Bio-Medical उपचारपद्धती व Autism

सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

माझ्या नवीन वर्षाच्या संकल्पानुसार मी माझा आउटलुक बदलण्यावर गेला महिनाभर काम करत आहे. मैत्रिणींशी/काही जवळच्या नातेवाईकांशी खुल्या मनाने चर्चा केली. आता मला पुन्हा नव्याने पॉझिटीव्ह दृष्टीकोनाने कामाला लागायची प्रेरणा मिळाली.  :)

एक मुख्य संवादाचे, प्रेरणेचे साधन आहे ते हे लेख लिहीणे. फार स्ट्रेंजली मला ही लेखमालिका लिहून बरं वाटतं! कदाचित माझ्याच डोक्यातील विचारांचा नीट निचरा होत असावा? किंवा सगळे विचार डोक्यात गरगर फिरण्याऐवजी कागदावर ऑर्गनाईझ्ड पद्धतीने उमटले की बरं वाटत असावे. त्यामुळेच या वर्षीचा पहिला लेख लिहीत आहे.

_____________________________________________________

मागील काही लेखांमध्ये Applied Behavior Analysis therapy बद्दल, ते थेरपिस्ट कसे पालकांबरोबर कम्प्लायन्स ट्रेनिंगच्या साहाय्याने काम करतात हे पाहीले. ही कार्यप्रणाली नवीन असताना मला तसेच मुलाला अतिशय परिणामकारक ठरली. परंतू काही काळ लोटल्यावर त्यातील किंचितसे दोष दिसू लागले. मुख्य म्हणजे फार रोबॉटीक प्रकार आहे. तू हे कर मग मी तुला ते देईन. मुलांनादेखील सवय लागते व ब्रेन एकाच दिशेने विचार करू लागतो. (मी ही पद्धती वाईट वा कुचकामी आहे असे मुळीच म्हणत नाही. काही काही बिहेविअर इश्युजना या पद्धतीने फार चांगल्या प्रकारे हाताळता येते. जसे मी मागे लिहीले ओसीडीसारखी लक्षणे. माझा मुलगा आता सलग ३-४ महिने यावर काम केल्यावर बर्‍यापैकी फ्लेक्झिबल झाला आहे. रस्ता बदलला तर पूर्वीसारखी धाकधूक होत नाही आता आम्हाला. सो इट'स गुड. )

पण तरीदेखील एबीए वापरून फार काही मिरॅकल्स होणार नाहीत असंही वाटायला लागले होते. मग अजुन काय आहे यावर संशोधन करता बर्‍याच पुस्तकांतून्/वेबसाईट्समधून बायोमेडीकल उपचारपद्धतींबद्दल वाचायला मिळाले. मी मुलगा २ वर्षाचा असल्यापासून बायोमेडीकल व ऑटीझम यावर पुस्तकं वाचली, इतकंच काय आमच्या जवळचा बायोमेडीकल डॉक्टर शोधून ठेवला. परंतू अ‍ॅक्चुअल त्या डॉ.कडे जाण्यास १.५ वर्ष उजाडले. नाही यात आळशीपणा वगैरे नसून काळजीचा भाग जास्त होता. कारण यामध्ये खूप प्रमाणात ब्लड टेस्ट्स लागणार, त्यामध्ये काय निष्पन्न होत आहे त्यानुसार सप्लिमेंट्स, ओरल औषधे, mb12 ची इंजेक्शने (पालकांनीच मुलाला देणे) इत्यादी फार काळजीत टाकणार्या गोष्टी होत्या. जरी वाचनात आले त्यानुसार - कित्येक पालकांनी १.५-२ वर्षाची मुलं ऑटीझमची लक्षणे दाखवू लागल्यावर लगेच ही उपचारपद्धती फॉलो केली असली तर आमचा धीर होत नव्हता. शेवटी फॅमिलीतील डॉक्टर नातेवाईकांशी बोलून मुलगा ३.५ वर्षाचा झाल्यावर डॉक्टरला तर भेटून घेऊ असं ठरलं.

हे वर जे लिहीले आहे बायोमेडीकल डॉक्क्टर म्हणजे काय?

आमच्या मुलाच्या डॉक्टरांच्या टीमचे ३ विभाग आहेत.
१) पिडीयाट्रिशिअन
२) डेव्हलपमेंटल पिडीयाट्रिशिअन
३) बायोमेडीकल डॉक्टर अथवा Defeat Autism Now (DAN!)/ MAPS डॉक्टर.

१ तर तुम्हाला माहीतीच असतो, २ बद्दल मागील लेखांमध्ये वाचले. आता या ३र्या डॉक्टरची काय आवश्यकता?
http://autism.about.com/od/alternativetreatmens/f/dandoc.htm Defeat Autism Now (DAN!) डॉक्टर; व http://www.medmaps.org/;मेडीकल अ‍ॅकॅडमी ऑफ पिडीयाट्रिक स्पेशल नीड्स डॉक्टर; येथे तुम्हाला बेसिक माहीती मिळेल. होतं काय, बायोमेडीकल अ‍ॅप्रोच ज्या गोष्टींवर विश्वास ठेवतो की ऑटीझम हा बरा होऊ शकतो. किंवा एक्स्ट्रीम फुड अ‍ॅलर्जीज्/व्हॅक्सिनेशन्/ leaky gut syndrome इत्यादी काही गोष्टी ऑटीझम होण्यास कारणीभूत असतात तसेच काही सप्लिमेंट्स, किंवा मर्क्युरी डिटॉक्स केल्यास ऑटीझमचे सिम्प्टम्स कमी अथवा जाऊ शकतात हे नेहेमीच्या डॉक्टरलोकांना पटत नाही. आम्ही त्यांना याबद्दलचे प्रश्न विचारले तर ते म्हणतात आम्ही तर या उपाययोजना करणार नाहीच पण रेकमंडही करणार नाही. तुम्हाला करायचे असल्यास तुमची जबाबदारी! GF/CF Dietने काही होत नाही. आम्ही असलं काही रेकमंड करत नाही. तुम्हाला करायचे असल्यास करा. त्यामुळे बायोमेडीकल साठी लागणार्‍या अतोनात खर्चिक टेस्ट्स, सप्लिमेंट्सची प्रीस्क्रिप्शनं यासाठी वेगळा डॉक्टर शोधावा लागतो. तो इन्शुरंसच्या छत्रीत बसत नाही.

biomedical autism

बायोमेडीकल डॉक्टर/ डॅन डॉक्टर्/मॅप्स डॉक्टर कडे गेल्यावर काय होते?

सर्वप्रथम तुमच्या बाळाची हिस्टरी, प्रायमरी फिजिकल चेकअप झाल्यावर तसेच बाळाच्या वागणूकीवर, लक्षणांवरून तो डॉक्टर तुम्हाला सर्वप्रथम ब्लड टेस्ट/युरीन टेस्ट व स्टूल टेस्ट करण्यास सुचवतो. ब्लड टेस्टसाठी अपॉईंटमेंट घेतली कारण फास्टींग करावे लागणार होते. व युरीन्/स्टूल टेस्ट्साठी सर्व बॉक्सेस्/सामग्री घरी दिली. आम्ही अजुन युरीन व स्टूल टेस्ट करू शकलो नाही. स्टूल टेस्ट जरी घाणेरडी तरी त्यातल्या त्यात सोपी. आम्ही प्रोसिजर सुरूही केली होती परंतू नेमका मुलगा कॉन्स्टीपेटेड झाला व त्या ठराविक दिवसात आम्हाला सँपल लॅबमध्ये पाठवता आले नाही. आता ते सगळं परत करायचे आहे.. एनिवे, ब्लड टेस्टच्या ठरलेल्या अपॉइंटमेंट साठी फास्टींग करणे पण त्रासदायकच होते. कारण मुलगा तेव्हा धड जेवायचा नाही व हमखास रात्री दूध प्यायचा. पण ते कसंतरी जमवले व गेलो. ब्लड घेणारी नर्स होती तिला मी 'रक्तपिपासू'च म्हणत होते. कारण तिने जवळपास १५-२० छोट्या टेस्टट्युब इतकं रक्त त्यादिवशी बाळाकढून काढून घेतले. मी रक्त वगैरे बाबतीत खंबीर असल्याने मीच मुलाला घट्ट धरून बसले होते. रक्त पाहून काही होण्याचा संभव नव्हता मात्र इतक्या हायपरअ‍ॅक्टीव्ह व स्ट्राँग मुलाला १५-२० मिनिटं घट्ट पकडून बसणे व त्याचे लक्ष जमेल तितके गाणी, र्हाईम्सकडे वळवणे हे मात्र फारच अवघड काम होते. इतक्या वेळ घट्ट पकडून बसल्याने त्याला सोडल्यानंतर माझे हात कितीतरी वेळ कापत होते.

यानंतर ब्लड लॅबमध्ये पाठवण्यात आले व रिपोर्ट पाहण्यासाठी महिन्याभरानंतरची अपॉईटमेंट फिक्स करण्यात आली. तसेच तोपर्यंत GF/CF Diet चालू करा असा आदेश देण्यात आला. जे आम्हाला तितकेसे शक्य नव्हते.. कारण माझा मुलगा तेव्हा केवळ पोळी,ब्रेड, नटेला, दूध व ओटमील या आहारावर होता. सर्वच्या सर्व पदार्थ ग्लुटेन व व्हीट तसेच केसीन असलेले. गहू, बार्ली इत्यादी धान्यांत ग्लुटेन असते तर दूध व डेअरीमध्ये केसीन. आता भारतीय आहारात कसे बसणार GF/CF Diet? ती लढाई तर अजुन चालूच आहे. त्याबद्दल पुढील लेखांत लिहीन.

पुढील अपॉईंटमेंटमध्ये चर्चा होती रिपोर्ट्सची. काय सापडेल रिपोर्टमध्ये? मर्क्युरी टॉक्सीन? कुठली डेफिशिएन्सी? कुठल्या पदार्थांच्या अ‍ॅलर्जी? फार प्रश्न... बरीचशी उत्तरं मिळाली. परंतू हा लेख लांबला व रिपोर्ट्सची माहीती तर फारच जास्त आहे त्यामुळे त्याबद्दल पुढील लेखात.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (3 votes)

प्रतिक्रिया

खरच लहान मुलांना "फास्टिंग" किती अवघड असेल Sad
म्हणजे आम्हालाही जे अवघड जातं Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ग्लूटन फ्री / केसिन फ्री डायटच्या परिणामकारतेबद्दल फार माहिती नाही पण पण अलिकडच्या काळात ग्लूटन (आणि त्यातही ग्लायडीन) कमी असलेल्या काही प्राचीन धान्यांचा वापर आम्ही करायला लागलेलो आहोत. एन्कॉर्न, खोरसान (कामूतचा एक प्रकार), स्पेल्ट, राय इत्यादी धान्ये शेतकर्याकडून थेट मागवून मग घरीच एका छोट्या गिरणीत दळतो. कामूत अथवा खोरसानच्या पोळ्या चांगल्या होतात (पण ताज्या जास्त चांगल्या लागतात, गार झाल्यावर तितक्या मऊ रहात नाहीत). या सर्व धान्यांत खूप प्रोटीन असतं आणि त्याचबरोबर ग्लूटन-ग्लायडीन असतंच पण ते मनुष्यासाठी तितकं टॉक्सिक नसतं असं शास्त्रज्ञांचं मत आहे. ज्याला आपण आधुनिक गहू म्हणतो त्यातल्या ग्लूटन आणि प्रोटीनच्या मोठ्या प्रमाणासाठी त्याची हजारो वर्षे लागवड केल्याने (सिलेक्टिव्ह ब्रीडींग) प्राचीन धान्यांच्या इतर जाती आणि त्यांचे संभाव्य फायदे मागे पडले आहेत. अलिकडे मात्र अनेक शेतकरी त्याची लागवड करू लागले आहेत. घरी पीठ दळायला दिवसाला पाच-सात मिनिटेच वेळ लागतो पण त्यामुळे आपल्याला हवी तीच धान्ये वापरायचे स्वातंत्र्य रहाते. आम्ही अजूनही साधा गहू अनेकदा वापरतोच पण त्याला थोडा वेगळा पर्याय आणि चवीचे त्यातून मिळणार्या पोषणाचे वैविध्य या गोष्टींसाठी ही धान्येही वापरायला लागलो आहोत. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटू शकेल म्हणून इथे लिहिली व खाली काही लिंका अधिक माहितीसाठी दिल्या आहेत.
ऐन्कॉर्न
खोरसान
पिठाची घरगुती गिरणी
धान्यविक्रेता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डिप्लोमॅटिकली बोलायचे तर टाळणेबल वाटते. स्वच्छ बोलायचे तर क्वॅकरी.

..मॉडर्न मेडिसिननुसार असाध्य वाटू लागल्याने जो हेल्पलेसनेस येतो तो वास्तव असला तरी कशावरही विश्वास ठेवून "तेही करुन पाहू" नावाच्या घातक फाट्यांकडे जाण्याचा धोका या स्टेजला सुरु होतो.

़.. ..जवळीक वाटल्याने सांगितले. प्लीज डोन्ट टेक अदरवाईज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मॉडर्न मेडिसिननुसार असाध्य वाटू लागल्याने जो हेल्पलेसनेस येतो तो वास्तव असला तरी कशावरही विश्वास ठेवून "तेही करुन पाहू" नावाच्या घातक फाट्यांकडे जाण्याचा धोका या स्टेजला सुरु होतो.

हे "ते ही करून पाहू" देखिल मॉडर्न मेडिसिनशी संबंधित लोकांचेच संशोधन असल्याने असे क्वॅकरी म्हणता येत नाही हीच गोची आहे. ग्लूटन आणि केसिनच्या मेंदूच्या आजारावरील संबंधांचे हे संशोधनही अलिकडेच प्रकाशझोतात आले होते. गव्हातील आणि इतर अनेक धान्यतील ग्लूट्न-केसिन मानवांसाठी टॉक्सिक असते आणि त्यामुळे मेंदूशी संबंधित आजार उद्भवतात असे मानणारे अनेक मॉडर्न मेडिसिनशी संबंधित डॉक्टर्स आहेत. मेंदूचे आणि ग्लूटन यातील परस्परसंबंध तपासणारी शास्त्रीय संशोधने त्या क्षेत्रातल्या तज्ञांकडून चाललेली असताना त्याला क्वॅकरी म्हणणे घाईचे वाटते. हे वाचून मी उद्यापासून ग्लूटनफ्री डायटही करणार नाही किंवा डॉ. मर्कोला यांचे शब्द शेवटचेही मानणार नाही पण मग मला ऑटिस्टिक अपत्यही नाही त्यामुळे हा पर्याय म्हणून पहाण्याची तितकी गरजही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संशोधन बर्‍याच गोष्टींवर चालू आहे. बेस्टसेलर पुस्तकेही बर्‍याच डॉक्टरांची निघाली आहेत.

ऑटिझम असेच नव्हे, कोणत्याही निराश करणार्‍या आणि पूर्ण "क्युअर" उपलब्ध नसलेल्या आजाराबाबत अश्या असंख्य थियरीज निघतात. ALS, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, बरेचसे कॅन्सर्स यासारख्या अनेक रोगांबाबत "मलाच का झाला?" (मलाच वर भर आणि "का झाला?" वर भर हे दोन्ही) हा सर्वात जास्त छळणारा प्रश्न असतो आणि त्यावर उपाय सापडत नसल्याने केअरगिव्हर्स हवालदिल झालेले असतात. अशा वेळी या स्थितीला एनकॅश करणारे अनेक संशोधक निघतात. "लाईफस्टाईल", "न्यूट्रिशन इज इम्पोर्टंट", "टॉक्सिन्स", "डीटॉक्स", "होलिस्टिक", "हीलिंग", "हर्बल", "नॅचरल" हे यांचे जनरली आवडते शब्द असतात.

-आपल्या लाईफस्टाईलमुळेच हे झालं,
-आपल्या मुलाला घातक ठरणारा किंवा चुकीचा आहार आपण त्याला दिल्यानेच हे झालं
-प्रदूषित जगात राहिल्यानेच हे झालं.
-वेळीच सावध न झाल्यानेच हे झालं.
-माझ्या मुलाबाबत मी कुठे कमी पडलो
-माझ्या मुलाच्या उपचाराबाबत आता मी कुठेही कमी पडणार नाही. नो स्टोन अनटर्नड.

असे असंख्य गिल्ट कॉम्प्लेक्सेस अशा वेळी सामान्य माणसाच्या मनात येतात. आरोपनिश्चिती, कोणालातरी जबाबदार मानणं आणि काही न सापडल्यास स्वतःला जबाबदार मानणं हा अतिशय कॉमन स्वभाव आहे.

या सर्व कॉम्प्लेक्सेसना टॅप करुन सप्लीमेंट्स, अँटिऑक्सिडंट्स, अमुकफ्री डाएट, तमुक अ‍ॅडेड डाएट अशी प्रॉडक्ट्स आणि औषधं विक्रीला आणली जातात.

ही औषधं घातक असतीलच असं नव्हे. पण आपल्या मुलाला किंवा स्वतःला लॅबमधला प्राणी अथवा अश्या प्रॉडक्ट्सचा भावनिक बळी होऊ देऊ नये अशी कळकळीची विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मार्मिक श्रेणी दिली आहे!
वेळ पडल्यास लक्षात ठेवावा असा प्रतिसाद. आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अशा वेळी या स्थितीला एनकॅश करणारे अनेक संशोधक निघतात. "लाईफस्टाईल", "न्यूट्रिशन इज इम्पोर्टंट", "टॉक्सिन्स", "डीटॉक्स", "होलिस्टिक", "हीलिंग", "हर्बल", "नॅचरल" हे यांचे जनरली आवडते शब्द असतात.

यात सर्व नवीन संशोधन आणायचे म्हटले तर कठीण आहे ब्वॉ! ग्लूटन आणि त्यातही ग्लायडीनचा मेंदूच्या आजारांवर यांचा संबंध तपासणारे संशोधन 'लॅन्सेट न्युरॉलॉजीत'ही प्रसिद्ध झालेले आहे. इथे पहा
त्यावर एन्कॅश करणारे आणि त्याचे सरसकटीकरण करणारे काही जण असतीलही पण म्हणून सरसरट अशा संशोधनांना क्वॅकरीच्या आणि सुडोसायन्सच्या पातळीवर आणून ठेवणे वस्तुनिष्ठ वाटत नाही.
कोणत्याही निराश करणार्‍या आणि पूर्ण "क्युअर" उपलब्ध नसलेल्या आजाराबाबत स्वतःला लॅबमधला प्राणी अथवा अश्या प्रॉडक्ट्सचा भावनिक बळी होऊ देऊ नये हे ठीकच आहे पण 'आलीया भोगासी' म्हणून उपाय अशक्यच आहेत असे समजून चालणे आणि सर्वच नवीन उपचारपद्धतींबद्दल सिनिकल असणेही वस्तुनिष्ठ वाटत नाही.
प्रोग्रेसिव्ह सेकंडरी मल्टीपल स्क्लेरोसिस असलेल्या आणि स्वतः एम.डी.असलेल्या डॉ. टेरी वॉल्श स्वतःच्या आहारात अमूलाग्र बदल करून त्याआधारे प्रकृतीत अविश्वसनीय सुधारणा झाल्याने त्याचा प्रसार करतात हे पाहिले की ज्या व्यक्तीला मल्टीपल स्क्लेरोसिस असतो त्याला वस्तुनिष्ठपणेही यामार्गाचा वापर करून पहावासा वाटला तर त्यात चुकीचे काय आहे? शिवाय हा मार्ग म्हणजे काही उपासमारी नाही किंवा ज्याचे संभाव्य धोकादायक परिणाम असतील अशी सिद्ध न झालेली आणि अतिमहाग औषधे नाहीत. अपेक्षित सुधारणा न दिसल्यास किंवा पोटाला त्रास झाल्यास आपला पूर्वीचाच आहार चालू ठेवण्याचा पर्यायही आहेच मग भावनिक बळी कसला? अशा पध्दतीकडून फार अपेक्षा ठेवणे आणि अपयश आल्याने निराशा येणे हा धोका असू शकतो पण वस्तुनिष्ठपणे विचार करणार्या व्यक्तीला ते टाळता येतच.
असो, ऑटिझम आणि जी.एफ. डायटबद्दल काही माहिती नसल्याने इथेच थांबते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यावर एन्कॅश करणारे आणि त्याचे सरसकटीकरण करणारे काही जण असतीलही पण म्हणून सरसरट अशा संशोधनांना क्वॅकरीच्या आणि सुडोसायन्सच्या पातळीवर आणून ठेवणे वस्तुनिष्ठ वाटत नाही.

सहमती. नावांमुळे किंवा कोणीतरी सांगितल्यामुळे (होलिस्टीक वगैरे) उपचारांना बळी पडू नये हे म्हणणे एक टोक आणि सर्वच नविन संशोधन अविश्वासार्ह आहे हे म्हणणे दुसरे टोक. ज्या आजारांबद्दल संशोधन चालू आहे त्याबद्दल उलटसुलट बातम्या येणार, त्याचे फायदे तोटे आपल्याला कळणार हे साहजिकच. पण आता जी प्रमाण मानली गेलेली औषधं वा उपचार आहेत ते याच चाचण्यातून तावून सुलाखून निघालेले आहेत. जोवर तसे होत नाही तोवर काळजीपूर्वक, विचारकरून पावलं टाकावित हे म्हणणे बरोबरच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

गविंशी सहमत.

अजुन अक काळजी घ्यायला हवी ती म्हणजे अन्नांच्या ज्या जाती/ प्रकार मागे पडले त्यांचा ही आधी पूर्ण अभ्यास होणे गरजेचे आहे. त्यांच्यातही काही धोकादायक गोष्टी असु शकतात.

आणि एक सरळ साधी गोष्ट कायम लक्षात ठेवावी. मॉडर्न मेडीसीन च्या मागचा मोठा जोर संशोधन करणे आणि त्या द्वारे जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवणे हा आहे. पण त्याच बरोबर त्यांना रेग्युलेशन ला पण सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रुव्ह करायला अशक्य असलेल्या थियरी मांडुन त्याचे पैश्यात रुपांतर करता येत नाही.
तसेच मॉडर्न मेडीसिन ला नविन काही स्वीकार करणे ह्यात काहीच आक्षेप नाहीये. त्यामुळे जर एकाजरी पर्यायी औषधात ह्या प्रचंड मोठ्या कंपन्यांना शास्त्र दिसले तर त्या ताबडतोब मागे लागतील आणि स्वताची पेटंटेड प्रॉडक्ट्स आणुन ( म्हणजे मॉडर्न मेडीसीन चा भाग बनवुन ) पैसे मिळवतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रूची यांच्या सर्व प्रतिसादांशी मी सहमत आहे.

गवि, तुमची कळकळ पोचली. म्हणूनच आम्ही या सर्वाला दीड वर्ष लावले. तोपर्यंत भरपूर पुस्तके वाचून, लोकांचे अनुभव ऐकून - मुख्यतः केवळ डाअएट चेंजेसने होणारे छोटे छोटे सकारात्मक बदल हे मला फार महत्वाचे वाटातात.

आता नीट पाहू. सपोज एखाद्याला दाण्याची / एगची अ‍ॅलर्जी आहे. ते खाल्ल्याने रॅश येतो, ओठ सुजतात, क्वचित श्वासनलिका सुजून श्वास घ्यायला त्रास होतो. ती व्यक्ती काय करेल? ते पदार्थ टाळेल , हो ना? की असं काही नसतं , ही क्वॅकरी आहे, फॅड आहे म्हणून तेच पदार्थ खाऊन स्वतःला त्रास करून घेईल? याचे उत्तर नाहीच येईल. ते पदार्थ तो माणुस टाळायला बघेल. या अ‍ॅलर्जीजबद्दल मी पुढील लेखात नीट लिहीले आहे. पण थोडक्यात ग्लुटेन सेन्सिटीव्हिटीने त्या व्यक्तीला दृश्य रॅश वगैरे त्रास नसेल परंतू बिहेविअर चेंजेस होत अस्तील तर त्या व्यक्तीने ग्लुटेन टाळावे हेच बरे. नाही का? मग ब्लड टेस्ट करून ग्लुटेन सेन्सिटीव्हिटी आहे का हे शोधता येत असेल तर त्यात क्वॅकरी काय आहे? विचार करा. इतके व्हॅक्सिनेशन स्केज्यूल का असते? फ्लू चा शॉट आपण लहानपणी घेतला होता का कधी? मला एव्हढंच म्हणायचे आहे, हे जे क्वेश्चनिंग आपण नवीन पद्धतींवर करतो तसेच रूळलेल्या पद्धतींना क्वेश्चन केले पाहीजे. साधे डाएट चेंजेस करण्यामध्ये एखाद्या डॉक्टरला झटकून टाकण्याइतके गैर काय वाटते? सपोज मी चायनामध्ये राहून त्या डॉक्टरला सांगितले की मी ऑक्टोपस खाणार नाही (फॉर व्हॉटेव्हर रिझन) तर म्हणेल का, नाही तुम्ही खाल्लाच पाहीजे. ऑक्टोपस न खाल्ल्याने काहीही वेगळे फायदे मिळत नाहीत. अरे पण आम्ही नाहीच खात! तसेच आम्ही ठरवले की आम्ही जीएफ्/सीएफ डाएट खाणार, तर कोणाला त्यात आडकाठी करण्याची गरज का वाटावी? आम्ही काही मुलाला उपाशी ठेवणार नाही आहोत. उलट जास्तीत जास्त पोषक अन्न कसं जाईल हे बघत आहोत. सेव्हन सीज नावाच्या कॉड लिव्हर गोळ्या मी देखील वाढीच्या काळात घेतल्या. मग फिश ऑईल्/कॉड लिव्हर ऑईलचे सप्लिमेंट देण्यात काय प्रॉब्लेम आहे? आणि त्याने आय काँटॅक्ट सुधारतो, समज सुधारत आहे असं जर पालक येऊन सांगत असतील तर त्यावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे?

ज्या गव्हावर आपण इतका विश्वास टाकत आहोत, तो गहू गेल्या काळात किती बदलला हे समजून घ्यायचे असेल तर 'व्हीट बेली' नावाचे पुस्तक वाचा. काही जनरेशन्स पूर्वी जो उत्तम प्रतीचा गहू मिळायचा तसा तो आता नसतो.सध्या विविध पेस्टीसाईड्स असतात. हे मी विशेषतः अमेरिकेचे बोलत आहे. भारतात नक्की काय परिस्थिती आहे माहीत नाही. परंतू इथे पूर्वी मिळणारी चिकन अ‍ॅव्हरेज साईजची असायची, आता चिकन ऑन स्टेरॉईड्स वाटते. पूर्वी गाईम्हशी चारा खायच्या, आता त्यांना कम्पल्सरी कॉर्न खायला घातला जातो जे अनैसर्गिक आहे, त्यामुळे जे दूध मिळते तेदेखील पूर्‍वी मिळणार्‍या दुधाइतके पोषक नसते. शिवाय गाईंना ग्रोथ हार्मोन्स टोचलेले असतात, असे दूध प्यायल्याने सध्याच्या जनरेशनमध्ये अगदी लहान मुली वयात येण्याचे प्रमाण वाढले आहे. साखरेपेक्षा स्वस्त व पूर्णपणे लॅबमध्ये तयार केलेल्या हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरपने किती लोकांना ओबेसिटी व इन्शुलिन प्रॉब्लेम्स सहन करावे लागले असतील. ही उदाहरणं फार बेसिक कॉमन सेन्सची आहेत. मलातरी ह्यात काहीच चुकीचे वाटत नाही. मुलाला ऑटीझम होण्यापूर्वीपासून मी व्हाईट ब्रेड खाणे बंद केले, पण कदाचित होल व्हीट ब्रेड देखील चुकीचेच आहे. कारण सध्याच्या गव्हाची प्रत. जर शेतातल्या रोपांवर, गव्हावर खताची फवारणी करताना प्रॉपर मास्क लावला जातो जेणेकरून ते नाका-तोंडावाटे अजिबात शरीरात जाऊ नयेत, तर ते त्या पेस्टीसाईड फवारलेल्या भाज्या/ग्रेन्स खाण्याचे किती दुष्परिणाम असतील? त्या भाज्या कितीही धुतल्या तरी त्या पेस्टीसाईडस विरहीत आहेत याची काय गॅरंटी? ज्या ज्या सिझनला जे फळ येते त्याव्यतिरिक्त सिझनला जेव्हा फळे मिळतात दुकानात तेव्हा ती जगवण्यासाठी, टिकवण्यासाठी त्यावर किती पेस्टीसाईड्स असतील? त्यामुळे ऑर्गॅनिक व सिझनल खाणे हे महत्वाचे आहे.

ज्याचे शरीर सुदृढ आहे, ज्याची इम्युन सिस्टीम मजबूत आहे, ज्यांच्याकडे उपयुक्त जीवजंतू शरीरात आहेत, त्यांचयसाठी कदाचित वरच्या गोष्टींने इतका वाईट फरक पडणार नाही. परंतू ऑटीझम स्पेक्ट्रमवरील मुलांकडे उपयुक्त जीवजंतू कमी असतात, ग्लुटेन्स सेन्सिटीव्हिटी असताना देखील खाल्लेल्या व्हीटमुळे इन्फ्लॅमेशन झाले असेल, तर अशा दुषित भाज्या,फळे खाल्ल्यानंतर ती टॉक्सिन्स त्यांचे शरीर पूर्णपणे शरीराबाहेर टाकू शकत नाही. 'लीकी गट' असेल तर हेच टॉक्सिन्स त्यांच्या ब्लडमधून ब्रेनमध्ये पण जाऊ शकतात. व त्यामुळेच हे सर्व बिहेविअर प्रॉब्लेम्स, ऑटीझमलाईक सिम्प्टम्स दृष्टीला पडतात. मग असे होऊ नये, म्हणून त्यांना उपयुक्त जीवजंतू देण्यासाठी प्रोबायॉटीक सप्लिमेंट देणे, इन्फ्लॅमेशन होऊ नये म्हणून ग्लुटेन फ्री आहार देणे हे केल्यास पॉझिटीव्ह फरक पडलेला दिसत असेल तर हे मान्य का होऊ नये? बर यासाठी सर्व ब्लड तपासण्या देखील करतात हे डॅन डॉक्टर्स.. (डॅन डॉक्टर्स म्हण्जे कोणी वैदू नाही. प्रॉपर मेडीसिन शिकलेले एम्डी झालेले परंतू नवीन वाटांना सामोरे जाणारे डॉक्टर असतात ते.)
समोर आकडे(रिझल्ट) दिसत असताना त्या मुलाचे बिहेविअर मधले पॉझिटीव्ह बदल दिसत असताना ते अमान्य करणे हे माझ्यासाठी अनाकलनिय आहे. हा विषय खूप व्हास्ट आहे. अजुन मोस्ट डॉक्टर्स ह्या वाटेला जात नाहीत म्हणून ही पद्धती चुकीछी अथवा क्वॅक हे मला पटत नाही. ज्यांना हे बेसिक चेंजेस करून फरक पडतो, मुलांचय स्पीचमध्ये सुधारणा होतात ते काय आहे मग? को-इन्सिडन्स? आय डोन्ट थिंक सो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0