Skip to main content

अहमदनगर ते अहिल्यानगर : नामांतर आणि ऐतिहासिक कोलांटीउड्या

अहमदनगर ते अहिल्यानगर : नामांतर आणि ऐतिहासिक कोलांटीउड्या

पुष्कर सोहोनी (अनुवाद — चैत्रा रेडकर)

या वर्षीच्या सुरुवातीलाच औरंगाबादचे नाव औपचारिकरीत्या छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. असे निर्णय घेण्याचा अधिकार शासनाला लोकशाहीच्या कक्षेत असतो असे मत सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात व्यक्त केले आहे. यापूर्वी प्रांतिक भाषेला अनुरूप ठरावे यासाठी (कलकत्त्याचे कोलकाता) किंवा वासाहतिक दर्प घालविण्यासाठी (त्रिवेंद्रमचे तिरुअनंतपुरम) गावांच्या नावात बदल करण्यात आला आहे. औरंगाबादच्या संदर्भात बोलायचे झाले तर ज्या मुघल बादशहाच्या नावे या गावाचे नाव ठेवण्यात आले होते, त्या औरंगजेबाची राजकीयदृष्ट्या चलती नाही. जनमानसात त्याची प्रतिमा खलनायकी असली तरी या शहराशी त्याचे नाते प्रदीर्घ होते. तो आधी इथला सुभेदार (१६३६-४४) आणि नंतर बादशाह (१६५२-५८) होता. या ठिकाणाचा शहरी बाज मुघलांच्या काळात सतराव्या आणि अठराव्या शतकात घडला गेला यात तिळमात्र शंका नाही. या शहराचे मूळ नाव खडकी बदलून औरंगाबाद मुघलांनी केले. खडकी १६१०मध्ये मलिक अंबरने वसवले होते. त्याने वसवलेले गाव म्हणजे दौलताबादच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या कटकीचे नवे रूप होते. दौलताबादही यादवांचा बालेकिल्ला असलेल्या देवगिरीचे नवे नाव होते. अर्थात या सर्व नामांतरामागे अशी काही ना काही ऐतिहासिक घटना किंवा घडामोड होती ज्यामुळे हे नामांतर काही अंशी तरी समर्थनीय वाटत गेले. तोच धागा पुढे ठेवत औरंगाबादचे नाव मलिकनगर करता आले असते.

मलिक अंबर (१५४८-१६२६) महाराष्ट्रात नावारूपाला आलेली असामी आहे. मूळ आफ्रिकी वंशाचा असलेला हा सेनापती अहमदनगरमध्ये आला. इथे सोळाव्या शतकात माजलेल्या यादवीतून त्याने स्वतःला मराठा-हबशी युतीचा नेता म्हणून प्रस्थापित केले. शहाजीराजे भोसले (१५९४-१६६४) यांच्या बाजूला होते. मराठ्यांच्या युद्धनीतीतील बारगीर-गिरी किंवा गनिमी कावा विकसित करण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. मराठ्यांचे स्वराज्य उभे राहण्याची पार्श्वभूमी म्हणून त्याचे कार्य महत्त्वाचे आहे. हे सर्व त्याने अहमदनगर राज्याचा अनभिषिक्त राजा म्हणून केले. नंतर १६३६पर्यंत शहाजीराजे भोसले यांनीही अहमदनगरचा बचाव करण्याचा आणि शहराला पुनर्जीवित करण्याचा जीवापाड प्रयत्न केला. त्यामुळे मराठा कालखंडाच्या सुरुवातीच्या काळात अहमदनगर नावारूपाला आले.

अहमदनगरचे अहिल्यानगर करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. अहमदनगर सीना नदीच्या काठी अहमद निजाम शाह (मृत्यू १५०९) याने वसवले. ज्या शिवनेरी गडावर पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्याच ठिकाणी काही दशके आधी अहमद निजाम शाह याने भूमिपुत्र म्हणून बहामनी साम्राज्यापासून स्वतंत्र होत असल्याची घोषणा केली होती. निजाम शाहचे कुटुंब हे पाथरीचे कुलकर्णी होते. बहामनी दरबारातील झगड्यात निजाम शाहच्या वडिलांचा खून झाला होता. पाथरी गावात त्यांचे अनेक नातेवाईक होते. हे गावात ताब्यात घेण्यात निजाम शाहांचे बरेच झगडे झाले होते.


Tomb of Ahmad Nizam Shah c. 1509
अहमद निजाम शाहची कबर, सुमारे १५०९

अहमद निजामशाह आपल्या राजनाधानीतून — शिवनेरीवरून दरवर्षी दौलताबाद ताब्यात घेण्यासाठी व्यूह रचत असे. शेवटी १४९९ मध्ये त्याने दौलताबाद ताब्यात घेतले. त्यापूर्वी १४९४ मध्ये शिवनेरी आणि दौलताबाद यांच्या मधोमध त्याने अहमदनगर वसवले. दख्खनच्या सल्तनतीकडे पाण्याच्या व्यवस्थापनाचे विकसित तंत्र होते त्यामुळे एवढ्या मोठ्या आकाराचे शहर ते वसवू शकले. पूर्वाश्रमीच्या औरंगाबादसह इतर काही मोठी शहरे तग धरून राहिली यामागे त्यांनी पश्चिम आशियातून आणलेल्या कनाती, कालवे, पाणी उपसा करणारी उदंचनाची तंत्रे आणि पाणी व्यवस्थापनाचे कौशल्य होते. पश्चिम आशिया, आफ्रिका आणि दख्खन यांच्यात विचार, माणसे आणि वस्तू यांच्यात पंधराव्या आणि सोळाव्या शतकात झालेल्या आदानप्रदानातून निर्माण झालेली विलक्षण अशी संमिश्र संस्कृती आणि बहुसांस्कृतिक दृष्टिकोनही संकुचित दृष्टिकोनाच्या बरोबरीने इथे वास करत होता. भानुदत्तकृत ‘रसमंजिरी’ आणि साबाजी प्रतापराजाकृत ‘परशुरामप्रताप’ या संस्कृत ग्रंथांच्या बरोबर ‘तारीफ़-ए-हुसेन शाह’ या पर्शियन भाषेतील ग्रंथाची निर्मिती निजामाच्या दरबारात झाली. यात शाह शरीफ़ हे नाव विशेष महत्त्वाचेच आहे. मालोजी भोसले यांनी शाह शरीफ़च्या सुफ़ी दर्ग्यावर मुले व्हावीत म्हणून नवस केला होता व त्याचमुळे पुढे आपल्या मुलांची नावे त्यांनी शहाजी आणि शरीफ़जी ठेवली.


Farah Bakhsh Bagh c. 1584
फराह बाग, सुमारे १५८४

निजामशाही ही दख्खनमध्ये घुसखोरी करण्याच्या अकबरापासून (१५७०च्या सुमारास) ते शहाजहानपर्यंत (१६३६च्या आसपास) मुघलांच्या प्रयत्नांना जवळपास ६० वर्षे जोरदार विरोध करणारी राजवट होती हे या संदर्भात लक्षात ठेवणे आवश्यक ठरते. या राजवटीत खुन्जदा हुमायून आणि चाँदबीबी या दोन शूरवीर स्त्रियाही होत्या. स्थानिक लोकगीतात त्यांची नावे आजही ऐकायला मिळतात. भोसले, जाधवराव, खंडागळे अशी काही प्रमुख घराणी अहमदनगर राजवटीतले सरदार होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन्ही बाजूचे आजोबा या राजवटीच्या सेवेत होते. १६००पर्यंत अहमदनगर ही निजामांची राजधानी होती. सोळाव्या शतकात शहरात मोठमोठ्या इमारतींचे बांधकाम झाले. कला आणि साहित्याचा विकास आणि प्रसार झाला. संस्कृत, पर्शियन आणि दखनीमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्यनिर्मिती झाली. याच कालखंडात शाह शरीफ़ आणि एकनाथ यांच्यासारखे सुफी आणि भक्ती परंपरेतील संतही होऊन गेले. निजाम शाह आणि मराठ्यांनी मुघलांचा कडवा विरोध केला. मुघलांनी निजामांचा १६३६च्या आसपास बिमोड केला आणि दख्खनमध्ये आपले पाय भक्कमपणे रोवले. निजामशाहीच्या निखाऱ्यातून मराठ्यांचे साम्राज्य उभे राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांवर एवढा प्रखर प्रहार केला की शिवाजी महाराजांचा १६८०मध्ये मृत्यू होईपर्यंत मुघल आदिल शाह किंवा कुतुब शाह यांच्याबरोबर युती करण्याचे धारिष्ट्यदेखील करू शकले नाहीत. छोट्यामोठ्या मराठा सरदारांची घराणीही स्वराज्याच्या कार्यात सामील झाली. निजामांचा घुसखोर मुघलांना होत असलेला विरोध आणि पुढे निजामशाहीचा मुघलांनी केलेला पाडाव यातून मराठ्यांनी एकत्र येण्याची पार्श्वभूमी तयार केली. निजामशाहीचे शेवटचे शिलेदार सिद्दीचे मलिक अंबर आणि मराठ्यांचे शहाजीराजे भोसले हे सत्तेच्या जवळ असलेल्या पण तरीही उपेक्षा झालेल्या दोन समाजांतून आले होते. अहमदनगर हे ऐतिहासिक शहर एक बहुसांस्कृतिक, बहुभाषिक, बहुवांशिक ठिकाण आहे व तो वारसा आजही कायम आहे. विविध समुदायांचे एकमेकांत मिसळलेले सहअस्तित्व आहे. अनेक पातळ्यांवर एकमेकांशी जुळलेले धागे आहेत. छोट्या छोट्या कसब्यांमध्ये आजही दखनी बोलली जाते. आध्यात्मिक क्षेत्रात उपासनेच्या परंपरांमध्ये मोठी गुंतागुंत आहे. गुरुपरंपरा आणि गुरूच्या आदेशानुसार चालणाऱ्या परंपरांमध्ये औपचारिक धार्मिक ओळखीला फारसा अर्थ नसतो.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील संत शेख मुहंमद यांचा उल्लेख ‘भक्तिविजय’मध्ये आढळतो. संत शेख मुहंमद आणि संत तुकाराम यांच्या विचारांत मोठे साम्य आहे. पुढील काळात मेहेरबाबांनी आपल्या आश्रमाची स्थापना करण्यासाठी अहमदनगरची निवड करणे हा निव्वळ योगायोग नाही. अहमदनगर शहराच्या भोवती असलेल्या आर्मी कॅम्पसमुळेही शहराचा बहुसांस्कृतिक बाज टिकून राहण्यास मदत झाली. सैनिकी तळांना रसद पुरवण्यासाठी वेगवेगळे व्यापारी समुदाय नगराला येत गेले. पहिल्या महायुद्धानंतर जर्मन युद्धबंद्यांचा तळ नगराच्या कॅन्टोन्मेंटजवळ उभारण्यात आला होता. प्रसिद्ध ब्रिटिश विनोदवीर स्पाईक मिलिगन याचा जन्म अहमदनगरचा आहे. ‘भारत छोडो’ आंदोलनादरम्यान अनेक राजकीय कैद्यांची रवानगी अहमदनगर तुरुंगात करण्यात आली होती. याच अहमदनगरच्या तुरुंगात भारताच्या बहुसांस्कृतिक आणि वैविध्यपूर्ण समाजाविषयी पंडित नेहरुंनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ लिहिणे त्या अर्थी फारच सयुक्तिक आहे.

अहमदनगर शहराबाहेर तीन तोफांचे स्मारक आहे. इथे १८०३साली अहमदनगर किल्ला जिंकल्यावर लॉर्ड वेल्सलीने ब्रेकफास्ट केला होता असे तिथे लावलेला फलक सांगतो. गेल्या वेळी आम्ही तिथे गेलो होतो तेव्हा स्कूटरवरून दोन बायका तिथे आल्या आणि त्या तोफांची पूजा करायला लागल्या. त्यातील एक तोफ ही भारतात स्थायिक झालेल्या पर्शियन प्रभावाखाली असलेल्या दखनी बोलणाऱ्या एका तुर्की सैनिकाने घडवली होती. तिला ब्रिटिशांनी मराठ्यांकडून ताब्यात घेतली होती आणि त्या क्षणी ती तोफ एक हिंदू देवता बनली होती. एका अर्थी तो क्षण अहमदनगरच्या बहुसांस्कृतिक इतिहासावर वेगळीच पुटे चढविण्यासाठी चाललेल्या चढाओढीचे प्रतीक होता. या अहमदनगराचा इतिहास इतका बहुल आहे की कोणताही एक ठरावीक प्रवाह त्याचा वारसा प्रकट करू शकत नाही.


Damdi Masjid c. 1562
दामडी मशीद, सुमारे १५६२

मराठ्यांचे स्वराज्य उभारण्यास पूरक ठरलेल्या अहमद निजाम शाह, निजामशाही आणि मलिक अंबर यांचे महत्त्व लक्षात घेता शहराचे नाव चुटकीसरशी बदलले जाणे हे अतिशय खेदकारक आहे. अहमदनगरच्या इतिहासाचे धागे ज्या प्रकारे स्वराज्याच्या उभारणीशी जोडले गेले आहेत त्याची या नामांतराने अजिबातच दखल घेतल्याचे दिसत नाही. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म अहमदनगर जिल्यातील चोंडी येथे झाला होता हे खरे आहे; मात्र त्याने त्या ठिकाणाचे ऐतिहासिक महत्त्वच वाढते. मनमानीने शहरांची नावे बदलण्यातून एखादे ऐतिहासिक स्मारक उद्ध्वस्त करावे तसे आपणच आपला इतिहास पुसून टाकत असतो. नामांतर हा महागडा उपक्रम आहे. प्रत्येक गोष्टीचे नव्याने नामकरण करण्यात कोट्यवधी रुपये खर्च होतात. संकुचित राजकारणातून वडिलोपार्जित मालमत्तेबरोबर येणारा शाश्वततेचा वारसा नष्ट होतो. शहरे आणि तिथल्या माणसांसाठी करदात्यांच्या पैशाचा सदुपयोग करण्याचे याहून अधिक श्रेयस्कर मार्ग असू शकतात.
———
(पुष्कर सोहोनी व चैत्रा रेडकर आयसर, पुणे येथे सामाजिक शास्त्रे व मानव्यविद्या विभागात सहयोगी प्राध्यापक आहेत.)
मूळ इंग्रजी लेख, हिंदुस्तान टाइम्स, ४ जून २०२३. वरील लेख त्याच्या विस्तारित आवृत्तीचा अनुवाद आहे.

स्वयंभू Mon, 05/06/2023 - 11:26

पण एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेला येणं गरजेचं आहे तो म्हणजे सध्याच्या काळात नामकरण सोहळे साजरे करून नेमकं साध्य करायचे आहे?

जर इतिहासातले दाखले देऊन जर नावं बदलण्याचं समर्थन केले जात असेल तेच तर्ककुतर्क देत जो सत्ताधारी येईल तो तेच करत बसेल. ज्याची सत्ता तो म्हणे माझीच महत्ता. असेच किती काळ चालू राहणार.

एकीकडे नावे बदलण्याचे समर्थन करणारे दुसरीकडे नावे बदलली की विरोध करतात. असा वैचारिक पचका झालेला काळ आहे सध्याचा.

एकाच्या मनातील महापुरुष दुसऱ्यांच्या मनातील खलपुरूष असतो. त्यानंतर गतकाळातील शिरसावंद्य असणाऱ्या विभूतींच्या जातीपातीशी निगडीत सध्याच्या परिस्थितीत मजबूत व्यवस्था उभी राहिली आहे. सर्वसामावेशक हिंदुत्वाच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांना तेच हवं आहे.

उबग आला आहे नावबदल संस्कृतीचा.

अमुक-ढमुक Thu, 10/08/2023 - 04:59

In reply to by स्वयंभू

आपलं म्हणणं पटत. एक सोपा तोडगा, नाव बदलायचंय, त्या स्थानिक लोकांना ठरवू द्या बाकीच्यांना नको. पण, आज अशी अवस्था दिसते, की आपण स्थानिक लोक स्थानिक गोष्टींचेच हक्क गमावून बसलोय. सर्व हक्क प्रकाशकाकडे, तसं आमचे सर्व हक्क फकस्त मतदानापुरतेच शिल्लक आहेत, नंतरचे सगळे निर्णय केंद्र व राज्य सरकारं ठरवतात. ते नाही तर न्यायालयं आहेतच 

Rajesh188 Mon, 05/06/2023 - 20:33

हिंदू राष्ट्र प्रेमी मोदी चे नाव देवु या का अहमदनगर ल.
इतिहास बघू च नका भारताचा.
गुलामी, हार गिरी, गद्दार पना असा भारताचा इतिहास आहे.
त्या मुळे जे आहे ते आहे.
तिकडे लक्ष देवू नका.
नाव बदलून काही बदलणार नाही.
देशाची आर्थिक,सामाजिक,न्यायिक स्थिती बदला.
औरंगजेब rd चे नाव बदलून औरंगजेब च इतिहास बदलत नाही

Rajesh188 Mon, 05/06/2023 - 20:33

हिंदू राष्ट्र प्रेमी मोदी चे नाव देवु या का अहमदनगर ल.
इतिहास बघू च नका भारताचा.
गुलामी, हार गिरी, गद्दार पना असा भारताचा इतिहास आहे.
त्या मुळे जे आहे ते आहे.
तिकडे लक्ष देवू नका.
नाव बदलून काही बदलणार नाही.
देशाची आर्थिक,सामाजिक,न्यायिक स्थिती बदला.
औरंगजेब rd चे नाव बदलून औरंगजेब च इतिहास बदलत नाही

स्वयंभू Tue, 06/06/2023 - 09:34

In reply to by Rajesh188

त्यांना आणि त्यांच्या भक्तांना भव्यदिव्य मोदीदेश हवा वेगळा. जेथे भक्त, अंधभक्त आणि उजवीकडचे तटस्थ फक कायमस्वरूपी नागरिक असतील. बाकीचे सगळे दुय्यम नागरिक जर राहणार असतील तर. मोदीदेश चालवण्यासाठी मोदीविधान लिहिणे आहे. मग मोदीध्वज, मोदीसेना आणि मोदीगीत ओघाने होणारच.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 05/06/2023 - 23:28

समयोचित लेख. लेखाबद्दल आणि भाषांतराबद्दल आभार.

नगरीनिरंजन Sat, 10/06/2023 - 23:03

हे कोणीतरी लिहावे असे वाटतच होते, ते उत्तमरित्या लिहिल्याबद्दल धन्यवाद!
मी नगरचा असल्याने या सगळ्या जागा लहानपणापासून पाहात आलो आहे आणि मलिक अंबर, निजामशहा, चांदबीबी वगैरेंच्या गोष्टी नगरमध्ये तेव्हातरी पोरासोरांनाही माहित असायच्या. नगरचा निजामशहा आधी ब्राह्मण होता हेही सर्वश्रुतच होते. नगरमध्ये तसे अहिल्याबाई होळकरांचे नाव मात्र फार नव्हते.
पण आता गाढवांच्या हाती सत्ता असण्याचा काळ असल्याने हे असे चालायचेच.
बाकी अहमद असो की अहिल्या आम्ही त्याला नगरच म्हणणार फक्त.

'न'वी बाजू Sat, 08/07/2023 - 04:09

In reply to by नगरीनिरंजन

बाकी अहमद असो की अहिल्या आम्ही त्याला नगरच म्हणणार फक्त.

यावरून एक सनातन शंका: (अहमद)नगरवासी काय, किंवा उर्वरित महाराष्ट्रवासी काय, किंवा अखिलजागतिक मराठीभाषक काय, अहमदनगरला जे पूर्ण नावानिशी न उल्लेखिता केवळ 'नगर' म्हणून उल्लेखितात (आणि म्हणूनच तद्ग्रामजन्य उपनामसुद्धा 'अहमदनगरकर' न होता फक्त 'नगरकर' असे होते — वास्तविक, 'गजेंद्रगडकर', 'अमरापूरकर', 'अक्कलकोटकर' यांसारखी लांबलचक आडनावे मराठीभाषकांकरिता असामान्य नाहीत; त्यामुळे, शब्दलाघव हे कारण खासे नसावे.), त्यामागे काही (ऐतिहासिक, सामाजिक, वा अन्य) कारणमीमांसा आहे काय?

आम्ही त्याला नगरच म्हणणार फक्त.

उपसर्ग काहीही असो, परंतु मुळात त्याला 'नगर' असेच म्हणण्याचा जर प्रघात असेल, तर मग केवळ उपसर्ग बदल्ल्यामुळे तो प्रघात बदलून लोक तो (नवीन) उपसर्ग उच्चारू लागण्याचे काहीच कारण दृग्गोचर होत नाही. त्यामुळे, तुमचे हे म्हणणे बरोबर वाटते.

सई केसकर Sat, 17/06/2023 - 15:15

In reply to by वामन देशमुख

>>प्रतिसादातील घटना आणि पात्रे काल्पनिक आहेत. जिवंत वा मृत व्यक्तींशी साधर्म्य योगायोग समजावा.

पात्रे काल्पनिक असली तरी प्रतिसाद लिहिणारा १००% विकृत आहे.

'न'वी बाजू Sat, 17/06/2023 - 16:56

In reply to by सई केसकर

पात्रे काल्पनिक असली तरी प्रतिसाद लिहिणारा १००% विकृत आहे.

ते तर आहेच. परंतु, It’s not his fault; it’s his (political) tribe.

तसेही, ‘ऐसीअक्षरे’चे नाव (बलात्काराने) बदलून (अद्याप) ‘वामनदेशमुख(अ)विचारमंच’ करण्यात आलेले नाही ना? तोवर ठीक आहे. जेव्हा ते घडेल, तेव्हा (‘ऐसी’चे) पुनर्नामांतर ('न'वीबाजूटाइमपासअड्डा असे) करून ‘पुनर्वसन’ करायचे, किंवा कसे, ते ठरविता येईल.

तोवर (उभयपक्षी – नव्हे, सर्वपक्षी) चालू द्या.

'न'वी बाजू Sun, 18/06/2023 - 03:59

In reply to by सई केसकर

तुम्हाला हे जर विकृत वाटत असेल (नाही म्हणजे, विकृत आहेच. वाद नाही.), तर जरा ही कादंबरीदेखील वाचून पाहा. केवळ वानगीदाखल वाचून पाहा. पेशन्स खाणारी कादंबरी आहे, परंतु तरीही, अथपासून इतिपर्यंत वाचाच. म्हणजे, या सर्व विकृत अविचारसरणीची/कल्पनाशक्तीची गंगोत्री कोठून आहे, किती जुनी आहे, याची कल्पना येईल.

प्रस्तुत विकृत विचारसरणीचा/कल्पनाविलासाचा, प्रस्तुत कादंबरीलेखक हा बहुधा प्रपितामह मानता यावा. (चूभूद्याघ्या. परंतु, विशिष्ट गोटांत प्रस्तुत कादंबरीलेखकास प्रचंड मान आहे.)

‘वानगीदाखल’ अशासाठी म्हटले, की प्रस्तुत लेखकाने लिहिलेल्या इतरही कथा पूर्वी वाचनात आल्या होत्या. (जालावर सापडत नाहीत.) काही समान सूत्रे आढळली.

१. कथेतील हिंदू स्त्री पात्र ही हिंदू अबला नारी असलीच पाहिजे. (किंबहुना, हिंदू नारी ही अबलाच असली पाहिजे.)
२. मग तिच्यावर कोणा धूर्त मुसलमानाकडून येनकेनप्रकारेण अत्याचार (तोही शक्यतो फसवणुकीने) झालाच पाहिजे. (मग तो हिंदू साधूचे ढोंग करणाऱ्या मुसलमानाकडून असू शकतो. किंवा, (मी वाचलेल्या त्या दुसऱ्या (छापील) कथेतल्याप्रमाणे,) क्वेट्ट्याच्या भूकंपानंतर (१९३५ व्हिंटाज) रेल्वेने पांगापांग होत असतानाच्या धामधुमीत, क्वेट्ट्यात नोकरीनिमित्त राहात असलेला मराठी हिंदू मुलगा आणि त्याच्याबरोबर राहात असणारी त्याची वृद्ध विधवा आई (अर्थात, टिपिकल हिंदू अबला नारी) हे रेल्वेने महाराष्ट्रात परत जायला चाललेले असताना, मध्येच त्यांची चुकामूक होते; बऱ्याच वेळानंतर (बहुधा पार कराचीपर्यंत वगैरे गाडी पोहोचल्यानंतर; चूभूद्याघ्या, तपशील आता आठवत नाहीत; कॉलेजात असताना गोष्ट वाचली होती.) प्लॅटफॉर्मवरच्या गर्दीत एक मुसलमान एका बुरखाधारी स्त्रीबरोबर त्या मुलास दिसतो, त्या मुसलमानास मुलाने हटकले असता, ‘मेरी बीवी है’ म्हणून खुशाल सांगून तो मुसलमान मोकळा होतो; मुलगा ‘हरामखोरा, माझी आई आहे ती!’ म्हणून बुरखा काढतो, तर ती खरोखरच त्याची आई असते, नि हिंदू अबलांना पळवून सीमेपलिकडे जाऊन विकणाऱ्या मुसलमानांच्या टोळीपैकी एकाच्या तावडीत ती नेमकी सापडलेली असते, नि तीदेखील, हा मला वाचवायला आलेला ‘माझा प्यारा पुत्त्त्त्त्त्त्र!!!!!!’ आहे, असा दुजोरा देते, नि मग (प्लॅटफॉर्मवर) प्रचंड इमोशनल सीन!, वगैरे वगैरे. सब बच्चे लोग, एक हाथ से ताली बजाव! जो नहीं बजायेगा उसकी माँ मर जायेगी!)
३. मग आपल्या हीरोने जमल्यास योग्य वेळेस शक्यतो हस्तक्षेप करता आला, तर उत्तम.
४. नाटकी भाषा! केवळ प्रस्तुत कादंबरीच्या लेखकालाच जमू शकते, अशी प्रचंड नाटकी भाषा!!! (परंतु, एका विशिष्ट गोटातील वाचकांस ती प्रचंड भावते!)

काय कल्पनाशक्ती! वाहवा! What an imagination!!!

(च्यामारी, ‘ऐसी’ने एवढा ‘पॉर्न विशेषांक’ काढला, त्यात खरे तर प्रस्तुत कादंबरीलेखकाचा आख्खा सेक्शन – चुकलो, ‘विभाग’! – टाकता आला असता. परंतु ‘ऐसी’ने साधी त्यांची दखलनोंदही घेतली नाही! त्यांना अनुल्लेखाने मारले! किती हिंदुत्वद्वेष म्हणायचा हा! हा हन्त! हाय हा!!!)

असो चालायचेच.

अमुक-ढमुक Thu, 10/08/2023 - 04:36

In reply to by 'न'वी बाजू

आपल्या प्रतिसादाशी सहमत, आणि सुराशी (tone) नाही. पण सुर जुळले पहिजेत अस थोडच आहे! मुख्यत: शेवट कन्सातील ध्वनित केलेल्या गोष्टी ह्या प्रासन्गिक आहेत, त्या मनोरन्जनासाठी नाहीत, 'ऐसी' ला ही जाणिव असेलच. तात्यांनी पुष्कळ पुरोगामी आणि किंबहुना तितकच प्रतिगामी लेखन केलय. पण कुठल्या गोष्टी थट्टेवारी न्याव्या हे ज्याने त्याने यथाशक्ती ठरवावे. 

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 18/06/2023 - 02:05

In reply to by 'न'वी बाजू

वामन देशमुख नामक आयडीच्या मनात कधी सहानुभूती, सहवेदना, करुणा, वगैरे निर्माण होतील याची शक्यता अजिबात नाही. सदर व्यक्ती विकृत आहे, हे त्यांनी वारंवार सिद्ध केलं आहे.

तुम्हाला सात विकृतपणा करून काही समाधान मिळालं असेल तर किमान त्या प्रतिसाद लिहिण्याचं सार्थक झालं. नाही तर काय मिळालं!

'न'वी बाजू Sun, 18/06/2023 - 03:09

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सहानुभूती, सहवेदना, करुणा…

नाही, (त्यांच्याकडून) ती अपेक्षा मी करीत नाही. (काहीतरीच काय!) परंतु, (आरसा दाखविल्यावर) चुकून कदाचित शरम वगैरे…

पण, तुम्ही म्हणता, ते बरोबर आहे. That entire political tribe is beyond shame. My bad.

Sorry.

shantadurga Sun, 18/06/2023 - 11:51

वामन हा जालावरचा ब्रिजभूषण! एकंदरीत आविर्भावात साम्य आहे. कीड वाढत चालली आहे.
-या प्रत्युत्तरातीलही सर्व नावे काल्पनिक आहेत. जिवंत वा मृत व्यक्तींशी साधर्म्य योगायोग समजावा.
संपादन: शीर्षकात द्विरुक्ती झाली.

Rajesh188 Sun, 18/06/2023 - 20:22

2000 हजार रुपयांच्या नोट मध्ये gps चिप्स.
वाढेलेली महागाई मध्ये कसे देश हित आहे.

शेतकरी,शीख,मुस्लिम,दलीत सर्व देशद्रोही आहेत आहेत आणि हे फक्त देश प्रेमी आहेत ह्यांचे सर्व उद्योग देशाला बुडवणारे असले तरी .
अशी समाज माध्यमात खानदानी पार्श्वभूमी असणारा वामन देशमुख हा आयडी आहे.
ऐसी अक्षरे चे मन मोठे म्हणून त्याला इथे अजून ठेवला आहे .
ह्यांची टोळी आहे .
आणि हे सर्व आयटी सेल चे पगारी नोकर असण्याची जाम शक्यता आहे.
ह्यांच्या. नेत्याने मानवी विष्ठा जरी रोज सकाळी नाश्त्यात खाली तरी हे टोळके त्याला विकृती म्हणणार नाही.
मानवी विष्टेचे health benefit लोकांना सांगत सुटतील
इतके हे मानसिक गुलाम आहेत.

'न'वी बाजू Sun, 18/06/2023 - 20:36

In reply to by Rajesh188

आणि जे सर्व आयटी सेल चे पगारी नोकर असण्याची जाम शक्यता आहे.

ही शक्यता मी लक्षात घेतली नव्हती. मी त्याचे खापर संस्कारांवर फोडीत होतो.

परंतु, अर्थात, दोन्हींपैकी (संस्कार, आयटी सेल) कोठलीही एक शक्यता (किंवा एकसमयावच्छेदेकरून दोन्ही) विचारार्ह आहे(त).

वामन देशमुख Tue, 02/01/2024 - 11:12

In reply to by Rajesh188

आणि हे सर्व आयटी सेल चे पगारी नोकर असण्याची जाम शक्यता आहे.

इथे लिहिणाऱ्यांपैकी "आयटी सेल चे पगारी नोकर" कोणकोण आहेत आणि कोणकोण नाहीत हे ठरवण्याचे निकष कोणते?

---

सवांतर: "आयटी सेल चे पगारी नोकर" असे काही काम असेल तर खरंच कळवा, पुरेसा पैसा मिळत असेल तर माणसे पुरवीन.

क्षणभंगुर Mon, 19/06/2023 - 23:15

अहो असं कसं... हेच तर आहे अमृतकाळातलं अमृत... कधीतरी सनातन प्रभात वाचत जा... अमृताचा सागर आहे तो

बाय द वे... आजचं दिनवैशिष्ट्य: १६७६ : नेताजी पालकरांना शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले.

गलिव्हर Tue, 20/06/2023 - 09:31

ऐसी अक्षरे ह्या साईट वर विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे म्हणून सगळे विकृत विचार गोळा करून इथे टाकण्यात येतात का काही माणसांकडून ? आणि त्या माणसांची नावे वामन देशमुख अशी असतात का ?

----------
ह्या प्रतिसादाचा सुद्धा जिवंत किंवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. असल्यास निव्वळ योगायोग समजावा.

'न'वी बाजू Wed, 28/06/2023 - 08:36

औरंगाबादच्या संदर्भात बोलायचे झाले तर ज्या मुघल बादशहाच्या नावे या गावाचे नाव ठेवण्यात आले होते, त्या औरंगजेबाची राजकीयदृष्ट्या चलती नाही. जनमानसात त्याची प्रतिमा खलनायकी असली तरी या शहराशी त्याचे नाते प्रदीर्घ होते. तो आधी इथला सुभेदार (१६३६-४४) आणि नंतर बादशाह (१६५२-५८) होता. या ठिकाणाचा शहरी बाज मुघलांच्या काळात सतराव्या आणि अठराव्या शतकात घडला गेला यात तिळमात्र शंका नाही. या शहराचे मूळ नाव खडकी बदलून औरंगाबाद मुघलांनी केले.

औरंगाबाद औरंगजेबाने वसविले, त्याला ‘औरंगाबाद’ हे नाव मुघलांनी दिले, इथवर ठीक. परंतु, पुढे हेच औरंगाबाद निजामाच्या मुलुखाचा भाग कधी नि कसे बनले, याबद्दल कुतूहल आहे.

——————————

प्रस्तुत निजाम हैदराबादचा. अहमदनगरचा नव्हे. ह्यो निजाम वायला नि त्यो निजाम वायला. (असो चालायचेच.)

वामन देशमुख Tue, 02/01/2024 - 11:16

In reply to by अहिरावण

अवरंग्याला महान सिद्ध करणे हा डाव्या विचारांच्या आणि स्वत:ला उदारमतवादी समजणा-या मतलबी, धुर्त, स्वार्थी लोकांचा सध्याचा धंदा आहे.

शंभर टक्के सत्य आहे.

---

बुडाला औरंग्‍या पापी । म्‍लेंछसंव्‍हार जाहाला ।
मोडलीं मांडली छेत्रें । आनंदवनभुवनीं ।।३३।।

शशिकांत ओक Sat, 16/12/2023 - 00:23

नमस्कार मित्रांनो, मी अनेक महिन्यानंतरऐसी बात अक्षरे संस्थळावर आलो. पुष्कर सोहोनींचा मराठीत अनुवादित लेख विशेष लेख वाचला. नंतर कुतुहलाने इंग्रजीत वाचला. छान लिहिले आहे कि नामांतराचा खटाटोप कशाला? पूना ते पुणे, कलकत्ता, मद्रास शहरांची नावे बदलण्यामागे त्या गावांची त्या आधीच्या काळात नावे होती. इंग्रजांना उच्चारायला जमत नसत किंवा मुघलांना आपल्या धार्मिक भावना प्रखरपणे दाखवायला फारशी, अरबीतील सरदारांची नावे कालांतराने बोलताना तोंडात बसली म्हणून तशीच राहू देणे योग्य नाही. हे मान्य आहे. पण ज्या काटकी गावाला आधीचा प्रभावी इतिहास नाही त्या गावाला अहिल्याबाईंच्या नावाने संबोधले जाणे कृत्रिम वाटले. त्यांनी या शहरात राज्य केले नाही. भारतात अनेक ठिकाणी लोकोपयोगी कामे केली त्यात ज्या गावाचा समावेश नाही. फक्त आसपासच्या परिसरात जन्म झाला इतका तोकडा ऐतिहासिक संदर्भ आहे, अशा व्यक्तीच्या नावे शहराला नाव देणे मग त्या भले महान राज्य कर्त्या असोत. तितकेसे पटत नाही. मुगल राजसत्तेतील व्यक्ती म्हणून न पाहता येईल ज्यानी सोहोनींच्या कथनानुसार नगराची राजधानी निर्माण केली असेल तर इतर गावांप्रमाणे सरसकट नाव बदल करणे आवश्यक नाही. असो.

यामागे त्यांनी पश्चिम आशियातून आणलेल्या कनाती, कालवे, पाणी उपसा करणारी उदंचनाची तंत्रे आणि पाणी व्यवस्थापनाचे कौशल्य होते.

वरील उतारा मुद्दाम संदर्भात घेतला आहे तेंव्हा कारण वेस्ट एशियन देशातील जलव्यवस्थापन पद्धतीने अ. नगरला, औरंगाबाद याठिकाणी वापर केला गेला आहे असे दिसते. प्रश्न आहे की जे मुलनिवासी आहेत. ते हजारो वर्षे पाणीपुरवठा कसा करत होते? किंबहुना भरपूर पाणी वापरून शेती, गावा - खेड्यात, नगरात पाणीपुरवठय़ाच्या योजना होत्या म्हणून तर वैराण आणि टोळ्यांनी राहणाऱ्या अनेक कबील्यांना भारतात येऊन परत जायला आवडत नव्हते.
उतारा मुद्दाम संदर्भात घेतला आहे तेंव्हा कारण वेस्ट एशियन देशातील जलव्यवस्थापन पद्धतीने अ. नगरला, औरंगाबाद याठिकाणी वापर केला गेला आहे असे दिसते. प्रश्न आहे की जे मुलनिवासी आहेत. ते हजारो वर्षे पाणीपुरवठा कसा करत होते? किंबहुना भरपूर पाणी वापरून शेती, गावा - खेड्यात, नगरात पाणीपुरवठय़ाच्या योजना होत्या म्हणून तर वैराण आणि टोळ्यांनी राहणाऱ्या अनेक कबील्यांना भारतात येऊन परत जायला आवडत नव्हते.
यावर अन्य विचार समजून घ्यायला आवडेल.

'न'वी बाजू Sun, 17/12/2023 - 23:55

‘कोलांटीउडी’चे अनेकवचन ‘कोलांटीउड्या’, की ‘कोलांट्याउड्या’?

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 20/12/2023 - 00:02

In reply to by 'न'वी बाजू

कोलांट्याउड्या. ते फ्रेंचसारखं चालत नाही. Cul de sac याचं अनेकवचन culs de sac होतं, तसं हे नाही. मराठी लोकांत एका उडीत एकाहून अधिक कोलांट्यांची सिमोनबायली फॅशन नसावी.