अमेरिकेत अनेक ठिकाणी मी पाट्या बघितल्या आहेत. विशेषतः प्राणीसंग्रहालयात आणि नॅशनल पार्क्समध्ये. 'प्लीज डू नॉट फीड द ऍनिमल्स'. येलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये अनेक अस्वलं असतात. तिथे 'प्लीज डू नॉट फीड द बेअर्स' अशा पाट्यादेखील दिसतात. हा संदेश का दिलेला असतो असा मला नेहमी प्रश्न पडत असे. प्राण्यांपासून माणसाला धोका असतो म्हणून की माणसापासून प्राण्यांना धोका असतो म्हणून? त्याचं थोडक्यात उत्तर असं की दोन्ही बरोबर आहे. माणसांनी प्राण्यांना खायला घातलं तर त्यांना माणसांकडून खायला मिळेलच अशी अपेक्षा निर्माण होते. त्यामुळे जे लोक त्यांना खायला घालत नाहीत त्यांच्याबाबतीत ते आक्रमक होऊ शकतात. दुसरी गोष्ट अशी की माणसांकडून अन्न मिळण्याची सवय झाली तर त्या रानटी प्राण्यांची स्वतःहून अन्न मिळवण्याची नैसर्गिक ऊर्मी नष्ट होऊ शकते. उन्हाळ्यात टूरिस्टांकडून त्यांना खायला मिळेल, पण हिवाळ्यात, जेव्हा कोणी फिरकत नाही तेव्हा काय?
'कृपया प्राण्यांना खायला घालू नका' या घोषणेप्रमाणेच 'कृपया ट्रोलना खायला घालू नका' ही घोषणाही वाचायला मिळाली. तुम्ही हे वाचून गोंधळात पडला असाल याची मला खात्री आहे. अस्वलं माहीत आहेत, एकंदरीत प्राणी माहीत आहेत, पण ट्रोल म्हणजे काय? हे कुठच्या प्राण्याचं नाव आहे का? त्यांच्यापासून आपल्याला किंवा आपल्यापासून त्यांना काय धोका असतो? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. आपण अगदी मुळापासून सुरूवात करूया.
ट्रोल म्हणजे काय? हा शब्द मुळात आला तो स्कॅंडेनेव्हियन लोककथांमधून. त्यात ट्रोल हे राक्षससदृश असतात. सामान्य मनुष्यापेक्षा कितीतरी प्रचंड आणि शक्तिवान. पण अतिशय कुरुप, आणि अत्यंत मंद. इथे ट्रोलांच्या काल्पनिक प्रतिमा सापडतील. लॉर्ड ऑफ द रिंग्स मध्ये टोल्कीननेदेखील या ट्रोलांचा वापर केलेला आहे.
पण जर ट्रोल्स हे काल्पनिक असतील तर त्यांना खायला घालू नका या घोषणेला काय अर्थ आहे? मृगजळ पिऊ नका असं म्हणण्यासारखंच नाही का ते? सांगतो.
आंतरजालीय परिभाषेत ट्रोल या शब्दाचा थोडा वेगळा अर्थ होतो. इंटरनेट ट्रोल म्हणजे कोणी राक्षसी प्राणी नाही. तर खोडसाळ, भडकाऊ विधानं करणारे आयडी. मराठी संस्थळं आंतरजालावर तशी नवीनच आहेत. पण जुन्या काळपासून युजनेट ग्रुप्स आहेत. तेव्हापासून ट्रोलही आहेत. विकिपीडियावर इंटरनेट ट्रोल वर लेख आहे. अर्बन डिक्शनरी वर असलेल्या आंतरजालीय ट्रोलच्या व्याख्या वाचण्यासारख्या आहेत. मराठी आंतरजालावर जे काही त्यातले नमुने दिसतात ते अशा दिव्य परंपरेतले आहेत. आंतरजालावर अनेक लोक या प्रवृत्तीने ग्रासलेले आहेत. त्यावर मुबलक लिखाणही झालं आहे. अशाच एका लेखाचा आराखडा, त्यातल्या काही कल्पना व माझा अल्प अनुभव घेऊन मी पुढचा लेख प्रश्नोत्तर स्वरूपात लिहितो आहे. तिथे सुरूवातीलाच लिहिलेलं आहे
Before we begin, though, understand this: the best way to deal with a Troll is to ignore them entirely.
१. ट्रोल नक्की कोण असतात? ते काय करतात?
या प्रश्नाचं नेमकं उत्तर देणं कठीण आहे. गुन्हेगार म्हणजे नक्की कोण असतात, व ते काय करतात, या प्रश्नांच्या उत्तरासारखंच. अनेक प्रकारचे गुन्हे असतात - पाकिटमारी, खून, दरोडा आणि सुनेला जाळून मारणं हे जसे गुन्हे आहेत तसेच पैशांची अफरातफर, लाचलुचपत आणि इनसायडर ट्रेडिंग हे पांढरपेशी गुन्हे आहेत. ट्रोलगिरीदेखील अशाच वेगवेगळ्या प्रकारे चालते. वरच्या गुन्ह्यांत गुन्हेगारांकडून इतरांना प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष उपद्रव होतो. ट्रोलांच्या वागणुकीमुळेही प्राथमिक परिणाम होतो तो म्हणजे त्यांच्या प्रतिसाद, टिप्पणी यांतून इतर उचकतात. उचकावणं हा अगदी बरोब्बर शब्द आहे. कारण बहुतेक ट्रोलांचा तोच प्रयत्न असतो.
विकिपीडियावरील इंटरनेट-ट्रोलचं काल्पनिक चित्र.
२. हे लोकांना का उचकावतात? त्यातून त्यांना काय मिळतं?
कोकिळ का गातो? घुबड घूत्कार का करतं? हत्ती सरळ रेषेतच आणि उंट तिरक्या रेषत का चालतो? तो त्यांचा स्वभावधर्मच असतो. तसाच काही लोकांचा इतरांना त्रास देऊन त्यात आनंद मानण्याचा स्वभाव असतो. शाळेतली दांडगट मुलं कशी एखाद्या लहानखुऱ्या मुलाला मारून हसतात, तसंच. पण त्यांना सगळ्यात आनंद मिळतो तो येनकेन प्रकारेण आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यात. वर दिलेले बहुतेक गुन्हे पैशांसाठी होतात. ट्रोलांची वागणूक ही आपल्या स्वतःवर लक्ष खिळवून ठेवणं आणि आपण इतरांना कसं मामा बनवलं, त्रास दिला याचा आनंद उपभोगण्यासाठी होते.
३. ते नक्की कशा कशा प्रकारे उचकावतात?
गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडी जशी वेगवेगळी असते तशीच ट्रोलांचीही असते. विकीमिडियावरचा 'व्हॉट इज अ ट्रोल' लेख
म्हणतो - Some trolls are critical of the project, its policies, its users, its administration, or its goals. Often, this criticism comes in the form of accusations of cabals (कंपू), ilks (जमाती), or campaigns that are typically invested in a particular POV, invested in maligning a specific user, and other similar claims. इतरही काही पद्धती असतात. एक पद्धत म्हणजे अत्यंत गलिच्छ किंवा अपमानास्पद विधानं वारंवार करणं. वाचकांपैकी काही जणांनी गेंड्याची कातडी पांघरलेली असली तरी काही हळवे सदस्य असतात. ते अशा विधानांनी दुखावले जातात. एखाद्या चांगल्या गोष्टीला इतकं वाईट कसं कोणी म्हणू शकतो, ही कल्पनाच त्यांना सहन होत नाही. त्यामुळे ते त्या ट्रोलच्या विधानाचा धिक्कार करतात. किंवा ते चूक कसं आहे ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. यामुळे त्या ट्रोलसाठी अर्थातच काडीचाही फरक पडत नाही. कारण अनेकांच्या मनात आपला धिक्कार करावासा वाटण्याइतपत भावना निर्माण झाल्या यानेच त्यांना समाधान मिळतं. काही हाच प्रकार गलिच्छपणा न करता करतात. निव्वळ पुरेसं धुसर पण सकृद्दर्शनी चुकीचं विधान केलं की झालं. अनेक लोक त्याची चूक दाखवण्यासाठी तुटून पडतात. मग ती चूक कशी नाही हे सिद्ध करण्यात ट्रोल भरपूर टीआरपी खाऊ शकतात. आपल्याला वारंवार असे आयडी दिसतात की मूळ चर्चा, लेख कशाविषयीही असो - हे लोक त्यात शिरले की थोड्याच वेळात ती चर्चा फक्त त्यांच्या स्वतःविषयी रहाते. अनेक लोक त्यांना विरोध करतात. आणि नेहमीची सवय झाल्यावर ती प्रतिक्षिप्त क्रिया होते. तसं झाल्यामुळे त्रयस्थांना 'तो म्हणतो ते अगदीच बरोबर असतं असं नाही, पण खूप लोक त्याने काही लिहिलं की बिचाऱ्यावर तुटून पडतात. हे बरोबर नाही.' अशी सहानुभूतीही त्यांना मिळते. हे खरे कौशल्य असलेले ट्रोल. आपण इतक्या लोकांचा वेगवेगळ्या प्रकारे मामा बनवतो म्हणून स्वतःशी खुदूखुदू हसणारे.
४. ट्रोलांचं व्यक्तिमत्व काय प्रकारचं असतं?
या प्रश्नाला सरळसाधं उत्तर नाही. ट्रोलांचे कंटाळलेले, थापाडे, भांडकुदळ, स्फोटक विधानं करणारे असे अनेक प्रकार आहेत. त्यांच्या विधानांवरून ते यडपट वाटले तरी ते खरोखरच तसे असतीलच असं नाही. पण बऱ्याच ट्रोलना आपल्याकडे लक्ष हवं असतं. आंतरजालावर स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी काहीतरी सुंदर लेखन करण्यापेक्षा कोणालातरी हिणवण्याचा मार्ग सोपा असतो. असा मार्ग निवडणारं व्यक्तिमत्व नक्की काय जातीचं असेल? एकतर आपल्याला चांगलं काही करता येत नाही, किंवा ते चांगलं करण्यासाठी कष्ट घेण्याची तयारी नाही अशी भूमिका घेणाऱ्या व्यक्ती. त्यासाठी आंतरजालावर मिळणाऱ्या बुरख्याचा, निनावीपणाचा गैरफायदा घेणारी व्यक्तिमत्व. त्यातले काही सामान्य जगात यशस्वी नसलेले, मित्रपरिवार कमी असलेले असतात. पण तरीही पुरेसं साधारणीकरण करता येत नाही.
५. मग या प्रकारच्या वर्तणुकीवर उपाय काय?
बिपिन कार्यकर्तेंनी आपल्या एका अत्यंत वाचनीय लेखात शिव्यांविषयी लिहिलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, सर्वात जहाल शिवी कुठची? तर ती म्हणजे 'दुर्लक्ष'. हा सर्वात उत्तम उपाय आहे. आंतरजालावर कोणीतरी काहीतरी भडकाऊ विधानं करतो म्हणून आपण भडकण्यात काही अर्थ नाही. राही ना का ते भडकाऊ विधान तिथे! जितकी भडकाऊ विधानं दुर्लक्षाने मरतील तितकं चांगलं. ऐसी अक्षरे वर प्रतिसादांना श्रेणी देण्याचा फायदा या बाबतीत दिसून येतो. दुर्लक्ष करण्याजोग्या विधानांना कोणीतरी तशी श्रेणी देऊन ठेवली की इतरांना ओळखायला सोपी जातात.
६. ट्रोल कोण नाही?
संस्थळांवर बरीच वर्षं वावर केल्यावर अनेक ट्रोलांचा अनुभव येतो. दुर्दैवाने एखाद्या नवीन सदस्याने केलेलं काहीसं पोरकट विधानही एखाद्या मुरब्बी ट्रोलने केलेल्या विधानासारखं वाटू शकतं. मग त्याला भडकाऊ, अवांतर अशी श्रेणी मिळाली की त्या सदस्याचा विरस होऊ शकतो. त्या बाबतीत सुमारे तीन विधानांची सवलत द्यावी. जर सातत्याने अशी विधानं आली तर त्या आयडीची वागणूक ही ट्रोलसदृश आहे असं समजायला हरकत नाही. मात्र आधी नको.
सारांश काय तर आपल्याला जागोजागी ट्रोल दिसतात. त्यांची विधानं आपल्या डोक्यात जातात. आपल्याला मनस्ताप देतात. त्यावर सोपा उपाय म्हणजे एकतर कोणता आयडी अशी विधानं करतो हे ओळखणं. आपला प्रतिसाद देण्यापूर्वी आपण ट्रोलला हवं तसंच वागतो आहोत का, त्याच्या हातातलं मनोरंजनाचं खेळणं बनतो आहोत का, हा विचार करावा. शक्य तिथे दुर्लक्ष करावं. अत्यंत गलिच्छ वागणुक केली तर व्यवस्थापनाकडे तक्रार करावी. पण 'डोण्ट फीड द ट्रोल' हा संदेश कायम लक्षात ठेवावा.
उपयुक्त
उपयुक्त आणि कायमचं धोरण ठरवणारा लेख आहे. आवडला
मस्त लेख आणि उपयुक्त सल्ला.
ट्रोल्सना खाऊ घालू नये हे खरेच. ट्रोल्सना खाऊ न घालणे जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच ट्रोल्स नसलेल्यांना पुरेसे खाऊ घालणे महत्त्वाचे आहे म्हणजे चांगल्या वागणुकीला बक्षिस दिल्या सारखे होईल.
पण बर्याचदा लोक (यात प्राणिसंग्रहालयाचे व्यवस्थापकही आलेच) फक्त आपल्या आवडीच्याच प्राण्यांना खाऊ घालतात आणि इतरांकडे दुर्लक्ष करतात. :)
सहमत
हे अतिशय महत्त्वाचं आहे. रस्त्यावरून चालताना भरकटू नका म्हणजे रस्त्यावरच रहाल ही एक बाजू झाली. रस्त्यावर आहात तेव्हा योग्य दिशेने झपाट्याने चाला हीही तितकीच महत्त्वाची आहे. प्रतिसादांना श्रेणी देणं, धाग्यांना तारका देणं हे चांगल्या गोष्टींची नोंद घेण्यासाठी उपयुक्त आहे.
दुर्दैवाने हे काही प्रमाणात होतं हे खरं आहे. 'आपण तर बुवा काय लिहिलंय याच्यापेक्षा कोणी लिहिलंय हे बघतो' अशी विधानं वाचलेली आहेत. नियमित लेखन करणाऱ्या लेखकांची एक प्रतिमा निर्माण होते. ती प्रतिमा माहीत असलेल्यांच्या अपेक्षा असतात. त्यामुळे प्रस्थापितांना काहीसं उजवं माप मिळतं. अशा प्रतिमेचा तोटाही असतो. लेखकाने आपल्या प्रतिमेपेक्षा वेगळं काहीतरी लिहिलं तर त्याचे चाहतेसुद्धा पुरेसा प्रतिसाद देत नाहीत हेही पाहिलं आहे.
यह भी समय निकल जायेगा!
यह भी समय निकल जायेगा!
उपयुक्त
अशा ट्रोल्स कडे दुर्लक्ष करण्याचे धोरण असावे हे उपयुक्तच आहे, त्यासाठी शुन्य कर्म्-मुल्य असलेले कोलॅप्सड् प्रतिसाद नक्कीच उपयुक्त ठरतिल.
--------------------------------
***तारांकित ह्या नविन सुविधे-बद्द्ल अॅड्मिनला अनेक धन्यवाद!!!!
-----------------------------------------
ह्याचप्रमाणे, फक्त 'ठराविक'(सदस्याच्या आवडिनुसार + तारांकित + नविन सद्स्य) लेखकांचे धागे दिसावेत अशी सुविधा देखिल उपयुक्त ठरू शकेल.
ग्ग्ग्ग्ग्ग्ग
हम्म्म्म्म..उंहूऊऊ ~बोट दाखवतो~
'Anyone can speak Troll,' said Fred dismissively, 'all you have to do is point and grunt.' -->"Harry Potter and the Goblet of Fire" - J.K. Rowling (2000)
बव्हंशी सहमत.. मात्र...
बव्हंशी करून ट्रोलला खायला घालू नये याच्याशी सहमत
मात्र
१. ट्रोल ही व्यक्ती (इथे आयडी) नसून गुणधर्म मानावा लागेल. आपल्यापैकी कित्येकदा अश्या प्रतिक्रीया लिहु शकतो की ज्यामुळे समोरच्याला उचकवले जाऊ शकते. (निदाम मी असे क्वचित केले आहे).
काहि व्यक्ती विनाकारण उचकतात किंवा काहिं ठराविक विषयावर उचकतातच उचकतात. अश्यावेळी त्यांना उचकवायला मजा येते ;)
२. दुसरे असे की काही 'प्रतिथयश व नियमित' ट्रोल्स हे प्रत्यक्षात अतिशय हुशार असतात. ते आपल्याला (प्रसंगी विनाकारण) उचकवताहेत हे कळत असले तरी त्यांचे मुद्दे कित्येकदा बिनतोड असतात - प्रसंगी माहितीपूर्ण असतात. आणि वा वा चान चान अश्या प्रतिसादांपेक्षा अश्या ट्रॉल्समुळे कित्येकदा रोचक चर्चा झालेल्या आहेत.
तेव्हा कोणत्याही आंतरजालीय व्यवस्थेप्रमाणेच मराठी संस्थळावरही हे ट्रॉल्स नेहमीच दुर्लक्ष करण्यासाठी असावेत असे वाटत नाही
उचाकावानार्याची त्यावेळची वृत्ती महत्वाची
(निदाम मी असे क्वचित केले आहे)............अश्यावेळी त्यांना उचकवायला मजा येते (डोळा मारत)
हेतू फक्त उचाकावाने एवढाच असेल तर काही point नाही राव.
एखाद्यावेळी मजा घेणे आणि समोरच्याची चूक लक्षात यावी हा हेतू असल्यास उचाकावायला पण काही हरकत नसावी. शेवटी उचाकावानार्याची त्यावेळची वृत्ती महत्वाची.
ट्रॉल्स नेहमीच दुर्लक्ष करण्यासाठी असावेत असे वाटत नाही.
सहमत, पण सतत ट्रोलिंग शिवाय दुसरा कुठलाच उद्देश नसल्यास दुर्लक्ष हाच एक उपाय बरा वाटतो.
कठीण आहे
लेख चांगला आहे पण प्रत्यक्षात उतरणे कठीण आहे. कारणांसाठी ऋषिकेशचा प्रतिसाद बघावा.
बर्याचदा ट्रोल्सना फीड करणारेही गंमत बघणार्यांतले असतात. म्हणजे आपण भरवायचे की ट्रोल पुढल्या प्रवाशांवर हल्ला करण्यास मोकळा. असे करणारे थोडेथोडके नसतात. किंबहुना, आंतरजालावरील प्रत्येकजण त्यात समाविष्ट असतो किंवा ट्रोलसदृश वागत असतो असे वाटते.
स्वतःवर नियम लावून घेणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे.
वा
उत्तम लेख गुर्जी.
कंट्रोल लेखपाडवी.
व्याख्या नीट पाहावी
ऋषिकेश म्हणाले:
मला वाटतं की ट्रोलच्या संकल्पनेत विधायक (पण ट्रोलसारख्या उचकवणार्या शैलीतली) टीका बसत नाही. उदाहरणार्थ, विकीपीडिआवरच्या व्याख्येचा संदर्भ देतो (अधोरेखन माझं):
माहितीपूर्ण प्रतिसादात बिनतोड मुद्दे देऊन निव्वळ शैलीमुळे उचकवणारे माझ्या मते यात बसवता येणार नाहीत.
मी अश्या ट्रोल्सबद्दल म्हणतोय
मी अश्या ट्रोल्सबद्दल म्हणतोय ल्यांचे उचकावणे त्या धाग्यावर ऑफ टॉपिक असले तरी रोचक असते. जसे त्याच व्यक्तीचा जुना (अगदी विरुद्ध मताचा) प्रतिसाद उकरून त्याला चिडवणे / डिवचणे ;)
यात ट्रोल मुद्दम उचकवतो आहे - भोचकपना खोडसाळपणा आहे. मात्र तरीही त्यात 'चुक' नाहि. भडकावे की नाहि हे समोरच्याने ठरवावे. असो. अश्यांना तुम्हाला ट्रोलमधे बसवायचे नसेल तर जाऊ दे.. तुमचा धागा आहे तुम्ही मालक आहात वगैरे **(शेवटची दोन वाक्यं ट्रोलिंग गणा!)**
थोडक्यात अंतर्जालावर रहायचं
थोडक्यात अंतर्जालावर रहायचं असेल तर तलवारी, बरचे, घोडा, तोफा बिचवे सगळं भंगारात काढायची.
एक शेळी पाळायची आणि तिचं दूध पिऊन गांधीवादी व्हायचं.
विष भरलेल्या शब्दांवर शर्करावगुंठण करुन लोकांना गंडवण्याची सवय करायची असं म्हणा की! :)
हा प्रतीसाद जरूर वाचावा (Score: -१ कै च्या कै)
राजेश लेख बघीतला तर एक गोश्ट जाणवते ते म्हणजे इथे श्रेणि देणारे सगळे खरे ट्रॉल आहेत. लेखकाला जे सांगायचे आहे ते यांनी लेबल दिल्यामूळे भरकटते. गविंनी स्वतःच संपादीत करून नश्ट केलेल्या लेखाला इथं इतर लोक ४स्टार म्हणून मानांकन देऊ करतात (जो वाचायला लिंक उघडली तर रिकामाच भेटतो रेटिंग मात्र ४स्टार). एखादा विनोद "रोचक" ठरतो तर एखादे सत्य "निरर्थक" बनते. आणि यांना फीड करु नका म्हणजे श्रेणी देणार्यांना उलट उत्तर देऊ नका यांचा नाद करू नका. हे म्हणतील तीच पूर्व दीशा माना असेच म्हणयाचं आहे ना ? खरोखर ट्रॉलबाबत अचूक निरीक्षण आहे.
२०११ मध्ये प्रतिसाद दिला अस
२०११ मध्ये प्रतिसाद दिला असता, तर "सहमत्" हा असता.
पण आता २०१७ मध्ये बहुधा श्रेणी पद्धतच ठेवली नसल्याने, मुळ मुद्दा रद्द झाला असे समजतो.
बाकी मी या लेखाचा उल्लेख मायबोलीवर आल्याने इकडे वाचायला आलो.
मूळ लेख व प्रतिसाद, दोन्हीही वाचनीय आहेत. :)
बाकी, मूळ लेखाखाली पाच स्टार्स वर क्लिक केले असता काहीच होत नाही.
म्हणजे मी काय ते स्टार्स चमकवु शकत नाही असे दिसते... (आता हे वाक्यदेखिल "ट्रोलिंगचा नमुना" म्हणुन घेतले जाऊ शकते... पण तसे नाहीये, माझा मूळ स्वभावच असा आहे... )
फीअर, अन्सर्टन्टी, डाउट वगैरे...
जर असा प्रतिसाद मूळ प्रतिसादकर्त्याची चूक किंवा त्याच्या मतांमधली विसंगती दाखवून देत असेल आणि ही चूक/विसंगती धाग्याच्या विषयाला अनुलक्षून असेल - म्हणजे निव्वळ बुद्धिभेद करणारा किंवा 'फड' पसरवणारा हा प्रतिसाद नसेल (मुद्द्यात तथ्य असेल) तर ते धाग्यावर ऑफ-टॉपिक म्हणता येईल का? अशा प्रतिसादकाला ट्रोल म्हणावं का? मला वाटत नाही. विसंगती ग्राह्य असूनही धाग्यात अवांतर असेल तर बहुधा ट्रोल गणता येईल. भडकावं की नाही हे समोरच्यानं ठरवायचं असतं म्हणून तर 'दुर्लक्ष करा' असं सांगण्याची गरज भासते.
ठीक आहे. तुमच्या इच्छेनुसार तुमच्या प्रतिसादाला भडकाऊ श्रेणी दिली आहे ;-)
ट्रोलपणा
एव्हाना प्रत्येक जण स्वतःकडे आपल्यात काही ट्रोलत्वाचे गुणधर्म आहेत की काय अशा आत्मपरिक्षणाने पहात असेल. आपल्याकडे इतरांचे लक्ष वेधावे यासाठी आपले उपयुक्तता मुल्यापेक्षा उपद्रवमुल्य अधिक सोयीस्कर मानणारे ट्रोल्स असणारच आहे. काही जण इतरांच्यात लावालावी करुन स्वतः नामानिराळे राहतात. सौ चुहे खाके बिल्ली हाज को चली. काही जण सरळ कबुल करतात की आम्ही काय साधुसंत नाही त्यामुळे उचकावणे किंवा उचकणे हा आमचा गुणधर्म आहेच. जेव्हा तुमच्याकडे उपयुक्तता मुल्य नाही व उपद्रवमुल्यही नाही तेव्हा तुमची किंमत शुन्य. तुम्ही अदखलपात्र झालात.
बौद्धिक उन्माद करणारे (सोप्या शब्दात माज करणारे)अनेक विद्वान जेव्हा इतरांकडे तुच्छतेने पाहतात त्यावेळी ते आपला विजय साजरा करत असतात. अधिकार, ताकद आली कि उन्माद हा सोबत येतोच. रस्त्यावरील कुत्र्यांचे अधिकार वा प्रभाव क्षेत्र ठरलेले असते. त्यांचे आपापसात अलिखित संकेत असतात. त्यांच्या कंपुत कधि सामंजस्य तर कधी भांडण असतात. एकदा आमच्याजवळच्या गल्लीत एक नवीन कुत्री आपल्या पिल्लासह आली. गल्लीतील प्रस्थापित कुत्र्यांनी गदारोळ केला. तिला हाकलून देण्याचा प्रयत्न केला पण ही कुत्री अपत्यप्रेमापोटी सगळ्यांना पुरुन उरली. शेवटी इतर कुत्र्यांनी पण तिचे सहअस्तित्व मान्य केल . ती त्यांच्या कंपुत समाविष्ट झाली नाही पण सहअस्तित्वाचा मात्र भाग बनली. आंतरजालावर काही आयडी अशाच स्थिरावतात.
याच्याशी मी अत्यंत सहमत आहे.
http://maazedonpaise.blogspot.in/2010/02/blog-post_25.html इथे बिपिनचा लेख आहे
प्रकाशराव, तुमच्यामुळे या
प्रकाशराव, तुमच्यामुळे या लेखाची लिंक मिळाली, धन्यवाद.
लेख वाचला सर्व प्रतिसादासहित्....
मी सुद्धा वाचला. बरीच माहिती
मी सुद्धा वाचला. बरीच माहिती मिळाली. एकच उपाय आहे हे समजले. 'इग्नोरास्त्र'.
अभ्यासपूर्ण लेख अतिशय आवडला.
अभ्यासपूर्ण लेख अतिशय आवडला. शब्दाने शब्द वाढत जातो. तेव्हा तुम्हीच गप्प राहीलात तर परत शब्द वाढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तेव्हा "दुर्लक्ष" हा उपाय अतिशय उत्तम या मताशी सहमत आहे. पण बरेचदा सज्जन लोक सात्विक संतापाने उठून ढाल मारायला निघतात ज्यामुळे या ट्रोल्स चे फावते हेदेखील खरे आहे. आपण जग बदलू शकत नाही तर आपण आपल्यापुरता कवचात राहू शकतो.
क्लिशे कथा - रस्त्यावर खूप दगड आहेत तुम्ही प्रत्येक दगड दूर करत बसता का? नाही. तुम्ही मजबूत पायताणं घालता. सिंपल.
मज्जा!
आमच्यासारख्या काही विघ्नसंतोषींना ट्रोलच्या असण्यानेच आनंद होतो.
त्या त्या सायटींवरचा वावर विद्वानांबरोबरच सो कॉल्ड ट्रोलमुळेच मजेदार होतो.
उदा. काही उपक्रम. तिथे फारसे ट्रोल नसल्याने आम्ही तिकडे पहातही नाही.
आम्ही बागेत जाणार, माकडांना केळी खाऊ घालणार म्हणजे घालणारच.
(एखादे नाठाळ माकड पटकन हाताला चावले तरी चालेल.)
अवांतर- लेख आवडला. असं काहीतरी धष्टपुष्ट लिहा राव!
आणिक एक प्रतिसाद.
वर दिला होता, तो हा होता-->
अन मी त्या वेळा ट्रॉलिश भाषा बोलत होतो. Pointing & Grunting. -> Anyone can speak Trollish. (घासकडवींनी दिलेल्या लेखातच लिंकमधे हे इंग्रजी वाक्य आहे. हॅपॉ मधील)
सांगण्याचा मुद्दा हा, की प्रत्येकजण अधून मधून ट्रॉलिंग करत असतो. कुणा अती संतापजनक प्राण्याला उलटून त्रास देण्यासाठी, किंवा कधी मूड तसा लागलेला असतो म्हणून. तर कधी आणिक काही कारणास्तव.
कुणावरही शिक्के मारायचं काम एकदा सुरू केलं, की ते शेवटी त्रासदायकच होतं. कुणालाही 'जज' करण्या आधी, कधीच पाप न करणार्यानेच दगड मारावा, हे सूत्र डोक्यात ठेवले तर बरे. :)
जाड कातडी
अगदी बरोबर. हेच ऋषिकेश यांनीदेखील म्हटलेलं आहे. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत टाइमपास चालवला जावा हे कोणालाही मान्य व्हावं. या लेखाचा उद्देश ट्रोल ओळखून त्यांना शिक्के मारणे, वाळीत टाकणे असा नाही. उलट स्वतःची कातडी थोडी जाडजूड करून थोड्या टपल्या गमतीत घ्याव्यात व तापदायक विधानांकडे तीच जाड कातडी वापरून दुर्लक्ष करावं असं सांगण्याचा उद्देश आहे. (प्रतिसादांना श्रेणी बहुतांश बरोबर येतात, काही तितक्या बरोबर नसतात, पण तेही थोडं चालवून घ्यावं.) एकच चुकीची गोष्ट वारंवार झाली तर मात्र काही कृती करावी.
मी मराठी आंतरजालावर नवीन होतो तेव्हा मला इतरांच्या विधानांचा त्रास झाला होता. आता मी तितका करून न घ्यायला शिकलो आहे.
कुणालाही 'जज' करण्या आधी,
अहो पण प्रतिसाद जज करायचा आहे, माणूस किंवा सदस्य नव्हे. असंच असेल तर मग समीक्षक लोकं एका फटक्यात बेरोजगार होतील!
अल्गोरिदम अन ऑटोमेटेड जजमेंट
अल्गोरिदम अन ऑटोमेटेड जजमेंट जर करायचा प्रयत्न केला, तर मानवी संपादकांची 'एथिकल सेन्सिटिव्हिटी' त्यात येत नाही. एकेकट्या प्रतिसादांनी शेवटी आपण त्या आयडीलाच जज करीत आहोत. म्हणजेच व्यक्तीला.
कालच इतरत्र वाचलेल्या एका धाग्यातील हा व्हिडीओ अशाप्रकारच्या ऑटोमॅटिक अल्गोरिदम्स वापरून आज नेट कुठे चालली आहे यावर उद्बोधक ठरावा.
अल्गोरिदम अन ऑटोमेटेड जजमेंट
डबल पोस्ट : प्रकाटाआ
लेखाचा मुद्दा योग्यच आहे पण
लेखाचा मुद्दा योग्यच आहे पण इतर जागी ट्रोलला खाऊ घालून मग स्वतःच्या घरी येऊन असे लेख लिहिणारे अन त्याला दुजोरा देणारे दुटप्पीच नाही का?
ऋषिकेश यांच्याशी सहमत.
+१
सहमत आहे.
ऋषिकेश यांच्याशीही सहमत आहे.
हम्म थोडक्यात बदनाम हुए तो
हम्म
थोडक्यात बदनाम हुए तो क्या हुआ आखिर नाम तो हुआ असा फंडा दिसतोय
आंतरजालावरही दिग्विजयसिँग उमाभारतीचे वंशज दिसतायेत एकंदरीत
लेख मस्तच.
आणि दुसर्या धाग्यातल्या "सर्वात जहाल शिवी म्हणजे दुर्लक्ष" ह्याचा जिवंत अनुभव नुकताच दुसर्या स्थळावर आलाय.
सतत एक महाशय एकहाती एकाच (कंटाळवाण्या,भाकड) विषयावर लिहित सुटलेत, आणि त्यांना थोतांड म्हणणार्या सर्व सदस्यांच्या एकत्रित उत्साहाला पुरून उरलेत, न थकता लिहितच आहेत असे चित्र होते. एकदा त्या महाशयांनी दुसर्याच कुठल्यातरी विषयावर रंजक धागा काढल्याबरोबर इतरांना, विशेषतः कट्टर विरोधकांना कसे चुकल्याचुकल्यासारखे वाटू होते, सगळ्यांनी लागलिच त्यांना थोतांड म्हटल्या जाणार्या विषयाची स्वतःच आठवण करून दिली!!
आणि मग लगेच पुन्हा एकदा थोतांड म्हटल्या जाणार्या विषयावर महाशयांनी तातडीने लिखाण करुन नेहमीचीच ठरलेली लढाइ आठवण करुन देणार्यांसोबत सुरु केली.
म्हणजे ट्रोलिंगसाठी अशी दोन्ही बाजूंची कशी सुंदर परस्पर संमती आहे बघा. झोडायचं तर आहे, लिहिलं नाही तर आठवणही करून द्यायची आहे. आणि आपण्च आठवण करुन दिल्यानंतर लिहिलेल्या धाग्यावर आतडी पिळवटून व घसा फाटेस्तोवर कंठशोषही करायचाय असा स्वभाव दिसतो.
काही जण अशा ट्रोलर्सना उचकवतात हे खरेच.
हे सगळं कसं ओळखीचं वाटत होतं......
१ त्यांच्या प्रतिसाद, टिप्पणी यांतून इतर उचकतात.
२ आपण इतरांना कसं मामा बनवलं,
३ त्रास दिला याचा आनंद म्हणून स्वतःशी खुदूखुदू हसणे.
४ सुंदर लेखन करण्यापेक्षा कोणालातरी हिणवण्याचा मार्ग सोपा.
५ ....
आणि या प्रकाराला ट्रोल म्हणतात हे माहीती नव्हतं .
राजेश घासकडवींच्या लेखामुळे जालसाक्षरता आणखी वाढली .
धन्यवाद.
बिपीनराव, आम्ही तुमच्या लेखनाचा गांभीर्याने विचार केला नाही याबद्दल दिलगिरी.
हाहाहा
=)) =)) =))
हॅ हॅ हॅ...हे आपल्याला भयंकर
हॅ हॅ हॅ...हे आपल्याला भयंकर आवडलं...खरं कै सांगितलं की प्रतिसादाला कैच्या कै श्रेणी देउन टाकायची म्हणजे फिल्टरवाल्यांना(तरी) दिसणार नै..
आता आमच्यासारख्या कैच्या कै, निरर्थक, अवांतर बाकी सगळे प्रतिसाद वाचणार्यांचं काय करणार? श्रेणी देता येत नै ही बाब सोडली तर?
आंतरजालावर कुणाला शिस्त
आंतरजालावर कुणाला शिस्त लावण्याच्या भानगडीत पडू नये. पाणी जसं वाहेल तसं वाहू द्यावं. फक्त वैयक्तिक शिवीगाळ, अश्लीलपणा चालू देवू नये.
ऋषिकेशचा दुसरा मुद्दा महत्वाचा आहे.
लेख आवडला.
विशेषतः फक्त थिअरी मांडण्यापेक्षा तिचा प्रत्यक्षातला उपयोग दाखवून दिल्यामुळे लेख जास्तच आवडला. स्वतःलाच दुर्लक्ष शिवी घालून घ्यायची असल्यास खोडसाळ, निरर्थक प्रतिसाद द्यावेत हे उत्तम.
आपण खोड्या काढायच्या पण आपल्या खोड्या कोणी काढू नयेत ही अवास्तव अपेक्षा अनेकदा दिसते. थोड्या खोड्या आपण काढाव्यात, आपल्या खोड्या काढल्या की त्यावर हसावं हा प्रकार मला मानवण्यातला आहे. विनोदबुद्धीचा अभाव असणार्यांना मानवणार्यातला हा प्रकार नाही, त्यांनी या फंदात पडू नये हे उत्तम.
अवांतरः मी काम करायचे त्यांपैकी एका ठिकाणी टेलिस्कोप बघायला येणार्या लोकांसाठी एका मैत्रिणीने पाटी लावलेली होती, "प्लीज फीड अॅस्ट्रनॉमर्स". टेलिस्कोप बघायला येणारे लोकं आतल्या लोकांकडे संग्रहालयातले प्राणी असल्यासारखेच बघायचे हे वेगळं सांगायची गरज नसावी.
खोड्या
"आपल्या खोड्या काढल्या की त्यावर हसावं हा प्रकार मला मानवण्यातला आहे."
~ देअर यू आर अदिती. ही प्रवृत्ती निव्वळ जालीय विश्वातच नव्हे तर नोकरीच्या ठिकाणीदेखील अत्यंत फलदायी ठरते असा माझा अनुभव सांगतो. वर कुठेतरी 'दुर्लक्ष' रसायनाचा उल्लेख केला आहे, तो प्रकारही याच गटातील असल्याने आपली मानसिकता ढळू न देण्यासाठी दुर्लक्षतेची फांदी धरली तर थोड्याच वेळात सर्व काही आलबेल होऊन जाते. कामेही झटदिशी उरकतात हे मी पाहिले आहे. 'खोड्या' प्रकरण कधीही एकांगी असू नये हेही पटते. पण त्याचबरोबर एक पुस्ती अशीही जोडावीशी वाटते की, एखाद्याने काढलेल्या खोडीवर तुम्हाला प्रतिवाद घालायचा नसेल तर 'मी खुर्दचाही नाही की बुद्रुकचाही नाही' अशा रितीने पाहिले न पाहिलेसे करून पुढचा रस्ता धरावा.
अशोक पाटील
पेशवे पार्क
मला लहानपणी पेशवेपार्कातल्या व्यवस्थापन कचेरीसमोर पाटी पाहिल्याचे आठवते. "आत प्राणी नाहीत. येथे रेंगाळू नये आणि डोकावून बघू नये." अशी काहीशी. (अर्थात, हा पुणेरी विनोद) ;)
ट्रोलिँग सुरु झालय
ट्रोलिँग सुरु झालय
'ट्रोल' ला मराठीत टोळभैरव
'ट्रोल' ला मराठीत टोळभैरव म्हणता येईल का?
उदा.- वाचवा! माझ्या धाग्यावर आज टोळभैरवांची टोळधाड येऊन कोसळली आहे!
नमो नमो
नमो नमो.
ग्रेट थिन्क.ग्रेट थिन्..
संकेतस्थळांवर काही वेळा अशा
संकेतस्थळांवर काही वेळा अशा काही पोस्टी येतात कि मला या लेखाची हमखास आठवण येते. सध्या आठवण झाली ती ऐसि अक्षरे व अभिव्यक्तिस्वातंत्र्य या लेखामुळे
माणसांनी प्राण्यांना खायला
माणसांनी प्राण्यांना खायला घातलं तर त्यांना माणसांकडून खायला मिळेलच अशी अपेक्षा निर्माण होते. त्यामुळे जे लोक त्यांना खायला घालत नाहीत त्यांच्याबाबतीत ते आक्रमक होऊ शकतात. दुसरी गोष्ट अशी की माणसांकडून अन्न मिळण्याची सवय झाली तर त्या रानटी प्राण्यांची स्वतःहून अन्न मिळवण्याची नैसर्गिक ऊर्मी नष्ट होऊ शकते.
मस्त उदाहरण.
हो... सध्या इकडे किमान तीन
हो... सध्या इकडे किमान तीन ट्रोल्स तर नक्कीच फिरत आहेत आणि हा लेख इकडे अगदी सुरुवातीपासून असूनसुद्धा अस्मि, सारिका , न'वी बाजू आणि Nile हिरिरीने प्रतिसाद देताना दिसतायेत.
अर्थात त्यांना किंवा त्यातील निदान काहीजणांना यात मजा येत असेल याची शक्यता नाकारता येत नाही. ;)
संस्थळाचा टी आर पी सध्या बराच वर सुद्धा गेला असेल. नेहमी नको असली तरी मधूनमधून अशी साठमारी बघायला मजा येते.बर्याच दिवसांनी मिपा वर गेल्यासारखं वाटलं आणि वाचायला मजा येतेय!
अय्यो मी कुठे ट्रोलांना फीड
अय्यो मी कुठे ट्रोलांना फीड केलं? एकाला फक्त एकदाच उपप्रतिसाद दिलाय. आणि दुसर्याला उघडे पाडणारे तीन प्रतिसाद दिलेत. प्रत्येक सदस्याला बदलणारी नावे, स्वाक्षरी लक्षात येतील/राहतील असे नाही किँवा खंडन न केल्यास सदस्य नसलेल्यांना काही आरोप खरे वाटू शकतात म्हणुन.
हो तर ... पहिल्या ट्रोल ला
हो तर ... पहिल्या ट्रोल ला २७, दुसर्याला ३४ आणि तिसर्याला ३७ मार्मिक आणि तोंड बंद करायला लावणारे प्रतिसाद दिले की!! ट्रोल फिडींग कुठे केले? ;)
आता (पुन्हा) आमच्या नावाचा ज़िक्र झालाच आहे, तर...
...आम्ही हिरिरीने प्रतिसाद / प्रतिवाद वगैरे काहीही करत नाही. (एस्पियोनाज आणि काउंटरएस्पियोनाजच्या धर्तीवर) फक्त काउंटरट्रोलिंग करतो.
(आणि हो, आम्हाला त्यात मजा येते. खोटे कशाला बोलू?)
पाहिजे तर यास 'टर्फ वॉर' म्हणा. बोले तो, आमच्यासारखा (फ्रेण्डली नेबरहूड) रेसिडेण्ट ट्रोल१ येथे अगोदरच मौजूद असताना, बाहेरच्या ट्रोलांची हिंमतच कशी होते आमच्या मैदानावर अतिक्रमण करण्याची?
१- (पंचमस्तंभी) 'न'वी बाजू.
करेक्ट! मीपण तेच म्ह्णते
करेक्ट! मीपण तेच म्ह्णते आम्हाला असे विचारजंत आणि हुच्चभू पण तरीही फ्रेंड्ली ट्रोल्स हवे आहेत.
यप्स
आमचा तर नाव घेउन उल्लेख होता, आडून आडून हिणकस पद्धतीने केलेला उल्लेखही होता.
त्याला मनोमन get well soon अशा शुभेच्छा देउन कामाला लागलो --- काहिच प्रतिवाद न करता.
येस, तू आणि आड्कित्ता यांनी
येस, तू आणि आड्कित्ता यांनी सुद्धा एक-दोनच प्रतिसाद देऊन त्यांच्याकडे व्यवस्थित दुर्लक्ष केले आहे.
बाकी तो ___ काका/काकू/ताई/दादांचा सल्ला सदर चालू करायचे मनावर घ्या जरा!
ट्रोल्स नको तर मग ट्यार्पी वाढावा कसा?
मला वाटत होतं की मी त्या
मला वाटत होतं की मी त्या ट्रोलांचे मतपरिवर्तन करू शकेन :(
मात्र रामाताराम यांचे नाव घ्यायला नको होते. उगाच त्याना ओढले :(
झोपलेल्याला जागे करता येते,
झोपलेल्याला जागे करता येते, झोपेचे सोंग घेतलेल्यांना नाही!
पण झोपेचे सोन्ग घेतले आहे हे
पण झोपेचे सोन्ग घेतले आहे हे गृहीत धरणे मला अन्यायकारक वाटते. थोडी शहानिशा करुन मी देखील नाद सोडून दिला. बट एव्ह्रीवन डिझर्व्हज अ चान्स.
नॉट फिडींग बट बेटिंग
आम्ही फिड केल्यामुळेच हे ट्रोल्स आहेत हे इतरांना कळले हे विसरू नका!
मीही
ट्रोल ची व्याख्या आता समजली पण मीही तिरशिंगराव माणूसघाणे हे नांव ट्रोलिंगसाठीच घेतले होते. आता मला ते 'ट्रोलशिंगराव' असे बदलले पाहिजे.
ट्रोमा
थोडक्यात ट्रोमा.
जबरी
जबरी कॉमेंट!
:)
ट्रोलिंग साठी बोगस, टोपण अथवा
ट्रोलिंग साठी बोगस, टोपण अथवा डुआयडी च का निवडला जातो?
माझाच धागा पुन्हा वर काढतो
माझाच धागा पुन्हा वर काढतो आहे. सध्या जी आततायी आणि त्राग्याची विधानं दिसतात त्यावर यातून कदाचित उपाय सापडेल.
(No subject)
:(
आभार! उपायाचा अवलंब करून पाहत
आभार! उपायाचा अवलंब करून पाहत आहे!
अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या
अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या जमान्यात त्रागा व्यक्त करायला, सगळीकडे पोचायला अडचण निर्माण करणे आततायीपणाचे असावे. जे ट्रोलिंग लिखाण आहे हे लोकांना स्वतःला वाटत आहे त्याला ते फिड करणार नाहीतच.
==============
त्रागा नि आततायीपणा ही बंदी घालायची मूल्यं केव्हापासून झाली?
अवांतर - ट्रोलिंग आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य
हे फारच आउट ऑफ प्लेस नि अवांतर वाटेल.
------------
"गाढवाच्या ... " इ इ प्रतिसादांनी मला त्रागा आला आहे असा गैरसमज होऊ शकतो. वेल, अभिव्यक्तिस्वातंत्र्याची पूजा आणि संवेदनांची होळी मागे काही चर्चांमधे झाल्यामुळे मी नव्याने या दोन शब्दांच्या सीमा शोधत आहे.
कोणत्या क्षणी माझं अभिव्यक्तिस्वातंत्र्य इथल्या संवेदनांमुळे लोकांना नावडायला होतं आणि मग ते काय करतात हे मला पाहायचं आहे. समाजात देखिल असंच काहिसं होत असणार. उलट तिथल्या लोकांना अभिव्यक्तिस्वातंत्र्याची कमी जाणिव असणार.
कोणत्या क्षणी माझं
त्यानं काय होणार? समजा इथल्या लोकांनी तुमचे प्रतिसाद दाबण्याऐवजी उडवले किंवा तुम्हांला बॅन केले. तर पुढे काय? त्यावरून तुम्ही काय निष्कर्ष काढणार?
हेतुपुरस्सर
अभिव्यक्तीच्या चौकटीत लोकांच्या रुचीअरुचीच्या मर्यादा काय आहेत हेच केवळ जाणून घेण्यासाठी आपण अनेकविध मुद्द्यांवरच्या चर्चांत हेतुपुरस्सर अधिकाधिक धारदार प्रतिसाद देत असाल, तर त्याचा अर्थ असा घेता येईल -
त्यामुळे खरं तर तुमची ही कबुली खाली उद्धृत केल्याप्रमाणे अवांतर नसून अगदी योग्य ठिकाणी आलेली आहे असं सकृतदर्शनी तरी वाटत आहे -
माझा शुद्ध, सात्विक हेतू
माझा शुद्ध, सात्विक हेतू अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि संवेदना यांच्या सीमा शोधणे आहे. पण त्यासाठी अप्रामाणिक प्रतिसाद देणे हा नाही.
====================
माझ्या पारंपारिक तत्त्वज्ञानाने यापूर्वी इथल्या लोकांच्या संवेदनांचा आदर करीत आणि स्वतःचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य सिमित ठेऊन मी लिहित असे. असे वर्तन सामाजिक दृष्ट्या योग्य आहे असे मला वाटे. पण इतरांच्या भावना वा श्रद्धा या स्वतःच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यासमोर सेकंडरी आहेत असे मत स्वीकारल्याने थोडा प्रॉब्लेम झाला आहे.
============
माझा सुद्ध संभ्रम आहे. कोणती दुरीच्छा नाही.
अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि
अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि संवेदना या दोन गोष्टी एखाद्या (काल्पनिक) रेषेच्या दोन (विरुद्ध) बाजूंना असतात या गृहितकातच गडबड आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या दुसऱ्या बाजूला फासिझम, गळचेपी, असे प्रकार असतात. संवेदनांच्या दुसऱ्या बाजूला दुष्टबुद्धी असते.
अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अमर्याद वापर करताना आपण हास्यास्पद, निरर्थक, आणि महाबोअर ठरण्याची बरीच शक्यता असते.
माझा संभ्रम झाला आहे हे मी
माझा संभ्रम झाला आहे हे मी मान्य करतच आहे.
==============
हे देखिल मला मान्य आहे. अशी प्रतिमा तुमच्या मनात असू शकते. पण मी प्रामाणिकपणे आपले विचार मांडत आहे. त्याला इतरांनी एंटर्टेन करू नये असं जाहिर आवाहान नको व्हायला. इथले सुज्ञ वाचक, लेखक अशा लेखनाला त्याच्या लायकीप्रमाणे आपोआप आपली जागा दाखवतील.
इथे प्रतिप्रतिसाद दिलेला असला
इथे प्रतिप्रतिसाद दिलेला असला तरीही थेट या प्रतिसादाशी त्याचा संबंध नाही. गेल्या काही दिवसांत जो काही गदारोळ सुरू आहे, आणि प्रत्यक्ष भेटीत, इमेलवर ज्या काही गोष्टी मी ऐकल्या त्यावरून हे लिहित आहे.
अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे मूल्य मानणारे पुरोगामी लोक हे सुद्धा माणसंच असतात. त्यांच्याही दिवसात चोवीसच तास असतात. त्यांच्याकडेही वाचण्यासारख्या बऱ्याच जास्त गोष्टी असतात पण वेळ पुरत नाही. अशा वेळेस "मी कोणाचा तरी तारणहार आहे," किंवा "मी अमुकतमुक-buster आहे" अशा प्रकारची भूमिका घेतलेलं लेखन कोणत्याही माणसासाठी कर्कश व्हायला लागतं. उसना आवेश कोणता, खरोखरचे विचार कोणते, विरोधासाठी विरोध कोणता, निव्वळ शेरेबाजी म्हणजे काय, हे समजणारे अनेक सुजाण लोक ऐसी आणि इतर सगळ्याच संस्थळांवर वावरतात. त्यांना अभिनिवेशी लेखन काही काळ गंमतीशीर, रंजक वाटेल पण तेच-ते वाचायचा कंटाळा येतो.
सध्या "इतरांनी एंटर्टेन करू नये असं जाहिर आवाहान" करण्याचीही फार गरज राहिलेली नाही, असं मला दिसतंय. हे आवाहन लोकांना करण्यापेक्षा "बघा बुवा आणि वेळेत आवरा" असं म्हणणं मला अधिक श्रेयस्कर वाटतं. या आवाहनाकडे दुर्लक्ष करण्याचं अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे. इतरही हास्यास्पद, महाबोअर वगैरे म्हणण्याचं अभिव्यक्तीस्वातंत्र्य वापरतील. आणि त्यातून कोणत्याही प्रकारचा संवाद घडणार नाही. संवाद नसेल तर अभिव्यक्तीस्वातंत्र्य मिळवून काय करणार?
संवाद नसेल तर
मूषकभक्षणोत्तर हजयात्रा करू पाहणार्या मार्जारिकेची आठवण आली.
प्रतिसादाशी मी सहमत आहेच असे
प्रतिसादाशी मी सहमत आहेच असे नाही* पण शतमूषक असे नको का?
==========
* मला डिस्क्लेमर्स टाकायची, मोघम बोलायची सवय करून घ्यायला लागणार.
आता ज्याची त्याची भूक वेगळी
आता ज्याची त्याची भूक वेगळी असणार नाही का. भुकेप्रमाणे मूषकांची संख्याही ठरत असेल.
अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे
तुम्ही अशी जी समीक्षा करताय एखाद्याची लेखनाची ती कदाचित उचित आणि करेक्ट असेल. पण त्यासाठी लेखकानं आपलं अभिव्यक्तिस्वातंत्र्य का दडपावं? सगळ्यांनीच प्रतिसाद देणे थांबवले तरी लेखक एकटाच लिहित राहिल इतका त्याचा उत्साह असेल तर त्याला उपाय काय?
संवादाची ज्योत तेवत ठेवण्यासाठी अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी करणेही योग्य नसावे.
संवादाची ज्योत तेवत
अतिरोचक व मार्मिक.
अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या
This comment has been moved here.
ज्याला कोणाला "आपले
ज्याला कोणाला "आपले अभिव्यक्तिस्वातंत्र्य" आणि "इतरांच्या संवेदना" या विषयावर प्रभूत्व आहे त्यांचेकडून मला मार्गदर्शन अपेक्षित आहे.
बहुतेक वेळा संस्थळावर (
बहुतेक वेळा संस्थळावर ( वैचारिकदृष्ट्या पुरोगामी , प्रतिगामी किंवा मध्यममार्गी ) बहुसंख्यांच्या मताविरुद्ध मते मांडणारा ट्रोल ठरतो कि काय असे वाटते .
अगदी अगदी. ट्रोलचे पर्सेप्शन
अगदी अगदी. ट्रोलचे पर्सेप्शन हे सब्जेक्टिव्ह असते.
विचारधारे विरुद्ध ते ट्रोल
माझ्यामते विचारधारे विरुद्ध ते ट्रोल असे समीकरण आहे. आणि ते सगळीकडे आहे. उद्या संघाच्या किंवा तत्सम सायटीवर विरुद्ध प्रतिक्रिया दिल्यावर त्यांच्या दृष्टीने तुम्ही ट्रोल ठराल. थोडक्यात आपल्या विरुद्ध किंवा आपल्या विचारधारेवर प्रश्न विचारलेले कोणालाही आवडत नाहीत. विशेतः जर त्या त्या व्यक्ति व्यक्तिगत जीवनात यशस्वी असतील तर. शिवाय बुद्धीमंत लोकांची अशी एक वेगळीच टीम किंवा एक ठराविक साचा असतो त्यात त्यांना फार कोणी मध्ये मध्ये केलेले पण आवडत नाही. थोडकेमे मानवी स्वभाव कोणी कितीही पुरोगामी आणि प्रतिगामी असला तरी राग/कंटाळा/वैताग वगैरे सारखाच येणार हो.
तुम्ही फार कमी प्रतिसाद देता
तुम्ही फार कमी प्रतिसाद देता आणि लोकांचे, संस्थळावरच्या समूहाचे स्वभाव समजण्याइतपत संस्थळावर वावरत नाही हे समजलं. (संदर्भ) पण लेखन न वाचता त्याबद्दल प्रतिक्रिया देणं निरर्थक आहे. ही मूळ लेखातली वाक्यं -
हे फारच वैयक्तिक आरोप
हे फारच वैयक्तिक आरोप होताहेत. पण असो.
प्रतिक्रिया देणं
सहमत आहे थोडासा पण प्रतिक्रिया दिली तरच लेख वाचले जातात असे काही नाही. काही वेळेला पटले नाहीतरी प्रतिक्रिया देउन असे वाद उद्भवतात असा माझा समज आहे. म्हणून मी फार प्रतिक्रिया देत नाही. जिथे अगदीच राहवत नाही तिथे देतो. दुसरे असे की प्रत्येकाचा एक cicle of competence असतो. प्रत्येकाची एक वाद घालण्याची क्षमता असते. त्यामध्ये तुम्ही किती आनंद वाटतो आहे त्यावरच प्रतिक्रिया अवलंबून आहे. बाकी आधी म्हटल्या प्रमाणे सतत एखाद्याच्या प्रत्येक प्रतिक्रियेला खोडून काढून आपण नक्की काय दाखवतात आहात हे काही कळत नाहीये. असो. जालावर वावरताना असल्या वादातून फार काही मते बदलत नाहीत तर वयैक्तीक टीका टिपण्णी होते आणि ह्यातुन अगदी समंजस असणारे पण सुटत नाहीत. शेवटी मर्त्य माणूस आहे. चालायचेच.
'ट्रोल ठरवणे' या
'ट्रोल ठरवणे' या शब्दप्रयोगाला माझा आक्षेप आहे. सामूहिकरीत्या मतदान करून किंवा जाहीर खटला उभा करून दोषी सिद्ध करणे अशी छटा त्यात येते. या लेखाचा हेतू कोणालातरी ट्रोल म्हणून लेबल करण्यासाठी नाही. तर ट्रोलिंगची वागणूक ओळखणे, आणि त्या वागणुकीचा स्वतःला त्रास होऊ नये अशी काळजी घेणे हा हेतू आहे.
अगदी सहमत आहे. मी हा लेख कायम
अगदी सहमत आहे. मी हा लेख कायम इतरांना वाचायला प्रवृत्त करत असतो. ट्रोलिंग ही मानसिकता आहे. काम क्रोध मद मत्सर मोह व लोभ हा षड्रिपु? मधील मद अथवा सोप्या भाषेत माज हा घटक याला कारणीभूत असतो. परंतु ती अवस्था आहे. म्हणून एकदा ट्रोल म्हणजे कायमच ट्रोल नव्हे. हा लेख आत्मपरिक्षण करायला लावतो व आपल्यालाही ट्रोलिंग पासून वाचवतो अशी माझी समजूत आहे.
सहमत आहे
सहमत आहे पण असा विचार खूप लोक करू शकत नाहीत. एखाद्याची प्रतिमा तयार झाली टी कुठलीही असेल तर ती बदलणे खूप अवघड जाते.
मी असे म्हणत नाही की टाचेखाली
मी असे म्हणत नाही की टाचेखाली दबून रहा पण ज्यांनी संस्थळ सुरु केलं, व्यासपीठ उपलब्ध करुन दिले त्यांच्या प्रति, थोडी कृतज्ञता ठेवा, मुख्य म्हणजे त्यांना होणार्या त्रासाचे भान राखा. कृतज्ञ असणे म्हणजे लाचर असणे नाही. पण हे समजायची प्रगल्भता, संवेदनशीलता काही जणांकडे नाही हे लक्षात येतय. (आता कोणीतरी विचारणार - कृतज्ञता राखा म्हणजे काय करा? )
त्यांना होणार्या त्रासाचे
कायद्याच्या तसेच संकेतस्थळाच्या नियमांच्या मर्यादेत अभिव्यक्तिस्वातंत्र्य वापरले तरी त्रास होतो तर !!! हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे.
असे नाही म्हणत अजो. जेव्हा
असे नाही म्हणत अजो. जेव्हा आपण कोणाला प्रतिसाद म्हणून मेगॅबायटी प्रतिसाद देतो, तेच तेच उगाळतो तेव्हा त्या व्यक्तीला वाचायचे अनावश्यक श्रम पडतात. प्रतिसादाचा साइझ जरा तरी कमी ठेवा, मुद्देसूद बोला. दुसर्याचे मत बदललेच पाहीजे हा अनाठाइ दुराग्रह टाळा असे म्हणते मी.
जर तोचतोच पणा येत असेल तर चर्चा ऑफलाईन घ्या (खव/व्यनि/फोन्/भेटीगाठी)
तुम्ही नेहमी बाऊन्ड्री कंडीशन्स टेस्ट करता मला माहीत आहे. तुम्ही मुद्दाम करत नाही पण तुम्ही नेहमी स्ट्रेस टेस्टींग करता/ बाऊड्री टेस्टींग करता, मला माहीते. पण .... आता काय बोलू? :( :)
_____
तुम्हाला संकल्पनांमध्ये आऊटलाइन फिगर आऊट करण्यात श्रम पडतात, गोंधळ होतो. मला जे नात्यात होतं, ते तुम्हाला संकल्पनांमध्ये होतं. माझ्याशी काही लोक अतिशय सहानुभूतीपूर्वक वागले आहेत, न चिडता, त्यांनी हळूवार मला डायरेक्ट केले आहे, तरी मला नात्यांत कुठे सीमारेषा आखायची ते कळत नाही.
मला माहीत हे तुम्हाला संकल्पनांबाबत होतं. वी आर इन सेम बोट :)
____
हे पटत नसेल तर तसे अवश्य सांगा. आपल्या मताचा आदर आहे.
मला वाटतं कि त्रास,इ होतोय
मला वाटतं कि त्रास,इ होतोय म्हणण्यापेक्षा इग्नोर करा ना.
----------------
आम्हाला त्रास होतो (जो देणं मला अभिप्रेत नाही) म्हणून माझ्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणणं योग्य आहे का?
कधी गदा आणली अजो? कधी चपला
कधी गदा आणली अजो? कधी चपला दाखविल्या? तुम्ही हर्ट इमॅजिन करताहात.
डुकाटाआ
डुकाटाआ