Covid १९ विषयी शंका कुशंका
डिसेंबर २०१९ पासून आपण एका नवीन साथी च्या रोगाशी झगडत आहोत.
प्रसार माध्यम, समाज मध्यम,बरोबर च इंटरनेट मुळे माहितीचा स्फोट झाला आहे.
माहितीचा विस्फोट आणि वाहतुकीची जलद साधन उपलब्ध असल्या मुळे जग जवळ आले आहे.
बाकी साथीचे रोग लोकांस नवखे नाहीत ना त्या वर प्रतिबंध करत असलेल्या लसी लोकांना नवीन आहेत.
आज जी पिढी आहे ती आधुनिक medicine science शी परिचित आहे.
स्वतः स्वतःचे मत असण्या एवढी प्रगल्भ आहे..
तर
Covid विषयी तज्ञ लोकांचे अंदाज,मत, ही खऱ्या स्थिती शी विपरीत ठरली का?
सरकार साथ रोखण्यासाठी योग्य उपाय योजना करत आहे का? की अधिकृत ज्या संस्था आहेत त्यांचे निर्देश डोळे झाकून राबवत आहे?
लोकांना covid विषयी काय वाटते ,खरेच हा भयंकर आजार आहे का?
लोकांना covid वरील उपचार विषयी काय वाटतं?
लसीकरण ह्या रोगापासून जगाला मुक्त करेल की त्या पाठी आर्थिक कारणे आहेत?
जे काही लोकांना अनुभव आहेत, मत आहेत त्या वर मुक्त पने व्यक्त होण्यासाठी हा धागा आहे.
इथे व्यक्त होणारी मत शास्त्रीय आधारांवर च असावीत अशी सक्ती नसेल..
कोणाला trol न करता मुक्त पने व्यक्त होण्यासाठी हा धागा आहे
मी काही लिहिलं होतं ते
दोन न्यूज चानेलच्या बातमी आधारे.
Aljazeera,
France24
ते कोणीही पाहू शकतं. किंवा sites
aljazeera dot com
france24 dot com
एक दोन मतं मांडली होती. त्यावरून कंगना_के_चाचा उपाधी 'भेटली'. माझ्या आणि कंगनाच्या विचारांत / मतांत काय साम्य आहे याचा अभ्यास करायचा आहे. ब्रिटीश राज, फ्रीडम, फाळणी, वगैरेंवर लेखकांनी पुस्तके लिहून त्यांचे विचार मांडलेतच. त्यात कंगनाने तोंडी/टिवटिव भर घातली म्हणतात. ब्रिटीशांनी कोलोनी देशांतून अचानक माघार का घेतली वगैरेवरही बराच उहापोह झाला होता.
नवीन हल्ला म्हणजे नवी लस का? या प्रश्नाला धुडकावून लावलं तरीही आज राज्य सरकारकडे बूस्टर डोसचे रेकमंडेशन गेले आहे. आहे तीच आणखी एकदा टोचा.
नव्या कपड्यातला म्हणजे शर्ट इन होता तो बाहेर काढलेला विषाणू किंवा आणखी काही म्युटेशनने हजर झालेला विषाणू हा जुनाच कोविड १९ आहे म्हणतात. मंत्री आज म्हणतात घाबरायचे कारण नाही. पण त्याच वेळी आलेल्या पाहुण्यांच्या मागे तपासणी पथके जेम्स बॉन्डच्या सिनेमातल्या पाठलागासारखी लागलेली आहेत. (For your eyes only ,काळा बुरखावाली आइफेल टॉवरवरून उडी मारते आणि पळते. त्यामागे बांडसाहेब. तर आम्हाला आइफेलचा वेगळा angle आवडला.सिनेमाचे नाव व प्रसंग आपापले टाकून घेणे.))
१८ वर्षाखालील मुलांसाठी लस देणे अजून अधांतरीच आहे. तरीही शाळा सुरू झाल्या . शिक्षकांचे पगार कसे होणार? गंमत म्हणजे दीड वर्षे शाळा बंद असलेल्या उघडल्यावरही चिमुकली मुले चार किलोंचे दप्तर घेऊनच आली. जणू काही पहिल्या दिवशीच अभ्यासाचा backlog भरून काढणारेत. बघू पुढे काय होतं.
बाकी समांतर धागे चालवण्यात मला इंटरेस्ट नाही.
कोणतीही चांगली गोष्ट झाली ,समस्या सुटली की मग नवीन चर्चा सुरू होते की नक्की श्रेय कुणाला द्यायचे ? कोरोनाचेही तेच होईल. ( कोकण रेल्वेचेही झाले.)
नवीन मतं टाकू ना.
करोना कोविडच्या फ्रान्स मध्ये लाटा येताहेत. विषाणूला ( कपडे बदलून ) रँप वॉक करत येण्याची सवय लागली आहे. पाऱ्ही ( पारिस, कान्ह) आणि फ्रेंच लोक आवडले आहे.
बाकी करोना बातम्या देताना विषाणूचं animation दाखवतात त्यास वाव आहे. दंडाला सुई ठोकणे पाहून कंटाळा आलाय. कुणी आक्षेपही घेईल. माझेच फोटो का दाखवता.
नेमके उलट अनुभव
April २० च्या २३ तारखेला lockdown mumbai मध्ये लागू झाले strict lockdown होते.
सर्व सार्वजनिक वाहतूक काहीच दिवसात बंद केली गेली, किराणा, भाजी पाला आणि medical store सोडून सर्व बंद होते.
मास्क पासून sanitizer पर्यंत सर्व माहिती लोकांस दिली जात होती
आणि त्याच काळात मी कार्य स्थळावर च राहत होतो.
घरी येणे जाणे बंद केले होते.
नंतर काही महिन्यांनी lockdown शिथिल केले गेले आणि ओला,उबर नी प्रवास सुरू झाला .
मी फक्त प्रवास रोज कार्य स्थळ ते घर असा प्रवास ओला उबर नी करत होतो.
आणि माझ्या ऑफिस मध्ये असणारे तिथेच राहत होते.
एकदा खात्री करून घ्यावी म्हणून सर्वांची antibody test aani rt PCR test दोन्ही एकत्र केल्या .
सरकार पण antibody test च वापर सर्रास करत होते.
पण माझा अनुभव ज्यांची antibody टेस्ट positive आली त्या मध्ये बहुतेक लोकांची rt PCR test negetive आली?
आणि ज्यांची antibody test negative आली त्या मध्ये पण बहुतेक लोकांची rt PCR test positive आली.
पहिला झटका इथेच बसला.
टेस्ट ह्या खात्री नी विषाणू चे अस्तित्व दाखवतात का?
हा प्रश्न मनात निर्माण झाला.
मी प्रवास करत असून सुद्धा माझ्या एकट्याच्या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या आणि बाकी सात ते आठ लोकांच्या टेस्ट positive आल्या.
ते सर्व माझ्या जवळ वावरणारे लोक होती.अगदी दोन फूट पर्यंत जवळ वावर हिता तो पण दिवसातून सात ते आठ तास.
तरी मी negetive.
विश्वास च बसत नव्हता म्हणून परत दोन दिवसांनी टेस्ट केली परत निगेटिव्ह.
सोशल distances बिलकुल नसताना covid positive लोकांत राहून ते पण मास्क न वापरता मला infection कसे झाले नाही.
ह्या प्रश्नाचे उत्तर कोणते शास्त्र देईल असे वाटत नाही.
‘एक चुकीचा क्षण’ is right!
म्हणजे, असे पाहा. संभोगातून दिवस जातात, अशी एक लोकप्रिय अंधश्रद्धा (हो, अंधश्रद्धाच!) आहे. परंतु, अनेकदा असे दिसते, की एकीकडे, मूल व्हावे, म्हणून (लग्न झालेले) एखादे जोडपे वर्षानुवर्षे डेस्परेटली ‘प्रयत्न’ करीत राहते, परंतु काहीही म्हणजे काऽहीऽही होत नाही, तर दुसरीकडे, एखाद्याच विवाहपूर्व/विवाहबाह्य ‘संबंधा’तून एखाद्या मुलीस फटकन दिवस जातात. तर तिसरीकडे, संभोगाशिवायच एखाद्या अविवाहित (परंतु, लग्न ठरलेल्या) तरुणीस दिवस गेल्याची किमान एक तरी डॉक्युमेंटेड केस मध्यपूर्वेतून ऐकावयास मिळते. पुरातन हिंदुस्थानातदेखील एखाद्या अविवाहित - आणि लग्नबिग्न न ठरलेल्या - कुमारिकेस संभोगबाह्य मार्गांनी दिवस गेल्याची कथा कर्णोपकर्णी आहेच. (पुरातन ग्रीसमध्ये, झालेच तर पुरातन हिंदुस्थानात, अन्यही काही चित्रविचित्र पद्धतींनी स्त्रियांना गर्भ राहिल्याचे दाखले आहेत, त्यांच्या तपशिलांत तूर्तास शिरत नाही. तपशील मला शोधून काढावे लागतील. परंतु, असे दाखले आहेत, याबद्दल कल्पना आहे.)
सांगण्याचा मतलब:
- संभोग आणि गर्भधारणा यांचा अर्थाअर्थी काहीही ‘संबंध’ नाही. तसा तो आहे, ही एक अंधश्रद्धा आहे. (लोकप्रिय आहे, तरीही अंधश्रद्धाच आहे.)
- संभोगातून गर्भधारणा होईलच, याची काहीही शाश्वती नाही. (बहुधा, इतरही अनेक योग जुळून यावे लागत असावेत.)
- संभोगरत भिन्नलिंगी जोडप्यांतील स्त्रियांना अनेकदा (बोले तो, अनेक केसेसमध्ये. अनेक वेळा/वारंवार अशा अर्थाने नव्हे.) गर्भधारणा होते, असे एक सार्वत्रिक निरीक्षण आहे खरे. परंतु, Correlation is not causation.
- ‘एक चुकीचा क्षण’ थियरी येथेही लागू होऊ शकते.
असो. चालू द्या. आमचा पूर्णविराम. इत्यलम्।
धाग्याचे स्वागत
त्यामुळे आता,
नस्य करणे, वाफारे घेणे, भाज्या व्हिनेगार/साबणाच्या पाण्याने धुऊन घेणे, घरातील व बाहेरील दारावरील सर्व स्पृश्य पृष्ठभाग सतत सॅनिटायझरने पुसणे, बाहेरुन आल्यावर प्रत्येक वेळी आंघोळ करणे व कपडे धुणे, काढे पिणे, व्हिटॅमिन डी चा अतिरेक करणे आणि असंख्य वात्सापीय सुत्रांचा अवलंब करणे यावर सखोल चर्चा आणि मतप्रदर्शन करता येईल.
मीडिया मधील न्यूज वर
सरकार नी निर्णय घेवू नये.
आता जो covid व्हायरस चा प्रकार आला आहे त्याचे उत्परीवर्तं न जास्त वेळा झाले आहे अशी माहिती वाचायला मिळत आहे.
ह्याचा अर्थ तो जास्त धोकादायक आहे असा नाही.
उलट हाच नवीन प्रकार जगाला कारोना मुक्त करेल(हे माझे मत).
आफ्रिकेत ह्याचा उगम झाला आहे तिथे बाधित लोकांना तीव्र लक्षण दिसत नाहीत.
लागण होते पण त्रास नाही
Delta ल ह्या व्हायरस प्रकार नी replace केले तर.
माणसात आणि त्याच्यात मैत्री होईल.(हे पण माझेच मत.आणि मी सामान्य व्यक्ती आहे पुरावे मागू नका)
द. आफ्रिकेत हॉस्पिटलांत जास्त लोक
आजच सकाळी NBCवर बातमी देत होते की गेल्या वेळपेक्षा दक्षिण आफ्रिकेत हॉस्पिटलांत भरती होण्याचं प्रमाण ६३% जास्त आहे. बातमीचा दुवा
विषाणू चे मूटेशन
कसे होत हे जास्त इंटरेस्टिंग आहे.
१) निसर्ग नियमानुसार अस्तित्व टिकवण्यासाठी.
मुळात विषाणू अस्तित्व तेव्हाच टिकते जेव्हा यजमान चा मृत्यू होण्या अगोदर प्रसार झाला पाहिजे दुसऱ्या यजमान कडे.
मुळात यजमानांना काही त्रास व्हावा हा त्यांचा हेतू च नसतो आणि ध्येय पण नसते.
पण काही विषाणू मध्ये असलेल्या काही रासायनिक रेणू मुळे (नक्की शब्द माहित नसल्याने हा रेणू ठोकून दिला) यजमान आजारी पडतो हा फक्त योगायोग.
त्या मुळे विषाणू स्वतः मध्ये बदल करतो तो घातक होण्यासाठी करत नाही.स्व अस्तित्व टिकवण्यासाठी करतो.
यजमान च लगेच मेला तर संपलेच सर्व.
२) काही अडथळे आले तर विषाणू स्वतःचे रूपं बदलून स्वतः मध्ये आवशक्य ते बदल करेल.
३) दोन प्रकार नी एकच व्यक्ती बाधित केले तर दोन्ही प्रकार च्या विषाणू मध्ये संयोग होवून तिसराच प्रकार निर्माण होईल.
प्रसार च झाला नाही तर पुढच्या सर्व शक्य ता नष्ट होतात.
ऐकीव माहिती वर आधारित.
खरेच आहे ते
मी काही कोणी तज्ञ नाही जी काही माहिती आहे ती सर्व ऐकीव किंवा वाचिव.
तज्ञ लोकांवर खूप बंधन असतात system च्या विरूद्ध जावून त्यांना मत जाहीर व्यक्त करता येत नाही.
कोणताही तज्ञ,डॉक्टर्स चाकोरी बद्ध च जाहीर व्यक्त होतात.
पण आपल्या सारख्या लोकांना ते बंधन नाही आपण जे वाटत तसे व्यक्त होवू शकतो.
कारण आपण तज्ञ नाही.
महत्वाचे मत आहे
'सरकार लाच अभ्यास करावा लागत aahe'
सिस्टम अशी असावी
१) who जगातील सर्व देशाकडून माहिती गोळा करते.
२) त्याचे विश्लेषण करते आणि काही निष्कर्ष काढते.
. त्या नुसार गाईड लाईन्स,उपचार पद्धती काय असाव्यात ह्याची सूचना सर्व देशांच्या सरकार ना दिली जाते.
त्याच सुचणे नुसार जगातील सर्व देशांनी वागायचे स्वतचं डोकं चालवायचे नाही.
हीच साथी च्या रोगात system आहे.
सर्च देश स्वतः पण अभ्यास करतात पण त्या निष्कर्ष ला who ची मान्यता असावीच लागते.
नाही तर सर्व निष्कर्ष कचऱ्याच्या डब्यात.
Who ची मक्तेदारी आहे .
सरकार ला काही अभ्यास करावा लागत नाही. फक्त सूचनेचे पालन करायचे हेच काम असते
डॉक्टर ना स्वतःच्या बुध्दी नी covid वर उपचार करण्याची मोकळीक द्यावी असे मला नेहमी वाटतं.
पटाईत काका किंवा कोणीही असो आदर आहेच.
मुख्य म्हणजे असंख्य लोक आहेत त्यांचे विचार संपर्कात आल्यावरच कळतात. पटाइतकाकांनी लिहिलं म्हणून कळलं. किंवा आणखी कुणी हे खरं नाही लिहिलं म्हणूनही कळलं. शहरातल्या लोकांकडे पैसा, सहजसंपर्क इत्यादींमुळे ते उपाय करतात. पण दूरदूरच्या ठिकाणच्या लोकांचे काय?
किन्नौर ( हिमाचल प्रदेश) इथेही प्रादुर्भाव वाढला. निर्बंध वाढले. शेतीप्रधान, फळफळावळ आणि पर्यटनावर अवलंबून. ते काय करणार?
पर्यटक आलेच नाहीत, किंवा फळे बाहेर गेलीच नाहीत तर काय?
अती घाई संकटात नेई
हे त्रिकाळ सत्य सर्वांना माहित आहे तरी भल्या भल्या ना मोह आवरत नाही
१) लोकसभेत सरकार नी सांगितले भारतात एक पण ओमायक्रोन चा रुग्ण नाही.
२) dr panda हे महाशय icmr मध्ये विषाणू तज्ञ
आहेत ते प्रसार माध्यमांना सांगत आहेत ओमयक्रोन चे भारतात शिरगाव झाला असणार?
पण हे समजायला वेळ लागेल .
मग एक जबाबदार शिक्षित व्यक्ती ला कसली घाई झाली आहे मत व्यक्त करायची.
३) अनेक खरे हाडाचे संशोधक सांगता आहेत हा नवीन प्रकार घातक च असे सांगता येत नाही .
जास्त mutation झाली आहेत हे मान्य पण त्या मुळे विषाणू अस्थिर पण होवू शकतो.
दुसरीकडे तीव्र वेगात पसरेल,iimmune system ल फसवेल, लस काम करणार नाही .हे पण तज्ञ नावाचे मानव च प्रसार माध्यमांना सांगत आहेत.
आणि प्रसार मध्यम ते प्रसारित करत आहे..
कसली घाई झाली आहे सर्वांस ?
अजुन अभ्यास चालू आहे कोणत्याच निष्कर्ष पर्यंत आता जाता येणार नाही.
हे शेवटचे वाक्य सर्व बोलून झाल्यावर जबाबदारी पडू नये म्हणून नक्कीच सर्व वापरतात.
मग घाई का करत आहात.
कन्फर्म निष्कर्ष येवू ध्या मग व्यक्त व्ह्या.
शिक्षित आहात mature पण व्हा.
परदेशी न्यूज चानेलवर सांगत आहेत कोणकोणते देश.
इकडे भारतात अफ्रिकेतून हजार लोक आल्याची एरपोर्टवर नोंद. आता त्यांचा शोध चालू होईपर्यंत ते गावागावात पोहोचले. डोंबिवलीत आलेला एक. त्याच्या आणि कुटुंबात तपासण्या झाल्या. कुठेकुठे गेला, त्याचा एअरिआ तिकडे आजुबाजूस घरी विचारत आहेत.
आता सावध राहण्याशिवाय इलाज नाही. पंधरा दिवसांत पसरणारे हे नवीन रोग आहेत . सध्या शोधाशोध हाच घाईचा उपाय आहे.
बखर किंवा खबर करोनाची हा विषय आहे म्हणून लिहिले. अफवा वगैरे नाहीत.
चीमन
सामान्य माणसं अफवा पसरवत नाहीत.त्यांच्या मताला किंमत नसते.
जास्ती त जास्त २०० मीटर पर्यंत च ते अफवा पसरवतात.
ज्यांच्या शब्द ला किमंत असते.जे नावाजलेले तज्ञ असतात त्यांचा एक चुकीचा शब्द पण जगात अफवा पसरविण्यास सक्षम असतो.
त्यांनी खूप मोजून मापून ,खूप विचार करून प्रतेक शब्द सार्वजनिक प्लॅटफॉर्म वर बोलणे गरजेचे असते.
स्वतः ला फक्त वाटतंय म्हणून काहीच बोलायचे नसते.
नका हो...
'करोना विशेष' भागात 'करोना लस' नावाचा विभाग आहे. तिथे लशींबद्दल तज्ज्ञांनी पुरेसं लिहिलं आहे. कशाला उगाच पिंका टाकून त्याला चित्र बनवायचा प्रयत्न करता? हवं तर 'ऐसी रत्न' वगैरे पुरस्कार सुरू करून तुम्हाला देऊ; पण निष्कारण, माहिती नसताना काहीच्या काही का लिहिता?
कधी तरी माहितगार, तज्ज्ञ वगैरे लोकांना, किमान ऐसीवर तरी मोकळेपणानं बागडू द्या. पिंका टाकायला फेसबुक, ट्विटर वगैरे दिलंय ना देवानं!
ओके.
पिंका म्हणता ते काढलंय.
पण आताची लस कोविड १९ ची आहे. पुढे कधी कोविड २१,२२, २३,/ओमीक्रॉनची आली तर त्यास काय म्हणणार? स्पेसिफिकच ना?
कोविड १९ ची ओमीक्रॉनसाठी काम करेल का असा अभ्यास चालू आहे हे वाचलं/ऐकलं म्हणूनच लिहिलं. जेवढे विषाणू तेवढ्या लशी नाहीत का लागणार?
पकाऊ/ निरर्थक म्हटलं तर विचारायचंच नाही कुठे.
आमचा "बघू नंतर घेऊ लस"
हा 'पण' धूळीस मिळालाय. सगळीकडे जामर लावले सरकारने. ट्रेन, ट्याक्सी, बस, ओटो. एवढंच काय डोंबिवलीत तुमच्या दारेससलाममधून एकजण' ओमिक्रॉन घेऊन आला. सगळ्या चानेलसवर न्यूजमध्ये डोंबिवलीचे नाव दुमदुमु लागले ( मालिकांमध्ये दुमदुमत आहेच.)
झालं - मुन्शीपालटीची फौज निघाली घरोघरी चेकिंगला. कुणी घेतली कुणी नाही. दारावर खडूच्या फुल्या . आता उरलो लशीपुरता.
तसा माझा विश्वास नव्हताच आणि मध्यंतरीच्या काही घटनांमुळे पक्का झाला. पण सांगतो कुणाला?
मंडळाने स्वानुभवांची आणि मतांची कदर करून कोणत्यातरी लेखात स्थान द्यावे. रत्न पुरस्कार वगैरे दूर.
प्रश्न का मत?
प्रश्न बिनधास्त विचारा. 'मला अमुकतमुक समजलं नाही, ते कुणाला समजलं असेल तर सांगा' असं म्हणालात तर काहीच अडचण नाही. ज्यांना माहीत आहे ते लोक हौशीनं उत्तरही देतील. इथेच खाली अबापटांनी विषाणूबद्दल शंकानिरसन केलेलं आहेच.
मात्र तुमचे प्रतिसाद म्हणजे प्रश्न कमी आणि मतप्रदर्शन जास्त असतं. खालच्या प्रतिसादात तुम्ही पुन्हा म्हणताच की लशीवर तुमचा विश्वास नाही. हे तुमचं, विषाणू आणि त्याचं उत्परिवर्तन (म्यूटेशन) यांतला फरकही न समजणाऱ्या माणसाचं, लशीबद्दल मत झालं. ते मत मांडून वर पुन्हा प्रश्न विचारलेत तर तुमचा हेतू काय आहे, असा प्रश्न मला वाचताना पडतो. लोक काय श्रेणी देतात ती का देतात; आणि त्यात आपली खरंच काही चूक असेल काय, असा प्रश्न कधी विचारता का स्वतःला?
तुम्ही काय आणि मी काय, विषाणू, लस, रोग, उपचार यांतले तज्ज्ञ नाही. मग आपल्या मताला किंमत काय? शून्य. तर ते मत आपल्याकडे ठेवून जेवढं समजलं नाही तेवढ्याबद्दल प्रश्न विचारून पाहा.
त्यातही तपशिलातला सैतान. रोगाचं नाव आहे कोव्हिड-१९. विषाणूचं नाव आहे सार्स-कोव्ह-२. कोव्हिड-२१ असं काही नाही. सार्स-कोव्ह-२च्या सगळ्या उत्परिवर्तनांमुळे (म्यूटेशन्स) जो रोग होऊ शकतो, त्याचं नाव कोव्हिड-१९. डेल्टामुळे होतो तो आणि ओमायक्रॉनमुळे होतो तो, दोन्ही कोव्हिड-१९ हेच रोग. एकच. जोवर शास्त्रज्ञ यापेक्षा निराळं सांगत नाहीत, तोवर हे असंच. कारण तेच, तुम्ही आणि मी यांतले तज्ज्ञ नाहीत.
सध्याच्या लशी ओमायक्रॉनवर प्रभावी ठरतील का, असा अभ्यास सुरू आहे. हे झाले वास्तवातले तपशील. त्यापुढे 'जेवढे विषाणू तेवढ्या लशी' हे तुमचं मत. हा प्रश्न मला विचारायचा असता तर मी आधी तो अभ्यास पूर्ण होईस्तोवर थांबले असते. थांबायचं नसतं तर विचारलं असतं - हे म्यूटेशन किती गुंतागुंतीचं आहे; विषाणूच बदलला असं म्हणण्याइतपत मोठं आहे का; (सार्स-कोव्ह-२च्या बाबतीतच नाही, पण एकंदरीतच) उत्परिवर्तनामुळे विषाणूच बदलला असं कधी म्हणता येईल?
करोना ही विषाणूंची प्रजात
करोना ही विषाणूंची एक प्रजात आहे असं समजा. 'सार्स' आठवतो का, 'मर्स' आपल्याकडे फार आला नव्हता पण आखाती देशांत गडबड केली होती त्यानं? हे दोन रोग आणि आताचा कोव्हिड-१९ ज्या तीन निराळ्या विषाणूंमुळे होतात, ते तीनही करोना प्रजातीचे, प्रकारचे विषाणू आहेत. असे खूप प्रकारचे करोना विषाणू आपल्याला आधीपासूनच माहीत आहेत. त्यांतली एक प्रजात म्हणजे सार्स-कोव्ह-२. (सार्स-कोव्ह-१ म्हणजे ज्यामुळे 'सार्स' हा रोग होऊ शकतो.) सध्याचे डेल्टा, ओमायक्रॉन वगैरे उत्प्रवर्तित प्रकार हे सार्स-कोव्ह-२ या विषाणूचे.
लसी विषयी
लसी विषयी पण माझे मत एकदम विरोधी होते.
पारंपरिक पद्धती नी बनवलेली covaxin हि लस नवीन rna लसी पेक्षा खूप फायदेशीर आहे.
Covaxin पूर्ण विषाणू चीच ओळख करून देते आपल्या रोग प्रतिकार शक्ती बाकी लसी ठराविक spike protein चीच ओळख करून देतात.
त्या मुळे covaxin ही सर्व varriant वर काम करेल.
हे माझे मत मी पाहिले पण मांडले होते.
पण उडवून लावले गेले.
पण हेच एक दिवस सत्य निघेल असे वाटत
… (अवांतर)
मुझे मालुम हैं पिस्तोल खाली है तुझे मालुम हैं पिस्टोल खाली है.
(या धाग्यावर पूर्णपणे अवांतर, परंतु तरीही लिहिण्याचा मोह आवरत नाही.)
हे नेहमीच खरे असेल, असे नाही. ‘तुझे मालूम है पिस्तौल ख़ाली है’ हा अनेकदा खरे तर ‘तुझे लगता है कि पिस्तौल ख़ाली है, क्यों कि तुझे किसी ने (शायद मैं ने ही) बताया है कि पिस्तौल ख़ाली है’वाला मामला असू शकतो. त्यामुळे, कोणावर संबंधित पिस्तूल रोखून पिस्तुलाच्या हातोड्याशी चाळा करण्याअगोदर, ते पिस्तूल खरोखरच रिकामे आहे याची स्वतः खात्री करणे श्रेयस्कर.
(याला अमेरिकेतील सध्याच्या एका स्थानिक तात्कालिक बातमीचा संदर्भ आहे, सबब, यातून तुम्हाला काही अर्थबोध होईलच अथवा झालाच पाहिजे, अशी अपेक्षा नाही. तेवढीच हौस असल्यास Alec Baldwin असे गुगलून पाहावे, आणि चालू बातम्या चाळाव्या, असे सुचवू इच्छितो. असो.)
डेटा बघून कन्फ्युज
प्रतेक १०० माणसात ५८.३५ माणसं नी दोन्ही डोस घेतले आहेत अमेरिकेत.
गेल्या सात दिवसात अमेरिकेत झालेले मृत्यू ६३८८
भारत.
१०० पैकी ३२.७२ लोकांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत.
मागील ७ दिवसात झालेले मृत्यू २६४७.
Uk.
प्रति १०० व्यक्ती मध्ये ६८.०९ लोकांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत.
मागील ७ दिवसातील मृत्यू ८४८.
Pureto rico
प्रति १०० व्यक्ती ८२.९२. लोकांनी दोन्ही डोस घेतलेलं आहेत.
मागील ७ दिवसातील मृत्यू ५.
आणि Nigeria गरीब देश .
आरोग्य व्यवस्था काय असेल त्याची कल्पना करा.
प्रति १०० व्यक्ती मागे फक्त १.७१ लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.
आणि मागील सात दिवसातील मृत्यू आहेत फक्त ३ .
आता इथे लसीकरण आणि covid मुळे होणारे
मृत्यू ह्याचा संबंध कसा जोडणार.
सरळ Nigeria च deta चुकीचं आहे हे ठरवण्याचा प्रयत्न होईल.
भारतात पण आरोग्य व्यवस्था उत्तम असणारे राज्य केरळ आणि सर्वात covid ग्रस्त तेच आहे.
What's ऍप फॉरवर्ड घ्या खरे खोटे तुम्ही ठरवा
https://www.dailymail.co.uk/debate/article-10256373/Dr-ANGELIQUE-COETZE…
Dr Angelique ज्यांनी omicron शोधला त्याच असे म्हणतात.
की omicron ल over rated करू नका.एक ही रुग्ण दक्षिण आफ्रिकेत omicron नी दगावला नाहीच पण साधं admit पण झालेला नाही.
वैचारिक समृद्धतेवर आधारित
वैचारिक समृद्धतेवर आधारित असलेल्या "ऐसी" च्या ध्येयघोषणेशी ताडून पाहिल्यास, या धाग्याचे नाव “लघुशंका” ठेवणे ज्यास्त योग्य होईल असे मला वाटते. असला निर्बुद्ध धागा “ऐसी”वर कशाला? त्यासाठी इतर संस्थळे हवी तितकी आहेत.
आणि या विशिष्ट धाग्यापलिकडे जाऊन, असा प्रश्न पडतो की एखाद्या सदस्यनामाकडून होणारा सततचा आणि दीर्घकालीन निरर्थक/पकाऊपणा "ऐसी"च्या धोरणांशी सुसंगत आहे काय? की अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली असला विवेकशून्यपणा इतरांनी सहन करत रहावा?
ऐसीचा एको चेंबर होऊ नये हे खरेच, पण लिखाणाच्या दर्जासंबंधीचे काहीतरी किमान नियम ठरवता येतील काय? उदा., लिखाणास वर्षभरात काहीशे हून अधिक निरर्थक/पकाऊ श्रेण्या मिळाल्यास तो आय्डी रद्द करणे?
"एका विशिष्ट मर्यादेपेक्षा खालची श्रेणी मिळाली तर ते लेखन अप्रकाशित करण्यासाठी संपादकांच्या विचाराधीन होईल. ही मर्यादा ठरवण्याचा व त्यानुसार कारवाई करून लेखन अप्रकाशित अथवा नष्ट करण्याचा अधिकार संपादक मंडळाला आहे."
काही सदस्यनामांच्या संदर्भात हा अधिकार वापरण्याची वेळ आली आहे काय याचा संपादकांनी जरूर विचार करावा.
"You are not entitled to your opinion. You are entitled to your informed opinion. No one is entitled to be ignorant."
-Anonymous
सहमत आहे
पण काही प्रश्न विचारून
1) संकेत स्थळ हे खासगी मालकीचे असल्या मुळे कोणत्या ही सभासद ला कोणतेही कारण न देता लिखाण अप्रकाशित करण्या पासून,श्रेणी देण्या पासून आयडी रद्द करण्याचा पूर्ण अधिकार आहे .
२) पण कोणी ही अगदी व्यवस्थापन मध्ये असणारा व्यक्ती असेल तरी.
वैयक्तिक टीका जाहीर पने करण्याचा अधिकार त्यांना संकेत स्थळ कसे देते.
हा सरळ सरळ नियम आणि अटी चा भंग आहे.
३) सभासद विषयी काही तक्रार असेल तर सरळ व्यवस्थापन कडे ती करण्याचा मार्ग उपलब्ध आहे त्याचा वापर न करता .असा मार्ग निवडला जाणे च बेशिस्त पना आहे.
४) दर्जेदार लिखाण विषयी बोलायचे झाले तर मी लिखाण च केले नाही इथे.
हा धागा सूचना केली म्हणून मी काढला होता.
लिखाण दर्जेदार असू शकत पण प्रतिसाद हे फक्त मत असते ते कोणाचे काही ही असू शकत.
ह्याच चाकोरी मध्ये मत पण व्यक्त करा असे सांगणे
बाकी व्यवस्थापन ला माझा आयडी उडवावा असा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे पण कोणी तरी तसे करा असा सल्ला देणे तो पण जाहीर पने ह्याचा अर्थ च व्यवस्थापन वर अविश्वास दाखवणे असा होतो.
बखर....कोरोनाची (भाग १०)
करोना किंवा इतर व्याधींच्या संदर्भात ऐसी वर संसर्ग, उत्परिवर्तन, उपचार अश्या शास्त्रीय अजाणकारांच्या चर्चेसाठी एक उपमा लिहू इच्छितो. जास्तीत जास्त भारतीयांना झालेला संसर्ग म्हणजे राजकारण. हा विषाणूमुळे झाला कि जिवाणूंमुळे हे वाचकांवर सोपवतो. मोठे पक्ष म्हणजे जिवाणू आणि छोटे वा प्रादेशिक वा इतर आधारावर टिकलेले विषाणू. जिवाणूंचा संसर्ग नाहीसा करण्याचा उपाय नाहीच, कारण औषध सापडले की जिवाणू असे बदलतात की ज्याने औषध निरुपयोगी ठरते. विषाणू हे टिकण्यासाठी उत्परिवर्तित होतात; इतके की औषध पुन्हा पुन्हा शोधावे लागते. संसर्ग इतका पसरला आहे की उपाय-योजना राष्ट्रीय स्तरावरच केली पाहिजे. बरें, एकाच लस सर्व जिवाणू विषाणूंसाठी शक्य नाही. औषधे काहींना आयुर्वेदिक तर काहींना आधुनिक शास्त्रांनुसार सिद्ध केलेली!
इतरही समस्या वाचकांवर सोपवतो.
उपाय म्हणजे शक्यतो जिवाणू-विषाणूंपासून दूर राहणे, निसर्गाबरोबर मैत्री करणे, व्यसनांपासून दुरी, नियमित व्यायाम आणि विवेक.
आपुल्या आपल्या कर्मी दक्ष तो मोक्ष मेळवी
परफेक्ट राजेश भाऊ !!! अभिनंदन
परफेक्ट राजेश भाऊ !!! अभिनंदन !!!