Skip to main content

१८२६ सालातील प्रवासीमित्र.

नाठाळ बकरीप्रमाणे इकडे तोंड घाल, तिकडे थोडा पाला ओरबाड असे जालावर करीत असतांना काही मनोरंजक पुस्तके दिसतात. कॅ. जॉन क्लून्स, १२वी रेजिमेंट, बॉंबे नेटिव इन्फन्ट्री अशा नावाच्या लेखकाने लिहिलेले Itinerary and Directory of Western India, Being a Collection of Routes अशा शीर्षकाचे आणि १८२६ सालामध्ये छापलेले पुस्तक माझ्यासमोर आले. कसलीहि यान्त्रिक वाहने आणि अन्य साधने, तसेच कसलेही रस्ते - पक्के वा कच्चे - नसण्याच्या काळामध्ये पालखी, घोडागाडी आणि क्वचित उंट वापरून १९व्या शतकाच्या पहिल्या अर्ध्या भागात प्रवास कसे गेले जात असतील ह्याची थोडीबहुत कल्पना ह्या पुस्तकावरून येते. Vade Mecum (शब्दश: Go With Me) ह्या लॅटिन नावाने ओळखल्या जाणार्‍या पुस्तकांसारखाच ह्याचा अवतार आहे. मुख्यत: आजचा पश्चिम महाराष्ट्र, तसेच गुजराथ, माळवा ह्या भागातील प्रमुख गावांमध्ये एका गावापासून दुसर्‍याकडे जायचे असल्यास कसे जावे, वाटेत कोणकोणती खेडी आणि नद्यानाले भेटतात, त्यांची अंतरे आणि आकार, तेथे असलेल्या तुटपुंज्या सोयीसुविधा अशा प्रकारच्या २१२ मार्गांची तपशीलवार वर्णने येथे आहेत. त्यावरून आपला देश १८३०च्या पुढेमागे कसा दिसत असेल, आजच्या तुलनेने त्याची वस्ती कशी असेल, पेशवाईच्या अंतानंतर ब्रिटिशांकडे सत्ता गेल्यावर नवी घडी बसवायचा त्यांनी कसा प्रयत्न सुरू केला होता हे ह्या पुस्तकावरून कळते.

कसल्याहि प्रकारच्या सुव्यवस्थित वाहतूकप्रणालीचा पूर्ण अभाव असल्याने कोठलाहि लहान वा मोठा प्रवास करावयाचा झाला तर त्याची पूर्ण तयारी पुरेशा आधीपासून करावी लागे. त्यासाठी laying the dawk ह्या गोष्टीचा अवलंब करावा लागे. पोस्टाचे टपाल ह्याला आपण ’डाक’ म्हणतो. ’डाक बंगला’ ह्या नावाची सरकारी कर्मचार्‍यांसाठी प्रवासामध्ये वापरायची तात्पुरती निवासी व्यवस्था हीहि आपल्या परिचयाची आहे पण मुस्लिम काळापासून अस्तित्वात असलेली पत्रे अणि प्रवासी एका जागेहून दुसर्‍या जागी घेऊन जाण्याची व्यवस्था - ज्याला ब्रिटिश काळात laying the dawk म्हणत असत - ती मात्र आता पूर्ण विस्मरणात गेली आहे. ह्या पद्धतीचे काही वर्णन ह्या पुस्तकामध्ये आहे.

ईस्ट इंडिया कंपनीच्या अखत्याराखालील सर्व भागामध्ये पोहोचलेले पहिले पोस्ट खाते Post Office Act XVII of 1837 ह्या कायद्याने निर्माण झाले. तत्पूर्वी मुंबई आणि मद्रासच्या गवर्नरांनी आपापल्या अखत्यारात डाक इकडून तिकडे न्यायची काही यन्त्रणा निर्माण केली होती आणि मुंबईमध्ये ’पोस्टमास्टर जनरल’, तसेच मुंबई, पुणे, ठाणे आणि सोलापूर येथे ’पोस्टमास्टर’ नावाच्या अधिकार्‍यांची नेमणूकहि केली होती. प्रवाशांच्या वाहतुकीचा laying the dawk हा प्रकार ह्या पोस्टमास्टरांच्या कामाचा एक भाग होता. स्वत: लेखक क्लून्स हे मुंबईमध्ये पोस्टमास्टर होते. ह्या प्राथमिक अवस्थेतील पोस्ट विभागाचे नियम तसेच पत्रे, पार्सले आणि प्रवाशांच्या वाहतूकीचे दर ह्याच्या वर्णनासाठी पुस्तकाचा काही भाग देण्यात आला आहे.

काय प्रयोजन असावे कळत नाही पण पश्चिम महाराष्ट्र आणि गुजराथमधील सर्व राज्यांचे प्रमुख आणि त्यांचे महत्त्वाचे सरदार ह्यांची त्रोटक माहिती पुस्तकाच्या अखेरीस देण्यात आली आहे.

पालखीतून प्रवासाची ही तत्कालीन चित्रे पहा:

पुस्तकाच्या तक्ता क्रमांक १ मध्ये मुंबईपासून पुण्यापर्यंतच्या प्रवासात लागणारी महत्त्वाची गावे, त्यांची परस्परांपासूनची अंतरे, वाटेतील नद्या हे नोंदविलेले आहेत. तो तक्ता असा:

ह्या तक्त्याकडे नजर टाकली की अनेक मनोरंजक गोष्टी दिसू लागतात. पहिली गोष्ट म्हणजे नावांची स्पेलिंग्ज - Ahmednuggur, Panwell, Khopooli (खोपवली-खोपोली साठी), Gaudhe R. (गाढी नदी), Putulaganga (पाताळगंगा नदी), Khundala, Loonowlee, Wulwun, Indrownee इत्यादि. गावांमधील घरांची आणि दुकानांची संख्या ह्या गोष्टीहि बघण्याजोग्या आहेत. खंडाळ्यामध्ये १८२६ साली एकूण ५० घरे आणि १२ दुकाने होती, लोणावळ्यात एकूण २० घरेच होती अणि एकहि दुकान नव्हते, वलवण, वाकई आणि कार्ले ही गावे लोणावळ्यापेक्षा बरीच मोठी होती. तळेगाव हे दाभाडयांचे गाव बरेच मोठे आहे कारण तेथे १५०० घरे आहेत. आजची स्थिति ह्याचा एकदम उलटी आहे.

तक्त्यात ठिकठिकाणी त्या त्या जागेबद्दल प्रवाश्याला मनोरंजक वाटेल अशी उपलब्ध माहिती नोंदवली आहे. बोरघाटामध्ये रस्ता असा नव्हताच. ३ मैल १ फर्लांग घाटाची चढण दाखविली आहे. घाटामधील गाडीचा रस्ता जॉन माल्कमच्या गवर्नर असण्याच्या काळात १८३० मध्ये बांधण्यात आला अशी नोंद अमृतांजन-रिवर्सिंग स्टेशनखालील ह्या संगमरवरी स्मृतिलेखावरून कळते. मजजवळ त्या लेखाचे शब्द आहेत ते असे:

THIS GHAUT CONSTRUCTED BY CAPTAIN HUGHES
WAS COMMENCED ON THE 19TH OF JANUARY
AND OPENED ON THE 10TH OF NOVEMBER 1830
DURING THE ADMINISTRATION
OF
MAJOR GEN.L SIR JOHN MALCOLM M.G.C.E.
ANNO DOMINI
1830
THE ROAD ON THIS GHAUT WAS CONSTRUCTED
WHICH
BY RENDERING THE TRANSIT OF MERCHANDIZE
ON WHEELED CARRIAGES AVAILABLE
AND
THEREBY FACILITATING THE INTERCOURSE
BETWEEN THE
DECKAN AND CONKAN
SECURES TO THE COUNTRY
PERMANENT AND SOLID
ADVANTAGES
ACTIS OVUM IMPLET NON SIGNIBUS ANNIS

कार्ले गावाच्या उत्तरेला काही खडकात कोरलेली जैन देवळे आहेत असा उल्लेख आहे कारण भारतातील प्राचीन अवशेषांचा अभ्यास अगदी नुकताच सुरू झाला होता आणि ही लेणी बौद्ध आहेत ही जाणीव आली नव्हती - बौद्ध धर्म हा एकेकाळी भारतात आणि ह्या भागातहि प्रमुख धर्म होता ही आठवणच ह्या काळामध्ये पूर्णत: लुप्त झाली होती. तळेगावात अखेरच्या युद्धात दोन ब्रिटिश अधिकार्‍यांचा निर्दयपणे वध केला गेल्याचा उल्लेख आहे. चिंचवडचा उल्लेखहि मनोरंजक आहे. तेथील मोरया गोसावींचे वंशज गणपतीचे अवतार मानले जातात ह्याचा आणि ह्याच संदर्भामध्ये गाणपत्य पंथाचा उल्लेख आला आहे.

वाटेतील नद्यांपैकी फक्त इंद्रायणीवर पक्का दगडाचा पूल होता असे दिसते आणि त्याचे Challon's bridge असे वर्णन दिले आहे. ही बहुतेककरून पुलाच्या बांधणीची एक शैली असावी कारण अन्य ठिकाणी - उदा. गाढी नदीवर - Shakspearian bridge चा उल्लेख आहे आणि हे पूल flying bridge स्वरूपाचे म्हणजे झुलते पूल असावेत असे दिसते. पुढे मुळा नदीवर flying bridge असल्याचा उल्लेख आहे. त्याच्या पुढेच ८ वर्षांपूर्वीच्या युद्धामध्ये जाळल्या गेलेल्या इंग्लिश रेसिडेंटच्या बंगल्याच्या अवशेषांचाहि उल्लेख आहे.

मुंबई-पुणे प्रवासाला सुरुवात कशी केली जात असे ह्याचा उल्लेख तक्त्याच्या आरंभातच केला गेला आहे. मुंबईहून पनवेलपर्यंत पोहोचण्याचा सोपा मार्ग म्हणजे समुद्रामधून पडावाने. ओहोटीला मुंबईत पडावात चढल्यास ३-४ तासांनी प्रवासी पनवेलला पोहोचत असे. परतीला मात्र ह्याच प्रवासाला चांगल्या हवेत ८ ते १० तास आणि पावसाळी हवेत १४ ते १५ तास लागत असत असे दिसते.

तक्त्याच्या शेवटच्या Note वरून असे दिसते की सध्या आपण ज्याला जुना पुणे-मुंबई रस्ता म्हणतो आणि जो चिंचवड-निगडी-आकुर्डी-दापोडीवरून जातो तो १८२६ मध्ये ’नवा’ रस्ता होता आणि सध्याचा औंध-गणेशखिंड ह्यावरून जाणारा ’नवा रस्ता तेव्हा ’जुना’ रस्ता होता.

ह्यानंतर मुंबई-ठाणे रस्त्याकडे पाहू.

ह्या तक्त्याच्या पहिल्या पानाच्या उजव्या बाजूस ठाणे रस्ता सुरू होतो. (त्याच्या डाव्या बाजूस पुण्याहून अहमदनगरचा रस्ता दाखविला आहे. त्याचा पहिला भाग वर पुण्याच्या भागाच्या शेवटाला आहे. भीमानदीकाठच्या पेशवे आणि इंग्रज सैन्यांमध्ये झालेल्या कोरेगाव-भीमा लढाईचा आणि त्या लढाईच्या स्मारकस्तंभाचा उल्लेख आहे. त्यांची चित्रे खाली पहा. तसेच ह्याच संस्थळावरील त्यासंबंधीचा लेख येथे पहा.

शेवटाकडील अहमदनगरच्या माळीवाडा गेटचा आणि त्यामधील स्मारकाचा उल्लेख १८८४ सालाच्या अहमदनगर जिल्हा गझेटीअरमध्येहि सापडतो पण त्यापैकी आता काही उरले आहे काय ह्याची कल्पना नाही. शिरूर गावाचा कँटोनमेंट म्हणून उल्लेख आहे कारण शिरूर हे ईस्ट इंडिया कंपनीचे सैन्याचे एक प्रमुख ठाणे होते. पुस्तकामध्येहि शिरूरकडे येणार्‍याजाणार्‍या अनेक रस्त्यांची वर्णने आहेत.)

आपल्यापैकी पुष्कळांना मुंबई-ठाणे भागाची उत्तम माहिती असणार. तक्त्यामधील बहुतेक जागा त्यांना माहिती असल्यामुळे त्यांचे आजचे चित्र आणि सुमारे दोनशे वर्षांपूर्वीचे चित्र ह्यांची मनोरंजक तुलना ते सहज करू शकतात. शीव कॉजवेचे तेव्हाचे वर्णन पहा. त्याच्या आधी वर्णिलेला टेकडीवरला किल्ला आजहि पडक्या भिंतींच्या रूपात अस्तित्व दाखवून आहे. कुर्ल्याहून तुर्भ्याकडे जाणार रस्ता भरतीच्या वेळी पाण्याखाली बुडत असे असे दिसते. कान्हेरी लेण्यांचे वर्णन कार्ल्यापेक्षा बरेच बरोबर आहे. ठाणे जिल्ह्याचे ठिकाण असून त्याची वस्ती ९००० होती ह्यावर आज विश्वास बसत नाही.

पुणे ते सातारा, कात्रज घाटमार्गे ह्या रस्त्याकडे आता पाहू. पुढील तक्त्याच्या मागील पानावर हा तक्ता सुरू होते पण त्याची एकच ओळ तेथे आहे ती अशी
Poona Satara via Katruj Ghat, To Katruj 73h, 1S.... 6 0
कात्रज गावामध्ये ७३ घरे आणि १ दुकान असून तेथपर्य्ंतचे अंतर ६ मैल आहे अशी ही नोंद आहे. ह्यापुढील तक्ता असा:

कात्रजच्या पायथ्याच्या तलावातून पुण्याला पाणी पोहोचविण्याची पेशवेकालीन योजना, शिरवळ गाव भोरकर पंतसचिवांच्या जहागिरीचा भाग असणे असे उल्लेख मनोरंजक आहेत.

असे हे तीन मार्गांचे तक्ते नमुन्याखातर पाहिल्यावर Laying the dawk ह्या विषयाकडे वळू. हे काम जेथे पोस्टमास्टर नेमले गेले आहेत त्यांच्या अखत्यारामध्ये येत असे असे वर नमूद केलेच आहे. ह्याखेरीज हा खाजगी व्यवसाय म्हणून करणारेहि लोक असत. ज्याला एका गावाहून दुसर्‍या गावी जायचे असेल त्याने वाटेतील सर्व पोस्टमास्टर वा खाजगी व्यवसाय करणार्‍या व्यवसायाशी संपर्क करायचा. (असा संपर्क त्यासाठी खास पत्र पाठवून केला जात असणार.) त्या पत्रामध्ये प्रवासाच्या सुरुवातीचा दिवस आणि वेळ, वाटेमध्ये कोठेकोठे विश्रान्तीसाठी वा जेवण्य़ाखाण्यासाठी किती वेळ मुक्काम करणार असे तपशील जितक्या खोलात जाऊन देता येतील तितके द्यायचे. पालखीचा प्रवास ताशी ४ मैलांच्या वेगाने होणार, त्यावरून प्रवासाला एकूण दिवस किती लागतील हे ठरवणे अवघड नव्हते. मुंबई-पुणे प्रवास २५ ते ३० तासात होई तर मुंबई कलकत्त्याला २० ते २५ दिवस लागत. एकूण अंतर १५ ते २० मैलांच्या टप्प्यांमध्ये विभागलेले असे. वेळापत्रकाप्रमाणे प्रत्येक टप्प्याला पालखी वाहणारे हमाल हजर असतील अशी व्यवस्था पोस्टमास्टर करून ठेवी. दर टप्प्याला साधारणपणे ८ हमाल, २ मशालची आणि २ बंगीवाले इतके मनुष्यबळ लागे. ह्यापैकी ४ हमाल, १ मशालची आणि १ बंगीवाला प्रत्यक्ष पालखी वाहात तर उरलेले बरोबर चालत. ते दर अर्ध्या तासाने एकमेकांमध्ये अदलाबदल करीत. रात्रीच्या थंड वेळी प्रवास करता यावा, तसेच अनवाणी चालणार्‍या हमालांच्या पायाखाली काटेकुटे, सापविंचू येऊ नयेत म्हणून तेवती मशाल आणि तिचे तेल घेऊन मशालची चालत राही. प्रवाशाला साधारण ५० पौंडांचा एक पेटारा असे दोन पेटारे विनामूल्य नेता येत असत. बंगीवाला कावडीच्या दोन पाखांत हे पेटारे घेऊन चालत असे. ह्यापुढे दाखविलेल्या तक्त्यातील मुंबई-पुणे भागाच्या डाकेच्या वर्णनावरून हे सर्व नीट कळेल.

हा तक्ता १३ हमाल (पालखी नेणारे, मशालची आणि बंगीवाले) लागणार असे धरून तयार केला आहे. प्रवासाला सुरुवात मुंबईतून पडावाने पनवेलला येण्याने होते. ह्याला वेळ साडेतीन ते साडेचार तास. प्रवास करणार्‍यानेच ही व्यवस्था स्वतन्त्रपणे करायची आहे. पनवेल ठाण्याच्या पोस्टामास्टरच्या अखत्यारात आहे आणि पनवेलमध्ये तो हमाल पाठविणार आणि ते हमाल प्रवाश्याला पहिला टप्पा खालापूरला साडेअठरा मैलावर नेणार. असे करायला ताशी ४ मैलांप्रमाणे त्यांना साडेचार ते पाच तास लागतील म्हणजे त्यांचे एका दिवसाचे काम झाले. त्यांना परतीला आपापल्या घरी परतायला अजून एक दिवस लागेल. ह्या सर्वांचा दर प्रत्येकी ८ आणे दरदिवशी. एकूण १३ हमालांना १३ गुणिले २ (दिवस) गुणिले ८ (आणे) = २०८ आणे = १३ रुपये इतका खर्च पडेल. प्रवाश्याला खालापुरात सोडून ते परततील. खालापूरपासून पुण्यापर्यंत अखत्यार पुण्याच्या पोस्टमास्टरचा आहे. त्याचे हमाल पुण्याहून खालापूरला पोहोचायला ३ दिवस घेतात तसेच काम झाले म्हणजे पुण्याला परतायला त्यांना तीन दिवस लागतात, एकूण ६ दिवस. हे हमाल प्रवाश्याला साडेसतरा मैलावरील कार्ले गावापर्यंत बोरघाट चढून पोहोचवतील. त्यांचा खर्च १३ गुणिले ६ (दिवस) गुणिले ५ (आणे) = ३९० आणे = २४ रु. १ पावली ५० खुर्दा असा येईल. (येथे रुपयाखालील नाणी कोणती आहेत ते स्पष्ट दाखविलेले नाही पण पुस्तकामध्ये अन्यत्र फणम - fanam, आणे, पैसे असे उल्लेख सापडतात.) कार्ले गावात आलेले हमाल पुण्याहून २ दिवसांची चाल करून आलेले आहेत. त्यांना परती धरून ४ दिवस प्रत्येकी दर दिवसाला ५ आणे ह्याप्रमाणे २६० आणे ह्याप्रमाणे १६ रुपये आणि १ पावली मिळेल आणि ते प्रवाश्याला तळेगावापर्यंत घेऊन जातील. तळेगावात हजर असलेल्या हमालांना येऊनजाऊन २ दिवस रोज ५ आणे प्रमाणे १३० आणे म्हणजे ८ रुपये आणि अर्धी पावली मिळून प्रवासी पुण्यामध्ये पोहोचेल. ह्या एकूण प्रवासाला प्रवाश्याला ६१ रुपये आणि ३ पावल्या खर्च येईल. पनवेलपर्यंतचा पडावाचा, तसेच वाटेतील जेवण्याखाण्याचा, डकबंगल्यामध्ये मुक्काम केल्यास त्याचा खर्च निराळा. प्रवाश्याला किती सावकाश वा घाईने हा प्रवास संपवायचा आहे त्यावर अवलंबून एक ते दीड दिवस एकूण प्रवासाला लागेल.

वरील सारांशामध्ये मुंबई-कलकत्ता पालखी प्रवासाचे अंतर, वेळ आणि खर्च दाखविले आहेत. अंतर १३२० मैल ६ फर्लांग (होडीचे अंतर सोडून), २० ते २२ दिवस आणि खर्च १२९२ रुपये ८॥ आणे असा दाखविला आहे. कंपनीचा प्रभाव जेथे आहे अशा भागातूनच हा प्रवास होणार म्हणून तो मुंबई-पुणे-सोलापूर-निजामाचे राज्य-आजच्या आन्ध्राची किनारपट्टी-ओरिसा-बंगाल अशा मार्गाने दाखविला आहे. नागपूरच्या उत्तरेचा भिल्ल-गोंडांचा प्रदेश टाळला आहे हे लक्षात येते.

दरिद्री हमालांना हे अतिकष्टकर काम होतेच. एक माणूस पालखीसकट चढउतारांवरून, उन्हातान्हातून आणि पावसातून १५ ते २० मैल उचलून न्यायचे काम काही सोपे नसावे. हेहि करायचे केवळ दिवसा ५ ते ८ आण्यासाठी. ह्यावरून हिंदुस्तानात हलाखीची परिस्थिति किती असावी ह्याचे कल्पना करता येते. दुसर्‍या बाजूना प्रवाशाचेहि अशा प्रवासात भरपूर हाल होत. दिवसदिवस पाय अवघडून पालखीमध्ये बसून राहायचे, हालचालीमुळे वाचनाचीहि करमणूक नाही, उन्हामुळे किंवा पावसामुळे पालखीचे पडदे पाडले तर आत अतिशय उकाडा, पालखीची सतत होणारी वरखाली हलचाल ह्यातून प्रवाश्याला प्रवास कधी संपतो असे होत असणार!
महाबळेश्वर, नाणे घाट ह्यांची वर्णने, तसेच पोस्टाचे दर दाखवून लेख संपवितो.



धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

नितिन थत्ते Mon, 26/01/2015 - 06:24

इंटरेस्टींग....
ठाण्याला जाताना कुर्ल्यापर्यंत आल्यावर आजच्या प्रमाणे घाटकोपर-विक्रोळी मार्गाने न येता लोक पवई-विहारच्या टेकडीवर चढून खिंडीपाड्यातून भांडुप सोनापूरला उतरून येत असत असं दिसतंय. आजचा पूर्व-द्रुत-महामार्ग घाटकोपर-विक्रोळी-भांडुप भागात खाजणातूनच आहे (पक्षी दोन्ही बाजूस दलदल/मॅनग्रोव्ह्ज आहेत). परंतु लाल बहादुर शास्त्री मार्ग तसा वाटत नाही. तरी टेकडीच्या पायथ्यापायथ्याने न जाता टेकडी चढून जायचे काय कारण असावे कळत नाही.

भांडुपला "मुख्यत्वे" उसाची शेती हे ही रोचक.

कलकत्त्याला जायला १०००+ रुपये म्हण्जे प्रवास लैच महाग होता म्हणायचा.

राही Tue, 27/01/2015 - 13:15

In reply to by नितिन थत्ते

मुंबईला गेल्या साठ-सत्तर वर्षांत जोडला गेलेला ठाण्यालगतचा साष्टी प्रांत हा जवळजवळ दीड ह्जार वर्षे नागर बनलेला होता. या प्रांतात कोंडिविटें,जोगेश्वरी,मंडपेश्वर,मागाठणे यांसारख्या बौद्ध-शैव गुंफा होत्या. कान्हेरीसारखे गजबजलेले ज्ञानपीठ होते. मालाड,अंधेरी,पहाडी, कोळेकलिआना (कोळे कल्याण म्हणजे कलीना),मरोल अशी मोठी गावठाणे होती.त्या मानाने मुंबईच्या सध्याच्या पूर्व उपनगरांमध्ये दलदल, जंगल,मिठागरे, खाजणे अशी स्थिती होती. अणजूर-भिवंडीपासून जलमार्गाने बोरिवलीपर्यंत म्हणजे कान्हेरीपर्यंत येता येई. वसई-उत्तन-गोराई-मंडपेश्वर असाही मार्ग होता.शिवाय खुष्कीने कान्हेरीचे डोंगर उतरले की ठाणे येई.(ह्या मार्गाविषयी घरातल्या वृद्ध लोकांकडून ऐकलेले आहे.) असे जवळचे आणि वाड्या-वस्ती असलेले मार्ग घाटकोपर विखरोळीच्या सुनसान प्रदेशांपेक्षा सोयीचे होते.
पवई तलाव होण्याआधी काही काळ हा भाग फ्रामजी कावसजी पटेल या पारशी गृहस्थांनी घेतला होता. हे गृहस्थ अ‍ॅग्रिकल्चरल अ‍ॅण्ड हॉर्टिकल्चरल सोसाय्टी ऑव्ह वेस्टर्न इंडिया चे उपाध्यक्ष होते आणि मोठे खटपटे आणि प्रयोगशील होते. त्यांनी या सपाट प्रदेशात ऊसशेतीचे यशस्वी प्रयोग केले.
बोरडी,घोलवड,डहाणू भागांतही या मेहनती इराणी लोकांनी चिकू,लिची,संत्री,मोसंबी अशा नवलाईच्या फळझाडांची लागवड केली.

चिमणराव Mon, 26/01/2015 - 07:51

फारच मजेदार पुस्तक सापडलं आहे. ब्रिटिशांना प्रत्येक बारीक गोष्ट नोंदवून ठेवायची सवय होती त्याचा पुढच्या अधिकाऱ्यांना उपयोग होत असे. डाक मोगलांनी सुरू केली आणि तीच इंग्रजांनी पुढे चालू ठेवली वेळेचा काटेकारपणा आणून. शिवाय ठरावीक तारखेस पगार देण्याच्या पद्धतीने बरीच सुधारणा झाली.
आमच्या आत्याचे यजमान ब्रिटिश काळात पोस्टमास्तर होते ते ७० साली निवृत्त झाले. बदली दर तीन वर्षांनी होत असे. माथेरानची गोष्ट: खाली नेरळला एका गावात एक माणूस भाला घेऊन तयार असायचा. पाचची डाक मुंबईहून रेल्वेने आली की त्यातली पत्रांची कापडी पिशवी घेऊन धावत वरती माथेरानला माउंट बैरी पॉईंट मार्गे पोस्टात जायचा. दुसरे दिवशी वरची थैली घेऊन खाली यायचा. या माणसाला रनर म्हणत. पूर्वी बिबळे फार होते त्यासाठी भाला असायचा आणि गावाचे नाव पडले टपालवाडी, ते नाव अजूनही आहे.

नितिन थत्ते Mon, 26/01/2015 - 09:38

अनेक पर्यटनस्थळांवर चढून जाण्यासाठी खुर्ची/डोलीची सोय असते. ते मागत असलेले पैसे या हमालांच्या पैशांशी* तुलना करून पहायला हवे.

*१८३० ते २०१५ चे इन्फ़्लेशन धरून....

Nile Mon, 26/01/2015 - 11:34

पुस्तक रोचक दिसते आहे.

शेवटाकडील अहमदनगरच्या माळीवाडा गेटचा आणि त्यामधील स्मारकाचा उल्लेख १८८४ सालाच्या अहमदनगर जिल्हा गझेटीअरमध्येहि सापडतो पण त्यापैकी आता काही उरले आहे काय ह्याची कल्पना नाही.

माळिवाडा गेट म्हणजे माळीवाड्याची वेश असावी. ती अजूनही व्यवस्थित आहे. (डागडुजी केली असण्याची शक्यता आहे. अहमदनगरमधील अशाच दुसच्या वेशीची, दिल्ली दरवाजा, एक दोन वेळा डागडुजी केल्याचे पाहिले आहे.) आजूबाजूला फेरीवाले वगैरेंनी गर्दी केली असली तरी बहुतेक त्याला लोखंडाचे कुंपण घातलेले आहे असे वाटते. स्मारक मात्र कोणते माहित नाही.

जालावर शोध घेता स्मारकाचे चित्र सापडले. आणि इतर.

माळीवाडा वेश आणि स्मारक

सद्ध्या वेश अशी आहे:

दिल्ली दरवाजा

अरविंद कोल्हटकर Mon, 26/01/2015 - 19:16

In reply to by Nile

तुम्ही जे माळीवाडा गेटचे आणि त्याच्या समोरील स्मारकाचे चित्र दाखविले आहे ते क्लून्सच्या पुस्तकात वर्णिलेले स्मारक नाही कारण क्लून्सचे स्मारक भिंतीत बसविले होते असे स्पष्ट उल्लेखिलेले आहे. तुमच्या चित्रातील स्मारक हे ओबेलिस्क स्तंभाच्या स्वरूपात आहे आणि ते कशाचे आहे ते नीट कळत नाही. ते स्वातन्त्र्योत्तर कालातीलहि असू शकेल.

क्लून्सच्या स्मारकाच्या वर्णनाहून अधिक तपशील १८८४ च्या गझेटीअरमध्ये सापडतात. ते असे आहेतः
"Close to the west of the doorway let into the wall in the centre of an arched recess specially built for it, an oblong inscribed black marble tablet, surmounted by an antlered stag's head and the Gaelic motto of the regiment, contains an inscription in memory of the officers and men of the 78th Highlanders who fell at the storming of the city on the 8th of August 1803."

जालावर मला माळीवाडा गेटच्या चित्रांमध्ये खालील चित्र दिसले. गझेटीअरच्या वर्णनाशी ते पूर्ण जुळते. हेच ते स्मारक असावे असे निश्चित म्हणता येईल. माळीवाडा गेट आणि दिल्ली गेट ह्या दोन्ही जागा आता ऐतिहासिक महत्त्वाच्या अशा घोषित केल्या गेल्या आहेत असे समजते. म्हणजे खालच्या चित्रातील स्मारक अजूनहि तेथे असावे असे मानायला हरकत नाही.

Nile Mon, 26/01/2015 - 20:29

In reply to by अरविंद कोल्हटकर

तुमच्या चित्रातील स्मारक हे ओबेलिस्क स्तंभाच्या स्वरूपात आहे आणि ते कशाचे आहे ते नीट कळत नाही. ते स्वातन्त्र्योत्तर कालातीलहि असू शकेल.

बरोबर. चित्रात पाहता ते 'सिमेंटचे' असावे असे वाटते. क्लून्सने वर्णिलेले स्मारक नक्कीच पाहिलेले नाही. माळीवाडा वेशीतून जाण्यायेण्यास बंदी (आणि बहुतेक कुंपण) घातल्याला अनेक वर्षे झाली असावीत. पुढच्यावेळेला गेल्यावर शोधायला हवे.

माळीवाडा गेट आणि दिल्ली गेट ह्या दोन्ही जागा आता ऐतिहासिक महत्त्वाच्या अशा घोषित केल्या गेल्या आहेत असे समजते. म्हणजे खालच्या चित्रातील स्मारक अजूनहि तेथे असावे असे मानायला हरकत नाही.

गेल्या वीस पंचवीस वर्षात या दोन्ही वास्तूंची बरीच हेळसांड झालेली आहे. मी वरती दिलेल्या चित्रातून थोडाफार अंदाज येत आहेत. ऐतिहासिक वास्त्रूंची पुर्नबांधणी करताना सिमेंट काँक्रिटचा वापर, त्या करता मूळ वास्तूत करण्यात आलेले बदल वगैरे पाहून हे काम हलगर्जीचे आहे असे वाटल्याशिवाय राहत नाही. सद्ध्या दोन्ही वेशींवरचे नक्षीकाम सिमेंटचे आहे, मी वरती दिलेल्या दिल्ली दरवाज्याच्या चित्रात बहुतेक बांधकाम चालू असताना वरच्या नक्षीकरता रोवलेले गज दिसत आहेत. दिल्ली दरवाजाला दिलेला रंग वगैरेबद्दल तर काय बोलावे! नगरसारख्या ठिकाणी खरंतर अशा बांधकामाकरता दगड सहज सापडतील. वरच्या स्मारकालाही चिकटवलेली पोस्टर्स दिसत आहेत. असो.

अंतराआनंद Mon, 26/01/2015 - 16:42

लेख नेहमीसारखाच माहितीपूर्ण. मजा येईल हे पुस्तक वाचायला. आताच forgottenbooks.com वरून घेतलं. बघू वाचतेय का शेवटपर्यंत. एक तर छापील वाचणंच सोईचं पडतं .
रा.भि. जोशींचं एक पुस्तक वाचलेलं होतं त्यात ते आणि त्यांचा मित्र मुंबईहून ठाण्याला चालत जायचं ठरवतात. वाटेत विखरोळीचं (असंचं म्हटलय) जंगल लागेल त्याची भिती घालत घरातले विरोध करतात. तो प्रवास वाचणं मोठं मनोरंजक आहे. शोधायला हवं ते ही पुस्तक.

अजो१२३ Tue, 27/01/2015 - 14:53

दरिद्री हमालांना हे अतिकष्टकर काम होतेच. एक माणूस पालखीसकट चढउतारांवरून, उन्हातान्हातून आणि पावसातून १५ ते २० मैल उचलून न्यायचे काम काही सोपे नसावे. हेहि करायचे केवळ दिवसा ५ ते ८ आण्यासाठी. ह्यावरून हिंदुस्तानात हलाखीची परिस्थिति किती असावी ह्याचे कल्पना करता येते.

असहमत. १८२६ ते २०१५ मधे (५+८)/२ = ६.५ आणे = ६.५*६ = ३९ पैसे. तेव्हापासून आतापर्यंत ४% वार्षिक महागाई मानली तरी दिवसाकाठी हे उत्पन्न आजचे ६५०/-- रु होते. महिन्याला २०,००० रु.
--------------------------------------------------

दुसर्‍या बाजूना प्रवाशाचेहि अशा प्रवासात भरपूर हाल होत. दिवसदिवस पाय अवघडून पालखीमध्ये बसून राहायचे, हालचालीमुळे वाचनाचीहि करमणूक नाही, उन्हामुळे किंवा पावसामुळे पालखीचे पडदे पाडले तर आत अतिशय उकाडा, पालखीची सतत होणारी वरखाली हलचाल ह्यातून प्रवाश्याला प्रवास कधी संपतो असे होत असणार!

अगोदरच्या काळातले लोक खूप मजबूत असत.

बॅटमॅन Tue, 27/01/2015 - 14:59

In reply to by अजो१२३

अगोदरच्या काळातले लोक खूप मजबूत असत.

जर पुरावा नसेल तर विधाने करता ती कशाच्या आधारावर ओ ;) की मेरे मन को भाया, मै विधान करके आया असा प्रकार आहे =))

अजो१२३ Tue, 27/01/2015 - 15:31

In reply to by बॅटमॅन

http://www.ibtimes.com/obesity-epidemic-mexico-us-more-20-percentage-po…
समृद्धी आणि लठ्ठपणा यांचं प्रोपोर्शनल नातं आहे. जे देश जास्त समृद्ध आहेत ते जास्त लठ्ठ आहेत. यावरून लक्षात यावं कि नव्या जमान्यातल्या जीवनशैलीचा पांढरपेशा लोकांवर काय परिणाम झाला आहे.
-----------
आता लठ्ठपणा आणि मजबूतपणाचा संबंध काय असा प्रश्न नका करू.

बॅटमॅन Tue, 27/01/2015 - 16:01

In reply to by अजो१२३

छे छे! ते रिलेशन सध्यासाठी आहे. जुन्या काळात असं काही होतं कशावरून?

भूतकाळाबद्दल निष्कर्ष काढण्यासाठी तुम्ही वर्तमानकाळ वापरावा हे बाकी रोचक आहे.

अजो१२३ Tue, 27/01/2015 - 16:04

In reply to by बॅटमॅन

भूतकाळाबद्दल निष्कर्ष काढण्यासाठी तुम्ही वर्तमानकाळ वापरावा

उलटा चोर? अहो, हे लठ्ठपणाचं आणि मजबूतपणाचं जुनंच समीकरण आहे. वर्तमानकालात भूतकाळातूनच आलं आहे.

बॅटमॅन Tue, 27/01/2015 - 16:11

In reply to by अजो१२३

हे लठ्ठपणाचं आणि मजबूतपणाचं जुनंच समीकरण आहे. वर्तमानकालात भूतकाळातूनच आलं आहे.

कशावरून?

राही Tue, 27/01/2015 - 15:18

In reply to by अजो१२३

भारतीयांचे सरासरी आयुर्मान खूपच कमी होते. बायकांचे २३ आणि पुरुषांचे ४२ की ४७. लोक सदा रोगजर्जर असत. कुमारी वयाच्या मातांना कुमारी वयात आणि प्रौढ (पस्तिशीनंतर) होणारी मुले दुबळी असत. किरकिरी मुले हे वास्तव होते. आई आणि मुलगी यांचे बाळंतपण एकाच सुमाराला येई आणि दोनदोन (प्रसंगी तीन-चार, कारण घरातल्या इतर बायकांचीही बाळंतपणे असत.)मुलांचे-मातांचे नीट संगोपन होत नसे.यातून जगून वाचून जे थोडे लोक सत्तरऐंशीचा पल्ला गाठत तेच जगासमोर राहात आणि त्यांच्यावरून 'जुने खोड, अगदी मजबूत' असे मत बनवले जाई. मध्येच मृत्यु पावलेले अनेक लोक विस्मरणात जात.
अर्थात धाडसी आणि धडधाकट असत तेच अशा खडतर प्रवासाला निघत. आयुष्याचा अंत जवळ आला की लोकांना काशीयात्रा करावीशी वाटे कारण काशीला पोहोचेपर्यंत किंवा पोहोचताना मृत्यूने गाठण्याची दाट शक्यता असे. पुण्य मिळवण्याची ती एक संधी असे.

अजो१२३ Tue, 27/01/2015 - 15:39

In reply to by राही

कादंबर्‍या जास्त वाचल्या तर हीच प्रतिमा राहिल जुन्या काळाची.
-------------------
बायकांचे सरासरी आयुर्मान २३ राहिले आणि पुरुषांचे ४२ राहिले तर मानवता किती वर्षांत नष्ट होईल याचे गणित मांडून बघा. किंबहुना तुम्हाला भारतीय समाज पुरुषप्रधान होता हे वेगळ्याच अर्थाने म्हणायचे आहे. म्हणजे ते बहुसंख्य होते या अर्थाने.
शिवाय पुरुष एकापेक्षा जास्त लग्ने करत. म्हणजे ५०% पेक्षा जास्त अडल्ट समाज विधुर वा ब्रह्मचारी होता असे. त्यातही न जुळलेल्या जोड्या पाहिल्या तर अजूनच जास्त.
किमान बेसिक गणित तरी करा.

अजो१२३ Tue, 27/01/2015 - 15:51

In reply to by राही

तो आपल्या मर्जीचा प्रश्न आहे. पण बायका सरासरी २३ वर्षे जगत नि पुरुष ४२ हे मधमाशांना सांगा. त्या श्रद्धेने ऐकतील. एकाच वेळी मादी माशीला कितीतरी अंडे देता येतात म्हणून त्यांचा वंश टिकेल. त्यांच्यात रेशो काहीही असलेला चालेल.

अजो१२३ Tue, 27/01/2015 - 16:48

In reply to by अजो१२३

शिवाय इतिहासात प्रत्येकच बाईचा नवरा तिच्या दुप्पट वयाचा असा ही एप्रोझिमेशन करता येतं.

बॅटमॅन Tue, 27/01/2015 - 16:49

In reply to by अजो१२३

अगदी अगदी.

आयुर्मान कमी होते असे वाचलेय, पण पुरुष व स्त्रियांच्या आयुर्मानात इतका ड्रास्टिक फरक असेलसे आजिबात वाटत नाही.

बॅटमॅन Tue, 27/01/2015 - 17:07

In reply to by अजो१२३

हे विधान तसे खरे आहे, पण राही या सदस्यांबद्दल खरे नाही इतके बाकी मी नक्कीच सांगू शकतो. मला त्यांचे आयुर्मानाबद्दलचे आकडे पटत नाहीत, पण बाकीचा प्रतिसाद सेन्सिबल आहे एकदम. आक्रस्ताळेपणा आणि राही हे विरुद्धार्थी शब्द म्हटले तरी चालेल.

अजो१२३ Tue, 27/01/2015 - 18:56

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन, हे भाषेचं दौर्बल्य आहे कि नाही माहित नाही, पण एकूण संवादावरून मी राहीला आक्रस्ताळी समजतो असा अर्थ काढला जाऊ शकतो (शकतोच असे नाही.). That is not the case. त्यांच्या जन्विन विचारांना आमचा जन्विन विरोध आहे.

बॅटमॅन Tue, 27/01/2015 - 19:02

In reply to by अजो१२३

तसे इम्प्लिकेशन जाणवते. माहिती चूक आहे असा नुस्ता आरोप नाही तर चूक माहिती मुद्दाम देतात असा हेत्वारोप जाणवतो. त्यातही तो हेत्वारोप वैयक्तिक जाणवला आणि दुसरे म्हणजे तो अस्थानी आहे हे अन्य प्रतिसादांवरून दिसले म्हणून म्हणालो इतकेच.

बॅटमॅन Tue, 27/01/2015 - 19:33

In reply to by अजो१२३

हे भाषेचं दौर्बल्य नाही तर नेहमीचे भाषावापराचे संकेत तुम्हांला पटत नाहीत त्यातून निर्माण झालेलं पर्सेप्शन आहे.

राजेश घासकडवी Tue, 12/05/2015 - 08:15

In reply to by अजो१२३

अतिरेकी पुरोगामीता आणि अतिरेकी स्त्रीवाद एकत्र आला कि बेसिक गणित बाजूला राहतं. असो.

चला, जरा पुरोगामित्व, प्रतिगामित्व, स्त्रीवाद, अतिरेक वगैरे शाब्दिक दुगाण्या बाजूला ठेवून थोडं बेसिक गणित करू.

डावीकडच्या आलेखात १८५० सालचे अमेरिकेचे आकडे आहेत. त्यात जन्माच्या वेळचं अपेक्षित वय ३७ आहे. हे सर्वांसाठी - स्त्री आणि पुरुषांसाठी आहे. तेव्हा हा आकडा त्यावेळच्या भारतीय आकड्याशी मिळताजुळता आहे - २६ आणि ४२ यांच्या मध्ये कुठेतरी. तेव्हा हा आकडा कसा येतो हे समजावून घेतलं की भारताची परिस्थितीही समजावून घेता येईल. नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे वय ० असताना अपेक्षित आयुष्य ३७ वर्षं आहे, तर वय १० असलेल्या मुलाचं अपेक्षित आयुष्य एकदम ५५ होतं. याचा अर्थ असा की वय वर्षं ० ते १० या काळात मृत्यूची शक्यता प्रचंड होती. अनेक देशांत, आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसताना वय वर्षं ५ च्या आत ३०% मुलं दगावण्याची आकडेवारी उपलब्ध आहे. किंबहुना या पेपरमध्ये केलेल्या गणितांनुसार आदीम काळात सुमारे ४४ ते ६० टक्के मुलं वयाच्या पाचव्या वर्षाच्या आत दगावायची असा अंदाज बांधलेला आहे. त्याच पेपरनुसार सोळाव्या व सतराव्या शतकात ब्रिटिश रॉयल्टीमध्ये २५ ते ३५% मुलं वयाच्या पाचव्या वर्षाच्या आत मरत. हे श्रीमंतांकडे - ज्यांना अनेक तत्कालीन सुविधा उपलब्ध होत्या. त्यामुळे भारतात १८०० सालात १० च्या आत दगावण्याची शक्यता ४०% असणं सहज शक्य आहे. तेव्हा हो, वय वर्षे १६ च्या आत प्रचंड प्रमाणावर मृत्यू होत.

मुलींसाठी नवव्या दहाव्या वर्षी लग्न, आणि वय वर्षं तीसच्या आत आठ-दहा बाळंतपणं हेही सर्रास व्हायचं. दर शंभर जन्मांमागे एका आईचा मृत्यू हे प्रमाणही वैद्यकीय सुविधा नसताना व्हायचं. http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC1633559/ म्हणजे चाळीसेक टक्के मुली दहा वर्षांच्या आत, आणि उरलेल्यातल्या दहा टक्के साधारण सरासरी वीसच्या आसपास निव्वळ बाळंतपणामध्ये मरायच्या. इतक्या बाळंतपणांचा त्रास अंगावर काढल्यामुळे इतर काळात मृत्यूचं प्रमाणही वाढलेलं असायचं. त्यामुळे पन्नास-पंचावन्न टक्के मुली/बायका अगदी लहान वयात मरायच्या. तेव्हा तुम्हाला जे आकडे अशक्यप्राय वाटत होते ते तितके अशक्यप्राय नाहीत.

आता राहाता राहिलं १५ टक्के बायका वय वर्षं ६० पलिकडे जगण्याची गोष्ट - हा १५ टक्के आकडा कुठून आला? तो एक निव्वळ अंदाज आहे. तो आकडा बराच लहान असावा. कारण आपण जेव्हा लोकांकडे पाहातो तेव्हा दहा वर्षांच्या आत मेलेल्यांचा हिशोब करत नाही. हा आकडा १८०० साली ५० टक्क्यांच्या आसपास असल्यामुळे उरलेल्यांतले तीसेक टक्के लोक ६० च्या पलिकडे जगत यावर विश्वास बसण्यासारखा नाही. कुठूनतरी आकडेवारी मिळाली तर हे अधिक स्पष्टपणे दिसून येईल अशी मला खात्री वाटते.

अजो१२३ Tue, 12/05/2015 - 13:49

In reply to by राजेश घासकडवी

त्या १५० मनुष्य-वर्षे इररने कायच्या काही अर्थ निघत आहे. ३०% लोक ५ चे असताना मरत कि १० चे? अशा लोकांचा विदा किती प्रमाण मानावा?

राजेश घासकडवी Tue, 12/05/2015 - 18:10

In reply to by अजो१२३

अहो, ते क्युम्युलेटिव्ह आकडे आहेत. पाच वर्षांच्या आत मरणारी सुमारे ३० ते ३५ टक्के. दहा वर्षांच्या आत एकंदरीत सुमारे ४० टक्के. त्यात ती पहिली ३० ते ३५ टक्के आलीच. आणि त्यातही पहिल्या पाच वर्षांत जी ३० ते ३५ टक्के मरत त्यातली सुमारे बहुतांश पहिल्या वर्षांतच दगावत. त्यामुळे मॅन इअर्स लिव्ह्ड काढतानाही वेटेज १ ला जास्त द्यावं लागतं.

मी तुम्हाला असं सुचवेन की अशी बॅक ऑफ द आन्व्हलोप कॅल्क्युलेशन्स करण्यापेक्षा प्रत्यक्ष अॅक्च्युरिअल टेबल्स शोधून पाहा. उदाहरणार्थ इथे टेबल आहे. त्यात १८६० च्या दशकातली अमेरिकेतली परिस्थिती दिलेली आहे. त्या काळात तिथलं जीवनमान १८०० सालच्या भारतापेक्षा खूपच 'चांगलं' असल्यामुळे वयाच्या पहिल्या वर्षापर्यंत 'फक्त' २१ टक्के मुलं मरत, आणि पुढच्या चार वर्षांत अजून सहा-सात टक्के मरत.

तेव्हा १०० लोकांच्या मॅन इअर्सचं सोपं गणित करायचं झालं तर ३० गुणिले एकपासून सुरूवात करा. मग उरलेल्या ७० लोकांना १० ते ७० पर्यंतच्या बिन्समध्ये समसमान घातलंत तरी १०० लोकांची मिळून मॅन इअर्स २८३० येतात. म्हणजे लाइफ एक्स्पेक्टन्सी २८.३०.

अजो१२३ Tue, 12/05/2015 - 18:38

In reply to by राजेश घासकडवी

PMC full text:
Hist Methods. Author manuscript; available in PMC 2011 Apr 1.
Published in final edited form as:
Hist Methods. 2010 Apr; 43(2): 45–79.

doi:  10.1080/01615441003720449

Table 9

Proportion dying in age interval x to x+n, white males

Exact age, x n 1860 1861 1862 1863 1864 1865 1866–69
0 1 0.2071 0.2071 ###### 0.2071 0.2071 0.2071 0.2071
1 1 0.0469 0.0469 ###### 0.0469 0.0469 0.0469 0.0469
2 1 0.0206 0.0206 ###### 0.0206 0.0206 0.0206 0.0206
3 1 0.0132 0.0132 ###### 0.0132 0.0132 0.0132 0.0132
4 1 0.0103 0.0103 ###### 0.0103 0.0103 0.0103 0.0103
5 1 0.0295 0.0295 ###### 0.0295 0.0295 0.0295 0.0295
10 5 0.0216 0.0216 ###### 0.0216 0.0216 0.0216 0.0216
15 5 0.0339 0.0418 ###### 0.1394 0.1582 0.1416 0.0339
20 5 0.0468 0.0552 ###### 0.1733 0.2306 0.1545 0.0468
25 5 0.0491 0.0562 ###### 0.1596 0.2193 0.1491 0.0491
30 5 0.0505 0.0576 ###### 0.1536 0.2057 0.1415 0.0505
35 5 0.0555 0.0596 ###### 0.1244 0.1670 0.1258 0.0555
40 5 0.0626 0.0657 ###### 0.0999 0.1242 0.1028 0.0626
45 5 0.0747 0.0765 ###### 0.0937 0.1066 0.0960 0.0747
50 5 0.0915 0.0956 ###### 0.0997 0.1043 0.1023 0.0915
55 5 0.1251 0.1251 ###### 0.1251 0.1251 0.1251 0.1251
60 5 0.1697 0.1697 ###### 0.1697 0.1697 0.1697 0.1697
65 5 0.2394 0.2394 ###### 0.2394 0.2394 0.2394 0.2394
70 5 0.3229 0.3229 ###### 0.3229 0.3229 0.3229 0.3229
75 5 0.4402 0.4402 ###### 0.4402 0.4402 0.4402 0.4402
80+ 1.0000 1.0000 ###### 1.0000 1.0000 1.0000 1.0000

आपल्या वरच्या प्रतिसादातल्या विधानांवर मी "लाइफ एक्स्पेटांसीची" व्याख्या वापरूनच गणिते केली आहेत. ती दाखवतात कि केलेल्या तीन विधानांचा (१. जन्मावेळी ३७ २. १० ला ५५ आणि ३. ५ पर्यंत ३०%) वापर करून केलेली आहेत. त्यातल्या इररने चक्क चक्क जन्मावेळची लाए ५ वर्षांनी पुढे सरकावता येते. आता ३०% -५ वर्षे कुमुलेटीव घटना आहे म्हणालात तर इरर अजूनच वाढते.
=================================================================================================
बाय द वे, आपण हा जो टेबल दिला आहे त्यात लोकांनी सर्वे केला आहे असे तरी वाटते काय? मंजे दशांशाच्या तिसर्‍या स्थळापर्यंत इतक्या वयोगटांत इतकी वर्षे आकडेच बदलू नयेत हे मला पटत नाही.

अजो१२३ Tue, 12/05/2015 - 19:28

In reply to by अजो१२३

या टेबलवरून लाईफ एक्सपेक्टांसी मोजली. ब्रॅकेटच्या सुरुवातीलाच किंवा शेवटाला (शेवटी ८५ वर्षे असा स्लॅब धरावा लागतो.) सगळे मरतात असे मानल्यास अनुक्रमे ३८ आणि ४२ वर्षे येते. हे आकडे जुळतात?

==================================================================
लाईफ एक्सपेक्टांसीच्या मोजणीत म्हातार्‍यांची मोजणी अगदी अल्पशीही इकडे तिकडे केली भयंकर फरक पडतो. म्हातारे नीट मोजून पोरांबद्दल कंक्यूजन काढले गेले असेल तर धन्यच म्हणावे.

राजेश घासकडवी Tue, 12/05/2015 - 20:48

In reply to by अजो१२३

लाईफ एक्सपेक्टांसीच्या मोजणीत म्हातार्‍यांची मोजणी अगदी अल्पशीही इकडे तिकडे केली भयंकर फरक पडतो.

अहो नाही फरक पडत. कारण म्हाताऱ्यांची संख्या प्रचंड कमी राहिलेली असते. ८५ च्या वरच्या स्लॅबमध्ये जेमतेम दोनतीन टक्के लोक शिल्लक असतात. मी वर दिलेल्या उदाहरणात ७० च्या बिनची संख्या दीडपट केली (आणि ती १० ते ६० बिन्समधून समसमान प्रमाणात काढली) तरी लाइफ एक्स्पेक्टन्सी २८.३ ऐवजी २९.८ होते फारतर.

असो. आता एकंदरीत मिसिंग द फॉरेस्ट फॉर द ट्रीज चालू झालेलं आहे. तुमचा मूळ युक्तिवाद असा होता, की 'म्हणजे १६ च्या खालच्या पासष्ठ टक्के मुली मरतात की काय? हे अविश्वसनीय वाटतं! तेव्हा हा आकडा चुकीचा असला पाहिजे.' त्याला मी उत्तर दिलं की हो, अगदी लहान वयात खूप मुली मरतात. त्यामुळे तो आकडा खाली येतो. आणि ही चर्चाही कशावर, तर कोणालातरी कुठेतरी २८ आणि ४२ असे आकडे वाचल्याचं आठवतंय त्यावर! तेव्हा डिटेल्स सोडा आणि दोन सर्वसाधारण मुद्दे लक्षात घ्या

१. पूर्वीच्या काळी जे लाइफ एक्स्पेक्टन्सीचे आकडे ३५ च्या आसपास यायचे ते बालपणी आणि तरुणपणी खूप लोकं मरत म्हणून. अप्रगत समाजांत जन्मलेल्या तीनांतलं एक मूल वर्षाभरात मरत असे.
२. स्त्रियांचा लाइफ एक्स्पेक्टन्सीचा आकडा हा पुरुषांच्या आकड्यापेक्षा लहान असण्याचं मुख्य कारण म्हणजे तरुणपणात त्यातल्या अनेक जणी बाळंतपणादरम्यान दगावायच्या किंवा अनेक बाळंतपणं सोसल्यामुळे मरायच्या.

आता यापलिकडे २८, ४२, ३७, वगैरेपैकी कुठचे आकडे अचूक आणि ते किती अचूक, त्यांच्या मोजमापातल्या त्रुटी काय यावर मला भाष्य करण्याची गरज वाटत नाही. मात्र पुढचा तिसरा मुद्दा त्याने खोडला जात नाही.
३. दोन शतकांपूर्वी भारतातच नव्हे, तर बहुतेक जगात लाइफ एक्स्पेक्टन्सी खूप कमी होती - सुमारे ३५ च्या आसपास. आधुनिक वैद्यकीमुळे जगभरच ती आता ६५-७० झालेली आहे.
आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही साफ दुर्लक्ष करत आहात.
४. 'अतिरेकी पुरोगामीता आणि अतिरेकी स्त्रीवाद एकत्र आला कि बेसिक गणित बाजूला राहतं. असो.' असं आक्रस्ताळी, टोचणारं विधान तुम्ही करता आणि तुम्हालाच त्यातलं बेसिक गणित समजलेलं नाही असं दाखवून दिलं की विधान मागे घेण्याचा उदारपणाही दाखवत नाही.

तुमच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी मी जी आकडेवारी तपासली, नीटपणे मांडली, त्यासाठी मी किमान दोन तास तरी घालवले. जर तुमच्याकडून बेजबाबदार विधानंच येणार असतील, तर असे कष्ट घेऊन मी किंवा इतर कोणीही का तुमच्याशी चर्चा करावी? आणि तुमचे आक्षेप गंभीरपणे तरी का घ्यावेत? अशा उगीचच्या उगीच फटकारण्याची वागणुक तुम्ही सतत चालू ठेवलेली असेल, तर तुम्हाला अवांतर, निरर्थक, भडकाऊ अशा श्रेण्या मिळतात यात आश्चर्य वाटण्यासारखं काही आहे का? जरा विचार करा.

अजो१२३ Tue, 12/05/2015 - 23:06

In reply to by राजेश घासकडवी

जर तुमच्याकडून बेजबाबदार विधानंच येणार असतील, तर असे कष्ट घेऊन मी किंवा इतर कोणीही का तुमच्याशी चर्चा करावी?

कृपया मी काय गणितं केलीत आणि मला म्हणायचं काय आहे ते समजून घ्यायची इच्छा ठेवा. तुम्ही मांडलेली गणितं माझ्या आकड्यांशी जुळत नाहीत म्हणजे मी बेजबाबदार इ आहे असं होतं का? मी गणितं केली नाहीत कशावरून? कृपया कृपया (हा दुसरा कृपया चूकून नाही) मला गणिते मेल करा म्हणा.
======================================================================================
आणि अशी सिलेक्टीव उत्तरे नकात देत जाऊ. दंशाशाच्या चौथ्या स्थळाबद्दल एक मुद्दा मांडलाय मी. त्याबद्दल काही? अजून बरेच आहेत. पण माझ्या व्हॅलिड मुद्द्यांचा प्रतिवाद कराल तर. अ‍ॅक्चूअरीअल डेटा आणि सेन्सस डेटा... बरंच काही. आता वर काय काय आहे ते दिसत नाहीये, नैतर लिहिलं असतं. गणित कराल तर दिलेल्या विद्यातून कमीत कमी एल ३८ च्यावर(च) येते. मग ३७ काय आहे?
==========================================================================================
"भयंकर फरक पडतो." हे प्रचंडच मोजून मापून केलेलं गणितीय विधान आहे. कोणत्या वयात किती एले आहे याचे जे वेगवेगळे आकडे आहेत त्यांतली एरर + बायकांची एले अर्धी आहे हे विधान यांचे वर्स्ट काँबिनेशन घेतले तर मागच्या काळी कदाचित बायका जगतच नसत असेही म्हणता यावे. म्हणून भयंकर.
लेट मी रिपिट अगेन.
१. ८५० : १००० असा प्रारंभीचा सेक्स रेशो.
२. पुरुषांची एले - ४२, स्त्रीयांची -२६, सरासरी ३७
३. वरील प्रमाणे मरायचा पॅटर्न
४. इंफॅन्ट मोर्टेलिटिचे आकडे
५. १ वर्षे, ५ वर्षे आणि १० वर्षे वयावेळेचे एल ए चे आकडे
६. धाग्यावरचे जुन्या काळाबद्दलचे अन्य वाईट आकडे
हे एकत्र ठेवले तर मजेदार गणित तयार होते. तुम्ही ६५% पोरी मारल्या आहेत मी १००% मारून दाखवतो. विश्वास ठेवाल का?

कॅल्यूलेशन मी थोडक्यात केलेले आहे (इथे चिट्कावले नाही). अजून बरेच रिफाइन करता येईल. ते इथे चढवायची माझी इच्छा नसते. वेळखाऊ आहे शिवाय प्रेझेंटेबल बनवायला खूप वेळ जातो.
===========================================================================================

तुमचे आक्षेप गंभीरपणे तरी का घ्यावेत? अशा उगीचच्या उगीच फटकारण्याची वागणुक तुम्ही सतत चालू ठेवलेली असेल, तर तुम्हाला अवांतर, निरर्थक, भडकाऊ अशा श्रेण्या मिळतात यात आश्चर्य वाटण्यासारखं काही आहे का? जरा विचार करा.

एकतर याचा इथे काय संबंध? आणि या श्रेण्या आहेत म्हणजे लोक इथे असे लिहू शकतात. पण माझं म्हणणं आहे लोकांनी मुद्दाम असं वारंवार लिहू नये अशी अधिकृत निती असावी. व्यक्तिगत माझा प्रश्न आहे तो पावेतो संस्थळाने माझे कोणतेही लेखन त्याच्या मर्जीने उडवावे असं माझं मत आहे. माझे सदस्यत्व देखिल अकारण रद्द केले तर मान्य आहे. नियम म्हणून वा शिष्टाचार म्हणून आय अ‍ॅम नॉट सपोज्ड टू स्पॉइल यूवर फन हेअर.
आणि जे शिष्टसंमत आहे, सर्वश्रुत, सर्वमान्य, सर्वश्रवणीय आहे त्याच्या पलिकडे जाऊन कोणत्या विषयावर सुज्ञ लोक कसा विचार करतात हे चाचपायला काय हरकत आहे? इंतरांना आलेखणे शिष्टसंमत नाही हे मान्य, पण हे संभव (दावा नाही बरं) आहे कि मी तुमच्याही पलिकडचा पुरोगामी, नास्तिक आणि आकडेवादी आहे. पण माझी शैली प्रचंड वेगळी असू शकते.

"आणि तुम्हालाच त्यातलं बेसिक गणित समजलेलं नाही असं दाखवून दिलं की विधान मागे घेण्याचा उदारपणाही दाखवत नाही."

हे अजिबात खरं नाही. ही गणितं अवघड आहेत हे मान्य पण अजून मला माझी चूक दिसलेली नाही. अपरिमेय नावाच्या प्राण्याने डबल कोइन्सिडेन्स इन ई = एम सी स्क्वेर मधे माझा १९७१ केलेला. मी उदारपणा दाखवलेला. रोजच कितीतरी लोक माझ्या बर्‍याच चूका काढतात, त्या मला मान्यच असतात. व्हाय डू हॅव माय इमेज अ‍ॅज अ स्टबर्न मॅन?
संवादामधे आदर असला पाहिजे. आणि मला आपल्याबद्दल नितांत आहे. इतर काही जणांशी लिहिताना क्वचितप्रसंगी माझा तोल ढळलेला असतो, पण कमॉन आय अ‍ॅम नॉट बुद्धा. तो देखिल क्षणिकच असतो. वास्तविक असा तोल ढळू न देणं १००% माझ्या हातात आहे. बट आय वॉन्ट टू बी मोअर दॅन अ पोलिटिकली करेक्ट इंटरनेट आयडी.

अजो१२३ Tue, 12/05/2015 - 20:03

In reply to by राजेश घासकडवी

आदीम काळात सुमारे ४४ ते ६० टक्के मुलं वयाच्या पाचव्या वर्षाच्या आत दगावायची असा अंदाज बांधलेला आहे.

आदिम काळाचं जाऊ द्या, आजच कोणत्याही प्राण्याची (मॅमलची) किती टक्के मुलं वयाच्या पाचव्या (प्राण्याचा लाईफ स्पॅन/ माणसाचा लाईफ स्पॅन * ५) आत मरतात याचं स्टॅटिस्टिक पाहिलं आहे का? Most mammals fare much better than human beings of new times in survival rate of the litter!!! माणसाचीच लेकरं जास्त का मरतात या संशोधन चालू आहे. Now, what makes you think that this only on biological account and not on the lifestyle account? म्हणून आदिम काळाबद्दलचा अंदाज पूर्णतः गंडलेला असू शकतो. कारण तेव्हा ते जस्ट एक मॅमल असतील.

राजेश घासकडवी Tue, 12/05/2015 - 21:13

In reply to by अजो१२३

Most mammals fare much better than human beings of new times in survival rate of the litter!!!

अहो, अशी विधानं, तर्क वगैरे भिरकावून देण्याआधी जरा गूगलून पाहा की हो. सर्वच मामलांचा पहिल्या वर्षांत पोरं मरण्याचा कॉमन प्रॉब्लेम आहे. तीस चाळीस टक्के तर सगळ्यांचीच पोरं मरतात. संदर्भ.

Table 3: Selected life table parameters for groups of animals.
Number of animals (per 1,000 births) surviving to different ages
1 week 1 year 2 years 5 years 10 years 15 years 20 years 25 years
Apes
837 747 727 700 657 602 552 473
Small Primates
715 614 574 475 340 234 152
Carnivores
713 568 534 480 384 211 64
Hoofstock
862 732 672 577 431 295 180
Kangaroos
936 762 666 485 267
Crocodilians
975 836 751 634 542 470 399 314
Ratites
870 525 463 382 270 205 144 94
Raptors
778 689 663 590 471 393 353 315

काव्या Tue, 12/05/2015 - 23:40

In reply to by राजेश घासकडवी

पण राघा, "Number of animals (per 1,000 births) surviving to different ages" आहे ते
.
म्हणजे Apes ची १००० मधील ८३७ पिल्ले पहील्या वर्षापर्यंत सर्व्हाइव्ह होतात. =>८३.७ पहील्या वर्षापर्यंत सर्व्हाइव्ह होतात => १६.३% मरतात
Small Primates ची २८.५% मरतात
Carnivores ची २८.५% मरतात
Hoofstock ची १३.५% मरतात
Kangaroo ची ६.४% मरतात
Crocodilians ची २.५% मरतात
Ratites ची १३% मरतात
Raptors ची २२.२% मरतात
.
मग तुमचा ३०% ते ४०% पोरं सर्वांची मरतात हा निष्कर्ष चूकीचा नाही काय?

अजो१२३ Tue, 12/05/2015 - 23:45

In reply to by काव्या

आय वान्ट दॅट इट इज फर्दर अ‍ॅडजस्टेड फॉर मॅक्स लाईफ स्पॅन फॉर इच स्पेसिस विसेविस मॅन.
म्हणजे एप २५ वर्षेच जगत असला तर माणसाची १ वर्ष आणि एपचे ४ वर्ष नंतर काय होते ते तोलावे.

काव्या Wed, 13/05/2015 - 00:57

In reply to by अजो१२३

म्हणजे Apes ची १००० मधील ८३७ पिल्ले पहील्या वर्षापर्यंत सर्व्हाइव्ह होतात. =>७४.७ पहील्या वर्षापर्यंत सर्व्हाइव्ह होतात => २५.३% मरतात
Small Primates ची ३८.६% मरतात
Carnivores ची ४३.२% मरतात
Hoofstock ची २६.८% मरतात
Kangaroo ची २३.८% मरतात
Crocodilians ची १६.४% मरतात
Ratites ची ४७.५% मरतात
Raptors ची ३१.१% मरतात
.

हेच वेगळ्या शब्दात .......
माकडांची पिल्ले
पहील्या आठवड्यात ८३.७% वाचली => १६.३% गचकली
१ वर्षात, ७४.७% वाचली => २५.३% गचकली...... त्यात वरचे १६.३ आले म्हणजे (२५.३-१६.३) = ९% फक्त २रा आठवडा ते १ वर्षात गचकली.
२ वर्षात ७२.७% वाचली => २७.३ गचकली ...... त्यात वरचे २५.३% आले म्हणजे (२७.३-२५.३) = २% पिल्ले फक्त दुसर्‍या वर्षी गचकलीत
५ वर्षानंतर ७०% वाचली => ३०% गचकली ...... त्यात वरचे २७.३% आले म्हणजे (३०-२७.३) = २.७% पिल्ले फक्त ३,४,५ या वर्षात गचकली. म्हणजे प्रत्येक वर्षी - ०.९%
गचकतायत
१० व्या वर्षी ६५.७% वाचली => ३४.३ गचकली. त्यात वरचे ३०% आले म्हणजे (३४.४-३०)=०.४% फक्त ६,७,८,९,१० व्या वर्षी गचकली. म्हणजे प्रत्येक वर्षी - ०.०८% गचकतायत
.
so on & so forth
निष्कर्ष- गचकण्याचा दर प्रतिवर्षी वेगाने कमी कमी होत जातो. पहील्या वर्षात मृत्युदर तुलनात्मक रीत्या फार आहे.................राघांचे बरोबर वाटते आहे.

राजेश घासकडवी Wed, 13/05/2015 - 00:43

In reply to by काव्या

अहो ताई, तुम्ही पहिल्या आठवड्याचे आकडे वापरता आहात! दुसऱ्या कॉलममध्ये १ वर्षानंतरचे आकडे आहेत, ते वापरा म्हणजे योग्य निष्कर्ष काढता येईल.

अजो१२३ Wed, 13/05/2015 - 01:23

In reply to by काव्या

Apes
837 747 727 700 657 602 552 473
Carnivores
713 568 534 480 384 211 64
Hoofstock
862 732 672 577 431 295 180
Kangaroos
936 762 666 485 267

केवळ मांसाहारी प्राणी सोडले मँमल्स वर्षांत २५% मरतात असे म्हणता येईल.
मांसाहारी तस्सेही १०-१५ वर्षांत गचकतात. म्हणून १ वर्षे हा स्पॅन त्यांना बराच मोठा आहे.

अजो१२३ Wed, 13/05/2015 - 00:53

In reply to by राजेश घासकडवी

बट स्टील एप्स आणि प्रायमेट्स फेअर बेटर दॅन ह्यूमन्स. दॅट इज कूल. विदाउट अ‍ॅडजस्टमेंट फॉर लाईफ स्पॅन. इवन कूलर.

काव्या Wed, 13/05/2015 - 01:10

In reply to by अजो१२३

विदाउट अ‍ॅडजस्टमेंट फॉर लाईफ स्पॅन. इवन कूलर.

हे वाक्य पटले नाही. जर पहील्या वर्षात माकडांची पिल्ले ३२% मरतायत म्हणजे जर माकडाचे १ वर्ष्=माणसाची ४ वर्षे धरली तर, ....... माणसाच्या आयुर्मानानुसार पहील्या ४ वर्षात ३२% मरतायत. तर पहील्या वर्षी अजुनी जास्त मरत असणार मे बी ४०% धरा.

मग त्यात कूलर काय आहे? :( मला नाही कळलं.

अजो१२३ Wed, 13/05/2015 - 01:49

In reply to by काव्या

सोपं आहे ताई.
माणूस चांगल्यापैकी सर्वाइव झाला तर १०० वर्षे जगतो.
मांसाहारी प्राणी तेच २० वर्षे जगतो.
याबाबतीत या दोन वेगळ्या प्रजाति आहेत हे विसरता कामा नये.
म्हणजे बाकी काहीही असो, सुरुवातीला दोन्ही प्रत्येकी १०० सजीव घेतले, तर मांसाहारी प्राणी पाचपट फास्ट मरतील.
मग किती % जीव मरताहेत हे पाहताना काळ अ‍ॅडजस्ट नको का करायला?
माणसाच्या बाळाने १ वर्षे जगणे ही अचिवमेंट असेल तर त्याची इक्विवॅलेंट अचिवमेंट छाव्याची काय? अर्थातच १/५ वर्षे जगून दाखवणे. (जसे कोणी वृद्ध १०० वर्षे जगला आणि सिंह २० वर्षे जगला तर ते समान एलिट क्लब मधे येतील.)
निसर्गाचे चक्र सिंहाना पाच पट फास्ट मारत असताना दोंहोंचे किती % उरले हे "तेवढ्याच काळात मोजणे" चूक नाही का?
------------------------------------------------------------
या टेबलमधे नॉन- मॅमल काढले आणि टेबल असा लाइफ स्पॅनसाठी अ‍ॅडजस्ट केला तर लक्षात येईल कि हे सस्तन प्राणी माणसापेक्षा खूपच बेटर ऑफ आहेत.
आता जर माणसाला प्रत्येकच काळात या प्राण्यांपेक्षा अधिक सुविधा, सुरक्षितता उपलब्ध असतील तर ... तर ... माणसे नक्की जगायची याबद्दल मांडलेले अंदाज वा केलेली मोजमापे चूक असू शकतात म्हणण्यात वावगे काय?

अजो१२३ Wed, 13/05/2015 - 01:15

In reply to by राजेश घासकडवी

Crocodilians
975 836 751 634 542 470 399 314
Ratites
870 525 463 382 270 205 144 94
Raptors
778 689 663 590 471 393 353 315

मी सस्तन प्राणी म्हटलं होतं. उद्या जीवाणू, विषाणूंचे दाखले देऊन माझं बोलणं खोटं पाडणार कि काय? आणि जेवढ्या काही सस्तन प्राण्यांचा अभ्यास झाला आहे त्यावर मी केलेले विधान खरे आहे.

राही Tue, 27/01/2015 - 19:12

In reply to by अजो१२३

निदान लग्नाच्या वेळी तरी साधारणपणे वराचे वय वधूच्या वयाच्या दुपटीच्या जवळपास असे. मुलीचे लग्न ती वयात येण्याआधी व्हायलाच हवे असे. नाही झाले तर तो कुळाला कलंक असे. नऊव्या-दहाव्या वर्षी म्हणजे मुलगी उफाड्याची दिसू लागण्याआधी तिचे लग्न करीत असत. या वेळी वर साधारण सोळा सतरा वर्षांचा असे. दुसरे-तिसरे लग्न करायचे झाल्यासही मुलीच्या वयाच्या बाबतीत हाच दंडक असे. वर कितीही मोठा,म्हातारा असला तरी चालेल पण मुलगी मात्र कोवळीच हवी ही जनरीत होती.
भारताच्या बाबतीत विकीवर आकडेवारी फार कमी आहे. त्यातून शंभर वर्षांपूर्वीची आकडेवारी तर नाहीच. पण काही वर्षांपूर्वी स्त्रियांच्या आरोग्यासंबंधी काही काम करताना काही आकडेवारी मिळाली होती. त्याचे संदर्भ आता माझ्याकडे नाहीत. शिवाय इतकी वर्षे सामाजिक विषयांवर काही थोडेफार वाचन झालेले आहे, त्यामध्ये हे आकडे नजरेत आले आणि डोक्यात राहिले इतकेच सध्या म्हणू शकेन.

अजो१२३ Tue, 27/01/2015 - 19:16

In reply to by राही

निदान लग्नाच्या वेळी तरी साधारणपणे वराचे वय वधूच्या वयाच्या दुपटीच्या जवळपास असे.

There is no reason why this statement should be accepted as truth. But even if it is accepted, the multiple of age at the time of early marriage and the multiple of overall society cannot be the same. It is very basic mathematics.

अजो१२३ Tue, 27/01/2015 - 19:52

In reply to by अजो१२३

There is a pattern of variations in the life expectancy at various age levels. But would not matter if we have society with same average life of men and women.
Now, on an average, a man at the age of 16, who is going to die after 26 years; marrying a girl of 10 who is going to die after 13 years...
----------------
And this was not enough, as I responded to Gavi-
To compound the matter, in such case for 85% of the population the girl will die after 4 years of marriage and the boy will live as a widower for 16 years before he perishes.
------------------------
I wonder how come the same set of people believe that various species have survived on this planet for 360 crore years with zero humanity in them.

अरविंद कोल्हटकर Mon, 11/05/2015 - 23:27

In reply to by अजो१२३

१९व्या शतकातील वधूवरांची लग्नाच्या वेळची वये काय असावीत ह्याची चांगली कल्पना पुढील जुन्या छायाचित्रावरून येते. येथे वर २५-२६चा आणि वधू १३-१४ची असावी असे वाटते. कुटुंब सुशिक्षित आणि चांगलेच सुखवस्तु असावे असा तर्क करता येतो. वराचा उपरणे आणि अंगरखा असा पोशाख आणि चष्मा, पुणेरी पगडी आणि जोडे, करवतकाठी धोतर, तसेच वधूचे जुन्या धर्तीचे दागिने, चापूनचोपून बसविलेले केस, ठळठळीत कुंकू, अंगावरचा नऊवारी शालू आणि शेला, अनवाणी पाय लक्ष वेधून घेतात.

राही Tue, 12/05/2015 - 00:59

In reply to by अरविंद कोल्हटकर

फोटोतली मुलगी लहान म्हणजे वयात न आलेली वाटते.(नऊ-दहा वर्षांची.) त्या काळातली पद्धतही वयात येण्यापूर्वीच मुलींना उजवून टाकण्याची होती, त्यानुसारच हा फोटो वाटतो. वराला चष्मा लागला आहे म्हणजे नक्कीच त्याने उच्च शिक्षण घेतले आहे.चेहर्‍यावरही थोडा पोक्तपणा वाटतो. चांगला धट्टाकट्टा. त्या काळच्या खुर्च्या थोड्या उंच असत. तरी पाय पूर्णपणे जमिनीला टेकलेले.वधू जर खुर्चीवर बसली असती तर कशी दिसली असती? पाय अधांतरी लोंबकळले असते का? वर उंच आणि वधू ठेंगणीठुसकी वाटतेय का? की कृश असल्याने उंच वाटतेय? वर बिजवर असावा का? सधन नक्कीच असावा. नाहीतर चष्मा कुठून घ्यायला. पायात जोडाही दिसतोय चांगला मजबूत. मुलगी बिचारी भेदरलेली, डोळे विस्फारलेले. फोटोग्राफरने सांगितले असेल,'आता समोर बघायचे. हलायचे नाही हां' त्याप्रमाणे ती 'सावधान'मध्ये उभी वाटते आज्ञापालन करीत, पदर खोचून. कृश, कपाळपटटी बाहेर त्यामुळे किंवा ठेवणच तशी असेल, डोळ्यांची खोबण आतमध्ये गेलेली, अ‍ॅनेमिक.

adam Tue, 12/05/2015 - 14:20

In reply to by राही

वराला चष्मा लागला आहे म्हणजे नक्कीच त्याने उच्च शिक्षण घेतले आहे

=))
.
आवरा.

त्याकाळी व्ह फ़ा च्या पुढचे शिक्षण म्हणाजे उच्च शिक्षण समजत असतील.

राही Tue, 12/05/2015 - 19:26

In reply to by नितिन थत्ते

विनोदी वाटले तरी ते खरे आहे. व्ह. फा.हाच शिक्षणाचा पूर्णविराम होता बहुतेकांकरता. मराठी सातवी म्हणजे व्ह.फा. आणि इंग्रजी सातवी(?)म्हणजे मॅट्रिक्यूलेट असे होते बहुधा.मराठी पाचवी म्हणजे इंग्रजी पहिली असे बहुतेक.
आणि भारतात वीज आलेली नसताना आणि छापील पुस्तके वाचण्याची आनुवंशिक सवय डोळ्यांना जडलेली नसताना कंदिलाच्या अंधुक प्रकाशात चार बुके वाचल्याने डोळे बिघडण्याची शक्यता जास्त.

अजो१२३ Tue, 12/05/2015 - 15:41

In reply to by अरविंद कोल्हटकर

हा प्रातिनिधिक फोटो आहे असं म्हणायचं असेल तर १९ व्या शतकाच्या सांपत्तिक स्थितीबद्दलही हाच फोटो प्रमाण मानावा.

गवि Tue, 27/01/2015 - 18:10

In reply to by अजो१२३

बायकांचे सरासरी आयुर्मान २३ राहिले आणि पुरुषांचे ४२ राहिले तर मानवता किती वर्षांत नष्ट होईल याचे गणित मांडून बघा.

अहो, ती सरासरी आहे. प्रत्येकजण २३ आणि ४२ वर्षे जगला तर मनुष्यजात नष्ट होईल हे एकवेळ कदाचित ठीकच..

पण असं असू शकतं ना की निवडक काही (उदा. १५%) लोक जास्त जगतच असत पूर्वीही (नशिबाने अथवा मजबूत इम्यून सिस्टीममुळे अथवा तुलनात्मक समृद्धीमुळे म्हणा). अगदी ५०, ६० वर्षेसुद्धा. आणि घरोघरी दहा पोरे जन्मून त्यातली पाच लहानपणी, तीन तरुणपणी अशी मरुन दोन म्हातारी होईस्तो जगली आणि त्यांनी आणखी दहा दहा मुले जन्माला घातली आणि त्यातलीही इफेक्टिव्हली दोनच जगली तर अशी लो लाईफ एक्स्पेक्टन्सी (२३ आणि ४२ वर्षे) सहज असू शकते.

माझ्या स्वतःच्या आयुष्यात आणि नजीकच्या लोकांच्या आयुष्यात किमान एक (आणि काहींबाबत तीन चारही) प्रसंग तरी असा आलाय की वैद्यकीय मदतीशिवाय मृत्यू अटळ होता. पण वैद्यकीय मदतीने सहज जगणे घडले. त्याचे कोणाला खास वाटणारही नाही आजच्या काळात.
पण पूर्वीच्या काळी हे सर्व मृत्यूच घडले असते.

स्त्रियांच्या बाळंतपणात जरासेही जास्त कॉम्प्लिकेशन झाले की मृत्यूच. इनफॅक्ट माझ्या माहितीनुसार (चुभूदेघे) सिझेरियनसदृश शस्त्रक्रियेचा शोध लागला तेव्हाही सुरुवातीचा बराच काळ सिझेरियनची गरज = स्त्रीचा मृत्यू असंच समीकरण होतं. फक्त मूल वाचवण्यासाठी जास्त उपयोग होत होता.

तेव्हा स्त्रीचं आयुर्मान पुरुषापेक्षा कमी असणंही समजणेबल.

अजो१२३ Tue, 27/01/2015 - 18:32

In reply to by गवि

पण असं असू शकतं ना की निवडक काही (उदा. १५%) लोक जास्त जगतच असत पूर्वीही

१५% स्त्रीया ६० वर्षे जगल्या तर सरासरी आयु २३ राहायला बाकीच्या ८५% बायका फक्त १६ वर्षे जगायला हव्यात. भारताचा इतिहास वाचताना बायका अशा दणादण मरत असे जाणवते का?
---------------
शिवाय अजून २% बायका ९० वर्षे जगल्या म्हटले कि बाकी ८३% बायकांचे आयुष्य १४ वर्षे इतके येते. मेलो!!!

अजो१२३ Tue, 12/05/2015 - 19:34

In reply to by अजो१२३

कादंबर्‍या जास्त वाचल्या तर हीच प्रतिमा राहिल जुन्या काळाची.

खाली कोल्हटकरांनी टाकलेला फोटो क्लासिक केस आहे याची.
===============================================================================================
ज्या भटाबामनांत सती द्यायची (यस, लेट मी से द्यायची) प्रथा होती, त्यांच्यात नवर्‍याघरी पोरगी पॉझिटीवली सती जावी (नवर्‍याच्या अर्ध्या वयाची मंजे दुसरं काय होणार?) असे वय निवडणे मंजे ... झाडून कोणालाही बायका आवडत नसाव्यात.
===============================================================================================
शिवाय भारतीय लोकांना आई हा प्रकारच इतिहासात माहित नसावा. जी बाई १८ व्या वर्षी चार लेकरे हळजून खपली तिच्या काय त्या आठवणी?

अनु राव Tue, 27/01/2015 - 15:39

In reply to by राही

म्हणुन तर सहस्त्रचंद्र दर्शन वगैरे ला महत्व होते. कारण हजारात एखादाच पोचायचा ८० वर्षापर्यंत. आता हजारात ५०० पोचतात. ( पुन्हा नोट : आकडे फक्त मुद्दा पटवुन देण्यासाठी आहेत, त्याबद्दल क्षमस्व. चिंजं कदाचित पुराव्यानिशी दाखवुन देवु शकतील की १८२६ साली हजारात १.२५४६ लोक ८० वर्षापर्यंत जगायची आणि सध्या ५०८.५६४८७३२ माणसे ८० वर्षापर्यंत जगतात. )

अनुप ढेरे Tue, 27/01/2015 - 16:31

In reply to by अनु राव

सहस्रचंद्र दर्शन ८१ पूर्ण झाल्यावर (येणार्‍या पहिल्या पौर्णिमेला) करतात. आणि ते हजारात एखादाच तिथपर्यंत जातो म्हणून नाय. ८१ पूर्ण झाल्यावर तुम्ही १००० पौर्णिमा पाहिलेल्या असतात म्हणून.

अनु राव Tue, 27/01/2015 - 16:41

In reply to by अनुप ढेरे

अहो एखाद्या गोष्टीचे महत्व ती कीती अप्रुप आहे ह्यावर असते. १००० मधले ५००, ऐशी वर्ष पार करायला लागल्यावर काय त्यात वैशिष्ठ राहीले. कदाचित आता तो बार १०० वर्षे केला पाहीजे.

अनु राव Tue, 27/01/2015 - 17:31

In reply to by बॅटमॅन

भाव इतकाच होता की पुर्वी ८० वर्षापर्यंत खुप कमी लोक जगायचे आता बरेच जास्त प्रमाण आहे.

अनु राव Tue, 27/01/2015 - 17:41

In reply to by बॅटमॅन

चुक झाली. माफी असावी. नवनविन अक्कल येत आहे, ती तुम्हाला मी नोट टाकायला सुरुवात केलीय त्यावरुन दिसतच असेल. ;)

८० च्या ऐवजी ७३ आकडा निवडला तरी चालेल, मतितार्थ तोच राहील , फक्त घासू गुर्जींकडुन आकडे जगणार्‍यांचे आकडे बदलुन घ्यावे लागतील.

काव्या Wed, 13/05/2015 - 01:21

In reply to by अनुप ढेरे

पण अनुपजी, ८०*१२ = ९७२ अन एक २४ ब्लु मून धरले तरच, ९७२+२४=१००० होतायत. यावरुन असा निष्कर्ष काढता येतो की ८० वर्षात कमीत कमी २४ वेळा ब्लु मून येतात
.
किंवा
.
आता म्हातारा/री गचकायच्या आत १००० चंद्र पाहीले असे गृहीत धरुन सोहोळा उरकून घ्या ;)