नाशिक
(लहान असतना लिहिलेली कविता)
नाव माझ्या गावाचे नाशिक,
आहेत त्याचे खुप रसिक!!!
इतीहास आहे त्यात सहभागी,
सापडत नाही इथे कोणी अभागी!!!
नदी ईथली गोदावरी,
निर्माण झाली जेव्हा शंकरांनी केली जटाधरी!!!!
रामाने पुर्ण केला इथे वनवास,
गुन्हेगार भोगतात इथे कारावास!!!
साजरा करतात महाउत्सव कुंभमेळ्याच्या सणाला,
अशा माझी आहे नशिक मागे पाडील सार्या जगाला!!!!!!!!!
कविता आवडली. अजुन फुलवता आली
कविता आवडली. अजुन फुलवता आली असती. तीन ओळींचा फॉर्मॅट या कवितेसाठी जास्त चांगला ठरेल असं मला वाटतं.
तशा आकारात माझ्या मतानुसार कविता पुन्हा खाली लिहिली आहे.
-गविंजय
नाव माझ्या गावाचे नशिक,
आहेत त्याचे खुप रसिक!!!
राहणी त्यांची खुप बेसिक!!!!
इतीहास आहे त्यात सहभागी,
सापडत नाही इथे कोणी अभागी!!!
गुरखाही इथला रात्री न जागी!!!!
नदी ईथली गोदावरी,
निर्माण झाली जेव्हा शन्करानी केली जटाधरी!!!!
घाटावर बसती अनेक भिकरी!!!!
रामाने पुर्ण केला इथे वनवास,
गुन्हेगार भोगतात इथे करवास!!!
द्राक्षांची इथल्या आहे मजा खास!!!!
साजरा करतात महाउत्सव कुम्भ्मेळ्य्च्या सणाला,
अशा माझी आहे नशिक मागे पाडील सार्या जगाला!!!!!!!!!
जूनमधे इथे कळ लागते ढगाला..!!!!!
छान !
नाशिकच्या आठवणी जाग्या झाल्या. मागच्या कुंभमेळाल्या लावलेली हजेरी, ते त्र्यंब्यकेश्वरचे स्नान, सगळे सगळे आठवून गेले. भर गर्दीत एकांताचा अनुभव आणि वरुन कितीही अपवित्र / घाण वाटलं तरी त्या पाण्यात केलेले भावभक्तीपुर्ण स्नान आणि स्नानानंतर मनात जागलेली पवित्रता ! आहाहा !
यंदाच्या कुंभमेळयालाही नक्की हजेरी लावणार.
नाशिक
लहानपणी "जर शिकला नाहीस तर भिक्षुकी करावी लागेल आयुष्यभर!" असा दम मातापित्याकडून अनेक वेळा खाल्ला होता...
दहा वर्षांचा असताना आत्याच्या निधनानंतर तिचं अस्थीविसर्जन करायला बाबांबरोबर नाशिकला गेलो होतो. तिथे ते घाट आणि त्यावर मोठ्या प्रमाणात चाललेले धार्मिक विधी पाहून न शिकलेले लोकं 'नाशिक'ला येऊन रहातात आणि खरोखरच भिक्षुकी करतात असं वाटलं. त्याची त्या वयात इतकी दहशत खाल्ली की चुपचाप अभ्यास करून 'शिकलो'!
:)
अर्थातच!
अहो, हा समज आताचा नाही, दहा वर्षांचा असतांनाचा बालपणातला आहे!
जसं तुम्ही बालपणी केलेल्या कवितेत बाळगलेले खालील समज चुकीचे आहेत,
नदी ईथली गोदावरी,
निर्माण झाली जेव्हा शन्करानी केली जटाधरी!!!!
रामाने पुर्ण केला इथे वनवास,
तसंच आहे ते!
आता आम्ही आमच्या बालपणीच्या चुकीच्या समजांतून बाहेर पडलो.
तुम्ही?
:)
आम्ची पण कवीता. गोड मानुन घ्यावि !!!!!
नाव आमच्या सायटीचे अक्षरेऐशी
करून टाकू सार्यांची ऐशी की तैशी
दुन्याभरची भुतावळ येथे सहभागी,
सापडत नाही इथे जो नाही अभागी!!!
याडमीण ईथली आदिती,
निर्माण झाली जेव्हा घासकडवीन्नी पिटली छाती!!!
अधून मधून "बरं कायतरी" लिहिल्याचा होतो जरी भास,
भौतेकदा सभासद भोगतात "नाशिक"चा कारावास!!
कीटककृमीचिंतूजंतू येऊन चावती नको त्या भागाला
अशी माझी आहे "ऐशी" मागे पाडील सार्या जगाला!!!!!!!!!
(अतिअवांतर)
घासकडवींनी छाती पिटली तेव्हा याडमीण अदिती निर्माण झाली, हा जालीय इतिहास नवाच की मुसुमामा.
हा इतिहास, की पौराणिक कथा?
नाही म्हणजे, बाबा आदमची बरगडी की काय ती१ कापली तेव्हा हव्वाबाई निर्माण झाली, या बिब्लिकल कथेची एलेमेंटे त्यात आहेत, म्हणून म्हटले.
शिवाय, छाती पिटण्यात नि बुभु:कारातसुद्धा एका प्रकारची व्हेरिसिमिलिट्यूड आढळते, ही बाबदेखील दुर्लक्षणीय नाही. बोला बजरंग बली की जय!
..........
१ समहाउ, ती 'बरगडी' यूफ़ीमिष्टिक असावी, अशी शंका आम्हांस नेहमीच येत राहिलेली आहे. असो.
झूस, घासकडवी, आदम
दिमाग-जिगर-दिल, अनुक्रमे :
झूसाने डोके फोडून त्यातून अथीना उद्भवली
आदमाच्या कमरेतली छोटी फासळी* फाडून काढून हव्वा उद्भवली
घासकडवीनी छाती बडवून अदिति उद्भवली
(कंबर कमनीय करण्याच्या अतातायी उपायांपैकी ही फासळी काढून टाकणे हा एक शल्यचिकित्सकीय उपाय आहे.)
हा शुद्ध हलकटपणा आहे माने.
नव्या कवींना wow मिळत नाही इथे,याचा जाहीर निषेध.
ऐसीसारख्या संस्थळावर होणार्या नवकवींच्या गळ्च्पीचा निषेध.
एक होतकरू नवकवी ह्या नात्याने माझं परखड मत मी मांडतो आहे.
"देश का पेहला लाँग डिस्टन्स कॉलिंग कार्ड- गीत. उन लोगो के लिये, जो ज्यादा बातें करना पसंद करते है."
~जब वी मेट.
कविता वाचून वय? असा प्रतिसाद
कविता वाचून वय? असा प्रतिसाद देणार होतो. इतक्यात हे पाहिले
तेव्हा ठीक.
ऐसीवर स्वागत. मोठेपणी लिहिलेल्या कविता/लेखनही इथे येऊ द्या