'ऐसी'चे अच्छे दिन?
गेला पाडवा 'ऐसी'ला चांगलाच लाभलायसं दिसतंय. 'ऐसी'वर विचित्रनामसंवत्सर सुरू झालंय. एका पंधरवड्यात दोन द्विशतकी धागे, दोन शतकी धागे, शिवाय सुवर्ण आणि अमृतमहोत्सवी धाग्यांची गणतीच नाही. म्हणजे मी केली नाही. काय चाललंय काय? की 'ऐसी'कर खुळावलेत? की त्यांना 'शतकी' आणि 'सुतकी' यातला फरक कळेनासा झालाय?
असो. अच्छे दिन आले म्हणायचे.
(लिहिलंय. आणि चार ओळींपेक्षा जास्त लिहिलंय. कायदेशीर आहे. आवाज नाय पायजे.)
वैशाखी वासंतिक समय शोभला, धागे/प्रतिसादांना बहर तो आला, प्रतिसादांस ऐसीगण पळत सूटला..
या धाग्यात तरी
या धाग्यात तरी राखलेय सामाजिक भान. कसे ते पाहा. मूळ 'वैशाखी वासंतिक'ची शेवटची ओळ 'दक्षिणेस भिक्षुकगण पळत सूटला' अशी आहे. येथे खुबीने धंदेवाचक शब्द वगळून टाकला आहे आणि सामाजिक समतोल राखला आहे. शिवाय 'ऐसीगणा'च्या पळत सूटण्यातून त्यांचे आरोग्यविषयक भान दाखवले आहे, जे 'तंदुरुस्त भारत'शी म्हणजे चालू काळाशी आणि समाजाशी सुसंगत आहे.
आफ्ताबे मौसिकी
आफ्ताबे मौसिकी(अल्लादिया खाँ) आहेत तर माहताब ऐसी की सुद्धा असू दे म्हणून केवळ. शिवाय त्यांच्याकडे चंद्रांचा खूप साठा आहे. खरं म्हणजे त्यांना 'चंद्रराव' हा किताब शोभला असता पण जावळीच्या मोर्यांनी महाराजांशी दगाबाजी केली म्हणून तो दिला नाही.
ता. क. स्वतःच्या धाग्यावर इतके प्रतिसाद दिले जाण्याचे घोर पातक घडते आहे, पण या पापाचे धनी निव्वळ अनुराव आहेत हे लक्ष्यात यावे. त्यांच्या या चिथावणीखोरपणाबद्दल संपादक काय अॅक्शन घेणार आहेत?
बर्फी की पेढे अं
बर्फी की पेढे अं ;)