लैंगिक उपासमार व गुन्हेगारी

'आपल्या लहान मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या नवर्‍याला मारुन त्याच्या मांसाचा बायकोने कुर्मा बनवला' अशा आशयाची बातमी आजच्या "टाईम्स" मध्ये वाचली. 'सहा महिन्याच्या मुलीवर बलात्कार', 'दरोड्यादरम्यान साठ वर्षाच्या वृद्धेवर सामूहिक बलात्कार' अशा बातम्या बर्‍याच वेळा वाचनात येतात. पंधेर आणि कंपनीचे निठारी वासनाकांड कोण विसरेल? अशा लोकांना सरसकट 'लिंगपिसाट', 'कामपिसाट', 'वासनांध पशू' अशी निर्भत्सनावाचक विशेषणे लावली जातात. लैंगिक स्वरुपाचे गुन्हे करताना माणूस त्याचे माणूसपण विसरतो, संस्कार, संस्कृती वगैरे गोष्टींचा त्याला विसर पडतो आणि त्या माणसाचे फक्त वासनेने झापाटलेल्या एका बेबंद पशूमध्ये रुपांतर होते, अशी एक सरसकट भावना दिसते. हा विषय संवेदनशील असल्याने यावर फारसे बोलले-लिहिलेही जात नाही. एकूण कामवासना ताब्यात ठेवणे शक्य झाले नाही की तो माणूस न राहाता पशू होतो असे समाजातील बर्‍याच लोकांचे म्हणणे दिसते.
कामवासना ही माणसाच्या आदिम प्रेरणांपैकी एक आहे. माणसाच्या भुकेचे वेळेवर दमन/ शमन झाले नाही तर माणूस जसा वेडापिसा होतो तसेच याही शारिरीक भुकेचे आहे. कामप्रेरणेचा निचरा होणे आणि त्यासाठी पुरुषाला स्त्रीची आणि स्त्रीला पुरुषाची उपलब्ध्दता असणे/ होणे हे समाजाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. हे जर झाले नाही तर सगळ्या समाजाचे भविष्यच धोक्यात येईल. वेश्याव्यवसायाला समाजविघातक म्हणून हिणवणार्‍या लोकांनी हे ध्यानात ठेवावे की जर वेश्या नसतील तर वासनेने आंधळे झालेले लोक रस्त्यातल्या दिसेल त्या स्त्रीला ओरबाडतील.
समाजातील एक मोठा भाग लैंगिकदृष्ट्या उपाशी असल्याचे दिसते. नोकरी, व्यवसायानिमित्त परगावी, परदेशी एकेकटे रहाणारे विवाहित पुरुषव त्यांच्या बायका, सैन्यांतील जवान व त्यांच्या बायका, विधवा आणि विधुर, तुरुंगातले कैदी, आर्थिक व इतर काही कारणांने विवाह न करु शकणारे पुरुष व स्त्रिया, विद्यार्थी यांच्या लैंगिक निचर्‍याची भारतीय समाजात काही व्यवस्था दिसत नाही. त्यातून स्त्रीची रजोनिवृत्तीनंतर कामेच्छा कमीकमी होत जाते तर त्या दरम्यान तिच्या जोडीदार पुरुषाला सर्वसाधारण समागमाची इच्छा असते. अशा लोकांनी आपल्या लैंगिक शमनासाठी हस्तमैथुनापासून ते गुदमैथुन, पशूमैथुनापर्यंत वाट्टेल ते मार्ग अवलंबल्याचे दिसते. समाजाची बाकी अशा व्यक्तींनी आपली लैंगिक इच्छा दाबून टाकून जगावे अशीच इच्छा दिसते. नाहीतर लगेच अशा व्यक्तींना दुर्वर्तनी, बदफैली असे म्हणून हिणवले जाते.
या प्रश्नाला उत्तर काय? लैंगिक गुन्हेगारीमागे समाजात असणारी लैंगिक उपासमार हे कारण आहे काय? लैंगिक उपासमारीतून लैंगिक विकृती निर्माण होते काय? की काही लोक जन्मतःच लैंगिकदृष्ट्या विकृत असतात? आता सहजपणे उपलब्ध असणारे लैंगिक लेखन, इंटरनेटवर सहज सापडणारे पोर्नोग्राफिक साहित्य यामुळे समाजाची ही भूक भागवली जाते की चेतवली जाते? वेश्याव्यवसाय जर कायदेशीर केला तर समाजात होणारे लैंगिक गुन्हे आणि समाजातील लैंगिक विकृती कमी होईल काय? तसे असेल तर लैंगिकदृष्ट्या अतृप्त स्त्रियांनी आपल्या वासनांच्या शमनासाठी काय करावे?
'ऐसी अक्षरे' च्या वाचकांनी आपली मते मांडावीत. कृपया उथळ व पांचट प्रतिसाद देण्यासाठी या धाग्याचा वापर करु नये. धन्यवाद.
नंदा प्रधान

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
1.714285
Your rating: None Average: 1.7 (7 votes)

वेश्याव्यवसायाला समाजविघातक म्हणून हिणवणार्‍या लोकांनी हे ध्यानात ठेवावे की जर वेश्या नसतील तर वासनेने आंधळे झालेले लोक रस्त्यातल्या दिसेल त्या स्त्रीला ओरबाडतील.

हे असे सातत्याने लिहून वेश्याव्यवसाय अत्यंत आवश्यक आहे वगैरे विचारवंतांमार्फत का लिहिले जाते हे न कळे.
"समाजच्या भल्यासाठी", एका अत्यंत उदात्त हेतूने एखाद्याच्या घरातील सदस्येला नेले जात असेल तर त्याने ते सहन करावे असे म्हणणे आहे काय? स्वतःपासून सुरु करणार का समाज सुधारणा?
म्हणजे, सतत त्या उद्योगाचा जो पुरस्कार केला जातो, ते त्यातील भयावहता जाणवत नाही म्हणून की काय असे वातते. की फक्त "तुम्ही करा.", "त्यांना(दुसर्‍यांना) करायला लावुयात" असा टोन असेल तर उत्तमच.
हा धंदा करावा असे जे म्हणत आहेत त्यांणीच हा धंदा कुणी करावा हेही सांगावे. जाहिर धागा काधला आहेच. जाहिर उत्तरही द्यावे.

वेश्याव्यवसाय जर कायदेशीर केला तर समाजात होणारे लैंगिक गुन्हे आणि समाजातील लैंगिक विकृती कमी होईल काय?
भारतात सध्या हा कायदेशीर आहेच असे वाटते. तसे नसते, तर पुण्यातील काही खास पेठा कधीच्याच बंद पडल्या असत्या. राजरोस, अगदि ओळखपत्रांसह सर्वकाही चालते असे ऐकून आहे. कित्येक स्वयंसेवी संस्थांकडे त्यांची आकडेवारी मिलते, म्हणजे ती सरकारदप्तरीही असनार, कायदेशीर असणार असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मला अतिशय पटलेला प्रतिसाद. अगदी योग्य शब्दांत मांडलंय.

<< वेश्याव्यवसायाला समाजविघातक म्हणून हिणवणार्‍या लोकांनी हे ध्यानात ठेवावे की जर वेश्या नसतील तर वासनेने आंधळे झालेले लोक रस्त्यातल्या दिसेल त्या स्त्रीला ओरबाडतील. >>

ही वाक्ये मलाही अजिबात पटली नाहीत. कारण यातून असे ध्वनित होते की अविवाहित / हक्काची महिला जोडीदार उपलब्ध नसलेले पुरूष एकतर वेश्यागमन करतात किंवा मग बलात्कारी असतात. हे विधान धादांत चूकीचे आणि तितकेच स्फोटकही आहे. एकतर आजच्या समाजात विविध कारणांमूळे अशा प्रकारे शारिरीक संबंधाकरिता महिला जोडीदार उपलब्ध नसलेले अनेक पुरूष वावरत असतात. त्या सर्वांचा अभ्यास करून हे विधान लिहीले आहे काय? दुसरीकडे ज्यांना अशी हक्काची महिला जोडीदार उपलब्ध आहे असे (प्रामुख्याने विवाहित, उरलेले लिव इन वगैरे) पुरूषही रोजच्या दगदगीमूळे (कामाचे वाढलेले तास, त्याकरिता करावा लागणारा प्रवास, शारिरीक मानसिक कष्ट, ताणतणाव इत्यादी) थकून नियमितपणे असे संबंध ठेवण्यापासून मुकतात. कित्येकदा तर बिछान्यावर पडल्या पडल्या घोरायला लागलेल्या अशा लोकांविषयी हल्ली नियतकालिकांमध्येही अनेक लेख येऊ लागलेत. म्हणजे ज्यांना हे सुख उपलब्ध आहे तेही नीट प्रकारे व रोजच्या रोज ते उपभोगत नसताना इतर सर्वच जण ते ओरबाडून अथवा विकत घेत असतील असे म्हणणे योग्य नाही.

दुसरा वेश्यासंबंधाने एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वेश्येकडे जाऊन तिच्याशी संबंध ठेऊन एखाद्या पुरूषाला सुख मिळत असेल तर त्या संबंधांमुळे त्या वेश्येलाही सुख मिळू शकत नाही काय? असे असेल तर मग ती त्याकरिता आर्थिक मोबदला का घेते? म्हणजे त्या पुरूषात अशी काही तरी कमतरता आहे (रंग, रूप इत्यादी) की ज्यामुळे त्याच्याशी संबंध ठेवायला कोणतीही महिला तयार नाही व दुसरीकडे त्या वेश्येकडे अशी काहीतरी भर (पुन्हा रंग, रुप इत्यादीच) आहे की ज्यामुळे पुरुषांनी तिला आर्थिक मोबदला देऊन तिच्याशी संबंध ठेवावेत. मला वाटते अशा प्रकारे आर्थिक मोबदला देऊन संबंध ठेवावे लागणे हाच अशा पुरूषांकरिता एक न्यूनगंडाचा भाग आहे. अशा पुरुषांशी (ज्यांच्याशी फुकटात कोणी इतर महिला संबंध (लग्न अथवा इतर मार्गांनी) ठेवायला तयार नाहीत) केवळ आर्थिक मोबदला मिळत आहे म्हणून संबंध ठेवल्यामुळेच समाज वेश्यांकडे एक हीन घटक म्हणून पाहत असावा. जसे की इतर कोठेच उपयोगात न येणारी वस्तू कचर्‍याच्या डब्यात पडते तद्वतच इतर सर्व स्त्रियांनी नाकारलेले पुरूष वेश्यांकडे येतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

या विषयाबाबत काही मते मी येथे मांडलेली आहेत :
वेश्याव्यवसायाची नैतिकता
त्यातील काही उद्धरणे :

माझ्या मते (१) बालकांचा वापर आणि (२) प्रौढांच्या व्यापारातही गिर्‍हाईक-विक्रेत्यांत असमतोल, यांच्यामुळे सध्या चालणारा वेश्याव्यवसाय अनैतिक मानावा. (वेश्या व्यक्ती अनैतिक नाहीत, तर बाजारपेठ अनैतिक.)

(अंगप्रदर्शन करून नाच करणार्‍यांसारखे) स्वातंत्र्य (प्रौढांच्या) वेश्याव्यवसायात असते, तर मी बहुधा त्याला नैतिक म्हटले असते... पण याबाबत माझे मन पूर्ण तयार नाही, कारण अंगप्रदर्शन हे शारिरिक इजा करणारे नसते. वेश्याव्यवसायात शारिरिक इजा (रोगराई) होऊ शकते. अन्य धोकादायक व्यवसायांइतके (खाणकामगार, अग्निशामक) धोक्याच्या तुलनेने शुल्क मागण्याचे स्वातंत्र्य शरीरभोग विकणार्‍यांकडे येऊ शकेल काय? नसल्यास हा व्यवसाय नेहमीच असमतोल स्वातंत्र्याचा राहील, आणि बाजारपेठ अनैतिक राहील.

वरील लेखात "कामप्रेरणेचा निचरा होण्यासाठी वेश्याव्यवसाय आवश्यक आहे" असा मुद्दा पुढे आनलेला आहे. फारतर यामुळे काय स्पष्टीकरण मिळते? "कायद्याने बंद केला तरी वेश्याव्यवसाय हा चालू राहीलच." परंतु आधीच पुष्कळ देशांत कायद्याने बंदी आहे. तरी व्यवसाय चालूही आहे. त्यामुळे हे स्पष्टीकरण कुठल्याही नव्या धोरणाकरिता क्रियाशील मदत करत नाही.

माझ्या मते क्रियाशील महत्त्वाचा मुद्दा असा : जर व्यवसाय आवश्यक असेल, तर त्या धोकादायक व्यवसाय करणार्‍या कामगारांना धोक्याच्या मानाने योग्य असा मोबदला मिळायला हवा. (नाहीतर कोणी म्हणेल शेती आवश्यक आहे म्हणून आम्ही काही लोकांना बिगरवेतन शेतीकामाला लावू... वगैरे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शनिवारच्या लोकसत्तामधला आरती कदम यांनी लिहीलेला 'बलात्काराचा अर्थ' हा लेख वाचावा असा. सदर चर्चाविषयाशी संबंधित आहेच असं नाही, पण लैंगिक गुन्हेगारीसंदर्भात चर्चा असल्यामुळे इथे लिंक द्यावीशी वाटली.

वेश्याव्यवसाय कायदेशीर केल्यास निदान कायद्याचे संरक्षण वेश्यांना मिळू शकेल. वय सरल्यावर प्रॉव्हिडंड फंड, ग्रॅच्युईटी मिळून त्यांचं पुढचं आयुष्य बरं जाईल का इत्यादी, इत्यादी प्रश्न पडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जपानमधे हे गून्हे घडतात काय याची कोणाला माहीती आहे काय ? कारण अन्न, वस्त्र, निवारा व लैगीक सूख ही मानवाची प्राथमीक गरज आहे असं तिथं मानतात असं एका प्रवासवर्णनात वाचलं होतं... जर हे खरं असेल व गून्हेही फार घडत नसतील तर मग... चर्चेला जागाच उरली नाही म्हणायचं.

राहीला मूद्दा वेश्या व्यवसायाचा, मी स्वतः वकिल नाही व कायद्याची नेमकी व्याख्या मला ठाऊक नाही, पण भारताचा विचार केला तर वेश्याव्यवसायाबाबत कायदेशीर व्याख्या फारच धूसर आहे हे माहीत आहे, त्याच स्वरूप साधारण असं आहे, म्हणजे वेश्याव्यवसायाची परवानगी आहे, पण तो सार्वजनीक ठीकाणापासून काही ठरावीक मीटर अंतर सोडून असलेल्या व खाजगी मालमत्तेतच व्हावा तसेच, तसच ज्या व्यक्तीला व्यवसाय करायचा असेल त्याचाशी गिर्‍हाइकाचा डायरेक्ट संपर्क असावा एजंट्गीरीला कोणत्याही परीस्थीती कायदेशीर परवानगी नाही, तसेच हा व्यवसाय करायला भाग पाडणे, अथवा कमाइत वाटा असणे ही बेकायदेशीर आहे. थोडक्यात कामवासना फारच असणार्‍या (स्त्रियांना) व्यक्तिना स्वेछ्चेने व्यवसाय करायची परवानगी हिंदू धर्म देतो हे तत्व फोलो झालेले दिसते.

नूकतच (२३नोवेम्बेर पासून) बिग-बॉस बघायला सूरूवात केली कारण पॉर्नस्टार सनी-लिओन (ही कोण हे दूर्दैवाने याआधी माहीत न्हवतेच Sad ). एकदम लोभस व गोड आहे मूलगी, व तिथल्या लोकांनाची तर फार लाडकी पण बनली आहे, इतकी त्यांनी तिला गॅरंटी दिली आहे की तूला या कार्यक्रमामूळे बॉलीवूडच्या ऑफर येणारच येणार. कोणालाही हे माहीत नाही की ती पॉर्न स्टार आहे ते. आता तिने सांगीतलय की वेळ आल्यावर ती हे स्वतःच उघड करेल, तेव्हां इतरांचे चेहरे बघण्यासारखे असतील. पण ती हे मोकळेपणाने बोलते की जेव्हां हे मी स्वेछ्चेने करायचा निर्णय घेतला तेव्हां कूटूंबाला व जवळच्या मित्रांना धक्काच बसला. पण हळूहळू त्यांनी परीस्थीतीशी जूळवून घेतले व संबध तोडले नाहीत. आता हे ज्या व्यक्तींच्या बाबत घडू शकते त्यांनी व्यवसाय करायला हरकत नसावी. अर्थात ति अमेरीका आहे व तिथे कायदेशीर संरक्षण व आरोग्यविषयक कायदेही जास्त कडक आहेत हे नक्कि. तेव्हां सदरील धाग्याच्या द्रूश्टीकोनातून यावरही आता लक्ष ठेवावे म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्त्री वैश्या, पुरुष वैश्या, हिजडे (क्रॉस ड्रेसर्स), समलैंगिक स्त्री व पुरुष वैश्या अश्या प्रकारे वैश्यांव्यवसायाचे ढोबळ ५ प्रकार सांगता यावेत ज्यात शारिरिक संबंध अपेक्षित असतात. या प्रत्येकांची कारणे, प्रश्न, स्वरूप वेगवेगळे असावे. तेव्हा 'वैश्या व्यवसाय' या एकाच कॉमन लेबलखाली त्यांना आणणे कठीण वाटते. दुसरे असे. असा व्यवसाय राजरोस करणार्‍यांना एकवेळ कायद्याचे संरक्षण देता यावे पण मग अंगवस्त्रे, 'ठेवलेल्या स्त्रिया', रखेल्या किंवा मग धार्मिक मुलाम्याआडून बर्‍याचदा हाच व्यवसाय करणारे देवदास, देवदासी, वाघ्या-मुरळी यांचा विचार कसा व्हावा? तसेच परस्परसंमतीने लग्नापेक्षा वेगळ्या जोडीदाराशी ठेवलेल्या संबंधांना वैश्यागमन म्हणावे का? अगदी उच्चभ्रु समाजातही अनेक पुरुष व स्त्रीया आपल्या जोडीदाराव्यतिरिक्त इतरांशी (चोरून) संबंध ठेवतात अशी वावडी आपण ऐकतो (असे असल्यास प्रकरण नेहमीच झाकलेले असते), अश्या व्यक्तींना वैश्या म्हणावे का? का ज्या शारिरिक संबंधात आर्थिक देवाणघेवाण आहे त्यालाच वैश्यावय्वसाय म्हणायचे? मग अगदी तुमच्या-आमच्या इमारतीत चालणारे हे छुपे प्रकार काय म्हणायचे? (जर आमच्याइथे नाहि हो चालत असं असं जर म्हणत असाल तर नुसतंच मोठं व्हा नाहि तर म्हणेन डोळस व्हा Wink )
थोडक्यात, जर असा कायदा करायचाच तर तो तयार करणे आणि त्याची अंमलबजावणी दोन्ही कठीण आहे

असो. माझे मत, माणूस हा इतर प्राण्यांप्रमाणे लैंगिक व्यवहार व हिंसा या दोन्ही मधुन पशुतेकडून मानवतेकडे चालला आहे. हे काहि कायद्याने किंवा एका दिवसांत होण्यासाअरखे नाहि. काहिशे वर्षांत बलात्कार व हिंसा यांचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी झालं असेल अशी अपेक्षा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वैश्या हा शब्द न वापरता वेश्या हा शब्द उचित ठरेल.
वैश्य हा शब्द व्यापारी वर्गासाठी (चातुर्वर्ण्य) अभिप्रेत आहे. ह्या शब्दप्रयोगाने अर्थाचा अनर्थ होतोय. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

ह्म्म माझ्या माहितीनुसार वैश्य हा वर्ग आहे वैश्या असा नव्हे .. असो.. मात्र 'वैश्या' चुक आणि 'वेश्या' बरोबर आहे हेही खरेच.. पण आता तुम्ही बुच लावले असल्याने प्रतिसाद अपडेटता येणार नाही Smile

तेव्हा सुज्ञ वाचकांनी वैश्या हा शब्द वेश्या असा वाचावा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>वेश्याव्यवसाय जर कायदेशीर केला तर समाजात होणारे लैंगिक गुन्हे आणि समाजातील लैंगिक विकृती कमी होईल काय?

असे म्हणणे म्हणजे जास्तीत जास्त उपाहारगृहे काढल्याने समाजातल्या उपाशी लोकांची संख्या कमी होईल का असे विचारणे होय.
ज्या देशांमध्ये वेश्याव्यवसाय कायदेशीर आहे तिथेही लैंगिक गुन्हे घडतातच. लैंगिक उपासमार हे लैंगिक गुन्ह्यांचे कारण वाटत नाही.
लैंगिक गुन्हे कमी करण्यासाठी कडक कायदे, त्यांची परिणामकारक अंमलबजावणी आणि लोकांनी सावधगिरी बाळगणे हे उपाय आहेत.
वेश्याव्यवसाय कायदेशीर केल्याने सध्याच्या वेश्यांचे जीवनमान सुधारेल की नाही हा वेगळा वादाचा मुद्दा आहे; पण वेश्याव्यवसाय कायदेशीर केल्याने लैंगिक गुन्हे कमी होतील हा नक्कीच भ्रम आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

उत्तम प्रतिसाद.
पन्नास ओळीतही जे सांगता आले नसते ते श्री.नगरीनिरंजन यानी पाचच ओळीत अत्यंत संयुक्तिकरित्या प्रकटले आहे. छानच.
विशेषतः "वेश्याव्यवसाय कायदेशीर केल्याने लैंगिक गुन्हे कमी होतील हा नक्कीच भ्रम आहे." हे वाक्य खूपच वास्तववादी आहे.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> >>वेश्याव्यवसाय जर कायदेशीर केला तर समाजात होणारे लैंगिक गुन्हे आणि समाजातील लैंगिक विकृती कमी होईल काय?
>>>असे म्हणणे म्हणजे जास्तीत जास्त उपाहारगृहे काढल्याने समाजातल्या उपाशी लोकांची संख्या कमी होईल का असे विचारणे होय. Biggrin Lol
हो ना हो, त्याशिवाय फुकट्यान्चे काय? आयुष्यभर फुकटचे ओरबाडुन घ्यायची सवय असलेल्या वासनांधांना तो व्यवसाय कायदेशीर असो वा नसो, काय फरक पडणारे? की वासनांधांमधे रोखीत व्यवहार करणारे वासनांध/ उधार ठेवणारे वासनांध / अन फुकट मिळवू पहाणारे वासनांध, असेही तीन फरक कायद्यात करावे लागतील, नै?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ननिं शी सहमत...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

''मी तंबाखु खाणारच''

एकूण कामवासना ताब्यात ठेवणे शक्य झाले नाही की तो माणूस न राहाता पशू होतो असे समाजातील बर्‍याच लोकांचे म्हणणे दिसते.
पशूंमध्येही अनैसर्गिक कामसंबंध दिसतात असे ऐकून आहे. उदा. सिंहांमधील समलैंगिकता. त्यामुळे अनैसर्गिक ते पशुतुल्य असे सरसकटीकरण योग्य वाटत नाही.
ज्या देशांमध्ये वेश्याव्यवसाय कायदेशीर आहे तिथेही लैंगिक गुन्हे घडतातच. लैंगिक उपासमार हे लैंगिक गुन्ह्यांचे कारण वाटत नाही.
कायदेशीर वेश्याव्यवसाय किंवा मुक्त शरीरसंबंध अशी संस्कृती असणार्‍या देशांत भारताच्या तुलनेने लैंगिक गुन्हे कमी प्रमाणात होत असावेत असा माझा समज आहे. हा फक्त समजच. याबाबत कोणताही विदा माझ्याकडे नाही. दीर्घकालीन आणि प्रखर लैंगिक उपासमार विवेकावर मात करुन सद्वर्तनी माणसालाही लैंगिक गुन्ह्याकडे वळवत असेल असे मला वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

प्रतिसाद उथळ व पांचट नसावेत ही अपेक्षा छानच आहे. मात्र मूळ धाग्यात काही त्रुटी जाणवल्या.

वेश्याव्यवसाय जर कायदेशीर केला तर समाजात होणारे लैंगिक गुन्हे आणि समाजातील लैंगिक विकृती कमी होईल काय?
>>>

वेश्याव्यवसाय कायदेशीरच असतो. वेश्यांना लायसेन्स वगैरे नसले तरी 'स्वेच्छेने शरीरविक्रय' कायद्यात मान्य केला गेलेला आहे. दलाली, जबरदस्तीने शरीरविक्रय करायला लावणे, भडवेगिरी हे गुन्हे आहेत. वेश्याव्यवसाय कायदेशीर नसता (म्हणजे 'स्वेच्छेने शरीरविक्रय) तर बुधवार पेठेतील वेश्या रस्त्यावर उभ्या राहिल्याच नसत्या. असा व्यवसाय कायद्याने मान्य केलेला असतानाही बलात्कार, शोषण इत्यादी गुन्हे होतच असतात कारण कित्येक टक्के समाज वेश्येकडे जातच नसतो. वेश्याव्यवसाय कायदेशीर (जो आहेच) केल्याने (दुर्दैवाने) लैंगीक विकृती कमी होणार नाहीत. डार्विनच्या (उत्क्रांतीवादातील) मताप्रमाणे 'अ मेल ऑल्वेज ट्राईज टू फाईन्ड मेटिंग अपॉर्च्युनिटिज'! स्त्री (पर - सहसा) दिसली की पुरुषाच्या मनात तेच विचार येतात. हा निसर्ग असून इतिहासातील कोणतीही संस्कृती या प्रवृत्तीवर कोणताही निर्बंध परिणामकारकरीत्या लागू करू शकलेली नाही.

तसे असेल तर लैंगिकदृष्ट्या अतृप्त स्त्रियांनी आपल्या वासनांच्या शमनासाठी काय करावे?>>>

काय करणार? समाजाला न समजता (इफ अ‍ॅट ऑल दे केअर) एक मित्र मिळवावा! दुसरे काय करू शकणार?

-'बेफिकीर'!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लैंगिकदृष्ट्या अतृप्त स्त्रियांनी आपल्या वासनांच्या शमनासाठी काय करावे?>
पुरूष वेश्या असतात की.

हिंमत असली की समाजाचं काय? सरळ हवे तितके मित्र ठेवावे. वन नाईट स्टँड ठेवावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बोलूच का इथे?
की आवरुन घेऊ?

आपल्या पैकी किती पुरुषांनी वेश्यागमन केले आहे? किंवा किती वेश्यांशी आपण बोलला आहात? काही विदा? मजकडे आहे. थोडा अनुभव. गमनाचा नाही, पण बोलण्याचा. उगा मेंटल मास्टरबेशन या धाग्यावर सुरू आहे हे माझे स्पष्ट मत आहे.

वेश्येवर बलात्कार होऊ शकतो. अन तसाच तो घराघरांत अनेक 'पत्नींवर' होत असतो. अनेकदा. अन अनेक बलात्कार स्त्री सहन करीत असते, अन पुरुष येताजाता अनेक स्त्रीयांवर नजरेने बलात्कार करीत असतात.

मनुष्य ही एकच हीन जात (स्पेसीज) या जगात आहे जिथे स्त्री(मादी)च्या इच्छे शिवाय वा विपरीत पुरुष(नर) तिला संभोगास भाग पाडतो अथवा 'बलात्कार' करतो. ही एकच लैंगिक विकृती इतर प्राण्यांत आढळलेली माझ्यातरी ऐकिवात नाही.

प्रत्येक पुरुषास त्याचे 'जीन्स' जास्तीत जास्त स्त्रीयांत 'पेरावेसे' वाटतात हे सत्य. अन त्याच वेळी स्त्रिया त्यांना आकर्षित करू शकणार्‍या 'नरपुंगावास' आमंत्रण देतात. हेही तितकेच सत्य. लैंगिक उपासमार फक्त पुरुषांची होत नाही. स्त्रीची ही होते. अन ती मार्गही काढत असते. अन तेच पुरुष करतो.

बलात्कार ही विकृती आहे. गुन्हेगारी तुम्ही यालाच म्हटले असावे. कारण तो कायद्याने गुन्हा आहे. असो. भरपूर बोलून झाले. स्पेसिफिक आक्षेपांना खरड/निरोपातून उत्तर दिले जाईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मी पुरूष नाही. पण वेश्यांशी बोलले आहे खूपदा. तृतीयपंथिय वेश्यांशी पण.(एडस विभागात काम केल्याने असेल)
तुमच्यापूर्ण प्रतिक्रियेशी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आडकित्ता,

किती पुरुषांनी वेश्यागमन केले आहे?>>>

मी केले आहे. बुधवार पेठेत दोन वेळा आणि मुंबईला एकदा!

फोरास रोडला!

तुम्ही केले नसलेत तर प्रश्न विचारून काय साधू पाहात आहात माहीत नाही. बहुधा 'ह्यॅ, नुसते सगळे फोरम मिळाला आहे म्हणून बोलतायत, प्रत्यक्षात कोण काय करतो' असा काहीतरी अहंगंड असावा!

किती वेश्यांशी आपण बोलला आहात>>>

वेश्यागमनच केलेले असल्याने बोलण्याचा क्षुल्लक प्रश्न अस्तित्वात येण्याचे कारणच नाही.

उगा मेंटल मास्टरबेशन या धाग्यावर सुरू आहे हे माझे स्पष्ट मत आहे.>>>

मास्टरबेशनचा नवीन प्रकार समजला. 'ब्लो जॉब' हा वेगळाच! (धागा अतिशय धाडसी असल्याने बहुधा बोलायला हरकत नसावी)

ही एकच लैंगिक विकृती इतर प्राण्यांत आढळलेली माझ्यातरी ऐकिवात नाही.>>>

भाद्रपद या मराठी महिन्यात श्वानजमातीचे निरिक्षण केल्यास हा समज बदलावा. मांजरीचेही नर पिल्लू मोठे झाल्यावर आईशी संभोग करते.

प्रत्येक पुरुषास त्याचे 'जीन्स' जास्तीत जास्त स्त्रीयांत 'पेरावेसे' वाटतात हे सत्य. अन त्याच वेळी स्त्रिया त्यांना आकर्षित करू शकणार्‍या 'नरपुंगावास' आमंत्रण देतात. हेही तितकेच सत्य. लैंगिक उपासमार फक्त पुरुषांची होत नाही. स्त्रीची ही होते. अन ती मार्गही काढत असते. अन तेच पुरुष करतो.>>>

मूळ धागाकर्त्यानेही बहुधा हेच किंवा असेच काहीसे म्हंटलेले आहे व त्याला (किमान मी तरी) हरकत घेतलेली नाही. Smile

स्पेसिफिक आक्षेपांना खरड/निरोपातून उत्तर दिले जाईल.>>>

का? मुळात तुम्ही जे लिहिलेत त्यात आक्षेपार्ह बिक्षेपार्ह तर जाऊचदेत, विशेषच काय आहे? (अवांतर - कृपया असे समजू नका की श्रेणीसाठी मी काही प्रतिसाद देत असेन बिसेन)

-'बेफिकीर'!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाद्रपद या मराठी महिन्यात श्वानजमातीचे निरिक्षण केल्यास हा समज बदलावा. मांजरीचेही नर पिल्लू मोठे झाल्यावर आईशी संभोग करते.

ही विकृती आहे? प्राण्यांसाठी खचितच नाही.
बहुदा तुम्ही आणि अडकित्ता एकच सुपारी कातरताय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकच सुपारी नव्हे! Smile

पिल्लू आईवर जबरदस्ती करते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कधीच जबरदस्ती नसते त्यात. तुमचे निरिक्षण तोकडे पडते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आणि समजा होत असली कुत्र्या-मांजरात जबरदस्ती म्हणून माणसांमध्ये त्याचं समर्थन कसं होऊ शकतं? इथे विषय सर्व प्राण्यांचा नसून फक्त माणसाचा चालू आहे असे मला वाटते.
पुरुषाने जास्तीत जास्त स्त्रियांना फलित करावे ही त्याची जनुकीय प्रेरणा असली तरी माणसाच्या प्रगत मेंदूमुळे कित्येक जनुकीय प्रेरणांप्रमाणे ही प्रेरणाही तो ताब्यात ठेवू शकतो आणि आजच्या समाजात तेच अपेक्षित आहे.
जर पूर्णतः जनुकीय प्रेरणेने वागायचे म्हटले तर वेश्याव्यवसाय, कायदा आणि गुन्हे हे तिन्ही प्रकार मानवी संस्कृतीसह नाहिसे होतील आणि या वादाचा निकाल लागेल.
इतर ठिकाणी स्वतःला प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ समजायचं आणि सोयीस्कर ठिकाणी प्राण्यांच्या वागण्याचे दाखले द्यायचे हा शुद्ध दुटप्पीपणा आहे.
सुंदर स्त्री कडे पुरुष आणि सामर्थ्यशाली पुरुषाकडे स्त्री आकर्षित होणे ही प्रकृती असली तरी दुसर्‍याच्या भावनांचा आदर राखून जबरदस्ती न करणे ही संस्कृती आहे.
ही संस्कृती टिकवायची असेल तर "माझी भूक भागवा नाहीतर मी गुन्हे करीन" असं म्हणणार्‍यांना आणि तसं वागणार्‍यांना कठोर शासनच केले पाहिजे, वेश्याव्यवसायास उत्तेजन देणे हा उपाय नव्हे.
खरोखर गुन्हे कमी करण्यासाठी लैगिक संबंधांबाबत मोकळेपणा, शिक्षण, खुली चर्चा, अपराधाबाबत कडक कायदे आणि एकूणच निकोप सामजिक वातावरण आवश्यक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@ नगरीनिरंजन : माय पॉइंट एक्झॅक्ट्ली. माझा मुद्दा नेमका पकडलात. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रेप & इन्सेस्ट
ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अन दोन वेगळ्या नीतीमत्ता. विवाहसंस्था जितकी 'सुपरफिशियल' आहे मानवी इतिहासाच्या परिमाणात, तितकीच इन्सेस्ट. तेंव्हा मांजरीच्या पिलाचे उदाहरण अवाजवी.

आपल्याकडे भेटीचा विदा आहे, याबद्दल आनंद. तुम्हाला अजुन एड्स नाही झाला याबद्दल परमानंद.

वेश्येचे 'जगणे' ही खूप वेगळी गोष्ट आहे. एकाद्या दुकानदारास दुकानात गिर्‍हाईक म्हणून भेटणे अन इतर वेळी तो दुकानात नसताना भेटणे / बोलणे यात थोडा फरक असावा असे मला तरी वाटते. हेच मी बोललो तेव्हा अभिप्रेत होते.

मास्टरबेशनचे प्रकार यासाठी व्यनीत ट्यूशन घेण्यात येईल.

मूळ धागाकर्त्यांनी जे मांडले, ते असे, कि लैंगिक उपासमार झाली तर लोक ते सुख ओरबाडून घेतात. कदाचित याला हिंदी पिक्चरमधे 'छोटा' हीरो 'रोटी की चोरी' करते हुए पकडा जाता है, और फिर आगे चलकर ज्वेल्थीफ या बडा डाकू बनता है आदी 'वास्तववादी' चित्रण कारणीभूत असेल.

भूक लागली म्हणून अन्न ओरबाडून घेणे, याला कारण अन्नाची मक्तेदारी आहे. माणूस 'हंटर-फोराजिंग' अवस्थेत असताना हे नव्हते. तेच बलात्काराबाबत. प्राण्यांत तरूण नरांना कळपातून हाकलून देण्यात येते. तेही चोरून वा मुख्य नराशी युद्ध करून माद्या 'कमावतात' पण शेवटी संभोग हा मादीच्या इच्छेवर अवलंबून. म्हणून बलात्कारास विकृती म्हटले.

तुमच्या पुढील प्रतिसादाच्या अपेक्षेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आपण माझ्या सदस्यत्वाच्या नावाला ('ची' असे म्हणणार नाही - हा हा व हे 'हा हा' अजून एकूण सहा वेळा) 'जी' का लावत आहात हे माहीत नाही. हे खरे आहे मात्र, की माझे निरिक्षण तोकडे पडते. समजा मी एखाद्या कुत्रीला झालेल्या पिल्लाने तिच्यावरच जबरदस्ती केल्याचे पाहिले असेल तर त्या निरिक्षणाला तितकासा अर्थ कदाचित राहणार नाही कारण ती कुत्री किंवा तिचे ते नर पिल्लू 'माणसाळलेले'ही असू शकेल.

'इन्सेस्ट' या शब्दाचा अर्थ मी 'नातेसंबंधातील / कुटुंबातील व्यक्तींबरोबर लैंगीक संबंध असा घेत आहे. नक्की माहीत नाही.

आणि 'सुपरफिशियल' या शब्दाचा अर्थ मी 'अंधश्रद्धाळू' असा 'काहीसा' घेत आहे व तेही योग्य / अयोग्य माहीत नाही.

पण प्राणी आपल्याच आई / बहिणीवर (बहीण मान्य आहे असे तर नाही ना?) 'अक्षरशः' जबरदस्तीच करताना दिसतात हे कोणत्या सदरात मोडते हे मला माहीत नाही.

आपल्याकडे भेटीचा विदा आहे, याबद्दल आनंद. तुम्हाला अजुन एड्स नाही झाला याबद्दल परमानंद.>>>

'विदा' म्हणजे 'विशिष्ट दाखला' का?

आपल्या परमानंदाच्या सद्भावनांचा आदर आहे. Smile

मात्र ती दोन्ही विधाने अवांतर आहेत.

वेश्येचे 'जगणे' ही खूप वेगळी गोष्ट आहे. >>>>

हे विधान अवांतर आहे.

या विधानावर खूप हासण्याचा स्मायली या संकेतस्थळावर कोठे व कसा उपलब्ध आहे हे माहीत नसल्याने येथेच थांबतो.

मास्टरबेशनचे प्रकार यासाठी व्यनीत ट्यूशन घेण्यात येईल.>>>>

हे विधान अवांतर आहे.

बाकी - कोणाला शिकवण्यात अडचण आल्यास जरूर विचारा

प्राण्यांत तरूण नरांना कळपातून हाकलून देण्यात येते. तेही चोरून वा मुख्य नराशी युद्ध करून माद्या 'कमावतात' पण शेवटी संभोग हा मादीच्या इच्छेवर अवलंबून. म्हणून बलात्कारास विकृती म्हटले.>>>>

आर्तपणे 'नाही हो' म्हणतो! सर्वसाधारणतः ज्या प्राण्यांचा अभ्यास बिभ्यास केला जातो ते वेगळेच असतात. आपल्याला अगदी नेहमीच्या रस्त्यावर मी म्हणतो ते प्रकार बघायला मिळतात. ( एक कुत्री पाळून पाहिल्यास अनुभव यावा )

अत्यंत अवांतर प्रतिसाद दिल्याबद्दल मूळ धागाकर्ता / कर्ती / प्रशासक यांच्यासमोर दिलगीर!

-'बेफिकीर'!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला जेजे अवांतर वाटले ते सोडून द्या, फक्त एक 'फेवर' म्हणून.
सुपरफिशियल म्हणजे, वरवरचे, विदा म्हणजे डेटा, असा अर्थ घ्यावा.

पाळीव प्राणी व 'दिसणारी' जबरदस्ती:
गल्लीत फिरणारी कुत्री अन त्यातल्या नरांत होणारी भांडणे तुम्ही पाहिलीच नाहीत का? कुत्री कोणत्या कुत्र्याला परवानगी देते? घरात पाळून ठेवल्यावर होणारी 'इन्सेस्चुअस' 'जबरदस्ती' म्हणजे केवळ मक्तेदारी निर्माण झाल्यावर अनुषंगाने येणारे ओरबाडणे असे तुम्हाला वाटत नाही का?
असो.
मी तुमच्याशी भांडण करीत नाहिये. माझे म्हणणे तुमच्यापर्यंत पोहोचविण्यात तोकडा पडलो असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

याचा खरे तर 'लैंगीक उपासमारी व गुन्हेगारी' याच्याशी 'थेट' संबंध नसेलही, पण सर्वसाधारणतः कुत्री बहुधा त्यातल्यात्यात रुबाबदार कुत्र्याला परवानगी देत असावी. त्यातील परिमाणे मला तरी माहीत नाहीत. खरडवहीत काहीतरी खरडले आहे आपल्या! असो! मलाही भांडायचे नाही. जबरदस्ती हा नराला निसर्गाने (दुर्दैवाने) दिलेला एक शारिरीक अधिकार आहे असे आपले वाटले.

Smile

-'बेफिकीर'!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय ज्ञानवर्धक चर्चा आहे.
बाकी पशुंमधे बालपण गेल्यावर फक्त नर अन मादी असे दोनंच नाते असतात असे डीस्कव्हरीवरच्या काही कार्यक्रमात पाहीलेले आठवतेय. इतर सगळी नाती ही मानवनिर्मित आहेत. असो.

मुळ मुद्द्यावर : कीतीही कायदा केला तरी बलात्कार थांबणार नाहीत. लैंगीक उपासमार असलेले सगळेच जण वेश्यागमन करत असतील असं गृहीत धरायचे काही कारण नाही. अन हवी असणारी व्यक्ती संभोगाला तयार असेलच असेही नाही त्यामुळे लैंगीक गुन्हे खुपच कमी होतील किंवा बंद होतील असेही नाही. हे आपलं माझं मत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतर सगळी नाती ही मानवनिर्मित आहेत. असो.

संभोगाच्या बाबतीत अगदीच मानवनिर्मित म्हणता येणार नाही. जवळच्या नातेसंबंधातल्या स्त्री/पुरूषापासून झालेली संतती रोगट असण्याची शक्यता फार वाढते. मानव वगळता इतर कोणी प्राणी आनंदासाठी संभोग करतात का नाही हे मला माहित नाही, असले तरी संख्येने कमीच असतील. रोगट प्रजा जगवण्यासाठी इतर प्राण्यांमधे फार प्रयत्नही होत नाहीत, जसे माणसांत होतात. त्यामुळे जवळच्या नात्यांतल्या स्त्री/पुरूषांशी (उदा: आई-वडील, बहिण-भाऊ) पुनरूत्पादनासाठी समागम करू/होऊ नये हे नैसर्गिक प्रेरणेशी समांतर वाटतं.

मूळ मुद्द्यावरच्या तुझ्या मतावर सहमती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

थेट सख्खा मामा, सख्खी मामेबहिण,सख्खा मामेभाउ,सख्खी चुलत बहिण,सख्खा चुलत भाउ ,सख्खा चुलता हे जवळच्या नातलगात येतात का?
खूप दिवसाप्पासून हे कुतूहल आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

असे म्हणतात, सख्ख्यांमधे (तुम्ही वर म्हटलेल्या नात्यांतही) लैंगिक नातेसंबंध ठेवल्यास होणारी संतती सुदृढ असेलच याची खात्री नाही. तेव्हा (ज्यांना) असे नातेसंबंध ठेवायचे असल्यास त्यापासून संतती होणार नाहि याची काळजी घेणे चांगले.

बाकी, याचे जेनेटिक / बायोलॉजिकल विश्लेषण करायला, सत्यासत्यता सांगायला आता आपल्याकडे (हक्काचे) दागदरबाबु हायेतच की Wink

तुम्ही विचारताय तसे संबंध पूर्वी होते हे सांगणार्‍या, भारतीय विवाहसंस्थेचा इतिहासचा इतके वेळा जालावर संदर्भ देऊन झाला आहे की ते तुम्ही वाचले असेलच असे गृहित धरतो Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी उल्लेख केलेल्या नात्यात जगभर भरपूर संबंध आहेत. काही खुद्द भारतातल्याच भागात आहेत. तर काही अरब जगतातील किंवा इस्लामी संस्कृतीचे वर्चस्व असणार्‍अय भागातील आहेत. ते तितके टाकाउ असते incest प्रमाणे, तर आधीच संस्कृतींनी त्याज्ज्य ठरवले नसते का? मध्यपूर्वेत बहुतेक सावत्र नात्यातही (half brother, half sister) संबंध होतात म्हणे.
संस्कृतींणी अनुभवजन्य गोष्टींचा एक उत्त्म साचा तयार केला अहे असे मानले जाते, मग आधुनिक जगातच ह्यालाच नकार का येतो आहे?(विशेषतः पाश्चिमात्त्यांचे जसे जसे अनुकरण होत आहे तसे तसे.)

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास संपूर्ण वाचलेला नाही. पण त्यातील काही भाग एक्सायटिंग विधी असलेला व वादग्रस्त ठरलेला जालोपलब्ध भाग वाचला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पण, आता, आधुनिक जगात अनुवांशिक रोग होण्याची शक्यता जवळच्या (जीन्स समान असल्याने डॉमिनंट, रिसेसिव्ह जीन्सची भानगड) नात्यात लग्न केल्यास वाढते. जेव्हढं जवळचं नातं तेव्हढी रिस्क जास्त. उदा. आईच्या खानदानात जर डायबेटीस (फक्त उदाहरण, जीन्सच गणित इथे वेगळं असू शकत) बहुसंख्यांना असेल तर तुम्ही मामाच्या मुलीशी लग्न केल्यास तुमच्या अपत्याला डायबेटीस होण्याची 'शक्यता' अनेकपटीने वाढू शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मी उल्लेख केलेल्या नात्यात जगभर भरपूर संबंध आहेत. काही खुद्द भारतातल्याच भागात आहेत. तर काही अरब जगतातील किंवा इस्लामी संस्कृतीचे वर्चस्व असणार्‍अय भागातील आहेत. ते तितके टाकाउ असते incest प्रमाणे, तर आधीच संस्कृतींनी त्याज्ज्य ठरवले नसते का?

त्याज्य ठरवलेच असते असं म्हणता येत नाही; कारण त्याज्य ठरवण्यासाठी आधी त्याचं कारण समजलं पाहिजे.
एखाद्या अवयवाचा उदा: आंत्रपुच्छ (अ‍ॅपेंडीस), स्प्लीन या अवयवांचा आपल्याला तसा फारसा फायदा नाही म्हणून ते झडतीलच असं म्हणता येत नाही. ज्यांचे असे अवयव झडतील त्यांच्या सर्व्हायव्हल (मराठी?) शक्यता वाढेल. (यात हे दोन अवयव तापदायक झाल्यास शस्त्रक्रियेने काढता येतात याचा विचार केलेला नाही.)

भारतातल्या पारशी जमातीत अगदी सर्रास जवळच्या नातलगांमधे लग्न होतात्/व्हायची आणि पुढची पिढी व्यंग घेऊन जन्माला यायची हे एक ऐकीव उदाहरण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मानव वगळता इतर कोणी प्राणी आनंदासाठी संभोग करतात का नाही हे मला माहित नाही, असले तरी संख्येने कमीच असतील.
डॉल्फिन असे करतात असे ऐकून आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

त्यामुळे जवळच्या नात्यांतल्या स्त्री/पुरूषांशी (उदा: आई-वडील, बहिण-भाऊ) पुनरूत्पादनासाठी समागम करू/होऊ नये हे नैसर्गिक प्रेरणेशी समांतर वाटतं.

असहमत. कळपाने राहणार्‍या बहुसंख्य प्राण्यांमध्ये (अनेक मादी, एक मुख्य नर) माद्यांना किंवा आईकडूनच जन्माला आलेल्या माद्यांना (म्हणजे नातातल्या) दुसर्‍या पिढीतला(मुलगा किंवा भाऊ) सशक्त नर प्रेग्नेट करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

बाकी पशुंमधे बालपण गेल्यावर फक्त नर अन मादी असे दोनंच नाते असतात असे डीस्कव्हरीवरच्या काही कार्यक्रमात पाहीलेले आठवतेय. इतर सगळी नाती ही मानवनिर्मित आहेत.
सहमत.
प्रत्येक स्त्रि ही प्रत्येक पुरुशा ( पोटफोड्या कसा हो लिहायचा ?) साठी फक्त एक मादीच असते ह्या एकेकाळच्या अतिशय जवळच्या व्यक्तिच्या वाक्याचा वारंवार पडताळा / अनुभव येतो.
एक मानव म्हणुन माझ्यासाठी ही एक नामुश्कीची बाब आहे.
आपण जर पशु आहोत आणि तसंच आपल्याला वागायचं आहे तर मग ही सर्व सुशि़क्षित आणि सुसंस्क्रुत ( परत अशुद्धलेखन !!!!!)पणाची ढोंगं हवितच कशाला? एकतर आम्ही म्हणे सर्व प्राणिमात्रात सुपिरिअर, तरी देखील प्रत्येक पुरुशाला प्रत्येक स्त्रि संभोगासाठीच हवी असेल, एक वापरुन झाली कि दुसरी मग तिसरि ( आणि प्रत्यक्ष मिळत नसेल तर विचारात किंवा फोटोत सुद्धा चालेल), आणि तशी ती मिळत नसेल तर त्या साठी काहीही करायची तयारी असेल तर ती वि़क्रुतिच म्हणायला हवी.
( ज्या कुत्र्या मांजरांविशयि वर लिहिलं आहे त्यांची तशी वर्तणुक बारमाही असते का हो? मग मनुश्याला जर पशुंसारखं वागायचं असेल तर तशीच निसर्गाची बंधनं आणि तारतम्यं पाळायला नको?)

लेंगिक उपासमार नाही असं माझं मुळीच म्हणणं नाही पण केवळ हेच कारण गुन्हेगारीचं नसावं. विक्रुति ही असावीच काही स्तरांवर, पण रेप/ इन्सेस्ट यांची या व्यतिरिक्तं बायोलॉजिकल, सोशियो / सायकॉलॉजिकल, आणि काही इतरही कारणं असु शकतिल. त्यांची इथे मला चर्चा दिसली नाही येवढच.
वेश्या व्यवसाय हा देखील फक्तं मानव जमातितच. अ‍ॅन्थ्रॉपॉलॉजी ( विशेशतः मार्गारेट मीड यांची पुस्तके) मध्ये मानवाच्या या वागणुकीबद्दल अधिक विचार मान्डले आहेत असे वाचल्याचे स्मरते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Sh = ष
skRu = स्कृ
बाकी उत्तर नंतर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

बाकी पशुंमधे बालपण गेल्यावर फक्त नर अन मादी असे दोनंच नाते असतात असे डीस्कव्हरीवरच्या काही कार्यक्रमात पाहीलेले आठवतेय. इतर सगळी नाती ही मानवनिर्मित आहेत.
सहमत.
प्रत्येक स्त्रि ही प्रत्येक पुरुशा ( पोटफोड्या कसा हो लिहायचा ?) साठी फक्त एक मादीच असते ह्या एकेकाळच्या अतिशय जवळच्या व्यक्तिच्या वाक्याचा वारंवार पडताळा / अनुभव येतो.

बाकी, पशूंमध्ये बालपण गेल्यावर.. हे काहिसे तुम्ही पशूंबरोबर बालपण घालवलेत असे ऐकू येते.
मनुष्य सोडून इतर (बाकी) पशूंची बाल्यावस्था संपल्यानंतर पशूंमध्ये नर व मादी हीच दोन नाती उरतात, असे आपणास म्हणावयाचे असावे.

पुरुष हाच फक्त बलवान असे प्रिमाईस ठेवल्यास, तुमचे दुसरे वाक्य खरे ठरते. पण स्त्री प्रत्येक पुरुषाकडे 'तशा' नजरेतून कधी(च) पहातच नाही काय?

एक मानव म्हणुन माझ्यासाठी ही एक नामुश्कीची बाब आहे.

तुमचे मत तुमच्या दॄष्टिने योग्यच. मान्य.

आपण जर पशु आहोत आणि तसंच आपल्याला वागायचं आहे तर मग ही सर्व सुशि़क्षित आणि सुसंस्क्रुत ( परत अशुद्धलेखन !!!!!)पणाची ढोंगं हवितच कशाला? एकतर आम्ही म्हणे सर्व प्राणिमात्रात सुपिरिअर, तरी देखील प्रत्येक पुरुशाला प्रत्येक स्त्रि संभोगासाठीच हवी असेल, एक वापरुन झाली कि दुसरी मग तिसरि ( आणि प्रत्यक्ष मिळत नसेल तर विचारात किंवा फोटोत सुद्धा चालेल), आणि तशी ती मिळत नसेल तर त्या साठी काहीही करायची तयारी असेल तर ती वि़क्रुतिच म्हणायला हवी.

पुरुष जसा पॉलिगॅमस असतो, तशीच स्त्रिही नेहेमी अधिक सशक्त नराच्या शोधात असते. जाहीर नसलेले विबासं जे भरपूर प्रमाणात समाजात प्रचलित आहेत, ते काय दर्शवितात? जॉन अब्राहम वर लाईन मारणार्‍या मुली नाहीतच का? किंवा आधीच्या पिढीत जितेंद्रला/राजेश खन्नाला/दिलीपकुमारला इ.इ. पाहून 'स्वून' होणार्‍या तरूणी नव्हत्याच का??

( ज्या कुत्र्या मांजरांविशयि वर लिहिलं आहे त्यांची तशी वर्तणुक बारमाही असते का हो? मग मनुश्याला जर पशुंसारखं वागायचं असेल तर तशीच निसर्गाची बंधनं आणि तारतम्यं पाळायला नको?)

इथे 'बायोलॉजी' आडवी येते. मानवी मादी दर महिन्याला 'माजावर' येते. प्राण्यांत हे वर्षातून एकदा होते. मानवी मादी प्रत्येक पाळीत गर्भधारणा करीत नाही, प्राण्यात बहुधा प्रत्येकच वेळी हे होते. मानवी मादीने प्रत्येक वेळी गर्भार न होणे हे गेल्या अर्ध्या शतकातील आहे. पूर्वी हे असे होत नसे. नॉर्मल ऑब्स्टेट्रिक हिस्ट्री : १२ 'राहिले' ३ अर्धे कच्चे पडले, ४ लहानपणी मेले. अन अत्ता ५ जिवंत आहेत, अशी काहीशी असे. आपल्या आजोबांच्या काळापर्यंत मनुष्यप्राणी पशुवत वागत असत असे आपणास म्हणावयाचे आहे काय? (बाकी अनेक पत्नी, व तत्कालीन विबासं इ. बद्दल काही लिहीत नाही)

लेंगिक उपासमार नाही असं माझं मुळीच म्हणणं नाही पण केवळ हेच कारण गुन्हेगारीचं नसावं. विक्रुति ही असावीच काही स्तरांवर, पण रेप/ इन्सेस्ट यांची या व्यतिरिक्तं बायोलॉजिकल, सोशियो / सायकॉलॉजिकल, आणि काही इतरही कारणं असु शकतिल. त्यांची इथे मला चर्चा दिसली नाही येवढच.
वेश्या व्यवसाय हा देखील फक्तं मानव जमातितच. अ‍ॅन्थ्रॉपॉलॉजी ( विशेशतः मार्गारेट मीड यांची पुस्तके) मध्ये मानवाच्या या वागणुकीबद्दल अधिक विचार मान्डले आहेत असे वाचल्याचे स्मरते.

मान्य

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

@आड्कित्त्ता
शुद्ध्लेखनाच्या मदतीबद्दल धन्यवाद.
आता इतर.
माझ्या प्रतिसादातील पहिले वाक्य मी वरील शिल्पा बडवे यांच्या प्रतिसादातून कॉपी पेस्ट केले आहे व त्याच्याशी सहमती दर्शवली आहे. ते वाक्य माझे नाही Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<< प्रत्येक पुरुशाला प्रत्येक स्त्रि संभोगासाठीच हवी असेल, एक वापरुन झाली कि दुसरी मग तिसरि ( आणि प्रत्यक्ष मिळत नसेल तर विचारात किंवा फोटोत सुद्धा चालेल), आणि तशी ती मिळत नसेल तर त्या साठी काहीही करायची तयारी असेल तर ती वि़क्रुतिच म्हणायला हवी. >>

ठळक केलेल्या शब्दांबद्दल - खरं तर असंच काही नाही. प्रेम, ममता वात्सल्य, बौद्धिक भूक भागविणे याकरिता ही पुरुषाला स्त्रीची आवश्यकता पडते. आईच्या / आजीच्या कुशीत शिरणारा, लहान मुलीला जवळ घेऊन कुरवाळणारा, अशा भूमिकांमध्येही पुरूष आहेच की आणि त्यावेळी त्याची स्त्रीकडून असणारी आवश्यकता पूर्णत: वेगळी आहे. इथे मी वयात अंतर असलेल्या स्त्रियांबद्दलची उदाहरणे दिली आहेत.

समवयस्कर स्त्रियांबद्दलही पुरुषांच्या मनात इतर भावना असू शकतात. ’प्लेटोनिक लव्ह’ विषयी आपण जरूर वाचावे.

अर्थात ज्या पुरुषाच्या मनात केवळ ’ती’ एकच गरज असेल आणि इतर कुठल्याही भावनेला थारा नसेल तर ती निश्चितच एक विकृती मानायला हवी ह्या आपल्या विधानाशी सहमत. परंतू ही विकृती हा त्या पुरुषाचा वैयक्तिक अवगुण आहे. हा अवगुण समस्त पुरुषांना चिटकविला जाऊ नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

<<हा अवगुण समस्त पुरुषांना चिटकविला जाऊ नये>>
पूर्ण सहमत.
’प्लेटोनिक लव्ह’ वर विश्वास नाही.
स्त्री विषयी पुरुषांना इतर भावना नसतात असे माझे मत नाही, एका पुरुषानेच ते मला सांगितले... आता ती त्या पुरुषाची विकृती असावी काय हे माहीत नाही पण एकेकाळी जवळून संबंध असताना तरी असे वाटले नव्हते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जवळ्याच नात्यातल्या सोडून* स्त्रीविषयी पुरूषांना सामान्यतः एकच भावना असणे हे उत्क्रांतीशी सुसंगत आहे. गटात, समाजात रहाण्यामुळेही प्रत्येक स्त्रीला पाहून प्रत्येक वेळी पुरूषांच्या मनात असेच विचार येत असतील असं नाही (हा माझा तर्क). फ्रॉईडचे सिद्धांत मला १००% मान्य नसले तरी 'प्लेटोनिक लव्ह’ मलाही बोगस वाटतं.

*पुन्हा एकदा, जवळच्या नात्यातल्या व्यक्तीपासून झालेली संतती रोगट निपजण्यामुळे हे नॅचरल सिलेक्शन (मराठी?) झाले असण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्तींनी जवळच्या नात्यातल्या व्यक्तीशी संभोग करून प्रजा निर्माण केली नाही त्यांचे वंश आणि गुणधर्म टिकले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

<< गटात, समाजात रहाण्यामुळेही प्रत्येक स्त्रीला पाहून प्रत्येक वेळी पुरूषांच्या मनात असेच विचार येत असतील असं नाही (हा माझा तर्क). >>

तुमच्या तर्काशी पूर्णत: सहमत. एकतर दिवसभरात नोकरी / व्यवसायाच्या निमित्ताने अनेक स्त्रियांशी संपर्क येतो. जर पुरुषाच्या मनात प्रत्येक वेळी असेच विचार येत गेले तर सगळं संतुलनच बिघडून जाईल. त्याचप्रमाणे असे विचार न येण्यामागे अजुनही दोन कारणे आहेत.

१. एखादी गरज (इथे शारिरीक संबंध) आपल्या हक्काच्या व्यक्तीकडून पूर्ण होऊन माणूस तृप्त झालेला असेल तर इतर वेळी तो पुन्हा पुन्हा त्या गरजेबद्दल कशाला विचार करत बसेल?
२. अशा विचारांना मनात येण्यापासून रोखण्यात संस्कारांचा सहभागही मोठा आहे.

पण मग आपला तर्क जर असा आहे तर मग आपलं हे वरचं विधान <<जवळ्याच नात्यातल्या सोडून* स्त्रीविषयी पुरूषांना सामान्यतः एकच भावना असणे हे उत्क्रांतीशी सुसंगत आहे.>> असं का? ही एकच भावना जर तीच असेल तर आपला तर्क तर काही तरी वेगळेच सांगतोय? की तर्कात म्हंटलंय त्याप्रमाणे प्रत्येक वेळी असे विचार येत नसले तरी प्रत्येक स्त्री विषयी केव्हा ना केव्हा असे विचार पुरुषाच्या मनात येतातच असं तुम्हाला म्हणायचंय का? जरा उलगडून सांगु शकाल काय?

<< 'प्लेटोनिक लव्ह’ मलाही बोगस वाटतं. >>

आपल्या मताचा आदर आहे. या अनुषंगाने या विषयावर नवीन चर्चाप्रस्ताव टाकला आहे. आपणांस शक्य असेल तर कृपया तेथे आपले सविस्तर मत मांडू शकाल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

नंदा प्रधान कधी प्रकट होणार?
आपण उगाच चर्चा करित आहोत की काय असे वाटू लागले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

+१
या आयडी खास या चर्चेसाठी काढला असावा इतका सुचक आहे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वर अनेकजणांनी प्राण्यांची उदाहरणं तुलनेला किंवा विरोधाभासाला घेतली आहेत..

प्राण्यांमधे बलात्कार, बळजबरी, गुन्हेगारी नसते.. याचं मुख्य कारण कोणी "नर बळजबरी करत नाही" असा नसतो, तर कोणी मादी विरोध करत नाही किंवा त्या नराच्या अ‍ॅक्शन्सना गैर समजत नाही असा आहे.

(उदा. टॉमी हाच माझा जन्माचा जोडीदार.. त्याच्याशी रत होण्यात गरतीपण आहे..

..पण ..रॉकी.. शी किळस येते मला त्याची.. तो माझ्याकडे अशा नजरेने बघतो की भीतीच वाटते.. रोज मी चौकातून येता जाता सगळी गँग घाणेरड्या भुंकॉमेंट्स करत असते.. असं काही डॉलीच्या मनात नसावं..)

कारण मुळात त्या क्रियेला आपल्यामधे असलेला स्टिग्मा प्राण्यांमधे असण्याची गरजच नाही. त्या क्रियेचा अर्थ आणि उद्देश स्पष्ट असल्याने आणि त्याखेरीज बाकी काही भावनिक / जन्मजन्मांतरीचे धागेदोरे त्यामधे गुंतलेले नसल्याने कोणतीही मादी उध्वस्त होत नाही किंवा आयुष्यातून उठत नाही किंवा "बळी" पडत नाही...

मूळ गुन्हेगारी ही बलात्कार या गोष्टीला "संपलं स्त्रीचं आयुष्य" असं समजणं ही आहे. कोणतीही हिंसक घटना वाईटच. पण आपल्याला (पुरुषाला) चार गुंडांनी गाठून जबरी मारलं आणि सर्व पैसे काढून घेतले आणि पळाले तर त्या घटनेचे मनावर आणि शरीरावर जेवढे आणि जितका काळ ओरखडे राहतील तेवढेच आणि तितकाच काळ बलात्काराचेही राहतील (आणि इतरजण ते ओरखडे टिकवून धरणार नाहीत) त्या दिवशी हे सर्व प्रश्न नाहीसे होतील.

असा सर्व सामाजिक वगैरे बदल व्हायला, अगदी तुमच्या माझ्या एकेकट्याच्या मनातही व्हायला, असंख्य वर्षं लागतील आणि गॅरंटी नाहीच.. तोसवर आपलं वेगळं आणि कुत्र्या-वाघा-तरसांचं वेगळं असं समजून घ्यावं अन तुलना करुच नये..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्राण्यांमधे बलात्कार, बळजबरी, गुन्हेगारी नसते.. याचं मुख्य कारण कोणी "नर बळजबरी करत नाही" असा नसतो, तर कोणी मादी विरोध करत नाही किंवा त्या नराच्या अ‍ॅक्शन्सना गैर समजत नाही असा आहे.

कळपातील मादी कळपाबाहेरील नराशी, वा वयात येणार्‍या इतर नरांशीही संबंध ठेवते. ठेवू शकते. संभोगाची क्रीया ही सर्वस्वी मादीच्या 'चॉइस'वर अवलंबून असते. किंबहुना मादीची 'फेव्हर' मिळविण्यासाठी नर एकमेकांशी जीव जाईपर्यंत भांडतात. प्राण्यांत नर 'जबरदस्ती' वा बलात्कार करू शकत नाही.

पुन्हा म्हणतो, मनुष्य हा एकच हीन प्राणी असा आहे जो मादीवर बलात्कार (लग्नाच्या बायकोशी तिच्या संमतीविना केलेला संभोग हा बलात्कार - कायद्याच्या व्याख्येने - होतो. वकिल मित्रांनी गूगल न करता कन्फर्मेशन करावे हे.वि.) करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

बरोबर बोलताय.. पण मादीला हो ~ नाही असा चॉईस नसून नरांची आपसातली स्पर्धा / लढत हीच नैसर्गि ननिवड ठरते आणि मादीला आपापत: झालेला असा निवाडा मान्य असतो.

नर जबरदस्ती करत नाहीत याचं कारण असं आहे. जबरदस्ती ही कल्पनाच गैरलागू आहे त्यांच्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चर्चा थोडी भटकतेय असं वाटतं.

मनुष्य हा प्राण्यांप्रमाणे सिझनल संभोग करत नाही. बहुसंख्य प्राण्यांमध्ये संभोगाची प्रेरणा ही हार्मोन्स सिक्रीट झाल्याने निर्माण होते. थोडक्यात नर आणी मादी हे दोघे या हार्मोन्सच्या काही प्रमाणात अधिपत्याखाली असल्याने "मादीच्या इच्छेविरूध" ही संकल्पना प्राणी जगतात १००% खरी नाही. (ऑल सिझन्स(?) वले कुत्रेही हार्मोन्सच्या प्रभावाखालीच असतात)

माणसाचे मात्र वेगळे आहे. मनुष्यासाठी नैसर्गिक रित्या कोणता सिझन आहे का? नसावा असे मला वाटते. हार्मोन्सच्या बरोबरच मानवाच्या मनाचा संभोग करण्याची इच्छा निर्माण करण्यात मोठा हात असतो. म्हणूनच नर किंवा मादी या पैकी एकास संभोगाची इच्छा नसणे मानवात प्राण्यांपेक्षा जास्त साहजीक आहे असे मला वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

माणसाने तसा बर्‍यापैकी निसर्गावर ताबा मिळवला आहे -
प्राण्यांत शाकाहारी प्राणी अशावेळी पुनरुत्पादन करतात, की पिलू जन्मते तेव्हा चारा/पाणी भरपूर असेल.
ही पिले जरा मोठी होऊन भक्ष्य म्हणून खाता येतील अशा बेताने शिकारी प्राणी जन्माला येतात.
याच हिशेबाने बायोलॉजिकल क्लॉक काम करते, अन त्यावेळी माद्या माजावर येतात, अन हत्तींच्या गंडस्थळांत मद वाहू लागतो. निसर्गाची किमया.
- अन यात मानवाची पिले कधीही जन्मली तरी अन्न्/निवारा/थंडी वार्‍यापासून बचाव होईलच, म्हणून माणूस कधीही जन्मतो. कायम रत होऊ शकतो, थोडक्यात, माज करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

जबरदस्ती होऊच शकत नाही.
एरवी माश्या हाकलण्यास अपुरी पडत असली, तरी बकरीची शेपटी सुद्धा वेळेवर "लाज राखण्यास" (झाकण्यास नाही) पुरे ठरते. (निरिक्षण) शेपूट आडवी आल्यास नर जबरदस्ती न करता निघून जातो. मानवात बिकिनी घातली, तर असे भडकाऊ कपडे घालू नका असे भाषण ऐकून घ्यावे लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

ऑ?? हा शेपटी सामंजस्याचा नियम माहीत नव्हता. माहीत नसल्याने मान्य करतो सध्या. अनेक पाळलेल्या कुत्र्यांची मेटिंग्ज केली तेव्हा अगदी उलट अनुभव पाहिला. असो..
जंगली प्राण्यांचा थोडाफार अभ्यास छंद म्हणून केला होता. त्यातही अनेक बाबतीत नर , विजेता नर खचितच मादीचा चॉईसबिईस घेत नाही..
पण सध्या मान्य करतो. मान्य काय. मीही खरं तर तुमच्या सारख्याच आशयाचं बोलत होतो अअल्टिमेटली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्राथमिक गरजेचे सोडून निसर्गत:च फार विचार न करु शकणार्‍या प्राणिमात्रांशी, तुलनेने जास्त विचारशक्ती असणार्‍या मनुष्यप्राण्याशी तुलना का करावी वाटतेय?

बाकी मुळ लेखावर धनंजय ह्यांशी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्यांची लैंगिक उपासमार वगैरे होते त्यांची अशा चर्चा वाचून पोटे भरण्याची शक्यता किती असावी? उगीच आपली शंका हं! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भरल्या पोटी चर्चा सुरू आहेत
बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मी प्रश्न उपाशी लोकांविषयी विचारला आहे. भरल्या पोटी चर्चा करणार्‍यांविषयी नाही. लैंगिक भूक भागवताना तत्सम साहित्य वाचणे, अ‍ॅगनी आंट वगैरे प्रकारांना प्रश्न विचारणे, इतरांची मते विचारणे इ. प्रकार केले जातात. पूर्वी आणि आताही, मासिकांमध्ये अशाप्रकारची सदरे उपलब्ध केली जात. महाराष्ट्र टाईम्सने यांत पुढाकार घेऊन वाचकांची अशी भूक भागवण्याचा प्रयत्न केलेला आहे. Wink

लैंगिक भूक भागवण्यासाठी बलात्कार करावा लागतो असे नाही.

अवांतरः वरील माझ्या प्रतिसादाला "कै च्या कै" श्रेणी हे स्पेसिफिक समूहाचे शहाणपण दर्शवत असावी. ":-)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता उत्तर द्यावे तर आम्ही उपाशी म्हणवले जाणार आणि नाही दिले तर भरल्या पोटाचे!! टू बी ऑर नॉट टू बी.. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

विकीवर शोधून मग सांगण्याचा प्रयत्न करतो Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

प्रतिसादांत "मनुष्यावेगळे पशू" यांच्या वर्तनाबाबत बरीच चर्चा होत आहे. परंतु या अतिशय भिन्न प्रकारच्या प्राण्यांमध्ये काय साम्य आहे?

मनुष्यांच्या व्यवहारात "पाशवी" हा शब्द "वाईट" या अर्थाने वापरला जातो. हे काव्यात्मक आहे. ते रूपक असे समजावे लागते : पशूवर कुठल्यातरी नावडत्या मानवी भावनेचा आरोप करायचा. मग ती भावना पशूची आहे अशी उत्प्रेक्षा करून त्या पशूची उपमा दुष्ट माणसाला द्यायची.

त्यास जीवशास्त्राचा किंवा नीतिशास्त्राचा काहीच आधार नाही.

- - -
काही दिवसांपूर्वी असे वाचले की अनेक प्राण्यांमध्ये जवळच्या नातलगाशी संभोग टाळला जातो. आंतरजालावर शोधता एक रिव्ह्यू लेख सापडला (पीडीएफ दुवा). यात असे दिसते की कित्येक प्रकारचे उंदीर, काही पक्षी, काही कीटक, यांच्यात तरी बहीण-भाऊ संभोग टाळला जातो. अन्य काही प्राण्यात नाही टाळत.
- - -

नीतिमत्तेच्या बाबत चर्चा करताना "मनुष्य वि. मनुष्येतर प्राणी" असे दाखले निरर्थक आहेत. आणि प्राण्यांबाबत जीवशास्त्रविषयक चर्चेत मनुष्याच्या समाजात योग्य नीतिमूल्यांचा काहीच संदर्भ नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@धनंजय,
असहमत. मला कदाचित तुमचा प्रतिसाद कळला नसेल. पण नीतिमत्ता मानव निर्मित आहे आणि मानव हा मनुष्य प्राणीच आहे. मानवाला देखिल जीवशास्त्रिय नियम लागु आहेतच. परंतु मानवाचा असा दावा आहे की ( कमितकमी)काही अंशी तरी मानवानी त्यावर ( स्वतः वर) नियंत्रण आणलेलं आहे. इथे मग मनुष्याचा मनुष्येतर प्राण्यां पासुन वेगळा प्रवास सुरु होतो.
मात्र दर वेळी स्वतःला ( इतर प्राण्यांपेकक्षा ) उच्च समजणारा मनुष्य व्हेन कन्विनिअंट बरोब्बर त्याच जीवशास्त्राच्या नियमांचा इतर प्राण्यांसकट दाखला देतो.
मला जर तुमचा प्रतिसाद कळला नसेल तर इथेच माफी मागून ही चर्चा संपवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहुधा सहमत आहात, किंवा वेगळा मुद्दा आहे.

पण नीतिमत्ता मानव निर्मित आहे आणि मानव हा मनुष्य प्राणीच आहे.

या चर्चेपुरते "होय", आणि नेहमीकरिता "होय'

मानवाला देखिल जीवशास्त्रिय नियम लागु आहेतच.

होय. (म्हणजे मनुष्य जमतात, मरतात, वगैरे. १००% खरे असलेले नियम आहेत. तर "मनुष्याने जन्मणे टाळावे" असा नीतिनियम कोणी केला, तर जीवशास्त्र आड येऊन नीतिनियम बाद होतो.)
पण बहुधा मुद्दा असंदर्भ आहे.
कारण बरेचसे जीवशास्त्रीय नियम ढोबळ - <<१००% - असतात. उदाहरणार्थ बरेचसे - पण <<१००% - प्राणिव्यक्ती - individual animals (not species) - लैंगिक संभोग अनुभवतात. हा ढोबळ नियम मनुष्यांना लागू आहे. पण ढोबळनियम १००% नाही. त्यामुळे नैतिक विचारात या नियमाची आडकाठी येत नाही. मनुष्य 'अ' याने मनुष्य 'ब' शी अमुक परिस्थितीत संभोग करावा काय? याबाबत "होय" किंवा "नाही" असा कुठलाही नीतिनियम मनुष्यांनी केला तर जीवशास्त्र आड येत नाही.

परंतु मानवाचा असा दावा आहे की ( कमितकमी)काही अंशी तरी मानवानी त्यावर ( स्वतः वर) नियंत्रण आणलेलं आहे.

हा दावा खराखोटा ठरवण्यासाठी मनुष्येतर प्राण्यांचा काहीच संदर्भ नाही. मनुष्यांनी मनुष्यांच्या अंतर्गत निरीक्षण करावे. निकष ठरवावे. नियंत्रण आहे, असे निरीक्षण झाल्यास विधानाची सत्यता कळते. नियंत्रण नाही, असे दिसल्यास विधानाची असत्यता कळते. मनुष्येतर प्राण्यांचा काहीच संदर्भ नाही.

इथे मग मनुष्याचा मनुष्येतर प्राण्यां पासुन वेगळा प्रवास सुरु होतो.

या विधानाकरिता मनुष्येतर प्राण्यांचे निरीक्षण जरुरीचे आहे. म्हणजे मनुष्येतर प्राण्यांच्या कुठल्या प्रजातीत त्यांची मानसिक स्थिती समजली पाहिजे, आणि त्या मानसिक स्थितीनुसार नियंत्रण झाले की नाही, हे पडताळले पाहिजे. मनुष्येतर प्राण्यांच्या करोडो प्रजाती आहेत. त्या सर्वांमध्ये नियंत्रण नाही, असे दिसून आले पाहिजे. मग म्हणता येईल, की "वेगळा प्रवास सुरू झाला".
किती हा खटाटोप! नाहीतरी मनुष्यांच्या वर्तनाबाबतच बोलायचे आहे. मग असूदेनाका कुठलीशी स्वनियंत्रण असलेली मानवेतर प्रजाती. असून-नसून फरक पडणार नाही, तर कशाला उगाच हवा मानवेतर जनावरांचा संदर्भ?

मात्र दर वेळी स्वतःला ( इतर प्राण्यांपेकक्षा ) उच्च समजणारा मनुष्य व्हेन कन्विनिअंट बरोब्बर त्याच जीवशास्त्राच्या नियमांचा इतर प्राण्यांसकट दाखला देतो.

तुमच्या या वाक्यावरून मला वाटते, की तुम्ही माझ्याशी सहमत आहात. कन्विनियंट पण चुकलेले युक्तिवाद हे युक्तिवादच नव्हेत. जीवशास्त्रातील बहुतेक नियम १००% लागूसुद्धा नव्हेत. मनुष्येतर जनावरांच्या मनातील "हेतू" आपल्याला माहीतही नाही. हे सर्व दाखले निरर्थक आहेत. फारतर काव्य म्हणून स्वीकारता येतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्की काय म्हणता आहात ते समजले नाही.
जरा समजवून सांगितल्यास बरे होईल.. (सिरियसली म्हणतो आहे)

उदा:

मनुष्येतर जनावरांच्या मनातील "हेतू" आपल्याला माहीतही नाही. हे सर्व दाखले निरर्थक आहेत. फारतर काव्य म्हणून स्वीकारता येतात.

माझ्या मनातील हेतू आपणास माहीत नाही, अन मला तुमच्या मनातील हेतू. तरीही तुम्ही माझ्या वागणूकीच्या निरिक्षणातून निष्कर्ष काढू शकता, की माझा हेतू काय असावा.
उदा. मी हातात सुरी घेऊन तुमच्या दिशेने येतो आहे.
काव्य म्हणून मी तुमचा खून करायच्या हेतूने येतो आहे. पण मूळ हेतू कृतीनंतर स्पष्ट होईल की मी तुमचे ऑपरेशन करण्याचा प्रयत्न करतो आहे..? किंवा उलट.
स्वतः व्यतिरिक्त इतरांच्या मनात काय आहे हे कुणी जाणू शकतो का???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

स्वतः व्यतिरिक्त इतरांच्या मनात काय आहे हे कुणी जाणू शकतो का???

नाही जाणू शकत. अधिक विस्ताराकरिता दुवा. त्यातील हा भाग :

वैज्ञानिक विचार करताना माझे असेही गृहीतक आहे की ३. तो (अन्य कोणीतरी व्यक्ती) विचार करण्यास समर्थ आहे, आणि समजण्याची त्याची क्षमता (माझ्या) तुल्य आहे.
हेदेखील केवळ एक कामचलाऊ तत्त्व आहे. कारण हे शक्य आहे की जगात खरा विचार करू शकणारा केवळ मी आहे, आणि बाकी सर्व लोक एक तर स्वप्नातल्या बाहुल्या आहेत, किंवा हाडामांसाचे यंत्रमानव आहेत (इंग्रजीत या विचाराला सोलिप्सिझम म्हणतात). मग लोकांशी विचारपूर्वक बोलण्यात काय अर्थ? तरी लोकांशी विचारपूर्वक बोलायला मला आवडते - तेही विचारक्षम आहेत असे म्हणणे मला त्यामुळे सोयीचे वाटते. इतकेच नाही, ते सरासरी माझ्याइतपतच विचारक्षम आहेत असे मानून बर्‍याच कामचलाऊ गोष्टी साध्य होतात. म्हणजे "अशा परिस्थितीत मी रागावलो असतो, म्हणजे त्याच प्रकारे आज साहेब माझ्यावर पेटणार!", "माझ्यासाठी कोणी 'अमुक' केले तर मला खूप आनंद होईल, मग समोरच्या माणसासाठी तसे आपण केले तर ते माणूस खुश होईल..." असे कितीतरी रोजच्या जीवनातले कामचलाऊ निर्णय पटापट घेता येतात. या कामचलाऊ तत्त्वाला मी "विज्ञानाचे गृहीतक" म्हणून का मानतो? कारण विज्ञानात एखादी कल्पना "सत्य" आहे असे मला वाटले, तरी जोपर्यंत आपल्या क्षेत्रातल्या दुसर्‍या कोणाला ती मी पटवून देऊ शकत नाही, तोपर्यंत ती कल्पना चुकली असल्याची दाट शंका माझ्या मनात असते. दुसर्‍याला कल्पना पटवता येणे हे माझ्या लेखी कल्पना जाणण्याइतकेच पायाभूत आहे.

पशूंच्या या चर्चेतील वरील तत्त्वाचा संदर्भ : मनुष्यांच्या बर्‍याच गुंतागुंतीच्या अंतर्गत मानसिक स्थितीबाबत "ही माझ्या अंतर्गत स्थितीसारखीच आहे" अशी कल्पना करून कामचलाऊ फायदा होतो. याबाबत माझा अनुभव आहे. उदाहरणार्थ गुंतागुंतीचे हेतू. मात्र मानवेतरांबाबत असा अनुभव नाही. त्यामुळे मानवेतर पशूंचे अंतर्गत गुंतागुंतीचे हेतू काय हे (सतःच्या अंतर्गत स्थितीच्या उपमेने) माहीत आहेत, असे मला सांगता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तर मग दाखले सरसकट निरर्थक कसे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

सरसकट असे काही नाही. या ठिकाणी दाखले क्रियाशील निर्देशांसाठी उपयुक्त नाहीत इतपत नि:संदर्भ आहेत, असा माझा दावा आहे. "सरसकटपणा" हा सुद्धा कामचलाऊच आहे.

माझ्या अंतर्गत ज्या गुंतागुंतीच्या मानसिक अवस्था आहेत, त्यांचा आरोप अन्य मनुष्यांवर केला, तर अन्य मनुष्यांच्या भविष्यातल्या वर्तणुकीचे भाकीत मला करता येते. ही भाकिते कामचलाऊ उपयोग होण्याइतपत ठीकठाक येतात.

माझ्या अंतर्गत ज्या ज्या गुंतागुंतीच्या मानसिक अवस्था आहेत, त्यांचा आरोप मनुष्येतर प्राण्यांवर केला, तर त्या प्राण्यांच्या भविष्यातल्या वर्तणुकीचे भाकीत मला करता चांगल्या प्रकारे करता येत नाही. म्हणजे कुत्रे "मिठाला इमानी" आहे की "भाकरीचे मिंधे" आहे, असे अलंकारिक वर्णन आपण करतो. या वर्णनांवरून, माझ्या "इमान"/"मिंधेपणा" संकल्पनांमधून, काही उपयोग आहे काय? प्रत्यक्षात समोरचा कुत्रा भाकरी देणार्‍या चोराला चावेल की नाही, याविषयी भाकित करणे कठिण आहे. पश्चाद्बुद्धीने आपण अलंकारिक रीत्या म्हणतो, की कुत्रा चोराला चावला, तर तो "इमानी", भाकरी खाल्ली तर "मिंधा". पण पश्चाद्बुद्धी अलंकारिक असली तरी ते यशस्वी भाकीत नव्हे.

वाटल्यास कोणी अलंकारिकरीत्या म्हणेल की "मलेरियाच्या स्त्री-पेशी आणि पुं-पेशी मनुष्याच्या रक्तवाहिनीत ब्रह्मचारी संयम ठेवतात, आणि डासाच्या पोटात पोचल्यानंतरच संभोगलंपट होतात". "संयम", "लंपटपणा" या मानवी संकल्पनांचा वापर करून अन्य मानवांच्या वर्तणुकीबद्दल कामचलाऊ भाकीत करता येते. मलेरिया पेशी "संयमी" आहेत दुसर्‍या कुठल्या प्रोटोझोआबद्दल कामचलाऊ भाकीत करता येत नाही.

निर्णय करण्यासाठी काळ मर्यादित असतो. मर्यादित अवधीत काम व्हावे, तर काही संकल्पना वेळेत वापरता येतात, आणि काही संकल्पना वेळेत वापरता येत नाहीत. वेळेच्या मर्यादेने पडते तितकेच काय ते सरसकटीकरण.

अर्थात कुठल्या संकल्पना मी वेळेच्या मर्यादेमुळे टाळाव्या, याबाबत माझी निवड कधीकधी चूक असते. दुसर्‍या कोणी सांगितले, की "अमुक संकल्पना वापरून वेळेत उपयोगी भाकिते करता येतील" आणि पटवून दिले, तर अर्थातच ती संकल्पना मी वापरू लागेन.

- - -
वरील लेखाच्या प्रसंगात नाहीतरी वर्णन मनुष्याचे आहे, आणि मनुष्याच्या वागणुकीबाबत विपुल साधनसामग्री आपल्याकडे उपलब्ध आहे. मनुष्यांच्या सँपलच्या स्वभावाचा आरोप सामान्यत्वाने मनुष्याच्या मानसिकतेबाबत केलेले सरसकटीकरण तितके आडवळणी नाही. मनुष्येतर प्राण्यांवर मनुष्याच्या स्वभावांचा आरोप करायचा. (आरोप करण्यासाठी लाखो प्रजातींपैकी कुठला प्राणी निवडणार?) मग त्या आरोपित स्वभावाची उपमा (दाखला) सांगून पुन्हा मनुष्यांच्याच वर्तणुकीबद्दल भाकिते करायची. हा मार्ग आडवळणी आहे.

- -
मानवेतर प्राण्यांचे दाखले या ठिकाणी क्रियाशील निर्देश होण्याइतपत उपयुक्त आहेत, असे तुम्हाला म्हणायचे असेल, तर कसे आणि कितपत हे तुम्ही समजून सांगावे ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन वेगळ्या विषयांबद्दल बोलत आहोत असे दिसते.
एक तर,

वाटल्यास कोणी अलंकारिकरीत्या म्हणेल की "मलेरियाच्या स्त्री-पेशी आणि पुं-पेशी मनुष्याच्या रक्तवाहिनीत ब्रह्मचारी संयम ठेवतात, आणि डासाच्या पोटात पोचल्यानंतरच संभोगलंपट होतात". "संयम", "लंपटपणा" या मानवी संकल्पनांचा वापर करून अन्य मानवांच्या वर्तणुकीबद्दल कामचलाऊ भाकीत करता येते. मलेरिया पेशी "संयमी" आहेत दुसर्‍या कुठल्या प्रोटोझोआबद्दल कामचलाऊ भाकीत करता येत नाही.

या प्रकारे प्लास्मोडियम व्हायवॅक्स चे जंतू Heterosexual Reproduction करतात इतपत माहीती मुळातच मला नव्हती.
मी आपला प्राणी म्हणजे कळप करून रहाणारे इतर प्राणी, जसे माकडे, हरिण, सिंह इ. ज्यांच्या कळपातिल कुटुंबव्यवस्थेचा अभ्यास थोडाफार झालेला आहे, व मानवी वागणूकीच्या समांतर पद्धती आढळून्/निदर्शनास आलेल्या आहेत त्यांचेबद्दल बोलत होतो.
प्रस्तावित चर्चा ही लैंगिक उपासमारीबद्दल व त्यामुळे होणार्‍या गुन्हेगारीबद्दल आहे.
यात उदा. सिंहांचे उदाहरण घेऊ. यात वयात येऊ लागलेले नर कळपातून हाकलून लावले जातात, जे पूर्ण वयात येईपर्यंत व जोपर्यंत दुसर्‍या / स्वतःच्या कळपात प्रमुख नराचे स्थान जिंकून घेईपर्यंत लैंगिक सुखापासून वंचित असतात. ते नर स्त्रीसुख ओरबाडून घेणे हे प्रकरण करत/करू शकत नाहीत. चोरून लपून एकाद्या तरूण मादीस वश करून संभोगसुख(?) किंवा प्रजनन सुख ते मिळवितातही. पण त्यासाठी मादीवर जबरदस्ती होत वा होऊ शकत नाही. हे मला म्हणावयाचे होते. प्रसिद्ध अभ्यासकांनी केलेली याप्रकारची निरिक्षणे (प्राणी जगातली) पुरेशी उपलब्ध आहेत.
अन हे पुरेसे रिलेव्हंट आहे, व हा 'क्रियाशिल निर्देशांसाठी उपयुक्त' (Exact meaning?) दाखला आहे असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

सिंहाचे उदाहरण क्रियाशील निर्देश आहे, असे तुम्ही म्हणता.

सिंहांचे उदाहरण घेऊ. यात वयात येऊ लागलेले नर कळपातून हाकलून लावले जातात, जे पूर्ण वयात येईपर्यंत व जोपर्यंत दुसर्‍या / स्वतःच्या कळपात प्रमुख नराचे स्थान जिंकून घेईपर्यंत लैंगिक सुखापासून वंचित असतात. ते नर स्त्रीसुख ओरबाडून घेणे हे प्रकरण करत/करू शकत नाहीत. चोरून लपून एकाद्या तरूण मादीस वश करून संभोगसुख(?) किंवा प्रजनन सुख ते मिळवितातही. पण त्यासाठी मादीवर जबरदस्ती होत वा होऊ शकत नाही. हे मला म्हणावयाचे होते. प्रसिद्ध अभ्यासकांनी केलेली याप्रकारची निरिक्षणे (प्राणी जगातली) पुरेशी उपलब्ध आहेत.
अन हे पुरेसे रिलेव्हंट आहे, व हा 'क्रियाशिल निर्देशांसाठी उपयुक्त' (Exact meaning?) दाखला आहे असे वाटते.

"मनुष्यांबाबत क्रियाशील निर्देश" याचा अर्थ असा आहे : तुमच्या मते की मनुष्यांच्या कळपामध्ये वयात येऊ लागलेले नर कळपाबाहेर हाकलले, तर ते नर स्त्रीसुख ओरबाडून घेऊ शकत नाहीत, पण क्वचित स्त्रीस वश करून प्रजनन आणि संभोगसुख मिळवण्यात्र यशस्वी होतील. म्हणून स्त्रियांवर बलात्कार टाळण्यासाठी मनुष्यांच्या समाजाने अशी क्रिया करण्याचा निर्देश आहे : वयात येऊ लागणार्‍या नरांना कळपाबाहेर हाकलावे.

असा तुमचा क्रियाशील निर्देश असल्यास मला तो मान्य नाही. (आणि हा क्रियाशील निर्देश नसेल तर तुमचा मुद्दा काय आहे?) मनुष्यांच्या आणि सिंहाच्या कळपांमध्ये भरपूर फरक आहेत. वयात येऊ लागणार्‍या नरांचे मनुष्यांच्या समूहामध्ये बलात्कारावेगळेसुद्धा बरेच व्यवहार असतात. त्यामुळे त्यांना हाकलण्याचा निर्देश क्रियाशील नाही.

प्राणी म्हणजे कळप करून रहाणारे इतर प्राणी, जसे माकडे, हरिण, सिंह इ. ज्यांच्या कळपातिल कुटुंबव्यवस्थेचा अभ्यास थोडाफार झालेला आहे, व मानवी वागणूकीच्या समांतर पद्धती आढळून्/निदर्शनास आलेल्या आहेत त्यांचेबद्दल बोलत होतो.

मग सिंहच कशाला घेतला. बोनोबो एप (bonobo ape) का नाही घेतले? हा प्राणी कळप करून राहातो, आणि याच्या कळपातील कुटुंबव्यवस्थेचा अभ्यास थोडाफार झालेला आहे. याच्या नरांना कळपातून हाकलत नाहीत. आणि साधारणपणे कुठलेही भांडण सोडवण्यासाठी प्राणी वाटाघाटी करून संभोग करतात (म्हणजे बलात्कार नाही).

गैरसमज होऊ नये : मी असे म्हणत नाही, की बोनोबोचा दाखला क्रियाशील निर्देश देतो, आणि मनुष्यांच्या समाजात संभोग-वाटाघाटीने भांडणे सोडवावीत. माझ्या मते सिंहाचेही नाही, आणि बोनोबोचे नाही, कुठलेच उदाहरण मनुष्यांना क्रियाशील निदेश देत नाही. कळप करून राहाणार्‍या शेकडो प्रजातींबाबत अभ्यास उपलब्ध आहे. त्या सर्वांपैकी कोणाचा दाखला योग्य? याबाबत कोडे सोडवण्यापेक्षा मनुष्यांचेच निरीक्षण कार्यक्षम आहे. मनुष्यांबाबतच विपुल साधनसामग्री उपलब्ध असताना सिंहाच्या किंवा बोनोबोच्या दाखल्याची गरज नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही गुन्हेगारी संदर्भात : पक्षी बलात्कार त्यांच्यात होत नाहीत हे सांगण्यासाठी माझ्या बोलण्यात आली होती. बाकी, लैंगिक उपासमार कमी झाली म्हणून असे गुन्हे कमी होतील असे नाही, हेच मत मी लगेचच नोंदविले आहे.
प्राणिजगताचे दाखले नको असल्यास सोडून द्यावेत. माझे मत मी फक्त मांडले आहे. ते बरोबरच, असा आग्रह नाही.

(क्रियाशील निर्देश या शब्दप्रयोगाचा अर्थ नक्की समजला नव्हता, व तसे मी नमूदही केलेले आहे. तो शब्दप्रयोग आपण कशासाठी वापरला आहात हे आपल्या वरील स्पष्टीकरणावरून समजले.)

आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

लैंगिक उपासमार झाली किंवा नाही झाली तरी " I like big butt" किंवा इतर यापेक्षाही उत्तेजक गाणी असतात त्यांच्यामुळे उत्तेजना वाढून गुन्हे वाढत असतील का? एक आपला विचार कारण नाही म्हंटल तरी कधी तेवढ्यापुरता कधी त्यापेक्षा जास्त असा साहित्याचा परिणाम होतोच नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतीय विवाह संस्थेचा इतिहास हे इतिहासाचार्य राजवाडे यांचे पुस्तक जालावर उपलब्ध आहे. बाकी बेफिकिर म्हणजे २०३ डिस्को बुधवार पेठ वाले आपणच का? बाकी चर्चेतील बौद्धीक मैथुन आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

हे असे सातत्याने लिहून वेश्याव्यवसाय अत्यंत आवश्यक आहे वगैरे विचारवंतांमार्फत का लिहिले जाते हे न कळे.
मनोबा, वेश्यांबद्दल समाजात एक मोठी अढी /गैरसमज आहे असे मला वाटते. वेश्या म्हणजे समाजाचे गटार, वासनेचे आगार असे काहीबाही लिहिले/ बोलले जाते म्हणून या स्पष्टीकरणाची मला गरज वाटली.
नंदा प्रधान कधी प्रकट होणार?
आपण उगाच चर्चा करित आहोत की काय असे वाटू लागले आहे.

मनोबा, सॉरी. एक किरकोळ अपघात झाल्यामुळे काही दिवस मला नेटवर येता आले नाही.
माणूस हा इतर प्राण्यांप्रमाणे लैंगिक व्यवहार व हिंसा या दोन्ही मधुन पशुतेकडून मानवतेकडे चालला आहे. हे काहि कायद्याने किंवा एका दिवसांत होण्यासाअरखे नाहि. काहिशे वर्षांत बलात्कार व हिंसा यांचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी झालं असेल अशी अपेक्षा आहे.
हृषिकेश, असे होण्यासाठी लैंगिक संबंधांमध्ये मोकळेपणा येणे आवश्यक आहे असे मला वाटते. नाहीतर आपले विधान म्हणजे भाबडा आशावाद वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक किरकोळ अपघात झाल्यामुळे काही दिवस मला नेटवर येता आले नाही.

क्षमस्व. उगाच प्रश्न उपस्थित केला. काळजी घ्या. आराम करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ही वाक्ये मलाही अजिबात पटली नाहीत. कारण यातून असे ध्वनित होते की अविवाहित / हक्काची महिला जोडीदार उपलब्ध नसलेले पुरूष एकतर वेश्यागमन करतात किंवा मग बलात्कारी असतात. हे विधान धादांत चूकीचे आणि तितकेच स्फोटकही आहे. एकतर आजच्या समाजात विविध कारणांमूळे अशा प्रकारे शारिरीक संबंधाकरिता महिला जोडीदार उपलब्ध नसलेले अनेक पुरूष वावरत असतात. त्या सर्वांचा अभ्यास करून हे विधान लिहीले आहे काय? दुसरीकडे ज्यांना अशी हक्काची महिला जोडीदार उपलब्ध आहे असे (प्रामुख्याने विवाहित, उरलेले लिव इन वगैरे) पुरूषही रोजच्या दगदगीमूळे (कामाचे वाढलेले तास, त्याकरिता करावा लागणारा प्रवास, शारिरीक मानसिक कष्ट, ताणतणाव इत्यादी) थकून नियमितपणे असे संबंध ठेवण्यापासून मुकतात. कित्येकदा तर बिछान्यावर पडल्या पडल्या घोरायला लागलेल्या अशा लोकांविषयी हल्ली नियतकालिकांमध्येही अनेक लेख येऊ लागलेत. म्हणजे ज्यांना हे सुख उपलब्ध आहे तेही नीट प्रकारे व रोजच्या रोज ते उपभोगत नसताना इतर सर्वच जण ते ओरबाडून अथवा विकत घेत असतील असे म्हणणे योग्य नाही.

दुसरा वेश्यासंबंधाने एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वेश्येकडे जाऊन तिच्याशी संबंध ठेऊन एखाद्या पुरूषाला सुख मिळत असेल तर त्या संबंधांमुळे त्या वेश्येलाही सुख मिळू शकत नाही काय? असे असेल तर मग ती त्याकरिता आर्थिक मोबदला का घेते? म्हणजे त्या पुरूषात अशी काही तरी कमतरता आहे (रंग, रूप इत्यादी) की ज्यामुळे त्याच्याशी संबंध ठेवायला कोणतीही महिला तयार नाही व दुसरीकडे त्या वेश्येकडे अशी काहीतरी भर (पुन्हा रंग, रुप इत्यादीच) आहे की ज्यामुळे पुरुषांनी तिला आर्थिक मोबदला देऊन तिच्याशी संबंध ठेवावेत. मला वाटते अशा प्रकारे आर्थिक मोबदला देऊन संबंध ठेवावे लागणे हाच अशा पुरूषांकरिता एक न्यूनगंडाचा भाग आहे. अशा पुरुषांशी (ज्यांच्याशी फुकटात कोणी इतर महिला संबंध (लग्न अथवा इतर मार्गांनी) ठेवायला तयार नाहीत) केवळ आर्थिक मोबदला मिळत आहे म्हणून संबंध ठेवल्यामुळेच समाज वेश्यांकडे एक हीन घटक म्हणून पाहत असावा. जसे की इतर कोठेच उपयोगात न येणारी वस्तू कचर्‍याच्या डब्यात पडते तद्वतच इतर सर्व स्त्रियांनी नाकारलेले पुरूष वेश्यांकडे येतात.
माझी ही विधाने सरसकट असली तरी ती प्रातिनिधिक आहेत असे मला वाटते. आपण उदाहरण दिलेले दगदग होणारे, तणावात रहाणारे लोक शहरात रहात असतील आणि उपलब्ध असतानाही कामसुख घेणे त्यांना शक्य होत नसेल, पण निमशहरी भागात, खेड्यात आरामाचे आयुष्य जगणार्‍या लोकांना लंगिक भुकेने झपाटले तर ते ओरबाडतील हे नक्की.
वेश्येला तिच्या गिर्‍हाईकापासून कामसुख मिळत असेल असे म्हणणे वेडेपणाचे आहे. कुरुप, अपंग, दारुडे लोक गिर्‍हाईक म्हणून अले तर त्यातून वेश्येला कसले सुख मिळणार? मला वाटते रोजरोज होणार्‍या यांत्रिक संभोगांमुळे तिच्या लैंगिक वासना मरुन जात असतील. अशा स्थितीत तिने एक धंदा म्हणून गिर्‍हाईकाकडून पैसे घेतले तर त्यात काय बिघडले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेश्याव्यवसाय कायदेशीर केल्यास निदान कायद्याचे संरक्षण वेश्यांना मिळू शकेल. वय सरल्यावर प्रॉव्हिडंड फंड, ग्रॅच्युईटी मिळून त्यांचं पुढचं आयुष्य बरं जाईल का इत्यादी, इत्यादी प्रश्न पडले.
हे विधान आपण खवचटपणाने केले आहे की हे आपले अज्ञान आहे हे मला ठाऊक नाही. सगळ्या कायदेशीर व्यवसायांना फंड, ग्रॅच्युईटी वगैरे नसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखाद्या उद्योगात सहाच्या* वर कामगार असतील तर प्रॉव्हीडंड फंड सुरू करावा लागतो. 'मावश्यां'कडे सहापेक्षा अधिक सेवादात्या असतील तर त्यांनाही असं करण्यास भाग पाडता येईल. होईलच असं नाही, पण निदान कायदा त्यांच्या बाजूने असेल.

*आकड्याच्या बाबतीत थोडी साशंक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उगा मेंटल मास्टरबेशन या धाग्यावर सुरू आहे हे माझे स्पष्ट मत आहे.
कृपया मेंटल मास्टरबेशन म्हणजे आपल्याला काय अभिप्रेत आहे ते स्पष्ट करावे. येथे पन्नासएक प्रतिसाद सीरीयस, विचारप्रवर्तक दिसतात. हे सगळेच हस्तमैथुन आहे असे आपल्याला म्हणायचे आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्यांची लैंगिक उपासमार वगैरे होते त्यांची अशा चर्चा वाचून पोटे भरण्याची शक्यता किती असावी? उगीच आपली शंका हं!
या भडकाऊअ प्रतिसादाचे कारण कळाले नाही. चर्चा वाचून पोटे कशी भरतील?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख उध्बोदक वाटला खटकला ,मुळात वेश्याव्यवसाय नाही ती एक लादलेली गोष्ट आहे .आपल्या न्यायाने जाण्याचे ठरवले तर मग चोरी बलात्कार दरोडा दारू देखील आवशक़ आहे,विकृतीची पाठराखण करता येणार नाही केवळ तर्कासाठी तर्क योग्य नाही कमी असेल मिळत नसेल तर ओरबाडून घेणे हा कुठला कायदा ?सामजिक आर्थिक संस्कारांचा अभाव कारणीभूत आहेत शेवटी आपन सारेच सारखे आहोत काही शरीरावर बलत्कार करतात काही मनावर काही पकडले जातात काही मोकळे सुटतात फोनोग्रफि काहीच नुकसान करत नाही उत्तेजन देत नाही अस असत तर रात्री क्रीडा करताना अतृप्त राहिलील्या इच्छा माणसाने सकळी कुणी महिला मुलगी दिसताच तिजवर तुटून पडले असते तस घडत नाही असल्या साहित्याने केवळ फोलपणा व तिरस्कार येतो ते लपून ठेवल्यामुळे आकर्षण वाटते उलट phonography एकदा दाखवा माणूस धुन्कुन्सुधा पहाणार नाही तेव्हा दोष देऊ नका

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोनोग्राफी म्हणजे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

वाढवायला हवा.
आजकाल निरनिराळे शब्द शिकायला मिळतात नेटवर Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

<< दुसरा वेश्यासंबंधाने एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वेश्येकडे जाऊन तिच्याशी संबंध ठेऊन एखाद्या पुरूषाला सुख मिळत असेल तर त्या संबंधांमुळे त्या वेश्येलाही सुख मिळू शकत नाही काय? असे असेल तर मग ती त्याकरिता आर्थिक मोबदला का घेते?>>

झालेल्या संभोगापासून वेश्येला शारिरीक सुख मिळत असेल काय आणि तसे मिळाल्यास त्याबद्दल आर्थिक मोबदला घेणे उचित आहे काय हा मुद्दा सदर चर्चेशी संबंधित नसून त्याने लैंगिक उपासमारी व गुन्हेगारी वर काहीही फरक पडू नये. म्हणून हा मुद्दा येथे अप्रस्तुत आहे अशी नोंद करत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवाय...

रोजच्या व्यावसायिक संबंधांनंतर वेश्येच्या दृष्टीने शरीर ही विकाऊ कमोडिटी बनत असावी. त्यामुळे तिला "सुख" मिळणे ही शक्यता कमी वाटते.

उदा. श्रीखंड विकत घेणार्‍याला ते खाऊन आनंद मिळतो पण विकणार्‍या (उदा. डेअरीवाला) ते विकण्यात पैसे मिळण्याखेरीज जास्तीचा आनंद असेल असं वाटत नाही.

वेश्येच्या बाबतीत स्वतःच्या या विकाऊ वस्तुकरणामुळे "सेन्सेस" शून्य झालेले असावेतसे वाटते. आणि शरीरसंबंधातलं "सुख" हे सेन्सेसवरच अवलंबून असतं. तरीही एखाद्या वेश्येला सुखद वाटेल असा अनुभव देऊ शकलेल्या मनुष्याला खरोखर काहीतरी खास ज्ञान/कौशल्य असलं पाहिजे..

किंवा मग आपल्या कामात पॅशन / निष्ठा इ इ ठेवण्याची वृत्ती असेल तर कल्पना नाही, पण मला अवघड वाटतं की या व्यवसायात कितीही प्रोफेशनल राहिलं तरी त्यातून पॉझिटिव्ह असा काही "आनंद" मिळत असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0