दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१९ एप्रिल
जन्मदिवस : पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या प्रवर्तक ताराबाई मोडक (१८९२), उद्योगपती पीटर दी नरोन्हा (१८९७), युरेनियमपेक्षा जड १० मूलद्रव्यांचा शोध लावणारा नोबेलविजेता ग्लेन सीबोर्ग (१९१२), गायिका मालती पांडे-बर्वे (१९३०), क्रिकेटपंच डिकी बर्ड (१९३३), अभिनेता अर्शद वारसी (१९६८), टेनिसखेळाडू मारिया शारापोव्हा (१९८७)
मृत्युदिवस : रोमँटिक कवी लॉर्ड बायरन (१८२४), उत्क्रांतिसिद्धांताचा जनक, जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन (१८९२), क्यूरी परिणाम आणि रेडीयमवर संशोधन करणारा नोबेलविजेता पिएर क्यूरी (१९०६), क्रांतिकारक अनंत कान्हेरे कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे (१९१०), पर्यावरणवादी, लेखक जिम कॉर्बेट (१९५५), लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर (२००८), वृत्तपत्रउद्योजक सिवंती आदीतन (२०१३), अॅनिमेशनपट आणि चित्रपटदिग्दर्शक भीमसेन (२०१८), सिनेदिग्दर्शिका सुमित्रा भावे (२०२१)
---
सायकल दिन
UN मँडरीन भाषा दिवस.
१५३६ : बाबरने दिल्लीच्या इब्राहिमखान लोदीचा पराभव करुन मोगल साम्राज्य स्थापन केले.
१८३९ : १८३९चा लंडनचा तह - बेल्जियम स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात.
१९१० : क्रांतिकारक अनंत कान्हेरे, कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे यांना ठाणे कारागृहात फाशी.
१९१९ : अमेरिकेच्या लेस्ली अर्विनने सर्वप्रथम पॅराशूटच्या सहाय्याने विमानातून उडी मारली.
१९२७ : मे वेस्ट या अमेरिकन अभिनेत्रीला 'सेक्स' नाटकातल्या बीभत्सपणासाठी दहा दिवसांचा कारावास.
१९७१ : पहिले स्पेस स्टेशन 'सॅल्यूट-१' अवकाशात.
१९७५ : 'आर्यभट्ट' हा भारताचा पहिला भूस्थिर उपग्रह रश्याच्या साहाय्याने अवकाशात सोडला गेला.
१९८७ : 'द सिंप्सन्स' मालिकेची मर्यादित सुरूवात.
२०११ : ४५ वर्षांनंतर क्यूबाच्या कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीमधून फिडेल कॅस्ट्रोचा राजीनामा.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- गवि
तसा इतरांप्रमाणेच साजरा
तसा इतरांप्रमाणेच साजरा करायला काही हरकत नाही. तरीही uncomfortable वाटलं तर खालील variations करू शकता:
१. वेगळे झाड निवडा.
२. वेगळा दोरा निवडा
३. थोड्या कमी वेटोळ्या घाला.
४. जास्त खात्री असेल तर जास्त वेटोळ्या घाला.
५. पौर्णिमेच्या ऐवजी दशमीला साजरा करा.
६. दोरे थोडे जास्त किंवा कमी घट्ट घाला.
७. झाडाच्या बुडाला दोरा बांधण्याऐवजी (as you are comfortable) थोडा वर घाला, भावनिक कि अजून काय ते कळेल.
८. अजून चार झाडांच्या बुडाला एक एक लहान रिळ फे़कून ठेवा
९. लाल पिवळा रंग वापरण्याजागी काळा/निळा वापरा.
१०. सात खून माफची पारायणे करा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
variation
variation अवे असेल तर, निवडा ऐवजी धरा जास्त योग्य ठरेल का?
तुम्हाला हे व्रत पाळायची गरज
तुम्हाला हे व्रत पाळायची गरज + अधिकार कुठे आहे?
हे व्रत जन्मोजन्मी हाच (सध्याचा) पती मिळावा म्हणून करतात असे ऐकले आहे.
तुम्ही अजून या जन्मीसुद्धा हा पती म्हणून मुक्रर केलेला नाही ना?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
हे करा
त्यादिवशी आवर्जून वडापाव खा आणि खाऊन झाल्यावर तीनदा तसे म्हणा.
वडाचे बोन्साय घरी आणा आणि त्याला, तुम्हाला जे वाटेल ते गुंडाळा.
वडाशी नामसाधर्म्य असल्यामुळे 'बडेका' खा आणि पार्टनरलाही खिलवा.
काही सल्ले
१. नवा पार्टनर शोधा. निदान सुरूवात करा. पुढच्या वटपौर्णिमेपर्यंत नवा पार्टनर मिळाला नाही तर लाज आणाल समाजाला.
२. जुन्या-नव्याचं मिश्रण होऊ द्या. (श्रेयः असा मी असामी - पु. ल. देशपांडे)
३. चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ आलेला आहे, उपभू बिंदूवर, तेव्हा lunacy लपवण्याचा प्रयत्न करा. (हा सल्ला सर्वांना आहे.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
'उपभू'चा दुवा (अवांतर)
तुम्ही दिलेला दुवा 'अॅपजी'चा आहे. बहुतेक 'पेरिजी' म्हणायचे होते तुम्हाला.
अविनाश कुलकर्णी, कृपया या
अविनाश कुलकर्णी,
कृपया या संस्थळावर एक-दोन ओळींचे फेसबुक-स्टेटस स्टाइलचे धागे काढू नयेत. या संस्थळाच्या वाचकांच्या अपेक्षा अधिक काही तरी भरीव वाचण्याची असते. तुम्ही निवडलेला विषय छान आहे. त्याचा विस्तार करण्याचे कष्ट घेतलेत तर ते निश्चितच वाचनीय होईल. मात्र आहे त्या स्वरूपातलं अल्पाक्षरी लिखाण पुन्हा येणार नाही याची काळजी घ्या.
गुर्जी ओ गुर्जी अविनाश
गुर्जी ओ गुर्जी अविनाश कुलकर्णींनी कोन्त्यातरी तरण्या पोरीच्या वतीने हा धागा काढला हाय. आता त्या पोरीनंच जर आसं सांगितलं आसल तवा त्ये तरी किती पानी टाकनार त्या आमटीत?
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
सहमत
अशा स्वरुपाचे धागे या संकेतस्थळावर योग्य वाटत नाहीत.
इथेच का, कुठेही फारसे योग्य
इथेच का, कुठेही फारसे योग्य वाटत नाहीत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कुठेतरी योग्य वाटत असणारच
ज्या अर्थी हा धागा फेसबुक स्टाईलचा मानला आहे त्या अर्थी फेसबुक किंवा ट्विटर वगैरे स्वरुपाच्या संकेतस्थळावर असे धागे चालून जावेत असे वाटते.
ठिक आहे योग्य ति काळजी
ठिक आहे योग्य ति काळजी घेवु..
आपका हुकुम सर आखोपर..
आता काहि तरी सकस लिहितो
सकस लि"खाणं"
लेख वाचताना तळाशी दिसणार्या दोन लिंकांनी मन जिंकले. (मला दिसले ते चित्रात डकवले आहे)
सहाजिकच दोन प्रश्न मनात आले.
१. तसलं व्हेरिएशन चालेल का?
२. अस्लं लि"खाण" येण्याचं कारण म्हणजे काल काही खाण्यात आलं का?
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-