जात

डिस्क्लेमर- सदर विषय वादग्रस्त असल्याचे ठरवुन आमचे मित्र राजेश भुस्कुटे यानी अन्य एका संस्थळावर टाकलेला हा लेख काढुन टाकला गेला. तो मी आज इथे नव्याने शेअर करित आहे. मूळ लेख श्री शिरगावकर यानी लिहिला असून त्यांच्या पूर्वानुमतेने पुनर्प्रकाशित करु इच्छित आहे.धन्यवाद


आपण ज्याच्यामध्ये अत्यंत योगायोगानी जन्मलो
तो देश, धर्म, जात, पोटजात, शहर, गाव
हेच जगातलं सगळ्यात बेस्ट आहे
असं मानणाऱ्या
आणि
इतर देश, धर्म, जात, पोटजात, शहर, गाव
या मधे जन्मलेले सगळे सगळे जंतू
आपल्यापेक्षा अत्यंत कनिष्ठ, दुय्यम, नीचच आहेत
असं मनोमन मानणाऱ्या लोकांना
एकच म्हणावंसं वाटतं
'Get well soon!'

प्रॉब्लेम एकच आहे
आपली ही अशी विचारसरणी हा आपला आजार आहे
आणि
आपण आजारी आहोत
हेच त्यांना मान्य नसतं…

त्यांच्या दृष्टीने आजारी असतात ते
त्यांचा देश, धर्म, जात, पोटजात, शहर, गाव सोडून
इतर ठिकाणी जन्मलेलेच!

कसं काय होणारे कोण जाणे...
या माणसांचं
आणि ते असल्यामुळे या जगाचं!!

मूळ लेख-

जात
----

पंधरा दिवसांपूर्वीच जॉईन झालेल्या एका ट्रेनी तरुणीला तिची मॅनेजर झापत होती
'अगं काय चाललंय तुझं? जेमतेम पंधरा दिवस झाले जॉईन होऊन, त्यात चार दांड्या मारल्यास... त्याही काहीही न सांगता...'
'आमचा सण होता'
'कोणता सण?'
'ते तुम्हाला माहित पाहिजे'
'अगं पण न सांगता दांडी का मारलीस?'
'तुम्हाला माहित नाही का हा सण असतो ते...'
'बरं, तो एक दिवस ठीके... इतर तीन दांड्यांचं काय?'
'.....'
'सांग ना?'
'मी सांगणार होते, तुमचा फोन लागला नाही..'
'तिन्ही वेळा?'
'......'
'बरं, तुला दिलेलं एकही टास्क पूर्ण झालेलं नाही, त्याचं काय?'
'मला मुद्दामून अवघड कामं दिली आहेत...'
'अगं, MBA आहेस ना तू... समोरच्या व्हाऊचर्समधे जे दिसतंय ते system मधे enter करणं हे अवघड आहे का?'
'आमच्या कॉलेजमधे हे काही शिकवलं नव्हतं'
'अगं पण इथे शिकवलं ना तुला आम्ही... आणि मॅन्यूअल आहे ते वाचायचं, काही अडलं तर तुझ्या टीम लीडरला विचारायाचं... जमत नाही तर विचारलंस का तू कधी?'
'......'
'तू न सांगता दांड्या मारतेस, तू दिलेलं काम वेळेत संपवत नाहीस, तुला काही अडलं तर कोणाला विचारत नाहीस आणि जी कामं केलीयेस त्यात भरपूच चुका आहेत.... काय करायचं आपण?'

'तुम्ही मला मुद्दामून अवघड कामं दिली आहेत... मला सोपी कामं द्या...'
'हे बघ मुली, तुला दिलंय त्याहून सोपं काम कंपनीत नाहीये कुठलं...'
'तो तुमचा प्रॉब्लेम आहे... by the way, मी पुढच्या आठवड्यात दोन दिवस येणार नाहीये, आधीच सांगतीये'...

त्या मॅनेजर बाईचं टाळकं आता सटकलं... तरीही संयमानी ती म्हणाली
'एक काम कर, तू राजीनामा दे आणि घरीच जा'
'मी का राजिनामा देऊ?'
'अगं मुली, तुला आम्ही काढून टाकलं तर तुझ्याच करीयरची वाट लागेल, त्यापेक्षा तू राजीनामा दे आणि जे तुला हवं ते कर आयुष्यात'

'मी देणार नाही... तुमच्या जातीतली लोकं मुद्दामून कारणं काढून आमच्या जातीतल्या लोकांना कामावरून काढून टाकतात'

'हे बघ, मला माहितही नाही तुझी काय जात आहे ते... मी स्वतः तर जातपात मानत नाहीच, पण आपली कंपनीही कधीही कोणालाही जात विचारत नाही... तुला तुझं काम झेपत नाहिये यात तुझ्या-माझ्या जातीचा काय संबंध? '

'नाही कसा... मी वेगळ्या जातीची आहे म्हणूनच तुम्ही मला कामावरून काढून टाकताय... कशी काढताय बघतेच मी...'

ती तावातावानी मॅनेजर बाईंच्या केबीनमधून निघून गेली...

दहा मिनिटांत मॅनेजर बाईंना फोन आला, 'मी अमुक तमुकचा बाप बोलतोय... आमच्या पोरीला ती वेगळ्या जातीची आहे म्हणून कामावरून काढून टाकलंत तर बघा... मोर्चाच घेऊन येईन तुमच्या अॉफीसवर... जे चाललंय ते चालू द्या... तिला काही त्रास झाला तर बघून घेईन तुमच्याकडे...'

मॅनेजर बाई घाबरल्या... त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना, HR ला वगैरे जे झालं ते सगळं सांगितलं...

हे सगळं झालं आज, दोनेक तासात...

पुढे काय होईल माहित नाही... पण अंदाज आहे... त्या पोरीचा जॉब नक्की जाईल... त्या कंपनीवर मोर्चा बिर्चा काही येणार नाही... मॅनेजरबाईही यातून सावरून एकदोन दिवसांत स्वतःच काम नीट सुरू करतील...

आणि सर्व जाती-धर्माच्या लोकांना आजवर समान संधी देत आलेली ही कंपनी मात्र पुढच्या रिक्रूटमेंटच्या वेळी बायोडेटांवरची आडनावं नीट तपासून पाहील कदाचित...

एकाच्या मूर्खपणाची किंमत दुसऱ्याच कोणाला द्यावी लागते
फक्त जातीव्यवस्था मानणाऱ्या,
आणि कोणत्याही प्रसंगी फुकटची जात मधे आणणाऱ्या
तद्दन बिण्डोक माणसांमुळेच...

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

त्याच संस्थळावर, याच लेखावर, एक लाखमोलाचे वाक्य वाचले होते - एका प्रसंगाने/अनुभवाने, लाखमोलाची माणुसकी विसरायची नसते.

ते वाक्य खूप आवडलेले. मीही तेच म्हणेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक नव्हे, अशी असंख्य उदाहरणे माझ्या माहितीत आहेत आणि त्यासाठी अनेक मॅनेजरांना त्रास भोगावा लागला आहे. सरकारी बँकांमधे तर अशी उदाहरणे खूपच आहेत, त्याठिकाणी मात्र, सोप्पे आणि जमेल ते काम देण्याचा पर्याय स्वीकारावा लागतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि सर्व जाती-धर्माच्या लोकांना आजवर समान संधी देत आलेली ही कंपनी मात्र पुढच्या रिक्रूटमेंटच्या वेळी बायोडेटांवरची आडनावं नीट तपासून पाहील कदाचित...
एकाच्या मूर्खपणाची किंमत दुसऱ्याच कोणाला द्यावी लागते
फक्त जातीव्यवस्था मानणाऱ्या,
आणि कोणत्याही प्रसंगी फुकटची जात मधे आणणाऱ्या
तद्दन बिण्डोक माणसांमुळेच...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वीतराग बनो......वीतद्वेष बनो !

अत्त दीप भव !

जातीचा गैरफायदा घेणं योग्य नाही. या उदाहरणात त्या मुलीची चूक आहे हे उघड आहे.

माझ्या मते त्या मॅनेजरबाईने पुरेशी काळजी घेतली नाही. कर्मचारी वेगळ्या जातीचा असो नसो - नोकरीवरून काढताना काहीतरी डॉक्युमेंटेशन तयार करणं आवश्यक नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'मी देणार नाही... तुमच्या जातीतली लोकं मुद्दामून कारणं काढून आमच्या जातीतल्या लोकांना कामावरून काढून टाकतात'

'हे बघ, मला माहितही नाही तुझी काय जात आहे ते... मी स्वतः तर जातपात मानत नाहीच, पण आपली कंपनीही कधीही कोणालाही जात विचारत नाही... तुला तुझं काम झेपत नाहिये यात तुझ्या-माझ्या जातीचा काय संबंध? '

'नाही कसा... मी वेगळ्या जातीची आहे म्हणूनच तुम्ही मला कामावरून काढून टाकताय... कशी काढताय बघतेच मी...'

-

१) म्यानेजर बाईंनी किमान Discretion दाखवायला हवे होते. हे संभाषण त्या दोघांमधे एका सेपरेट खोलीत व्हायला हवे. तिसर्‍या व्यक्तीस (उदा. धागाकर्ता) हे संभाषण ऐकू येता कामा नये.
२) म्यानेजर बाईंनी थोडा सडेतोडपणा दाखवायला हवा होता. जर "तुमच्या" जातीबद्दल माझ्या मनात एवढे खराब विचार असते तर मी तुला काढून टाकण्यासाठी कामावर घेतलेच नसते.
३) ही कंपनी जर संपूर्णपणे खाजगी असेल तर त्या कंपनीस कोणत्याही कर्मचार्‍यास कोणतेही कारण न देता केव्हा ही कामावरून कमी करण्याचा विकल्प असायला हवा. पण कंपनीच्या पॉलिसीज मधे - जर - जात धर्म यावर आधारित भेदभाव करण्यास मनाई आहे - अशी HR Policy तरतूद असेल तर म्यानेजरीण बाईंना डॉक्युमेंटेशन मेंटेन करावे लागेल - की कोणत्या कारणास्तव त्या ट्रेनी मुली ला कमी करण्यात येत नाहे. To ensure compliance with the firm policies.
४) Markets do have reasonable provisions to reduce (if not prevent) discrimination based on irrelevant considerations/criteria. त्यामुळे समस्येचे पूर्ण निराकरण होत नसले तरी निदान काही प्रमाणावर तरी होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असे सगळे नियम, संकेत लिहिलेली लिंक द्याल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

लिंक

सपस्ट लिवलं हाये. वाचा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुम्ही माझ्या मुद्दा क्र. ४ बद्दल व सिरियसली विचारत असाल तर - लिंक इथे आहे. गॅरी बेकर यांनी भेदभावाच्या मुद्द्याचे तर्कशुद्ध विश्लेषण केलेले आहे. बेकर यांच्यानंतर स्टिग्लिट्झ यांनीही याबद्दल लिहिलेले आहे. पण ते मात्र मी वाचलेले नाही (व त्याचे कदाचित कारण असे ही असेल की स्टिग्लिट्झ हे थोडेसे डाव्या विचारसरणीचे आहेत.). अर्थात माझा असा दावा नाही की बेकर यांनी मांडलेल्या संकल्पना भारतात तंतोतंत व संपूर्णपणे लागू पडतील. पण काही प्रमाणात तरी ....

व तुम्ही जर उपरोधाने म्हणत असाल तर .... तुम्ही माझ्या प्रतिसादाची किमान दखल तरी घेतलीत (व नंतर उपरोध वापरलात). तुमच्या समोरील रियलिस्टिक विकल्पांमधे - दुर्लक्ष करणे - हा सुद्धा एक विकल्प होता. पण तुम्ही दखल घेतलीत. इसलिये तह्-ए-दिल से शुक्रिया.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>एकाच्या मूर्खपणाची किंमत दुसऱ्याच कोणाला द्यावी लागते
फक्त जातीव्यवस्था मानणाऱ्या,
आणि कोणत्याही प्रसंगी फुकटची जात मधे आणणाऱ्या
तद्दन बिण्डोक माणसांमुळेच...<<<
दुर्दैवाने ते खर आहे. जे जे हॉस्पिटल मधे डॉ तात्याराव लहाने यांच्या बाबतीतही असेच काहीसे झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

अशी परिस्थिती दिसते खरी -विशेषतः सरकारी आस्थापनांमध्ये. काही विशिष्ट काऊंटर्सवर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात. कामे भराभर उरकली जात नाहीत.
मात्र, हे कदाचित फर्स्ट जनरेशन माय्ग्रंट्स आणि इतर बरेच काही फर्स्ट जनरेशन - सुशिक्षित वगैरे, असावेत; (आणि) यांची पुढची पिढी स्पर्धाशील आणि कॉम्पिटंट होईल अशा आशेस जागा आहे असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रांगा छोट्या करायचे कौशल्य शिकायला अख्खी पिढी लागत नसावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

लांब रांगा हे एक उदाहरण झाले. कामाची शिस्तशीर आखणी, चटपटीतपणा, व्यवस्थेशीरपणा (ऑर्गनाइझ्ड असणे), अन्यायग्रस्तता आणि वैफल्य, न्यूनगंडावर मात करण्यासाठी पोकळ अहंगंड बाळगणे, समस्येचा गाभा लक्षात येणे, संवादशील असणे या आणि अशा अनेक मनोवृत्तींतून बाहेर पडण्यासाठी हे गुण असलेल्या आणि अवगुण नसलेल्या समाजाशी प्रदीर्घकाळ अभिसरण आवश्यक असते. ह्याला आपण रिअलाय्झेशन, अवेकनिंग, जाण येणे वगैरे शब्द वापरू शकू. दिङ्मूढ जडशीळतेतून बाहेर पडणे हे सरसकट भारतीय समाजालाही अजून जमलेले नाही. मग त्यातल्या अतिमागासांची काय कथा?
शिवाय गर्भावस्थेत आणि वाढीच्या दिवसांत व्यवस्थित पोषण मिळाले नाही तर मूल आळशी, मंद, शीघ्रकोपी होते, आणि वाधीच्या दिवसांत योग्य, आदर्श वर्तन समोर नसले तर वर्तनात दोष रहातो. अर्थात हे विधान सर्वच समाजाला लागू आहे. एखाद्या समाजगटाच्या एकूण संख्येच्या प्रमाणात अशा व्यक्तींचे प्रमाण त्या त्या गटात किती आहे याचा विदा कधी उपलब्ध झाला तर याची सत्यता तपासता येईल.
अर्थात गैरशिस्त वर्तन खपवून घेऊ नये हे खरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जगातल्या सर्व लोकांची बुद्धी आपल्यापेक्षा कमी आहे असं मानणं विकृती आहे. लेखकाला म्हणावं - Get well soon!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

धागाकर्त्यास प्रश्न -
ही बातमी वाचलीत का? ह्या पातळीवर अन्याय चालू असता आपले हे लिखाण कुठवर आणि कितपत गांभीर्याने घ्यावे ह्याविषयी सल्ला द्यावा ही नम्र विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ह्या पातळीवर अन्याय चालू असता आपले हे लिखाण कुठवर आणि कितपत गांभीर्याने घ्यावे ह्याविषयी सल्ला द्यावा ही नम्र विनंती.

प्रस्तुत लिखाण कितपत गांभीर्याने घ्यावे, हा भाग अलाहिदा, पण या दोन बाबींचा परस्परसंबंध काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आहे . संबंध आहे. जेव्हा हा लेख मिपावर टाकला होता तेव्हा त्या सणाच्या जागी आंबेडकर जयंतॆचा उल्लेख होता. कथेतील मग्रूर मुलगी असे म्हणते की ती आदल्या दिवशी रजा राहिली कारण आंबेडकर जयंती होती. आता लेखकाने फेरफार केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण या दोन बाबींचा परस्परसंबंध काय?

हेच विचारतो. आमच्या हपिसात पण एक ब्रिगेडी टाळक होतं. काही फ्रेशर्सना प्रोग्रॅमिंगचं ट्रेनिंग देताना सरळ ब्रिगेडी भाषण सेशनमध्ये सांगत असे. अगदी जातीचा उल्लेख करून. अमुक अमुक लोकांनी तमुक तमुक केलं. मूलनिवासिनायक मधले लेख ऑफिसमध्ये ई-मेल मधून पूर्ण ग्रूपला पाठवायचा. आता इतर ठिकाणी अत्याचार होतायत म्हणून उपरोल्लेखित वर्तनपण दुर्लक्षित करायचं का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

नेमके!

एका बाजूवर अत्याचार जास्त होतात म्हणून त्यांनी केलेल्या गोष्टी नजरेआड कराव्यात असं लॉजिक आहे काय? असेल तर स्पष्ट सांगावे तरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> एका बाजूवर अत्याचार जास्त होतात म्हणून त्यांनी केलेल्या गोष्टी नजरेआड कराव्यात असं लॉजिक आहे काय? <<

सदर लेख एक ऐकीव किस्सा ह्या पातळीवरचा आहे. असे प्रकार होत असतील का? शक्यता नाकारता येत नाही. खाजगी कंपन्यांत अशा वेळी उच्चवर्णीयांवर अन्याय होत असेल का? कल्पना नाही. विश्वासार्ह म्हणता येईल अशा स्वरूपात तशी बातमी आली तर त्याचा विचार करताही येईल. परंतु, असं लिखाण हे मी तरी ऐकीव किश्शांच्या पातळीवरच ऐकलेलं आहे. तरीही, 'आता ही कंपनी जातीपातीच्या आधारावर भेद करेल, तर त्यात तिला कसा दोष देता येणार?' असा गर्भित प्रश्न त्यात आहे. म्हणजे, 'पाहा, दलितच दलितांचे वैरी आहेत' असं गर्भित आहे. म्हणजे 'एवढ्या सवलती दिल्यानंतर आता दलितांच्या सद्यस्थितीला आम्ही उच्चवर्णीय जबाबदार नाही' असा गर्भित दावा आहे. शिवाय, असे किस्से सांगताना अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट किती घातक आहे आणि त्यामुळे उच्चवर्णीय किती मनस्ताप सोसतात अशी टिप्पणी उघड किंवा छुप्या स्वरूपात येते. ह्या सगळ्या छुप्या किंवा गर्भित दाव्यांच्या पार्श्वभूमीवर मी दिलेली बातमी पाहिली तर काय दिसतं?

  1. ती एक बातमी आहे
  2. ती एका प्रतिष्ठित वृत्तपत्रानं छापली आहे. म्हणजे असे आरोप करताना किमान शहानिशा झाली असावी
  3. अशा अनेक बातम्या येत राहतात
  4. त्यातल्या गुन्ह्यांचं स्वरूप भीषण असतं (किंबहुना म्हणूनच त्याची बातमी होते)

मग हे लक्षात घेता अशा ऐकीव किश्शाच्या आधारे मी काही मत बनवावं का? आतापर्यंत आलेले प्रतिसाद पाहिले तर कुणीही किश्शाच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित केलेली नाही. म्हणजे ऐकीव माहिती सत्य आहे आणि असं होत राहतंच असंच सगळे धरून चालले आहेत. ह्यात (म्हणजे कुणीच शंका उपस्थित न करण्यात) अशा किश्शांवर विश्वास ठेवण्याचा एक उत्साह किंवा gullibility मला दिसते. म्हणून अशी शंका उपस्थित करण्याची गरज भासली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

उत्तम प्रतिवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>आतापर्यंत आलेले प्रतिसाद पाहिले तर कुणीही किश्शाच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित केलेली नाही.

गब्बरसिंग यांनी दिलेल्या प्रतिसादात पहिल्याच मुद्द्यात ही शंका उपस्थित केली आहे. मॅनेजरबाईंनी अधिक डिस्क्रिशन वापरायला हवं होतं. धागालेखकाने ऐकीव माहितीवर आधारित किंवा मॅनेजरबैंच्या व्हर्जनवर आधारित लेख लिहिलेला आहे असा त्यांचा रोख असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

लेखाच्या बाजूने बोलल्याचा अर्थ, दिलेल्या बातमीवर अविश्वास ठेवणे असा होतो हे आत्ताच कळाले. ऐकीव व्हर्जन्स दरवेळेस चूकच असतात असेही नाही.

तदुपरि गलिबिलिटीबद्दल बोलायचं झालं तर कौंटरकरंट्स सारख्या वेबसायटींवर डोळे झाकून विश्वास ठेवणेही त्यातच मोडावे, नै?

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सदर लेख एक ऐकीव किस्सा ह्या पातळीवरचा आहे असे कुठे म्हटलेले दिसले नाही. असे प्रकार होत असतील का? हो होतात. प्रचंड होतात. आजचे तर जाऊच द्या ८० च्या दशकात गावाकडे पाटला कुलकण्यांची फाटून असायची.

खाजगी कंपन्यांत अशा वेळी उच्चवर्णीयांवर अन्याय होत असेल का? होतो. सवर्ण स्त्रीवर बलात्कार झाला तर तो केवळ बलात्कार असतो. पण दलित स्त्रीवरील शहरी खासगी प्राववेट कंपनीतला बलात्कार ती सगळी विशेषणं घेऊन येतो. हे झाले अन्यायाचे. लखनौच्या टेल्कोच्या प्लँटमधे पेंटशॉप मधे दलित पेंटर एक मजला पेंटचा एक कॅन (१०-१२ किलोचा) घेऊन जायला मना करतात. येऊ द्या केन म्हणतात. त्यांना झाडता येत नाही. शेवटी मॅनेजर स्वतः घेऊन जातो किंवा सवर्ण पेंटरला बोलावतो. क्रेनची वाट पाहिली तर प्रॉडक्शन अर्ध्यावर उतरायचे.

जामनगरमधे एकदाच दीड लाख कामगार एकाच प्रोजेक्ट वर काम करत होते. अर्थातच तिथे प्रचंड घाण होती. सगळ्या मोठमोठ्या पाईपांत संडास, इ. आमचा एच ओ डी, मी नि मित्र थांबलो असताना मित्र म्हणाला, "भंगी लावून आपण हे साफ का करत नाही?" एह ओ डी म्हणाले, " तो जातीवाचक शब्द चूकूनही नंतर तोंडात आणू नको. इअतके कडक कायदे आहेत कि काही तक्रार झाली तर बिना बेल जेल." रिलायन्स प्रायवेट आहे.

'आता ही कंपनी जातीपातीच्या आधारावर भेद करेल, तर त्यात तिला कसा दोष देता येणार?' यात वाक्यरचना चूक आहे. कोणतीही कंपनी अशी अधिकृत पॉलिसी बनवत नाही. एक दुष्ट संकेत प्रस्थापित होतो. 'पाहा, (काही मूर्ख) दलितच (इतर चांगल्या) दलितांचे वैरी आहेत' असं गर्भित आहे नि ते योग्य आहे.

'एवढ्या सवलती दिल्यानंतर आता दलितांच्या सद्यस्थितीला आम्ही उच्चवर्णीय जबाबदार नाही' असा चिंजंनी लेखकाच्या हेतूवरच शंका घेऊण काढलेला अर्थ आहे. विश्वासच ठेवायचा नाही हे मूळ असेल मोठमोठे तर्क देण्यात हशील नाही.

शिवाय, असे किस्से सांगताना अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट किती घातक आहे आणि त्यामुळे उच्चवर्णीय किती मनस्ताप सोसतात अशी टिप्पणी उघड किंवा छुप्या स्वरूपात येते. ह्या सगळ्या छुप्या किंवा गर्भित दाव्यांच्या पार्श्वभूमीवर मी दिलेली बातमी पाहिली तर काय दिसतं?

पहिला प्रश्न आहे कि येदियुरप्पाच्या भ्रष्टाचाराचा आरोप, त्याचे उत्तर देताना भाजपवाल्याने शीला दिक्षित नि कॉमनवेल्थचे नाव घेऊ नये. मग येदिचा फ्रॉड १० रुचा आणि शीलाचा १०००० चा का असेना. अगोदर कर्नाटकचा हिशेब द्यावा. तुम्ही म्हणताय कि गरज नाही. कर्नाटकचा हिशेब निव्वळ शून्यच आहे, दिल्लीचे पहा. आता ही लिंक वाचा हा प्रो-दलित रिपोर्ट आहे. During the last 15 years(1995-2010), a total of only 5, 58, 103 cases (4, 71,717 against SCs
and 86,386 against STs) were registered.
What the report says about convictions? Adjusting all numbers for pendencies, less than 5%!!! What does this mean? Either judiciary/justice is doomed or there are false cases by dalits. Among these 95% non-convictions, there must be good amount false cases!!! दलितांवर जेव्हा अन्याय होईल तेव्हा तिथे त्याची खबर घेऊ, पण विषय एक चाललेला असताना उगाच "छुपे", "गर्भित" अर्थ पाहून ती समस्या कशी सोडवायचे ते टाळू नये. मी सवर्ण आहे म्हणून मला आमचे काही संकुचित सवर्ण मित्र, आतल्या गोटातला मानून, सांगतात - कंपनीत आम्ही त्यांना घ्यायचे टाळतो. एकतर घटनेत नि कायद्यांत त्यांच्या सुरक्षेसाठी बरंच काही लिहून ठेवलं आहे. (अगदी मुस्लिमांना ५ (?) नमाज पडायला मिळणारी सुट्टी इतरांना खुपते.) चूकून काही भंग व्हायची रिस्क का घ्या? कारण कॉर्पोरेट राजकारण नंतर नंतर जसे जसे रंग घेऊ लागते तसे तसे ही सगळी संरक्षणे शस्त्रे बनतात. आणि पी एस यू मधे तर विचारूच नका. दलित ऑफिसर 'प्रत्येकच गोष्टीत प्रेफरन्स' असल्याने कूल लाईफ जगतो नि बाकीचे कात खाऊन असतात. प्रमोशन त्याचेच होणार किंवा त्याचे होणारच म्हणून इतरांची प्रचंड जळजळ होते. पण यात त्या दलित व्यक्तिंचा दोष नाही. परंतु कितीतरी व्यक्ति कामास मना करणे, इ इ प्रकारच्या गोष्टी करून परिस्थिती चिघळवतात.

मग हे लक्षात घेता अशा ऐकीव किश्शाच्या आधारे मी काही मत बनवावं का तर बनवू नये. नेटवर सगळा डाटा मिळतो. समाजात चर्चा करावी. आतापर्यंत आलेले प्रतिसाद पाहिले तर कुणीही किश्शाच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित केलेली नाही. पण हाच किस्सा खरा असला पाहिजे/ आहे हा आग्रह कशाला? एततसम स्थिती येते ती लेखकाला दु:खी करून जाते असे मानावे.

म्हणजे ऐकीव माहिती सत्य आहे आणि असं होत राहतंच असंच सगळे धरून चालले आहेत. ह्यात (म्हणजे कुणीच शंका उपस्थित न करण्यात) अशा किश्शांवर विश्वास ठेवण्याचा एक उत्साह किंवा gullibility मला दिसते.

शंकररावांवरचा (एक असेच मंत्री समजा) आरोप ऐकीव आहे म्हणून मंत्र्यावरील आरोपांचे तथ्यच नाकारायचे. लोक नाव घेऊन असले सत्य सांगायला भयंकर घाबरतात. बेल मिळत नाही. तहसिलदार चपराश्याला चळाचळा कापताना मी स्वत: पाहिला आहे. तुम्हाला दलित प्रेम आहे, तितकंच सर्वाना आहे. मलाही आहे. पण जे दलित आपल्याला मिळालेल्या संरक्षणाचा गैरफायदा घेतात (घेतात कि नाही हा ही धाग्याचा विषय नाही. जे कोणी अल्प स्वल्प घेतात) त्यांचा इतरांवर काय परिणाम होतो ते सांगीतले आहे.

म्हणून अशी शंका उपस्थित करण्याची गरज भासली.

तुमच्या बातमीतल्या माहितीने लेखातल्या महिलेच्या वर्तनाचे समर्थन होते का? काही संबंध? वर ऐसीवर 'जास्तीत जास्त' प्रतिसादक असा आरसा दाखवायची गरज आहेत असे आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अतिशय जबर्‍या प्रतिसाद. मान गये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

(कोणत्याशा प्रतिसादात HTML कोड गंडला आहे, तो दुरूस्त करण्याचा प्रयत्न.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शेवट्च्या वाक्याखेरीज उत्तम मुद्देसूद प्रतिसाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदर लेख एक ऐकीव किस्सा ह्या पातळीवरचा आहे असे कुठे म्हटलेले दिसले नाही.

धाग्यात कुठेही स्थान, काळ, वेळ यांचा उल्लेख नाही. त्या मुलीची काय बाजू आहे हे लिहीलेलं नाही. अशा प्रकारचे संवाद चारचौघात होत नाहीत म्हणून ते ऐकीव पातळीवरचं असावं असा निष्कर्ष काढता येतो.

तुमच्या बातमीतल्या माहितीने लेखातल्या महिलेच्या वर्तनाचे समर्थन होते का?

तिचं समर्थन करण्याबद्दल बोलावंसं का वाटावं? मूळ प्रतिसादात अशा अर्थाचं काहीही लिखाण मला तरी दिसलं नाही. जे काही आहे ते निष्कर्षाबद्दल केलेली टिप्पणी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>> आजचे तर जाऊच द्या ८० च्या दशकात गावाकडे पाटला कुलकण्यांची फाटून असायची. <<

काय विदा द्याल? ऐकीव माहिती नको. गावांत दलितांवरच्या अत्याचारांच्या बातम्या सातत्यानं येतात. बलुतेदारांकडे तर गावातली सत्ता असते. मग बातम्यांना काय तोटा?

>> लखनौच्या टेल्कोच्या प्लँटमधे पेंटशॉप मधे दलित पेंटर एक मजला पेंटचा एक कॅन (१०-१२ किलोचा) घेऊन जायला मना करतात. <<

पुन्हा ऐकीव किस्सा.

>> आमचा एच ओ डी, मी नि मित्र थांबलो असताना मित्र म्हणाला, "भंगी लावून आपण हे साफ का करत नाही?" एह ओ डी म्हणाले, " तो जातीवाचक शब्द चूकूनही नंतर तोंडात आणू नको. इअतके कडक कायदे आहेत कि काही तक्रार झाली तर बिना बेल जेल." रिलायन्स प्रायवेट आहे. <<

तुम्हाला नक्की कोणती बाजू मांडायची आहे? 'भंगी' हा शब्द नुसता जातिवाचक नाही, तर अवमानकारकसुद्धा आहे. हे माहीतही नसलेल्या तुमच्या मित्राचं तुम्ही समर्थन करताय, की रिलायन्ससारख्या कंपनीची काय गोची होत्ये ते सांगताय? 'भंगी' शब्द वापरता न आल्यामुळे ज्याची गोची होत्ये त्याची बाजू मी घेणार नाही. इत्यलम्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

>> आजचे तर जाऊच द्या ८० च्या दशकात गावाकडे पाटला कुलकण्यांची फाटून असायची. <<

काय विदा द्याल? ऐकीव माहिती नको. गावांत दलितांवरच्या अत्याचारांच्या बातम्या सातत्यानं येतात. बलुतेदारांकडे तर गावातली सत्ता असते. मग बातम्यांना काय तोटा?

>> लखनौच्या टेल्कोच्या प्लँटमधे पेंटशॉप मधे दलित पेंटर एक मजला पेंटचा एक कॅन (१०-१२ किलोचा) घेऊन जायला मना करतात. <<

पुन्हा ऐकीव किस्सा.

>> आमचा एच ओ डी, मी नि मित्र थांबलो असताना मित्र म्हणाला, "भंगी लावून आपण हे साफ का करत नाही?" एह ओ डी म्हणाले, " तो जातीवाचक शब्द चूकूनही नंतर तोंडात आणू नको. इअतके कडक कायदे आहेत कि काही तक्रार झाली तर बिना बेल जेल." रिलायन्स प्रायवेट आहे. <<

तुम्हाला नक्की कोणती बाजू मांडायची आहे? 'भंगी' हा शब्द नुसता जातिवाचक नाही, तर अवमानकारकसुद्धा आहे. हे माहीतही नसलेल्या तुमच्या मित्राचं तुम्ही समर्थन करताय, की रिलायन्ससारख्या कंपनीची काय गोची होत्ये ते सांगताय? 'भंगी' शब्द वापरता न आल्यामुळे ज्याची गोची होत्ये त्याची बाजू मी घेणार नाही. इत्यलम्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आतापर्यंत आलेले प्रतिसाद पाहिले तर कुणीही किश्शाच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित केलेली नाही. म्हणजे ऐकीव माहिती सत्य आहे आणि असं होत राहतंच असंच सगळे धरून चालले आहेत. ह्यात (म्हणजे कुणीच शंका उपस्थित न करण्यात) अशा किश्शांवर विश्वास ठेवण्याचा एक उत्साह किंवा gullibility मला दिसते. म्हणून अशी शंका उपस्थित करण्याची गरज भासली.

पूर्ण ताकदीनीशी सहमती!

एकंदरीत उशीरच झाला म्हणायचा ह्या धाग्यावर यायला. काही प्रश्न पडले होते वाचताना आणि चिंजं बरोब्बर तो मुद्दा पकडला.

१. कंपनी रिक्रुट करताना काय झोपा काढत होती का? (कंपनी प्रायव्हेट दिसतेय)
२. प्रायव्हेट कंपन्या फक्त गुणवत्तेला प्राधान्य देतात, त्यामुळे त्यामुली ऐवजी ज्याने/जिने तिला रिक्रुट केले त्याला/तिला नोकरीवरून कमी करायला हवे
३. लेखाकाचा रोख गुणवत्ता फक्त एका वर्गाची मक्तेदारी आहे असा का वाटतो आहे?

- (gullible नसलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकाच्या मूर्खपणाची किंमत दुसऱ्याच कोणाला द्यावी लागते

खरं आहे. कोणाला नोकरीवर ठेवायचं याचा निर्णय एका माणसाला योग्य रीतीने घेता आला नाही, एका माणसावरून संपूर्ण जाती-जमातींना जोखण्याचा मूर्खपणा कोणा एकाने किंवा काही ठराविक लोकांनी केला की त्याची किंमत कधीमधी सगळ्या समाजालाही भोगावी लागते.

माझ्या पुण्याच्या ऑफिसात ऑफिसमेट होती, ती सुरूवातीला फार तक्रार करायची. त्या विशिष्ट पदावर लागलेली ती पहिली मुलगी होती. ती नोकरी सोडून गेली तर त्या पदावर इतर कोणा हुशार, मोटीव्हेटेड मुलीची निवड होणं कठीण आहे, म्हणून तिने असा प्रकार करू नये असं एक मित्र म्हणत होता, "हे लोक तुम्ही बाकी सगळ्या मुली चांगलं काम करता त्याकडे पाहणार नाही. मोठ्या गटात खोट शोधायची असली की बरोबर तशीच, सोयीस्कर उदाहरणं दाखवली जातात. पुढच्या मुलींसाठी हिने त्याग करावा असं नाही; पण डोक्यावरचे मूर्ख लोक आणि पालकांच्या दबावापायी तिथे नोकरीला आलेली मुलगी यामुळे पुढच्या मुलींचं आयुष्य कठीण होणार. चूक कोणाची आणि भोगणार कोण!" असा त्याचा दावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण अदिती त्या मुलीची चूकी आहे पण जास्त चूकी "पूर्वग्रहदूषित" दृष्टीने पहाणार्‍या किंवा स्वतःला सोईस्कर तेच पहाणार्‍या लोकांची जास्त आहे. जी माणसे स्त्रीद्वेष्टेपणातून , स्त्रियांना नोकरी देत नाहीत त्यांच्या हाती खरखुरे जळते कोलीत मिळाले काय किंवा त्यांनी मालमसाला बनवून गोष्ट केली काय सारखच.
चूक त्या मुलीची आहे पण जास्त तेच अधोरेखित करुन घेऊन, बदल करणार्‍या अन्य लोकांची आहे. अन ते काय निमित्ताला टपलेलेच आहेत.

खरं तर अशा लोकांना (निमित्ताला टपलेल्या) च टपकवायला पाहीजे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0