शाळेची वेळ

महाराष्ट्रातील बहूतेक शाळा ह्या दोन सत्रात भरतात. एक सकाळ सत्र व दुसरे दुपार सत्र असली त्यात विभागणी असते.
विद्यार्थीसंख्येत वाढ झाल्याने असे करावे लागते. या शाळांत प्राथमिक व माध्यमिक शाळा येतात.
सकाळच्या शाळेची वेळ साधारणत: सकाळी ७ ते १२ व दुपारच्या शाळा ह्या दुपारी १२ ते ५:३० ह्या वेळात असतात.

सकाळ सत्राच्या विद्यार्थ्यांना शाळा संपवून दिवसभर मोकळा वेळ मिळतो. ते विद्यार्थी या वेळेत घरी जावून, ताजेतवाने होवून दुपारच्या दरम्यान एखाद्या शैक्षणीक वर्गाला जावू शकतात. फावल्या वेळेचे छंद, वाचन, घरकाम करू शकतात. एखादा गरजू विद्यार्थी एखादे काम करून हातखर्चाला पैसे मिळवू शकतो. (बालमजूरी योग्य नाहीच पण ती त्या विद्यार्थ्यांची गरज असू शकते.)

जेव्हापासून इयत्ता १२ वी ला स्पर्धा परिक्षेला महत्व आले तेव्हापासून इयत्ता दहावीच्या गुणांचे महत्व कमी झाले. तरीही दहावीचे गुण पुढील प्रवेशासाठी महत्वाचे असतातच असतात. अगदी ०.१ टक्यांवरूनही एखाद्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही. आजकाल स्पर्धा परिक्षांची तयारी अगदी नववी पासून होते आहे. अशा नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना हा मोकळा वेळ सोन्यासारखा मौल्यवान ठरू शकतो.

बहूतेक शाळांचे मोठे माध्यमिक वर्ग (आठवी ते दहावी) हे दुपारच्या सत्रात आयोजित केलेले दिसतात. या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मोकळा, पुरेसा वेळ मिळणे आवश्यक असते. सकाळच्या वेळात या वर्गांचे नियोजन शाळांनी केल्यास तसा वेळ त्या विद्यार्थ्यांना निश्चीत मिळू शकतो.

याच्या नेमके उलट घडते. लहान वर्गाचे विद्यार्थी सकाळच्या सत्रात शाळेत जातात. पाचवी पासून पुढे ठिक आहे पण पहिली ते चौथीचे विद्यार्थी हे खरोखर लहान वयाचे असतात. सकाळच्या वेळी त्यांचे उठणे, तयारी करवून घेणे पालकांना जिकीरीचे असते. त्यातही दुपारचा वेळ हा त्यांच्यासाठी इतका काही महत्वाचा नसतो. त्यावेळेत ते शाळेत जावू शकतात.

शालेय व्यवस्थापनाला या गोष्टी माहीत असतीलच पण याबाबत त्यांनी काही विचार करून वेळेचे योग्य नियोजन केले पाहीजे.

आपल्यालाही शाळेच्या वेळेबाबत असला अनुभव आहे काय?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (2 votes)

प्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाभेजी,
कोणतेही सत्र घेतलेत तरी शाळेचा एकूण वेळ एक्झॅक्टली तितकाच असतो. (क्लॉक अवर्स) त्यामुळे अमुक सत्रामुळे जास्त वेळ मिळतो वगैरे पटले नाही. (सकाळच्या सत्रातील मास्तरांस कमी वेळ काम करून तितकाच पगार मिळू लागला तर आपल्याकडे किती बोंबाबोंब होईल याची कल्पना केलीत का कधी?Wink )
दुसरे म्हणजे आपल्याकडे दुपारी भयंकर ऊन असते. अन उन्हाळा हा डॉमिनंट ऋतू आहे. थंडी फार कमी दिवस असते. त्यामुळे लहान मुलांसाठीची वेळ सकाळची बरोबर वाटते. बर्‍याच शाळा ऐन थंडीत,७ ऐवजी ८ वाजेपासून सुरू होतात.

(हा प्रतिसाद इतरत्र आधीच दिला आहे, इथे फक्त कॉ.पे. केला आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आमची शाळा दुपारच्या सत्रात भरत असे. उन्हाळ्यात ऊन वाढल्यावर शाळा सकाळी सुरू होई आणि ९ च्या ऐवजी ८ तास (लेक्चर्स) होत. मला सकाळच्या शाळेचा फार फायदा होतो असे वाटत नाही. सलग वेळ मिळत असला तरी टाईमपासच अधिक व्हायचा. दुपारीपण झोप येई कधीकधी. त्यामुळे उन्हाळा आणि शनिवार सोडून दुपारीच चांगली वाटायची शाळा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>> मिळत असला तरी टाईमपासच अधिक व्हायचा
मिळणारा वेळ कसा खर्च करायचा हे त्या त्या विद्यार्थ्याच्या हातात असते. एखादा गरजू विद्यार्थी त्या वेळेचा सदुपयोगही करू शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

शाळा हवीच का?

उत्तर हो असल्यास मला रात्रीची वेळ चालेल... :innocent:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

रात्र शाळेत नांव घालायला, दिवसा फिजिकल हमाली करायला लागते, अन बुडाला प्रचंड आग लागते, शिकण्याची. मग रात्रशाळेत जातात लोक. अन वर येतात. बरेच ठाउक आहेत तसले नमूने मला.
तुला ती गरज नाहिये बेट्या.
हां, 'शाळा हवीच का' या विषयावर भरपूर शाळा करता येईल. पण त्यासाठी नवा धागा काढ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

रात्र शाळेत नांव घालायला, दिवसा फिजिकल हमाली करायला लागते, अन बुडाला प्रचंड आग लागते, शिकण्याची. मग रात्रशाळेत जातात लोक. अन वर येतात. बरेच ठाउक आहेत तसले नमूने मला. तुला ती गरज नाहिये बेट्या.

डागदर साहेब, गरजांचा फारच एकांगी विचार करताहात आपण! आमच्यापण अनेक गरजा होत्या, त्या वरील गरजेंपेक्षा वेगळ्या असल्यातरी त्या आमच्यासाठी गरजाच होत्या. शनीवारी आमची सकाळची शाळा असे, त्यावेळी दुरदर्शनवर शुक्रवारी रात्री हिंदी सिनेमे लागत. या सकाळच्या शाळेमुळे सालं आमचं हिंदी सिनेमाचं नालिज पार "नल्ला" आहे हो! कालेजात पुढे या हिंदी सिनेमाच्या नालेजवरच कित्येकांनी कंडम पोरी पटवल्या हे काय तुम्हाला सांगायला नको!! आम्हाला तर साला ममता कुळकर्णी अन उर्मिला मातोंडकर अशा दोन चार मराठी तारका सोडल्या तर इतरांची नावं पण माहित नव्हती, त्यामुले कालेजात काय फेफे उडाली आमची माहितीए?

आमचे दोस्त लोक नववी-दहावीत असताना पोरींना शाळा बूडवून मॅटीनीच्या सिनेमाला नेत असतं (संध्याकाळी पोरींच्या घरनं परवानगी नसायची तेव्हा), आम्ही नाकासमोर राहून शाळेत जायचो. काय भलं झालं आमचं त्या शाळेने? शाळाच नसती तर आम्ही पण फिरवल्या असत्या की एक दोन पोरी!!

त्या दुपारच्या शाळेने दिवसभर जागायची इतकी वाईट्ट सवय लावली म्हणून सांगू की पुढे पाच दहा वर्ष दुपारी झोप येत नसे! (उन्हाळाच्या सुटीत आम्ही एका खडूस आजीकडे जात असू, खायची चंगळ असायची तिथे पण दूपारी कंपलसरी झोपलं नाय तर संध्याकाळी मँगोशेक मिळणार नाहीची तंबी असायची. बोंबलायला झोप येईल तर ना. किती मिन्नतवारी करावी लागायची मग शेक्स मिळवायला...)

त्याशिवाय क्रिकेटच्या सरावाला त्या शाळेचा किती उपद्रव व्हायचा म्हणून सांगू.. दोन पाच वर्ष सुटी मिळाली असती शाळेला तर अगदी सचिन नाही तरी महमंद कैफ तरी नक्की झालो असतो.. किती कैफियती ऐकवायच्या तुम्हाला!! जाउंद्या... तुम्ही म्हणताय तर काढू कधीतरी वेगळा धागा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मी निळ्या म्हनाय्चं आन तू 'डाग्दर्सायेब' हे कै पटत नै.
डाक्टरा! असं म्हट्लास तर मजा येईल. बाकी धागा काढच दुसरा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

निळ्या, निळ्या आतातरी पटलं ना, शाळा शिकून कोणाचं भलं झालंय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमची शाळा नेहमीच सकाळी पावणेअकरा ते सव्वाचार (किंवा पावणेपाच) पर्यंत असे. त्यामुळे सकाळच्या शाळेचा अनुभव फक्त शनिवारी यायचा.

मला पाभेंनी सुचवलेल्या बदलाचा विचार करावासा वाटतो तो दुसऱ्या कारणासाठी. चौथीपर्यंतच्या मुलांना सांभाळण्याची जास्त गरज असते. पाचवीनंतरची मुलं अधिक स्वतंत्र असतात. ज्या घरात नवराबायको दोघेही काम करतात तिथे बारा ते सहा मुलांची काहीतरी सांभाळण्याची सोय करण्यापेक्षा सकाळी ९ ते १२ आणि संध्याकाळी ५ ते ६ अशी सोय करणं सोपं जाईल का? की ही वेळ लहान मुलांना दुपारी झोप घेता यावी म्हणून निवडलेली आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शाळा हा आयटम तुमच्या बाळराजांना/प्रिन्सेस्बेबीला बेबीसिट करण्यासाठी बनविलेला नाही. नवरा अथवा बायकोने नोकरी सोडून आपल्या स्वतःच्य भावी पिढीची -अमरत्वाची/वंशाच्या दिव्या पणतीची- काळजी घ्यावी. ते शाळेचे काम नाही. शाळेने तुम्हाला आवतन देऊन्/प्रोत्साहन देऊन सांगितले नाहिये की तुम्ही नोकर्‍या करा आम्ही मुले सांभाळू.

ता.क. तुमच्या म्हंजे 'ज्या घरात दोघे नोकरी.. इ.'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

>>आमची शाळा नेहमीच सकाळी पावणेअकरा ते सव्वाचार (किंवा पावणेपाच) पर्यंत असे. त्यामुळे सकाळच्या शाळेचा अनुभव फक्त शनिवारी यायचा.

तुम्ही पुण्याचे दिसता. रोज दुपारी शाळा आणि शनिवारी सकाळी हा प्रकार पुण्यात असतो. आमचे सीओईपी सुद्धा तसेच असायचे.
(आमचे व्हीजेटीआय मधले मित्र त्यांना शनिवारी सुट्टीच असते असे सांगून आम्हाला जळवत असत).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

असे काहि नाहि.. आमची शाळा मुंबईतली असुनही दुपारी असायची.. शनिवारी सकाळची (अर्धा दिवस)..
बाकी कधीही शाळा घ्या, आपले दोस्त सोबत असल्याने पोरांना फारसा फरक पडत नाहि.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

घासू गूर्जींना पुण्याचे म्हणल्याचे पाहून थत्ते काकांचा कमी पडलेला अभ्यास दिसून आला! Wink (का घासू गूर्जींना पुणेकर प्रतिमा बहाल करण्याचा हा थत्ते काकांचा कुटिल डाव आहे?) :-?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

करण्याची सोय असणारे एक संकेतस्थळ निघालेले आहे. हा प्रतिसाद म्हणजे त्या स्थळाची जाहिरात नव्हे. सहज आठवले म्हणून लिहिले.

आयुष्य ही एक शाळा आहे आणि अभ्यासाला वेळच मिळत नाही.

वाळवंटातून आलेला नवा माणूस मी
समजवा कोणीतरी की का बरसते याइथे

-'बेफिकीर'!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेळ अशी काही जबरदस्तीने ठरवलेली असूच नये. माझ्या कल्पनेतील शाळा अशी:-
साधारणतः एखाद्या खेळाच्या तालमीचं, खेलाच्या स्पर्धेचं रूप त्याला हवं.
म्हणजे, सकाळी ७ ते संध्याकाळी ६ ह्या वेळात विविध वर्ग उपलब्ध असतील, ज्याला जे आवडेल त्याने तिथे जाउन बसावे. वर्षाखेरिस कुठल्याही आवडीच्या ५ विषयात काहिएक performance चे बंधन मात्र असावे. विद्यार्थ्याने ते स्वतःहून शिकायचे आहे.
(अशीच संकल्पना शांतीनिकेतन वगैरे मध्ये राबवून झाल्याचे ऐकले आहे.)
माझ्या बुजरेपणाची व एकाकीपणाची सुरुवात झाली तेव्हा मी आठवीच्या आसपास उगीच गावातून चक्कर मारी. खावेसे वाटले ते खाई.कधी ऐन दुपारी शांत वेळी दूरच्या मंदिरात शांत पहुडण्याचा आनंद काय असतो, ते मला तेव्हाच समजले. कधी गावाबाहेरच्या शेतातल्या लोकांशी गप्पा मारी. सगळं पहायची, फिरायची एक विचित्र हौस होती तेव्हा. असाच फिरत फिरत एकदा आमच्याकडे जुन्या औरंगाबादेत मुस्लिम बहुल भाग आहे, तिथे गेलो होतो. तिथे कुणीतरी फार पूर्वी आमच्याकडे काम करणार्‍या खाला/मौसी भेटल्या.घरी चल म्हणून कौतुकाने घेउन गेल्या. त्यांच्या व्हरांड्यातच कुणीतरी कोकरु हलाल करीत होते. त्याचा गळा चिरत होते. त्याला थेट एका घावात मारण्यापेक्षा असे रक्त वाहून मारले जाते, त्यालाच हलाल म्हणतात, हे नंतर समजले. दोळे उघडे थेउन, टाचा घ्स्शीत ते मेले. ते नीट मरावे म्हणून त्याची तडफड होत असताना काही जणांनी त्याचे पाय घट्ट धरून ठेवले होते. तेव्हा हे सगळे इतके थेट प्रथमच इतक्या जवळून पहात होतो. तोवर मी नंबर एकचा खादाड असूनही सडपातळ अंगकाठी असल्याने मला कौतुकाने,थट्टेने सगळे " खातय बोकडावनी अन् होतय माकडावानी" असे म्हणत. ह्यानंतर मला कुनी "बोकड", "कोकरु" म्हटल्यास कसेसेच होइ.
पण एकूणात वेळ मस्त जायचा. मनाला वाटेल ते करायचो. घरी समजल्यावर बोलणी बसली थोडी, पण मला जोवर तसे करावेसे वाटले, तोवर मी केले. कसं अगदि हलकं हलकं वाटायचं.
माझ्यासाठी हाही शिक्षणाचा भागच होता असे आता वाटते.
विषय काय, मी लिहितोय काय.
विषयाच्या एखाद्या शब्दातून अचानक मनातील साचलेल्या विचारद्रव ढवलला जातो, गढूळ होउन तळाशी असणारे काहीतरी असे अचानक वर येते. ते लिहून मोकळा होतो. हळूहळू सगळे कसे पुन्हा तळाशी जाते आहे. मी पुन्हा क्रियाविहीन व सामान्य बनतो आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

प्रकाटाआ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

प्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

पाभे माझी शाळा तिसरी ते सातवी सकाळची होती
आठवीनंतर बारा ते पाच झाली
पण माझ दुपारच्या शाळेच्या वेळेशी काही जमल नाही
मला स्वतला सकाळची वेळ अतिशय आवडते
सकाळी लवकर उठल्याने फ्रेश तर वाटतेच पण अभ्यासही चांगला होतो
झोपेच म्हणाल तर टीव्ही बंद करुन लवकर झोपल्यास मुलांना उठायला प्राँब्लेम होत नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

>>>> झोपेच म्हणाल तर टीव्ही बंद करुन लवकर झोपल्यास मुलांना उठायला प्राँब्लेम होत नाही <<<<
आता हे तुम्ही भारीच अवघड सान्गता ब्वॉ ! टीव्ही कोण बन्द करणार? अन का म्हणून आम्ही आमच्या व्यक्तिगत आयुष्याच्या हौसामौजा मारायच्या? Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय हे?! एकाचवेळी हौसा अन मौजा देखील!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

थोडी प्रशासकीय अडचण असावी.

बहुतेक शाळांमध्ये पहिली ते दहावी असे वर्ग असले तरी प्रशासकीय दृष्ट्या प्राथमिक विभाग आणि माध्यमिक विभाग वेगळे असतात. प्राथमिक विभागास वेगळे मुख्याध्यापक वगैरे असतात. शिवाय अनेक शाळांमध्ये इमारतीही वेगळ्या असतात. आणि दोन सत्रातली शाळा प्राथमिक आणि माध्यमिक अशी वेगवेगळी चालवली जाते. त्यामुळे प्राथमिक विभागात दोन वर्ग सकाळी आणि दोन वर्ग दुपारी चालवले जातात. तसेच माध्यमिक विभागात तीन वर्ग सकाळी आणि तीन दुपारी चालवले जातात.

म्हणून पहिली ते चौथीचे/पाचवीचे वर्ग दुपारी आणि पाचवी/सहावी ते दहावीचे सकाळी अशी विभागणी शक्य होणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

दोनदा झाला म्हणून प्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ऑफिसच्या वेळेप्रमाणेच ९-४/५ अशी शाळेची वेळ हवी, त्यामुळे कुटुंबाला सकाळ/संध्याकाळ एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल, ह्यात शाळेतिल लॉजिस्टिकचे इश्युज असू शकतिल पण वर्षाकाठी आकरण्यात आलेली फी बघता ही अपेक्षा फार नाही. शिक्षण/काम हेच आयुष्य नसुन, आयुष्याचा एक भाग असले पाहिजेत असे माझे मत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुपारचीच शाळा बरीये. व्यवस्थित झोप होते, जेवण होतं, झालंच तर एखाद्या तासाला मागच्या बाकावर बसुन वामकुक्षी घेता येते, जरा संध्याकाळ झाली की मित्र मैत्रीणी असतातच खेळायला. जर वर्गाबाहेर उभं केलं तर छानपैकी बाहेर गॅलरीत उभं राहुन गप्पा हाणता येतात. कीतीतरी फायदे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>> याच्या नेमके उलट घडते. लहान वर्गाचे विद्यार्थी सकाळच्या सत्रात शाळेत जातात. पाचवी पासून पुढे ठिक आहे पण पहिली ते चौथीचे विद्यार्थी हे खरोखर लहान वयाचे असतात. सकाळच्या वेळी त्यांचे उठणे, तयारी करवून घेणे पालकांना जिकीरीचे असते. <<<<<

तुम्ही पालकान्ची जिकीर विचारात घेऊ नका हो, हे जे काही लहान मुलान्ना लौकर ऊठवणे/तयार करणे वगैरे "पालकांना" जिकीरिचे अस्ते ना, त्यापेक्षा जास्त जिकीरिचे वाढलेल्या वयाच्या पोरान्ना लौकर उठण्याची शिस्त लावण्याचे अस्ते. शिवाय, लहान मुले दुपारची पेन्गुळतात ते वेगळेच. किंबहुना, लहानपणी दुपारची थोडी झोप देखिल योग्य शारिरीक वाढीसाठी आवश्यक मानली जाते. तसेच, लौकर उठण्याची शिस्त लहान वयातच लागू शकते. त्यामुळे, पालकांन्ना काय त्रास होतो (स्वतःच उठण्याचा? की मुलान्ना उठविण्याचा? :डोमा: ) त्याचा विचार करणे तितकेसे महत्वाचे वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरती आदरणीय श्री. निळे यांनी विचारलेला "शाळा हवीच का?" हा मूळ प्रश्न जो पर्यंत सोडवला जात नाही, तो पर्यंत शाळेच्या वेळा वैग्रे आनुषांगिक प्रश्न आपण बाजुला ठेवु!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0