आश्चर्यकारक विज्ञान

आश्चर्यकारक विज्ञान या नावाने प्रकाशित केलेल्या या संचातील भुलभुलैय्या, महाशक्तीशाली लेसर, उर्जानाट्य,व अलिबाबाची गुहा ही विज्ञानविषयक पुस्तकं वाचत असताना आताच्या नवीन पिढीचा हेवा वाटू लागतो. कारण २०-३० वर्षापूर्वी आपल्या मनातील कुतूहलकारक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी, पालक, भाऊ-बहीण, त्यांचे मित्र-मैत्रिणी, शिक्षक, पाठ्य पुस्तकं, संदर्भ ग्रंथ, वाचनालय यांच्याकडे हेलपाटे घालावे लागत होते. (व त्या उत्तरावाचून काही अडत नाही हे लक्षात आल्यानंतर गप्प बसावे लागत होते.) परंतु आज गूगल अंकल एका क्लिकमध्ये सर्व माहिती तुमच्या डोळ्यासमोर हजर करतो. परंतु या माहितीला चाळणी लावून नेमके आपल्याला काय हवे, काय नको हे अजूनही समजत नाही. आणि ही माहिती फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून उपलब्ध असल्यामुळे तज्ञांनी लिहिलेल्या मुद्रित पुस्तकांना पर्याय नाही असेच म्हणावे लागेल.

विज्ञानाचा आवाका आणि पसारा लक्षात घेतल्यास मन भरून जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना काहीना काही प्रश्न विचारावेसे वाटतात. आणि प्रश्नांना उत्तरं मिळाली की आणखी कुतूहल निर्माण होऊन न संपणारी मालिका मनात घर करून बसते. लहान मुलांपासून शैशवावस्थेतील विद्यार्थ्यांना नेहमी पडणाऱ्या प्रश्नांना समजून घेऊन त्याची उत्तरं या पुस्तकांचे लेखक, प.रा. आर्डे या प्राध्यापकांनी संकलित केलेले आहेत.

काही प्रश्न चमत्कारसदृश गोष्टींचा उलगडा करून घेण्यासाठी विचारलेले असतात. भुलभुलैय्या या पुस्तकात अशा प्रकारच्या चमत्कारांच्या मागील विज्ञान उलगडून सांगितलेले आहे. पाण्याच्या पृष्ठीय ताणाचा गैरफायदा घेत गणपती दूध पितो या अफव्यामागील विज्ञान ते समजून सांगतात. पाण्याने दिवा कसा पेटवतात याचे वैज्ञानिक स्पष्टीकरण ते देतात. अशाच प्रकारे लिंबातून जाळ कसा काय निघतो, आगीवरून (काही क्षणच) चालल्यास तळवे का भाजत नाहीत, उंबराला फूल लागले म्हणून कशी फसगत केली गेली, टोकदार खिळ्यावर झोपण्याची किमया कशी केली जाते, एका भाकरीचे दोन भाकऱ्या कसे केल्या जातात, मेलेला साप चावला म्हणून पैसे उकळणाऱ्याचे भांडा फोड असे अनेक गमतीदार किस्से या पुस्तकात असून दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये याचा प्रत्यय पुस्तक वाचताना आपल्याला येतो.

मानवाची गरज ही नव्या संशोधनाचा पाया असते व अशा प्रकारचे संशोधन हाही कुतूहलाचा विषय असू शकतो. शत्रूच्या विमानाचा वेध घेण्यासाठी लेसर यंत्रणेचा वापर आरोग्य, दळणवळण, व संशोधन या विधायक क्षेत्रातही होत आहे. या चमत्कारसदृश किरणांचा इतिहास मोठा मनोरंजक आहे, याची कल्पना महाशक्तीशाली लेसर हे पुस्तक वाचत असताना येते. या संदर्भात लेसर किरण महाशक्तीशाली कसे, लेसर प्रिंटर अधिक प्रभावी कसा, लेसरनिर्मितीचे विज्ञान काय, लेसरने डोळ्यांची शस्त्रक्रिया का शक्य झाली, लेसरमुळे चंद्र ते पृथ्वी हे अंतर अचूकपणे मोजणे कसे शक्य झाले, युद्धात लक्ष्यांचा भेद लेसर कसे करते, भूकंप नोंदणी यंत्र, अग्नीनोंदक, लेसर दर्शक (पॉइंटर), लेसर शो, बार कोड, बर्ड डेटरंट इत्यादी उपकरणात लेसरचा वापर कसा केला जातो, अशा अनेक प्रश्नांचा ऊहापोह या पुस्तकात केला आहे.

लहान मुला-मुलींना नेहमी पडणाऱ्या काही कुतूहलजनक विज्ञान विषयीच्या प्रश्नांना उत्तरं लेखक उर्जानाट्य या पुस्तकात देत आहेत. ढग खाली का पडत नाही, सोनोग्राफी म्हणजे नेमके काय असते, ध्वनी प्रदूषण कसे मोजले जाते, अंतरिक्ष प्रवास कसा शक्य झाला, गुरुत्व बल नसते तर, शनीला पळवून लावणं शक्य आहे का, सोन्याच्या मुकुटामधील भेसळ आर्किमिडीजने कशी ओळखली, पृथ्वीला उचलून दाखवणे शक्य आहे का, गॅरेजमध्ये दुरुस्ती करताना कार कशी उचलली जाते, निळा प्रकाश देणारे LED बल्ब कसे काम करतात, चंद्र आपल्याबरोबर पळतो कसा, पक्षी उडतात, मग माणूस का उडू शकत नाही, अशा प्रकारचे अनेक प्रश्न विद्यार्थी वयात (आणि मोठेपणीसुद्धा) आपल्याला विचारावेसे वाटत असतात. अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तर वाचत असताना नैसर्गिक नियम, व माणसातील संशोधक वृत्तींचे कौतुक करावेसे वाटते.

अलीबाबाची गुहा
हे पुस्तक रसायनांच्या प्रतिसृष्टीमुळे माणसाचे जीवन कसे बदलले याचा मागोवा घेत आहे. दैनंदिन जीवनातील सकाळी दात घासण्यासाठी वापरात येणाऱ्या टूथ ब्रश व टूथ पेस्ट पासून रात्री झोपण्यापूर्वी रिमोट हातात घेवून सर्फिंग करत असलेल्या टीव्हीपर्यंतच्या शेकडो गोष्टीत रसायनांची रेलचेल असते. या गोष्टींचा उलगडा लेखक आपल्याला या पुस्तकातून करून देत आहेत. त्याचबरोबर जेनेटिक्स, क्लोनिंग, युजेनिक्स, ऑस्मॉसिस या संकल्पनांचा परिचय ते करून देत आहेत. पण सर्वच रसायनं आपणाला सुख आणि आनंद देतात का हाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे रसायनांनी निर्माण झालेल्या प्रतिसृष्टीला नीट ओळखायला हवे व तिचा योग्य वापर करायला हवा हा इशाराही ते येथे देत आहेत.

साधी सोपी भाषा व वैज्ञानिक संकल्पनांच्या स्पष्टीकरणाला आवश्यक असलेले क्लिष्ट गणितीय समीकरणे टाळून समर्पक उत्तरं थोडक्यात दिल्यामुळे ही सर्व पुस्तकं अत्यंत वाचनीय झालेले आहेत. लेखकानी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे विज्ञान आपल्या संस्कृतीवर प्रामुख्याने तीन प्रकारे परिणाम करीत आले आहे. पहिला परिणाम म्हणजे भौतिक सुबत्ता, दुसरा परिणाम म्हणजे हे जग कोणत्या नियमांनी चालते याचे ज्ञान व सगळ्यात महत्वाचा परिणाम म्हणजे विश्वाबद्दलचा एक नवा दृष्टिकोन. पूर्वापार चालत आलेल्या चुकीच्या रूढी आणि गैरसमजुती दूर होण्यासाठी दैववादी दृष्टिकोन जाऊन वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यास विज्ञानाने मोलाची मदत केली आहे.
कदाचित ही व असली पुस्तकं वाचून आजच्या पिढीत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजत असल्यास लेखकाचे प्रयत्न वाया गेले नाहीत असे नक्की म्हणता येईल.

१.अलिबाबाची गुहा २. उर्जानाट्य ३. महाशक्तीशाली लेसर ४.भुलभुलैय्या
लेखकः प्रा. प.रा. आर्डे
प्रकाशकः सृजन प्रकाशन, सांगली (मोबाइलः ७२१९६००५०३)
किंमतः प्रत्येकी ७० रुपये, पानेः प्रत्येकी सुमारे ६०

right

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान माहिती - धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशी पुस्तके जास्तीतजास्त मुलांनी वाचली पाहिजेत, तसेच विज्ञान शाखेकडे न गेलेल्या प्रौढांनीही ती जरुर वाचावीत म्हणजे अंधश्रद्धा गळून पडतील.
सध्या कुठल्याशा चॅनेलवर एक पानवाला, गिर्‍हाईकांच्या तोंडात, जळते पान कसे कोंबतो, हे वारंवार दाखवत आहेत. पण त्याचे वैज्ञानिक स्पष्टीकरण फक्त डिस्कव्हरी चॅनेलवरच दाखवत होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

How come surface tension of water was keenly observed by people only on one specific day in human history? Isn't use of water too abundant, too frequent to observe all about it in routine course? Is there anything specific about Ganapati shape (any capillary or any curvature) that is extra-ordinary?
Didn't people notice usual surface tension?
Why weren't these people challenged on the spot?
Do people now accept that Ganapati is supposedly drinking milk the same way from that date onward (as the effect can be demonstrated repeatedly)?
Can a whole nation be stupid?
Can a whole nation accepted a NEW superstition overnight?
Did muslims also see the milk drinking? How did they react?
=============
How can surface tension cause assimilation effect across idols of various makes, designs, materials, shapes, etc?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.