भारत जोडो यात्रा

"नफरत छोडो भारत जोडो" म्हणत रागा उर्फ पप्पू उर्फ राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या पदयात्रेला चांगल्यापैकी प्रतिसाद मिळत असावा असं चित्र सध्या वर्तमानपत्र आणि सोशल मीडिया निर्माण करत आहेत. विशेषतः राहुलने महाराष्ट्रात आल्यानंतर सावरकरांवर भाष्य करून जाणीवपूर्वक आरोप-प्रत्यारोप सत्र चालू केलं असा मतप्रवाह आहे. त्यामागे मोदी मीडियाला यात्रेची दखल घेणं भाग पडावं असा हेतू होता आणि तो साध्य झाला असं काँग्रेस समर्थक, हितचिंतक आणि सध्याच्या राजवटीमुळे निराश झालेले लोक सांगत आहेत. त्याहीपुढे जाऊन एक भाबडा आशावाद सोशल मीडियावर दिसतो आहे. तो म्हणजे - द्वेषमूलक राजकारण आणि राजकारणी यांचा अतिरेक झाल्यानंतर लोकांना प्रेमाची भाषा हवी आहे आणि समजते आहे. विशेषतः मोदी प्रभावाबाहेर असलेल्या  सुशिक्षित मध्यमवर्गातील लोकांकडून राहुलचं हास्य, देहबोली, सामान्य लोकांमध्ये मिसळणं ह्या गोष्टींचं प्रचंड कौतुक चालू आहे. त्याच्या सुरक्षा रक्षकांची धावपळ, चिंता वगैरे फोटोतून दिसत आहेच पण राहुल मजेत चालताना, पळताना, सामान्य लोकांसारखं मिळेल ते खाताना, लहान मुलांना मायेने उचलून घेताना, स्त्री-पुरुष असा भेद न करता सगळ्यांना प्रेमाने मिठी मारतानाचे फोटो शेअर केले जात आहेत. या यात्रेमुळे राहुल व्यक्ती म्हणून आमूलाग्र बदलला आहे आणि नेता म्हणून तो पुढे येईल अशी प्रचंड आशा या लोकांना वाटते आहे . प्रत्यक्षात यात्रेला मिळणाऱ्या प्रतिसादाचं रूपांतर काँग्रेसला निवडणुकांच्यात होणाऱ्या मतदानात आणि वाढीव जागांमध्ये होणार कि नाही याबद्दल कोणालाही खात्री नाही. परंतु केवळ आशेचा किरण दाखवणारा माणूस म्हणून त्याला उचलून धरलं जात असावं अशी शंका घ्यायला वाव आहे. राहुलवर व्यक्तिगत टिप्पणी न करता म्हणावंसं वाटतं की फॉरेस्ट गम्प पळत निघाल्यावर लोक जसे त्याच्यामागे धावत निघतात, आणि एक दिवस तो थांबल्यानंतर पूर्णपणे गोंधळून जातात तशी अवस्था व्हायला नको! नाहीतर पुन्हा एकदा 'मोदी नाही तर कोण?' हा वैतागवाणा प्रश्न विक्रमादित्याला ग्रासणाऱ्या वेताळासारखा मानगुटीवर बसेल.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आज भारतात राहुल जी इतका ..
सुशिक्षित,शिक्षित,सुसंस्कृत, नितिवान , एक पण राजकीय नेता नाही.
राहुल जी पप्पू नक्कीच नाहीत पण संयमी, सभ्य नक्कीच आहेत
त्यांना पप्पू बोलणारे मूर्ख,अडाणी,बे अक्कल,अशिक्षित,असंस्कृत, नक्कीच आहेत

या देशांत खरोखरीचे रामराज्य कधीतरी येईल असा लोकांचा भाबडा आशावाद असतो. पण त्याचबरोबर, हे कधी प्रत्यक्षांत होणार नाही याची अंतर्मनाला खात्रीही असते.

यासंदर्भातील हा टिवटिवाट ऐकू आला -

https://twitter.com/ShefVaidya/status/1596551259934191616

---

BTW ,

हे ट्विट इथे थेट embed करता येत नाहीय.

गोडॅड्डी ची error येत आहे.

ह्या वैद्यबाई काँग्रेसच्या तर वाटत नाहीत- paid handle आहे का भाजप आय टी चं?

मला तो रागांचा विडिओ पाहून मागच्या दशकातील त्या team building वगैरे प्रशिक्षणातील ऍक्टिव्हिटीजची आठवण झाली. म्हणजे प्रशिक्षक आपल्या प्रशिक्षणार्थींना काही ऍक्टिव्हिटी करायला सांगतात आणि मग त्याद्वारे काहीतरी संदेश देतात तसे. पण इथे ती घासून गुळगुळीत झालेली ऍक्टिव्हिटी आणि तो संदेश यांचा काही संबंध आहे का हे कळले नाही.

बाळबोधपणा आणि शुद्ध थापा या दोहों मध्ये निवड करायची असल्यास पसंद अपनी अपनी.

बाळबोधपणा आणि शुद्ध थापा या दोहों मध्ये निवड करायची असल्यास पसंद अपनी अपनी.

विडिओ माजी बाळे बोधे आणिक थापा मारणारे
रागीया वाणीची फळे शुद्ध कोठोनी असतील?

तुम्ही मासेमार्केटमध्ये तोंडली विकत घ्यायला जात असाल ना?
तुम्ही तोंडली विकत घ्यायला मासेमार्केटमध्ये जात असाल ना?

मासेमार्केटात लोक ‘पाणशेंगा’ आणायला जातात, हे ठाऊक होते. ‘तोंडल्यां’बाबत कल्पना नाही.

(थोडक्यात, असेही काही बामणी यूफ़ीमिज़म असल्यास ते (बामण असूनही) निदान माझ्या तरी ऐकण्यावाचण्यात आलेले नाही.)

——————————

बाकी, श्री. वामन देशमुख हे मुळात मासेमार्केटात जातात, या गृहीतकास आधार काय? (नाही, जात असल्यास आक्षेप अर्थातच नाही, परंतु, Are you taking for granted things which may not necessarily be true?)

या गृहीतकास आधार काय?

बरोबर आहे.

मी मासळीबाजारात जात नाही.

पाणशेंगा

जलपुष्पालु

दुरुस्ती केली आहे!

ठीक. Biggrin

बाकी, एक शब्द इकडचा तिकडे केल्याने अर्थात खूपच फरक पडतो, नाही? Wink

तुम्ही मासेमार्केटमध्ये तोंडली विकत घ्यायला जात असाल ना?

नाही.

पण तुम्ही तसे करता असे या प्रतिसादावरूनच दिसते.

यांचं फेसबुक पेज पाहिलं तर काय ते लगेच लक्षात येईल.

यांचं फेसबुक पेज पाहिलं तर काय ते लगेच लक्षात येईल.

राहुलजी या यात्रेत ही भाजप स्टार प्रचारकाचे कार्य उत्तम करत आहे. महाराष्ट्रात येऊन वीर सावरकरांची निंदा (लोकांनी नेहरूजीचे किस्से टाकून दिले). ऐन गुजरात निवडणूकी पूर्वी मेधा पाटकरची गळा भेट घेतली. दोन्ही राज्यांत कॉँग्रेसची मते कमी होतील. (हे माझे नाही कोंग्रेसच्या एका कार्यकर्त्याचे मत आहे). भाजप याच्या फायदा घेणारच. मला अनेकदा वाटते याच्या जवळचे लोक बहुतेक भाजप वाले असावे.

BTW, गुजरातेत निवडणुका आहेत पण ही यात्रा गुजरातेतून जात नाहीय. काय कारण असावे बरे?

राहुल गांधी न वर वैयतीक फालतू आरोप करणे सुरू झालं आहे.
राहुल जी काँग्रेस बुडवत आहेत ही चिंता काँग्रेस ल नाही तर bjp samarthak. लोकांना लागली आहे.
नेहरू,गांधी जावून अर्थ शतक झाले त्यांनी त्यांची योग्य जबाबदारी पार पाडली होती हे लोकांना माहीत आहे.
पण गांधी जी च कुठे अफेअर होते आणि नेहरू जी चे कुठे अफेअर होते असले फालतू विषय bjp समर्थक बोलत आहेत न लाजता .
म्हणजे भारत जोडी यात्रा नी योग्य दुष्परिणाम हिंदू राष्ट्र ,पाकिस्तान,अफगाणिस्तान सहित भारत वादी (तो पहिला पण कधी नव्हता आणि पुढे पण शक्य नाही लोकांवर केला आहे)लोकांवर झाला आहे.
पहिली लढाई राहुल जी नी जिंकली आहे

नाहीतर पुन्हा एकदा 'मोदी नाही तर कोण?' हा वैतागवाणा प्रश्न विक्रमादित्याला ग्रासणाऱ्या वेताळासारखा मानगुटीवर बसेल.

उपमा किञ्चित गंडलीय.

बोले तो, त्या विक्रम-वेताळाच्या ष्टोरीत कीनै, तो वेताळ असतो ना, तो ना, आपण होऊन विक्रमाच्या मानगुटीवर जाऊन बसलेला नसतो कै. (आणि, ग्रासतबिसत तर नसतोच नसतो!) उलट विक्रमानेच त्याला (खरे तर तो राहात असलेल्या प्रेताला) आपण होऊन जबरदस्तीने अंगावर – आपले, मानगुटीवर – चढवून घेतलेले असते. आणि तो (बोले तो, वेताळ), एवढ्यातेवढ्या कारणावरून विक्रमाला बोलता करून, ती संधी साधून पळून जाऊन पुन्हा झाडावर लटकण्याच्या प्रयत्नांत असतो. आणि तो गधडा विक्रम, तरीसुद्धा दर वेळेला पुन्हापुन्हा जाऊन, त्या झाडावरून ते वेताळवाले प्रेत उतरवून, ते आपल्या मानगुटीवर आपल्याच हातांनी चढवून घेत असतो. (काय एकेकाच्या हौशी म्हणायच्या तरी!)

थोडक्यात:

हात् साला! तुम्ही विक्रम-वेताळाच्या गोष्टीसुद्धा धड वाचल्या नाहीत!

असं म्हणायचा हेतू इतकाच होता की विद्यमान पंतप्रधानांना दोनदा निवडून दिल्यानंतर इतर पर्याय नाही म्हणून येत्या निवडणुकीत पुन्हा तेच होऊ नये. गेल्या खेपेला ऐनवेळी राहुलने 'मी पंतप्रधान पदासाठी उमेदवार नाही' असं जाहीर करून टाकून कुंपणावर बसलेल्या लोकांची पंचाईत केली होती.

तो वेताळ, विक्रम राजाला वाचवायचाच प्रयत्न करत असतो. कारण प्रेत नेऊन दिलं तर तिथला मांत्रिक विक्रमला मारणार असतो. अगदी शेवटी, तो विक्रमराजाला सत्य सांगतो आणि सावध झालेला विक्रम त्या मांत्रिकाचे पारिपत्य करतो. (असं आम्ही वाचलं आहे मूळ वेताळपंचविशीत )

.

इंदिराजी नाही तर कोण,राजीव जी नाही तर कोण हे हे प्रश्र्न
मोदी नाही तर कोण ह्या पेक्षा गंभीर होते.
.भारतात खूप टॅलेंट आहे मोदी ना पर्याय लाखो युवा आहेत

ते युवा पर्याय कोण किंवा स्वतः राहुल यावेळी तरी नेतृत्व स्वीकारणार का, हे मतदारांना वेळेत कळायला पाहिजे. 2024 फार लांब नाही.

देश,लोकशाही,सामान्य लोकांचे अधिकार वाचवण्यासाठी सत्ता बदल झालाच पाहिजे हे लोकांना कळाले आहे.
काँग्रेस स्व बळावर बहुमत मिळवू किंवा आघाडी सरकार जरी आले तरी राहुल जी च पंतप्रधान असणार हे सांगायची गरज नाही...
भारताला आता त्यांची गरज आहे.

भारत जोडो यात्रा हे राहुलचे उशीरा पडलेले पण स्तुत्य पाऊल आहे. भाजपवाल्यांची चड्डी पिवळी झालीये या यात्रेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे. राहुलने अधिक आक्रमकपणे भाजपला शिंगावर घेणे सुरू केल्याने सुस्त पडलेल्या काँग्रेसींना पण मैदानात येणे भाग पडते आहे. भाजपच्या नीच ध्रुवीकरणवादी अजेंड्याचा पराभव करण्यासाठी जे जे लागेल ते राहूलने आणि काँग्रेसने केले पाहिजे. या निमित्ताने ट्रोलधाडीला उत्तर देण्याची क्षमता काँग्रेस विकसित करतेय हेदेखिल कमी नाही.
गुजरातमध्ये मात्र राहुलने नांगी टाकल्याचे सकृतदर्शनी दिसते जे अत्यंत चुकीचे आहे. यात्रा गुजरातमधून न्यायला हवी होती. जिंकणे, हरणे यापेक्षा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मोबिलायझेशन अधिक महत्वाचे आहे.

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

कालचा निकाल पाहता असे वाटते की हात दाखवून अवलक्षण नको म्हणून काँग्रेसने भाजोया गुजरातमधून नेली नाही. भाजपच्या इलेक्टोरल मशीनरीपुढे जवळजवळ नांगी टाकल्याप्रमाणे काँग्रेसचा परफॉर्मन्स आहे. मोदी- शहाला नडायचे म्हणजे असा बुळबुळीतपणा उपयोगाचा नाही. यात्रा गुजरातमधून न्यायला हवी होती. कार्यकर्त्यांना बळ द्यायला हवे होते तसेच पराभव झाला असताच पण तरीही तो ग्रेसफुली स्विकारायला हवा होता. पण राहूलने सेफ गेम खेळला.

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

काही कल्पना नाही खरंच.

एका टोकाला म्हणजे समजा अतिशय साधा दृष्टिकोन असेल तर मला रा.गांची यात्रा बघून बरं वाटतं. कुणीतरी नेता साध्या सोप्या विषयावर लोकांशी बोलतोय आणि क्लासिक म्हणता येईल अशा माध्यमातून जनसंपर्क वगैरे करतोय. छान आहे. उत्तम.
त्याने काहीही फरक पडला नाही तरीसुद्धा "नफ्रतीला प्रेमाने उत्तर द्या" असलं पुस्तकी तरीही जगन्मान्य प्रत्युत्तर प्रत्यक्षात आणणं हे अज्याबात सोप्पं नाही.

दुसऱ्या टोकाला जाउन् मग माझ्यातला सिनिक-व्यवहारी-संशयी-अविश्वासठेवुत्सुक- माणूस जागा होतो की बाबा राहुलची इमेज जाणीवपूर्वक बदलण्यासाठी त्याचे अगोदरचे स्ट्राँग प्वाईंटस लोकांच्या मनावर ठसतील - असं काही भव्य दिव्य करण्याचा हा प्रयत्न आहे का?
मी भले त्यात प्रेमाने जनसंपर्क करणं हे बघतो - पण हाच परिणाम व्हावा म्हणून हे सगळं चाललं आहे का? थोडक्यात लाईव जाहिरात. आणि टार्गेट आडिअन्स म्हणजे आपण सगळे लोकं - जे भाजपासोबत आणि खचितच प्रतिगामी नाहीत.

पण खरं ह्याच्या मधे कुठेतरी आहे.
आणि ते नक्की काय आहे ते मला ठाऊक नाही- माझ्या मते -

१. मोदीशा आणि संघाच्या द्वेषात्मक राजकारणाला टक्कर द्यायला काहीतरी सकारात्मक बाब केंद्रस्थानी ठेवायला हवी - हे काँग्रेस सोडून आणखी कुणी करू शकत नाही (कितीही स्वप्न पाहिली तरी)
१.५. हे काँग्रेसनेच करायला पाहिजे असल्याने राहुल गांधींना पर्याय नाही. (पुन्हा, लोकांची कितीही इच्छा असली तरी. ते थरूर बघा.)
२. "राहुल गांधींना शिरेसली घ्यावं लागेल" हा संदेश द्यायचा ही यात्रा प्रयत्न करत असेल तर they at least have my attention.
५. एकदा "I am with Anna" प्रकार बघितल्याने ह्या यात्रेतली किती गर्दी समारंभोत्सुक आहे आणि किती खऱ्याखुऱ्या भारत जोडोशी सलंग्न आहे त्याबद्दल शंका.
४.मात्र ज्या लोकांना खरंच लोकशाही मूल्य, बंधुता, भारत-विविधतेतली-एकता ह्यांची पडली आहे ते ह्या यात्रेमुळे एकत्र झालेत, निदान त्यांना कळतंय तरी की अजूनही त्यांच्यासारखे लोक आहेत.

असो. At the end, It matters what I chose to believe. And I very well fucking choose to believe in the positive rather than all negative that's already sprawling around me like seaweed.

"I am with Anna" आंदोलन, 'आप' ने सुरुवातीला दाखवलेली आशा वगैरे गोष्टींचा पूर्वानुभव "भारत जोडो" विषयी फार स्वप्नाळू न राहाण्यासाठी पुरेसा ठरावा! पण खरोखरीच सिनिकल वगैरे म्हणवणारे लोकही रागांपाठी वाहावत जाताना दिसत आहेत. त्यामुळे रागांनी भ्रमनिरास करू नये अशी प्रामाणिक इच्छा आहे. रागांनी भगवी उपरणी, पगडी वगैरे घालून आरती केली, साष्टांग नमस्कार घातले की भक्तांना चेव येतो आहे आणि त्या व्हीडिओज मध्ये रागा अत्यंत bored and disinterested दिसत आहेत. समारंभोत्सुक गर्दीने यात्रेत दाखवलेला उत्साह मतदान करण्यासाठी  शाबूत ठेवावा अशी अपेक्षा आहे. काँग्रेस सोडून गेलेल्या युवा नेत्यांना 'स्वगृही' आणण्या करता सुद्धा प्रयत्न  व्हायला हवेत.  

त्या मध्ये गुजरात आघाडी वर आहे .
खोबरे तिकडे चांभ भले अशा वृत्ती चे ते राज्य आहे.

.
सत्ता जो मिळवेल त्यांनाच ह्यांचा पाठिंबा असतो.
तत्व,सत्व त्या राज्यातील लोकात नाहीत.
पण बाकी अनेक राज्य अशी नाहीत .
कष्ट सहन करायला भिनार नाहीत पण तत्व सोडणार नाहीत.
त्या मध्ये बंगाल,महाराष्ट्र,पंजाब आणि दक्षिण भारतातील राज्य आहेत

तत्व,सत्व त्या राज्यातील लोकात नाहीत.

येक लंबर इनोदी ल्हिवलंय!
आनिक यऊ द्या.

आपल्या न्यूज चॅनल पेक्षा कमीच कॉमेडी मत मांडले आहे मी

आपल्या न्यूज चॅनल पेक्षा कमीच कॉमेडी मत मांडले आहे मी

अधोरेखित भागासाठी एक पर्याय निवडा -

१. आपल्या == your
२. आपल्या == our

अर्थात, मला दोन्हीही लागू नाहीत हा भाग निराळा.

आपल्या न्यूज चॅनल पेक्षा कमीच कॉमेडी मत मांडले आहे मी

तेच तर म्हणतोय मी! (अधोरेखित भाग लक्षात घ्या.)

"सध्या कॉमेडी कमी आहे, अजून येऊ द्या" असं म्हणतोय मी.

We are on same page.

त्याच मीडिया चे दाखले bjp samarthak पुरावे म्हणून देतात.
जी मीडिया फक्त हास्यास्पद विचार पसरवीत असते किंवा दावे करत असते.
तो संदर्भ आहे माझ्या पोस्ट ल
तुम्ही येड घेवून पेडगाव ल जात आहात

https://epaper.loksatta.com/c/71117582
गुजरात मध्ये काँग्रेसची ३% मतं भाजपाला आणि १३% आप ला मिळाल्याची नोंद आहे. भजोया गुजरात मधून नेली असती तर काय झालं असतं, हा प्रश्न अनुत्तरित रहाणार. हिमाचलमध्ये दर पाच वर्षांनी विरोधीपक्ष सत्तेत येतो असे निरीक्षण आहे.

भाजोयाचा उद्देश सत्ता पुन्हा मिळवण्याचा आहे का? असेल तर ती जास्तीत जास्त भागातून गेली पाहिजे, तिच्यानिमित्ताने जास्तीत जास्त कार्यकर्त्यांचे मोबिलायझेशन झाले पाहिजे आणि निवडणुका जिंकायची महत्वाकांक्षा त्यांच्यात पेरली गेली पाहिजे. नुसतं निर्भीड बनो असं कार्यकर्त्यांना सांगून काय होणार? उदाहरण ठेवलं पाहिजे होतं गुजरातच्या लोकांपुढे की मी ह्या दोघांना घाबरत नाही.

सत्ता नको असेल आणि फक्त नफरत खतम करो या सुविचाराचा प्रचार करायचा असेल तर जे चालूय ते ठीक आहे.

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

.delete

1994 पर्यंत काँग्रेस च गुजरात मध्ये सत्तेवर होती.
Powerful नेते काँग्रेस चे होते
1994 लं नरेंद्र मोदी सत्तेवर आले.
1992 लं बाबरी मशीद पाडली गेली.
हा देश हिंदू बहुसंख्य आहे मतांचे विभाजन येथून च सुरू झाले .
गुजराती नी bjp ल मत देण्यास सुरू केले.
ह्या वर खूप खोलवर विचार विर्मर्ष केला तर गुजराती लोकांची मानसिकता समजून येईल

जिकडे खोबरे तिकडे चांभ भले.
हे माझे वाक्य सिद्ध होईल
महागाई आहे?
सरकारी कंपन्या विकत आहेत
सरकारी बँका हळू हळू मित्रांना देण्याचे चालू आहे
Ed,cbi, आणि बाकी सरकारी यंत्रणा फक्त bjp सोडून बाकी सर्व विरोधी पक्षातील नेत्यांवर कारवाई करत आहेत आणि केस निकाली पण निघत नाहीत.
नोट बंदी चे दुष्परिणाम आहेतच
शेती सुधारण कायदा फक्त मित्रांचे कल्याण करण्या साठी च होतं

सर्व न्यूज चॅनल वर दबाव आहे .भारतात पूर्ण मीडिया दहशती मध्ये आहे
न्याय व्यवस्था दहशती मध्ये आहे
खूप गंभीर स्थिती आहे
अशी स्थिती कधीच नव्हती.
इतके सर्व असून गुजरात मधील लोक bjp लं बहुमत देतात..
ह्याचे गुपित त्या लोकांच्या मानसिकता मध्ये आहे
ह्याचा अर्थ आहे संघर्ष न करता स्वतःचा फायदा कसा होईल हा विचार
हिमाचल ची ती वृत्ती नाही

हिमाचल मध्ये आलटून पालटून वेगळ्या पक्षाची सरकार येतात .

ह्या बकवास लॉजिक la काही अर्थ नाही .
खोलात जावून असे का होते ह्याचे विश्लेषण जरुरी आहे..
हिमाचलप्रदेशमधील जनता जागरूक आहे त्यांना देशाची काळजी आहे
. हाच त्याचा अर्थ आहे
हिमाचल मधील लोकांचे अभिनंदन करायचे सोडून फालतू लॉजिक मांडून त्यांचा अपमान करू नका.
पोट निवडणुका bjp हरली,हिमाचल हरली, दिल्ली हरली .
पंजाब हरली..कारण त्या लोकांना देश आणि देशाची लोकशाही ह्याची काळजी आहे .
महाराष्ट्र मध्ये पण तीच स्थिती असेल .
मराठी लोकांना पण देश आणि देशाची लोकशाही प्रिय आहे

कारण कट्टर उजवे,कट्टर डावे,कट्टर समाजवादी,कट्टर साम्य वादी,कट्टर भांडवल शाही ,कट्टर राष्ट्रवादी .
माझे विचार नसतात.
हे सर्व प्रकारचे कट्टर वादी हे देशासाठी आणि समजा साठी धोकादायक असतात.
1950 च पकडू काँग्रेस दीर्घ काळ सत्तेवर होती
पण ती मिश्र विचार श्रेणीची होती..कोणत्याच वादी विषयी कट्टर नव्हती.
त्या मुळे देश एकसंघ राहील आणि प्रगती पण झाली.
पण bjp कट्टर हिंदुत्व वादी,आणि कट्टर राष्ट्रवादी आहे .
हे विष आहे
ह्या विषाचे बळी देश आणि देशातील सामान्य जनताच असेल.
चतुर लोक हे विष प्राशन करून ऐश करतील.
कारण त्यांचा स्वार्थ साधने ह्या पेक्षा दुसरा कोणताच हेतू नसेल.
भीती ह्याचीच आहे.
पण लोक इतकी परिपक्व नाहीत

भाजोयामध्ये डॉ रघुराम राजन सामील झाले आणि भाजप्यांची तंतरली. लगेच ह्या विद्वानाचे कचकचून ट्रोलिंग सुरू झाले. या लोकांचा अँटी इंटेलेक्च्युलिझम सर्वांना माहित आहेच पण आता ज्या पातळीवर हे सुरूय त्यावरून आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संशोधकांना भारताच्या पॉलिसीमेकिंगमध्ये कसलाही सहभाग घ्यावासा वाटेल असे वाटत नाही.

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

हे प्रकरण खरंच भयानक तापदायक असणार आहे.
आपल्याविरूद्ध काहीही दिसलं की त्यावर ट्रोळधाड सोडायची हे हुकूमी अस्त्र सध्या तरी चालतंय.
पण लवकरच एक दिवस येईल की लोकांना खरं समजेल आणि ह्या पाळीव ट्याव्ट्याव करणाऱ्या आवाजांकडे लोक दुर्लक्ष करतील - NOT.

पण लवकरच एक दिवस येईल की लोकांना खरं समजेल आणि ह्या पाळीव ट्याव्ट्याव करणाऱ्या आवाजांकडे लोक दुर्लक्ष करतील - NOT.

बरोबर बोललात.

दुर्दैवी आहे, परंतु खरे आहे. (आणि, जागतिक पातळीवर खरे आहे.)

भाजपने सुरू केलेले ट्रॉलिंग हा भाग बाजूला ठेवून -

मला अर्थशास्त्र मध्ये फार काही गम्य नाही. पण रघुराम राजन हे खरोखरच अर्थशास्त्रात सक्षम आहेत का? म्हणजे माझ्या वाचनात बऱ्याचदा असं आलं आहे की त्यांचे मागच्या दहा-पंधरा वर्षांमधले सगळेच अंदाज चुकलेत. रिझर्व बँकेचे गव्हर्नर असताना त्यांनी घेतलेले सगळेच निर्णय बरोबर होते का? म्हणजे त्यांची अर्थशास्त्री म्हणून कीर्ती असेलही पण ते त्या कीर्तीस worth आहेत का?

नाण्याची दुसरी बाजू ही बघायला हवी, नाही का?

रघुराम राजन हे खरोखरच अर्थशास्त्रात सक्षम आहेत का हा विषय भाजपा ट्रोलिंग प्रमाणे बाजूला ठेऊया. पण भाजपा सरकारच्या ज्या 'नोटबंदी' या थोर निर्णयाला विरोध केल्यामुळे राजनना जावे लागले, त्याचे फायदे काय झाले ते जरा समजावून सांगा की. बाकी राजन नसले तरी निर्मलाताई, अनिल बोकील, शक्तिकांत दास वगैरे थोर अर्थतज्ञ सरकारकडे आहेतच! त्यांच्यामुळेच तर भारताच्या अर्थव्यवस्थेला आलेली इतकी भरभराट पहातो आहोत आज. बाकी भाजपा सरकारच्या पसंतीचे उर्जित पटेल सुद्धा स्वतःच्या मर्जीने 'खाजगी कारणांमुळे' पायउतार झाले हे तुम्हाला माहित असेलच.

Class Crass whataboutery

गेल्या आठ वर्षात खालील अर्थतज्ज्ञांनी भारतीय सरकारबरोबर करत असलेले काम सोडले आहे:
१. रघुराम राजन
२. अरविंद पानगरिया
३. अरविंद सुब्रमण्यम
४. उर्जीत पटेल्
५. विरल आचार्य
६. सुरजीत भल्ला
७. रथीन रॉय

जगातले सगळे एकाच माणसाला कळते तो म्हणेल ती पुर्व दिशा असते मग विषय डिफेन्सचा असो कि अर्थव्यवस्थेचा किंवा मग आरोग्य- शिक्षण असा कुठलाही. तज्ज्ञांचे मत ऐकूण घेणे किंवा त्यांच्या चिकित्सक विचारांना मुभा देणे हे या सरकारला अपमानजनक वाटते असे दिसते.

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

रघुराम राजन हे जागतीक अर्थशास्त्रातले अतिशय महत्वाचे नाव आहे. फिस्कल, मॉनेटरी पॉलिसी आणि एकूणच मॅक्रोइकॉनॉमिक्सच्या जागतीक किर्तीच्या अभ्यासकात ते गणले जातात. २००८ च्या मंदीचे त्यांनी केलेले विश्लेषण आणि सबप्राइम क्रायसीसचे सुतोवाच यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले असले तरीही त्यांचे सैद्धांतिक काम अनेक पातळ्यांवर त्याआधीही सुरू होते. शिकागो बूथ स्कूलचे ते प्राध्यापक आहेत आणि अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्कारासाठी त्यांचे नाव गेले काही वर्षे सतत चर्चेत असते.
मात्र माझ्या मते भारतीय अर्थव्यवस्थेतले त्यांचे योगदान भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून आणि रिझर्व बँकेचे गव्हर्नर म्हणून अत्त्युच्च कोटीतले आहे.
कृपया खालील व्हिडिओ नक्की बघा. इतकी क्लॅरिटी असणारा आणि भारताविषयी प्रेम असणारा विद्वान मनुष्य इतकी निंदा वाट्याला यावी हे डिझर्व करतो का?

https://youtu.be/bKGBfsdCNsE

विद्वानाची सर्वत्र कदर असते फक्त आपल्या देशातच गेल्या काही वर्षांत अशा लोकांवर शिंतोडे उडवण्याचा घाऊक कार्यक्रम सुरू झाला आहे जो अश्लाघ्य आहे असे माझे मत.
राहता राहिला प्रेडिक्शन्स बरोबर येण्याचा प्रश्न: माझ्या माहितीनुसार नोटबंदीचे त्यांचे विश्लेषण संपूर्ण बरोबर ठरले. इंडस्ट्रियल लायसन्सेस आणि बँकरप्सी कोडबद्दलचे त्यांचे विवेचनदेखिल महत्वाचे ठरले. गव्हर्नर असतानाच्या त्यांच्या भाषणांचा संग्रह I do what I do या पुस्तकात आहे जे मी वाचले आहे आणि त्यातले विचार भारतीय अर्थव्यवस्थेला दिशादर्शक ठरण्यासारखे आहेत असे मला वाटते. त्यांच्या किर्तीस ते खरंच वर्थ आहेत का हे जाणून घेण्यासाठी या पुस्तकापासून सुरूवात करता येईल.
भाजोयामध्ये त्यांचा सगभाग हे त्यांचे राजकिय भुमिका घेणे आहे आणि त्याबद्दल कोणालाही आक्षेप नसावा. आपल्या देशात चक्क न्यायाधिश मंडळी पदावरून पायौतार होताच खासदार, राज्यपाल वगैरे बनतात. इथे डॉ राजन गेले काही वर्षे कुठल्याही पदावर नसताना केवळ राहूलशी बोलतात, यात्रेत चालतात म्हणून त्यांची सगळी क्रेडिबिलिटी नष्ट करणे, ट्रोलधाड सोडून त्यांची बदनामी करणे हा अँटी इंटेलेक्च्युअलिझम नाही तर काय आहे?

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

मला अर्थशास्त्र मध्ये फार काही गम्य नाही. पण रघुराम राजन हे खरोखरच अर्थशास्त्रात सक्षम आहेत का?

भगव्यांचं काय किंवा कोणत्याही रंगाचं असेना, ट्रोलिंग ह्याही प्रकारचं असतं. आपल्याला काही समजत नाही; मग हवेत हात-तलवारी वगैरे फिरवायच्या; तपशील काही लिहायचे नाहीत, फक्त चूक-चूक म्हणायचं. आणि मग आणखी गलिच्छ भाषेत लिहिणारे पेटतात.

खरंच काही म्हणायचं असेल तर ते म्हणा की! "मागच्या दहा-पंधरा वर्षांमधले सगळेच अंदाज चुकलेत", याचे किमान काही तपशील लिहा!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सध्या रागा उत्तर भारतातल्या भर थंडीत साधा T shirt घालून चालत आहेत म्हणून ते ड्रग्स किंवा दारू पिऊन चालत असणार असा भक्त लोकांचा दावा आहे!

बोले तो, ते ड्रग्ज़ किंवा दारू पिऊन चालत असणार, असा दावा करण्यासाठी भक्तगणांना ते टीशर्ट घालून उत्तर भारतातल्या थंडीत चालत आहेत या (लंगड्या) सबबीची गरज पडली.

डुप्रकाटाआ

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

भारत जोडो यात्रेचे दूरागामि परिणाम निश्चित दिसून येतील असे वाटते.
इ.स. २४ पर्यंत असेच काही उपक्रम चालू राहिले तर नक्कीच त्यांना फायदा होऊ शकेल.

*********

उतनाही उपकार समझ कोई जितना साथ निभाए |
जनम मरन का मेल है सपना, ये सपना बिसरा दे |
कोई ना संग मरे ...

हे सरकार धार्मिक उन्मेदा चा पायावर उभे आहे.
त्याचा विरोध करायचं असेल तर कोणताही धार्मिक किंवा जातीय विवाद निर्माण होवू नये ह्याची काळजी घ्यावी लागेल .
विरोध फक्त,महागाई,लोकशाही ,संसदीय संस्था चे अस्तित्व धोक्यात आहे, अशाच विषयावर आधारित असला पाहिजे.
नाही तर सर्व मुसळ केरात जाईल.

सत्ताधारी तशा संध्या शोधत च राहणार.

जातीनिहाय मतांचं विश्लेषण आणि यात्रेची परिणामकारकता याविषयी लिहिलं आहे.
https://epaper.loksatta.com/c/71369909