Skip to main content

दांभिक (hypocrites) लोक ओळखण्याचे सात निकष:

1 minute

दांभिक (hypocrites) लोक ओळखण्याचे सात निकष:

१) हे लोक त्याच गोष्टी म्हणतात किंवा करतात ज्या दुसऱ्यांनी करू नये असे यांना वाटते.

२) हे लोक त्या गोष्टी आणि नियम कधीच पाळत नाहीत ज्या इतरानी पाळाव्यात असे यांना वाटते.

3) यशस्वी लोकांवर हे नेहेमी टीका करतात आणि त्यांचा द्वेष करतात. ज्या गोष्टी ते प्राप्त करू शकत नाहीत
त्याबद्दल ते द्वेष आणि तुच्छता बाळगतात.

४) हे लोक इतरांच्या आयुष्याचे अंधानुकरण करतात. आणि जर इतरांसारखे होकारात्मक परिणाम जाणवले नाहीत
तर त्या लोकांच्या आयुष्यांवर टीका करून मोकळे होतात.

५) हे लोक द्वेषापोटी इतरांवर टीका करतात

६) हे लोक व्यक्तिपरत्वे टीका बदलतात.

७) हे लोक खासगीत त्याच गोष्टी करतात ज्या गोष्टींचा ते लोकांमध्ये मिसळले असतांना विरोध करतात.

Node read time
1 minute

रेड बुल Fri, 21/11/2014 - 16:08

असा मनुष्य ओळखता येण्याचे तोटे काय आहेत ?
असा मनुष्य ओळखता येण्याचे फायदे काय आहेत ?
सप्त दांभिक आणी नॉर्मल दांभिक यांच्यात मुलगामी फरक कोणते ?

अरविंद कोल्हटकर Fri, 21/11/2014 - 22:39

रामदासांनी मत्सर आणि दंभ हे एकासारखे मानले आहेत. पहा 'मनाचे श्लोक':

नको रे मना क्रोध हा खेदकारी । नको रे मना काम नाना विकारी
नको रे मना लोभ हा अंगिकारू । नको रे मना मत्सरू दंभभारू ।।६।।

मनीषा Tue, 25/11/2014 - 14:04

In reply to by अरविंद कोल्हटकर

श्लोक फारच स्मर्पक आहे .

यात जो "दंभ" असा उल्लेख आहे , त्याचा अर्थ , गर्व कि'वा स्वतःला श्रेष्ठं समजून , इतरांना कमी प्रतीचे समजणे असा असावा.
आणि दांभिक म्हणजे , "खायचे दात वेगळे-- आणि दाखवायचे वेगळे" असलेला .

अर्थात तरीही श्लोक अगदी योग्यं आहेच.

शशिकांत ओक Sat, 22/11/2014 - 01:26

मित्रांनो,
नाडी ग्रंथांच्या बाबत अनेकदा असे दिसून येते की जे लोक उघडपणे नाडीग्रंथ भविष्याला बोगस म्हणून टीका करतात,ते नाडीकेंद्रात हटकून भेटतात किंवा होमिओपाथीला जे सदासर्वकाळ नावे ठेवतात ते आजारी पडले की दवाखान्यात त्यांचे चेहेरे दिसले की समजावे, हे दाभिक लोक आहेत

हे लोक खासगीत त्याच गोष्टी करतात ज्या गोष्टींचा ते लोकांमध्ये मिसळले असतांना विरोध करतात.

अस्वल Sat, 22/11/2014 - 02:38

In reply to by शशिकांत ओक

शक्य आहे!
पण मग ज्या लोकांची नाडी भविष्याच्या अचूकतेबद्दल खात्री आहे, त्यांनी इन्स्युरन्स वगैरे काढणंही तितकंच दांभिक नाही का?

ऋषिकेश Tue, 25/11/2014 - 13:33

In reply to by अस्वल

अहो! नाडीपत्रात लिहिलं असेल तसं. नाडी पट्टी नुसती भविष्य नै सांगत आदेशही देते म्हणे.
दिला असेल आदेश हा हा इन्श्युरन्स घ्या म्हणून किंवा नाडीपट्टीत इन्श्युरन्स कंपनीचा लोगोसुद्धा असेल त्या महर्षींनी कित्येक वर्षांपूर्वीच काढलेला! आहात कुठे!? :P

गवि Tue, 06/01/2015 - 14:39

In reply to by शशिकांत ओक

नाडी ग्रंथांच्या बाबत अनेकदा असे दिसून येते की जे लोक उघडपणे नाडीग्रंथ भविष्याला बोगस म्हणून टीका करतात,ते नाडीकेंद्रात हटकून भेटतात किंवा होमिओपाथीला जे सदासर्वकाळ नावे ठेवतात ते आजारी पडले की दवाखान्यात त्यांचे चेहेरे दिसले की समजावे, हे दाभिक लोक आहेत

उदाहरणात जरा गडबड दिसते. इनफॅक्टः

होमिओपथीचे सदासर्वदा गोडवे गाणारे लोक खुद्द स्वतःच्या छातीत कळ किंवा मानेत गाठ आली की अनुक्रमे गपचूप त्या मेल्या अ‍ॅलोपथीच्या हास्पिटलात सीसीयूमधे भरती होताना अन एमाराय स्कॅनला गाउन घालून आडवे झालेले पाहून दांभिकपणा म्हणजे काय ते समजावे.