मनिषा (भाग ३)

मनिषा आता तिकडे सासरी नांदत होती. इकडे माझ्यावर एक संकट कोसळलं. मी कामानिमित्त बाहेरगावी गेलो होतो आणि माझ्या बायकोने माझी पुस्तकं, व इतर गोष्टी ठेवलेलं कपाट उघडून पाहिले. त्यात मनिषाने लिहिलेले पत्रं तिला सापडली. तिने ती वाचली. मी घरी आलो तर माझी बायको एक शब्दही बोलेना. रुसून बसली. समजूत काढायला गेलो तर तीने "आधी ती पत्रं जाळून टाका. मला तुम्ही फसवलं आहे, लग्नाआधी प्रेमप्रकरण करायची लाज वाटली नाही का, तुम्ही मला व तिलासुध्दा फसवलं आहे." असं बोलून भांडायला लागली. "अजून पत्रं जपून ठेवलीय म्हणजे तीच तुमच्या मनात आहे" असं म्हणून ती तुटक वागायला लागली. तिच्या माहेरी सुध्दा तिनं सांगितलं. पण माहेरच्या मंडळींनी झालं गेलं विसरून जा असं सांगितलं. पण तरीही माझी पत्नी नेहमी मला फसवलं असं बोलून टोचत राहीली.
मनिषा लग्नानंतर एम. ए. झाली. नंतर तिने बी. एड. ला एडमिशन घेतली. एकदा गाठ पडली असता मी तिला म्हणालो " मला तूझी फार आठवण येते, तूला येते का? तू माझी नेहमीच आठवण काढत असशील , मला तुझ्याशिवाय जगणं फार कठीण वाटत आहे." तर ती म्हणाली " मग आत्महत्या करा. मला संपर्क केला तर माझ्या कडे खूप मार्ग आहेत." आडून आडून पोलिसात तक्रार करीन अशी धमकी होती ती.
मी तर एकदम हादरून गेलो. इतकी बदलली ही? मी आता ठरवलं परत तिचं तोंड सुध्दा बघायचे नाही. मग कळलं की ती पि. एस. आय. (पोलिस उपनिरीक्षक) परिक्षा उत्तीर्ण होऊन विदर्भात जॉईन झाली होती.
एकदा तिचा मोबाईल नंबर मिळाला. मध्ये बरीच वर्षे उलटून गेली होती. अगोदर मोबाईल फोन नव्हते. मला तिचं अभिनंदन करायचे होते. पण तिची रिअॅक्शन कशी राहील याची काळजी वाटत होती. चिडली तर
काय करावं? फोन करायची हिंमत होत नव्हती. एकदाचा फोन केला व " हा शिंदेंचा नंबर आहे का? " असे विचारले. ती बोलली " नाही. रॉंग नंबर आहे." परत काही दिवसांनी फोन केला व शिंदे आहेत का विचारलं तर तिनं आवाज ओळखून " कशाला खोटं बोलता? मी तुम्हाला ओळखलं आहे. काय काम आहे?" असे म्हणाली. मग मी तिचं अभिनंदन केले व इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. मला जाणवलं की ती माझ्याशी बोलायला खूप उत्सुक आहे. नंतर ती फोन करून पंधरा मिनिटे, अर्धा तास बोलायला लागली. मला कंजूस, काय काय नावं ठेवायला लागली. एक दिवस म्हणाली माझ्या घरी या. मग एक दिवस मी गंमत केली . माझी कार इकडेच ट्रॅफिक मध्ये अडकली होती व मी तिला फोन केला " अगं मी आलोय तुझ्या गावात. पत्ता सांग ना तुझ्या घराचा." ती आनंदाने म्हणाली या इकडं सिटी पोलिस स्टेशनला. मी म्हटलं आलो दहा मिनिटात. नंतर तिचा फोन आला तर मी म्हणालो " अगं गंमत केली. मी इकडे गावालाच आहे. हे ऐकून ती रागावली. नंतर परत फोन करून गप्पा मारायची. तिचा नवरा तिला त्रास देतोय, दोन मुलींना घरी ठेवून कामावर , रात्रपाळीला कधीही जावं लागतं हे सांगायची.
अशीच एकदा ती आमच्या कडे आली. एकटीच आली होती. पण बायकोमुळे मी तिला घरी बोलावले नाही. भावाच्या घरी मुक्कामाला थांबली. पण मी तिला भेटलो नाही. परत एकदा आली तेव्हा मी आणि माझी बायको कारने बाहेर निघालो होतो. घरी परत येईपर्यंत ती निघून गेली होती.
नंतर फोन केला तर " किती छळता हो मला तुम्ही. माझा अपमान केला तुम्ही घरी न बोलवून. " मी म्हटलं "माझी मजबुरी आहे . ही तुझ्याशी भांडली असती तर? तिनं तुझा अपमान केला असता म्हणून नाही बोलावलं"
नंतर म्हणाली मी पण घेईन गाडी. मी म्हटलं घे पण स्विफ्टच घे. ती म्हणाली मग काय तुम्हीच गाडी घेऊ शकता काय?
एक दिवस फोन केला तर म्हणते " लॅपटॉप घेतला आहे" तिची भाषा मला जळवायची होती. मी म्हटलं माझ्याकडे दोन हजार चार पासून कॉंप्युटर, दोन दोन प्रिंटर सगळे काही आहे. तिला राग आला.
नंतर मी दोन वर्षे फोन केला नाही. तिचा नवरा तिला नोकरी सोडून दे म्हणून धमकावत होता व बेशुद्ध पडे पर्यंत मारहाण करत होता. पण ती नोकरी सोडणार नाही असे म्हणत होती. एक दिवस त्याने खूप मारहाण केली की ती मरते की काय. तिनं इतके दिवस माहेरी सांगितले नव्हते. ती मुलींना नवऱ्याकडे सोडून माहेरी पळून आली. तिचे वडील घटस्फोट घेऊ यावर ठाम होते. पण नवऱ्याकडून समझोता करायचा प्रयत्न झाल्यावर कोर्टात त्याच्याकडून बॉण्ड लिहून घेतला तेव्हा परत गेली. नवरा नंतर तिच्या ताटाखालचं मांजर बनला.
एकदीड वर्ष गेल्यानंतर एक दिवस मला ट्विटरवर मनिषा तिचं माहेरचं आडनाव व माझं आडनाव लावलेल्या आयडीकडून " nothing , how are you? " असा मेसेज आला. मग मी पाच पन्नास मेसेजेस " आय लव्ह यू मनिषा" असे लिहून पाठवले. तिनं रिस्पॉन्स दिलाच नाही वर मला ब्लॉक केले.
मग मी नथिंग, हाऊ आर यू असे एस एम एस पाठवले. ती फोन करून कानात बोलल्यासारखा आवाज काढून " मेसेज कशाला करता, मला नवऱ्याला घाबरावं लागतं. फोनवर बोला" असे म्हणाली. पुढे ती मला टाळायला काहीही बोलायला लागली.
मग मी तिला "प्रेम त्याच्यावर करायचे, भवतीनं त्याच्या फिरायचे आणि त्याच्याच लग्नात जेवायचं" असे मेसेज पाठवून द्यायचो. कारण ती माझ्या लग्नाला आली होती. मी तर तिच्या लग्नाला गेलोच नव्हतो. "क्या आपकी शादी बॉण्ड पर टिकी हुयी है" असे मेसेज पाठवले तेव्हा ती म्हणाली डोन्ट ट्राय टू कॉन्टॅक्ट मी. अदरवाईज.....
तिच्यातला पोलिस चांगलाच जागा झाला होता. तिचं प्रमोशन होऊन आता पि आय झाली व एक्स यु व्ही ५०० गाडी घेतली होती.
नवरा पुर्ण थंड पडला होता तिच्यापुढे.
बऱ्याच दिवसांनी मी तिला फोन केला तर ओरडून म्हणाली " मी गाडी चालवतेय, तुम्हाला काय काम ना धंदे." मी फोन कट केला व स्वत:शीच हसलो.
समाप्त.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हुश्श.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उगाच हुश्श केलय कथेला समर्पक. पण कथा छान धावली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद आ'बाबा! सत्यकथाय ती. चित्तरकथा म्हणा हवं तर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

चित्तरकथा!! सत्यकथा!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या सर्व प्रकारास शुद्ध मराठीत 'स्टॉकिंग' अशी संज्ञा आहे, असे वाटते. (चूभूद्याघ्या.) तसेच, घटना घडली तेव्हा नसेलही कदाचित (चूभूद्याघ्या), परंतु निदान आजमितीस तरी हा जगात सर्वत्र (भारतातसुद्धा) कायद्याने दंडनीय गुन्हाही आहे.

सबब, कथा - मनोव्यापारांचे दर्शन म्हणूनसुद्धा - आवडली नाही. आणि, सत्यकथा असेल तर... असोच.

गांधीजींना आम्ही महात्मा मानतो, ते त्यांच्या राजकीय - आणि कदाचित स्वल्प अंशी सामाजिक - क्षेत्रातील सार्वजनिक टगेगिरीबद्दल; 'सत्याच्या प्रयोगां'तल्या त्यांच्या अतिवैयक्तिक स्वरूपाच्या 'कबुलीजबाबां'बद्दल नव्हे. Confessions of an ultra-personal nature do not a Mahatma make!

असो चालायचेच.
..........

भारतात हा कायद्याने गुन्हा २०१३ साली ठरविण्यात आला, असे विकी सांगतो. फार कशाला, अमेरिकेच्या विविध राज्यांतून, पश्चिम युरोपातल्या विविध देशांतून तथा जपानात, कॅनडात आणि ऑस्ट्रेलियातसुद्धा हा कायद्याने गुन्हा म्हणून १९९०च्या दशकापासून ते २०००च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत एवढ्या कालावधीतच ठरला (त्याअगोदर नव्हे), असेही विकीकडूनच कळते. असो.

अर्थात, हे माझे वैयक्तिक मत.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

कथा, कादंबऱ्या आणि चित्रपटात ठीक आहे. परंतु प्रत्यक्षात अत्यंत त्रासदायक आणि घृणास्पद प्रकार आहे हा.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

*********

टाळ बोले चिपळीला - नाच माझ्या संग ।
देवाजीच्या दारी आज - रंगला अभंग ॥

काहीही म्हणा पण घडलं असंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

म्हणून रांगडा गडी पायजे, पळवून नेणारा डायरेक, हान की बडीव बिडीएसेम

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

एकदम बरोबर बोल्लासा. आता काय उपेग?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

मस्त लिहिलंय, तिन्ही भाग एकत्र टाकायला हवे होते. मनीषा विषयी माझ्यसारख्या गेंड्याच्या कातडी असलेल्या माणसाला पण सहानुभूती वाटली म्हेच तुमच्या लेखनाचे यश गोल्डन ब्राउन.

हा "न"वी बाजूच्या प्रतिसादाकडे काही लक्ष देऊ नका. असे लोक स्वतःच्या गावाबाहेर कधी पडत नाहीत आणि नुसता विकिपीडिया आणि गुगल वरून युरोप अमेरिकेच्या गांडीचा वास घेतात. stalking वैगेरे काही नाही केला तुम्ही. असच असता रियल लाईफमध्ये. हा नवी बाजू नुसता माझे मत आणि सायटेशन लावून शहाणपणाचा आव आणत असतो .

"सबब, कथा - मनोव्यापारांचे दर्शन म्हणूनसुद्धा - आवडली नाही.२ आणि, सत्यकथा असेल तर... असोच."

अंबरनाथ के आज कभी गया नही और बाते अमेरिका कि लोल.
सत्यकथाच आहे हि नवीबाजू , नुसता काजू खाल्ला नाही या गोल्डन ब्राउन काकांनी तुमच्यासाराखा अरेंज मॅरेज करून. देशस्थ - देशस्थ!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ2

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

धन्यवाद सुशेगाद भाऊ. भाषा जरा सौम्य वापरा ही विनंती. ती तुकोबांनाच शोभते " देऊ तरी गांडीची लंगोटी नाठाळाचे काठी हाणू माथा." आचार्य अत्रे यांनी गांडीची शब्द बदलून कासेची असा केला. तर आपणही तोच वापरावा ही विनंती.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

कधी कधी भाषेची भीडभाड न बाळगता लिहून बघा. हे असला मागासपणा भारतातच असतो. जे मनात ते लिहायचं. आणि हे नवी बाजू सारख्या लोकांकडे प्रूफरीड करून लिहायला खूप वेळ असतो.

तुकोबा वैगरे ठीक आहे. अत्रे काय चार्लस बुकोवस्की लेवल च थोडेच होता त्याचा ऐकायला.

खाली एक डायलॉग आहे ,एका मेक्सिकन फिल्म मधला जिला स्क्रिनप्ले साठी ऑस्कर मिळालय.

Tenoch: Did she blow you?

Julio Zapata: [looks away] Of course not man!

Tenoch: [angrily] Look me in the eyes asshole! Did she blow you?

Julio Zapata: No.

Tenoch: Did you blow her? You fucking pig!

Julio Zapata: Of course not, c'mon!

Tenoch: Did she come?

Julio Zapata: How could I know? It happened really fast, maybe she didn't.

Tenoch: Did she like it?

Julio Zapata: I don't know.

Tenoch: Did you like it, asshole?

Julio Zapata: No dude! No! I really felt like shit, I mean it!

[beat]

Julio Zapata: I wanted to tell you.

Tenoch: [shouts] Fuck you asshole! You fucked up our friendship, you fucked up my trust, you fucked my girl! You fucked up! Even when I brought from Lake Tahoe your fucking comics and the fucking dress for Ana, that whore!

Julio Zapata: Tenoch, I'm sorry man, it was an accident, really.

Tenoch: An accident?

[angrily]

Tenoch: You poke some girl's eye by accident, asshole! You don't fuck her! You don't fuck her!

Julio Zapata: [shyly] Right... right.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

ज्युलिओ ने टेनोक च्या प्रेयसीबरोबर सेक्स केला म्हणून टेनोक त्याला जाब विचारत आहे ना? तिला का विचारत नाही? की विचारला आहे? यावरून स्त्री स्य चरित्रम् पुरुषस्य भाग्यम् हे खरं आहे असे वाटते. स्त्रियांचा थांग लागणं अवघड असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

होय, पूर्ण फिल्म बघा जर मिळाली पाहायला तर.
स्त्रियांचा थांग लागण अवघड असत जेव्हा आपण डायरेक्ट विचारत नाही आणि गेस करत बसतो. जेव्हा कबीर सिंग सारखी पर्सनॅलिटी असते तेव्हा झक मारत स्त्रिया येतात मागे.
जाती कितीही फेमिनिझम कोळून प्यायला तरी त्यांना कबीर सिंग सारखा माचो , अडमुठा, पळवून नेणारा, वाईट वागवणारा मुलगाच आवडतो.
हम झुकते है तो दुनिया कासे मार जाती है.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

फिल्म का नाम बताओ भी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

https://hdbest.net/y-tu-mam-tambin-2001-4856.html

headphone ghalun bagha aur ghari kon nastana nahitar mazi kase maral.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

थोडा वेळ नबा आपलं मत खरं मानलं तरी नावं बदलून लिहिलेल्या गोष्टीने कायदा भंग कसा होतो. आणि नायिकेपर्यंत हे कसं पोचणार? नाव, गाव उल्लेख केलेला नाही. त्यामुळे क्ष व्यक्तीची हिस्टरी उघड झाली हे कसं सिध्द होते आणि तक्रार कोण करू शकतो याविषयी माहिती द्या. जागरूक केल्याबद्दल धन्यवाद. यापुढे सत्यकथा लिहिताना काळजी घेईन.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

नातेसंबंध हे सरळ रेषेसारखे कधीच नसतात. तशी अपेक्षा केली तर अपेक्षाभंगच पदरी पडतो. आपल्या दोघांच्या मनाची उलाघाल मी समजू शकले. तिचा गाडी वगैरे समृद्धीबद्दलचा मत्सर तर १०० % समजू शकले.
तिला अगदी पूर्णपणे विसरणंच श्रेयस्कर आहे. १००% श्रेयस्कर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद सामो जी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

अशा घटना खूप लोकांच्या आयुष्यात घडतात .
तुमची कथा ही सत्याच्या जवळ जाणारी आहे .
प्रेयसी आणि बायको ही दोन्ही नाती
सांभाळताना जी मनाची घालमेल होते त्याचे यथार्थ वर्णन केले गेले आहे .
आणि प्रेयसी विषयी ओढ आहे प्रेम आहे पण त्यात आक्रमक पना नाही संयम आहे .
तिच्या वैयक्तिक आयुष्यात लुडबुड सुद्धा नाही पण भेटावी अशी सुप्त इच्या सुधा आहे दोन्ही भावनेचं वर्णन फक्कट जमून आले आहे .
असे प्रसंग घडतात समाजात.
प्रेम, जलन,ओढ,मर्यादा,सर्व प्रसंग कथेत आले आहेत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद राजेश भाऊ!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।