Skip to main content

मेथांबा

"डाॅन एल पावो रेआलसाठी काम करणार का?"

"मी? काहीतरी काय? मी साधा माणूस आहे हो. डाॅन लोकांशी माझा काय संबंध?"

"मी काय एल पासोवरून आलेला वाटलो काय? तुमच्या बॅगेतली बरणी बघितलीय मी!"

"मग? घरून येताना खाऊ आणलाय फक्त!"

"ती हिरव्या झाकणाची बरणी पाहिली मी. आणि मेथांबा असा स्टिकरसुद्धा!"

"अहो मेथीचे दाणे आणि कैरी यांचं लोणचं असतं ते. त्यात डाॅन एल पावो रेआलला काय स्वारस्य असणार?"

"खामोष! माझे आजोबा नूमवित होते. संधी-समास मीसुद्धा कोळून प्यायलोय."

"अहो काय बोलताय तुम्ही?"

"मेथी अधिक आंबा यांचा संधी मेथ्यांबा होईल."

"क्काय?"

"होच मुळी! आणि मेथांबा म्हणजे मेथ अधिक आंबा. मेथाम्फेटमिनची तस्करी करायचा उत्तम मार्ग शोधलात तुम्ही!"

"क्काय?"

"उगाच श्रेयाव्हेर करू नका. चला आता, डाॅन एल पावो रेआल वाट पाहताहेत तुमची!"

Node read time
1 minute

ललित लेखनाचा प्रकार

1 minute

'न'वी बाजू Sun, 10/12/2023 - 18:04

.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 12/12/2023 - 08:11

ममव इज ब्रेकिंग बॅड.

गवि Tue, 12/12/2023 - 10:13

हे राम.

हॅशटॅग वापरणे, खसखस पिकणे, गर्द वनराईत रमणे, विडा खाणे, अफवा पसरवणे याही गोष्टी अवघड झाल्या की ...

'न'वी बाजू Tue, 12/12/2023 - 17:12

In reply to by गवि

...दिली असती, परंतु, देता येत नाही, म्हणून देऊ शकत नाही.

(तरी बरे, हल्ली कोणी गांजलेल्यांची सेवा करीत नाही ते. भांग पाडणे मात्र अडचणीचे ठरू शकेल.)

चिमणराव Tue, 12/12/2023 - 14:32

तर अशा प्रकारचे दोन विनोदी किस्से (स्किट चे मराठी?) महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये दाखवतात ते आठवले.

तुमच्या आयुष्यात असे काही सणसणीत प्रसंग येवोत. मेथांबा वुइक पॉइंट दिसतोय. असो. पावलोरेआलकडून कामगिरी पार पाडून औंधात (किंवा कोरेगाव पार्क जे काही हाईटेक) बंगल्यात राहायला याल तेव्हाचे किस्से लवकरच टाका.

(शीर्षक वाचून वाटलं होतं की रेसिपी लिहिण्याचा प्रयत्न असावा. पण त्या लेखिका सइट झाल्यात.)

'न'वी बाजू Fri, 10/01/2025 - 02:15

(धागा वर आणण्याकरिता तथा जुने प्रतिसाद दृश्य करण्याकरिता.)