Skip to main content

छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ३ : 'पाहणार्‍याची रोजनिशी' आणि त्या रोजनिशीतला एक क्षण

प्रत्येकाच्या रोजनिशीत असे अनेक क्षण असतात जे सुखाच्या, दुखा:च्या, नैराश्याच्या किंवा उमेदीच्या भावना जागवतात किंवा एखादा क्षण, त्यातले घटक आजुबाजुच्या परिस्थितीबद्दल बरच काही सांगुन जातात आणि आपल्याला ते चटकन भावतं किंवा जाणवतं. ह्या क्षणांची रेंज मोठी आहे, अगदी आपल्या जवळच्या माणसाच्या निरागस हसण्याचा तो क्षण किंवा आपल्या रोजच्या कामाला जाण्याच्या प्रवासातला एखादा भावनेला हात घालणारा क्षण, कोणाला रोजनिशीतलं काय भावेल कोणी सांगावं पण चला आपण सगळे एकमेकांना सांगुयात...

आणि रोजनिशीतले क्षण टिपताना तो भारीचा कॅमेरा जवळ असायला पाहिजे असं नाही तर मोबाईलवरच्या साध्या कॅमेरात टिपलेले क्षणही खुप प्रांजळ असु शकतात, आणि २० दिवसात निदान १ क्षण तरी इथल्या प्रत्येकाला टिपता यावेत, तेंव्हा हा धागा शतकी करुयात बरे. ;)

काही अशाच क्षणांची ही एक झलक-

टिप - छायाचित्रे नेटवरुन उचलली आहेत, प्रताधिकार कायद्याचा भंग होत असल्यास चित्रे इथून काढून टाकावयाची असल्यास संपादकांनी कळवावे.

नियमः
१. केवळ स्वतः काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.
२. स्पर्धाबाह्य अशी कितीही चित्रे देण्यास हरकत नसेलच मात्र त्यासाठी किमान एक चित्र स्पर्धेसाठी द्यावे लागेल.
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परीक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व परीक्षक असे चालू राहील.)
४. आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट १८ ऑगस्ट रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. १९ ऑगस्ट रोजी निकाल घोषित होईल व विजेती व्यक्ती पुढील विषय देईल.
५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिप्पण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठरावीकच निकष लावावेत असे, बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे, इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाची व्यक्ती आव्हान देईल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले, तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच विजेता/विजेती घोषित करणे बंधनकारक आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.

स्पर्धा का इतर?

............सा… Tue, 05/08/2014 - 17:59

In reply to by मी

हा बरा आहे. गेल्या आठवड्यात आमच्याकडे एका रस्त्याचे उद्घाटन झाले. खूप स्टॉल्स लागले होते. एका आर्टीस्ट्कडून मी चेहर्‍यावर फुलपाखरु रंगवून घेतलेले. सॉलिड मजा आली. कारण हवा खूप छान होती. चक्क ऊन होतं.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 05/08/2014 - 18:37

In reply to by ............सा…

सारीका, तुझा हा फोटो आणि सही दोन्हींचं मिश्रण मजेशीर आहे. फूल रंगवून घेताना फोटो काढला का? असेल तर तो ही दाखव.

............सा… Tue, 05/08/2014 - 18:52

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हाहाहा खरय अदिती :)
फूल रंगवून घेताना नाही पण एक जवळून असेल तो टाकतेय. आय अ‍ॅम अन एक्झ्हिबिशनिस्ट (हाहाहा इन अ हर्मलेस वे ;))


__________

आपल्या दोघींचा रिव्हर वॉकवरचा टाकणार होते पण तुला आवडेल का असा विचार आला :(
________
अजून एक कारण आहे मला खूप उत्सुकता असते कोण कसे दिसते ते जाणून घ्यायची. बरेच जण फेसबुकमुळे माहीत आहेत पण अनेक अनेक जण माहीत नाहीत.
______
हा खरं तर पहाणार्‍याच्या रोजनिशीतील क्षण पाहीजे. पण मला घरातल्यांचे फोटो टाकावेसे वाटात नाहीत अन अन्य रोचक टिपले नाहीत.

मी Tue, 05/08/2014 - 20:44

In reply to by ............सा…

वा वा, तुम्ही टिपला नसला तरी क्षण एकदम प्रांजळ आहे, तुम्हीही एखादी सेल्फी टिपली असेल तर तीही चालेल की.

आदूबाळ Wed, 06/08/2014 - 13:57

In reply to by मी

"मी" यांच्या आवाहनाला अनुसरून समोर प्रथम दिसले त्याचा फटू हानला आणि Pixlr express या सॉफ्टवेअरद्वारे त्यावर संस्करण केलं.

(दिसतोय का? का प्रथेप्रमाणे मी काहीतरी काशी कढवली आहे?)

(अब दिख रहा है का?)

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 05/08/2014 - 20:43

In reply to by ............सा…

डोक्यातला गोंधळ प्रतिसादात उतरून काशी कढवली होती, पण आता तिला मोक्षप्राप्ती झाली असावी.

फटू हानला, हे फारच आवडलं. (तशी मराठीतली क्रियापदं मारामारीप्रधानच असतात, असं वाटतं. उदा. धागा/फोटो काढला, विडंबन पाडलं, दुसरी स्लॅब काल पडली, इ.)

मी Wed, 06/08/2014 - 14:23

In reply to by ............सा…

बहुदा गुगल ड्राइव्ह वरचे फोटो दिसत नसावेत इथे, संपादक अधिक सांगू शकतील. वायरींचे ते जंजाळ फारच तुमच्या सरळसोट प्रतिसादाला अनुसरून नाही ;)

च्यामारी, इथले संपादक फार लबाड, माझा प्रतिसाद पडेपर्यंत फोटो दिसायला लागला, असो, क्षण 'हानल्या' बद्दल धन्यवाद. इतरेजनांनो तुम्हीही प्रयत्न क्रा.

काल दिसत होता, आज परत कढली फोटोची - खालची समस्या असावी -

403. That’s an error.

Your client does not have permission to get URL /5aJr1KgcgL_jUy3MWQV6NhuOayGHP3RW9SbicCumj8Op-QyTMqYmz79g8OI9dVrv9QAFvk4vCSlrZxtg_SmAfls0Cw7JQXo=w1348-h602 from this server.

Forbidden That’s all we know.

मुळापासून Wed, 06/08/2014 - 03:16

मुळात विषय Instagram ला अनुरूप आहे म्हणून आणखी दोन फोटो शेअर करण्याचा मोह आवरला नाही (एरवी Instagram ला कुणी विचारत नाही!). आधीच्या दोन पोस्ट मध्ये बक्कळ फोटो दिले आहेत त्यामुळे ही पोस्ट पुन्हा स्पर्धेसाठी देवून गर्दी वाढवू इच्छित नाही.

हिवाळ्यात फोटोंचा उच्छाद मांडणे एवढा एकाच timepass असल्याने खालचे दोन्ही फोटो बर्फाळ आहेत (जुने फोटो दाखवण्याच्या नादात ताजे गरमागरम फोटो नाही काढता आले… ).

नंदन Wed, 06/08/2014 - 03:44

In reply to by मुळापासून

दुसरा फोटो खासच. चाकांच्या रेषांतून आणि नजीकच्या माणसाच्या आकृतीतून निर्माण होणारे noir-नाट्य, डावीकडच्या खांबाची सावली वाटावी अशा बंद दिव्याच्या खांबामुळे फोटोच्या कोनाला येणारा किंचित unsettling फील - हे सारे मस्तच. हा फोटो कातरला असल्यास त्याची अखंड आवृत्तीही पहायला आवडेल.

मी Wed, 06/08/2014 - 14:11

In reply to by नंदन

दुसरा फोटो मस्त आहे, सावल्या, टायरच्या खुणा, समोरासमोरचे चालु बंद दिवे, नंदन म्हणतो त्याप्रमाणे फोटो जमुन आला आहे.

............सा… Wed, 06/08/2014 - 18:43

In reply to by मी

असेच म्हणते. अतिशय सुंदर आहे.
मला माहीत नाही हे कितपत खर आहे पण - कुठेतरी वाचलेले की चित्र हे फोटोसम अन फोटो हा चित्रासम दिसला की म्हणे ते चांगले :)
तुमचा फोटो अगदी चित्रासारखा वाटला मला.

मुळापासून Wed, 06/08/2014 - 20:10

In reply to by ............सा…

नंदन, मी आणि सारीका सर्वांना धन्यवाद! नंदन म्हणतात तशी अखंड आवृत्ती आता उपलब्ध नाही (फोन बदलला). Instagram च्या "चौकटी" त बसवण्यासाठी फोटो जितका कातरावा लागतो, तितका कातरलेला आहे आणि Instagram चे Inkwell filter वापरले आहे बहुदा. फोटो दीड वर्षं जुना आहे त्यामुळे नक्की आठवत नाही.

ऋषिकेश Wed, 06/08/2014 - 21:18

चला सकाळ झाली, ऑफीसला निघायची घाई आहे. झटझट आवरून, घरातल्या चिमणीच्या मागे लागून, दुसरीकडे दोन महत्त्वाच्या गोष्टी मस्ट असतात.
१. न्याहारी

२.चहा नी विकांताला घरी बनवलेली बिस्किटे

३. गुडनाईट
त्याउलट, रोज रात्री बाहुल्यांचं जेवण झालं की आमच्याकडे त्यांच्या चपला काढल्या जातात नी त्यांना असे मांडून ठेवले जाते. नी मग सगळ्या बाहुल्या माझ्या बाहुलीजवळ झोपायला जातात :)

मी Wed, 06/08/2014 - 21:57

In reply to by ............सा…

शेवटचा फोटो झकास आहे, उलटा असल्यामुळे आणि बाहुलीच्या चपलेसमोर बाबाच्या चपलेला कमी जागा मिळाल्यामुळे लोकांच्या भावनेला हात घालणारा झालाय.

मिसळपाव Thu, 07/08/2014 - 16:59

In reply to by नंदन

२३ आणि २५ काहि खास नाहि वाटले पण बाकी सगळे A-1 आहेत. कुठलाहि यातला स्टेज्ड वाटत नाहि. हे असे सगळे क्षण आपल्या पण आजू-बाजूला असतात. आपण लक्ष देत नाहि? की ते क्षण कॅमेर्‍यात कसे पकडायचे यात सगळी खुबी आहे? माझ्या पायवाटेवच्या फोटोबद्दल न्यूSSSनगंड वाटायला लागला आता !

मी Thu, 07/08/2014 - 17:07

In reply to by मिसळपाव

१३ क्रमांकाचा फोटो पहा, असा क्षण हमखास कॉमन आहे पण त्यावेळेला तो टिपण्याचे लक्षात रहात नाही, काहींसाठी क्रमांक १८चा पण कॉमन असेल पण ते 'नाट्य' दिसण्यासाठी तांत्रिक सफाई आणि तंत्र दोन्ही अवगत हवे हे खरे. पण मुळात काहीतरी कँडिड(प्रांजळ) लक्षात येण्यासाठी तसे भवताली जाणिवपुर्वक बघितले पाहिजे असे वाटते.

............सा… Thu, 07/08/2014 - 20:21

In reply to by मी

होय बरोबर आहे तुमचं मी, १३ कॉमन आहे पण आपणही त्या क्षणात लीन असतो त्यामुळे, फोटो काढायचे भान रहात नाही.
तो बुद्ध मूर्तीच्या शिराचा फोटो फार आवडला.

मिसळपाव Fri, 08/08/2014 - 02:31

In reply to by मी

तो मुलगा घाबरला नाहिये. चेहेर्‍यावर हसू आहे अजून. पण 'नाहि, काहि भानगड नाहि ना होणार' या विचारने हात आक्रसून मागे झालाय. पण डोळ्यातले भाव पहा! त्याचं टायटलपण काय चपखल आहे - ".... isn't sure he wants anything to do with the "Peanut" ..." क्या बात है, व्वा! नंदन, पुनःश्च एकदा थ्यांकू हां.

नंदन Fri, 08/08/2014 - 02:58

In reply to by मिसळपाव

बाकी यातल्या क्र. १२ मधल्या (गॉडझिलासारखेच विक्षेप करणारी तरुणी) फोटोसारखाच क्षण टिपणारा अमुक यांचा हा प्रतिसाद आठवला -

http://www.aisiakshare.com/node/2136#comment-34599

रुची Fri, 08/08/2014 - 09:58

Jalpari
तांत्रिक माहिती:
कॅमेरा: निकॉन डी९०
भिंग: ४२ मि. मि.
उघडझाप: १/१०० से.
छिद्र: f/३.३

मी Fri, 08/08/2014 - 11:50

In reply to by रुची

लहान मुलांची नेहमीची गोड स्माईलवाली पोझ सोडुन अशी सोज्वळ दमदाटी केलेली पोझ आवडली, तांत्रिकदृष्ट्याही फोटो मस्त आला आहे.

मी Fri, 08/08/2014 - 11:45

In reply to by रुची

फोटो आवडला, एरवी टोपीखाली प्रश्न सरकवणार्‍या सत्ताधार्‍यांच्या समोर असे सगळेच प्रश्न टोपीवर मिरवणारी उदारमतवादी म्हातारी मराठी आंतरजालावर फिट्ट बसेल. :प, इथुन तरी स्त्रीवादी बॅच दिसला नाही.

राधिका Tue, 12/08/2014 - 08:24

१.

Camera: Canon
Model: Canon PowerShot SX160 IS
ISO: 800
Exposure: 1/200 sec
Aperture: 5.9
Focal Length: 80mm
Flash Used: No

२.

Camera: Canon
Model: Canon PowerShot SX160 IS
ISO: 100
Exposure: 1/25 sec
Aperture: 5.9
Focal Length: 80mm
Flash Used: No

मुळापासून Tue, 12/08/2014 - 20:21

स्ट्रीट फोटोग्राफी संदर्भातील एक गंमतीशीर video काल पहिला. "Pro Photographer Cheap Camera Challenge" या मजेदार Video मालिकेतला हा एक. हातात कसाही कॅमेरा असो, त्यातूनही चांगले फोटो कसे काढले जातात याचं उत्कृष्ट प्रात्यक्षिक या video मध्ये आपण बघू शकतो. तसंच, भाषेचं ज्ञान नसतानाही लोकांशी संवाद साधून त्यांच्याकडून सहकार्य मिळवणारा फोटोग्राफर पण लाजवाब!

मी Tue, 12/08/2014 - 22:57

In reply to by मुळापासून

बघितला होता, मस्त आहे, म्हणूनच मोबाईल कॅमेराने सुद्धा उत्तम फोटो येतील असं मी पहिल्यांदा म्हणालो होतो.

ह्या फितीतला अ‍ॅन्कर काई वॉन्ग अनेक कमेरांचं परिक्षण करत असतो तेही बर्‍याचदा पाहिलं आहे.

अमुक Sun, 17/08/2014 - 03:42

चित्र स्पर्धेसाठी नाही.

Camera: NIKON COOLPIX L120, ISO: 80, Exposure: 1/160 sec, Aperture: 4.7, Focal Length: 23.2mm, Flash Used: No

अमुक Sun, 17/08/2014 - 03:58

चित्रे स्पर्धेसाठी नाही.

तांत्रिक तपशील सध्या मिळत नाही आहे. मिळाल्यावर देतो.

अमुक Sun, 17/08/2014 - 04:07

चित्र स्पर्धेसाठी नाही.

Camera: NIKON COOLPIX L120, ISO: 400, Exposure: 1/500 sec, Aperture: 5.4, Focal Length: 39.7mm

मी Tue, 19/08/2014 - 10:52

स्पर्धेचा शेवट १८ ऑगस्ट रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. १९ ऑगस्ट रोजी निकाल घोषित होईल व विजेती व्यक्ती पुढील विषय देईल.

२० ऑगस्ट निकाल घोषित होईल, त्यामुळे आज जमल्यास काही फोटो इथे टाकू शकता.

मी Sat, 23/08/2014 - 19:59

सर्वप्रथम सगळ्यांचे आभार, सर्व प्रतिसादकांची रोजनिशी आवडली. निकाल घोषित करण्यास विलंब झाला आहे, पण ऑलमोस्ट सगळेच फोटो आवडल्याने निकाल कसा द्यावा ह्याचा विचार मी करत होतो, अर्थात इतरही काही आळशी कारणं होती पण ते असो, ह्या आव्हानाला मिळालेल्या प्रतिसादापेक्षा अधिक प्रतिसाद संख्या अपेक्षित होती कारण विषय तसा सोपा होता, आपण भवताली काय-काय बघतो ह्याची उजळणी त्या निमित्ताने होते किंवा आपण जरा डोळसपणेच आजुबाजूला बघायला शिकू असे वाटले, पण ह्या निमित्ताने इथले अनेक शब्दप्रभू दृष्य-कलेबाबत उदासीन आहेत हे पुनश्च अधोरेखित होत आहे, इतकेच नव्हे तर दृष्य कलेबाबत आस्था असणार्‍यांनी देखील डोळे बंद करून घेतल्याने क्षणभर शब्दांचा वारसा सोडून जाणार्‍या ब्रिटिशांबद्दल मनात चीड उत्पन्न झाली, मग धाग्यावरचे फोटो बघून जरा बरं वाटलं. ;)

माझा कॅमेरा दुरूस्तीला गेलेला असल्याने आणि फोनवरील कॅमेर्‍यातुन काढलेले फोटो चंद्रावरचे वाटण्याची शक्यता असल्याने आणि अर्थात चंद्रावर जाणे माझ्या रोजनिशीत नसल्याने तुर्तास मी मनात असूनही फोटो काढू शकलो नाही.

प्रत्येक फोटोबद्दल मी प्रतिसाद दिला असल्याने इथे अधिक काही लिहित नाही, तर निकाल पुढीलप्रमाणे आहे -

क्रमांक तीन - छायाचित्र 'विदाउट प्रॉवोकेशन'
छायाचित्रकार - रोचना
क्रमांक तीन - छायाचित्र 'चिमटे' -
छायाचित्रकार - राधिका
   
क्रमांक दोन - छायाचित्र 'जलपरी' -
छायाचित्रकार -रुची
क्रमांक दोन - छायाचित्र 'वाढता कॉवबॉय' -
छायाचित्रकार - मुळापासून
क्रमांक दोन - छायाचित्र 'तयारी' -
छायाचित्रकार - अदिती
   
क्रमांक एक - छायाचित्र 'चहा' -
छायाचित्रकार - नंदन
क्रमांक एक - छायाचित्र 'मुक्तीचे द्वार' -
छायाचित्रकार - स्पा
क्रमांक एक - छायाचित्र 'गुडनाईट' -
छायाचित्रकार - ऋषिकेश

तांत्रिक दृष्ट्या स्पा ह्यांचे चित्र सर्वोत्तम आहे, नंदनची इतर दोन छायाचित्रेही मस्त आहेत.

स्पर्धेसाठी छायाचित्र न दिलेल्यांमधे खास उल्लेख धनंजयच्या गोल्डन गेटवरच्या समुपदेशन छायाचित्राचा करावासा वाटतो, त्याचबरोबर अदितीने दिलेल्या रेस्तंराचे छायाचित्रही मस्त आहे, मुळापासून ह्यांचे अनेक फोटो उत्तम आहे, त्यात पॅटर्न तर खासच आहे, अमुकने दिलेली सगळीच छायाचित्रे उत्तम आहेत.

सर्वांचे अभिनंदन आणि आभार, इतरांची छायाचित्रे देखील सुंदर आहेत, पण मला वरची जास्त आवडली. क्रमांक एक नंदन, स्पा आणि ऋषिकेश ह्यांना विभागून दिल्याने पुढच्या आव्हानाचा विषय तिघांनी किंवा परस्परसंमतीने द्यावा अशी विनंती करतो.

जाता-जाता पुढच्या विषयासाठी एक टीप म्हणजे 'शब्द' असा विषय देऊन पहा, कदाचित अधिक प्रतिसाद मिळेल. ;)