Skip to main content

'ऐसी'चे अच्छे दिन?

गेला पाडवा 'ऐसी'ला चांगलाच लाभलायसं दिसतंय. 'ऐसी'वर विचित्रनामसंवत्सर सुरू झालंय. एका पंधरवड्यात दोन द्विशतकी धागे, दोन शतकी धागे, शिवाय सुवर्ण आणि अमृतमहोत्सवी धाग्यांची गणतीच नाही. म्हणजे मी केली नाही. काय चाललंय काय? की 'ऐसी'कर खुळावलेत? की त्यांना 'शतकी' आणि 'सुतकी' यातला फरक कळेनासा झालाय?
असो. अच्छे दिन आले म्हणायचे.
(लिहिलंय. आणि चार ओळींपेक्षा जास्त लिहिलंय. कायदेशीर आहे. आवाज नाय पायजे.)
वैशाखी वासंतिक समय शोभला, धागे/प्रतिसादांना बहर तो आला, प्रतिसादांस ऐसीगण पळत सूटला..

अनुप ढेरे Tue, 26/04/2016 - 12:29

एका पंधरवड्यात दोन द्विशतकी धागे, दोन शतकी धागे, शिवाय सुवर्ण आणि अमृतमहोत्सवी धाग्यांची गणतीच नाही.

ह्हूं! काय उपयोग याचा? सामाजिक भान कुठाय यात???

राही Tue, 26/04/2016 - 13:51

In reply to by अनुप ढेरे

या धाग्यात तरी राखलेय सामाजिक भान. कसे ते पाहा. मूळ 'वैशाखी वासंतिक'ची शेवटची ओळ 'दक्षिणेस भिक्षुकगण पळत सूटला' अशी आहे. येथे खुबीने धंदेवाचक शब्द वगळून टाकला आहे आणि सामाजिक समतोल राखला आहे. शिवाय 'ऐसीगणा'च्या पळत सूटण्यातून त्यांचे आरोग्यविषयक भान दाखवले आहे, जे 'तंदुरुस्त भारत'शी म्हणजे चालू काळाशी आणि समाजाशी सुसंगत आहे.

ऋषिकेश Tue, 26/04/2016 - 13:24

बहुदा साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाल्यावर ऐसीची छाती ५६ इंची झाली असेल
मग काय दिन अच्छे होणं ओघाने आलंच ;)

राही Tue, 26/04/2016 - 14:16

In reply to by अभ्या..

मला एकदम झाडीपट्टी वाटलं. म्हटलं, 'झालाच पाहिजे' वगैरे आलं की काय इथे.
आणि तसंही (मराठी)संस्थळमालकांचं आणि म्येंब्रांचं मूळ आणि कूळ शोधू नये म्हणतात. तरीही फ्यामिली ट्री काढलीच कुणी तर गोत्र एकच सापडतं म्हणे.

नंदन Wed, 27/04/2016 - 10:01

In reply to by राही

हे वाचून, चिंजं "अनु माने ना, अनु माने ना" म्हणत नेति नेति नेटिझनावस्थेला पोचले आहेत; असं दृश्य डोळ्यांसमोर तरळून अंहळलो! ;)

(माहताब = फारसीत चांदणं)

राही Wed, 27/04/2016 - 10:59

In reply to by नंदन

आफ्ताबे मौसिकी(अल्लादिया खाँ) आहेत तर माहताब ऐसी की सुद्धा असू दे म्हणून केवळ. शिवाय त्यांच्याकडे चंद्रांचा खूप साठा आहे. खरं म्हणजे त्यांना 'चंद्रराव' हा किताब शोभला असता पण जावळीच्या मोर्‍यांनी महाराजांशी दगाबाजी केली म्हणून तो दिला नाही.
ता. क. स्वतःच्या धाग्यावर इतके प्रतिसाद दिले जाण्याचे घोर पातक घडते आहे, पण या पापाचे धनी निव्वळ अनुराव आहेत हे लक्ष्यात यावे. त्यांच्या या चिथावणीखोरपणाबद्दल संपादक काय अ‍ॅक्शन घेणार आहेत?

राजेश घासकडवी Tue, 26/04/2016 - 16:23

बाकीचं सगळं जाऊदेत, चक्क राही यांचं नाव बोर्डावर दिसलं! प्रतिसादांच्या भाऊगर्दीत उभं राहाणं सोडून त्यांनी लोकांच्या 'तुम्हीपण बोला ना, बोला ना, प्लीज प्लीज' अशा विनंत्यांना मान देऊन स्टेजवर चढून हातात माइक घेतला! ऐसीचे खरंच अच्छे दिन आले म्हणायचे!

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 27/04/2016 - 23:25

गजेंद्र चौहानमुळे ऐसीला जेवढी बरकत आली नाही, तेवढी बरकत नक्की कशामुळे आली की राही यांनी धागा काढला आणि प्रतिसादांस ऐसीगण पळत सूटला?

राही Thu, 28/04/2016 - 00:00

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कौन हैं ये बरकत के गुनहगार?
(आधी पन्नास वर्षे गुन्हेगार शोधून झाल्यावर मग तो सद्गुन्हा कसा होता ते सांगण्याची प्रथा रूढ करणार्‍या सदानंद मोरे यांची क्षमा मागून.)