे मतदाराने मतदान करताना (जातीधर्मावर आधारीत) केलेला भेदभाव शोधून काढता येईल व मतदाराला अशाप्रकारच्या भेदभावाबद्दल शिक्षा करता येईल आणि असा कायदा व्यवस्थित राबवता आला तर हा जातीजमातींचा गुंता सुटेल ?
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अतिशय उत्तम,कोणाचीच बाजू न घेता सत्य च मांडणारा अती उत्तम लेख.
नाही तर इतके गट आहेत जाती धर्माचे की विचारू नका..सर्व स्वतःचीच लाल करत असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारतातील जातीय ,धार्मिक ,स्थिती पाहिली काय होती आणि आता काय आहे ह्याचे विश्लेषण होणे गरजेचे आहे.
लोकशाही राज्य व्यवस्था भारताला लाभली हे भारताचे भाग्य थोर असे म्हणता येईल.
पण लोकशाही राज्य व्यवस्थेचा वापर करून जातीय ,धार्मिक,आणि प्रांतीय भेद हळू हळू कमी होणे गरजेचे आहे.
फक्त कायदा सर्वांना समान समजतो हे पाळपुद काही कामाचे नाही.
जाती नुसार सामाजिक मगासले पना ,आर्थिक मागासले पना दूर करण्याचे काहीच प्रयत्न झाले नाहीत असे च म्हणावे लागेल.
फक्त आरक्षण दिले की आपले कर्तव्य संपले असे नाही .
आज सुद्धा त्या मुळे जातीय तेढ आहे वरवर दिसत नसली तरी आत मध्ये खोल वर ती आहे.
आणि ती कळ तशीच राहावी .
म्हणून जातीय अस्मितेच्या नावाखाली त्याला इंधन पुरवले जाते.
जय अमका ,जय तमका ह्या घोषणाच त्याचे उदाहरण आहे.
सर्व भारतीय एक आहेत प्रांतीय अस्मिता कोणी जागृत करू नयेत हे आदर्श वाक्य आहे फक्त वाक्य च आहे.
त्या साठी प्रयत्न कुठे आहेत.
विभागीय आर्थिक विषमता आणि प्रांतीय आर्थिक विषमता दूर करण्यासाठी भारताने काहीच प्रयत्न केलेले नाहीत.
त्या मुळे तो विषय पण धगधगता च आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0