करोना फोटोफीचर - आळंदी लॉकडाऊन - मंदार देशपांडे

दर वर्षी पालखीच्या वेळी आळंदी भक्तांनी फुलून जाते. या वर्षी मात्र करोनामुळे ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आणि परिसर सील केला गेला होता. अनेक लोकांना त्यांच्या हयातीत प्रथमच आळंदी अशी दिसली. मंदार देशपांडे यांनी काढलेले या लॉकडाऊन आळंदीचे हे काही फोटो -

आळंदी फोटो ०१

आळंदी फोटो ०२

आळंदी फोटो ०३

आळंदी फोटो ०४

आळंदी फोटो ०५

आळंदी फोटो ०६

आळंदी फोटो ०७

आळंदी फोटो ०८

आळंदी फोटो ०९

आळंदी फोटो १०

आळंदी फोटो ११

आळंदी फोटो १२

---
सर्व छायाचित्रे प्रताधिकार मंदार देशपांडे.

आधीचे फोटोफीचर - स्वॉब सेंटर
पुढील फोटोफीचर - लॉकडाऊन लग्न

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

प्रसिद्ध/ मुख्य}चौक, रस्ते यांना नावे हवीत. कारण तिकडे गेलेलो नाही.

फोटोंना क्रमांक द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रसिद्ध/ मुख्य}चौक, रस्ते यांना नावे हवीत. कारण तिकडे गेलेलो नाही.

फोटो कोणत्या चौकात / रस्त्यावर काढलाय हा तपशील इथे महत्त्वाचा आहे असं फोटो पाहून मला तरी वाटलं नाही. बाकी नदीचा घाट, मंदिराकडे जाणारा चढ आणि प्रत्यक्ष मंदिर हा परिसर स्वयंस्पष्ट असावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

फोटो - पत्रकारिता यासाठी प्रत्येक फोटोस मथळा ,वर्णन गरजेचे आहे.
२०२०_०७_१०_१५:३०, बाजारपेठ/गुरुमंदिर पूर्व प्रवेशद्वार वगैरे,आळंदी एवढंसुद्धा पुरेसं राहील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इंद्रायणी घाट छान आहे. ( पण फोटोंत aberration फार आहे. खांब, इमारती तिरप्या फारच वाटतात. अर्थात यासाठी चांगले वाइड- अँगल लेन्स लागेल.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्या भकास गावात दिसणाऱ्या मोजक्या वारकऱ्यांचा निरागसपणा अंगावर आला. हा नवा करोना-विषाणू नाही, नेत्यांचा मूर्ख-माचोपणा किती लोकांना आणि कसा भोवणार आहे ह्याची कल्पना न करण्याची मुभा होती; पण हे असे फोटो बघितल्यावर त्या कोषातून बाहेर यावं लागतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

केवळ निसर्गसौंदर्य पहाण्यासाठी चारधामची यात्रा केली, ही माझी आयुष्यातली मोठी चूक होती. त्यावेळेस भक्तिधुंद तांड्यांचा जो त्रास अनुभवला त्यामुळे, नंतर कुठल्याही धार्मिक स्थान असलेल्या ठिकाणी पर्यटनाला जायचे नाही असा नियम केला. त्यानुसार, अमरनाथ, वैष्णोदेवी, सुवर्णमंदिर आणि तत्सम सर्व ठिकाणांवर कायमची फुली मारली.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या सर्व ठिकाणी आणि हिमालयातील (जवळचा पायथा) दार्जीलिंग, कुलु मनाली, नैनिताल परिसर यांवर मी पर्यटन लेख वाचून २००० सालीच फुली मारलेली आहे.

वैष्णोदेवी आणि शिवखोरी ही ठिकाणे जम्मु काश्मि परिसरांतील ट्याक्सीवाल्यांनीच सुरू केली ९२-९५ काळातल्य काश्मिर परिस्थितीत.
वैष्णोदेवी येथे तर ८५ पूर्वी फक्त चार पाच मोठ्या धोंड
यांमध्ये एक शेरोंवाली माँचा फोटो ठेवून साधू लोक बसत असत. हे दाखवणारी एक डॉक्यु डीडी भारतीवरच आहे. तर या सर्व गुहांचा वापर थंडीतला आसरा होता फक्त.
रेल्वेने वन्दे भारत गाडी दिल्ली ते वाराणसी आणि वेष्णोदेवी इथे फक्त ठेवली आहे. ( शिरडीलाही होणार आहे. हैदराबाद ते इथे)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आळंदीला अनेकदा जाणे होत असे आधी. आता बंदच आहे म्हणा. पण गाडगीळ यांनी वर विचारलेल्या प्रश्नांची माहिती काही प्रमाणात देऊ शकतो.

आळंदीला सर्वात जास्त प्रसिद्ध काय असेल ते अर्थातच ज्ञानेश्वर महाराजांचे देऊळ. किंबहुना आळंदीला गेलो की मंदिरात जायचा रस्ता कुठला असा जेनेरिक प्रश्न जरी विचारला आणि आळंदीत सत्राशेसाठ मंदिरे जरी असली तरी लोक ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराचाच रस्ता सांगणार हे नक्की! (अर्थात हे विधान सर्वच तीर्थक्षेत्रांना लागू पडेल म्हणा.)

तर हे माऊलींचे मंदिर म्हणजे मूळचे आळंदीचे ग्रामदैवत सिद्धेश्वराचे मंदिर आहे. म्हणजे शंकराचे मंदिर आहे. या शंकराच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या समोरच ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्याची जागा आहे. (त्यांची समाधी आणि बाकीचे मोठे मंदिर गर्भगृह, सभामंडप इत्यादी सिद्धेश्वराच्या मंदिरास थोडेसे लागूनच आहे.) तर या मोठ्या मंदिरसमूहाला चोहोबाजूंनी तटबंदी म्हणता येईल अशी भिंत आहे. भिंतीत मोठ्या खोल्या, कोनाडे इत्यादी आहेत. मुख्य द्वार ज्याला महाद्वार म्हणतात ते उत्तरेकडे तोंड करून उभे आहे. पश्चिमेला पाणदरवाजा आणि पूर्वेकडे गणेश दरवाजा, पूर्वेकडेच अजून एक दरवाजा (नाव विसरलो) आहे. महाद्वारातून आत जाताना आधी हैबतबाबांची पायरी लागते. मग समोरच वरील एका फोटोत दिसणारा सभामंडपाचा दरवाजा दिसतो. (मला वाटतं हे तपशील खूप होत आहेत. तेव्हा थांबतो.)

फोटो छान आहेत. मंदार देशपांडेसाहेब बहुधा बसने आळंदीला गेले असावेत असे गृहीत धरतो. इंद्रायणी नदीच्या काठी असलेल्या पीएमपीएमएल च्या स्थानकात उतरलो की मुख्य रस्त्याने म्हणजेच प्रदक्षिणा मार्गाने पुढे गेल्यास उजवीकडे टर्नला नगरपालिकेची इमारत लागते. डावीकडे आता २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर बॅरिकेड लावून बंद केलेला रस्ता दिसतो. देशपांडे साहेबांनी काढलेला पहिला फोटो हा ह्या रस्त्याचा आहे. डावीकडे संजय प्रॉव्हिजन स्टोअर हे दुकान जे आहे, त्याचे मालक मला आठवते त्याप्रमाणे कोलन की काय अशा नावाचे आहेत. ह्या फोटोत जिथे भगवा झेंडा दिसतो आहे तिथे डावीकडे किंचित वळून रस्ता परत उजवीकडे वळतो. इथे आजोळघर (जुने नाव गांधीवाडा) आहे. इथे बहुतेक बँक ऑफ महाराष्ट्र आहे आणि एक घाट आहे, जो नदीकडे जातो. दुसऱ्या क्रमांकाचा मारुतीच्या मंदिराचा फोटो कुठला ते आठवत नाही. पण इथलाच कुठलातरी असावा. तीन आणि चार क्रमांकाचे फोटो इथल्याच इमारतींचे आहेत. ही सगळी प्रसादाची दुकाने आहेत. चौथ्या फोटोतील आता बॅरिकेड लावून बंद केलेल्या गल्लीत एक दुकान आहे, जे कपड्यांसाठी पंचक्रोशीत वर्ल्डफेमस आहे.

पाचव्या क्रमांकाच्या फोटोत महाद्वाराच्या समोर साष्टांग नमस्कार घालून माऊलींच्या पाया पडणारी एक महिला दिसत आहे. इथे अर्थातच मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. समोर रमेश टी हाऊस दिसते आहे. हे दिघे बंधूंचे हॉटेल तिथल्या पदार्थांच्या चवीसाठी प्रसिद्ध आहे. फोटोत उजव्या हाताला प्रसादाची दुकाने दिसत आहेत. त्यातले एक फासाटे यांचे आहे. फोटोत दोन पिवळे लोखंडी खांब दिसत आहेत, त्या कमानीला एक मोठी घंटा टांगलेली आहे. (घंटेचा लंबक मात्र बांधून ठेवला आहे. उगीच कुणी वाजवत बसू नये म्हणून?)

त्यानंतर फोटोग्राफर शनी मंदिराच्या रस्त्याने नदीकडे गेलेला दिसतो. पाच आणि सहा क्रमांकाचे फोटो हे ह्या दगडी रुंद पायऱ्या असलेल्या आणि दोहों बाजूंंस प्रसादाची दुकाने असलेल्या रस्त्याचे आहेत. खाली उतरून गेल्यास सातव्या फोटोत दिसणारा कमानीचा रस्ता आहे, त्याच्या आधी उजव्या हाताला शनी-मारुतीचे मंदिर आहे. हा रस्ता म्हणजे भिकाऱ्यांनी अडवून ठेवलेला भाग आहे. डाव्या हाताला नदी आणि कोण ते शिक्षणसम्राट बरं? त्यांनी लोकवर्गणीतून उभारलेला घाट आहे. ह्या घाटाचे बांधकाम सुरू झाल्यानंतर पुण्यातील त्यांच्या शिक्षणसंस्थेची पुढे चांगलीच भरभराट झाली. असो.

नऊ क्रमांकाचा फोटो हा नव्या पुलावरून घेतलेला दिसतोय. (हेच त्या पुलाचे नाव आहे. त्यानंतर अजून एक पूल बांधला गेला जुन्या पुलाच्या शेजारी, पण ह्या पुलाचे नाव काही बदलले नाही. जुना दगडी पूल हा ब्रिटिशांच्या काळात बांधलेला आहे. मला वाटते तो दीडशे वर्षे तरी जुना असावा. ह्या पुलाचे आयुष्यमान संपले तेव्हा इंग्लंडाहून आळंदी नगरपालिकेला पत्र आले असे ऐकिवात आहे.)

दहावा फोटो हा पुलावरून नदी ओलांडून पलीकडील घाटाचा घेतला आहे. इथे एक मोठा स्क्रीन आहे. एकादशीला नदीपलीकडील प्रोजेक्टरच्या साहाय्याने धार्मिक चित्रपट, कार्यक्रम इत्यादी दाखवतात.

अकरावा फोटो माहीत नाही. बारावा फोटो सभामंडपाच्या द्वाराचा वाटतोय.

(सर्व माहिती मला आठवतंय तशी दिली आहे. चुभुदेघे.)

(आळंदी बरीच स्वच्छ दिसते आहे. पूर्वी आळंदीला उतरलो की नाक मुठीत धरूनच चालावं लागे! छान!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या आळंदी गावास (अधिकृतरीत्या) 'देवाची आळंदी' अथवा 'आळंदी (देवाची)' या नामाभिधानाने(सुद्धा) ओळखले जाते.

याचे कारण, 'आळंदी' नावाच्याच दुसऱ्या एका गावापासून ('चोराची आळंदी') डिस्टिंग्विश करण्यासाठी, असे सांगितले जाते.

यावरून काही शंका:

(१) ही चोराची आळंदी नेमकी कोठे आहे? आणि देवाच्या आळंदीहून किती दूर?
(२) 'चोराची आळंदी' हे नाव कसे पडले असावे? ('देवाची आळंदी' हे नाव, (ज्ञान)देवाची आळंदी म्हणून पडले असावे, असा तर्क बांधता येतो; चूभूद्याघ्या.)
(३) फॉर्दॅट्मॅटर, तळेगाव ढमढेरे हे नक्की कोठे आहे? (तळेगाव दाभाडे कोठे आहे, याची पूर्ण कल्पना आहे. किंबहुना, तळेगाव दाभाडे ठाउक नाही, असा पुण्यात वाढलेला नि मुंबईस क्वचित का होईना, परंतु जाणेयेणे असलेला मनुष्य विरळा. परंतु, ढमढेऱ्यांच्या तळेगावाबद्दल, 'असे दुसरे एक तळेगावसुद्धा आहे', याव्यतिरिक्त अधिक माहिती आढळत नाही अथवा रीतसर दडपली जाते.)
(३अ) हे दाभाडे नि ढमढेरे नक्की कोण?
(४) 'आळंदीला जाऊन लग्न करणे' हा नक्की काय प्रकार आहे? म्हणजे, वधू अथवा वर यांजपैकी किमान एका पक्षाच्या घरून संमती नसताना, पळून जाऊन विवाह करण्याची पुणे परिसरातील ही एक अत्यंत लोकप्रिय पद्धत आहे, इथवर ठाऊक आहे. परंतु, व्हाय पर्टिक्युलरली आळंदी? म्हणजे, पुणे शहरात ब्राह्मणाच्या घरात मृत्यू झाल्यास त्याचे अंतिम क्रियाकर्म (परंपरागत मोनॉपलीने) जेणेकरून मोघ्यांनीच करायचे, तद्वत, घरातून पळून जाऊन झटपट धार्मिक विवाह उरकू इच्छिणाऱ्या वधूवरांनी आळंदीलाच काय म्हणून जायचे? (आळंदीविवाहपद्धतीस काही लीगॅलिष्टिक डिष्टिंक्षण आहे, असे उडतउडत ऐकून आहे, परंतु तपशिलांबद्दल अनभिज्ञ आहे. जाणकारांनी तपशील भरून काढल्यास उपकृत राहीन. आगाऊ आभार.)
(४अ) सध्याचा करोनाकाळ जाऊ द्यात, परंतु, आळंदीकरांनी आपल्या या वैवाहिक यूएसपीचे डेस्टिनेशनटूरिझमकरिता मार्केटिंग का करू नये? (म्हणजे मग तत्त्वतः या प्रकारास 'डेस्टिनेशन वेडिंग' म्हणून संबोधता यावे, नाही काय?) मोटेले-हॉटेले वगैरे उभारता येतील. हवे तर रेझॉर्ट्स, हनिमून प्याकेजे, वगैरे... परंतु, महाराष्ट्रात कल्पकता कमी पडते, ती इथेच. अशानेच महाराष्ट्र व्यापारात मागे पडतो, नि ते परप्रांतीय वगैरे येऊन डोक्यावर मिऱ्या वाटतात. (मोघ्यांनीसुद्धा आपल्या सर्व्हिसेसचे मार्केटिंग केले पाहिजे, खरे तर. परंतु, तो वेगळा विषय आहे.)

या शंकां(पैकी एकीची अथवा अनेकां)ची समाधानकारक उत्तरे ठाऊक असूनसुद्धा ती जे देणार नाहीत, त्यांच्या डोक्यांची शंभर शकले होऊन ती त्यांच्याच पायांशी लोळू लागतील.

- पी. व्ही. (= प्रेतातला वेताळ) 'न'वी बाजू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

न'वी' बाजू,

(१) ही चोराची आळंदी नेमकी कोठे आहे? आणि देवाच्या आळंदीहून किती दूर?

चोराची आळंदी पूर्वी म्हणत. आता म्हातोबाची आळंदी म्हणतात. सोनोरी माहिती आहे का? तिकडे आहे. स्वारगेट ते म्हातोबाची आळंदी बससेवा आहे. देवाच्या आळंदीपासून किती दूर हे माहीत नाही. अंदाजे पंचावन्न ते साठ किमी असावे. गूगलबाबाला विचारणे.

(२) 'चोराची आळंदी' हे नाव कसे पडले असावे? ('देवाची आळंदी' हे नाव, (ज्ञान)देवाची आळंदी म्हणून पडले असावे, असा तर्क बांधता येतो; चूभूद्याघ्या.)

महाराष्ट्रात सेम नाव असणारी गावे चिक्कार आहेत. तेव्हा एक आळंदी जर देवाची असेल तर दुसरी चोराची मानली तर फरक करणे सोपे जात असेल. किंवा फॉर दॅट मॅटर, अब्राहमिक धर्मप्राबल्य असते तर आळंदी सैतानाची असे म्हटले गेले असते असा अंदाज.

(३) फॉर्दॅट्मॅटर, तळेगाव ढमढेरे हे नक्की कोठे आहे? (तळेगाव दाभाडे कोठे आहे, याची पूर्ण कल्पना आहे. किंबहुना, तळेगाव दाभाडे ठाउक नाही, असा पुण्यात वाढलेला नि मुंबईस क्वचित का होईना, परंतु जाणेयेणे असलेला मनुष्य विरळा. परंतु, ढमढेऱ्यांच्या तळेगावाबद्दल, 'असे दुसरे एक तळेगावसुद्धा आहे', याव्यतिरिक्त अधिक माहिती आढळत नाही अथवा रीतसर दडपली जाते.)

तळेगाव दाभाडे मावळात आहे, तर ढमढेरे तळेगाव हे शिरूर तालुक्यात आहे. त्या भागातील लोक त्याला नुसतेच तळेगाव म्हणतात आणि मावळातल्या तळेगावला दाभाडे तळेगाव म्हणतात. कसली माहिती दडपली जाते हे माहीत नाही. किंबहुना तसा अनुभव आलेला नाही. दोन्ही तळेगाव सारखीच फेमस आहेत.

(३अ) हे दाभाडे नि ढमढेरे नक्की कोण?

सारख्या नावांच्या गावांना पुढे त्या त्या गावातील मेजॉरीटेरीअन आडनाव लावण्याची प्रथा दिसते. अर्थातच शक्यतो ही आडनावे मराठा जातीतील असतात. तळेगाव दाभाडे इथल्या (तेव्हाच्या) जास्त संख्येने असलेल्या कुटुंबांंच्या नावाने ह्या गावाला दाभाडे असे उपनाम मिळाले. उमाबाई दाभाडे ह्या मराठेशाहीतील सरदार होत्या असे वाचल्याचे आठवते.

(४) 'आळंदीला जाऊन लग्न करणे' हा नक्की काय प्रकार आहे? म्हणजे, वधू अथवा वर यांजपैकी किमान एका पक्षाच्या घरून संमती नसताना, पळून जाऊन विवाह करण्याची पुणे परिसरातील ही एक अत्यंत लोकप्रिय पद्धत आहे, इथवर ठाऊक आहे. परंतु, व्हाय पर्टिक्युलरली आळंदी? म्हणजे, पुणे शहरात ब्राह्मणाच्या घरात मृत्यू झाल्यास त्याचे अंतिम क्रियाकर्म (परंपरागत मोनॉपलीने) जेणेकरून मोघ्यांनीच करायचे, तद्वत, घरातून पळून जाऊन झटपट धार्मिक विवाह उरकू इच्छिणाऱ्या वधूवरांनी आळंदीलाच काय म्हणून जायचे? (आळंदीविवाहपद्धतीस काही लीगॅलिष्टिक डिष्टिंक्षण आहे, असे उडतउडत ऐकून आहे, परंतु तपशिलांबद्दल अनभिज्ञ आहे. जाणकारांनी तपशील भरून काढल्यास उपकृत राहीन. आगाऊ आभार.)

आळंदीत केवळ नवरा नवरी, आवश्यक कागदपत्रे आणि दोन साक्षीदार (तेही नसले तरी तिथे मिळतात) एव्हढा जामानिमा घेऊन गेलं की कितीही कमी बजेटमध्ये लग्न करता येते. पुरोहित, केटरिंग, घोडा, बँडबाजा इत्यादी सगळे (ऑनलाइनच्या भाषेत एका क्लिकवर) एका ठिकाणी मिळते. सर्वधर्मीय व रजिस्टर्ड पद्धतीने कमी खर्चात जास्त डोकेदुखी न करता लग्न करता येते. त्याची फार मोठी इंडस्ट्री आळंदीत निर्माण झाली आहे आणि इथल्या अनेकांची पोटे लग्नव्यवसायावर अवलंबून आहेत. मध्यरात्री रात्रीअपरात्री केव्हाही आळंदीला गेलात आणि पार्किंगला गाडी लावून उतरलात की तुम्हांला एजंटलोक हेरणार आणि गाठणार.

(४अ) सध्याचा करोनाकाळ जाऊ द्यात, परंतु, आळंदीकरांनी आपल्या या वैवाहिक यूएसपीचे डेस्टिनेशनटूरिझमकरिता मार्केटिंग का करू नये? (म्हणजे मग तत्त्वतः या प्रकारास 'डेस्टिनेशन वेडिंग' म्हणून संबोधता यावे, नाही काय?) मोटेले-हॉटेले वगैरे उभारता येतील. हवे तर रेझॉर्ट्स, हनिमून प्याकेजे, वगैरे... परंतु, महाराष्ट्रात कल्पकता कमी पडते, ती इथेच. अशानेच महाराष्ट्र व्यापारात मागे पडतो, नि ते परप्रांतीय वगैरे येऊन डोक्यावर मिऱ्या वाटतात. (मोघ्यांनीसुद्धा आपल्या सर्व्हिसेसचे मार्केटिंग केले पाहिजे, खरे तर. परंतु, तो वेगळा विषय आहे.)

तुम्हांला माहिती नसावी याचे आश्चर्य वाटले, पण आळंदीची ही ख्याती होल महाराष्ट्रात दूरवर पसरली आहे. केवळ पळून जाऊन प्रेमविवाह करणारे प्रेमवीर आणि प्रेमवीरांगनाच नाही, तर अरेंज मॅरेज करू पाहणारे लोकही इथे दूरवरून सगळ्या गोतावळ्याला घेऊन येतात आणि आपापल्या बजेटनुसार लग्न करून जातात. पण आळंदीला कुणी हनिमूनला गेलेलं ऐकिवात नाहीये. तेव्हा तुमच्या वरील सूचनेपैकी हनिमून प्याकेजे इथे करणे शक्य नाही असे दिसते. आय माय स्वारी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आळंदीत अशा एका लग्नाला हजेरी लावण्याचा योग आल्याने पर्स्पेक्टिव्ह म्हणतात तसे कितीही कमी बजेट मध्ये लग्न करता येते ही गोष्ट प्रत्यक्ष पाहिली आहे. त्या लग्नाला कोणाचाही विरोध नव्हता, पण वधू वरांची खर्च करण्याची ऐपत नव्हती. वधूवर अत्यंत साध्या कपड्यात होते. बाशिंग आणि गळ्यातल्या फुलांच्या माळा एवढंच काय ते नाविन्य. लग्न लागल्यानंतर जेवणही नव्हते. पण त्यात काही वेगळे घडते आहे असा भाव कोणाच्याही चेहऱ्यावर नव्हता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. चोराची आळंदी : हवेली तालुक्यात पुणे सोलापूर रस्त्याच्या आसपास उरुळी कांचन ओलांडल्यानंतर आहे(जिल्हा पुणे)
२. तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यात पुणे अहमदनगर रस्त्याच्या आसपास आहे (जिल्हा पुणे)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्हाला फक्त ,

फुगेभाऊ फुगेभाऊ ढमढेरे
फुगु नका आणखीन , आता पुरे|

एवढंच गाणं माहितीये!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रश्नोत्तरे आणि माहितीने फोटोंपेक्षा अधिक करमणूक झाली. चुकलो.
हे फोटो करमणुकीसाठी नाहीतच. ते आहेत एक दस्तावेज म्हणून. त्यासाठीच मथळे, तारखा टाका म्हणतोय. मूळ लेखकाने इथे एक चक्कर टाकल्यास बरे होईल.
फेसबुकवर हे लोक उत्तरे देतच असतील. पण इथे हवीत ही अपेक्षा.

पर्सपेक्टिवरावांचे आभार. आणि त्यांनी न'बांची लेखन लकब चांगली उचलली आहे. न'बांचा ड्युआइडी असेल असे म्हणणे वाह्यातपणा होईल. एकूण छान. पण यावरून एक केनेथ एंडरसनची गोष्ट आठवली. एक साधू वाघाचा आवाज काढून लोकांना घाबरवत असे. (गंमत करत आहे. फार उचकू नये.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आभार.
मला न'बा' ह्यांचा ड्युआयडी म्हणणे हे स.पे. ला ना.पे. समजण्यासारखे आहे. (तीही चूक अनेकजण पुनःपुन्हा करतातच ही गोष्ट अलाहिदा. खोटे वाटत असल्यास रिक्षावाल्यांना विचारून पाहणे.)
मला साधू म्हटल्याबद्दल 'साधू! साधू!' वाटले. धन्यवाद. नपेक्षा न'बांना कुणी त्यांना वाघ म्हटल्याबद्दल काही आक्षेप असेल असे वाटत नाही. वाघाला कुणी त्याला न'बा म्हटल्यास काय वाटेल ह्याची कल्पना नाही. पक्षी : न'बा आणि वाघोबा यांना विचारून बघणे.

हा श्लेष नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यासाठीच मथळे, तारखा टाका म्हणतोय. मूळ लेखकाने इथे एक चक्कर टाकल्यास बरे होईल.

हा निर्णय मूळ कलाकारांचा असतो. तो आपल्याला पटला नाही तर मागे लागण्यापेक्षा आपण आपल्या आवडीची कला तयार करून प्रदर्शित करणं बरं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

निर्णय -

>>>हा निर्णय मूळ कलाकारांचा असतो. तो आपल्याला पटला नाही तर मागे लागण्यापेक्षा आपण आपल्या आवडीची कला तयार करून प्रदर्शित करणं बरं.>>>

छेछे मागे कसला लागतोय. पण फोटोपत्रकारिता करणार असेलच तर एक सुचवलं हो.
मथळे/वर्णनाचं काम पर्स्पेक्टिवांनी करून टाकली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0