१०) ऑटीझम स्पेशल अ‍ॅक्टीव्हिटीज व कोपिंग टेक्निक्स

प्रत्येकालाच एक कम्फर्ट झोन असतो. ती अमुक एक गोष्ट केली की बरं वाटतं, किंवा अमुक एक पदार्थ खाल्ला, कॉफी प्यायली की बरं वाटतं. अशा सारखेच काही कम्फर्ट झोन्स ऑटीझम असलेल्या मुलांचेही असू शकतात.
फक्त फरक हा आहे, की ती मुलं आपल्याला येऊन सांगू शकत नाहीत. त्यामुळे केअरगिव्हरलाच त्यांच्या दृष्टीने विचार करून वेगवेगळ्या अ‍ॅक्टीव्हिटीज कराव्या लागतात.

१) stimming : ऑटीझम अंतर्गत जवळपास प्रत्येक मूल स्टीमिंग बिहेविअर दाखवून देतेच. स्टीमिंग म्हणजे काय? तर Self-stimulatory behavior. मग ते हाताचे फ्लॅपिंग असेल, गोल गिरक्या घेणे असेल, किंवा छोटासा मणी दोन बोटात फिरवत बसणे असेल, किंवा वुडन ब्लॉक्स - खेळणी एका रांगेत लावून ठेवणे असेल. प्रत्येक मुलाची पर्सनालिटी वेगळी त्यामुळे प्रत्येकाची तर्हा वेगळी. लक्षात ठेवा : If you meet one person with autism, you've met one person with autism.
IMG_2180

मला शक्यतो मुलाचे हे बिहेविअर जितके कमी करता येईल तितके करायचे असते. आयडियली. परंतू कधीकधी परिस्थिती अगदीच हाताबाहेर गेलेली असते. कधी तो सर्दीने बेजार असतो. कधी घरात खूप लोकं असतील. किंवा कधी नुसताच कंटाळा आला असेल त्याला. अशा वेळेस मात्र मी मुद्दाम स्वतःहून खेळणी लाईन अप करत बसते. कधी आम्ही दोघंही हँड फ्लेपिंग करतो. कधी सलग १०-१५ मिनिटं एकेका पायाने हॉपिंग करत त्याचा हॅपी डान्स करतो. माझ्या मुलाला इन्स्टंटली बरं वाटतं. मला खात्री आहे यामुळे माझ्या मुलाला मी 'त्याच्या जगात' आल्याची भावना होत असेल. हे आपल्या जगाच्या दृष्टीने वेडं वागणं असेल, पण त्याने मुलाशी झटक्यात कनेक्ट होता येतं. प्रत्येक पालकाने हा असा हॅपी डान्स केलाच पाहीजे.

२) deep pressure : मागे लिहीलेल्या सेन्सरी इंटीग्रेशनच्या लेखामध्ये आपण proprioceptive sense बद्दल थोडक्यात वाचले. proprioceptive sense म्हणजेच बॉडी पोझिशन. हा सेन्स फार जास्त प्रमाणात आपले अस्तित्व दाखवून देतो. त्यामुळे सोफ्यावर सतत जाऊन आदळणे, मसल्स ताठरणे, कुठेतरी अडगळीत जाऊन बसणे असे प्रकार होतात. या सेन्सला थोडसं अजुन सेन्सिबल बनवण्यासाठी घरात एक मोठी बीन बॅग हवीच. बीन बॅगवर जाऊन क्रॅश होणे, त्यात लोळणे हे नुसतेच आरामादायी नाही तर ह्या मुलांसाठी फार उपयोगी आहे. बीन बॅगेच्याच मटेरियलसारखी मोठी गादी असेल तर त्या गादीमध्ये त्याला रॅप करून वरून डीप प्रेशर द्या.
peapod_beanbag
ऑक्युपेशनल थेरपिस्टला विचारून प्रत्येक जॉईंटला डीप प्रेशर कसे द्यायचे हे शिकून घ्या. ही मुलं toe walking सतत करत असल्याने चवड्यांकडील भाग अगदी घट्टे पडल्यासारखा होतो. सतत पाऊल बाहेरच्या बाजूल स्ट्रेच केल्यामुळे आपण डीप प्रेशर देताना पाऊल शरीराच्या दिशेला वळवतो - त्याने मुलांना बरे वाटते. याचप्रमाणे दिवसभरात जमेल तेव्हा त्यांना अतिशय घट्ट मिठी मारावी. खांदे आतल्या साईडला दाबावेत. कुठल्याही बिहेविअर प्रॉब्लेमला डीप प्रेशर हे बर्‍याचदा उत्तर असते.. स्मित

३) epsom salt bath : एप्सम सॉल्टने अगदी पटकन शांत वाटते. तसेच काही इजा झाली असेल तरी त्यावर फायदा होतो. त्याहीपेक्षा महत्वाचा फायदा - ऑटीझम असला की gut problems असतातच. त्यामुळे अन्नातील आवश्यक गोष्टी शरीराला मिळतीलच असे नाही. उदा: सल्फर. एप्सम सॉल्ट जेव्हा गरम पाण्याच्या बाथमध्ये आपण मिसळून/सोक करून त्यात मुलाला २० मिनिटं बसवतो तेव्हा त्वचेतील पोअर्समधून सल्फर शरीराला मिळते. ह्या उपायाने खात्रीशीर फायदा होतो. मूल बर्‍याचदा शांतपणॅ झोपी जाते नंतर. बिलिव्ह मी, हा खूप मोठा फायदा आहे. ऑटीस्टीक मूल शांतपणे झोपी जाणे हे दिवसभरातील अचिव्हमेंट असते. बर्याचदा एप्सम सॉल्टनंतर मूल खूप अटेन्टीव्ह झाल्याचेही आढळून येते. रोज असा बाथ दिला तरी चालतो.

४) PECS [ Picture Exchange Communication System ] : ही खरंतर एक पध्दत आहे संवादाची. परंतू आमच्या घरात पेक्स आल्यापासून बरीच शांतता प्रस्थापित झाली आहे. नाहीतर फ्रस्ट्रेशन लेव्हल इतकी जास्त होती आधी, की सतत चावणे, ओरबाडणे, डोकं आपटणे असंच सगळं चालायचे. परंतू पेक्स आल्यापासून माझ्या मुलाला अगदी हुकमी एक्का मिळाला आहे संवादाचा. अर्थात हे आमचे काम की त्याला कुठल्या गोष्टींचे पेक्स लागतील, तो विचार आम्ही करून, फोटो काढून, प्रिंट करून मग ते लॅमिनेट करून मागे वेल्क्रो लावून पेक्सचे पुस्तक तयार करणे. ही सिस्टीम बरीच किचकट आहे. परंतू त्याचा फायदा इतका आहे की मी अगदी आवडीने हे काम करते. Scotch Thermal Laminatorघरातच आणून ठेवल्यामुळे बरंच सोपं झाले आहे आता. माझ्या घरातील पेक्सबुकमधील हे एक पान. हे माझ्या मुलाचे आवडते शोज आहेत.

IMG_2185
याचप्रमाणे त्याच्या दुधाचा कप, पाण्याची बाटली, आवडीचे खाण्याचे पदार्थ, डायपर इत्यादी गोष्टींचे पेक्स आम्ही तयार करून ठेवले आहेत.
मी मागे सांगितल्याप्रमाणे माझ्या मुलाला आता वाचता येते. त्यामुळे पेक्ससारखीच मी आता वेक्स सिस्टीम घरात चालू केली आहे. वर्ड्स एक्स्चेंज कम्युनिकेशन सिस्टीम. त्याच्या दैनंदिन जीवनातील महत्वाच्या अ‍ॅक्टीव्हिटीजच्या शब्दांना मी लॅमिनेट करून कार्ड्स तयार करून घरी चिकटवली आहेत. उदा: हे शाळेला जातानाचे कार्ड. ही मुलं व्हिज्युअल लर्नर असल्याने डोळ्यांनी त्यांनी ते स्केज्युल पाहीले की त्यांचे मन जरा तयार होते पुढील कार्यक्रमासाठी. सरप्राईझेस आर नो नो इन अवर हाऊस.
IMG_2187

IMG_2188
असेच झोपतानाचे आहे, जेवायच्या वेळेचे आहे. पार्कमध्ये जायचे आहे. मी प्रत्येक सिनारिओ तर नाही प्रिंट करू शकत परंतू महत्वाच्या गोष्टी जिथे त्याने कम्युनिकेट करणे गरजेचे आहे किंवा त्याने ती गोष्ट करणं भाग आहे, अशा वेळेस याचा खूपच उपयोग होतो. कालच मुलाने घरात पाहुण्यांशी मी गप्पा मारत असताना मला 'बेड' हा शब्द आणून दिला. कारण तो खूप पेंगुळला होता. Smile

५) Sensory Brush मसाज :

sensorybrush
या अशा सेन्सरी ब्रशने मुलाचे सर्व अंग, मुख्यत्वेकरून हात, पाय, पोट व पाठ हे हलक्या हाताने घासावेत. खसाखसा नाही. एकाच दिशेने जरा दाब देऊन ब्रश घासत न्यावा. सेन्सरी इंटीग्रेशनच्या दृष्टीने या एक्झरसाईझचे महत्व आहे. पहिल्यांदा ओटीने जेव्हा आमच्या मुलाला असा मसाज दिला तेव्हा आम्ही प्रथम आमच्या मुलाला नंतर शांतपणे खुर्चीवर बसून राहीलेले पाहीले.

६) sign language : ही एक खूप महत्वाची स्टेप आहे मुलांच्या कम्युनिकेशनमधली. खरंतर आता मी भूतकाळात जाऊन बदल करू शकले तर मला मुलाला अगदी तान्हा असल्यापासून साईन लँग्वेज शिकवायला आवडेल. उगीचच नकोसे फिलिंग येते खरे, की सईन लँग्वेज शिकवली की हा बोलणारच नाही की काय. तसे होत नाही. उलट होण्याची शक्यता जास्त. मुलांना साईन लँग्वेजनुसार कम्युनिकेशनची सवय लागली की त्यांना त्यातली सहजता कळते. व आपण तर त्याने केलेल्या साईनवर तो शब्द उच्चारून दाखवतोच. त्यामुळे शब्दही कानावर पडतो व असोशिएशन पटकन होते. मी सर्व पालकांना सांगीन की तुमचं बाळ स्पेक्ट्रमवर असो वा नसो, बेसिक साईन लँग्वेज शिकवा. मोअर, ऑल डन, हेल्प, कुकी, मिल्क, ड्रिंक, ईट इत्यादी. हे खूप सोप्पे हातवारे असतात व मुलं कम्युनिकेट करायला लवकर शिकतात. माझा मुलगा वरीलपैकी कुकी व ड्रिंक वगळता साईन्स करतो त्यामुळे देखील आमचे काम सोपे होते. प्लीज ही भाषा शिका व शिकवा मुलांना.
या व अशाच बर्याच अ‍ॅक्टीव्हिटीज, टेक्निक्स आम्ही दिवसभरात मुलाबरोबर करत असतो. या सर्वांचा कुठेनाकुठेतरी फायदा होतोच. अजुनही कितीतरी गोष्टी आहेत. हगिंग मशिन आहे, बॉडी सॉक आहे, ट्रॅम्पोलिन आहे. जे जे मुलाच्या दृष्टीने फायद्याचे ते ते करत राहायचे. फळाची अपेक्षा न करता. स्मित

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

बरेच दिवस ही सिरीज इथे अपडेट केली त्याबद्दल क्षमस्व. (मी माझ्या वेबसाईटवर बरेच लेख लिहीले, परंतू इथे अपडेट करायला विसरले.)
तसेच सर्व लेखांना अंक देते, म्हणजे फ्लो लक्षात येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचे प्रयत्न चांगले आहेत. राग नसावा, पण माझे मत या बाबतीत जरा वेगळे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपले मत मला पटले नाही तरी वेगळे असण्याचा आपला हक्क मान्य आहे. फक्त ब्लॉगचा दुवा देण्याऐवजी येथेच मत मांडले तर वाचकांना सोपे जाईल.

त्यामुळे मलातरी एकंदरीत हा स्वकौतुक करण्याचा प्रकार वाटला.

या आपल्या निष्कर्षाशी पूर्ण असहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आत्ताच ऐसीअक्षरेवर स्वमग्नता एकलकोंडेकर या लेखिकेचा लेख वाचला आणि मग तिने लिहिलेले सगळे लेख वाचले. लेखिकेने ऑटिझम, म्हणजे स्वमग्नता या विषयावर लेख लिहिले आहेत. तिचा मुलगा हा स्वमग्न आहे. लेख चांगले माहितीपूर्ण आहेत. प्रतिक्रियांमध्ये लोकांनी तिचे कौतुक केले आहे. पण माझे विचार इतरांपेक्षा जरा वेगळे आहेत.

सर्वप्रथम माझ्या लक्षात आले की या लेखिकेने स्वमग्नता या एकाच विषयावर ९ लेख लिहिले आहेत. बाकी कशावरही १ ओळसुद्धा लिहिली नाही. “मी Mother Warrior आहे.” असे ती म्हणते.

तिच्या मुलाला स्वमग्नता आहे. ही नक्कीच वाईट गोष्ट आहे. But it is fait accompli. त्यामुळे तिला सहानुभुती दाखवण्याखेरीज आम्ही काय करणार? माझ्या बॉसची दोन्ही मुले स्वमग्न आहेत, पण तो कधीही तसे जाणवू देत नाही. मग लेखिकेचा मुलगा त्यांच्यापेक्षा काही फार वेगळा नाहीये. आणि स्वमग्नतेबद्दल ९ लेख ऐसीअक्षरेवर लिहिण्याचा हेतू मला काही कळला नाही. उद्या “अंध लोकांनी त्यांच्या रोजच्या जीवनात इंटरनेट कसे वापरावे ” असे लेख मी जर अंध लोकांच्या फोरमवर लिहिले तर एकवेळ लोक समजून घेतील, पण असे ९ लेख ऐसीअक्षरेवर लिहिले तर त्याला काही अर्थ आहे का? त्यामुळे मलातरी एकंदरीत हा स्वकौतुक करण्याचा प्रकार वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वप्रथम माझ्या लक्षात आले की या लेखिकेने स्वमग्नता या एकाच विषयावर ९ लेख लिहिले आहेत. बाकी कशावरही १ ओळसुद्धा लिहिली नाही.

ही गोष्ट मला विशेष आक्षेपार्ह वाटत नाही. प्रत्येक सदस्याने लिहिलेच पाहिजे, विविध विषयांवर लिहिले पाहिजे वगैरे नियम असे थोडेच आहेत? ज्यांना ज्या विषयांबद्दल किहावेले वाटते, कमी-अधिक तीव्रतेने, ते त्यावर लिहितात. आमच्यासारखे काही तर लिहावेसे वाटते त्यबद्दलही लिहित नाही. स्वमग्नता ताईंनी एकाच फक्त विषयावर लिहिलेले असले तरीही दर भागात केवळ तेच तेच तेच लिहिलेले नाही. काही लोक फक्त संगीतावर लिहितात. काही केवळ पाककृती लिहितात. त्यात गैर काय आहे?

“मी Mother Warrior आहे.” असे ती म्हणते.

यात मला तरी बढाईचा भाग वाटला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचे मत माझ्या मताशी जुळावेच असा आग्रह नाही. तुमच्या मताचा आदर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या बॉसची दोन्ही मुले स्वमग्न आहेत, पण तो कधीही तसे जाणवू देत नाही. मग लेखिकेचा मुलगा त्यांच्यापेक्षा काही फार वेगळा नाहीये.

एक तर व्यावसायिक संबंधांत विशिष्ट वर्तन ठेवणे वेगळे आणि ऐसी, मायबोली इ संस्थळावर (किंवा अन्य मित्रमंडळीत)अनुभव मांडणे वेगळे. त्यातून प्रत्येक व्यक्तीची अभिव्यक्तीची गरज आणि पद्धत वेगळी असू शकते.
दुसरे म्हणजे स्वमग्नता या नावाच्या मोठ्या छ्त्राखाली अनेक वर्तने येतात, आणि दोन स्वमग्न मुलांची वर्तने निरनिराळी असणे अगदी शक्य असते. शिवाय एकाच गोष्टीबद्दलदेखील दोन व्यक्तींचे अनुभवविश्व् वेगळे असू शकतेच की नाही?

आणि स्वमग्नतेबद्दल ९ लेख ऐसीअक्षरेवर लिहिण्याचा हेतू मला काही कळला नाही. उद्या “अंध लोकांनी त्यांच्या रोजच्या जीवनात इंटरनेट कसे वापरावे ” असे लेख मी जर अंध लोकांच्या फोरमवर लिहिले तर एकवेळ लोक समजून घेतील, पण असे ९ लेख ऐसीअक्षरेवर लिहिले तर त्याला काही अर्थ आहे का?

हे आपल्याला अर्थहीन वाटावे याचे वाईट वाटते. मागे, समलैंगिकता या विषयावर ऐसीवर चर्चा - लेख चालू होते. त्यात कुणा सदस्याने असा काहीसा विचार मांडला होता-'ही समलैंगिकता वगैरे ठीक आहे, पण इथे आपल्यात त्या चर्चेचा काही उपयोग आहे का? ह्या सर्व चर्चा त्यांच्या त्यांना करू दे ना, इथे, आपला कोणाचा त्याच्याशी काही संबंध आहे का? आपल्याला काय करायचे आहे?' ते आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचे दोन प्रकारचे आक्षेप दिसतात.
१. लेखिकेने केवळ एकाच विषयावर दहा लेख लिहिलेेले आहेत, इतर काहीच लिहिलेलं नाही : अनेक लेखक असं करतात. उदाहरण द्यायचं झालं तर फारएंड फक्त हिंदी सिनेमांची चेष्टा करणारं लिखाण करतात, नानावटी केवळ आधुनिक विज्ञानाच्या पैलूंवर लिहितात... प्रत्येकाचा एक कंफर्ट झोन असतो, आणि प्रत्येकाचा आपल्या आवडीचा विषय असतो. उगाच सगळ्याच विषयांवर लिहीत बसण्यापेक्षा आपल्याला ज्याबद्दल मनापासून लिहावंसं वाटतं अशा विषयावरच लिखाण करणं चांगलं नाही का?
२. ऐसी अक्षरेवर अशा प्रकारचं लेखन अस्थानी आहे : हा मुद्दा तर बिलकुलच पटत नाही. जे सर्वांनाच लागू होऊ शकेल असंच लिखाण ऐसीवर यावं का? किंबहुना जे विषय नेहेमीचे, परिचयाचे नाहीत अशांवर सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत लिखाण होणं आणि ते अनेक लोकांपर्यंत विनासायास पोचू शकणं हेच ऐसीचं बलस्थान आहेे.

त्यामुळे मलातरी एकंदरीत हा स्वकौतुक करण्याचा प्रकार वाटला.

स्वकौतुक हा शब्द खटकला. लेखिकेने आपल्या परिस्थितीत जी सकारात्मक भूमिका घेतली आहे ती इतर अनेकांना स्फूर्तिदायी ठरू शकते. त्यातून काही आयुष्यं सुधारू शकतात. अशा लेखनाला हिणवलं जाऊ नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वमग्नतेबद्दल ९ लेख ऐसीअक्षरेवर लिहिण्याचा हेतू मला काही कळला नाही

असं जाणवलं आहे, की मराठीत बहुधा एखाद्या गोष्टीवर लिहिलेलं सापडतंच, असं नाही.
त्यातून सापडलं, तर गूगल ऐसी किंवा मिसळपाव अशा फोरम्सना प्राधान्य देते. तेव्हा असा माहितीपर लेख ऐसीवर टाकणे आणि एखाद्या ब्लॉगवर टाकणे, ह्यात फरक आहे- ऐसीवरचा लेख चटकन सापडतो आणि जास्त लोकांपर्यंत पोचतो.

उद्या “अंध लोकांनी त्यांच्या रोजच्या जीवनात इंटरनेट कसे वापरावे ” असे लेख मी जर अंध लोकांच्या फोरमवर लिहिले तर एकवेळ लोक समजून घेतील,

हे विधान अजिबात झेपलं नाही. असं म्हणायला गेलं तर ललित लिखाण मग लेखकांच्या फोरमवर किंवा पाककला ह्या शेफ लोकांच्या फोरम्सवर टाकाव्या लागतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यामुळे मलातरी एकंदरीत हा स्वकौतुक करण्याचा प्रकार वाटला.

समजा असे अाहे हे खरे मानले तरी यात नक्की काय प्रॉब्लेम आहे? एखाद्याला स्वकौतुक करवून घेण्याची मानसिक गरज असू शकते. ऑटिझमविषयी मला काही माहिती नाही. जी काही आहे ती या लेखमालेतूनच होते आहे. त्यातून माझा असा समज झालाय की अशी परिस्थिती असलेल्या मुलाला सांभाळणे हे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खडतर काम दिसते आहे. हे कष्ट उपसणाऱ्या पालकांना 'आपले कष्ट कुणीतरी अॅप्रीशिएट करावेत' असे वाटणे साहजिकच आहे. आपल्या प्रौढ वयात तसेही आपले कौतुक कोण करते? (लग्न झाल्यावर तर फक्त क्रिटिसिझमच वाट्याला येतात Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लग्न झाल्यावर तर फक्त क्रिटिसिझमच वाट्याला येतात (डोळा मारत)

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचे बॉस, त्यांच्या मुलांविषयीची चर्चा 'तुमच्याशी' करत नाहीत...
याचं मला आश्चर्य वाटलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बोकाशेठ.. भावना समजली पण आपण थेट काही करु शकलो नाही किंवा आपल्या आसपास असे लोक नसले तरी तरी अंध किंवा autistic व्यक्तीचं विश्व कसं असतं हे समजून घेणं एक वाचक म्हणून माहितीपूर्णच आहे ना?

मी विमानावरचे लेख एव्हिएशन स्पेशल फोरम्समधे टाकले पाहिजेत तसं म्हटलं तर. आता तर फलाईट इंस्ट्रुमेंट्सवर लेख बाकी आहेत.

की फक्त autism एकाच विषयावर सर्व न लिहिता इतरही बाबतीत त्यानी लिहितं व्हावं म्हणजे त्यानाही जरा चेंज आणि मोकळं वाटेल असं म्हणणं आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कदाचित "स्वमग्नता" या आयडीचा जन्मच स्वमग्नतेविषयी लिहीणयासाठी झाला असावा. बाकी लिखाण वेगळया आयडीने होत असावं.

स्वकौतुकाबद्दल -
असं नसावं. स्वमग्नता असलेल्या मुलाचा सांभाळ करतानाच्या बेस्ट प्राक्टिसेस्, खाचखळगे, वगैरे लेखन इतर पालकांना "अर्र..असं बी करता येईल की" असं वाटायला लावू शकतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

तुमचे म्हणणे बरोबर आहे. अशाच विचारधारणेने ही लेख मालिका लिहायला घेतली. तसेच आंतरजालावर जरी अच्युत गोडबोले व इतर न्युजपेपरमधील आर्टीकल्स सापडली, तरी इंग्रजीमध्ये ज्या प्रमाणात व जशी माहीती अव्हेलेबल आहे तशी मराठीत अजिबात दिसली नाही. 'लोकांचे भले करायचे' या उदात्त विचाराने लेख लिहायला घेतले खरे, परंतू थोड्याच दिवसात जाणवलं, याचा मला स्वतःलाच व पर्यायाने मुलालाच खूप फायदा आहे. मी इतकी मोकळी गेल्या ३ वर्षात झाले नव्हते. अगदी नवर्‍यासमोरही नाही. कारण त्याला मी माझ्या काळज्या एका ठराविक लिमिटपर्यंत सांगते. सांगताना रडूच जास्त येण्याची शक्यता. मात्र लिहीताना त्यातल्या त्यात मूद्देसूद लिहीले जाते व माझ्याच विचारांना सॉर्ट करण्याची मला संधी मिळते.

उपाशी बोका यांच्या ब्लॉगवर ती पोस्ट पाहीली आणि खोटं नाही सांगत, निराशा दाटून आली. त्यावर एक कमेंटही लिहीली होती - ती त्यांनी डिलिट केली. पण माझ्या लेखांचे इतके साधे उद्दीष्टं त्यांच्यापर्यंत पोचू नये याबद्दल वाईट वाटले. दोष त्यांचा नाही.'त्यात काय विशेष' अशी विचारसरणी असणारे कित्येक लोकं अस्णार आहेत. माझ्याही प्रत्यक्ष जीवनात 'मुलाला दोन फटके का नाही देत? म्हणजे सरळ होईल' असंही म्हणणारे लोकं आहेत. मला जो अवेअरनेस हवा आहे तो हेच बदलण्यासाठी. जरासं अजुन संवेदनशीलता दाखवा, अशा मुलांकडे, त्यांच्या पालकांकडे. ऑटीझम असण्याबद्दल काय कौतुक करणार आम्ही? रोज एम्बॅरॅस न होता, लोकांच्या नजरा झेलत मुलाची वेगळी वागणूक सगळ्या जगासमोर पेलत असतो. त्यांच्या एखाद्या गुणाबद्दल कौतुक केलेच तर त्यातही चुकीचे नाही. पुढे येईलच एक लेख - ज्यात मी मुलाचे कौतुक केले आहे. ऑनेस्टली, ऑटीझम डायग्नोस झाल्यानंतरच्या ३ वर्षात पहिल्यांदा ब्रॅगिंग करू शकले मी.

मला कळतंय मी अनावश्यकरीत्या इमोशनल होत आहे. पण चालायचेच. अजुन हे सगळं नवीन आहे. तितका कोडगेपणा इच्छा असूनही आणता आला नाही. प्रॅक्टीस चालू आहे. मात्र, मी उपाशी बोका यांना मनापासून थँक्स म्हणीन. कारण त्यांच्या पोस्टने मला जाणिव झाली मला हे लेख जिकडे तिकडे जमेल तिथे पाठवले पाहीजेत.अजुन पुष्कळच अवेअरनेसची गरज आहे.असो, बाकी सर्व प्रतिसाद देणार्‍यांचे आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बर्याच दिवसांनी आला हा भाग. माहितीपूर्ण लेखमाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बर्‍याच दिवसात दिसला नाहीत, तेव्हा एक खरड टाकण्याचा विचार करतच होते.

ऐसीवर लिहीत रहा. सगळ्यांनाच या विषयाची उत्सुकता असायला हवी असं कुठे आहे, पण आमच्यासारखे काही नियमाने तुमचे लेख वाचत असतात.

इतरांना वेगळ्या किंवा विचित्र वाटणार्‍या तर्‍हा आपल्या सर्वांमधे असतातच. असे लेख वाचताना त्याची जाणिव होते आणि आपण अधिक संयमाने वागायला शिकतो असा माझा अनुभव आहे.

प्रत्येक लेखावर पोच्/प्रतिक्रिया द्यायला जमली नाही, तरी वाचतो आहोत याची खात्री असुद्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतरांना वेगळ्या किंवा विचित्र वाटणार्‍या तर्‍हा आपल्या सर्वांमधे असतातच. असे लेख वाचताना त्याची जाणिव होते आणि आपण अधिक संयमाने वागायला

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थँक्स! हो तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आम्हालादेखील हे सर्व समजून घेताना जाण्वले हेच. किती मुलांना हा नाठाळ आहे , नादीष्ट आहे, एककल्ली आहे ही विशेषणं मिळाली असतील! हे सगळं माहीती असेल तर आपणच पटकन त्या मुलांना आपल्या नजरेत नापास करण्याऐवजी थोडा वेगळा विचार करून पाहू!
आम्ही आमच्या आयुष्यात एकंदरीतच थोडे संयमाने वागायला शिकलो. मुलगा आक्रस्ताळेपणा करत असेल तर रागाचा पारा चढण्याऐवजी आम्ही त्याच्या दृष्टीने जमेल तितका विचार करून पाहतो. दोन वर्‍शांपूर्वी भारतात घरचे कार्य होते. तिकडे कार्यालयात माझा मुलगा न भूतो न भविष्यती चेकाळला होता. भर कार्यालयात त्याने मला हनुवटीला इतका जोरात चावा घेतला की रक्त येऊ लागले. तेव्हा अर्थातच मी चिडले, रडले दुख्खी झाले. पण आता कळतय. भारतात कार्याला वगैरे लोकं इतकी नटून येतात. सगळ्या साड्या ब्राइट रंगाच्या, सगळीकडे गप्पांचा फड, डोक्यावर १७६० सिलिंग फॅन्स! सेन्सरी ओव्हरलोडचाही कडेलोट होता त्याच्या दृष्टीने तो. तेव्हा इतकी माहीती नव्हती. काही कोपिंग टेक्निक्स उपयोगी पडली असती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजुबाजूला इतकी माणसं, सतत आवाज, उकाडा, वेगळ्या वासाचे वातावरण, वेगळ्या चवीचे अन्न व ओळखीच्या काहीच खुणा न सापडणे यांचा या मुलांना खूप त्रास होऊ शकतो. शिवाय कार्यात व भेटिगाठींमध्ये तुम्ही व्यस्त असणार, त्यामुळे त्याने सौम्य तर्‍हेने व्यक्त केलेला त्रागा तुमच्या लक्षात आला नसेल. पण तुम्ही स्वतःला इतका दोष देऊ नका, असे प्रसंग सगळ्याच आई-बापांच्या आयुष्यात येत असतात. शिवाय न मागता सल्ले देणारी, परिस्थिती आपल्या ताब्यात घेऊन परस्पर निर्यण घेणारी माणसं आजुबाजूला असतील तर परिस्थिती अधिक चिघळते. असो.
मुलांच्या आवडी-निवडी, त्यांना होणारे सेन्सरी त्रास व त्यांना शांत करणार्‍या गोष्टी या काळानुसार बदलत असतात, तेव्हा याबाबती तुम्हाला रोज नवीन शिकायचे आहे. आजची सर्व कोपिंग टेक्निक्स उद्या चालतीलच असे नाही, पण संयम व चिकाटीला पर्याय नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वमग्नता - तुमचे सगळे लेख मी वाचले आहेत. लिहीण्यामागे तुमचा उद्देश नक्कीच चांगला आहे आणि सर्वांना त्यातुन माहीती मिळते आहे. तुम्ही लिहीत रहाच. आम्ही शुभेच्छा देऊ शकतो फक्त. ह्याच आयडीने दुसर्‍या विषयावर लिहीलेत तर अजुनच बरे वाटेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या मुलीला सध्या ऑटिझम वगैरे नसला तरी इतरांपेक्षा वेगळ्या म्हणा किंवा नवीन म्हणा अशी काही कृती केली की लगेच नाके न मुरडता किंवा तिला फारशी लेबले न लावता आम्ही तिच्याशी खेळतो तिला समजून घेऊ पाहतो यामध्ये तुमच्या या लेखमालेचे काहीच योगदान नाही असे म्हणू शकत नाही.

ऑटिझम हे एक निमित्त आहे. या निमित्ताने एकुणच लहानांचे विश्व, त्यांच्या लकबी, विविध खेळण्याची इन्स्ट्रुमेंट्स आणि मुख्य म्हणजे मुल वाढवताना धरायचा धीर यावर विचार करताना, आम्ही उभयता चर्चा करताना तुमचे लेखन प्रकर्षाने आठवतात.

एक पालक म्हणून मनःपूर्वक आभार! आणि पुढिल लेखनासाठी शुभेच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अगदी हेच लिहायला आलो होतो मी ही. माझा २.५ वर्षाचा मुलगा अशक्य त्रास देतो (खरंच, म्हणजे अश्या वयात मुलं त्रास देतातच असा त्रास नाहीये हा. आजू-बाजूच्या लोकांची त्याच वयाची मुलं एवढा दंगा करत नाहीत आणि ते पालक ही वैतागून म्हणतात की तुमचा मुलगा किती किंवा जरा जास्तच त्रास देतो. त्याच्या डे-केअर मधल्या प्रोफेशनल केअर-टेकर/अटेंडंट पण बर्‍याच वेळा हात टेकतात मुलापुढे, त्याला दिवसभरासाठी डे-केअर ला ठेवायचं म्हंटलं की त्या अवंढा गिळतात आणि मानसिक तयारी करतात ). त्याच्या ह्या बंडपणामुळे आम्ही सुद्धा त्याला ओरडतो, प्रसंगी मारलं ही आहे. पण तुमची लेखमाला आणि झुंज/पेशन्स पाहून वाटलं की मी किती अधीर आहे, किती छोट्या छोट्या गोष्टींमधे चिडचिड करतो. मला त्या वेळेला जी शांतता निवांत पणा हवा असतो तो मिळत नाही म्हणून मी चिडचिड करतो, पण त्याला माझ्याकडून काय हवंय किंवा त्याला जे हवंय ते मीही एंजॉय केलं तर गोष्टी बदलू शकतात असं लक्षात आलं, अर्थात त्याला खूप पेशन्स ची गरज आहे ती तुमच्या लेखमालेतून मिळाली. त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद!
(अता माझा स्वभाव अगदी बदलला असं मी म्हणणार नाही पण मला माझा स्वभाव बदलावा लागेल ही गोष्ट मनापासून पटली.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रत्येकालाच एक कम्फर्ट झोन असतो. ती अमुक एक गोष्ट केली की बरं वाटतं, किंवा अमुक एक पदार्थ खाल्ला, कॉफी प्यायली की बरं वाटतं

अगदी पटले. त्या कंफर्ट झोन च्या बाहेर आपण किती अनकंफर्टेबल असतो याची अनुभूती इतरांना देता येत नाही. काही माणसांना घाउक प्रमाणात द्वेष वा तुच्छता व्यक्त केल्याशिवाय कंफर्टेबल वाटतच नाही हे आपण आजुबाजूला पहात असतोच की! या उलट काही माणसांना प्रेम व आपुलकी व्यक्त केल्याशिवाय कंफर्टेबल वाटत नाही हे ही आपण पहात असतो. चालायचच व्यकी तितक्या प्रकृती!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/