चंद्रप्रभाचे सिंह (दीर्घ लघुकथा)

छापील माध्यमात प्रकाशनासाठी कथा अप्रकाशित करत आहे.

वाचकांचे अनेक आभार. बहुमूल्य सूचनांसाठी 'न'वी बाजू यांचे विशेष आभार.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सतीशला अचानक एबीसीडी बनवून (आणि त्याच्या बायकोला पांढरी दाक्षिणात्य अमेरिकन बनवून) कहानी में ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न रोचक आहे. परंतु...

"आप से मिलकर खुशी हुई! मेरा नाम सतीश है," मी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला.

एबीसीडी पोर इतके चांगले नि अस्खलित हिंदी बोलण्याची शक्यता जवळजवळ शून्यवत्. (बालपणी कदाचित थोडीतरी - निदान, जुजबी तरी - परंतु फुलग्रोन अडल्टकडून... चान्सिल्ले. खास करून ते 'आप से मिलकर खुशी हुई' वगैरे तर... हॅ:!)

फार कशाला, हा मनुष्य पैसे द्यायला कौंटरवर गेलेला असताना याने जर तोंड उघडले असेल, तर याचा इंग्रजी बोलण्याचा ॲक्सेंट ऐकूनसुद्धा - याची कातडी कितीही ब्राउन दिसत असली तरी - कोणताही रशियन/कझाक/व्हॉटेव्हर याच्याशी आपण होऊन हिंदीत बोलण्याच्या भानगडीतच पडणार नाही. रशियन, कझाक वगैरे मंडळी - निदान अमेरिकेत येणारी तरी - सहसा हुशार असतात, असे निरीक्षण आहे.

Y2K च्या प्रोजेक्टसाठी आलो त्या, अमेरिकन मिडवेस्टमधल्या आडगावात आपली भाषा बोलणारं कोणी असेल असं वाटलं नव्हतं.

हं! काहीही!

एबीसीडी मंडळींची 'आपली भाषा' ही अस्खलित अमेरिकन आघातातली इंग्रजी असते; दुसरी कोणतीही नाही. हिंदी, मराठी वगैरे 'मातृपितृभाषा' या फक्त तेवढ्याच असतात - आईवडिलांशी संभाषण करता येण्यापुरत्या. आणि तितपतच जुजबी येतात. एरवी, उदाहरणादाखल, अमेरिकेतील चार देशी किंवा चार मराठी (किंवा कानडी, बंगाली, जे काही असतील ती) कुटुंबे सणासमारंभाकरिता जर एकत्र आली, तर प्रौढ मंडळी (फर्स्ट जनरेशन इमिग्रंट्स) एकमेकांशी हिंदीत (किंवा मराठीत, किंवा कानडीत, बंगालीत, किंवा जी कोठली सामायिक भारतीय भाषा त्यांच्यामध्ये असेल, त्या भाषेत) गप्पा मारतात, तर त्यांच्याबरोबर आलेली त्यांची अमेरिकेत जन्माला आलेली (किंवा गेला बाजार अमेरिकेत वाढलेली) मुले आपसात अमेरिकन आघातातल्या इंग्रजीत बोलतात, असे चित्र दिसते.

त्यात पुन्हा अ-हिंदी आईवडिलांचा एबीसीडी असेल, तर जुजबीसुद्धा हिंदी येण्याची शक्यता शून्य. (उदाहरणादाखल, आईबाप मराठी असतील, तर जुजबी, मोडकेतोडके मराठी येण्याची शक्यता थोडी तरी, परंतु हिंदी तेवढीसुद्धा येणार नाही.)

माझं रशियनचं ज्ञान कझानमधल्या एका महिन्याच्या प्रोजेक्टमुळे आहे आणि अगदीच जुजबी आहे हे मी त्याला सांगितलं, आणि आम्ही हिंदी-इंग्रजीतच बोलू लागलो.

याचे एबीसीडीचे हिंदी ऐकून त्या रशियनाने 'भीक नको, पण हिंदी आवर' म्हणून याच्याशी इंग्रजीतच (किंवा, कदाचित रशियनमध्येसुद्धा) संवाद साधण्याचा अट्टाहास धरला नाही, याचेच नवल वाटते. (सतीशपेक्षा निकोलायचेच हिंदी पुष्कळ चांगले असण्याची शक्यता वाटते.)

('माफ करा हं, माझे रशियनचे ज्ञान अगदीच जुजबी आहे' याला 'मग तुझे हिंदीचे ज्ञान तरी कोठे सखोल आहे?' यासारखा मस्त रिजॉइंडर - आणि तोही एका रशियनाने - मिस करणे म्हणजे... रशियन लोक तसे खवचटपणात कमी नसतात!)

तुमचे राकेश शर्मा आणि रवीश मल्होत्रा आले होते तेव्हा त्यांच्याशी हिंदीतच बोलायचो.

या वाक्यावर एखाद्या एबीसीडीची प्रतिक्रिया ही केवळ 'कोण राकेश शर्मा / रवीश मलहोत्रा?' अशीच असू शकते. अन्य काही असण्याचे कारण संभवत नाही. (हे एके काळी करंट इव्हेंट्स / लक्षात ठेवण्याच्या विशेष गोष्टी या कॅटेगरीत एखाद्या भारतीयाकरिता मोडणे समजण्यासारखे आहे; एखाद्या एबीसीडीच्या रेडारवर ते असण्याचे काहीच कारण नाही.)

गीरचे काही आशियाई सिंह उत्तर प्रदेशच्या चंद्रप्रभा अभयारण्यात नेले होते तुमच्या सरकारने.

असे वाक्य एखाद्या रशियनाकडून येणे अपेक्षित आहे. मात्र, एबीसीडीचे आईबाप जर उत्तरप्रदेशातून आले असतील, तर कदाचित त्याला उत्तरप्रदेश निदान ऐकून माहीत असणे संभवते, (अन्यथाही कदाचित उत्तरप्रदेशबद्दल त्याने ऐकलेले असणे अशक्य नाही), मात्र, गीर आणि चंद्रप्रभा या स्थानविशेषांबद्दल तो पूर्णपणे क्लूलेस असण्याव्यतिरिक्त (आणि, त्यांचा उल्लेख केला असता, 'Huh?' अशी त्याची (सानुनासिक) प्रतिक्रिया येण्याव्यतिरिक्त) दुसरे काहीही संभवत नाही.

नंतर मी एका पेफोनवरून मॉस्कोमधल्या एका इंग्लिश भाषेतील वर्तमानपत्राच्या ऑफिसात फोन केला.

पेफोनवरून इंटरनॅशनल कॉल... दणकट बिल आले असेल, नाही?

की कोणते कॉलिंग कार्ड वापरले होते?

"मला फक्त एक शंका आहे - तुझ्या सदर्न बेल ब्लॉन्ड बायकोचं नाव स्वाती कसं काय?"

मी सुस्कारा सोडला, आणि सुस्तपणे म्हणालो, "ती नक्षत्रासारखी सुंदर दिसते असं माझी आजी म्हणाली होती. हे इंग्रजीत सांगितलं तेव्हा कॅथीला खूपच काव्यात्मक वाटलं, आणि भारतीय नक्षत्रांची नावं बघून तिने स्वत:च हे नाव निवडलं. कॅथरीन स्वाती कॉलिन्स."

सदर्न बेल ब्लॉण्ड ही भारतातून आलेल्या एखाद्या ट्रूब्लू भारतीयाच्या प्रेमात पडून त्याच्या कल्चरमधील नाव घेणे हे एक वेळ (एक्झॉटिक इनफ, म्हणून) समजू शकतो. एखाद्या एबीसीडीच्या प्रेमात पडून भारतीय नक्षत्राचे नाव कशाला घेईल? भले त्याची आजी काहीही म्हणाली, तरीही?

तसेही, "ती नक्षत्रासारखी सुंदर दिसते", असे मराठीत म्हणतात. हिंदीत म्हणतात का? असल्यास, कसे म्हणतात?

(की हीसुद्धा डिसइन्फर्मेशनच आहे?)

----------

सांगण्याचा मतलब, तुमची ही गोष्ट एखाद्या नेटिव्ह (खरे तर रेसिडेंट म्हणायला पाहिजे; तत्त्वत:, मीही नेटिव्हच.) मराठी वाचकास इंप्रेस करू शकेलही कदाचित. मराठी-अमेरिकन आड्यन्सला मात्र तिच्यात भोकेच भोके दिसतील.

पण प्रयत्न चांगला आहे.

- (एबीसीडी पोराचा बाप, मराठी-अमेरिकन) 'न'वी बाजू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थँक्स! तुमचे इनपुट्स महत्त्वाचे आहेत. अमेरिकेत जन्मलेल्या आणि वाढलेल्या पिढीला/ पिढयांना मी जवळून पाहिलं नाहीये, त्यामुळे या त्रुटी राहिल्या.

भोके बुजवायला सतीशला भारतात जन्मलेला आणि लग्नामुळे अमेरिकन नागरिक झालेला असा दाखवावा का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसा बदल केल्यास एबीसीडीवाली भोके तर निश्चित बुजतील, परंतु...

...कदाचित त्यामुळे एखादे नवीन भोक निर्माण होऊ शकेल का, याचा विचार करतोय.

बोले तो, सासरा सीआयएमधले बडे प्रस्थ आहे. जावई अमेरिकन नागरिक म्हटला तरीही कितीही झाले तरी फॉरेन-बॉर्न; त्याला विश्वासात घेऊन त्याच्याशी इतक्या जवळिकीची/मोकळेपणाची सासऱ्याची वागणूक असेल का? (किंबहुना, इतका जवळचा नातेवाईक फॉरेन-बॉर्न असल्यावर त्याच्या स्वत:च्या सेक्युरिटी क्लियरन्सवर कितीसा फरक पडत असेल, इ. इ.)

आता, या तपशिलांबद्दल मला स्वत:ला फारशी माहिती नसल्यामुळे खात्रीलायक टिप्पणी देऊ शकत नाही (जितकी एबीसीडीच्या मुद्द्याबद्दल देऊ शकत होतो), परंतु इट डझ रेझ अ फ्यू क्वेश्चन्स. (एबीसीडीइतक्या ब्लेटंट त्रुटी होत नसल्या, तरीही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"सतीश! आफ्तर थ्री इयर्स! हाऊ आर यू? अॅन्द हाऊ इज यूर लव्हली वाईफ?" साशा एक्साईट होऊन बोलू लागली. कझानमध्ये आमची छान मैत्री झाली होती, आणि कदाचित पुढे काही घडूही शकलं असतं; पण त्यापूर्वीच मला मुंबईला परत पाठवलं गेलं. असो.

एबीसीडीला मुंबईला कशाला "परत" (?) पाठवतील? एबीसीडी मुंबईच्या कंपनीत नोकरी करीत होता? कशाला? आणि तेही वायटूकेपूर्व काळात? कसा? कोणत्या व्हीज़ावर? (तोवर पीआयओ कार्ड, ओसीआय कार्ड वगैरे भानगडी आल्या नव्हत्या.) आणि, मुख्य म्हणजे, का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झ का स गोष्ट आहे.
तुम्ही न. वी.ंच्या मदतीने भोकं बुजवालच.
भोकं बुजवून झाली की ही गोष्ट धनंजयच्या येत्या (२०२०) दिवाळी अंकासाठी ही गोष्ट द्यायला आवडेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साहस,विज्ञान,रहस्य,वगैरे कथा त्याच क्षेत्रातील लोक लिहितील अशी इच्छा करूया.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0