पहीली भेट

परदेशी नागरिकत्व मिळूनही, भारताबद्दल अतूट प्रेम वाटते, किंबहुना या भूमीवरती पाऊल ठेवले की भरून येते. इथे ना कधी उपरेपणा जाणवला ना जाणवेल. किती का पाश्चात्य संस्कृती अंगवळणी पडलेली असू देत, पण या जागेबद्दल, इथल्या संस्कृतीबद्दल जो जिव्हाळा वाटतो तो अवीट आहे व तसाच राहील .
मुलगी ३ वर्षांची असताना आम्ही अमेरिकेत गेलो त्यापश्चात, यावेळेला मुलीबरोबर पहिली भारतवारी केलेली. म्हणजे तिच्याकरता पहिली. खूप anxiety होती की तिला हि भूमी कशी वाटेल , तिला आवडेल का, ममत्व वाटेल का? अर्थात आवडेल ना आवडेल त्यात मला काहीच say नव्हता, तो सर्वस्वी तिचा वैयक्तिक अनुभव होता. पण तरीही!

आणि काय आश्चर्य मुलीला भारत देश पहिल्यांदा पाहूनच , अतिशय आवडून गेला. तिच्याच शब्दात सांगायचे झाले 'तिला surreal वाटले". काहीतरी ओळखीचे पण हातात धरू पाहाताही चिमटीतही ना येणारे, काहीतरी illusive . तिला इथली झाडे, पक्षी , लोक, गर्दी सारे काही आवडून गेले. आणि हे सर्व तिच्या मनात मी काहीही भरविले नसताना.आपणहोऊन हा जो आपलेपणा वाटला याला काय म्हणावं. आणि तरी अजून तर बेस्ट ऑफ कंट्री yet टु सी. कोकण, केरळ, गोवा, दक्षिणेतील मंदिरे , राजस्थान काहीकाही पाहिलेले नाही.
दर वेळेला इथे आलं की गलबलून येतं. इथे आपलेपणा वाटतो. इथे आपण फक्त ब्लेंडच होत नाही तर I belong here - हे आवर्जून लक्षात येते.
coming बॅक टु रुटस म्हणजे काय हे अनुभवायला, आधी आपली मूळे उखडून, दूर वेगळ्या परक्या वातावरणात स्वतः:ला रुजवावे लागते नंतरच हे सुख अनुभवता येत असो.
मुलीच्या हृदयाला तिच्या मातृभूमीच्या घातलेली ही साद मला कशी वाटते सांगू. अद्न्येन् यांच्या शब्दात -

वह सोने की कनी जो उस अंजलि भर रेत में थी जो
--धो कर अलग करने में--
मुट्ठियों में फिसल कर नदी में बह गई--
(उसी अकाल, अकूल नदी में जिस में से फिर
अंजलि भरेगी
और फिर सोने की कनी फिसल कर बह जाएगी।)

काळाच्या प्रवाहात कधीतरी उन्हात चमचमणारी सोन्याची बांगडी हाताला लागते काय आणि हातात धरेधरे स्तोवर ती विखरून परत नदीत विखरून जाते काय. तसे झालेले आहे. उन्हाने लाटांवरती निर्माण केलेली ही बांगडी ना कधी धरता येईल परंतु , एका क्षणी ती तशी illusively का होईना हातात आली, हेही नसे थोडके.
हे क्षण नाही धरून ठेवता येणार पण ते तसे निर्माण झाले, अनुभवता आले, हेच इतके मोठे आहे. तिला वाटलेला हा जिव्हाळा, माझयाकरता, अत्यंत सुखद धक्का आहे. कोणी सांगावे, आमच्या पश्चातही.पुन्हापुन्हा, ती घरट्याकडे झेपावत राहिला. फक्त देशाकडे एक स्थान, ठिकाणं, या दृष्टीने नाही तर मनातील जागा, एका हळवा कोपरा, एक चिंतन, तिची मूळे, तिच्या values म्हणूनही. मी अतिशय आनंदात आहे की तिला एकदा तरी देश दाखवता आला, तिच्याबरोबर तो परत अनुभवता आला.
________________________
२२ डिसेंबर - रात्री ९ ला एकविरा दर्शन झाले. अत्यंत निवांत. कोणीच नाही. फक्त आम्हीच. मनसोक्त वेळ दर्शन घडले.खाली येताना, किर्र काळोख आजूबाजूला पण पायवाटेवरती बंद होत जाणाऱ्या दुकानांचे दिवे. फारच मजा आली. नाना प्रकारची मंगळसुत्रं - माशाचं पदक, माणीकमोत्यांच्या कलाकुसरीची पदके, मोत्याच्या घोसांची पदके. काय काय व्हरायटी. माझ्या मैत्रिणींकरता काही ना काही घेता आले. मग तांब्याचे कडे, गोमेद मणी, कवड्या. मुलीला हे सर्व अनोखे होते, एक्सायटिंग होते. तिने नानाविध एथनिक वस्तू, तिच्या मैत्रिणींकरता घेतल्या. फुलपाखरासारखी भिरभिरत होती मुलगी. एक कवडी विकत घेतली. (तंत्र मार्गात, कवडी ची उभी चीर ही योनीचे प्रतिक मानली जाते. जसे शिवलिंग तशी देवीची कवडी. असे वाचल्याचे स्मरले) माझ्या देवघरात ठेवेन बहुतेक.

फार फार मेमरेबल दिवस होता.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

फार आवडलं. काही गोष्टी आपोआपच होतात. तिथे गेल्यावर बरं वाटायला लागतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद च्रट्जी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या लेखातील विचार जरी कधी पटत असेल कधी नसेल तरी
तुमची लेखनशैली फार आवडते.
तुमची शैली सिसीलीया कार्व्हालोंच्या सुंदर शैलीची नेहमीच आठवण करुन देते हे आवर्जुन नमुद करावेसे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुलीलाही लिहायला सांग ना ... (आणि तिचं लेखन भाषांतरित करून डकव).

परिचित जागा वेगवेगळ्या लोकांबरोबर बघायला मला आवडतात. त्यांबद्दल लोकांच्या नजरेतून नावीन्यानं बघता येतं.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक2
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्या मुलांना एक वेगळ्याच प्रकारच्या ( खऱ्या) स्वातंत्र्याची सवय झालेली असते.
भाच्याची मुलगी आली होती साताठ वर्षांची होती. तिचा अक्सेंट दुसऱ्या एका तिच्या बरोबरीच्या इकडच्या मुलीला कळत होता. त्यांना पतंग आणून दिले होते. खूप आनंद झाला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद ,मारवा.
मुलीला लिहायला सांगून, भाषांतर करण्याची आयडिया जबरी आहे अदिती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचं नशीब चांगलं आहे सामो. ओळखीतली अनेक मुलं इंडिया म्हणलं की आईवडिलांना 'तुम्हीच जा' म्हणतात. हायस्कुलच्या वयाची झाली की मग जास्तच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी तर गावातल्या गावात आई-वडलांच्या कार्यक्रमांना जायला नकार द्यायचे! "मला घरी एकटं राहता येतं, मला तुमच्याबरोबर यायचं नाही", हे म्हणण्याची बुद्धी आल्यावर आई-वडलांनीही त्यांच्याबरोबर नेणं बंद केलं. दुसऱ्या देशात म्हणजे फारच झालं!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्या कार्यक्रमांत समान आवडीची वयाची मुलं मुली येत नसतील ना? कुणीतरी सुरुवात करायला हवीच. तू (तुम्ही) येणार म्हटल्यावर इतरही येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>>>तुमचं नशीब चांगलं आहे सामो>>>> नशीब चांगलं वगैरे नाही म्हणणार मी कारण जरी तिला देश आवडला नसता तरी फार फरक पडला नसता. सर्वांना सर्व ॲप्रिशिएट करता येत नाही. प्रत्येकाच्या मर्यादा असतात. मला फक्त याचा माफक आनंद आहे की ५०-५० चान्सेस होते, तिला तो आवडुन गेला. अर्थात आम्ही सगळेच शेवटी शेवटी होम-सिक झालेलो ज्यात ती सर्वाधिक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0