Skip to main content

.

.

Node read time
0

ललित लेखनाचा प्रकार

0

राजेश घासकडवी Wed, 09/11/2011 - 21:19

कथा छान जमलेली आहे. थोडक्यात संपली, अजून वाढायला हवी होती असं वाटत राहिलं. लाटा येत रहातात, काही मोठ्या, काही छोट्या. शेवटच्या वाक्यांतून एकदम परस्पेक्टिव बदलतो.

अजून सविस्तर प्रतिसाद वेळ मिळाल्यावर देईन.

आडकित्ता Wed, 09/11/2011 - 21:35

पण,
"आजोबा" होईपर्यंत 'तिच्या' दु:खात इतकं बुडलेलं ??
बात कुछ हजम नही हुई..

... Wed, 09/11/2011 - 23:28

शेवट अपेक्षित गवि
तुमची लिहीण्याची स्टाईल परिचित झालीये
पण एकदरीत अस वाटतय की हे एकतर्फी प्रेम असाव
कारण तिला काहीच माहीत नाही अस दाखवलय तुम्ही
सामान्यत अशा प्रेमाचा शेवट दुखद असणारच

खवचट खान Thu, 10/11/2011 - 02:23

छान आहे. आवडले.

चला, आता फेसबुकवर 'त्या' प्रोफाईलवर जाऊन तासभर अश्रू ढाळणे आले! :)

ऋषिकेश Thu, 10/11/2011 - 09:42

शेवटाने 'नजरीया' बदलला.. तरी फारसा रुचला नाही
त्या वयातही इतका गुरफटू शकतो माणूस?

गवि Thu, 10/11/2011 - 09:48

In reply to by ऋषिकेश

प्रतिसादाला काही एक्स्प्लेनेशन द्यावे की नाही या संभ्रमात पडलो.

एवढंच सांगतो की लेले आजोबांना काहीच जमलेलं नाही, केव्हाच कसलाच कॉन्फिडन्स नव्हता. या वयात हे असं गुरफटणं असा नवथर प्रेमाचा प्रकार नाहीये. ते रिकामे आणि एकटे पडण्याचा कडेलोट झाल्यावर आणि सुटून गेलेला काळ एकदम अंगावर येण्याने त्यांना सिलेक्टिव्ह आठवणींची जास्त धग लागतेय..त्यात ती आहे. एरवी आता पुलाखालून आक्खी नदी वाहून कोरडीही झाली असेल इतका वेळ गेला आहे..

असो..