आमची मराठी वेब सिरीज

नमस्कार,

  • आजच्या धावपळीच्या जगात लोकांमधला खरा संवाद हरवत चाललाय असं तुम्हाला वाटतं का?
  • घरात, बाहेर सगळीकडे सर्वजण आपापल्या मोबाईल-कॉम्पुटर मध्ये डोकं खुपसून बसलेत असं तुम्हाला वाटतं का?
  • पुढच्या पिढीचे गॅजेट ऍडिक्शन मुळे वांधे होणार आहेत अशी तुम्हाला सतत चिंता वाटते का? या चिंतेमुळे तुम्ही एक-दिवसाआड उसासे सोडत आपलं ब्लडप्रेशर वाढवत आहात का?
  • घरोघरी सतत चालू असणारे टिव्ही., त्यावरच्या अमृत-प्राशन केलेल्या मालिका - यात रमणार्‍या कुटूंबातील प्रत्येकाचं घरातल्या माणसांशी नातं आणि संवाद दोन्ही तुटत चाललंय, असं तुम्हाला वाटतं का?
  • तुमची मुले सदानकदा कॉम्पुटरवर गेम्स खेळत बसलेली असतात असं तुम्हाला वाटतं का?
  • “कॉम्पुटर बंद कर!”, असं सांगितल्यावर "मला बोअर होतंय" असं म्हणत तुमची मुलं तुमचं डोकं खातात का?
  • शासनाच्या धोरणामुळे मैदानाची संख्या कमी झालीये आणि ट्रॅफिकमुळे मुलांना खेळायला रस्ते सुरक्षित नाहीत असं तुम्हाला वाटतं का?
  • तुमची नातवंड तुमच्याकडे येतात तेव्हा ते “नवीन काहीतरी सांगा आजोबा/आजी” असं म्हणतात का?
  • कॉलेजच्या होस्टेलमधल्या रूमवर मित्र आले की लॅपटॉप वर पिक्चर बघत बसण्याचा तुम्हाला कंटाळा आला आहे का?
  • तुम्हाला कधीतरी अचानक लहानपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यां आठवून नॉस्टॅल्जीक वाटतं का?

या आणि अशा गोष्टींमुळे तुम्ही चिंताक्रांत झाले आहात का? झाले असलात - (किंवा नसलात) - तर तुमच्यासाठी आम्ही एक मराठी वेब सिरीज घेऊन येत आहोत - ज्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या बैठ्या खेळांचे नियम शिकवू.

हे खेळ तुम्ही आपल्या मित्र/मैत्रिणी/मुले/पालक यांसोबत खेळा आणि वरच्या सर्व चिंतांपासून मुक्ती मिळवा Biggrin

या सिरीज मधला दुसरा व्हिडीओ इथे पहा

https://youtu.be/Z3_HTR101BQ

हा आमच्या फावल्या वेळातला उपक्रम आहे. आम्ही व्हिडीओ मेकिंग मधले प्रोफेशनल नाही आहोत आणि या विषयातलं बरंच काही नुकतंच इंटरनेटवर शिकलो आहोत.

तुम्हाला व्हिडीओ आवडले तर लाईक/सबस्क्राईब जरूर करा! काही सूचना किंवा प्रश्न असतील तर कळवा.

धन्यवाद!

चहा-बिस्कीट प्रोडक्शन

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

टीप - सर्व व्हिडिओजना इंग्रजी सबटायटल्स जोडली आहेत.

मराठी (किंवा हिंदी) यामध्ये बैठ्या खेळांचे नियम सांगणाऱ्या वेबसाईट्स/व्हिडीओज जवळपास नाहीतच. म्हणून ही सिरीज सुरु करायचा विचार आम्ही केला. आमच्या सिरीजच प्रमोशन (विनामूल्य, कारण आमच्या चॅनेल मधून आम्हाला काहीच पैसे मिळत नाहीत. मोनेटायझेशन बंद आहे.) कुठे करता येईल याबद्दल तुमचा काही सल्ला असल्यास जरूर द्या.

आमच्या ओळखीतल्या सगळ्यांना वॉट्सअप वर लिंका पाठवून सुद्धा ५०० पण views झाले नाहीत!

त्याबरोबर व्हिडीओत अजून काय-काय सुधारणा करता येतील ते देखील सांगा.

आणि मुख्य म्हणजे आमच्या व्हिडीओज मधले खेळ आधी खेळून पहा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवांतर - कोणाला व्हिडीओ बनवण्याच्या तांत्रिक गोष्टींची माहिती हवी असेल कृपया विचारा.

व्हिडीओ एडिटिंग साठी आम्ही शॉटकट (ShotCut) तर ऑडिओ एडिटिंग साठी Audacity हे सॉफ्टवेअर वापरले आहे. ही दोन्ही सॉफ्टवेअर फ्री आणि ओपन सोर्स आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@चहा-बिस्किट, गोल्फ खेळून बघितला. मजा आली. दोन्ही भाचरं खुश आहेत या खेळावर..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

वा, वा! खेळून पाहिलात हे वाचून आनंद झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे त्यांना नको म्हणत आम्ही दुसय्रा एका स्क्रीनमध्ये डोकं खुपसायचं का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे त्यांना नको म्हणत आम्ही दुसय्रा एका स्क्रीनमध्ये डोकं खुपसायचं का?

हा हा! मी वाट बघत होतो हा मुद्दा कोण काढतं ते. फक्त खेळाचे नियम शिकण्यासाठी या सिरीज चा उपयोग आहे. नियम शिकून झाल्यावर स्क्रीन बंद करा, सजेस्टेड व्हिडीओ बघत नसू नका Smile

(का तुमचा मुद्दा काहीतरी वेगळा होता, जो मला समजला नाही?)

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक पाहिलेला खेळ टिव्हीवर, तो आम्ही लहानपणी खेळायचो. दगडाच्या ठिकय्रा लांब फेकायच्या. एकाने फेकली त्याच्या अगदी एकवित जवळ दुस य्राची पडली तर पहिल्याकडून एक गोटी घ्यायची.
तिकडे परदेशात कुठे रिटायर्ड लोक चिजच्या ठिकय्रा वापरताना दाखवलेले. असे चिज गोळा करायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0