आईसक्रीम

‘टबुडी टबुडी’ चाच (http://aisiakshare.com/node/2239) हा पुढचा भाग आहे असे समजावे, म्हणजे पुन्हा सर्व पात्रांची ओळख करुन द्यायची आवश्यकता नाही.

तो वेडा जागा सोडून गेल्यावर तिथे दुसरे एक श्रीमंत गुजराती कुटुंब रहायला आले. त्यांचा बहारिनला मोठा धंदा होता. कुटुंब मोठे, मुख्य मोटाभाई म्हणजे आसुभाई, दोन तीन महिन्यांनी कधी एखादा आठवडा घरी यायचे. त्यांचे धाकटे भाऊ, नवीन आणि खिमन, मुंबईतला बिझिनेस सांभाळायचे. एक बहीण, बायको आणि दोन मुली आणि तीन मुले, शिवाय एक म्हातारी दमेकरी आई. त्यांचा सर्वात धाकटा मुलगा माझ्या बरोबरीचा असल्यामुळे, आम्ही दोघं खूप खेळायचो. ते खूपच श्रीमंत असल्यामुळे आमच्यापासून थोडे अंतर राखून असायचे. आईनेही आम्हाला त्यांच्या घरांत, बोलावल्याशिवाय कधी जायचे नाही, अशी सक्त ताकीद देऊन ठेवली होती. मात्र, बिनाका गीतमाला ऐकायला ते आम्हा मुलांना बोलवायचे आणि आम्ही तिन्ही भावंडे तो एक तास, अतिशय आनंदात घालवायचो. आमच्या सर्व शेजार्‍यांचा एक चांगुलपणा म्हणजे, दर रविवारी आमच्या घरी जी 'रविवारची सकाळ' भरायची, त्यातले गवई कितीही जोरात गायले, तबला भरपूर बडवला, तरी कधीही तक्रार करत नसत. आमच्या दारासमोरच्या गॅलरीत चपला-बुटांचा खच पडलेला असे, तोही मुकाटपणे ओलांडून जाण्याचे सौजन्य त्यांच्यापाशी होते, किंबहुना, त्याकाळी व्यक्तिस्वातंत्र्य, पर्यावरण इत्यादी गोष्टींची गळवे समाजात फार दिसत नसत.

त्यांच्याकडे एक, हाताने फिरवायचे आईसक्रीम मशीन होते आणि त्यांत ते बर्‍याच वेळा आईसक्रीम करत असत. त्यांच्या मुलांबरोबर जवळच्या बर्फाच्या फॅक्टरीत, बर्फ आणायला आम्हीही जात असू. आईची ताकीद असल्यामुळे, आईसक्रीम खायला मात्र आम्ही कधीच जायचो नाही. एकदा, आम्ही आईकडे हट्ट धरला की आपल्याकडे आईसक्रीम करुया. बर्‍याच दिवसांच्या चालढकलीनंतर, आईने शेजारच्या 'बेन' ला आईसक्रीम पॉट देण्याची विनंती केली. त्यांनीही, 'कस्सु वांदो नथी' म्हणत, पाहिजे तेंव्हा ते देण्याचे कबूल केले. झालं, आम्ही अत्यंत आनंदाने, एका सुट्टीच्या दिवशी बेत ठरवला. बर्फ कुठे मिळतो ते आधीच माहीत होते. सकाळी आईने जास्त दूध घेऊन ते आटवायला सुरवात केली. सकाळपासून आम्ही भावंडे आनंदावर तरंगत होतो. मी साधारण पांच वर्षांचा होतो. बाहेरच्या कॉमन गॅलरीत माझी तीनचाकी चालवत होतो. त्याकाळी सगळ्यांची दारे दिवसा उघडीच असायची. अचानक, शेजारच्या घरातून त्यांचा खिमन, हातात आइसक्रीम पॉट घेऊन बाहेर पडताना दिसला. मी सायकल थांबवून आ वासून त्याच्याकडे पहायला लागलो. तो झपाट्याने माझ्या बाजूने चालत गेला पण, आमच्या घरांत न शिरता, वेगाने जिन्याच्या पायर्‍या अलगद उतरुन गेला. मी पटकन कठड्याशी येऊन बघितले तर तो वाडीच्या गेटबाहेर पडलेला दिसला. मी दुसर्‍या क्षणी घरांत धूम ठोकली आणि आईला, बघितलेला सर्व प्रकार सांगितला. प्रथमतः तिचा विश्वासच बसला नाही. त्याच्या हातात नक्की आईसक्रीम पॉटच होतं का, हे पुन्हापुन्हा विचारले. मी मात्र, माझ्या सांगण्यावर ठाम होतो. आई म्हणाली, "अरे, ते श्रीमंत लोक आहेत, त्यांच्याकडे दोन मशीन सुद्धा असतील." थोडावेळ ती बाकीचे काम करत राहिली. मग मात्र, तिला रहावेना. तिने शेजारी जाऊन सरळ बेन ला विचारले. बेनचा चेहेरा पडला होता. त्या म्हणाल्या, " सूं करु मालतीबेन, आमच्या जवळचे नातेवाईक आहेत, त्यांनाही आजच आईसक्रीम करायचं आहे. म्हणून पाठवावं लागलं." बेन ना, आईच्या नजरेला नजर देणे जड जात होते. आई निमूटपणे परत आली. तिने आम्हाला तिघांना जवळ बोलावून सत्य परिस्थिती सांगितली. आम्ही तिघांनीही कसलाही हट्ट केला नाही. त्या रात्री आम्ही आटीव दूध पिऊन 'कोजागिरी' साजरी केली. दुसरा दिवस उजाडला. नाना ऑफिसला गेले, बहिणी शाळेत गेल्या. मीही दिवसभर खेळलो. संध्याकाळी परवचा म्हटल्यावर, अर्ध्या तासात नाना घरी येत. त्यादिवशी मात्र एक तास झाला तरी ते आले नाहीत. आई मात्र वाट पहात नव्हती. रात्री नऊ वाजता जिन्यावर पावले वाजली. नाना घरांत शिरले. त्यांच्या हातात, एक कागदात गुंडाळलेली जड वस्तु दिसत होती. त्यंनी आधी दरवाजा बंद केला. आम्हाला जवळ बोलावले आणि कागद बाजूला केले. आंत, नवे कोरे आईसक्रीम पॉट होते. आम्ही आश्चर्याने दोघांच्या तोंडाकडे बघत होतो. आई-नानांच्या चेहेर्‍यावर मंद स्मित आणि समाधान होते.
आयुष्यातला एक मोठा धडा आम्ही तिघं शिकलो होतो, शेजार्‍यांकडून आणि आई-नानांकडूनही!

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

वाह

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ये बात, तिमा!

जी ए कुलकर्णी यांची 'फेड' कथा आठवली!

(अवांतर: ऐसीवर ललित महोत्सव चालू आहे का?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अरे वा! मस्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सुंदरच.

एक गोष्ट मला नेहमी बुचकळ्यात पाडते ती म्हणजे जर व्यक्तीस्वातंत्र्याला जर सर्वोच्च मुल्य न मानता मिळून मिसळून रहाता येण्याला चांगले म्हणायचे असेल तर अश्या प्रकारे कोणी स्वत्:ची गोष्ट दुसर्याला (त्याला हवी त्या वेळेस) न देण्याचा हक्क बजावत असेल तर त्याबद्द्ल वाईट वाटण्याहून जास्त म्हणजे मानहानी झाल्यासारखे का वाटत असावे?

समजा, खरच बेनच्या अगदी घरातल्या कोणाला ते भांडे त्याच दिवशी हवे असेल म्हणून द्यावे लागत असेल आणि ते देण्याआधी आईला तिने तसे सांगितले असते तर आईला तो अपमान वाटला असता की नसता?

समजा, खरच बेनच्या अगदी घरातल्या कोणाला ते भांडे त्याच दिवशी हवे असेल तरी शेजारणीला द्यायचे आहे म्हणून तिने द्यायचे नाकारले तर तिच्या घरात तिला नावे ठेवली गेली असती किंबहुना तसे नाकारायचे पूर्ण स्वातंत्र्य तिला असेल का?

समजा बेन गरीब असती आणि आई श्रीमंत तर तिचं हे वागणं कितपत लागलं असतं? म्हणजे आपले परस्पर-संबध हे आर्थिक स्थितीवर अवलंबून असतात का?

भारतीय कुटुंबपद्धतीप्रमाणे भारतीय शेजारधर्म ही सुद्धा बर्^यापैकी गुंतागुंताची गोष्ट आहे का?

[ कथा उत्तमच आहे. त्यातल्या पात्रांनाही नावे ठेवायची नाहीत फक्त 'व्यक्तीस्वातंत्र्याची गळवे' हा शब्द आणि 'बेनला आईच्या नजरेला नजर देणे अवघड जात होते' हे वाक्य यामुळेच आलेल्या शंका. ]

(चला. बर्‍६याच दिवसांनी येणे सार्थकी लावले. आता पळा.......)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटतं व्यक्तिस्वातंत्र्य हे मूल्य भारतीय संस्कृतीत स्वीकारार्ह आहे. पण "स्ट्रिक्टली विथ अ‍ॅडव्हान्स नोटीस"! म्हणजे बेनने "आमचं आईस्क्रीम पॉट आम्ही नै देत कोणाला" असं म्हटलं असतं तर तिमांच्या आईची प्रतिक्रिया फारतर "काय विचित्र / माणूसघाणी बाई आहे.." अशी झाली असती. अपमानही वाटला नसता आणि मानहानीही.

गरीब-श्रीमंत हा नाजुक भेद अर्थातच असतो. माझ्या लहानपणची एक आठवण आहे. आमच्या शेजारी (म्हणजे भिंतीला-भिंत-शेजार नाही, पण शेजार) एक कुटुंब रहात असे. माझ्याएवढाच मुलगा त्यांना. वरकरणी त्यांची आर्थिक स्थिती आमच्यासारखीच होती, पण ते काका कोणत्याशा सरकारी खात्यात होते, आणि 'वरचे' पैसे मिळत असत. त्या काळी त्या 'वरच्या लक्ष्मी'चं प्रदर्शन करायची चाल नसावी. तर ते काका मसाला दूध, फालुदा वगैरे (मित्राच्या भाषेत) 'भारीतल्या' गोष्टी गुप्तपणे घरी आणायचे, आणि दारंखिडक्या लावून घेऊन गोपनीयतेने ते कुटुंब त्या गोष्टींचा आस्वाद घ्यायचं! (त्यांच्या माळ्यावर दादर्‍यात गुंडाळलेला व्हीसीआरपण होता!) तर सांगायची गोष्ट - हा मित्र आम्हा बाकीच्या मित्रांना कमी लेखत असे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हा बर्राच वादाचा मुद्दा आहे. तिरशिंगरावांनी आधीच्या भागात त्यांचं वय, त्यांच्या भवतालचं वातावरण स्पष्ट करून दिल्यामुळे, 'व्यक्तिस्वातंत्र्याची गळवे' असं त्यांनी लिहीणं अपे़क्षितच आहे. दररोजच्या घटना पाहता, व्यक्ति'स्वैराचार' जो वाढलाय, त्यामुळे व्यथित होऊन त्यांनी तो शेरा दिला असावा. साधारणतः स्वातंत्र्योत्तर (भारदस्तक!) काळात जन्मलेल्या पिढीची मतं अशीच असतात, आणि त्यात बर्‍यापैकी तथ्यही आहे. (हेही माझंच मत.)
असो.
त्यांनी, जे शेजार्‍यांनी दिलेलं 'वचन' मोडलंय त्याबद्दल खंत व्यक्त केलेली आहे असं दिसतं. शिवाय ती म्हणजे अगदीच गरजेची वस्तू वगैरे नाही. (स्वतःची गाडी, एखादं औषध इ.) की, जे, 'त्यांनी आधी मागितलेलं असलं तरी' कुटुंबियांना प्राधान्याने देणं भाग पडावं. देण्याआधी सांगणं, म्हणजे स्वतः कबुली देणं फार मोठी गोष्ट आहे. (तिसर्‍याकडून कळण्यापेक्षा.)
आर्थिक परिस्थितीचा ह्यात काहीच संबंध नाही. कोणीही दिलेलं वचन मोडलं आणि त्याबद्दल पहिल्यांदा स्वत:च येऊन दिलगिरी व्यक्त केली नाही, तर ती व्यक्ती, कोणीही असली तरी टीकेस पात्र होते.

मला ह्या दोन्ही कथा फार फार आवडल्या. घरच्या परिस्थितीचं करूण करूण वर्णन नाही, उगीच कथांच्या शेवटी नसते हार्टब्रेक नाहीत. असं वाचायला मस्त वाटतं. त्यांनी जे सांगायचंय ते अत्यंत शुद्ध आणि सोप्या भाषेत, छान 'नॅरेट' केलेलं आहे. शिवाय शेवट छान असल्यामुळे अजूनच छान वाटलं. मला त्या लहानपणी ह्याचं अप्रूप कसं वाटलं, आणि ती गोष्ट कशी मिळाली नाही, आणि आपल्या पालकांनी मग काय केलं, नि आजकाल ती गोष्ट खूप मिळत असली तरी ह्या प्रसंगाची आठवण कशी आली, ह्या सानेगुरुजीछाप गोष्टींचा वात आलाय अक्षरशः. त्या पार्श्वभूमीवर, ही कथा एकदम आवडूनच जाते!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

एरवी तिरशिंगरावांचं लेखन पाहता ते टिपिकल वाटत नाहीत. त्यामुळे अंतराला पडलेला प्रश्न मलाही पडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी टिपिकल नक्कीच नाही. पण लेख लिहितेवेळी माझ्या मनांत गरीब्-श्रीमंत, असलं काही नव्हतं. चाळीत रहात असल्यामुळे, तेही असं काही जाणवू द्यायचे नाहीत. पण 'गरीब' पेक्षा सुद्धा, मराठी म्हणजे घाटी, अशी एक सूक्ष्म अढी त्यांच्यात असावी. लेखांत न लिहिलेलं एक सत्य आता उघड करतो. वरील घटना घडून गेल्यानंतर आईला असे खात्रीलायकरीत्या कळले होते की, फक्त त्या खिमनचाच आम्हाला ते पॉट देण्यास विरोध होता आणि तेंव्हा तो त्यांच्या घरातला तरुण तुर्क असावा. त्यामुळे त्याच्यापुढे कोणाचे चालले नाही. त्याने ते पॉट निव्वळ , आम्हाला द्यायचे नव्हते म्हणूनच नातेवाईकांकडे नेऊन ठेवले.
प्रश्न पॉट देण्याचा वा नाकारण्याचा नव्हताच मुळी, लहान मुलांचा हिरेमोड झाला, याचेच आईला दु:ख झाले. आणि यापूर्वीही कुठलीच गोष्ट, त्यांच्याकडे मागितली नव्हती आणि तो नियम तिला मुलांसाठी मोडावा लागला, याचे पण दु:ख झाले असावे, कारण ती खूपच मानी होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता तुमच्या वाक्याचा अर्थ आणखी चांगला समजला. ज्यांच्याबद्दल प्रेम, आपुलकी असतात त्यांच्यासाठी व्यक्तिस्वातंत्र्य ही गोष्ट आपण थोडी गुंडाळून ठेवतो. तशा संदर्भात ते वाक्य लिहिलं असावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख आवडला हे वर लिहीलं होतंच. ज्या दोन कथनात विरोधाभास जाणवला तो दाखवला एवढंच. मानी स्वभावाच्या आईची होणारी कुचंबणा पोचली.

भारतीय कुटुंबपद्धती, शेजारधर्म वैगेरेबद्द्ल फार फार अभिमान बाळगण्याचे आणि गेले ते दिन म्हणून हळहळ व्यक्त करण्याची लागण दिसते त्याबद्द्ल मला चर्चा उकरून काढायची होती. पण सगळे लेखातच अडकल्याने आणि मीही ऐसीवर न आल्याने तसं झालं नाही.

माझे आईवडील अलीकडे जुन्या गोष्टी बर्^याच बोलत असतात. पूर्वीसुद्धा दहादा बोलल्या गेलेल्या साध्या घटनांबद्दल ते विषादपूर्ण सूर लावतात. पूर्वी साध्या समजल्या गेलेल्या घटना त्यांनी सहजपणे स्वीकारल्या असं तेव्हा वाटलं होतं पण त्यांचे घाव खोल गेलेत हे जाणवतं.
भारतीय कुटुंबपद्धती, प्रेमळपणा, उच्चनीच या बाबतीतल्या सरळ सरळ व्यावहारिक आणि कोरड्या वाटणार्^या माझ्याच कल्पना बरोबर होत्या हे जाणवू लागतं. भारतीय कुटुंबपद्दती व्यक्तीला ना नीट मनाने आणि मानाने जगू देत ना दुर्लक्ष करून मरू देत.

आता ह्या लेखाचा कुटुंबपद्धतीचा काय संबध असं म्हणाल तर जे कुटुंबाबद्द्ल तेच शेजारधर्माबद्द्ल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेवटच्या परिच्छेदात मी म्हटलंय मला काय वाटतं ते. असं लेखन आजकाल दुर्मीळ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

या शेजारधर्माबद्दल काही म्हणी ,उपयुक्त सल्ले वगैरे काहींच्याकडे पिढ्यानपिढ्या पुढे दिले जातात. हे सल्ले ते सर्वांना सांगत सुटत नाहीत॥ काही तोडगेही असतात. क्वचितच याबद्दल ते वाच्यता करतात. "बीजा एक मासीना त्या आजच पार्टी छे एटले पॅाट मोकलाव्यु पड्यू" हा त्यातलाच एक नाही म्हणण्याचा तोडगा. द्यायला वेळ लावणे, दुसरं खेकट उभं राहिलं कारण सांगणे वगैरे.
जाताजाता-
" पाडोशी पाँचसो रुपिया माँगे तो सो आपवानू अने भुली जवानू"
( कारण ते परत येणार नसतात तर थोडेच द्यायचे आणि शेजारधर्म पाळायचा).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त लिहिलंत.

मी लहानपणी दोनतिनदा घरी आईसक्रीम च्या पॉट मधे आईसक्रीम केलेलं असल्यामुळे विषय जिव्हाळ्याचा आहे.

-

आयुष्यातला एक मोठा धडा आम्ही तिघं शिकलो होतो, शेजार्‍यांकडून आणि आई-नानांकडूनही!

हे कळीचं वाक्य.

पण तरीसुद्धा ... ??

-
-
-

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयुष्यातला एक मोठा धडा आम्ही तिघं शिकलो होतो शेजार्यांकडून आणि आई-नानांकडूनही! >> If you can not afford to buy an icecream-pot; do not produce kids!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचा हा निरोपवजा निष्कर्ष मी आता आई-नानांपर्यंत पोचवू शकत नाही, त्याबद्दल क्षमस्व. आणि कळवता आला तरी, आता काही उपयोग नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.... आणि दहा-बारा हजार वर्षांपूर्वी शेती करायला शिकलेल्या आपल्या पूर्वजांना हा निष्कर्ष काढता आला नाही याबद्दल मला जरा हुश्शच वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुमचे स्वागत आहे.
खालील अजुनकाही मॉरल ऑफ द श्टुरी कशें वाटतात?

* श्रीमंत शेजार्यांनी आपली आइस्क्रीम पॉटं किंवा फालुदा वगैरे गरीब शेजार्यांसोबत शेअर केलीच पाहीजेत!
* असे न करणारे वैट वैट वैट दुष्ट असतात!
* आपण प्रामाणीक असल्यानेच गरीब आहोत/होतो. ते अप्रामाणीक असल्यानेच (किंवा बापजाद्यांनी डब्बोल्लं दिल्यानेच) श्रीमंत आहेत/होते?
* आपण श्रीमंत असलो तर ते केवळ स्वकष्टाने, स्वबळावर इ इ झालेले असतो. इतर गरीब असतील तर लायकीच नाही ओ त्यांची! फडतुस कामचुकार लोकं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(yawn)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुपर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मिसळपावरच्या काटेकोरांटीची फुलं.ची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

जी एंची एक कथा वाचली होती - चैत्रातील हळदीकुंकवाचा संदर्भ असलेली. त्यातील आईही मानी दाखवली होती. त्या कथेचीच अगदी आठवण आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या कथेवरचा २० मि.चा लघुचित्रपट - 'चैत्र'
--
शिवाय आत्माराम भेंडे यांनी जीएंच्या कथांवर एक मालिका काढली होती. त्यातही ही कथा होती. भक्ती बर्वेंनी काम केलं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा वा! घरी गेल्यावर पहातेच. मला ती कथा फार आवडली होती. फार!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाहीली. खूपच प्रभावी लहानशी फिल्म बनवली आहे. खूप आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिरशिंगराव, गोष्ट सुंदर आहे. आधीचीही खूप आवडलेली. लिहीत रहा. छान लिहिता तुम्ही !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मस्त लिहिताय. निव्वळ काही जणांमुळे लिहिणं थांबवू नकात प्लीझ. सारीच मंडळी जे लिहिलय ते समजून घेउ शकतील अशी असतील असं नाही. किंवा सारीच सहमत असतील असं नाही. जोवर थोडेबहुत का असेना, वाचणारे आहेत; तोवर तरी माणसानं लिहित रहावं. मनापासून सांगतो; फारसं मनाला लावून घेउ नकात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अगदी हेच्च. हीच भीती मलाही होती की तिमा गविंसारखे लिहीणे बंद करतील Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोण बोलतय, काय बोलतय Smile

नोट : पुन्हा चुकीच्या आयडीने प्रतिसाद दिलास मनोबा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खुप च सुंदर कथा आहे... संयमीत भाषा आणि खुमासदार शैली ही तुमच्या लेखनाची वैशीष्ये आहेत. पु.ले.शु.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर लिहीले आहे. आधीचे वाचलेले नाही, आता वाचतो.

शेवट वाचून 'चिल्ड्रेन ऑफ हेवन' चित्रपटातला शेवट, तसेच शाळेच्या पुस्तकात वाचलेल्या एका 'पाडवा गोड झाला' धड्याचा शेवट ही आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरोखर सुंदर लिहीलेय.
.
.
.

'
अवांतरः चुकीच्या मॉरल ऑफ द श्टुरीवरून ती शास्त्रज्ञ अन झुरळाची गोष्ट आठवली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निरागसकाका निरागसकाका, शास्त्रज्ञ आणि झुरळाची गोष्ट सांगा नाऽ मला माहीत नाहीऽ

===
मी समजतेय ती मॉरलं ऑफ द श्टुरी चुकीची असतील तर बरोबर काय आहे तेपण सांगा?

कायेना मी कधी शेजारच्या घरात काय पकतय किंवा ते लपवूनछपवून काय खातात पितात बघीतल्याच आठवत नाहीय. इथे कोणीच अदर साइड ऑफ श्टुरी सांगु शकणारं नाहीय का?

===
फ्रँकली हे असले लेख मला 'बामनांच पॉवर्टी पॉर्न' वाटतात. बघा बघा ओ साठ वर्षांपुर्वी आमच्या घरात साधं आईस्क्रीम पॉट नव्हतं ओ. किती ती दरिद्री...
Fool yeah right!

===
एनीवे आजकालची पोरं शेजारच्या पिंट्याला काय मिळालं त्यावर लक्ष ठेवून असतात का? आजकालचे पालक मुलांच्या आवाक्याबाहेरच्या मागण्या कशा हँडल करतात?

आणि लास्ट बट नॉट लिस्ट आर वी एवर गोइंग टू टिच आवर चिल्ड्रन नॉट टु बी जेलस ऑफ मोअर प्रिविलेज्ड चिल्ड्रन अँड फैमिलीज?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काहीही. ब्राह्मणही बाय & लार्ज फार काही श्रीमंत नव्हते जुन्या काळी हे सत्य पचायला इतकं अवघड का जावं? तसे तर कुणीही लिहिलेले लेख पॉव्हर्टी पॉर्नच आहेत मग. जातीवाचक उल्लेख केल्याने नक्की काय सिद्ध होतं कोण जाणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ब्राह्मणही बाय & लार्ज फार काही श्रीमंत नव्हते जुन्या काळी

अगदी! पॉव्हर्टी होतीच, बाय अँड लार्ज, तर पॉर्न हे पडणारच, नाही काय?

(शिवाय, बाय अँड लार्ज पॉव्हर्टीबरोबरच असलेली बाय अँड लार्ज साक्षरता ही पॉर्न पाडण्यास काही अंशी फ्याशिलिटेट करीत असावी बहुधा.)

तसे तर कुणीही लिहिलेले लेख पॉव्हर्टी पॉर्नच आहेत मग. जातीवाचक उल्लेख केल्याने नक्की काय सिद्ध होतं कोण जाणे.

काय, मुद्दा येतोय ना लक्षात? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय, पण फक्त 'तेच' नव्हते, आजकाल असे लेख 'इतर' लोकही लिहितात आणि त्यांची संख्या दुर्लक्षणीय नाही खास. रादर आजकालच नव्हे तर साठोत्तरी काळापासूनच अशा लेखनाचे प्रमाण लक्षणीय आहे. पण असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

...हेही व्हायचेच ना?

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमची टीका अगदिच नकारात्मक आहे. तुमच्या सर्व शंकांचे निरसन करावेसे वाटले पण तुम्हाला मोरल ऑफ स्टोरी समजवणे म्हणजे झोपे चे सोंग घेतल्याला जागे करण्याचा प्रयत्न करणे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्राह्मण काय कोणीच श्रीमंत नव्हते ९०च्या आधी. पण 1950 - 60 madhe ghari आईस्क्रीमपॉट असणे नसणे यावरुन गरीबी श्रीमंती ठरवताय तुम्ही. आणि बाकीच्यांची खायची प्यायची भ्रांत होती/अजुनही आहे. हे म्हणजे माझी आजी चवथीपर्यंतच शिकली होती सांगत फिरण्यासारखं आहे. आजीला शाळेत जायला मिळत होतं हाच काहीतरी प्रिवीलेज होता तेपण लक्षात येत नाही.

कुणीही लिहलेले लेख असतीलही पॉवर्टी पॉर्न. मी वाचले नाहीत. इतक्यात. इथे.

अगौबै सुचिताकाकू, थँक्यु बरं का मला न जागवल्याबद्दल.

===
परत एकदा:
इथे कोणीच अदर साइड ऑफ श्टुरी सांगु शकणारं नाहीय का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अ‍ॅमी, तू लिहिते आहेस ते सगळं बरोबर आहे. पण ललित वाचताना लेखकाच्या बाजूने विचार करायचा असतो.
=============
आता असं गृहित धर कि तू पिक्चर पाहत आहेस. त्यात एका गुंडाच्या वाड्यावर त्याचे शेकडोनी टगे पोसलेले लिंबे टिंबे गुंड आहेत. हिरो येतो. मशिन गनने धडाधडा त्यातल्या खूप बिनमहत्त्वाच्या गुंडांना उडवत असतो. बाँब टाकतो. आपण हृदयात म्हणत असतो कि त्या गुंडाची एकही गोळी, तलवार, भाला हिरोला नको लागायला. आपली शेवटपर्यंत तीच काकलूत असते.
पण आपण आता या सीनला टर्न देऊ. व्हिलेनच्या किल्ल्यातल्या / अड्ड्यातल्या तिसर्‍या उपगल्लीतल्या पाचाव्या खांबाखाली थांबलेल्या ७ पैकी एक बिनमहत्त्वाच्या लिंबू टिंबू गुंडावर फोकस करू. आणि चित्रपट, एरवी २-३ सेकंदापलिकडे फुटेज न मिळालेल्या त्या बाबाच्या जीवनावर नेऊ. आता तो जाड, घाण, अस्वच्छ इ इ असला तरी जन्मावेळी फार गोंडस होता. त्याच्या आईला फार आनंद झालेला. तो अत्यंत सद्गुणी होता. मग गावात त्याच्यावर अन्याय झाला. शहरात कसंबसं चालू होतं. इतक्यात लहान बाळाला दुर्धर आजार झाला. मग उपायच नव्हता. मन मारून एका मित्राने सुचवलेल्या जागी आला. आज त्याचा पहिलाच दिवस होता. नेमकी त्याच दिवशी हिरो त्या कँपसमधे घुसला नि ... ....
======================
ललित वाचताना हिरोच्या बाजूने वाचावं ना गं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

क्या बात! जबर्‍या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सही: बॅटमॅनला शरण कसे जावे (मंजे मी शरण गेलेलोच आहे, त्यांनी आमची शरणांगती स्वीकारावी यासाठी काय करायचं.) याबद्दल मार्गदर्शन कुठे मिळेल?

न योत्स्य इति गोविन्दमुक्त्वा तूष्णीं बभूव ह.

विक्रमा, तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर माहीती आहे. .... शंभर शकलं....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि बाकीच्यांची खायची प्यायची भ्रांत होती/अजुनही आहे. हे म्हणजे माझी आजी चवथीपर्यंतच शिकली होती सांगत फिरण्यासारखं आहे. आजीला शाळेत जायला मिळत होतं हाच काहीतरी प्रिवीलेज होता तेपण लक्षात येत नाही.

याला अंडरप्रिविलेज-पॉर्न म्हणावे काय?

थोडक्यात काय, तर ज्या/जिच्याजवळ जे पॉर्न मटीरियल असते, त्याप्रमाणे तो/ती लिहितो/ते. (म्हणजे, अर्थात, लिहिता येत असेल तर. बाय अँड लार्ज अंगठाबहाद्दर मटीरियल असूनसुद्धा काय पॉर्न पाडणार?) फरक इतकाच, की पूर्वी ब्राह्मणी-दारिद्र्य-पॉर्नचा जमाना होता, आजकाल अंडरप्रिविलेज्ड-अंडरडॉग-पॉर्नला चलती आहे. चालायचेच. जमाना बदलतोच. कालाय तस्मै नम:, इ.इ. असो. हेही दिवस जातील. नि तिसऱ्याच प्रकारचे पॉर्न रूढ होईल. बॉटमलाइन, पॉर्नला मरण नाही. कारण मानवजातीची पॉर्नची भूक अखंड आहे. प्रकार बदलतात, इतकेच. बरोबरच आहे, रुचिपालट नको काय?

(अवांतर: लूकिंग बॅक, 'ऐसी'च्या पॉर्न-विशेषांकात ब्राह्मणी-दारिद्र्य-पॉर्न तथा अंडरप्रिविलेज्ड-अंडरडॉग-पॉर्न दोहोंचेही प्रतिनिधित्व दिसले नाही, असे खेदाने नमूद करावेसे वाटते.)
..........

हा अंडरप्रिविलेजचा एक आविष्कार असू शकतो.

नाही म्हणायला, दृक/श्राव्य माध्यमे हा पर्याय असावाच, परंतु तो खर्चिक असावा बहुधा. छापील माध्यमे सर्वात स्वस्त. किंवा आजच्या जमान्यात आंतरजाल. फुकट. पण दोहोंसाठी अंगठाबहाद्दर असून चालत नाही. किंवा मग कोणीतरी एक जण शिकतो, नि मग सर्वांच्या वतीने प्रातिनिधिक पॉर्न पाडू लागतो. पण मग त्याचा भाव वधारतो नि तोही प्रिविलेज्डांत मोडू लागतो, नि बाकीचे राहातात तसेच. हात हालवत. असो चालायचेच.

अवांतर: ब्राह्मणी-दारिद्र्य-पॉर्न पाडणाऱ्या क्लासातसुद्धा, त्या दारिद्र्यातून कालौघात बाहेर पडल्यावर पुढल्या पिढ्यांना ते तसले पॉर्न पाडण्यात स्वारस्य उरले नसावे. ती एक पिढी होती, त्या फेज़मधून गेलेली, त्यातले जे कोणी अजून शिल्लक आहेत साइन्स ऑफ दोज़ टाइम्स म्हणून उरलेले, त्यांच्यापुरता हा फेनॉमेनॉन मर्यादित असावा. (चूभूद्याघ्या.) असो. ती पिढीही कालौघात कालवश होईल, नि त्याबरोबर ते लोकही जातील, नि ती पॉर्नची जाँर(genre)ही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अ‍ॅमीकाका/काकू, झुरळाच्या काय किंवा कुठच्याही गोष्टी आत्ता इथे 'त्या' आयस्क्रीम पॉटासारख्याच आहेत. मिळणार नाहीत! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL Farch Niaragas aahat tumhi Ajoba!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोष्ट आवडली. तुमच्या अभिनिवेशरहित शैलीतले लेखन आवडते.

[अवांतरः 'मराठी मध्यमवर्गाच्या आईस्क्रीमबद्दलच्या बदलत्या मानसिकतेचे आंतरजालीय साहित्यात पडलेले प्रतिबिंब (एक्झिबिट ए: प्रस्तुत लेख, एक्झिबिट बी: वेडपट व्हरमाँट) आणि तदनुषंगिक सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि कौटुंबिक कारणांचा मागोवा किंवा धांडोळा' असा एक आगामी, होतकरू संशोधकांसाठी विषय सुचवून ठेवतो :).]

१. आठवा: कोसला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा अजो भारी प्रतिसाद आहे ROFL

ललित हिरोच्या अँगलनेच असणार मान्य. पण मग ते 'काल्पनीक' आहे हे सगळ्यांनीच लक्षात ठेवावं लागेल. इथले प्रतिसाद वाचून तसं वाटततरी नाहीय. प्रत्येकालाच आपण/तिमा हिरोच आहेत आणि शेजारी नालायक व्हिलन आहेत वाटू लागले आहे. मिपावर एकीने नालायक म्हणलेदेखील. ऑ :-O का बरे नालायक? त्यांच्याकडे आइस्क्रीम पॉट आहे म्हणून? की त्यांनी तो तुम्हाला दिला नाही म्हणून? अन् माझ्या वरकमाई(?)तून जर मी पंधरवड्यातून एकदा चार वडापाव आणि सहा फालुदे आणू शकत असेन तर ते मी माझ्या मुलांना देऊ की शेजारपाजार्यांच्या?
ठीकय लहान मुलांना भुका फार लागतात, मित्राला काय किती मिळतंय ते लगेच लक्षात येतं वगैरे मान्य. पण यू आर सपोज्ड टू ग्रो आऊट ऑफ इट वेन यू ग्रोअप.

===
नबा, तुमचे आजचे सगळेच प्रतिसाद मान्य. पण मला मुळात तिमा गरीब वाटतच नाहीयत. आईस्क्रीम पॉटची किंमत किती असायची त्याकाळी काय माहीत. पण ८०च्या दशकात घरी फ्रिज असणार्यांनी आत्ताच्या काळात 'फार गरीब होतो हो तेव्हा आम्ही. साधा गोदरेजचा सिंगल डोअर फ्रिज होता. आता बघा आम्ही एल्जीचा थ्री डोअर घेतलाय. प्रगती केली प्रगती केली.' असं म्हणण्यासारखं वाटतंय.

===
एनीवे आय थिंक आय हैव सेड इनफ. सो धाग्यावरुन रजा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या वितंडवादाला काही अंत नाही. तेंव्हा,
त्यांनीच यावर 'अ‍ॅमि'केबल सोल्यूशन काढलं, हे चांगलं झालं, नाही का ?

अवांतरः १) संपादकांना माझा हा लेख्/गोष्ट, 'पॉर्न विशेषांकात घुसवता आला तर पहावे.' ही कॅटेगरी त्यांत समाविष्ट केल्याचे समाधानही सर्वांना मिळेल.
२) मला व्हिलन ठरवायला काहीच हरकत नाही. पण माझ्या बिचार्‍या दिवंगत आई-वडिलांना यांत ओढू नका. आपल्या बाळाने जे प्रताप करुन ठेवले
ते , त्यांना माहित नाहीयेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

मुळात ललित लेखनाच्या चिकित्सेला मर्यादा असते. ती सगळ्यांना पटते/पचते असं नाही. तेव्हा तुम्ही लिहीत राहावे हि विनंती एक वाचक म्हणून करतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

http://www.maayboli.com/node/22044 'ललित का करावे' जाणण्यासाठी प्रतिसाद वाचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0