सध्या काय वाचताय? - भाग २९

बऱ्याचदा एखादे पुस्तक आवडते; एखादा दीर्घ लेख आवडतो; वाचता वाचता त्याबद्दल थोडेफार सांगावेसे वाटते; पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. तरीही, अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसऱ्यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जिवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणाऱ्यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहाव्यात अशी अपेक्षा आहे.

field_vote: 
0
No votes yet

भास्कर चंदावरकरांनी लिखित ' चित्रभास्कर ' वाचायला घेतले आहे .
अरुण खोपकर लिखित प्रदीर्घ प्रस्तावना ( ज्याला खोपकर प्रस्तावना न म्हणता ' संकल्पना ' म्हणत आहेत ) वाचूनच खुश झालो .
कारण ,मराठीत " छान मराठीत " लिहिलेले या /अशा विषयांवरचे ग्लोबल विषयांना /संकल्पनांना सहजस्पर्श करून जाणारे वाचण्यात फार येत नाही.
( इतर पब्लिक अजून कुठे कुठे अडकून बसले आहे वगैरे टांगउप्पर सक्काळ सक्काळ करत नाही )
मज्जानु टैम अहेड .
पुस्तकाबद्दल लिहीनच ... वाचून झाल्यावर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरुण खोपकर लिखित प्रदीर्घ प्रस्तावना ( ज्याला खोपकर प्रस्तावना न म्हणता ' संकल्पना ' म्हणत आहेत ) वाचूनच खुश झालो .

झैरात मोड १
झैरात मोड २

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चित्रभास्कर फार जुने आहे का? मी एकदा कोणे एके काळी बहुतेक वाचले होते. ((टांगउप्पर विनम्रपणा आवडला.))
----
तेंडुलकर जबरी माणूस आणि लेखक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आभार !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रोचक विषयावरील रोचक पुस्तक -
इंडिका - अनुवाद नंदा खरे

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ओरिजिनल घ्यावे की अनुवाद घ्यावा ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओरिजिनल घ्यावे की अनुवाद घ्यावा ?

अशा विषयावरच्या पुस्तकाचा मराठीत खप व्हावा अशी प्रामाणिक इच्छा आहे. इंग्रजीत खप होत राहतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

१. नंदा खरेंची मराठी अतिशय साधी, सोपी आहे.
२. कारण, विषय समजल्याशिवाय खरे त्याबद्दल बोलणार नाहीत; म्हणजे भाषा वापराबद्दल शंकाच नकोत.
३. माझा स्वतःचा मराठी वाचनाचा वेग इंग्लिशपेक्षा बराच जास्त आहे, अजूनही.
४. शिवाय मराठीतून लिहायचं तर मराठी वाचनाला पर्याय नाही. डोक्यात उलट भाषांतर होत राहतं, मराठी -> इंग्लिश, त्याचाही लिहिताना उपयोग होतो.

मी दोन्ही पुस्तकं वाचलेली नाहीत. पण मी खऱ्यांचंच वाचेन.

वाढीव प्रतिसाद - पुस्तक किंडलवर आहे असं दिसतंय. म्हणजे सहज मिळवून वाचता येईल.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इंडिका - कॉफी टेबल बुक ( मराठीत ?) वाटत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अतिशय अभ्यासपूर्ण आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चांगलं दिसतंय पुस्तक!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुस्तक घरी आले. सुंदर प्रिंट. झकास चित्रे! स्वतःहून शोधून नक्कीच मागवायला गेलो नसतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कालच घरी आले पुस्तक.
अतिशहाणे यांच्याशी सहमत.
अति शहाणे भारतात आले काय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या पुतणीला (वय 9 वर्षे ) भेट म्हणून घेतो. बघू आवडत का !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारतीय अर्थव्यवस्थेवर काही पेपर्सचा आधार घेऊन काही मांडणी करणारा एक ब्लॉग सापडला :
Untangling India's Distinctive Economic Story

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

#2020books

सध्या गाजत असलेलं The Silent Patient (लेखक Alex Michaelides) भिक्कार आहे.

सध्या काय 'इन' आहे त्याचा विचार करून अक्षरशः 'शिवलेलं' कथानक आहे. स्त्रीवादी हिरविण, मनोविश्लेषण करणारा हिरो, (spoiler) unreliable narrator, शेवटाकडे ट्विस्ट(चा प्रयत्न), वगैरे.

मेह(न)तामय अनुवाद लौकरच आल्यास आश्चर्य वाटणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

https://www.buzzfeednews.com/article/scaachikoul/kashmir-hindus-muslims-...
साची कॅनडात जन्माला आलेली व वाढलेली आहे. भारताचा, काश्मीरचा जो इतिहास ती जाणते तो म्हणजे आई-बाबांनी भावनिक कढ येत सांगीतलेला. साची विचारी आहे, ६ व्या वर्षी भले मी आई-बाबांनी सांगीतलेल्या प्रत्येक गोष्टीवरती डोळे झाकून विश्वास ठेवला - पण आता २८ व्या वर्षीही मी तेच करायचं का? असा प्रश्न विचारण्याचे वैचारिक स्वातंत्र्य व प्रगल्भता तिच्यामध्ये आहे.
या लेखात तिचे मत आहे की आपण काश्मिरी पंडीत हुसकाउन लावलो गेलो ते ' ethnic cleansing' पण आता मुसलमानांबद्दल तेथे तेच चाललेले आहे ते मात्र 'exodus'.
त्यांनी आपली गाय मारली असेलही पण आपण वासरु मारायचं का?
______________
खरं तर हा अतिशय जटील प्रश्न आहे. पण या प्र्श्नावरती स्वतंत्र विचार करुन ती काही एक स्टँड घेतेय हेच मुळी कौतुकास्पद आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

मानसशास्त्र आणि राजकारणाचे अभ्यासक आशिष नंदी यांची दिल्लीमधील दंग्यांच्या पार्श्वभूमीवर मुलाखत :
Ashis Nandy: It’s very difficult to go back to pre-violent days after you’ve once participated, killed

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

लोकसत्तेतले परीक्षण वाचून वाचावे वाटले.
लोकसत्ता परीक्षण
620 चे पुस्तक किंडलवर 80(!!!) रुपैत मिळाले. पहिली forgotten (?) केस वाचली. खूप खूप खूप रंजक पुस्तक असणार ताबडतोब खात्री झालीये. गुडरिड्स मधले तपशील:

Can a state Legislature imprison a critic and summon a high Court judge to appear before it? Are religion-based personal laws above fundamental Rights? Why did the Punjab police organize a band to celebrate the defeat of the state in a case of sexual harassment? Is it legal for the government to arm untrained private citizens to participate in counter-insurgency operations? How did Parliament come to pass the first Amendment to the Constitution allowing for caste-based reservations? And why did the Supreme Court acquit a rape accused on the basis of the victims sexual history? In this book, constitutional expert chintan chandrachud takes us behind the scenes and tells us the stories of ten extraordinary and dramatic legal cases from the 1950s to the present day that have all but faded from public memory. Written in a lively, riveting style, this book has a cast of characters that includes the who’s who of the Indian legal system. It also paints an unexpected picture of the Indian judiciary: the Courts are not always on the right side of history or justice, and they don’t always have the last word on the matters before them. This entertaining book is an incisive look into the functioning of Indian institutions.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता जा निघोनी जसे की विरावे
धुके दूर रानात अलवारसे
तुझी पाठ होता मला शोधणे गे
कुठे फोडले काल मी आरसे !

विकत घ्यायला पाहिजे! (भलतेच रोचक प्रकरण दिसतेय.)

620 चे पुस्तक किंडलवर 80(!!!) रुपैत मिळाले.

आमच्या इथे ३२.९५चे ८ डॉलरांत विकताहेत. तरीही नॉट बॅड.

----------

घेतले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बऱ्याच दिवसांपासून ऑपरेशन ब्लू स्टार आणि त्याआगे-मागे घडलेल्या घटनांवर वाचायचं होतं.
मार्क टुली/टली/टल्ली (असो) आणि सतीश जेकब ह्या बी.बी.सी.च्या पत्रकाराद्वयीने लिहिलेलं हे पुस्तक त्या मालिकेतलं पहिलं पुस्तक आहे.

१९७९-१९८४ अशी पंजाबमधल्या घटनांची विस्तारपूर्वक दखल लेखकांनी घेतली आहे. ब्लू-स्टार ही काही एखाद वर्षात झालेल्या घटनेची परिणीती नव्हे तर त्यामागे बऱ्याच घटनांची साखळी होती- जी पुस्तकात स्पष्ट केली आहे.
-------------
मुळात पंजाबात १९८०पासूनच जे काही खदखदत होतं त्याला गांधी-अकाली दल ह्यांच्या राजकारणातून आणखी पाठिंबा दिला गेला. ह्या राजकारण्यांच्या रस्सीखेचेत दोघांनीही लोकानुनय करण्यासाठी "भिंद्रनवाले" ह्या संताला वापरून घेतलं. - निदान त्यांचा असा समज होता.
पण पुढे भिंद्रनवाले इतके शिरजोर होतील ह्याचा अंदाज येऊनही त्याला गांधींनी आवरला नाही, अखेरपर्यंत त्याचा उपयोग होऊ शकेल - अशीच भूमिका केंद्राची राहिली.
------------------
१९८०-८४ ह्या काळात भिंद्रनवाले आणि इतर पंजाबी कट्टरपंथी अतिरेक्यांनी शेकडोंनी बळी घेतले. खुलेआम लोकांच्या हत्या केल्या, बसगाड्या जाळल्या, अतिशय निर्घृण खूनही झाले. केंद्र सरकार + पंजाब राज्य सरकार हे सगळं आटोक्यात आणू शकलं असतं पण एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात भिंद्रनवाले दुर्लक्षित झाले आणि पार सुवर्णमंदिरातच ठिय्या देऊन बसले.
------------------------

पुस्तक वाचून बऱ्याच गोष्टींचा खुलासा झाला. पंजाबच्याच नव्हे तर स्वतंत्र भारताच्या इतिहासातली बहुधा सर्वात मोठी घटना असूनही ऑपरेशन ब्लू स्टार बद्दल चित्रपट/मालिका/पुस्तकं- ह्यात खूप कव्हरेज दिसत नाही. सुवर्णमंदिरात रणगाडे आणणं, त्यानंतरची २ दिवस चाललेली लढाई, निरपराधांची हत्या, सैन्यातल्या २ तुकड्यांनी नंतर केलेलं बंड, आणि नंतरच्या खलिस्तान अतिरेक्यांनी केलेले हल्ले - अशी मालिका ८०च्या दशकात चालूच होती. कदाचित पंजाबी चित्रपट किंवा मालिका असाव्यात ह्या विषयावर, पाहिलं पाहिजे.
-----------------------
आता कुलदीप शिंग ब्रार ह्यांचं पुस्तक वाचतोय. ऑपरेशन ब्लू स्टार - सैन्याच्या नजरेतून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज एक फार रोचक लेख वाचण्यात आला- https://www.scientificamerican.com/article/blood-sisters-what-vampire-ba...
कार्टर हे वटवाघळांचा अभ्यास करत आहेत. त्यांनी नीरीक्षण केले की - 'रक्तपिपासू वटवाघळे' माद्या या ८-१० अशा कोंडाळ्यात रहातात तर नर हा एकएकटा असतो व आपल्या आपल्या मालकीच्या भागाचे रक्षण करतो. आता या माद्या काय करतात तर आपल्या अन्य नातेवाईक व मैत्रिणी, त्यांची पिल्ले यांना स्वतः रक्त पिउन, उरलेले रक्त देतात. म्हणजे त्यांना हवं तेवढं रक्त मिळाल्यानंतर उरलेले रक्त परत तोंडातून बाहेर काढून अन्य भुकेल्या त्यांच्या गटातील वाघळांना देतात. उत्क्रांतीच्या दॄष्टीने आपण एकवेळ समजू शकतो की स्वतःची गुणसूत्रे पुढे नेण्याकरता त्या आपापल्या नातेवाईकांना जगवत असतील पण मग त्या नातेवाईकांखेरीज अन्य वाघळांनाही हे रक्त का पाजतात तर - मैत्री = Risk pooling, म्हणजे स्वतःकरता त्या Safety net बनवितात, ज्यायोगे त्यांचे अस्तित्व अधिक बळकट होइल. hungry bats often rely on their food donors.
“Friendship is complicated in that we don’t understand it scientifically,”
वाघळांचा मेंदू शरीराच्या मानाने मोठा असतो विशेषतः neocortex. याचे मुख्य काम असते क्लिष्ट, गुंतागुंतीची असे सामाजिक नाती जोपासणे व तत्सम.
perhaps friendship serves as a safety net for a variety of animals.
मैत्रीचा सेफ्टी नेट म्हणुन उपयोग आपण करुन घेतो पण त्याचा अर्थ १००% फुकटेपण आपण सहन करतो असेही नाही. कुठेतरी परताव्याची अपेक्षा असतेच.
सर्व मुद्दे समजून घेण्याकरता वरती दिलेल्या दुव्यावरती लेख वाचावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

Evolutionary Psychology नावाचं David Buss ह्यानं लिहिलेलं पाठ्यपुस्तक तुला आवडेलच. संशोधकांचं म्हणणं, मनुष्यांमध्ये स्त्रियांचीही उत्क्रांती अशाच प्रकारे झाली. त्यातून त्यांनी अशा पद्धतीनं आपली शिकार वाटून घेणाऱ्या नरांनाच - सब मिल-बांट के खायेंगे - निवडलं, त्यातून नैसर्गिक निवड होत गेली.

(हे वाचायला छानच वाटतं. पण ह्या समजूतदारपणामुळे, माझ्या मते, बायका जास्त इमोसनल ब्लॅकमेलिंग करून घेतात. उदाहरणार्थ, कन्यादान म्हणजे शब्दशः वस्तुकरण नाही, असल्या फोलपटांनाही भाव देतात.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'ग्रंथाच्या सहवासात' हे पुस्तक वाचले. त्यात जयवंत दळवींच्या लेखात हे आढळले:

सगळे कवी मला चालतात. मर्ढेकर, इंदिरा, विंदा, पाडगावकर, बापट, बोरकर, आरती प्रभू, शांता शेळके, ग्रेस, सदानंद रेगे! यांचे एखादे पुस्तक काढून चाळत राहातो. वेळ बरा जातो. काही कविता समजल्या नाहीत, तरी काही बिघडत नाही. उलट न समजणाऱ्या कविता परत परत गुणगुणाव्याशा वाटतात.

मर्ढेकरांची 'पिपात मेले ओल्या उंदिर' ही कविता अशीच मी कितीतरी वेळा गुणगुणतो. ती न समजण्यातही समजल्यासारखे काहीतरी वाटते आणि बरे वाटते. पण ही प्राध्यापक मंडळी तो आनंद मिळू देत नाहीत. विजया राजाध्यक्ष झाल्या, प्रभा गणोरकर झाल्या आणि आता प्रा. म. वा. धोंड! आमच्या कोकणात काही शेतकरी बायका अंगणात बसून हातोडा घेऊन काथ्या कुटत राहतात आणि त्यातून सुंभ वळतात. ही प्राध्यापक मंडळी असाच हातोडा घेऊन ही कविता कुटत बसतात याचे वाईट वाटते. त्या बायकांच्या हाती वळायला सुंभ तरी असते. यांच्या हाती काहीच नाही. म. वा. धोंडांनी तर कहरच केला आहे. त्यांनी विजया राजाध्यक्ष आणि प्रभा गणोरकर यांनी या कवितेचे लावलेले अर्थ रद्दबातलच ठरवले आहेत. इतकेच नव्हे, तर स्वतःच १९६७ साली 'सत्यकथे'त लिहिलेला लेखही रद्द करून त्यावेळी आपण चुकीचा अर्थ लावला होता, अशी कबुली दिली आहे. आणि या लेखात कंटाळवाण्या पद्धतीने नवीन अर्थ लावला आहे. पुढील वर्षी (किंवा त्या आधीही!) ते पुनश्च आणखी एक लेख लिहितील आणि या वर्षी लिहिलेला या कवितेचा अर्थ चुकीचा होता, असा नवा शोध लावतील, या आशेवर मी दिवस काढतो आहे! या प्राध्यापकांपासून बचावण्याचा दुसरा काहीच मार्ग दिसत नाही!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

The Stand आधीच वाचलंय. रिचर्ड मेथसनचं I Am Legend वाचलं. एका साथीच्या रोगामुळे सगळे लोक व्हॅम्पायर झाले असतात आणि रॉबर्ट नेव्हील नावाचा एकटाच व्यक्ती शिल्लक राहिला असतो. गोष्ट पूर्ण बदललेला विल स्मिथचा एक टुकार टिपिकल झोंबीपट येऊन गेलाय. पुस्तक मात्र टिपिकल मारधाडीपासून बहुतांशी लांब राहतं. भविष्याबद्दल नेव्हीलचे विचार, रोगावरच त्याच संशोधन , नेव्हीलचे तात्विक चिंतन वगैरे एकदम मस्त रंगवलंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुस्तक तसं लहान आहे. झटपट वाचून झालं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता जा निघोनी जसे की विरावे
धुके दूर रानात अलवारसे
तुझी पाठ होता मला शोधणे गे
कुठे फोडले काल मी आरसे !

लोकसत्ता मधील संहिता जोशी यांचा हा लेख वाचला

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>>>>मी ऑफिसात जाऊन जाहीर केलं.. ‘तिशीतली ती स्त्री म्हणजे मी नाही.’ तिन्ही श्रोते हसले. >>>>>> हाहाहा!!! तू ना Smile
>>>>ऑफिसात गेले काही आठवडे आम्ही चौघं पैजा लावत होतो की, ऑफिसात पहिल्यांदा कुणाला लागण होईल. वरच्या पदांवरचे बरेच लोक कामासाठी फिरत असतात. आम्ही त्यांच्याबद्दल बोलत होतो>>>>> ROFLROFL
'तिथे पाव मिळाला नाही म्हणून केक आणून खाल्ला.' . 'तेव्हा सार्वजनिक कवायतीसारखे दोघांनी हात लांब केले.' वगैरे वाक्यांनी लेख खुसखुशीत झालेला आहे.
.
एकंदर परिस्थिती मस्त मांडलीयेस. शेवटचा पॅरा आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

स्त्रीला वय विचारु नये असं म्हणतात पण तीने स्वतः सांगीतलयास हरकत नाही Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्या वाक्याचे अर्थ -

१. मी तिशीतली नाही.
२. मी स्त्री नाही.
३. मी करोनाग्रस्त नाही.
४. मी ती स्त्री नाही ... ह्यांतले काहीही किंवा सगळे असू शकतात.

पाव नव्हता म्हणून केक खाल्ला; हा विनोद मुळात बऱ्या अर्ध्यानं केला. जंत्वाग्रहामुळे तो लेखात आला.

सामुदायिक कवायत हा माझ्या भावाचा, बराच जुना विनोद आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लॉकडाऊनमुळे घरात अडकलेल्या लहान मुलांचा वेळ कसा घालवायचा हा प्रश्न असेल तर प्लुटो मासिकाचा हा अंक पाहा :
फ्लिप-बुक आवृत्ती
पीडीएफ आवृत्ती

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||