राज मत्स्य

राज मत्स्य
टीनरीब, रंबल आणि इतर .... वादी
विरूध्द
राजा आणि राणी .... प्रतिवादी
(न्या. वुल साहेब यांचे न्यायालयात)
या अनोख्या खटल्यात, ज्याची सुनावणी आजच सुरु झाली, एक मनोरंजक मुद्दा उद्भवला आहे. एका मृत देवमाश्या संदर्भात, राजा, राणीचे हक्क आणि कर्तव्य.
सर इथलरेड रट के. सी. (वादीचे वतीने वकील) : माननीय न्यायमूर्ती, पुडिंग मॅग्ना या गावचे रहिवासी टीनरीब, रंबल आणि इतर यांनी तेथील ग्रामस्थांच्या वतीने सदरील दावा दाखल केलेला आहे. आता हे पुडिंग मॅग्ना हे गाव डॉरसेट परगण्यात......
न्यायमूर्ती वुल : हा डॉरसेट परगणा कुठे आहे?
सर इथलरेड रट : न्यायमूर्ती हा पहा माझ्याकडे नकाशा आहे, त्यात तुम्हाला हे गाव आढळेल, तळाशी, थोडेसे डाव्या कोपर्‍यात....न्यायमूर्ती, .... डॉरसेट, डॉरसेट.....
न्यायमूर्ती वुल : होय, होय, सापडले... तुम्ही चालू ठेवा...
सर इथलरेड रट : धन्यवाद न्यायमूर्ती.... तर न्यायमूर्ती, हे पुडिंग मॅग्ना गाव, पुडिंग उपसागराच्या ईशान्येला वसलेले आहे. या गावातील लोक हे सामान्य कोळी समाजातील आणि सर्वसामान्य उत्पन्न गटातील आहेत.. हे एक साधे गाव असून विल्यम शेक्सपिअर, थॉमस हार्डी यांच्या सारख्या नामांकित लेखकांच्या लिखाणात याचा साधा उल्लेख सुद्धा नाही.
न्यायमूर्ती वुल : ते सर्व तसेच आणि सारखेच !!!!!
सर इथलरेड रट : तर न्यायमूर्ती, ही घटना घडली २१ जून च्या रात्री, जेंव्हा या पुडिंग उपसागराच्या दक्षिणेच्या नैऋत्य दिशेला एक मृत देवमाश्याचे धूड येऊन पडले... न्यायमूर्ती....आता हा संपूर्ण देवमासा आणि त्याचे सर्व अवयव हे राजाच्या मालकीचे आहे. किंवा अधिक स्पष्टपणे सांगायचे तर त्याचे डोके हे राजेसाहेबांच्या मालकीचे आहे आणि त्याचे शेपूट हे राणीसाहेबांच्या मालकीचे आहे. राणीसाहेबांच्या शेपटावरील मालकी हक्कासंदर्भातील रेक्स वि. मंडे (१८४१ ३ AC) हे निकालपत्र तर आपल्या स्मरणात असेलच.
न्यायमूर्ती वुल : माझ्या असे काहीही स्मरणात नाही.
सर इथलरेड रट : न्यायमूर्ती.. उत्तम.. तर न्यायमूर्ती.. या पुडिंग मॅग्ना गावातील राजनिष्ठ ग्रामस्थांनी अत्यंत त्वरेने या मृत देवामाश्यामधील उपयुक्त अशी चरबी, हाडे आणि इतर किमती नाशवंत घटक काढून घेतले आणि ते स्वतःकडे ठेवून घेतले.....
मला त्यांच्याकडून असे सांगण्यात आले आहे की, त्या गोष्टींचा ताबा त्यांनी राजाच्या वतीने विश्वस्त म्हणून घेतलेला आहे.. मी असे नमूद करतो की त्यांच्या या कृतीमागे त्यांचा इतर काही उद्देश आहे असे दाखवण्याचा कोणीही प्रयत्न केला तर त्याला तीव्र प्रतिकार केला जाईल आणि गरज पडल्यास त्या संदर्भात योग्य ते प्रतिज्ञापत्रही दाखल केले जाईल.
तर न्यायमूर्ती.. ३ दिवसांनतर या भागातील वाऱ्याचा रोख बदलला आणि जो उत्तरेकडे होता तो आता आग्नेयेकडे वळाला..........
सर विल्फ्रेड नॉकनी के. सी. (प्रतिवादीचे वतीने वकील) : तुम्हाला नैऋत्य म्हणायचं ना.
सर इथलरेड रट : मी माझ्या विद्वान मित्रांचा अत्यंत आभारी आहे. त्यांचे वक्तव्य अत्यंत योग्य आहे... न्यायमूर्ती... न्यायमूर्ती... वारा नैऋत्येकडे वाहत होता... आणि न्यायमूर्ती... त्या घटनेनंतर साधारण ५ दिवसांनंतर ते देवमाश्याचे धूड पुडिंग मॅग्नाच्या रहिवाशांकरीता त्रासदायक होऊ लागले.
अशा परिस्थितीत सर्व ग्रामस्थ अत्यंत विश्वासाने राजेसाहेबांकडे अत्यंत आशेने बघू लागले होते की त्यांनी त्यांच्या मालकीच्या वस्तूचे उर्वरित भाग योग्य ठिकाणी हलवावेत...
सर विल्फ्रेड नॉकनी : त्या वस्तूंचा आता ग्रामस्थांना काहीही उपयोग उरलेला नव्हता.....
सर इथलरेड रट : न्यायमूर्ती.. माझ्या विद्वान मित्रांनी या प्रकारची निंदाव्यंजक विधाने करू नयेत.... न्यायमूर्ती मी याचा निषेध करतो... न्यायमूर्ती.....
न्यायमूर्ती वुल : सर इथलरेड, तुम्ही चालू ठेवा..
सर इथलरेड रट : न्यायमूर्ती... धन्यवाद, आपण अतिशय उत्तम आहात... तर न्यायमूर्ती.... अशा परिस्थितीमुळे पुडिंग मॅग्नाच्या सरपंचांनी, अत्यंत आदरपूर्वक, एक विनंती अर्ज गृहसचिवांना पाठविला की कृपा करून राजेसाहेबांना त्यांच्या मालकीच्या वस्तूचे आगमन झाल्याची बातमी कळविण्यात यावी आणि त्यांनी त्वरित ती वस्तू गावातून हलवावी. आणि न्यायमूर्ती .... या अर्जाची एक प्रत शेतकी आणि मत्स्योत्पादन विभागाकडे सुद्धा पाठविण्यात आली.
न्यायमूर्ती त्यामुळेच बहुधा हा पत्रव्यवहार गृहसचिवांच्या नजरेतून संपूर्णपणे निसटला..... पण शेतकी आणि मत्स्योत्पादन विभागात मात्र सरपंचांचे हे पत्र एका श्री. स्लीप नावाच्या एका नव्यानेच भरती झालेल्या कारकुनाकडे देण्यात आले, ज्याच्याकडे अत्यंत सुपीक कल्पनाशक्ती आणि दैनंदिन कामे करण्याची असाधारण अकार्यक्षमता असावी असे दिसते आहे.
न्यायमूर्ती... सध्या या गृहस्थाने सरकारी नोकरी सोडून दिलेली आहे...
एकूण प्रकरणात असे दिसते आहे की, सरपंचांचे हे पत्र श्री. स्लीप यांच्या टेबलावर अनेक दिवस दाखल न घेताच पडून राहिले.. आणि एक दिवस श्री. स्लीप यांच्या हातात एक टेलेग्राम पडला.
“राजेसाहेब - मागील पत्रव्यवहारात नमूद केलेला देवमासा आता विघटनाच्या पुढच्या टप्प्यात पोहोचला आहे तेंव्हा कृपा करून त्वरित कार्यवाही करावी – टीनरीब”
न्यायमूर्ती.. श्री. स्लीप यांनी स्वतः सांगितल्याप्रमाणे, त्यांच्या तल्लख बुद्धीने, त्यांनी एक उपाय शोधून काढला जेणे करून राजाच्या खजिन्यावर ताण पडणार नाही. त्यानी दोन दिवसांनी नॅचरल हिस्टरी म्युझियम च्या संचालकांना एक पत्र लिहुन कळविले की “balaena biscayensis” प्रजातीचा एक मासा पुडिंग उपसागराजवळ आढळला असून राजेसाहेबांच्या आदेशाप्रमाणे शेतकी आणि मत्स्योत्पादन खात्याचे मंत्री तो मासा संग्रहालयाला देशाच्या वतीने विश्वस्त म्हणून सांभाळ करण्यासाठी, देऊ इच्छितात. तेंव्हा त्यांनी कृपा करून देवमाशाचा ताबा स्विकारावा आणि स्वतःच्या खर्चाने त्याची वाहतूक करावी.
न्यायमूर्ती.. ३ जुलैला नॅचरल हिस्टरी म्युझियम च्या सचिवांनी, तेथील संचालकांच्या वतीने पत्रोत्तर लिहिले आणि कळविले की संग्रहालयात जागेची कमतरता असल्यामुळे राजेसाहेबांची अत्यंत उदार भेट ते स्विकारू शकत नाहीत व त्याबद्दल क्षमस्व. त्या पत्रात त्यांनी असेही नमूद केले की संग्रहालयात “balaena biscayensis” प्रजातीचे ३ नमुने उपलब्ध आहेत.
न्यायमूर्ती.. या घटनेनंतर काही दिवस कोणतीच कृती श्री. स्लीप यांनी केल्याचे दिसत नाही...दरम्यानच्या काळात ते देवमाशाचे धूड सडायला लागले आणि त्यामुळे समुद्राचे पाणी विषारी होऊ लागले आणि त्याचा परिणाम स्थानिक कोळी लोकांच्या जीवनावर होऊ लागला.
श्री. टीनरीब यांनी....न्यायमूर्ती....आपला एकतर्फी पत्रव्यवहार चालूच ठेवला. न्यायमूर्ती.... १२ जुलै रोजी श्री. स्लीप यांचे नाविकदलातील मित्र आणि सहकारी श्री. स्लो यांच्याबरोबर सहभोजन केले. जेवणाचा आस्वाद घेता घेता या देवमाशाचा विषय निघाला आणि श्री. स्लीप यांनी (अनधिकृत पणे) श्री. स्लो यांना कळविले की त्यांचे खाते हा मृत देवमासा नाविक दलाला “target practice” करीता देण्यास इच्छुक आहे आणि नाविक दलाने त्वरित जहाजे पाठवून तो देवमासा पाण्यातून बाहेर काढून स्वतःच्या ताब्यात घ्यावा. श्री. स्लीप यांनी श्री. स्लो यांना त्याचा अजून एक महत्वपूर्ण उपयोग सांगितला की पाणबुड्यांसारख्या लक्ष्यांचा वेध घेण्याचा सराव करण्यासाठी अशा प्रकारचा मासा अधिक चांगल्या प्रकारे वापरता येईल. न्यायमूर्ती.... श्री. स्लो यांनी श्री. स्लीप यांना वाचन दिले की या संदर्भात ते पदाधिकार् यांशी चर्चा करतील आणि ही भेट स्विकारण्याची शक्यता पडताळून पाहतील... आणि त्यानंतर त्यांची बैठक संपली.
न्यायमूर्ती..... हे सगळे जेंव्हा घडले तेंव्हा १२ जुलै तारीख होती आणि त्यानंतर १७ जुलैला ते जेंव्हा पुन्हा भेटले तेंव्हा श्री. स्लो यांनी श्री. स्लीप यांना सांगितले की शेतकी आणि मत्स्योत्पादन खात्याच्या या प्रस्तावाला नाविक दलाचे कोणीही पदाधिकारी पाठींबा देत नाही आहेत..आणि दृष्टीआड होणाऱ्या लक्ष्यांवर सराव करणे चांगले असले तरी पदाधिकारी असा दारूगोळ्या वर खर्च मंजूर करू शकत नाहीत जे लक्ष्य बहुसंख्यवेळा सर्व अंतराच्या पल्ल्यांच्याही पलीकडे असते... त्यांचे असेही मत पडले की जोपर्यंत त्यांचा शिशिर ऋतूतील सराव सुरु होईल तोपर्यंत हा देवमासा नैसर्गिक रीतीने नष्ट झालेला असेल.
न्यायमूर्ती..... पुडिंग मॅग्नाच्या रहिवाशांचेही हेच मत आहे..
न्यायमूर्ती.....२० जुलै रोजी श्री. टीनरीब आणि इतर ग्रामस्थांच्या एका शिष्टमंडळाने श्री. स्लीप यांची भेट घेतली आणि त्यांना याची जाणीव करून दिली की पुडिंग मॅग्ना भागातील मासेमारी आता (विषारी पाण्यामुळे) संपूर्णपणे बंद झालेली आहे. दुर्गंधीमुळे गावात राहाणेही ग्रामस्थांना शक्य नाही आणि म्हणूनच लोक आता पळून गावापासून दूर राहायला गेली आहेत... त्यांनी अशीही विचारणा केली की, जर शक्य असेल तर थोडाफार दारू गोळ्याचा वापर करून ते देवमाशाचे धूड नष्ट करणे कायदेशीर ठरेल का? आणि त्या करता जो काही थोडा फार खर्च येईल त्याचा परतावा राजेसाबांच्या खजिन्यातून ग्रामस्थांना मिळेल का?
न्यायमूर्ती....यावर श्री. स्लीप यांनी मत प्रदर्शित करण्यास असमर्थता दर्शविली...मात्र त्यांचे मत असे पडले की सदरील मृत देवमासा निर्विवादपणे राजेसाहेबांची मालमत्ता आहे आणि अर्थखाते राष्ट्रीय संपत्तीतून राजाची मालमत्ता सामान्य नागरिकांनी नष्ट करण्याचा परतावा देईल का?
त्यांनी हे पण नमूद केले की जर ग्रामस्थांनी अर्थखात्याला संपर्क केला तर त्या देवामाशाची चरबी, हाडे आणि इतर किमती नाशवंत घटक, जे ग्रामस्थांनी काढून घेतलेले आहेत त्याचाही हिशेब विचारला जाईल.
पण दारूगोळ्याचा उल्लेख करता त्यांच्या डोक्यात एक नवी कल्पना आली की आपण युद्ध खात्याशी संपर्क साधावा की ते या धुडाचा ताबा घेण्यास उत्सुक आहेत का? एव्हढी चर्चा होऊन टी बैठक संपली. शिष्टमंडळाला हा उपाय योग्य वाटला आणि ते परतले.
न्यायमूर्ती....२४ जुलैला युद्धखात्याला एक पत्र पाठविण्यात आले की, पुडिंग उपसागराच्या काठाशी उपलब्ध असलेला मृत देवमासा भू-सागरी युद्ध सरावासाठी अत्यंत उपयुक्त आहे जेणेकरून सैनिक, अभियंते ई. यांना अडथळे हलविणे, आक्रमणाचा सराव करणे, किनाऱ्यावर उतरणे आदि गोष्टींचा सराव करता येईल आणि आगामी सरावांसाठी त्याचा उपयोग होईल. युद्धखाते याही गोष्टीची निश्चित नोंद घेईल की हा मृत देवमासा त्यांच्या कार्यालयाच्या अत्यंत नजीकच्या भागातच उपलब्ध आहे.
न्यायमूर्ती....३१ जुलैला युद्धखात्याचे उत्तर आले की, मृत देवमाशाचे धूड रणगाडे वापरून नष्ट करणे हा फारसा चांगला युद्धसराव म्हणून आता गणला जात नाही.. आणि भविष्यकालीन आगामी युद्धसरावात भूसागरी सराव समाविष्ट नाही.
या दिवसानंतर... न्यायमूर्ती.... श्री. स्लीप यांनी त्यांचे प्रयत्न बहुधा थांबविलेले दिसत आहेत.. काहीही असो.. ४ ऑगस्ट रोजी, श्री. टीनरीब यांना एक अत्यंत संदिग्ध आणि अशोभनीय असे पत्र प्राप्त झाले.
“मृत देवामाशाच्या कलेवरा संदर्भात -
मा. महोदय,
आत्तापर्यंत आपण शेतकी आणि मत्स्योत्पादन खात्याशी केलेला पत्रव्यवहार हा गैरसमजुतीतून केला गेला असल्याचे आम्हास आढळते आहे. वास्तविक पणे हे नमूद करण्याची सुद्धा गरज नाही की, देवमासा हा मत्स्यवर्गीय नसून तो एक सस्तन प्रजातीचा प्राणी आहे आणि त्यामुळे शेतकी आणि मत्स्योत्पादन खाते या संदर्भात कोणतीही जवाबदारी घेऊ शकत नाही. आम्ही या संदर्भात खेद व्यक्त करतो”
अशा परिस्थितीत, न्यायमूर्ती..., पुडिंग मॅग्ना गावातील रहिवासी किंवा मी म्हणेन की कधी काळी तेथे राहात असलेले रहिवासी यांना सदरील दावा दाखल करणे भाग पडले आहे आणि त्यांची आदरणीय न्यायालयाला विनंती आहे की.....
न्यायमूर्ती... न्यायमूर्ती... न्यायमूर्ती...
(पुढची तारीख.......)

साभार भाषांतर
मूळ कथा – Fish Royal, मूळ लेखक – ए. पी. हर्बर्ट, प्रथम प्रसिद्धी – पंच (मासिक), इंग्लंड
पुस्तक - अनकॉमन लॉ (१९३५, मेथुएन), युनिव्हर्सल लॉ पब्लिकेशन (२००९) (भारतीय पुनर्मुद्रण)
अनुवाद: ©
अॅड. भूषण धनंजय पानसे,
“साया”, घुले नगर, वडगाव बुद्रुक, पुणे ४११ ०४१
मो. ९८९०५७१३१४

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हा हा हा

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हीहीही।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे काय होत नक्की ?
एक आर के नारायण ची कथा आठवली
ज्यात एका माणसाला रोडरोलर लॉटरीत बक्षिस म्हणून मिळतो
आणी मग तो त्या गरीब माणसाचे फार फार हाल करतो
अस काहीसं वाटल
बाकी गुढ प्रतिकात्मक अर्थ असेल तर कळला नाही.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे काय होत नक्की ?

जौद्याना! थोरामोठ्यांनी घालून दिलेल्या वहिवाटीस अनुसरा, नि हाहाहा म्हणून मोकळे व्हा.

बाकी,

एका माणसाला रोडरोलर लॉटरीत बक्षिस म्हणून मिळतो

हे रोचक आहे.

लॉटरीचे तिकीट विकत घेतेसमयी बक्षीस रोडरोलर असणार आहे हे ठाऊक नव्हते काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही एक बोधकथा आहे.
( हीहीही हा प्रतिसाद खवचट वाटल्याने थोडा सविस्तर प्रतिसाद देत आहे.)
उद्या(आगामी काळात कधीतरी) चंद्रावर प्रत्येक देशास काही वस्तू फुकट देण्यात /वाटण्यात आली आणि त्याचा महिन्याचा खर्च शंभर कोटी लावला तर हेच होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उद्या(आगामी काळात कधीतरी) चंद्रावर प्रत्येक देशास काही वस्तू फुकट देण्यात /वाटण्यात आली आणि त्याचा महिन्याचा खर्च शंभर कोटी लावला तर हेच होईल.

चंद्रावर महिना कसा मोजतात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चंद्रावर कोण {घंटा} जातोय?
इथूनच कुणाला महिन्याला पयशे पाठवायचेत. क्लेम राहावा म्हणून.

-----
बाकी शंका रास्तच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही रुपककथा समजावी आणि त्यातील देवमासा हीच लोकशाही समजावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकशाहीवर का घसरायचं?
हे एक मार्केटिंग तंत्र आहे. नको असलेल्या वस्तूही विंटेजवगैरे किंवा इतर कारणाने श्रीमंतांच्या गळ्यात बांधणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळातून वाचायला रोचक असेल नक्की. ब्रिटीश कथा आहे ते कळून येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाषा थोडी सोपी करायला हवी.

माझ्या मामाने त्याच्या अनुभवातील एक गोष्ट कथन केलेली आठवते. "रात्रीच्या वेळी आजारी व्यक्तीस हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी अमुक भागात टॅक्सी मिळाली नाही तरी या भागात टॅक्सी स्टॅण्डची सोय करावी" अशा अर्थाची तक्रार् वाचकांच्या पत्रव्यवहारात कुणीतरी केली होती. त्याची सुओ मोटु दखल घेऊन शासनाच्या विविध खात्यांनी जो पत्रव्यवहार एकमेकांच्यात केला त्याची कहाणी वरील प्रकारचीच होती. त्यात समाजकल्याण खाते, आरोग्य खाते, नगरविकास खाते, परिवहन खाते, सार्वजनिक बांधकाम खाते आणि पोलीस खाते या सर्वांनी "शहरात जागोजागी आवश्यक असलेले टॅक्सी स्टॅण्ड" या विषयावर घनघोर चर्चा केली होती. माझा मामा तेव्हा सिडको मध्ये चीफ आर्किटेक्ट होता. आणि हे चर्चेचे बाड "नव्या मुंबईत या विषयात काय काळजी घेतली गेली आहे?" अशी विचारणा करण्यासाठी त्याच्याकडे आले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.