खादी कॅलेंडर वर मोदींचा फोटो लावल्यावर , जर गांधीजी हयात असते, तर त्यांची प्रतिक्रिया काय असती?
विक्री वाढली म्हणून बेगडीपणा
विक्री वाढली म्हणून बेगडीपणा वाटला नाही, असं म्हणण्यासाठी पुरेसा काळ गेला आहे का? पुढच्या वर्षी या सुमारास हे आकडे असेच किंवा यापेक्षा अधिक फुललेले (फुगलेले नव्हे) असतील तर तसं एकवेळ म्हणता येईल. किंवा लॅक्मे फॅशन शोमध्ये कोणा डिझायनरनं खादी वापरली; एखाद्या सिनेमात कोणी खादीचे ग्लॅमरस कपडे वापरले; आणि दुसऱ्या टोकाला फॅशन स्ट्रीटवर स्वस्त-मस्त खादी किंवा तिची बनावट रूपं* (जशी गुच्ची किंवा डी&जीची दिसतात) दिसली तर त्याला मोदी-परिणामकारता म्हणता येईल. गांधींनी तसा फरक घडवला. एरवी फॅशनी येत-जात राहतात. >>>>>>>>>>>>>>>>>>>> गांधी बेगडी होते पण त्याकाळचे लोक सज्जन होते, प्रभवनशील होते . मोदी सच्चे आहेत पण तुमच्या सारखे सगळे लोक अप्रभावनशील आहेत. त्यांना प्रत्येकच गोष्ट बेगडी वाटते . शिवाय केजरीवालांचे भक्त मोदींचे बरेच कार्टून बनवतात म्हणजे काही फक्त कार्टून आहेत नि परिणाम नाहीत असे होत नाही .
ओके. उदा. गान्धीन्चा नि
ओके. उदा. गान्धीन्चा नि अहिंसेचा काही सबन्ध नव्हता.
http://www.holybooks.com/wp-content/uploads/M.-K.-Gandhi-An-Autobiograp… या पुस्तकात त्यांनी कितीदातरी भारतीय लोकाण्ची शस्त्रे काढणे हे ब्रिटिशाण्चे भारातातले सर्वात काळे काम आहे असे म्हटले आहे.
===========
दुसरीकडे ते त्यान्च्या सुरक्षा रक्षकाला बण्दूक बाहेर ठेव म्हणत.
============
तिसरीकडे तुम्ही गुजराती (मोदीवाल्या) / मारवाडी / जैन लोक जे आजही (२०१७ मधे) डास , मुंग्या, चिलटे, किडे मरू नयेत म्हणून पैसे खर्च्तात, नि कित्ती कष्ट घेतात ते पाहायला पाहिजे.
बकवास
कुणाला कशाचं आणि भुक्तांना गांधींचं! मोदींनी कुठला कायदा मोडला असल्यास बोला, नपेक्षा हे टीकेचे सूत नेहमीप्रमाणे कातणे सुरूच आहे. काही विशेष नाही. आजकाल विरोधकांना सांगावं लागतं की बाबांनो तुम्ही या मुद्यावर फोकस केल्यास तुम्हांला तुमचा अजेंडा नीट चालवता येईल. त्यांची विचारक्षमता गंडलीये. (एरवी तरी कुठे धड होती म्हणा, पण ते एक असो.)
http://www.livemint.com/Opini
http://www.livemint.com/Opinion/cJUAzWb3vymN6Xv50vsUlI/Why-Modi-is-upse…
हा लेख एका पुरोगाम्यांचा आहे नि इथल्या पुरोगाम्यांना आवडेल . मात्र मोदींनी चरख्यावर फोटो काढून खाडी ग्रामोद्योग मंत्रालयाला दिलेला नाही. ते न जाणताच इथले पुरोगामी लागले त्याला farce इ म्हणायला . असो.
==========
अनुप , आपण जे म्हणता ना कि भाषण स्वातंत्र्य नाही तर त्याची मक्तेदारी धोक्यात आली आहे ते खरे आहे. चरख्याला अगदी विटाळ झालेला दिसतो मोदींचा !!!
मोदींना नाही आवडलं.
खादी ग्रामोद्योगाची दिनदर्शिका आली १२ जानेवारीला. त्यानंतर पाच दिवसांनी, १७ जानेवारीच्या वृत्तपत्रांत बातमी, मोदींनाच हे आवडलं नाही. पाच दिवसांत, लोकांची प्रतिक्रिया काय असेल, किंवा या दिनदर्शिकेतल्या फोटोंचा राजकीय फायदा होणार का नाही, याची कल्पना येत असावी.
बरोबर आहे. आपला तो
बरोबर आहे. आपला तो बाब्या.
========
त्यांनी हातात घेतलेले काम फिजल्ड आउट? वर राहीने लावलेली इतकी सारी गुडी गुडी विशेषणे?
============
असहकार चळवळ? ती तरी अधिकृतरित्या मागे घेतली ना?
=========
आणि आज पी एम ओ म्हणते कि असा फोटो असेल हे मोदीला माहित नव्हते. मग इथल्या मोदीविरोधी लॉबीचे विधान काय? गांधी मानणारे सोडून सगळे खोटे, स्वार्थी, राजकीय लाभ पाहणारे, मग भलेही ती प्रशासकीय यन्त्रणा देखिल असो!!
========
आम्ही सोडून सगळं खोटं हा एक नवगांधीवाद उपजताना दिसतोय.
ऐसी सारख्या स्थळावर जिथे अधिक
ऐसी सारख्या स्थळावर जिथे अधिक तर लोक मोदी विरोधी किंवा गांधीवादी आहेत तिथे देखिल या प्रश्नाला ७:६ व्हावे हे विचित्र आहे. प्रश्नाचे जे स्वरुप आहे ते गांधीजींचे चरित्रण करणारे आहे. त्यांच्या बद्दल ज्या प्रकारे लोक विचार करतात त्याची अंध गांधीवाद्यांनी नोंद घ्यायला हवी.
प्रातिनिधिक नाही.
फारच थोड्या लोका़ंनी मतदान केले आहे. प्रश्न थोडेसे लोडेड आणि संदिग्ध आहेत. दुसरा प्रश्न सरळ आहे.पण त्या वाक्यात दोन नकार आहेत. त्यांचा(स्वतः गांधींचा) फोटो नाही लावला म्हणून गांधी नाराज झाले असते म्हणजे फोटो लावला तर नाराज झाले नसते. अर्थात स्वतःचा फोटो लावलेला त्यांना आवडला असता. हे विधान मला पटत नाही; या वाक्याला माझे मत 'नाही' असे पडले असते. पंप्रसारख्या प्रसिद्ध व्यक्तीचा फोटो छापून 'पाहा,इतकी प्रसिद्ध व्यक्ती सूत कातते,(म्हणून) तुम्हीही काता" असा संदेश जाणे त्यांना आवडले नसते. यात खादीचे महत्त्व दिसत नाही, चेहर्याचे दिसते,म्हणून पहिल्या प्रश्नाचे उत्तर देतानासुद्धा, कोण्या मोठ्या आणि प्रसिद्ध व्यक्तीच्या करिश्म्याची मदत घेऊन खादीचा प्रसार करावा, ह्री कल्पना गांधींना आवडली नसती हे लक्ष्यात घ्यावे लागेल. तत्कालीन अनेक प्रभावशाली नेत्यांचे सूतकताई करतानाचे फोटो आहेत. पण ते गांधींच्या हयातीत कश्याच्याही प्रचारासाठी वापरले गेले नव्हते. केवळ मोदींचा चेहरा म्हणून त्यांची नाराजगी राहिली असती असे नाही.
म्हणून इतर अनेकांप्रमाणे मीही मतदान केलेले नाही.
ऐसी सारख्या स्थळावर जिथे अधिक
ऐसी सारख्या स्थळावर जिथे अधिक तर लोक मोदी विरोधी किंवा गांधीवादी आहेत तिथे देखिल या प्रश्नाला ७:६ व्हावे हे विचित्र आहे. प्रश्नाचे जे स्वरुप आहे ते गांधीजींचे चरित्रण करणारे आहे. त्यांच्या बद्दल ज्या प्रकारे लोक विचार करतात त्याची अंध गांधीवाद्यांनी नोंद घ्यायला हवी.
पर्शियली करेक्ट.
पण हा पोल थोडासा मोदी अॅपसारखा झालाय, त्यामुळे "त्यातल्यात्यात बरोबर" उत्तर द्यायचं झालं तरी लोकांना २च पर्याय उपलब्ध आहेत. म्हणजे मूळ प्रश्नाला जरा १० उत्तरं दिली असती, तर १३ मतं १० भागांत विभागण्याची शक्याता होती.
पण २च पर्याय असल्याने २ कप्प्यांत मतं विभागलीत. ५०% प्रोबॅबिलिटी! तेव्हा ७:६ हे खरं तर सांख्यिक दृष्टीने बरोबरच आहे.
असं तुम्हाला वाटत नाही का? किंवा असं तुम्हाला का वाटत नाही?
गांधी जिवंत असते तर .. मला वाटतं काँग्रेसच अस्तित्त्वात नसती आणि भारताला काँग्रेसमुक्त करणारा भाजपही. नोटा आणि पुस्तकांत कोणाचे फोटो असले असते हे सांगणं कठीण आहे.
धन्यवाद!
सर्व प्रतिसादकांचे आभार!
लोडेड पर्यायांबद्दलः पर्याय लोडेड आहेत हे खरंच आहे. यात थोडा खोडसाळपणा करायची इच्छा होतीच. पण केवळ दंगा हा धाग्याचा उद्देश नव्हता. खादीचं आणि त्यापुढे गांधीजींचं आजचं महत्त्व काय याबद्दल चर्चा घडवून आणायचादेखील उद्देश होता.
गांधीजींचे अनेक पैलू होते. राजकीय गांधी, सामाजिक गांधी, आर्थिक गांधी असे अनेक गांधी होते. खादी यातल्या कुठल्या गांधींची आहे? खादी उद्योग हे आज खरच महत्त्वाचे आहेत का केवळ गांधीजींची आठवण म्हणून त्यांचं महत्त्व आहे असे प्रश्न पडले म्हणून हा धागा काढला.
सो या वादात दोन गोष्टी दिसतात. एक,खादी हे गांधीजी या व्यक्तीचं चिन्ह आहे. त्याला मोदींनी हायजॅक करणं चूक आहे. हा सद्ध्याच्या आक्षेपाचा सूर दिसतो.
दोन, खादी हे भारतीय उत्पादन आणि पर्यायाने भारतात कामाचं निर्माण याचं चिन्ह आहे. मोदी गेले एक्-दिड वर्ष खादी-खादी करत आहेत. मेक इन इंडियामध्ये खादीचा प्रचार होत आहे. तसं बघायला गेलं तर मूळ खादीचा उद्देश भारतात कापड बनवणं आणि त्यातून कामाचं निर्माण हाच होता. मेबी तेच आता कंटिन्यु करण्याचा प्रयत्न होत आहे असं म्हणता येईल. हे मान्य केलं तर सध्याचा वाद तसा निरर्थक वाटू शकतो. खादीचा नोकरी निर्माण यासाठी वापर करायचा असेल तर बेस्ट पॉसिबल ब्रँड अँबसिडर निवडण्यात काहीच चूक नाही. सद्ध्या असा एंबॅसिडर मोदी आहेत यात दुमत नसावं.
( मोदींच्या परवानगीने फोटो छापला का नाही हे गौण आहे. मेगॅलोमेनिअॅक हे विशेषण मोदींना नक्की लावता येईल. )
>>राजकीय गांधी, सामाजिक
>>राजकीय गांधी, सामाजिक गांधी, आर्थिक गांधी असे अनेक गांधी होते.
यातले सामाजिक गांधी म्हणजे कुठले ते समजले नाही. स्वच्छता, अस्पृश्यता निवारण का?
खादी आणि तिचा प्रसार हे आर्थिक गांधी होते. आर्थिक गांधींच्या अंडर स्वयंपूर्ण खेडे, परिसरातीलच साधन सामुग्रीचा वापर वगैरे गोष्टी येतात. ज्या मोस्टली भारतीयांनी आणि भारत सरकारने बाजूस सारल्या होत्या. कारण खादी वापरणे याला ब्रिटिश मालावर बहिष्कारा*ची जी पार्श्वभूमी होती ती भारतीय व्यक्तींच्या कापड गिरण्या सुरू झाल्यावर नाहीशी झाली होती. तेव्हा खादी एक सिंबॉल म्हणून राहणे आणि २ ऑक्टोबरला चरखा चालवण्याचे रिच्युअल पाळणे इतकेच उरले होते.
*ब्रिटिश मालामुळे बेकार झालेल्या विणकरांना या खादीने काय फायदा झाला असता? त्या विणकरांकडून कापड घेण्याऐवजी स्वत: सूत कातून कापड विणण्याने त्या विणकरांचा गेलेला रोजगार परत मिळतच नव्हता.
अं...
In reply to त्यातला बेगडीपणा सहज समजतो. by अनुप ढेरे
विक्री वाढली म्हणून बेगडीपणा वाटला नाही, असं म्हणण्यासाठी पुरेसा काळ गेला आहे का? पुढच्या वर्षी या सुमारास हे आकडे असेच किंवा यापेक्षा अधिक फुललेले (फुगलेले नव्हे) असतील तर तसं एकवेळ म्हणता येईल. किंवा लॅक्मे फॅशन शोमध्ये कोणा डिझायनरनं खादी वापरली; एखाद्या सिनेमात कोणी खादीचे ग्लॅमरस कपडे वापरले; आणि दुसऱ्या टोकाला फॅशन स्ट्रीटवर स्वस्त-मस्त खादी किंवा तिची बनावट रूपं* (जशी गुच्ची किंवा डी&जीची दिसतात) दिसली तर त्याला मोदी-परिणामकारता म्हणता येईल. गांधींनी तसा फरक घडवला. एरवी फॅशनी येत-जात राहतात.
* पैठणीच्या कापडाचे कुडते आणि शर्टसारखे टॉप अशा गोष्टी आता लोकप्रिय होत आहेत. हे महाग असण्यातच त्याची ब्रँड व्हॅल्यू आहे, म्हणून फॅशन स्ट्रीटवर या गोष्टी दिसणार नाहीत.
मी व्हॉट्सॅप फारसं वापरत नाही आणि मला मोदींचे फोटोशॉप केलेले निरनिराळे फोटो तिथे आले. १४ ऑगस्ट १९४७च्या मध्यरात्री झेंडा फडकवताना, 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया'च्या मुखपृष्ठावर, पारले-जीच्या पुड्यावर, आणि दोन-तीन मला आता आठवत नाहीत. हे बेगडीपणावर केलेले विनोद आहेत. (जसे राहुल गांधींच्या अर्णब गोस्वामीनं घेतलेल्या मुलाखतीनंतरही विनोद फिरायला लागले होते.)
चरखा आणि गांधींबद्दल हेमंत कर्णिकांची ही फेसबुक पोस्ट -
चरख्याविषयी काही बाही
हा इतिहास वाचून पुष्कळ दिवस झाले. त्यामुळे सन, स्थळ यांचे नेमके संदर्भ देता येत नाहीत. पण नेहरू, गांधी, विवेकानंद, वगैरेंबद्दल जे थोतांडं पसरवलं जातं; त्यातलं हे नाही. यात काही खोटंनाटं आढळल्यास ते ताबडतोब माझ्या निदर्शनाला आणावं. इथेच टाकलं तरी हरकत नाही.
देशातला बहुतांश शेतकरी एक पीक काढून झाल्यावर वर्षातला बाकी काळ कामाविना असतो, असं गांधींच्या लक्षात आलं. गांधी जरी पत्रकार होते आणि भरपूर लिहीत असले, तरी 'भाषिक कृती'वर समाधान पावणारे नव्हते. त्यांचा भौतिक कृतीवर जास्त भर होता आणि त्यातही प्रथम स्वतः आचरण करण्याचा त्यांचा आग्रह होता. त्यांनी काही कार्यकर्त्यांना बोलावलं आणि भारतीय शेतकऱ्याला रिकाम्या वेळात करता येण्यासारखा काय उद्योग असू शकेल, याचा शोध घ्यायला सांगितलं. त्यात काही अटी होत्या : उद्योगासाठी लागणारा कच्चा माल देशातच सहजी मिळायला हवा; भांडवली गुंतवणूक कमीत कमी हवी; शेतकऱ्याच्या हाताशी असलेले ऊर्जास्रोत पुरेसे हवेत; एकूण सर्व दृष्टींनी तो उद्योग शेतकऱ्याच्या आवाक्यातला हवा.
कार्यकर्ते कामाला लागले आणि त्यांनी गांधींसमोर पर्याय आणून टाकले. त्या अनेक पर्यायांमधून गांधींनी चरख्याची निवड केली.
म्हणजे, चरख्याची निवड गांधींनी बुद्धीमधून केली. गांधी चरखा चालवत जन्माला आले नव्हते. चरखा चालवण्याची सवय त्यांना लहानपणीच्या संस्कारांमधून लागलेली नव्हती. त्या क्षणी चरखा चालवण्याची फॅशन नव्हती की चरखा चालवणाऱ्याला काही थोर मूल्य येऊन आपसूक येऊन चिकटणार नव्हतं. चरखा गांधी चालवतात, या एकमेव कारणामुळे चरख्याला प्रतिष्ठा मिळाली आणि आजही त्याचमुळे मिळते.
गांधींच्या अपेक्षांना चरखा किती उतरला, यात जाण्याचं कारण नाही. गांधी नावाच्या बनियाला हेसुद्धा लक्षात आलं की चरख्यावर काढलेलं सूत आणि त्या सुतापासून बनणारं कापड अजिबात तलम नसणार. ते कोणी का पैसे देऊन विकत घ्यावं? दुसरं असं की शेतकऱ्याला पूरक कमाई मिळवून देणाऱ्या उत्पादनाची विक्री शेतकरी नसणाऱ्यांना करायला हवी. म्हणजे, खादी शहरात विकायला हवी.
मग त्यांनी दोन गोष्टी केल्या. एक म्हणजे काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी खादी बंधनकारक केली. 'तुम्हाला काँग्रेसच्या स्वातंत्र्यलढ्याचा भाग व्हायचं आहे? स्वतःची तशी ओळख सांगायची आहे? खादी घाला!'
पण एवढं मार्केटिंग पुरेसं न वाटून त्यांनी खादीला ग्लॅमर मिळवून द्यायचा प्रयत्न केला. खादी घालणं म्हणजे एक विशिष्ट स्टाइल स्टेटमेंट करणं होय, असं जनमनावर बिंबवलं. फडक्यांचे नायक फिरतील सुटात; खांडेकरांचे खादीच घालणार! जुन्या b&w चित्रपटातले ध्येयवादी, सामाजिक जाणिवेचे नायक पहा; यच्चयावत सगळे खादीत सापडतील!
अशा रीतीने एक प्रचंड मार्केट खादीला मिळालं. खादीवर सूत कातण्याचे कार्यक्रम होऊ लागले. सत्याग्रहात भाग घेऊन तुरुंगात जाणं सगळ्यांना शक्य नव्हतं, पण चरखा चालवण्याच्या आड कोणी येणार नव्हतं. स्वतःची मानसिकता व्यक्त करण्याचा मार्ग ग्रामीण, शहरी तरुणांना सापडला.
आजच्या जागतिकीकरणाचा बोलबाला असणाऱ्या आधुनिक काळात चरख्याला चिकटून राहावं की गांधींचा प्रॅक्टिकल दृष्टिकोन लक्षात घेऊन वेगळी, आज योग्य ठरेल अशी कृती करावी; हे ज्यानं-त्यानं ठरवायचं आहे.
आजही चरख्याला एक मूल्य मानणं म्हणजे काय, याचं एक उदाहरण सांगतो. आमचे एक स्नेही, त्यांनी वर्षभर सूत कातलं, त्या सुताची साडी विणून घेतली आणि बायकोला पाडव्याला भेट दिली!
याला म्हणतात बांधिलकी.