Skip to main content

वैज्ञानिक

गणितस्य कथा: रम्या: |

एकंदरीत मानवी संस्कृतीच्या प्रगतीमध्ये गणित या विषयाचा सिंहाचा वाटा असूनही गणित, गणितज्ञ, आणि गणिताचा इतिहास या बाबतीत समाजात सर्वसाधारणपणे अनभिज्ञता आढळते. अच्युत गोडबोले आणि माधवी ठाकूरदेसाई या लेखकद्वयीनं मात्र या परिस्थितीला छेद देऊन अगदी अनादी काळापासून ते आजच्या आधुनिक उच्चस्तरीय गणितापर्यंतच्या या विषयाच्या प्रवासातले महत्वाचे टप्पे, ते गाठण्यात महत्वाचा वाटा असणारे गणितज्ञ आणि एकूणच गणिती प्रक्रियेचा गुंतागुंतीचा इतिहास वाचकांपुढे रंजकपणे मांडला आहे – त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडके!

- डॉ. श्रीकृष्ण दाणी

समीक्षेचा विषय निवडा

पुस्तक परिचय – विज्ञानाच्या दृष्टीकोनातून चार्वाकवाद आणि अध्यात्म


पुस्तक परिचय – विज्ञानाच्या दृष्टीकोनातून चार्वाकवाद आणि अध्यात्म

फोटोत डावी कडून श्री. श्री श्री भट, शशिकांत ओक, डॉ. प.वि. वर्तक आणि धनुर्धारीचे संपादक-मालक श्री सापळे

समीक्षेचा विषय निवडा

मेंदूचे अंतरंग

मेंदू हे माणसाला पडलेले सगळ्यात अवघड कोडे आहे. या कोड्याचे उत्तर पुन्हा मेंदूतच दडलेले आहे !
आपल्याला स्वप्न का पडतात? हरवून जातो? स्मरणरंजनात आपण इतके का हरवतो? सूड घ्यायची इच्छा मनात का निर्माण होते? आपण प्रेमात का पडतो? सगळ्या भावभावना हा जर मेंदूतल्या रसायनांचाच खेळ असला तर मग आपल्या हातात काय असतं? या प्रश्नाची उत्तर शोधायला जितकं खोल जावं तितकं गुंत्यात अधिकच अडकायला होतं!

समीक्षेचा विषय निवडा

चिकित्सा : ‘उत्क्रांती, एक वैज्ञानिक अंधश्रद्धा’ ठरवणाऱ्या समजुतींची

स्त्रीरोगतज्ज्ञ आणि साहित्यिक डॉ. अरुण गद्रे यांचे ‘उत्क्रांती : एक वैज्ञानिक अंधश्रद्धा?’ हे 2021 मध्ये प्रसिद्ध झालेले पुस्तक उत्क्रांतीचा सिद्धांत ही एक ‘वैज्ञानिक अंधश्रद्धा असल्याचे’ सिद्ध करू पाहते. गद्रे यांच्या नजरेतून उत्क्रांती-सिद्धांतामधील उणिवा काय आहेत हे सांगून प्रकाश बुरटे यांनी त्यांचा प्रतिवाद केला आहे.

समीक्षेचा विषय निवडा

"अशीही एक झुंज" - एका महत्त्वाच्या पुस्तकाचा परिचय

आफ्रिकेत एड्सचे स्वरूप भयंकर होते. सिप्ला या भारतीय कंपनीमुळे अतिशय कमी खर्चात आफ्रिकेत एड्स आटोक्यात आणणारी औषधे उपलब्ध झाली. भयानक पसरलेल्या एड्सची साथ आटोक्यात आणण्यात थोडेफार यश प्राप्त झाले. आफ्रिकेतील या झुंजीविषयीच्या मृदुला बेळे लिखित पुस्तकाचा परिचय.

समीक्षेचा विषय निवडा

‘And the Band Played On’ - एड्स, राजकारण आणि समाजकारण

'अँड द बँड प्लेड ऑन' हे पुस्तक वाचेपर्यंत एड्स साथीच्या इतिहासाबद्दल संकलित आणि सखोल असे काहीही वाचनात आले नव्हते. पुस्तक खूप सखोल आणि व्यापक आहे. एका रोगाची साथ अमेरिकेत कशी पसरत गेली, कशी पसरवू दिली गेली याचा उत्तम आढावा या पुस्तकात दिला गेला आहे.

समीक्षेचा विषय निवडा

व्हायरस, करोनाव्हायरस, आणि इतर काही – डॉ. योगेश शौचे

व्हायरसविषयी संशोधन करणारे शास्त्रज्ञ डॉ. योगेश शौचे यांच्याशी 'ऐसी अक्षरे'ने करोनाव्हायरसच्या निमित्ताने संवाद साधला. व्हायरसविषयी, विशेषतः करोनाव्हायरस आणि सध्याच्या साथीविषयी विचारलेल्या प्रश्नांची डॉ. योगेश शौचे यांनी सोप्या शब्दांत, विद्वत्तापूर्ण आणि दिलखुलास उत्तरं दिली.

करोनाव्हायरस, लस आणि आपण सगळे - डॉ. राजीव ढेरे (भाग २)

कोरोना हा केवळ जास्त धोकादायक फ्लू आहे का? लशीकरण झाल्यानंतरही मास्क आणि सोशल डिस्टंसिंग पाळावं लागेल का? या आणि इतर तांत्रिक प्रश्नांची उत्तरं देत आहेत सीरम इन्स्टिट्यूटचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर डॉ. राजीव ढेरे.

करोनाव्हायरस, लस आणि आपण सगळे - डॉ. राजीव ढेरे (भाग १)

सीरम इन्स्टिट्यूट जगातली व्हॅक्सिन तयार करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. सर्वसामान्य माणसाच्या मनात ज्याची उत्सुकता मोठ्या प्रमाणावर आहे तो प्रश्न म्हणजे कोरोनाची लस सर्वसामान्य लोकांच्याकरता बाजारात कधी उपलब्ध होणार? या आणि इतर तांत्रिक प्रश्नांची उत्तरं देत आहेत सीरम इन्स्टिट्यूटचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर डॉ. राजीव ढेरे.