निर्मितीची कल्पनाशक्ती

टोनी मॉरिसन उद्धृत

टोनी मॉरिसन ह्या प्रसिद्ध लेखिकेचं निधन झाल्यावर मला तिच्याबद्दल समजलं.

आमचं ऑफिस सध्या 'वी वर्क'च्या जागेत आहे. तिथे पाण्याच्या पिंपाशेजारी काही तरी उद्धृत असतं. कालचं मला आवडलं म्हणून मी तिथल्या रिसेप्शनव‌रच्या मुलींशी बोलायला गेले.

तिथे जी मुलगी होती ती फार खडूस आहे, असं आमच्या ऑफिसातल्या लोकांचं म्हणणं आहे. का कोण जाणे, ती माझ्याशी नेहमी गप्पा मारते. त्या 'वी वर्क'च्या जागेच्या बाहेर भेटली तरीही नॉर्मल गप्पा मारते. लोकांना ती खडूस का वाटते, हे मला माहीत नाही. त्याबद्दल कधीतरी मी त्यांना खोदूनखोदून विचारणारच आहे.

तर तिनं गप्पा मारायला सुरुवात केली. काय, कसं, शुक्रवार संपतच आलाय, असे माफक विषय झाले. मग कसं कोण जाणे, आम्ही मांजरांबद्दल बोलायला लागलो. आमची तिर्री (मांजर) मला सकाळी लोळू देत नाही. मी लोळताना एकीकडे बातम्या वाचायला फोन सुरू करते. मी फोन कितीही पांघरुणात लपवला तरी तिला ती स्क्रीन उजळलेली दिसतेच. ती येऊन फोनला डोक्यानं ढुशा मारते. त्याचं वर्णन मी एकेकाळी 'फिदायीन हल्ले' असं करायचे. मग तो फोन हातातून पडतो, कधी दिवाणावरून खाली पडतो, कधी त्यात भलत्या ठिकाणी क्लिक होतं. त्यामुळे ती ढुशा द्यायला लागली की मी चुपचाप उठून तिला बाहेर सोडते. तिनं मला बरोबर ट्रेनिंग दिलेलं आहे.

हे मी त्या मुलीला सांगितलं. ती म्हणाली, माझाही बोका अशाच ढुशा देतो. पण तो स्वयंपाकघरातल्या सिंकच्या नळाला ढुशा देऊन नळ सुरू करतो आणि पाणी पडताना बघत बसतो. तिथे दुसरीही रिसेप्शनिस्ट मुलगी आली. तीही तन्मयतेनं आमच्या मांजर-गप्पा ऐकायला लागली.

मी म्हणलं, "बरं झालं माझ्या मांजरीला असल्या काही कल्पना सुचलेल्या नाहीत. लोकांची मांजरंही असले कायकाय खेळ खेळतात. तेही आमच्या तिर्रीला सुचलेले नाहीत म्हणून बरं आहे. किंवा विचार कर, तिर्री फेसबुकवर गेली आणि असले खेळ इतर मांजरींकडून शिकली! मला सळो का पळो करून सोडेल... ते थोडंसं त्या उद्धृतासारखंच झालं ना!"

"If you can't imagine it, you can't have it." - Toni Morrison

मलाही बऱ्याच कल्पना सुचत नाहीत. पण मला टोनी मॉरिसन भेटते.

ही बाई काय बंडखोर असेल! कुणीतरी जरा जरबेनं सांगितलं, अमकी गोष्ट ढमक्या पद्धतीनंच व्हायला पाहिजे, की बहुतेक लोक लगेच हो-हो म्हणतात. का, कशासाठी, त्यातून काय मिळणार, वगैरे प्रश्न कोणी विचारत नाही. विज्ञानात ठीक आहे, पुरावा दाखवा नाही तर विधानाला किंमत नाही. पण ही बाई म्हणाली, आपल्या कल्पनेत एखादी गोष्ट असेल तरच ती आपल्याला मिळू शकेल. आपल्या सोयीच्या, सवयीच्या, साचेबद्ध विचारांच्या पलीकडे गेल्याशिवाय आपल्याला ते मिळणार नाही.

'न्यू यॉर्कर'मध्ये तिच्याबद्दल लेख आला आहे. (दुवा) त्यात तिच्या काही कादंबऱ्यांची उद्धृतं आणि समीक्षा, तिच्या चरित्राचा काही भाग असा तो लेख आहे. तिच्या एक कादंबरीत - ‘The Bluest Eye’मध्ये - एका काळ्या मुलीला सुंदर दिसण्यासाठी निळे डोळे हवे असतात. तिचा काळा वर्ण, विचित्र हेल ह्या कुरूपपणापासून सुटका म्हणून निळे डोळे; आजूबाजूच्या सगळ्यांच्या सौंदर्याच्या कल्पनांत बसणारे. टोनी मॉरिसननं ती कादंबरी लिहिली कारण तिला ती वाचायची होती.

"If there’s a book that you want to read, but it hasn’t been written yet, then you must write it." - Toni Morrison

मला हवं तसं जग माझ्या आजूबाजूला नसेल तर मी ते तयार करेन. काय विलक्षण ताकदीची होती ही बाई! लोक आहे त्या जगात युद्धं करून, आहे त्या लोकांत दुही माजवून जगावर कब्जा करू पाहतात. त्या जगाच्या पुरुषी रीतीकडे ही अल्पसंख्य बाई पाठ फिरवते आणि स्वतःच्या रीतीनं स्वतःचं जग निर्माण करते.

गोंधळ माजवण्यातच रस असणाऱ्या लोकांकडे सत्ता आहे; किंवा ज्यांना सत्ता ह्या संकल्पनेबद्दल काहीही आकलन नाही, अशा लोकांकडे सत्ता आहे असं जागोजागी दिसतं; कोणत्याही विचारांचे सत्ताधारी का असेनात, हो-ला-हो करणाऱ्या लोकांचं बहुमत आहे हे दिसतं; उदारमतवाद आणि स्वातंत्र्याच्या आपल्या स्वतःच्या कल्पना बहुतांश जगापेक्षा जास्त व्यापक आहेत आणि आपल्याला आनंद मिळणारं काम करायचं असेल तर आपल्याला शांतता हवी, ह्याची जाणीव आहे, तेव्हा खवचटपणा (सिनिसिझम) बाजूला ठेवणं कठीण असतं. टोनी मॉरिसनबद्दल मला आता थोडं समजल्यासारखं वाटतं. आपल्या कल्पना आपणच तयार करणारी, आपल्यासाठी आपणच पुस्तक लिहिणारी, त्यातून आपल्या संभाषितांवर आणि आयुष्यावर आपण ताबा मिळवा असं सांगणारी टोनी मॉरिसन पाण्याच्या पिंपाशेजारी दिसणं थोडंसं गमतीशीर होतं. लोक एरवी तिथे उभे राहून हवापाण्याच्या गप्पा करतात.

रिसेप्शनिस्टांशी गप्पा मारून मी परत कामाला लागले. ऑफिसातला एकजण सांगायला लागला, "हल्ली मी त्या मुलींसमोरून जाताना इथलं ॲक्सेस कार्ड नाचवतच जातो. मीसुद्धा इथे घुसखोरी करतोय असं त्यांना नको वाटायला!" (त्याला तसं वाटण्याचं कारण आम्हांला सगळ्यांना तशा छापाचा निरोप आला होता.) मी त्याला म्हणलं, "त्यापेक्षा पुढच्या वेळेस जाऊन तू त्यांच्याशी गप्पा का नाही मारत? मला पक्की खात्री आहे, ऑफिसनं इथली जागा सोडल्यानंतरही मी इथे येऊन बसले तरी त्या मला हाकलणार नाहीत!"

नवनव्या कल्पना न सुचण्याच्या बाबतीत ऑफिसात मी एकटी नाही. पण सुदैवानं आम्ही कोणी, आपण कोणी मांजरंही नाही.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

असे दैनंदिन प्रसंग वाचायला भारी वाटतात. तिर्रीमुळे तर त्यात आणखीनच मज्जा येते. त्या तिर्रीला द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच असल्याने ते आता देत नाही.

बाकी ती टोनी मॉरिसन काय म्हणते ते मला कळत नाही. म्हणजे ते मी मला (निदान आत्ता तरी) कळवून घेत नाही. मेंदू हालला नाही म्हणजे ते माझ्यासाठी नाही असं समजून मी त्या गोष्टीचं काही वाटूनच घेत नाही. मेंदूही इतका बधिर झालाय की, त्याला हा हादरा आहे वा हे विलक्षण आहे हेच कळत नाही. त्यामुळे टोनी मॉरिसन म्हणते तर म्हणते...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

मस्त लिहीले आहेस.
>>>>>>>मला हवं तसं जग माझ्या आजूबाजूला नसेल तर मी ते तयार करेन. काय विलक्षण ताकदीची होती ही बाई! लोक आहे त्या जगात युद्धं करून, आहे त्या लोकांत दुही माजवून जगावर कब्जा करू पाहतात. त्या जगाच्या पुरुषी रीतीकडे ही अल्पसंख्य बाई पाठ फिरवते आणि स्वतःच्या रीतीनं स्वतःचं जग निर्माण करते. >>>>> सुंदर!! लेख तर आवडलाच पण दिलेला उतारा, लेखिकेचे निर्देश केलेले बलस्थान , सगळं विचार करण्याजोगे आहे. शेवटचा उताराही आवडला.
___________
तू दिलेला दुवा वाचला आणि किती तरी विचार मनात येउन गेले.
माझा मोनोलॉग -
- तू कौतुकाने, उल्लेखिलेला लेख वाचतानाच त्यातील सौंदर्यस्थळे प्रकर्षाने, जाणवत असतील, तर समथिंग इज राँग. Why can't I own some piece of literature. Own in the sense be able to appreciate it independently.
- न्यु यॉर्कर रेग्युलरली (नियमित) वाचायलाच हवे.
- लेख वाचताना, खरोखर, मनाला हिरवीगार पालवी फुटल्यासारखे वाटले.
______________

The music is mournful, and in it we hear Polly’s griping monologues about how she came to be with Cholly, who, as a baby, was abandoned on a pile of trash by his mother. The music is mournful, and in it we hear Polly’s griping monologues about how she came to be with Cholly, who, as a baby, was abandoned on a pile of trash by his mother. /blockquote> अतिशय सुंदर उतारा व उपमा आहे त्या लेखातील. जाणिवेच्या कक्षा तसेच सौंदर्यदृष्टी रुंदावणारा आहे.
_____
पुलेशु.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हल्ली माझा गाडी चालवण्यात दिवसाचा तासभर जातो. शनिवार-रविवारी बागकाम करण्याची आस लागते. त्यामुळे मी हल्ली न्यू यॉर्कर ऐकते.

हा लेख ऐकायला मला अधिक आवडला. मी वाचताना माझ्या हेलात वाचते; काही लेख त्या-त्या लोकांच्या, समाजांच्या हेलात, आवाजात ऐकून अधिक प्रभावी वाटतात. इथे दिलेला लेख त्यांपैकी एक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

They groped their way through the darkness of the Seville-Biltmore bar. They were only dimly aware of their fellow-guests, who sat crouched in silence and shadow like parachutists gloomily waiting the signal to leap. Only the high proof of Dr Hasselbacher's spirits could not be quenched.

'You haven't won yet,' Wormold whispered, trying to check him, but even a whisper caused a reproachful head to turn towards them in the darkness.

'Tonight I have won,' Dr Hasselbacher said in a loud firm voice. 'Tomorrow I may have lost, but nothing can rob me of my victory tonight. A hundred and forty thousand dollars, Mr Wormold. It is a pity that I am too old for women I could have made a beautiful woman very happy with a necklace of rubies. Now I am at a loss. How shall I spend my money, Mr Wormold? Endow a hospital?'

'Pardon me,' a voice whispered out of the shadows, 'has this guy really won a hundred and forty thousand bucks?'

'Yes, sir, I have won them,' Dr Hasselbacher said firmly before Wormold could reply, 'I have won them as certainly as you exist, my almost unseen friend. You would not exist if I didn't believe you existed, nor would those dollars. I believe, therefore you are.'

'What do you mean I wouldn't exist?'

'You exist only in my thoughts, my friend. If I left this room..

'You're nuts.'

'Prove you exist, then.'

'What do you mean, prove? Of course I exist. I've got a first-class business in real estate: a wife and a couple of kids in Miami: I flew here this morning by Delta: I'm drinking this Scotch, aren't I?' The voice contained a hint of tears.

'Poor fellow,' Dr Hasselbacher said, 'you deserve a more imaginative creator than I have been. Why didn't I do better for you than Miami and real estate? Something of imagination. A name to be remembered.'
'What's wrong with my name?'

The parachutists at both ends of the bar were tense with disapproval; one shouldn't show nerves before the jump.

'Nothing that I cannot remedy by taking a little thought.'

'You ask anyone in Miami about Harry Morgan...'

'I really should have done better than that. But I'll tell you what I'll do,' Dr Hasselbacher said, 'I'll go out of the bar for a minute and eliminate you. Then I'll come back with an improved version.'

'What do you mean, an improved version?'

'Now if my friend, Mr Wormold here, had invented you, you would have been a happier man. He would have given you an Oxford education, a name like Pennyfeather...'

'What do you mean, Pennyfeather? You've been drinking.'

'Of course I've been drinking. Drink blurs the imagination. That's why I thought you up in so banal a way: Miami and real estate, flying Delta. Pennyfeather would have come from Europe by K. L. M., he would be drinking his national drink, a pink gin.'

'I'm drinking Scotch and I like it.'

'You think you're drinking Scotch. Or rather, to be accurate, I have imagined you drinking Scotch. But we're going to change all that,' Dr Hasselbacher said cheerily. 'I'll just go out in the hall for a minute and think up some real improvements.'

'You can't monkey around with me,' the man said with anxiety.

Dr Hasselbacher drained his drink, laid a dollar on the bar, and rose with uncertain dignity. 'You'll thank me for this,' he said. 'What shall it be? Trust me and Mr Wormold here. A painter, a poet -or would you prefer a life of adventure, a gun-runner, a Secret Service agent?'

He bowed from the doorway to the agitated shadow. 'I apologize for the real estate.'

The voice said nervously, seeking reassurance, 'He's drunk or nuts,' but the parachutists made no reply.

(ग्रॅहम ग्रीनच्या 'अवर मॅन इन हवाना'मधून साभार.)

केवळ मी कल्पना करतो, म्हणून हे तमाम विश्व आहे. मी जर कल्पनाच केली नसती, तर इथे 'ऐसीअक्षरे' नसते, अदिती नसती, तिर्री नसती, सामो नसत्या, नि (ग्लोरी ऑफ ग्लोरीज़) चिंजंसुद्धा नसते! हे सर्व माझ्या कल्पनेचे खेळ आहेत; सर्व माझ्या कल्पनाशक्तीतून मी निर्माण केले आहेत!

हाय! कुठून मला असली कल्पनाशक्ती प्राप्त झाली! आणि कुठून हे सर्व कल्पायची दुर्बुद्धी झाली! (बोले तो, इतकी सक्षम कल्पनाशक्ती असताना, कल्पून कल्पून कल्पिले काय, तर हे??? कल्पनादारिद्र्य, कल्पनादारिद्र्य म्हणतात, ते हेच असावे काय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त लेख!
>>>
पण तो स्वयंपाकघरातल्या सिंकच्या नळाला ढुशा देऊन नळ सुरू करतो आणि पाणी पडताना बघत बसतो.
>>>
हे भारी "गोड" आहे.
("क्यूट" शब्द पुरुषांच्या तोंडी नाही शोभत माझ्या मते.
जेन्डर स्टिरिओटाइप्स तोडण्याच्या काळात हे मत चूकही असेल.
पण हार्मलेस असल्यामुळे चालून जाइल बहुधा.)

टोनी मॉरीसनबद्दल खुप ऐकलय, वाचायला हवी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"क्यूट" शब्द पुरुषांच्या तोंडी नाही शोभत माझ्या मते.

वेल... "मुंबूड्या" हा शब्द ("शेंबड्या"शी यमक साधणारा) कोणाच्याच तोंडी नाही शोभत आमच्या मते. (पण विचारतो कोण?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर लेख. वेगळाच.

बाकी..

तिथे जी मुलगी होती ती फार खडूस आहे, असं आमच्या ऑफिसातल्या लोकांचं म्हणणं आहे. का कोण जाणे, ती माझ्याशी नेहमी गप्पा मारते.

हं ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल बाहेर पाऊस होता आणि ती चामडी विजार घालून आली होती. तिला शोभतही होती ती! मी तिला ते सांगूनही आले. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खोडसाळ प्रवृत्तीची आहेस झालं..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला हवं तसं जग माझ्या आजूबाजूला नसेल तर मी ते तयार करेन..

मला अशा बिन्धास विचारसरणीच्या लोकांबद्दल अपार रेस्पेक्ट आहे. बर्याच वेळेस सामाजिक संकेत धुडकावण्याची कितीही अपार इच्छा असली तरीही सर्वांनाच ते जमत नाही...

तनु वेड्स मनु द्वितिय मधे मुव ऑन नावाच्या गाण्यात याच अर्थाचे शब्द आहेत -

नया जहां हम जब भी बसाएंगे, कोइ खुदा भी हम ढुंढ के लाएंगे.
कोइ मिला नही जो इस काबिल, हम खुद ही खुदा फिर बन जायेंगे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला हवं तसं जग माझ्या आजूबाजूला नसेल तर मी ते तयार करेन..

मला अशा बिन्धास विचारसरणीच्या लोकांबद्दल अपार रेस्पेक्ट आहे.

रेझ्युमे पॅड करता येतो, याची कल्पना आहे ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही हो, कधी गरज नाही पडली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्याबद्दल नाही म्हणत आहे.

पण...

अशी विचारसरणी (आहे असे) दर्शविणारे आपला रेझ्युमे पॅड करीत नसतीलच, याची खात्री तुम्हाला कशावरून वाटते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्याकडे फक्त ओळखीतल्या लोकांनाच मुलाखतीची संधी द्यायची आणि मग कसून मुलाखत घ्यायची, अशी पद्धत नाही का?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खूपच सुरेख लिहिलंय...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

अशा मजेदार स्फुटांसाठीच येतो.
-------

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेम टु शेम!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशा मजेदार स्फुटांसाठीच येतो.
-------

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिल्या वेळेस सांगितलेत, तेव्हासुद्धा कळले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हल्ली वोडाफोन चे इंटरनेट गंडलेलं आहे. एक ओळ अपलोड ( उचलून टाकायला )करायला युगे युगे लागतात..दोनदा प्रकाशित करा बटण दाबले.
ते असो.
ज्यांच्याकडे वेळ कमी असतो ते गोष्टी पटकन सांगतात.
( गोष्ट सांगत सांगत झोपवायचे नसल्याने)

-------------
कथानकातले तीर्री मांजर एक मांजरी नसून समांतर आख्यान आहे. ते मूळ विषयाला त्याच्या पद्धतीने पुढे रेटते. ते अंग झटकत नाही, त्याच्या पद्धतीने प्रतिक्रिया देते.
गोष्ट ऐकणारी खडुस ( सो कॉल्ड)स्वागतिकाही आपल्या बोका आणि नळाची गोष्ट पुढे सरकवते. ग्रेट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0