मोहन गाढवे

मोहन गाढवे माझ्या गावा शेजारच्या गावात रहात होता. तो आणि मी एकाच शाळेत शिकायला होतो. आमच्या वर्गशिक्षकांनी पोरं मोहन्याला गाढव्या, गाढवीच्या असं म्हणत म्हणून त्याला 'मोगा' हे नाव दिले. सगळे त्याला मोगा म्हणू लागले. कुणी गाढवे आडनावावरुन चिडवलं तर लगेच हेडसरांकडे रडत जायचा. हेडसर वैतागून गेले, एक दिवस बोलले गाढव खूप कष्टाळू आणि इमानी प्राणी आहे. तूला कुणी गाढव म्हणाले तर अजिबात चिडू नकोस. गाढवासारखा अभ्यास कर मग बघ गाढव चिडवणारे गाढवे साहेब म्हणतील.
हेडसरांचं बोलणं मोगानं मनावर घेतले. खेळ नाही की मित्र नाही सतत डोळ्यासमोर पुस्तके. मोग्यानं चौथी, सातवीत पहिला नंबर काढला. सतत अभ्यास केल्यामुळे जाड भिंगाचा चष्मा लागला. दिसायला आधीच ध्यान. दात पुढे आलेले, काळा रंग, एक पाय फेगडा. त्यात सतत बैठक मारलेली त्यामुळे लठ्ठ होऊन अकालीच प्रौढ दिसू लागला. दहावीत देखील पहिला नंबर आला मोग्याचा. अकरावीला मी शाळा सोडली आणि मुंबई ला गेलो. मामाचा गाळा होता भायखळा मार्केटमध्ये. तिकडं मी काम करत होतो. मोगा बारावीला नव्वद टक्के मार्क मिळून पास झाला हे मी एका वर्गमित्राच्या तोंडून ऐकलं होतं.
मी मुंबईला माझ्या कामात रमलो. दरम्यान माझं लग्न मामाच्या पोरीबरोबर झाले. मी मुंबईला सेटल झालो. मध्ये बरीच वर्षे सरली. असाच एक दिवस मी लोकलनं प्रवास करत होतो. माझ्या समोरच्या सीटवर मोगासारखा दिसणारा एक मनुष्य बसला होता. दिसायला हुबेहूब मोगासारखा. मी त्याला मोहन्या गाढवीच्या असे बोलणार इतक्यात मी जीभ चावली. कारण तो मोगासारखा दिसणारा वेगळाच पोशाखात होता. एका धर्माचे लोक घालतात तसा पेहराव होता त्या व्यक्तीचा. पण ती व्यक्तीच बोलली "गोबऱ्या काय रे, इकडे काय करतोस मुंबई मध्ये?" मी म्हटलं मी ओळखले नाही तुम्हाला. तर तो म्हणाला "अरे मी आहे. मोहन गाढवे." पण मी आश्चर्याने ओरडलो मोग्या, अरे नाटकात काम करतोस का काय? हुशारीचा उपयोग झाला नाही तूला?
मोगा तोंड सोडत बोलला " नाही रे, खूप वेगळी कहाणी आहे."
मग मोग्याला माझ्या स्टेशनवर उतरायला लावलं. स्टेशनबाहेरच्या हॉटेलात गेलो. नाष्टा, चहाची अॉर्डर दिली. मोगा पुढे सांगायला लागला.
बारावीनंतर पुण्याला बीजे मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. तेथून एमबीबीएस डॉक्टर होऊन बाहेर पडला. मुंबईत एका दवाखान्यात नोकरी मिळाली. पण रुप बघून छोकरी काही मिळेना. त्या काळात विवाह जमवणारी मंडळं नव्हती. शेवटी गावाकडे एक पोरगी मिळाली. तीनं नर्सिंगचा कोर्स केला होता. एकाबरोबर पळून गेली होती. पण त्यानं धोका दिला म्हणून परत आली होती. मुलीला सहा बहिणी होत्या. सासरा पोरींचं शिक्षण लग्न करता करता कफल्लक झाला होता. मोगा त्या मुलीबरोबर लग्न करायला तयार झाला.
लग्न झालं. बायकोला मुंबईत आणलं. तिलाही सरकारी दवाखान्यात नर्सची नोकरी मिळाली. वर्ष सहा महिने सुखात गेले. मोगाची पत्नी गरोदर राहिली. ती तीचा सगळा पगार वडिलांकडे पाठवून देई. तीची एक बहिण आणि तीचा नवरा मोगाच्या सासऱ्याकडेच रहात. बहीणीचा नवरा शिकलेला होता पण चांगली नोकरी मिळाली नाही म्हणून घरी बसला होता.
बायको सगळा पगार घरी देते यावरुन मोगाचं आणि तीचं रोज कडाक्याचे भांडण होत होतं. भांडणापायी मोगा रडकुंडीला आला होता. त्यातच त्याचे दैव फिरले. मोगाला ट्रकनं उडवलं. मोगा चा एक हात आणि पाय मोडला. हाडांचा पार भुगा झाला. पैसा संपला. बायकोच्या पगारावर घर चालत होते. तेवढ्यात मोगाची बायको बाळंतपणासाठी माहेरी गेली. मोगाला त्याच्या गावी त्याचे आई-वडील घेऊन गेले. सहा महिने झाले तरी मोगा हालचाल करु शकत नव्हता. मोगाची बायको नांदायला यायला तयार नव्हती की मोगाची मुलगी त्याच्या कडे पाठवायला तयार होती.
एकतर बायको मिळत नव्हती. मिळाली तर अशी. काहीच महिने इंद्रिय सुख वाट्याला आल्यानं मोगा त्या सुखाला फार आसुसला होता. रात्री झोप येत नव्हती. सारखी बायकोच्या कोमल शरीर स्पर्शसुखाची आठवण येत होती. बिचारा तळमळत रात्री ढकलत होता. आई-वडील पोराचे हाल पाहून कावून गेले होते.
दिवसभर मोगा देवाधर्माच्या पोथ्या पुराणे वाचत बसे. अधू पायामुळे परावलंबी बनला होता. देवाची इतकी प्रार्थना करुनही देव मोगाला पावत नव्हता. तेवढ्यात चिंतन करतांना मोगाच्या डोक्यात एक विचार आला. 'हिंदू धर्मातील कर्मविपाक सिध्दान्तामुळेच मला हे भोग वाट्याला आले आहेत.'
लगेच मोगानं हिंदू धर्म सोडायचा संकल्प केला. ए आर रेहमान चं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून मोगानं नवीन धर्माच्या देवाला कळकळून प्रार्थना केली. आणि तो देव मोगाच्या हाकेला धावून आला. एका महिन्यात मोगा ठणठणीत बरा झाला. नवस फेडून मुंबई ला परत गेला. नवीन देवानं अजून कृपा केली मोगाला मोठ्या पगाराची नोकरी मिळाली. दुसरी छोकरीही मिळाली.
ऐकता ऐकता नाष्टा संपला, चहा आला. चहा घेऊन मोगाचा निरोप घेतला.
मनात राहून राहून विचार येत होता, मोगाचं छान झालं. इंद्रिय सुख न मिळता मेला असता तर खवीस झाला असता. जाऊदे बिचाऱ्याचं चांगले झाले. ( काल्पनिक लेख)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पण कथा खरी वाटू लागली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुसलमान झाल्यानंतरसुद्धा तो 'मोहन गाढवे'च कसा काय राहिला? गेला बाजार 'मोहसीन गाढवे' व्हायला नको? मोहन बोले तो कृष्ण. इस्लाम क़ुबूल केल्यावरसुद्धा त्या काफ़राचे नाव? तौबा तौबा! साफ़साफ़ कुफ़्र है ये! याच्यावर फतवा काढला पाहिजे. फक्त एक अक्षर वाढवून कुफ़्र धुवून काढता येत असताना...

आणि, खवीस होण्यापेक्षा मुसलमान झालेला परवडला काय? याच, याच मनोवृत्तीमुळे आजवर हिंदुत्वाचे अपरिमित नुकसान होत आलेले आहे!

(असो. बाकी चालू द्या.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नबा अहो आपल्या साठी नवीन नाव कसं येईल तोंडात? जुन्या नावानंच आपण त्याला ओळखणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

आत्म्या काय रे, इकडे काय करतोस मुंबई मध्ये?"

आत्म्या? ' गोलड्या ' का नाही बोलला? मोगाची ' मायबोली ' लै झोंबणारी, त्याच्या मागे लागलं तर आडनाव ही सार्थक करतो, लै जोरात तडाखा बसतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हैला मार्मिकराव बरुबर पाइंटात सापडवलं हां. दुरुस्ती करणं पडस.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

तुम्हाला अनुभव आहे तर त्याच्या तडाख्याचा!! मी अशांना पुरुन उरणारा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

अनुभव नाही हो, पण ' विटकरी ' रंग ' ब्राऊन ' झाला म्हणून वाटले बहुतेक तडाखा बसला की काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मोगाचे जातभाई वाटतात चारपायाचे आपण.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

मस्त गोष्ट आहे! मोगाच्या आईवडिलांची काय प्रतिक्रिया त्याच्या आयुष्यातील बदलाबद्दल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मोगाचं कर्तूत्व पाहूनच त्यांनी राम म्हटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।