दांभिक (hypocrites) लोक ओळखण्याचे सात निकष:
दांभिक (hypocrites) लोक ओळखण्याचे सात निकष:
१) हे लोक त्याच गोष्टी म्हणतात किंवा करतात ज्या दुसऱ्यांनी करू नये असे यांना वाटते.
२) हे लोक त्या गोष्टी आणि नियम कधीच पाळत नाहीत ज्या इतरानी पाळाव्यात असे यांना वाटते.
3) यशस्वी लोकांवर हे नेहेमी टीका करतात आणि त्यांचा द्वेष करतात. ज्या गोष्टी ते प्राप्त करू शकत नाहीत
त्याबद्दल ते द्वेष आणि तुच्छता बाळगतात.
४) हे लोक इतरांच्या आयुष्याचे अंधानुकरण करतात. आणि जर इतरांसारखे होकारात्मक परिणाम जाणवले नाहीत
तर त्या लोकांच्या आयुष्यांवर टीका करून मोकळे होतात.
५) हे लोक द्वेषापोटी इतरांवर टीका करतात
६) हे लोक व्यक्तिपरत्वे टीका बदलतात.
७) हे लोक खासगीत त्याच गोष्टी करतात ज्या गोष्टींचा ते लोकांमध्ये मिसळले असतांना विरोध करतात.
काही अंनिसवाल्यांना लागू?
मित्रांनो,
नाडी ग्रंथांच्या बाबत अनेकदा असे दिसून येते की जे लोक उघडपणे नाडीग्रंथ भविष्याला बोगस म्हणून टीका करतात,ते नाडीकेंद्रात हटकून भेटतात किंवा होमिओपाथीला जे सदासर्वकाळ नावे ठेवतात ते आजारी पडले की दवाखान्यात त्यांचे चेहेरे दिसले की समजावे, हे दाभिक लोक आहेत
हे लोक खासगीत त्याच गोष्टी करतात ज्या गोष्टींचा ते लोकांमध्ये मिसळले असतांना विरोध करतात.
नाडी ग्रंथांच्या बाबत अनेकदा
नाडी ग्रंथांच्या बाबत अनेकदा असे दिसून येते की जे लोक उघडपणे नाडीग्रंथ भविष्याला बोगस म्हणून टीका करतात,ते नाडीकेंद्रात हटकून भेटतात किंवा होमिओपाथीला जे सदासर्वकाळ नावे ठेवतात ते आजारी पडले की दवाखान्यात त्यांचे चेहेरे दिसले की समजावे, हे दाभिक लोक आहेत
उदाहरणात जरा गडबड दिसते. इनफॅक्टः
होमिओपथीचे सदासर्वदा गोडवे गाणारे लोक खुद्द स्वतःच्या छातीत कळ किंवा मानेत गाठ आली की अनुक्रमे गपचूप त्या मेल्या अॅलोपथीच्या हास्पिटलात सीसीयूमधे भरती होताना अन एमाराय स्कॅनला गाउन घालून आडवे झालेले पाहून दांभिकपणा म्हणजे काय ते समजावे.
क्र. ३ खूप आवडला. (हिपॉक्रसी
क्र. ३ खूप आवडला.
(हिपॉक्रसी ही अतिशय उपयुक्त गोष्ट आहे असे मानणारा) गब्बर.