Sthree - त्या तिघींची गोष्ट

Instagram वरच्या meet the flow या पेजवर या टीमने मिळून STHREE नावाचा हा दृकश्राव्य माध्यमातला प्रयोग केलाय.
मराठी वाङ्मयात ओवी हा काव्यप्रकार बराच जुना. तो म्हटला की आठवतं ते स्त्रियांनी त्यांची दैनंदिन कामं करताना गाण्यातून केलेली अभिव्यक्ती.
आभा सौमित्र या एका अशाच हुशार मुलीने आताच्या काळातल्या 3 मुलींना केंद्रस्थानी ठेवून 3 ओव्या लिहिल्यात. त्या त्यांच्या त्यांच्या activity मध्ये आहेत आणि त्यातूनच त्या प्रत्येकीची लयबद्ध गद्यात अशी गोष्ट सांगितलीये. प्रेम, तेज आणि शांती ही यातली तीन elements.
यातलं प्रेम ही जी micro tale आहे ती गोष्ट आहे एका अशाच मुलीची. मातृत्वाची प्राप्ती होणार नाही हे लक्षात आल्यावर ती तिच्या चहुबाजूला असणाऱ्या निसर्गालाच आपलं अपत्य म्हणते. मातृत्व आणि प्रेम या संकल्पनांची वैश्विकताच या ओवीचा गाभा बनलीये.
खरं काय ते समजल्यावर ब्रशने कॅनव्हासवर हिरव्या रंगाने रंगवताना तिच्या कलेच्या सर्जनशील अभिव्यक्ती मधेच तिला नवीन सत्य उमगतं आणि ती हसते आनंदाने, आत्मविश्वासाने आणि ते गवसलंय याच्या समाधानाने.
यातल्या सायली भामरे हिचं हसणं अगदी काळजाचा ठाव घेतं आणि डोळे पाणावतात.
दुसरं element तेज. पाऊस थांबतो, सूर्यप्रकाशात रंगांची उधळण होते. निसर्गाच्या चक्रातच इथे तिला तिचा जीवनपट दिसतोय.
सगळी नैसर्गिक रूपकं आहेत ज्यातून तिची भावनिक आंदोलनं दिसताहेत आणि त्या घडामोडी आणि तिच्या आयुष्यातले चढउतार, त्या phases इथे parallel track वर मांडल्यात.
पण शेवटच्या क्षणी तिचं तिचं एक सत्य तिला गवसतं.या सगळ्यात श्रिया पुसळकर हिचा स्क्रीन presence, त्या कमाल outdoor locations मध्येअगदी मस्त वाटलाय.
शेवटची शांती, इथे ही मुलगी आणि तिला प्रिय असणारा मोगरा यांचा हा संवाद आहे. ज्यात तो गजरा ओवताना, त्यातल्या आवाजाला ऐकताना मोगऱ्याच्या सुगंधाबरोबर आयुष्यातल्या शांततेचाही परिमळ तिला सापडतो आणि ती मोकळी होते. ज्ञानेश्वरी वेलणकर या मुलीचा screen presence अगदी सहज आणि सुखावणारा आहे.
ही ओवीसुद्धा आभाच्या शब्दफुलांनी सजलीये. अर्थात इथे दिवसाच्या प्रत्येकवेळची भावावस्था शब्दांत मांडून तो मोगऱ्याच्या गंध तिला अगदी तिमिराच्या वेळीसुद्धा अलगद सामावून घेतो स्वतः मध्ये आणि त्या अनामिक शांततेत तिची ओंजळ रिती होऊनही सुवासाने भरून जाते.
तिन्ही ओव्यांमध्ये त्यातल्या प्रत्येकीचं भावविश्व हे रुपकांमधून मांडलंय आणि आभा सौमित्र या मुलीने जो शब्द साज चढवलाय तो केवळ अप्रतिम! निलची दिग्दर्शन आणि दृश्यकलेतली समज इथे दिसून आलीये. त्याचबरोबर कुणाल आणि चेतन यांनी आपापली कामं अगदी चोख बजावली आहेत.
इथलं संगीत आणि पार्श्वगायन यांच्यामुळे हा प्रयोग अत्यंत श्रवणीय असा झालाय.
म्हणूनच STHREE ही शब्दांची ओव्यांमध्ये केलेली गुंफण ही अनुभवायला हवी!
Links to watch : https://www.youtube.com/watch?v=yLexgX9zDvA
https://www.youtube.com/watch?v=NwVEknwR-5s
https://www.youtube.com/watch?v=ET9JnCRBP_M

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पाहील्या. छान आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0