डिसेंबर २०१९ पासून आपण एका नवीन साथी च्या रोगाशी झगडत आहोत.
प्रसार माध्यम, समाज मध्यम,बरोबर च इंटरनेट मुळे माहितीचा स्फोट झाला आहे.
माहितीचा विस्फोट आणि वाहतुकीची जलद साधन उपलब्ध असल्या मुळे जग जवळ आले आहे.
बाकी साथीचे रोग लोकांस नवखे नाहीत ना त्या वर प्रतिबंध करत असलेल्या लसी लोकांना नवीन आहेत.
आज जी पिढी आहे ती आधुनिक medicine science शी परिचित आहे.
स्वतः स्वतःचे मत असण्या एवढी प्रगल्भ आहे..
तर
Covid विषयी तज्ञ लोकांचे अंदाज,मत, ही खऱ्या स्थिती शी विपरीत ठरली का?
सरकार साथ रोखण्यासाठी योग्य उपाय योजना करत आहे का? की अधिकृत ज्या संस्था आहेत त्यांचे निर्देश डोळे झाकून राबवत आहे?
लोकांना covid विषयी काय वाटते ,खरेच हा भयंकर आजार आहे का?
लोकांना covid वरील उपचार विषयी काय वाटतं?
लसीकरण ह्या रोगापासून जगाला मुक्त करेल की त्या पाठी आर्थिक कारणे आहेत?
जे काही लोकांना अनुभव आहेत, मत आहेत त्या वर मुक्त पने व्यक्त होण्यासाठी हा धागा आहे.
इथे व्यक्त होणारी मत शास्त्रीय आधारांवर च असावीत अशी सक्ती नसेल..
कोणाला trol न करता मुक्त पने व्यक्त होण्यासाठी हा धागा आहे