Skip to main content

ही बातमी समजली का? - १८

भाग | | | | | | | | | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं.

तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.

आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.

===
ऑस्ट्रेलियाच्या सगळ्यात मोठ्या आरोग्य संशोधन संस्थेने होमिओपॅथी माणसांच्या आरोग्याच्या दृष्टीने निरुपयोगी असण्याचा निर्वाळा दिला आहे. ऑस्ट्रेलियात आरोग्यविम्यावर खर्च केलेल्या रकमेवर 30% आयकर सवलत मिळते. या खर्चात complementary therapies वर केलेल्या खर्चाचा समावेश करावा का नाही, या निर्णयावर संशोधन संस्थेच्या निर्णयाचा फरक पडेल असं बातमी म्हणते.

NHMRC rule homeopathic remedies useless for human health

मन Fri, 11/04/2014 - 09:16

आत्ता दुवा हाताशी नाहिये. पण आजच्याच TOI मध्ये का express मध्ये होमिपथीला youngest and most effective असं काहीतरी म्हणणारा मथळा दिसला. माझ्या प्राधान्याच्या विषयातली बातमी न वाटल्याने मी ते बायपास करुन पुढे वाचू लागलो. दुवा सापडला की डकवतो.

नितिन थत्ते Fri, 11/04/2014 - 10:23

>>ऑस्ट्रेलियाच्या सगळ्यात मोठ्या आरोग्य संशोधन संस्थेने होमिओपॅथी माणसांच्या आरोग्याच्या दृष्टीने निरुपयोगी असण्याचा निर्वाळा दिला आहे.

महाराष्ट्र शासनाने हा निर्वाळा होमेपदी डॉक्टरांच्या मागणीवरून यापूर्वीच दिला आहे. इथेतरी महाराष्ट्र शासन ऑष्ट्रेलियाच्या फुडे आहे. ;)

मी Fri, 11/04/2014 - 11:03

जालावर टाकलेले फोटो चोरी होण्याची शक्यता असतेच, स्टॉपस्टीलिंगफोटोज् हि वेबसाइट अशाच चोरांची माहिती सगळ्यांसमोर ठेवते. बघा तुमचे फोटो तर कोणी चोरले नाहित न?

गवि Fri, 11/04/2014 - 11:07

ऑस्ट्रेलियाच्या सगळ्यात मोठ्या आरोग्य संशोधन संस्थेने होमिओपॅथी माणसांच्या आरोग्याच्या दृष्टीने निरुपयोगी असण्याचा निर्वाळा दिला आहे.

ऑस्ट्रेलिया देश इतकी वर्षे होमिओपथीला उपयोगी मानत होता ही धक्कादायक बातमी आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 11/04/2014 - 17:16

In reply to by गवि

इथे होमिओपथीच्या उपयुक्ततेपेक्षा सरकारने, अधिकृतरित्या नाकारणं महत्त्वाचं वाटलं. तुम्हाला घ्यायचं तर ती "औषधं" घ्या पण त्या खर्चावर करसवलत मिळणार नाही. खरोखर किती ऑस्ट्रेलियन होमिओपथीची "औषधं" घेत होते आणि किती लोकांवर या निर्णयाचा फरक पडेल याबद्दल शंका आहे.

ऋषिकेश Fri, 11/04/2014 - 12:53

In reply to by मी

जर "कमाल अधिकृत कार्यकाळ" खाजगी क्षेत्राला लागु व बंधनकारक केला तर पुढिल निवडणुकीत भाजपाला मत देण्याचा खरंच विचार करावा लागेल. :)

गवि Fri, 11/04/2014 - 13:00

In reply to by ऋषिकेश

खाजगी क्षेत्राला कोणतेही या प्रकारातले नियम (सुट्टी, कामाचे तास, कामाचे दिवस, कामाचे प्रमाण आदि) लागू करुनही उपयोग नाही, कारण खाजगी क्षेत्रात कोणी कर्मचारी या कारणास्तव कायद्याचा बडगा उभारु इच्छितच नाही.

सध्याही अनेक कायदे लागू आहेत. उदा. २६ जाने / १५ ऑगस्ट / २ ऑक्टोबर / इलेक्शन या दिवशी सुट्टी देणे कायद्याने बंधनकारक आहे, पण अनेक खाजगी कंपन्या या दिवशी पूर्ववेळ / अर्धवेळ काम लावतातच. अशा वेळी कायद्याने कंपनीविरोधी तक्रार करणे म्हणजे स्वतःची गच्छंती करुन घेण्यासारखे आहे. कोण वैर घेणार कंपनीशी?

सरकारी नोकरीला असे नियम लावण्याची गरजच नाही कारण तिथे खरोखर कोणाला कशाची पडलीय ? कोणीही कधीही या, कधीही जा.. कितीही रजा घ्या..
.. कं.ज.ना.

मेघना भुस्कुटे Fri, 11/04/2014 - 13:01

In reply to by गवि

खाजगी क्षेत्राला कोणतेही या प्रकारातले नियम (सुट्टी, कामाचे तास, कामाचे दिवस, कामाचे प्रमाण आदि) लागू करुनही उपयोग नाही, कारण खाजगी क्षेत्रात कोणी कर्मचारी या कारणास्तव कायद्याचा बडगा उभारु इच्छितच नाही.

अतिमार्मिक. टाळ्या. :D> :D> :D>

गवि Fri, 11/04/2014 - 13:08

In reply to by मेघना भुस्कुटे

अनेक खाजगी कंपन्या कायदा वगैरे तर राहूदेच.. युनियन शब्दातला यू जरी कोणाच्या तोंडून बाहेर पडला तरी त्याला नारळ देतात. चार कर्मचारी एकत्र येऊन काही थोडाजरी संघर्ष करु पाहात असतील तर तातडीने ते संघटन तोडतात.

एकेकट्याने तात्विक लढा देण्यापेक्षा खाजगी नोकरीतल्या कर्मचार्‍याला महिनाअखेरी येणारा पगार महत्वाचा वाटतो असतो.

काही कायदे / नियम हे पाळले जाण्याची जबाबदारी अंतिम लाभार्थीवर न टाकता ते नियमन करणार्‍या अथॉरिटीने घेतली तरच ते लागू पडतात.

सिग्नल तोडला की थेट हवालदार पकडतो. त्यासाठी अन्य कोणा नागरिकाने तक्रार करावी लागत नाही. हवालदाराचे लक्ष असते.

तसेच खाजगी कंपन्यात सुटीच्या दिवशी कोणी सरकारी नियामक मंडळाचा अधिकारी चक्कर टाकून कारवाई करत असेल तरच असल्या नियमांना अर्थ आहे.

नितिन थत्ते Fri, 11/04/2014 - 13:32

In reply to by गवि

>>सिग्नल तोडला की थेट हवालदार पकडतो. त्यासाठी अन्य कोणा नागरिकाने तक्रार करावी लागत नाही. हवालदाराचे लक्ष असते.

तसेच खाजगी कंपन्यात सुटीच्या दिवशी कोणी सरकारी नियामक मंडळाचा अधिकारी चक्कर टाकून कारवाई करत असेल तरच असल्या नियमांना अर्थ आहे.

बरोबर. पण हवालदार पकडतो ते तुम्ही सिग्नल तोडला म्हणून नाही. तो ज्या कारणासाठी पकडतो ते कारण खाजगी कंपनीच्या बाबतीत आधीच साध्य झालेले असते.

गब्बर सिंग Fri, 11/04/2014 - 13:56

In reply to by गवि

अनेक खाजगी कंपन्या कायदा वगैरे तर राहूदेच.. युनियन शब्दातला यू जरी कोणाच्या तोंडून बाहेर पडला तरी त्याला नारळ देतात. चार कर्मचारी एकत्र येऊन काही थोडाजरी संघर्ष करु पाहात असतील तर तातडीने ते संघटन तोडतात.

मागे एका रिटेलर मधल्या एका छोट्या सेक्शन मधल्या लोकांनी युनियन केली (उदा. भाज्या सेक्शन). तर कंपनीने ती बिझनेस लाईन च बंद करून टाकली.

अवांतर - Labor arbitrag .... ......

---

एकेकट्याने तात्विक लढा देण्यापेक्षा खाजगी नोकरीतल्या कर्मचार्‍याला महिनाअखेरी येणारा पगार महत्वाचा वाटतो असतो.

स्वतःचाच Quasi Leveraged Buyout केलेला असतो. इएमआय च्या माध्यमातून. त्यामुळे इलाज नसतो. Debt disciplines individuals.

आदूबाळ Fri, 11/04/2014 - 15:06

In reply to by गब्बर सिंग

स्वतःचाच Quasi Leveraged Buyout केलेला असतो. इएमआय च्या माध्यमातून. त्यामुळे इलाज नसतो.

गब्बरजी, आपण कधी भेटलो तर या वाक्याबद्दल पार्टी! कडकडून टाळ्या...

मी Fri, 11/04/2014 - 15:31

In reply to by गवि

सध्याही अनेक कायदे लागू आहेत. उदा. २६ जाने / १५ ऑगस्ट / २ ऑक्टोबर / इलेक्शन या दिवशी सुट्टी देणे कायद्याने बंधनकारक आहे, पण अनेक खाजगी कंपन्या या दिवशी पूर्ववेळ / अर्धवेळ काम लावतातच. अशा वेळी कायद्याने कंपनीविरोधी तक्रार करणे म्हणजे स्वतःची गच्छंती करुन घेण्यासारखे आहे. कोण वैर घेणार कंपनीशी?

हे जरी खरे असले तरी, इतर अनेक कायदेशीर बाबींची(मटर्निटी बनेफिट्स, बोनस, ग्रॅच्युटी वगैरे) पुर्तता 'झक' मारत का होईना कंपनीला करावी लागते, त्यामुळे कमाल तासांचा कायदा आल्यास त्यामधुन पळवाट काढावी लागेल पण पुर्तता करावी लागेल.

आणि प्रत्येक वेळेस स्वतःची मान काढुन द्यायची(व्हिसल ब्लोअर) गरज नाही, बातमी (पुराव्यासकट) 'लिक' होणे पुरेसे आहे.

मी Fri, 11/04/2014 - 12:17

'मुलगी शिकली प्रगती झाली' हा मंत्र आता अमेरीकेतही गाजणार. मुलींना संगणकाचे शिक्षण देण्यासाठी गुगलने आपले पाकिट थोडे बाहेर काढले आहे, त्याअंतर्गत माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी मुलींना ठरवल्याप्रमाणे संगणकाचे शिक्षण दिल्यास त्यांना जवळपास २,५०० डॉलर्स पर्यंत रक्कम/मूल्य असलेले बक्षिस मिळु शकेल. पण तुम्ही कितीही मुलांना शिकवले तरी तुम्हाला एक छदामही मिळणार नाही. ;)

अमेरिकेतील मुलींचा संगणक क्षत्रातील टक्का(१८%) फारच कमी असल्याने व भविष्यात संगणकाशी निगडीत संधी जास्त असल्याची शक्यता असल्याने हे पाऊल गुगलने उचलले आहे असे बातमीप्रमाणे लक्षात येते.

आता तुम्ही ह्याला लैंगिक भेदभाव म्हणा किंवा गुगलला स्त्री संगणक अभियंता जास्त उत्पादनक्षम वाटत असेल असे म्हणा, आता संगणकसंबंधी क्षत्राचा उज्ज्वल भविष्यकाळ जवळ आला आहे ह्यात शंका नाही. ;)

गवि Fri, 11/04/2014 - 15:21

स्पीचलेस..

Now, Abu Azmi says women having sex outside marriage, rape victims should be hanged

Azmi, told Mid-day when asked for a solution to the problem of rapes: "Any woman if, whether married or unmarried, goes along with a man, with or without her consent, should be hanged.

Both should be hanged. It shouldn't be allowed even if a woman goes by consent."

"Rape is punishable by hanging in Islam. But here, nothing happens to women, only to men. Even the woman is guilty. Girls complain when someone touches them, and even when someone doesn't touch them. It becomes a problem then... If rape happens with or without consent, it should be punished as prescribed in Islam."

He went on to say that the solution to rape was hanging both the man and woman.

He also defended his party chief by saying Mulayam respects women.

ऋषिकेश Sat, 12/04/2014 - 09:17

In reply to by गवि

जेव्हा आम्ही म्हणतो की "पुरूष म्हटला की तंग कपड्यातली बाई बघुन चाळवणारच, बाईनेच योग्य कपडे घालावेत" असे म्हणणे गैर आहे, तर त्याचा कसून विरोध होतो. 'म्हातारी मेल्याचे दु:ख नाही काळ सोकावतो' म्हटले तर कुठे सोकावला आहे काळ अशी उलट विचारणा होते.

आता हे उदाहरण तसा सोकावलेला काळ म्हणून तरी ग्राह्य धरणार आहेत का पुरूषवृथाकळवळे कोण जाणे!

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 12/04/2014 - 18:21

In reply to by ऋषिकेश

हा हा हा.

पण आता मुलगा फरहान आझमी आणि सून आयेशा टाकिया यांनी अबू असीम आझमींना एकटं सोडलं आहे.
Netaji, dad must say sorry to all Indians, says Farhan Azmi

अतिशहाणा Fri, 11/04/2014 - 19:12

Annihilation of Caste हे माझे अत्यंत आवडते पुस्तक. (जालावर काही ठिकाणी ते उपलब्ध आहे) या पुस्तकाच्या अनुषंगाने लिहिलेला The Doctor And The Saint हा अरुंधती रॉय यांचा भलामोठा लेख वाचायला सुरुवात केली. गांधीजींच्या महात्मा होण्यापूर्वीच्या द. आफ्रिकेच्या दिवसांतील काही घटनांचे उल्लेख या लेखामध्ये आहेत. स्वतः आंबेडकरांनी अनेक लेखांमध्ये अधोरेखित केलेला गांधींचा जातीयवाद आणि वर्णाश्रमाच्या समर्थनाची पार्श्वभूमी उलगडण्याचा रॉय यांचा हा प्रयत्न वाटला. 'हिंदू' एकजुटीमागची गरज का निर्माण झाली आणि या गरजेपोटी एकत्र येण्याचा प्रयत्न करतानाही आर्य समाज, रामकृष्ण मिशन किंवा काँग्रेसचे तत्कालीन नेते उदा. लोकमान्य टिळक यांनी काय भूमिका घेतली हे मुळातून वाचण्यासारखे आहे. (उदा. 'प्रबुद्ध भारत' या आंबेडकरांच्या वर्तमानपत्राची जाहिरात 'केसरी'मध्ये प्रसिद्ध करण्यास नकार देणे किंवा जातीयवाद निर्मूलनविषयक करारावर स्वाक्षरी करण्यापासून पळवाट काढणे वगैरे)

लेखाच्या उत्तरार्धात रॉय यांच्या नेहमीच्या विकास आणि संपत्तीविरोधी विचारसरणीकडे वळण घेतल्याने लेख वाचून पूर्ण केलेला नाही. लेखाच्या शेवटी काही संदर्भ वगैरे दिले आहेत ते तपासून पाहता येतील.

अतिशहाणा Wed, 16/04/2014 - 19:12

In reply to by अतिशहाणा

गांधी बिफोर इंडिया या रामचंद्र गुहा यांच्या पुस्तकाबाबत आजच ऐकले. सदर पुस्तकासंदर्भातील चर्चेत गांधींच्या तुरुंगवासाचा उल्लेख गुहा यांनी कौतुकाने केलेला आहे मात्र रॉय यांना त्यात बराच रेसिझम दिसला.

ऐसि पाहुणा Sat, 12/04/2014 - 22:01

मोदिच्या लग्नाविषयि वाचले. या भामट्या मनुष्याने इतके दिवस पत्निचे अस्तित्त्व नाकारले. जसोदाबेनचे १७व्या वर्षि मोदिंशि लग्न झाले. म्हणजे काहि एकदमच बालविवाह नव्हे. लग्नानंतर हा भामटा माणुस संघ प्रचारक बनुन निघुन गेला. मग याने लग्न का केले असावे?

ऐसि पाहुणा Sun, 13/04/2014 - 18:00

डाव्या विचारसरणिबद्दल मुलभुत विचार करणार्‍या महाराष्ट्रातल्या मोजक्या विचारवंतांपैकि एक असलेले शरद पाटिल यांचे निधन.

नंदन Mon, 14/04/2014 - 01:40

Under the agreement, she said, each company would develop a policy and enforcement mechanisms. One might choose to block communications from 11 p.m. to 10 a.m. by shutting down its email servers, while another might simply ask employees not to check email between 9 p.m. and 8 a.m.

Similar limits have been tested elsewhere. In 2011, Volkswagen started shutting off its BlackBerry servers at the end of the workday, stopping some employees in Germany from sending or receiving emails. Last year, the German Labor Ministry ordered its supervisors not to contact employees outside office hours.

But the British press did not seem to notice the German precedents, and reveled at another opportunity to confirm scornful stereotypes about the French. Several websites, Twitter feeds and other news outlets in Britain lost no time in misconstruing the agreement on Thursday, asserting that France had banned email after 6 p.m. or that one million 35-hour-a-week workers would be covered by the accord.

स्रोत - http://www.nytimes.com/2014/04/12/world/europe/in-france-a-move-to-limi…

चिंतातुर जंतू Mon, 14/04/2014 - 23:15

विविध मुद्द्यांवरच्या तुमच्या मतांचा आधार घेऊन कोणत्या पक्षाच्या जाहीर धोरणांशी तुम्ही किती सहमत आहात ते शोधून काढण्यासाठी एक ऑनलाइन सर्व्हे.

ॲमी Tue, 15/04/2014 - 18:38

In reply to by अतिशहाणा

अगदी हार्डकोअर काँग्रेसी आहात वाटत तुम्ही ;-)
माझा निकाल बर्यापैकी उन्नीस बीस आहे. मी सर्व प्रश्न somewhat important ठेवलेले. तुम्ही?

मिहिर Tue, 15/04/2014 - 14:33

In reply to by मी

नाव विजय शेषाद्री असावे. स्पेलिंग करण्याच्या पद्धतीवरून मूळ मलयाळी असावेत असा अंदाज आहे.

आडकित्ता Tue, 15/04/2014 - 20:57

चुकीच्या जागी आला म्हणून
प्रकाटाआ.

मी Wed, 16/04/2014 - 11:38

सिलिकॉन व्हॅलिबद्दल कुतुहल असणार्‍यांसाठी -

सॅन्ता क्लारा व्हॅलीमधे सिलिकॉन/संगणक संबंधी औद्योगिकरण झाले आणि तिथली (महा)उपजाऊ जमीन हळू-हळू औद्योगिकरणात स्वाहा झाली, आता जमिनीचे/घरांचे भाव आणि संगणकाशिवाय-इतर-उद्योग करणार्‍यांच्या उत्पन्नाचा हिशोब जमेना त्यामुळे एकुणच व्हॅलीत काय उलथापालथ चालु आहे हे ह्या टेकक्रन्चच्या प्रदिर्घ(सुपरलेटिव्ह) लेखात वाचता येईल, मीहि सध्या लेख पुर्ण वाचलेला नाही.

हे सगळं उद्या बँगलोर किंवा पुण्यात होऊ शकतं, त्यामुळे त्याअर्थी जागरुक होण्यासाठी किंवा निदान चांगली इन्व्हेस्टमेंट करण्याच्या दृष्टीने तरी विचार करायला हवा.

मी Wed, 16/04/2014 - 12:12

अमेरीका हि लोकशाही नसून अल्पलोकसत्ताक(Oligarchy) राज्य आहे असे मत प्रिन्सटन आणि नॉर्थवेस्टर्न विद्यापिठांच्या संशोधकांनी शास्त्रोक्त अभ्यासावरुन मांडले आहे.

त्यातलं हे उधृत -

Economic Elite Domination theories do rather well in our analysis, even though our findings probably understate the political influence of elites. Our measure of the preferences of wealthy or elite Americans – though useful, and the best we could generate for a large set of policy cases – is probably less consistent with the relevant preferences than are our measures of the views of ordinary citizens or the alignments of engaged interest groups. Yet we found substantial estimated effects even when using this imperfect measure. The real-world impact of elites upon public policy may be still greater.

चिंतातुर जंतू Wed, 16/04/2014 - 18:32

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार घोषित झाले आहेत. 'शिप ऑफ थिसिअस'ला सर्वोत्कृष्ट चित्रपट, 'फँड्री'ला सर्वोत्कृष्ट पदार्पण (बेस्ट डेब्यू) आणि बालकलाकार ह्यासाठीचे पुरस्कार, शिवाय, 'यलो', 'अस्तु', 'तुह्या धर्म कंचा?' वगैरे मराठी चित्रपटांना पुरस्कार. स्ंपूर्ण यादी इथे पाहता येईल.

अमुक Wed, 16/04/2014 - 18:53

Announcing the first Cineoo Meetup
Cineoo Meetup commences this Friday, 18th April 2014 with the first meetup to be held in Mumbai.
Cineoo Meetup's will enable film enthusiasts from across the globe to gather at one place for a discourse on cinema in the company of film makers, film scholars and film lovers.
We invite you to participate in the Cineoo Meetup this Friday, along with some good grub to keep you filled, by our sponsor,
Kala Ghoda Cafe.
Details of the Meetup are as follows

Film
Battleship Potemkin

Time
7.30 pm to 9.30 pm

Venue
Chatterjee & Lal, 01/18, Kamal Mansion, 1st Floor, Arthur Bunder Road, Colaba, Mumbai, Mumbai - 400005

* Free entry. Seating on first come first serve basis.

नंदन Fri, 18/04/2014 - 04:29

या श्रेष्ठ लेखकाचे आज निधन झाले.

न्यू यॉर्क टाईम्समधल्या लेखातला काही निवडक भाग -

Mr. García Márquez was considered the supreme exponent, if not the creator, of the literary genre known as magic realism, in which the miraculous and the real converge. In his novels and stories, storms rage for years, flowers drift from the skies, tyrants survive for centuries, priests levitate and corpses fail to decompose. And, more plausibly, lovers rekindle their passion after a half century apart.

Magic realism, he said, sprang from Latin America’s history of vicious dictators and romantic revolutionaries, of long years of hunger, illness and violence.

In Spanish or English, readers were tantalized from its opening sentences:

“Many years later, as he faced the firing squad, Col. Aureliano Buendía was to remember that distant afternoon when his father took him to discover ice. At that time Macondo was a village of 20 adobe houses built on the bank of a river of clear water that ran along a bed of polished stones, which were white and enormous, like prehistoric eggs. The world was so recent that many things lacked names, and in order to indicate them it was necessary to point.”

“One Hundred Years of Solitude” would sell more than 20 million copies. The Chilean poet Pablo Neruda called it “the greatest revelation in the Spanish language since ‘Don Quixote.’ ” The novelist William Kennedy hailed it as “the first piece of literature since the Book of Genesis that should be required reading for the entire human race.”

अक्षय पूर्णपात्रे Fri, 18/04/2014 - 19:35

In reply to by नंदन

काही महिन्यांपुर्वीच One Hundred Years of Solitude वाचली. माझ्याकडे ही कादंबरी गेल्या १२-१५ वर्षांपासून आहे. तेव्हा वाचतांना ३०-४० पाने वाचल्यानंतर कंटाळून वाचली नाही. त्यानंतर News of Kidnapping कसेबसे रडतखडत संपवले. News हे एक प्रचंड कंटाळवाणे पुस्तक आहे. कदाचित अपहरण झालेल्या व्यक्तिची परवड-तपशिलांचा सोस हे सगळे जास्तच परिणामकारकपणे त्या पुस्तकात उतरले असावे. नंतर ५-६ वर्षांमागे 'Memories of My Melancholy Whores' ही लघुकादंबरी वाचतांना मार्केजच्या भाषेतले काव्य, त्यातला थोराड रोमँटिसिझम आणि खट्याळ लैंगिकता यामुळे भारावून गेलो. आणि पुन्हा एकदा सॉलिट्युड वाचण्याचा प्रयत्न केला पण पुन्हा संपवू शकलो नाही.

मग मागच्या वर्षी पुन्हा वाचणे सुरू केल्यानंतर आपण किती मोठ्या पुस्तकाला मुकलो असतो याची जाणीव झाली. मला वाटतं Solitude वाचतांना लॅटिन अमेरिकेच्या इतिहासाविषयी थोडीफार माहिती असल्यास कादंबरीच्या निर्मितीतल्या प्रेरणा लक्षात येतात. पण तशी काही माहिती नसल्यासही (माझे त्या इतिहासाचे ज्ञान फारच तोकडे असल्याने) हे अतिशय प्रवाही पुस्तक त्यातल्या काव्यमय भाषेमुळे, ठसठशित पात्रांमुळे सहज वाचता येते. मॅजिक रिअ‍ॅलिझमचा वापर दगडगोट्यांवर वाढलेल्या शेवाळाप्रमाणे निवेदनास न खरचटता पुढे नेतो. वास्तव वर्तमानापासून वेगळे करण्यासाठीही या शैलीचा उपयोग झाला असावा. Solitude मधले जग इतके नविन आणि इतर जगापासून विभक्त आहे की कादंबरीची सुरूवात कमीतकमी इंग्रजीत वाचतांना भयंकर कंटाळवाणी होऊ शकते. पण एकदा बुएंदिया कुटूंबाचा स्थळ-काळातील नकाशा समजल्यानंतर पुढे वाचायला मजा येते. निव्वळ हरकून जावे अशी पान-पानभर वाक्यं, कुठलाही शब्द अनावश्यक वाटू नये अशी घट्ट वीण यामुळे ही कादंबरी वाचकाच्या ग्रहणक्षमतेला मोठेच आव्हान देते. पुन्हा-पुन्हा वाचल्याशिवाय आपल्याला हे पुस्तक आकळलेच नाही असे बर्‍याचदा वाचतांना जाणवले. भिंताड वाड्यात राहणार्‍या लोकांच्या स्थिंत्यंतरातुन महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास दिसल्यास तो जितका विशवसनीय असेल तितकाच Solitudeचाही आहे. माझ्याच काही मर्यादांमुळे कदाचित मला Solitudeचा परिसर चित्रदर्शी वाटू शकला नाही आणि मला या कादंबरीची निवेदनशैली भयानक पुरुषी वाटली. पुन्हा एकदा कधीतरी लांब सुट्टीत Solitude वाचले पाहीजे.

चिंतातुर जंतू Fri, 18/04/2014 - 15:34

पेंग्विननं आपलं पुस्तक मागे घेतलं त्याविषयी आणि अमेरिकेतही हिंदुत्ववादी लॉबी काय प्रकारचे निर्बंध आणण्याचा प्रयत्न करते आहे ते सांगणारा वेंडी डॉनिजर ह्यांचा लेख 'न्यू यॉर्क बुक रिव्ह्यू'मध्ये आला आहे.

मी Fri, 18/04/2014 - 16:01

In reply to by चिंतातुर जंतू

अ‍ॅड्व्होकसी किंवा लॉबीइंग अनुमत असल्यास हे न्याय्यच आहे, ह्याचा फायदा झालाच तर वेंडीलाच(पुस्तक वाचन/खप) होणार आहे.

चिंतातुर जंतू Fri, 18/04/2014 - 16:05

In reply to by मी

>> अ‍ॅड्व्होकसी किंवा लॉबीइंग अनुमत असल्यास हे न्याय्यच आहे, ह्याचा फायदा झालाच तर वेंडीलाच(पुस्तक वाचन/खप) होणार आहे.

कॅलिफोर्निआत पाठ्यपुस्तकांत बदल घडवून आणण्याचा हिंदुत्ववादी लॉबीचा प्रयत्न त्यात डॉनिंजर ह्यांनी वर्णन केला आहे. पाठ्यपुस्तकं बदलली गेली तर त्या प्रकाराचा फायदा कुणाला होईल असं तुम्ही म्हणताय? डॉनिंजर बाईंना? तोटा मात्र राज्यातल्या विद्यार्थ्यांचा होईल असं वाटतं.

मी Fri, 18/04/2014 - 16:22

In reply to by चिंतातुर जंतू

त्या प्रयत्नाबद्दल तपशीलवार वाचल्यास त्यात लॉबीचाच तोटा झाला हे लक्षात येते, त्याचप्रमाणे लॉबीने सुचविलेले बदल काही प्रमाणात योग्यच होते हेही लक्षात येते. डॉनिंजर बाईंना २०१४ मधे २००५ च्या घटनेचा आधार घ्यावा लागला हिहि एक प्रकारची अ‍ॅडव्होकसी आहे असे म्हणण्यास वाव आहे.

अनुप ढेरे Fri, 18/04/2014 - 16:12

In reply to by चिंतातुर जंतू

चिंताजनक लेख आहे. आजकाल प्रत्येकाच्या भावना फार लवकर दुखावल्या जातात. चित्र असोत, लेख असोत की व्यंगचित्र...

The misunderstanding arises in part from the fact that there is, in India, no real equivalent of the academic discipline of religious studies. With only a few recent exceptions, students in India can study religion as a Hindu or Muslim or Catholic in private theological schools of one sort or another, but not as an academic subject in a university. And so the shared assumptions underlying this discipline are largely unknown in India.

हा पॅरा खरा आहे का ते नाही माहित. असेल तर असे अभ्यासक्रम असायला हवेत.

नितिन थत्ते Fri, 18/04/2014 - 16:14

In reply to by अनुप ढेरे

धर्माविषयक फॉर्मल शिक्षण / माहिती विद्यापीठात मिळत नसेलही. पण ती केवळ धार्मिक संस्थांमध्ये मिळते हे काही पटत नाही.

धार्मिक ग्रंथ, त्यांवरील जुने टीका ग्रंथ बहुधा ग्रंथालयांतून उपलब्ध असतात.

चिंतातुर जंतू Fri, 18/04/2014 - 16:23

In reply to by नितिन थत्ते

>> धार्मिक ग्रंथ, त्यांवरील जुने टीका ग्रंथ बहुधा ग्रंथालयांतून उपलब्ध असतात.

अ‍ॅकॅडमिक डिसिप्लिनमधून नवं संशोधन आणि ताजी टीकाटिप्पणीसुद्धा आपल्यापर्यंत पोहोचू शकते.

मी Fri, 18/04/2014 - 16:52

In reply to by चिंतातुर जंतू

सहमत आहे, अशी सोय असणे गरजेचे आहे. पण भारतातील विद्यापीठात अशी सोय करणे(पक्षी: असे डिपार्टमेंट काढणे) म्हणजे दारुगोळा बनवण्याचे कोचिंग क्लासेस घेण्यासारखे आहे.

मी Fri, 18/04/2014 - 16:33

In reply to by अनुप ढेरे

धर्माचा अभ्यास करण्यासाठी वेगळे डिपार्टमेंट सगळ्याच विद्यापिठांमधे असण्याची शक्यता कमी आहे(बनारस विद्यापिठ एक अपवाद), पण फिलॉसॉफी किंवा सोशिओलॉजी डिपार्टमेंटच्या सिलॅबसमधे धार्मिक अभ्यास थोड्याफार प्रमाणात अंतर्भूत असतो.

पण थत्ते म्हणतात त्याप्रमाणे शिकण्यासाठीचे मटेरिअल मात्र ग्रंथालयात नक्कीच उपलब्ध असावे.

गब्बर सिंग Fri, 18/04/2014 - 16:50

In reply to by अनुप ढेरे

आजकाल प्रत्येकाच्या भावना फार लवकर दुखावल्या जातात.

क्या बात है.

एकदम चपखल.

आमचे एक हिंदुत्ववादी मित्र - तावातावाने मला सांगत होते की त्या ताजमहाला च्या खाली शिवलिंग आहे. मी त्याला म्हंटलं की तुमचं खरं दुखणं ते नसून तुमचं दुखणं हे आहे की एका व्यक्तीने आपल्या पत्नीचे भव्य दिव्य स्मारक उभे केले. आपल्या देशात पत्नी ही अतिकनिष्ठ मानली गेलेली आहे. (उदा. स्त्री ही अनंत कालाची माता असते व क्षणैक कालाची पत्नी असते .... वगैरे बकवास केला जातो) व माता ही अत्युच्च मानली गेलेली आहे. व मातेचे स्मारक बांधण्यापेक्षा पत्नीचे स्मारक बांधले - हे हिंदुत्ववाद्यांच्या परंपरागत विचारांत बसत नाही. एवढेच मी त्याला बोललो. व वर असे ही टॉपिंग्स लावले की - "यार" मे खुदा देखनेका प्रयास अनेक उर्दु कवींनी केलेला आहे. (शेवाळकरांनी ही असाच एक विचार ... त्या ज्ञानेश्वर माऊली क्यासेटात व्यक्त केलेला आहे की काही इस्लामिक कवींनी आपल्या प्रियतमेमधे खुदा ढूंढनेका प्रयास केलेला आहे....). व हिंदुत्ववाद्यांच्या नेमके हेच डोळ्यात खुपते व म्हणून हिंदुत्ववाद्यांना तो ताजमहाल खुपतो.

आता हे माझे एक फक्त कंजेक्चर होते. बस्स. बाकी काही नाही. It was hardly any argument ... let alone a strong one.

पण .... झाले ... तेवढे निमित्त पुरे होते ... सायबांच्या भावना अशा काही दुखावल्या की बोलायची सोय नाही.

मी Fri, 18/04/2014 - 17:55

In reply to by गब्बर सिंग

"यार" मे खुदा देखनेका प्रयास अनेक उर्दु कवींनी केलेला आहे.

अनेक देवांची परवानगी मुस्लिम धर्म देत नाही म्हणून हे करावं लागलं बहुदा. ;)

हताश टिप - स्मायली देणं म्हणजे वाचणार्‍याच्या अकलेचे वाभाडे काढण्यासारखं आहे, पण असोच.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 18/04/2014 - 17:34

राजेश्वरी देशपांडे यांचा लेख 'त्यांच्या' बायका, 'त्यांची' इभ्रत!

या विषयावरच्या लेखांबद्दल काहीही आक्षेप न घेता सहमत म्हणावं असं फार कमी वेळा होतं. त्यामुळे हा लेख फारच जास्त आवडला.

मी Fri, 18/04/2014 - 17:53

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

किचकट शब्द आहेत पण शेवटचा भाग थोडाफार आवडला, लेखाची लांबी बघता लिहिता-लिहिता 'पटकन' त्या निष्कर्षावर आल्यासारखं वाटलं, म्हणजे अजुन दोन-एक पानं सहज लिहिता आलं असतं पण बहुदा वृत्तपत्रिय मर्यादेमुळे(बेनेफिट ऑफ डाउट) आवरतं घेतलं त्यामुळे पहिल्या काहि परिच्छेदात म्हणावा तेवढा दम वाटत नाही.

समाजातले भौतिक संरचनात्मक (structural-systemic) अन्याय दूर करण्याची क्षमता आणि शक्यता राजकीय व्यवहारांमध्ये असते. दुर्दैवाने आज आपण आपल्या आणि आपल्या राजकारण्यांच्या कृती-उक्तीतून एक आक्रमक, 'माचो' पौरुषत्वाला प्राधान्य देणारा, पुरुषांच्या नजरेतून स्त्री वास्तवाकडे पाहणारा आणि म्हणून 'पुरुषप्रधान' राजकीय व्यवहार साकारतो आहोत. आणि हा सर्व व्यवहार स्त्री सक्षमीकरणाच्या तोंडदेखल्या सहमतीने तोललेला असल्याने तो अधिकच जीवघेणा, अधिक उफराटा बनतो आहे.

गब्बर सिंग Sat, 19/04/2014 - 17:29

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मला काही हा लेख तितकासा पटला नाही. अनेक बाबी न पटण्यासारख्या आहेत.

अजो१२३ Sat, 19/04/2014 - 18:17

In reply to by गब्बर सिंग

सहमत. निव्वळ पोटशूळ उठल्यावर जी भाषा तोंडी येते ती वापरली आहे. असंयत लोकांवर टिका करणारा लेख संयंत भाषेत असावा. न्याय्य मुद्द्यांवर असंयत टिका ऐकून टाळ्या पिटू वाटणारा बराच वाचक समाज असतो.

"बलात्काराचे समर्थन" वैगेरे काय? "गलती हो जाती है।" मधे पण समर्थन आहे असे म्हणता येत नाही.

बॅटमॅन Sat, 19/04/2014 - 18:21

In reply to by अजो१२३

"गलती हो जाती है।" मधे पण समर्थन आहे असे म्हणता येत नाही.

ती घटना क्षुल्लक आहे असे म्हणून कार्पेटखाली दडवायचाच प्रकार आहे की ओ तो. समर्थन नसलं म्हणून काय कमी गर्हणीय होतो काय तो?

अजो१२३ Sat, 19/04/2014 - 18:38

In reply to by बॅटमॅन

मी फक्त लेखात वारंवार आलेल्या समर्थन आणि तत्सदृश शब्दांबद्दल बोलतोय.

मुलायम सिंगाने जे म्हटले, लिटरली त्याला तेच म्हणायचे होते असेच असेल तर तो निव्वळ बेअक्कल आहे. पण त्यातही त्याला जे म्हणायचेच नव्हते ते लेखिकेने म्हटले आहे.

बॅटमॅन Sun, 20/04/2014 - 02:16

In reply to by अजो१२३

मुलायम सिंगाने जे म्हटले, लिटरली त्याला तेच म्हणायचे होते असेच असेल तर तो निव्वळ बेअक्कल आहे.

या वाक्यात मुलायम सिंगास दुसरे कैतरी म्हण्णे अपेक्षित होते असे वाटतेय. ते काय असेल याचा अंदाज शब्दयोजनेवरून मला तरी आजिबात घेता येत नै. असो.

तदुपरि

पण त्यातही त्याला जे म्हणायचेच नव्हते ते लेखिकेने म्हटले आहे.

सहमत. पण तो सूक्ष्म भेद असून गर्हणीय कोशंट पाहिल्यास तिकडे दुर्लक्ष केले तरी ठीक असे वाटते खरे.

गब्बर सिंग Sun, 20/04/2014 - 07:58

In reply to by अजो१२३

आता हेच उदाहरण घ्या -

भारताचे नवे मसीहा नरेंद्र मोदी यांनी

मोदी हे मसीहा आहेत हा कुत्सित कॉमेंट नाहिये का ? विश्लेषण करायचे म्हंजे पॉलीसी चे करायला नको का ? गुजरातेत बलात्काराच्या / विनयभंगांच्या किती घटना झाल्या ? त्या गेल्या १० - १२ वर्षांत कमी झाल्या की वाढल्या ? इतर राज्यांच्या तुलनेत कमी झाल्या का ? त्यांचा कन्व्हिक्शन रेट (समस्याजनक स्टॅटिस्टिक्स), पिडीत महिलेस मिळणारा सपोर्ट, महिलांविरुद्ध च्या गुन्ह्यांचे बदलते रूप(***) व ते गुजरातेत किती प्रिव्हेलंट आहे, प्रिव्हेंटिव्ह मेझर्स कोणती घेतलेली आहेत - या सगळ्यांबद्दल बोलणे गरजेचे असले तरी जागेअभावी शक्य नाही असे मान्य केले तरी किमान काही मुद्दे तरी उपस्थित केले पाहिजेत. नाही का ? (निदान मोदींचा विषय उपस्थित केलेला असताना.). नाहीतर मग मोदींचा मुद्दा उपस्थित करू नका.

एखाद्या परिच्छेदाच्या सुरुवातीस जो मुद्दा उपस्थित केला जातो त्याचे विवेचन त्या परिच्छेदात असावे ही माफक अपेक्षा.

---

बलात्कार्‍यांना फाशी द्यावी याबद्द्ल त्यांची मते विचारात घेण्याजोगी आहेत. पण - It is not enough to do justice .... Justice must also be seen to have been done. न्यायाच्या अनेक तत्वांत सिग्नलिंग हे एक तत्व असते. याकडे पूर्ण दुर्लक्ष करून चालेल का ? त्याचा परिणाम म्हणून फाशी ... जर काही केसेस मधे होत असेल तर ? Especially if as a result of the rape the woman is completely devastated mentally - then ? In this case she is reduced to a body without a mind. Isn't it ? या केस मधे न्यायाधीशाने फाशी ची तरतूद केली तर ?

या मुद्द्यावर - त्यांनी अतिरेकी कणवपूर्ण भूमिका घेतलेली आहे. कणव ही समस्याजनक नसतेच असे गृहितक असावे त्यामागे.

---

स्त्रीगर्भाच्या नि:पातातून आणि निलाजऱ्या डॉक्टरांकडून जसे हे घडते

डॉ़क्टरांचा उल्लेख निलाजरे असा केला. पण स्त्रीगर्भाचा नि:पात करणार्‍या पालकांचा उल्लेख टाळला. (खरंतर डॉक्टर हे दोषी नाहीतच या मुद्द्यावर. कायदा डॉक्टरांना दोषी मानत असेल तर कायदा चूक आहे.)

या मुद्द्यावर बरेच लिहिण्यासारखे आहे पण् स्फोट होईल म्हणून थांबतो.

----

आता माझ्या जिव्हाळ्याचा मुद्दा.

भांडवली भणंग सांस्कृतिक-सामाजिक वास्तवाच्या

भारतातल्या कुंठित आणि भणंग भांडवली विकासाचा परिणाम म्हणून हे तिपेडी सत्तासंबंध उलथेपालथे झाले आहेत.

(खरंतर हे आमचे खरे दुखणे. भांडवलवादावर आक्रमण केले की आम्ही चवताळून उठतो.)

त्यांनी "भांडवली" असा शब्द (अनेकदा) वापरलाय व मी असे गृहीत धरतो की हा त्यांचा भांडवलवादास संबोधित करण्याचा मार्ग आहे.

आता या सगळ्या समस्येचा भांडवलवादाशी काय संबंध ? Is capitalism really driving this criminal mentality of (Indian) men ? कसा ? हा संबंध आहे हे गृहितक की निष्कर्ष ?

पर्यायी अर्थव्यवस्थेत काय सिच्युएशन होती ? आजही आपल्या देशात मोठ्याप्रमाणावर भांडवलवाद आहे असे नाही. पण तो भाग सोडला तरी भांडवली अर्थव्यवस्थेपूर्वी स्त्रियांवरील अत्याचार कमी होते का जास्त ?

भांडवल व भणंग यात "भ"कार सोडल्यास काय संबंध आहे की ते दोन शब्द एकाशेजारी एक ठेवलेत ?

----

आपल्या एकंदर सार्वजनिक-सांस्कृतिक जीवनाचे उथळ व्यापारीकरण आणि माध्यमीकरण झाल्याने

म्हंजे काय ?

व्यापारीकरण - हे गेली किमान १००० वर्षे चालू आहे ना ? १९४७ मधे देश स्वतंत्र झाला त्यापूर्वी देशात प्रचंड जागतिकीकरण होतेच ना??? १९४७ नंतर त्याचे De-globalization झाले. मग १९९५ नंतर पुन्हा globalization ची लाट आली. globalization हे व्यापारीकरणाचे "वसुधैव कुटुंबकम" रूप नाहिये का ?

----

(***) She is alluding to this aspect in this statement ...

उरलेले सर्व दिवस, उरलेले सर्व पुरुष स्त्रियांवर या ना त्या प्रकारचे अन्याय करण्यास मोकळे राहतात

सव्यसाची Sun, 20/04/2014 - 09:54

In reply to by गब्बर सिंग

बऱ्याच अंशी सहमत.. या लेखामध्ये नरेंद्र मोदींना आणि त्यांच्या पत्नींना का आणले याचे कारण काही कळले नाही.. मोदींनी त्यांच्या बायकोला चारधाम यात्रेला पाठवले वगैरे हे नेमके कश्याच्या आधारावर हे काही कळले नाही..
त्यामुळे लेख थोडासा भरकटला असे वाटले..

अजो१२३ Mon, 21/04/2014 - 11:45

In reply to by सव्यसाची

जसोदाबेनने देशपांडेबाईंना स्वप्नात दृष्टांत दिला असावा.

मोदीने बायकोला सोडायला नाही पाहिजे, सोडायचेच होते तर आधी लग्न नाही करायला पाहिजे होते, सोडले तर तिचे दुसरे लग्न लावून द्यायला पाहिजे होते, किमान तिची स्वतःची ओळख मोदीची बायको अशी नको ठेवायला हवी होती, आपल्या विवाहाचे स्टॅटस अगोदरच नीट सांगायला पाहिजे होते, तिचे आयुष्य (मोदीमुळे + परंपरांमुळे) बर्बाद झाले, याची तिला जाणिवही नाही, इ इ ठिक आहे. पण अख्खा मेडीया तिला शोधत असताना ती जर फक्त देशपांडेबाईंनाच भेटली, बोलली असेल तर हे थोडे नवलाचे आहे आणि बाईंनी वाचकांच्या माहितीसाठी तसे स्पष्ट करायला हवे.

शिवाय मोदीने बायकोला सोडले या वाक्यात बायकोबद्दल "अरेरे बिचारी" टाईपचा भाव दिसतो. लग्नाचा करार कोणी मोडला? रितसर काडीमोड कोणी दिला नाही? मोदीने. मग त्याच्यावर सडकून टिका करा (ही मात्र लेखात आहे), पण बायकोबद्दल अजागळ सहानुभूती का? विवाहाबद्दलचे तिचे जे (मागास) तत्त्वज्ञान आहे, त्यालाही मोदी थोडीच जबाबदार आहे? तिने मोदी नावाचा चॅप्टर विसरून आपले आयुष्य वेगळेपणाने का जगले नाही त्याबद्दल टिका खुद्द तिच्यावरच व्हायला हवी, मोदीवर नाही. अशी टिका कुठे दिसतच नाही. इथे बोंब उलटीच आहे.

आणि मोदींनी रामदासांचे चरित्र लै सिरीअसली घेतले. त्यांनी गौतम बुद्धाचे चरित्रही सेम टू सेम कॉपी केले. जमान्यानुसार प्रोसिजरमधे फरक नाही केला. आणि अजूनही नक्की काय भानगड आहे याबद्दल तोंड गप्प ठेऊन आहेत. याचे दोन अर्थ आहेत. एकतर लोकांनी त्यांच्या खासगी बाबतीत बोलावं किंवा बोलू नये. बोलावं तर माहिती नीट हवी आणि त्यांचं मत काय आहे ते ही नीट हवं. आणि ते ते देत नसतील तर केवळ गप्प आहेत इतकीच टिका व्हावी. बोलू नये असा अर्थ असला तर प्रश्नच मिटला. सामाजिक संकेत नक्की काय आहे?

गब्बर सिंग Mon, 21/04/2014 - 12:24

In reply to by अजो१२३

तुमच्या प्रतिसादाचे मला हव्या त्या मुद्द्यात रुपांतर करतो -

जसोदाबेन ही शोषित असल्याने फक्त अनुकंपेस (कणवेस) पात्र आहे व मोदी हे निर्विवादपणे शोषक आहेत - असे गृहीतक केले की बाकीचा प्यारा एकदम सोप्पा होतो.

ऋषिकेश Mon, 21/04/2014 - 12:31

In reply to by अजो१२३

मोदींनी रामदासांचे चरित्र लै सिरीअसली घेतले. त्यांनी गौतम बुद्धाचे चरित्रही सेम टू सेम कॉपी केले

छे! उलट असा प्रवाद आहे की त्यांनी रामाप्रमाणे देशासाठी पत्नीचा त्याग केला! ;)

अजो१२३ Mon, 21/04/2014 - 12:41

In reply to by ऋषिकेश

राम उरलाच होता. विश्वामित्राचं काय? अजून बरेच निघतील...
"महान कार्यासाठी कुटुंब्/बायको/लेकरे/देश्/गाव/नवरा/इइ सोडणे ही एक जागतिक परंपरा आहे.

सरळसोट Mon, 21/04/2014 - 15:41

In reply to by गब्बर सिंग

तुम्ही नरेंद्र मोदींना काय मानता ते म्हत्त्वाचे नाही- पण जो माणूस आपल्या बायकोला ३-४ दशके लपवून ठेवतो, तिचा उल्लेख सुद्धा होऊ देण्याची काळजी ज्याने कधी दाखवली नाही त्याच्याबद्द्ल कुत्सितपणे जर कोणी बोलले तर ते फार चुकीचे वाटू नये.

ा. (खरंतर डॉक्टर हे दोषी नाहीतच या मुद्द्यावर. कायदा डॉक्टरांना दोषी मानत असेल तर कायदा चूक आहे.)

हे काय आणि कसं? स्त्रीभ्रूणहत्या बेकायदेशीर नाही? आणि त्यात डॉ दोषी नाहीत हा तुमचा दावा कशाच्या आधारावर तुम्ही मांडला आहे ते कळलं तर बरं होईल. जर प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान आणि त्या अनुषंगाने गर्भपात हा बेकायदेशीर आहे, तर मग तो करणारे डॉक्टर्स पण दोषी ठरतात. नुसता, वैद्यकीय कारणामुळे केलेला गर्भपात हा गुन्हा नाही पण केवळ स्त्री गर्भ नको म्हणून इतर कुठलेही कारण नसता केलेला गर्भपात हा बेकायदेशीर आणि अनैतिक दोन्हीही आहे.

१९४७ मधे देश स्वतंत्र झाला त्यापूर्वी देशात प्रचंड जागतिकीकरण होतेच ना

कधी, कुठे आनि कसले जागतिकीकरण होत होते? तुम्ही ज्याला कदाचित ग्लोबलायझेशन म्हणत आहात ते केवळ मायग्रेशन आहे, ग्लोबलायझेशनची व्याख्या अशी आहे-
the process by which businesses or other organizations develop international influence or start operating on an international scale.
यातल्या कुठल्या गोष्टी १००० वर्षे चालू आहेत? ईस्ट इंडिया कंपनी वा डच ईस्ट इंडिया कंपनी या थोड्या फार प्रमाणात जागतिकीकरणाकडे वाटचाल करणार्‍या वाटू शकतील पण त्या सुद्धा ग्लोबलायझेशनच्या नव्हे तर इम्पेरिअलिझम च्या प्रतिक मानायला हव्यात. ज्याला ग्लोबलायझेशन म्ह्णावे असे मोठे बदल तंत्रज्ञानामुळेच शक्य झाले आणि ते हे गेल्या काही दशकातच. त्यामुळे ग्लोबलायझेशन हा एक कंटिन्युअस फेनोमिनॉ आहे हा तुमचा दावा अपुरा आणि सरसकट आहे.

सरळसोट Mon, 21/04/2014 - 15:44

In reply to by अजो१२३

"बलात्काराचे समर्थन" वैगेरे काय? "गलती हो जाती है।" मधे पण समर्थन आहे असे म्हणता येत नाही.

रोचक! ऐकावे ते नवलच!

तुम्ही इम्प्लिसिट कन्सेन्ट ऐकली आहे का? मुलायमसिंघाची ती टिप्प्णी त्याचेच एक उदाहरण आहे.

सरळसोट Mon, 21/04/2014 - 15:50

In reply to by अजो१२३

निव्वळ पोटशूळ उठल्यावर जी भाषा तोंडी येते ती वापरली आहे.

राजेश्वरी बाईंना पोटशूळ कशामुळे झाला असेल असं आपल्याला वाटतं? इतक्या बायकांवर बलात्कार झाले मग माझ्यावर का झाले नाहीत अशा असूयेपोटी त्यांना पोटशूळ झाला असेल असंच तुमच्या विधानावरून वाटतं. आणि ह्या बाईंनी वापरलेली भाषा असंयत का आहे याचं एकही उदाहरण न देता ते लेखन असंयत आहे असा निर्वाळा देऊन तुम्ही मोकळे झालात! वर परत, टाळ्यापिटू वाचक समाज अशी हेटाळणी! चांगलंय!

गब्बर सिंग Sun, 20/04/2014 - 06:24

http://indianexpress.com/article/opinion/columns/national-interest-secu…

डॉ. शेखर गुप्ता बहुतांश वेळा मस्त (म्हंजे इनसाईटफुल) लिहितात. पण आजच्या लेखात जरा प्रॉब्लेम आहे. लेख वाचून झाल्यावर पुन्हा लेखाचा मथळा वाचलात की - हा मथळा का दिलेला आहे हा प्रश्न पडतो ? एक लक्ष वेधून घेणारा मथळा म्हणून ठीक आहे पण .....

माहितगार Sun, 20/04/2014 - 09:50

२६ एप्रिल संध्याकाळी ६:३० वाजता मुंबईच्या भाऊ दाजी लाड संग्रहालयात समकालीन भारतीय कलेविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. अधिक माहिती -

Contemporary Indian Art through the Lens of Asia by Dr Parul Dave-Mukherji, professor at the School of Art and Aesthetics, JNU, on Saturday, 26th April, 2014 at 6:30 pm.

The recent publication of InFlux: Contemporary art in Asia, provides a point of departure to raise questions about the current state of contemporary art in Asia. Parul aims to examine the shift in its critical reception, from the time of its emergence in the 1990s to the present, through a global recession and the challenge posed by post-nationalist geography. She questions the extent to which the aspiration to move beyond a Eurocentric definition of Asia to an inter-regional understanding has been fulfilled in its art practice and critical reception. She will focus on the recent works by N Pushpamala and the Raqs Media Collective in the way their practice has engaged with the category of “Asia” though travel and discourse.

Parul Dave-Mukherji is a professor at the School of Arts and Aesthetics, Jawaharlal Nehru University, New Delhi, India. She holds a PhD in Indology from Oxford University. Her publications include Towards A New Art History: Studies in Indian Art (co-edited), New Delhi, 2003 and guest edited special issue on Visual Culture of the Journal of Contemporary Thought, 17 (Summer 2003); Rethinking Modernity, (co-edited) New Delhi, 2005. Her recent publications include InFlux- Contemporary Art in Asia, (co-edited) New Delhi, Sage, 2013 and forthcoming 20th Century Indian Art, Skira (co-edited with Partha Mitter and Rakhee Balaram). Her research interests include global art history, contemporary Asian art and comparative aesthetics.
The lecture will be held on Saturday, 26th April 2014, in the Education Centre, at The Museum Plaza, Dr. Bhau Daji Lad Mumbai City Museum. Do join us for tea in the Plaza at 6:00 pm, followed by the lecture at 6:30 pm. Since the seating is limited, we request you to please RSVP with us by email (ccardoza@bdlmuseum.org).

अतिशहाणा Mon, 21/04/2014 - 02:22

माया कोदनानी यांच्या खटल्याचा पाठपुरावा करुन त्यांना शिक्षा घडवून आणणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याशी गुजरात सरकारची सूडबुद्धीची वागणूक याबाबतचा एक रोचक लेख वाचनात आला.

http://www.livemint.com/Leisure/RzMzJqvoJR5OE24Z8ypChJ/Narendra-Modi-cr…

अजो१२३ Mon, 21/04/2014 - 12:45

In reply to by अतिशहाणा

हीच बातमी दोन प्रकारे वाचता येते.

एक. अतिशहाणाची लिंक नि http://centreright.in/2013/02/can-anyone-ever-beat-aakar-patels-record/… ही लिंक हे एकत्र वाचावे

दोन. http://timesofindia.indiatimes.com/india/Gujarat-harassing-me-over-riot…
ही बातमी वाचावी.

बॅटमॅन Tue, 22/04/2014 - 15:14

In reply to by ऋषिकेश

वाह!!! बहुत अच्छे.

या बातमीस मिळालेला कमी प्रतिसादही बोलकाच आहे. हेच जर खापवाल्यांवर टीका करणारं असतं तर लोक कसे तुटून पडले असते त्याची कल्पना करून डोळे अंमळ पाणावले. (श्रेणीदातेहो, होऊदे खर्च, तेवढंच मनोरंजन वर्चं.)

'न'वी बाजू Tue, 22/04/2014 - 16:51

In reply to by बॅटमॅन

कुत्रा माणसाला चावला, तर ती बातमी नव्हे; माणूस कुत्र्याला चावला, तर ती बातमी. इथवर ठीकच आहे. पण एखाददिवस कुत्रा माणसाला जर चावला नाही, तर तीही ब्रेकिंग / हेडलाइन न्यूज़ व्हायला पाहिजे खरे तर. पण तशी ती होत नाही, ही बहोत नाइन्साफी आहे, नाही का?

====================================================================================================================

(अतिअवांतर: कुत्र्यावरून आठवले. तो "अइउण्ऋऌक्!! हल्!!!" प्रकार म्हणजे, रस्त्यात एखाद्या अनोळखी कुत्र्याने जर हटकले, तर त्याला अगोदर एक सणसणीत शिवी हासडून नंतर मग "हाड्!" असे जे मराठीत म्हणतात, त्याचे पाणिनीय भाषांतर असावे काय?)

बॅटमॅन Tue, 22/04/2014 - 16:57

In reply to by 'न'वी बाजू

या केसमध्ये नाइन्साफी तर आहेच.

तदुपरि आमची स्वाक्षरी म्ह. पाणिनीची काही सूत्रे आहेत. त्यांचा अर्थ काय, हे आम्हांस ठौक नाही. पण गोनीदांच्या "स्मरणगाथा" नामक आत्मचरित्रपर ग्रंथात त्यांनी एक किस्सा दिलेला आहे. ते घराबाहेर पडून भटकंती करीत होते तेव्हाची गोष्ट. संन्यास घेतला होता आणि एका माणसास घाबरवणे गरजेचे होते-का, कशासाठी, इ.इ. सफै विसरलो. भौतेक कुणी गुंड असावा. मग त्यांनी कमंडलूतले पाणी हातात घेतले आणि वरील मंत्र म्हणून ते त्याजवर फेकले. तो माणूस घाबरून पळून गेला. ते आठवलं, इतकंच. शिवाय ती अक्षरे शिवीचा फील देतात, हेही तितकेच खरे आहे.

चिंतातुर जंतू Mon, 21/04/2014 - 13:06

गुजरात सरकारच्या अडाणी संबंधांविषयी फोर्ब्जमध्ये आलेला लेख - Doing Big Business In Modi's Gujarat

फोर्ब्जसारख्या मासिकात आल्यामुळे हा डाव्यांचा प्रोपागांडा मानता येणार नाही बहुतेक.

मी Mon, 21/04/2014 - 13:37

In reply to by चिंतातुर जंतू

लेखाची साउंड इफ्फेक्ट्स वापरुन भिती दाखवणारे भयपटाशी तुलना करता यावी, झारपारा खेड्यातील लोकांना सकाळच्या 'सुंदर' दवबिंदूंच्या ऐवजी आणि झेलाव्या लागणार्‍या राखेच्या माध्यमातून लोकांच्या मुलभूत 'अपिल टू नेचर' ला हात घालणारे लेखन प्रपोगांडा वाटत नाही.

चिंतातुर जंतू Mon, 21/04/2014 - 18:02

In reply to by अजो१२३

>> याला खवचट श्रेणी का? काहीही?

खाली उद्धृत केलेल्या वाक्याला 'खवचट' मानलं गेलं असावं. अर्थात, माझी त्याला हरकत नाही.

फोर्ब्जसारख्या मासिकात आल्यामुळे हा डाव्यांचा प्रोपागांडा मानता येणार नाही बहुतेक.

अजो१२३ Mon, 21/04/2014 - 18:53

In reply to by चिंतातुर जंतू

त्या वाक्यातही खवचटपणा नाही. लिहिणारा कोण हे पाहूनच बातमी लोक टोलवतात. ही बातमी गांबीर्याने घ्यावी असे तुम्हाला मनोमन वाटले म्हणून तशी तुम्ही नोंद केलीत.

मन Mon, 21/04/2014 - 14:23

मिसळपाव access करता येत नाही इथून ह्याचे वाईट वाटते.
खालील बातमी वाचण्यात आली :-

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Togadia-BJP-Muslim-Hindu/…

*******************************बातमी सुरु********************************
हिंदू वस्तीतून मुस्लिमांना काढा!

राजकीय क्षितिजावर नरेंद्र मोदी यांचा उद्य झाल्यापासून झाकोळले गेलेले विश्व हिंदू परिषदेचे वादग्रस्त नेते प्रवीण तोगडिया यांनी ऐन निवडणुकीत पुन्हा एकदा वादाला तोंड फोडले आहे. 'हिंदू वस्त्यांमध्ये राहणाऱ्या मुसलमानांना बाहेर काढा,' असे वक्तव्य तोगडिया यांनी आले आहे. या घडामोडींमुळे भाजपची, पर्यायाने नरेंद्र मोदी यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

गुजरातच्या भावनगर शहरातील मेघानी सर्कलजवळ एका मुस्लिम उद्योजकाने घर खरेदी केले आहे. परिसरातील हिंदूंनी त्यास विरोध केला आहे. याचे निमित्त करून तोगडियांनी यांनी शनिवारी विहिंप व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसह या मुस्लिम उद्योजकाच्या घरावर धडक दिली. तिथे निदर्शने करण्यात आली व रामजप करण्यात आला. यावेळी तोगडियांनी विहिंपच्या कार्यकर्त्यांना या उद्योजकाच्या घरावर बजरंग दलाची पाटी लावण्याचे आदेश दिले. तसेच चिथावणीखोर भाषणही दिले.

'भावनगरमध्ये डिस्टर्ब एरिया अॅक्ट लागू करण्यात यावा किंवा हे घर जबरदस्तीने ताब्यात घेतले जावे आणि कायदेशीर लढाई लढावी, असे तोगडिया म्हणाले. '४८ तासांत याने घर खाली ने केल्यास घरावर दगड, टायर आणि टोमॅटोचा मारा करा. 'हे सगळं करण्यात काहीच गैर नाही. अजून राजीव गांधींच्या मारेकऱ्यांनाही फाशी झालेली नाही. तुमच्यावरचे खटलेही वर्षानुवर्षे चालतील. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. मी याआधी असे अनेक खटले लढलो आणि जिंकलोही आहे, असेही तोगडिया म्हणाले.

'हिंदूंच्या हितासाठी राजकीय पक्षांवर दबाव आणण्याची निवडणूक ही संधी आहे. हिंदूंच्या रक्षणासाठी काँग्रेस आणि भाजपवर दबाव आणा. तसे करताना अजिबात मागे हटू नका,' असे आवाहनही तोगडियांनी केले. तोगडियांच्या या भाषणानंतर मुस्लिम उद्योजकाच्या घराला संरक्षण देण्यात आले आहे.

************************बातमी समाप्त***************************

गब्बर सिंग Mon, 21/04/2014 - 14:50

In reply to by मन

भाजपा नेहमी राज्यांची बाजू घेतो (स्थानिक सुरक्षेच्या बाबतीत) तो ह्यासाठीच. की जेणेकरून त्यांना हे उद्योग करता यावेत. घटनेनुसार स्थानिक सुरक्षा ही राज्यांच्या अखत्यारीत ठेवलेली आहे. पण त्याचा परिणाम हा होतो की .... अशा निर्वाणीच्या वेळी व्यक्ती समोर फक्त एकच मार्ग असतो - तो म्हंजे पोलिस. पण पोलिसांचा बॉस असतो गृहमंत्री (राज्यसरकार). पर्याय उरतच नाही. There is hardly any check there.

Power tends to corrupt and absolute power corrupts absolutely. ____ Lord Acton.

नितिन थत्ते Mon, 21/04/2014 - 20:19

In reply to by सरळसोट

दिग्विजयसिंग काहीही बरळतात तसे तोगडिया बरळत आहेत; तेव्हा दुर्लक्ष करा असे सुचवू पहात आहात का?

पण इथे बरळण्याच्या पुढची पायरी गाठली जात आहे असे दिसते.

मी Mon, 21/04/2014 - 20:55

In reply to by नितिन थत्ते

भाजपा आणि रास्वसंघाला तोगडियापासून अंतर राखावे लागले हि ते काँग्रेसप्रमाणेच सेक्युलर होण्याची नांदी आहे काय असे क्षणभर वाटून गेले.

बॅटमॅन Tue, 22/04/2014 - 17:45

In reply to by मी

याने नक्की फायदा काय झाला? म्ह. एग फ्रीझिंग केले सो दॅट नंतर पाहिजे तेव्हा वापरले हे ठीकच आणि उत्तमच.

पण ३५+ वयात गर्भार राहण्याचे जे कै तोटे आहेत असे म्हटल्या जाते, त्यांपैकी किती अडचणी अंडे गोठवल्याने नष्ट होतील हे पहायची उत्सुकता आहे. त्याबद्दल लेखातून काही कळ्ळे नै.

मी Tue, 22/04/2014 - 18:12

In reply to by बॅटमॅन

बायोलॉजिकल घड्याळाची सतत चिंता करावी लागणार नाही हा एक फायदा दिसतो, बाकी तोटे सध्यातरी होते तसेच असणार आहेत.

बॅटमॅन Tue, 22/04/2014 - 18:41

In reply to by मी

अर्थातच- तो एक मोठा फायदा आहेच. तरी आमचे अज्ञान अपार असल्याने नीट लक्षात आलं नाही. समजा अंडे गोठवले नाही तर नक्की कसला प्रॉब्लेम येऊ शकतो? स्त्रीशरीरातली तशी जेवढी अंडी असतात ती जन्मतः असतात तेवढीच राहतात असे वाचलेले आहे. दर महिन्यास एक अंडे शरीराबाहेर पडते-प्रोव्हायडेड स्त्री तेव्हा गर्भार नसेल तर. मग अंडे गोठवल्याने पुढे अंडी संपतील अशी चिंता नको म्हणून गोठवले तर ठीक. पण एकदा का सगळी अंडी संपली म्ह. मेनोपॉजल वय आले, की अंडी गोठवून तरी काय फायदा? कारण तेव्हा तर गर्भार राहता येणारच नै. ते कै लक्षात आलं नै. जोपर्यंत पाळीप्रक्रिया सुरू आहे तोपर्यंत अंडी गोठवण्याच्या प्रक्रियेची नक्की गरज काय असा प्रश्न आहे. समजा अंडी गोठवली नाहीत तर संयुक्तपेशी बनण्यास नंतर नंतर प्रॉब्लेम कशामुळे होतो ते पाहिलं पाहिजे, मग कदाचित आमचे शंकासमाधान होईल. असो.

ॲमी Tue, 22/04/2014 - 18:50

In reply to by बॅटमॅन

माझ्यामते अंडे गोठवल्यास हवे तेव्हा बाहेरच स्पर्मशी मिलाफ करुन मग बनलेला गर्भ गर्भाशयात ट्रान्सफर करता येइल. IVF मधे हेच करतात ना?

बॅटमॅन Tue, 22/04/2014 - 18:53

In reply to by ॲमी

होय, हेच होते.

पण मुद्दा असा की हे सगळे नैसर्गिकपणे होण्यास ३५+ वयात नक्की कसल्या अडचणी येतात?

आणि शिवाय अंडे गोठवूनही जर सरोगेट मदर वापरायची नसेल तर किती वयापर्यंत मूल पैदा करता येईल त्यालाही लिमिट आहेच ना? मेनोपॉज एकदा सुरू झाली की हे शक्य होईल का? कदाचित नसावे किंवा माझी काही गफलत होत असावी.

ॲमी Tue, 22/04/2014 - 19:05

In reply to by बॅटमॅन

मी तज्ञ नाही पण थोड्याफार इकडेतिकडे वाचलेल्या माहितीवरुन अंदाजपंचे उत्तर देतेय. मी ती बातमीदेखील वाचली नाही कारण इंटरेस्ट नाहीय. त्यामुळे चुभुद्याघ्या.
१. वय वाढल्यावर अंड्याची क्वालीटी डिग्रेड होत असावी.
२. नैसर्गिकरित्या कंसीव करणे अवघड जात असावे.
३. गर्भ मेनोपॉजनंतरही वाढवू शकतो सरोगेटचीच गरज नसते.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 22/04/2014 - 19:11

In reply to by बॅटमॅन

माझं या विषयातलं ज्ञानही फार नाही. डॉक्टर जास्त तपशील देऊ शकतात.

१. ३५+ वयापुढे बीजाचं फलन होण्याची शक्यता कमी असते. दुसरं, मुलगी जन्माला येते तेव्हा तिच्या शरीरात जेवढी अंडी असतात, त्यापेक्षा बरीच कमी अंडी वयात येताना असतात. (ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडमध्ये कमी होतात; मासिक पाळीतून दोन-चार कमी होतात तशी नाही.)
१अ. वयानुसार बीजांडांची प्रतही कमी होत जाते. (वयानुसार स्पर्म्सचंही हेच होतं.)
२. स्वतःचं मूल हवंय पण स्वतःला गर्भार रहायचं नसेल (किंवा पुरुष व्हायचं असेल आणि हे परवडत असेल) तरीही हा पर्याय वापरता येईल.
३. वरच्या प्रतिसादात जे काही लिहीलं आहे ते सगळं सामान्य आरोग्यवंत स्त्रियांबद्दल आहे. शरीरात असणाऱ्या गुंतागुंतीच्या अवयवांमध्ये किंचितसा बिघाड असेल तरीही गर्भधारणा, गर्भ गर्भाशयात टिकून राहणं कठीण होतं. अशा बऱ्याच गुंतागुंती मला माहित नाहीत, हे समजावण्याचा आवाका या लेखाचा असावा असं दिसत नाही.

तरीही ज्या स्त्रियांना स्वतःची मुलं, स्वतःच्या सोयीनुसार हवी आहेत तेव्हा होण्यात आणखी एक पाऊल पुढे टाकलं गेलं इतपत मला या बातमीचा अर्थ लावला.

बॅटमॅन Tue, 22/04/2014 - 19:17

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

धन्यवाद. अस्मि यांनी क्लीअर केलेच होते, या प्रतिसादातून अजून जरा क्लीअर झाले. विशेषतः मेनोपॉज सुरू झाल्यावरही गर्भार राहता येऊ शकते(जर ऑलरेडी फलन झाले असेल बाहेरच्या बाहेर तर) हे मला विशेष रोचक वाटले. त्यामुळे तत्त्वतः अगदी ५० पर्यंतही स्वतःचे मूल या पर्यायाने पैदा करता येईल. मग टेन्शनच नाही. हे विशेषत: करिअरिस्ट महिलांसाठी आणि अन्य काही कारणांमुळे मूल पोस्टपोन करू इच्छिणार्‍या सर्वांसाठीच अतिशय उत्तम आहे.

ॲमी Tue, 22/04/2014 - 19:29

In reply to by बॅटमॅन

एवढं सोप्प पण नाहीय बरं का ते :-). प्रेगन्सी कअॅरी करायची ताकद असलेल आणि इतर काही त्रास नसलेल शरीर लागत त्यासाठी. जे ५०+ वयात असणे अवघड आहे