रशिया - युक्रेन युद्धाबद्दल

रशिया - युक्रेन युद्धाबद्दल

आपली मतं, निरीक्षणं इथे नोंदवा.

मी माहिती मिळवतो त्या साईटस
aljazeera dot com किंवा चानेल,
france24 dot com,किंवा चानेल,

India Today मासिक.

ते कुणीही पाहू शकतोच. सर्व लेखांच्या लिंका देण्याची/फेकण्याची गरज नाही.

याशिवाय या युद्धाबद्दलची मते मांडणे योग्य ठरेल. ती अपेक्षित आहेत.
------------------
माझे मत-
१)युद्ध हे प्रत्यक्षपणे तो भूभाग ताब्यात घेणे आले. परंतू तसे न करता एखादा देश वेगळ्या कारणांनी/पद्धतींनी ताब्यात ठेवला जात आहेच.
२) सुपरपॉवर देशांचे इतर देश मिंधे ( दबलेले) आहेतच.
३) प्रगत देशही तेल उत्पादक देशांना घाबरून आहेत.
४) तेलाची शक्ती महत्त्वाची आहे - देश चालवण्यासाठी.
५) २०५० पर्यंत ऊर्जा संपू लागेल आणि जगातील देश कसे अगतिक होतील त्याची ही झलक आहे.
------------
जमिनीतील सुटे क्रूड तेल काही देशांत आहे पण त्यांना ते काढण्याचे विज्ञान दुसरीकडून घ्यावे लागते. तर ते देश एकमेकांवर अवलंबून आहेत.
रशियाकडे चिखलात मिसळलेलं तेल आहे ते काढणे खर्चिक आहे तुलनेने तरीही आता ते परवडू लागलं आहे. ते युअरोपिअन देशांत पाठवण्यात काही भूभाग ताब्यात हवा किंवा कराराने घ्यावा लागतोय. तेच कारण या युद्धामागे आहे.
--–---
भारताला सर्वच देशांशी सहकार्य ठेवावे लागते आहे. राजकीय पक्ष कोणताही सत्तेत येवो धोरण बदलता येणार नाही.
रशियाला विरोध करणे शक्य नाही.
( कालपासून Russia Today channel बंद झाला आहे.)तो त्यांनीच बंद केलाय का भारताने काढला कळणार नाही.)
असो.

-----------------
हे युद्ध अथवा इतर दुसरे कोणतेही होवो अथवा न होवो, क्रमांक (५) मुद्दा आता फार महत्त्वाचा आहे.
भारताने ऊर्जा निर्मिती, बचत,बदल यावर जोरदार मोहीम सुरू करायला हवी आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

मला या विषयात काहीही गती नाही, त्यामुळे माझं काहीही मत नाही.

अमेरिकी शेअर बाजार आक्रमणाच्या पहिल्या दिवशी कोसळला, आणि लगेच पुन्हा परत वर गेला. यावर माझ्या जुन्या कंपनीतल्या सीटीओचं (प्रमुख तंत्रज्ञान अधिकारी) म्हणणं होतं की बायडननी योग्य निर्णय घेतले, आततायीपणानं सैन्य पाठवलं नाही, 'नो फ्लाय झोन' वगैरे काही केलं नाही; मात्र रशियाच्या आर्थिक नाड्या आवळायला सुरुवात केली त्यामुळे शेअर बाजार सावरला.

बाकी सगळ्या अमेरिकी माध्यमांत रशियन नागरिकांनी पुतीनचा, युद्धाचा धिक्कार केल्याच्या चर्चा आहेत. मात्र एनबीसी वाहिनीवर एका चर्चेत एक बाई म्हणत होती की ती गेले काही आठवडे मुद्दाम रशियाचा राष्ट्रीय टीव्ही बघत आहे. त्यातला प्रचार सगळा पुतीन आणि रशियाच्या आक्रमणाची भलामण करणारा आहे. सगळे निषेध, धिक्कार वगैरे मॉस्को, सेंट पीटर्सबर्गमध्ये, म्हणजे शहरांमध्ये होत आहेत. पण ग्रामीण भागांत लोकांपर्यंत फक्त सरकारी प्रचार, प्रॉपगंडाच पोहोचतो. त्यामुळे सामान्य रूसी नागरिकांना युद्ध नकोच आहे, असं कुणी गृहीत धरू नये.

'न्यू यॉर्क टाईम्स'मध्ये फरहाद मंजू नामक तंत्रज्ञानावर लिहिणारा कॉलम्‌निस्ट आहे. त्यानं प्रश्न विचारला आहे की २०१६च्या अमेरिकी निवडणुकांत फेक न्यूज, वगैरे मोहिमा चालवण्याइतपत, आणि त्या प्रकारांमुळे अमेरिकी निवडणुकांमध्ये फरक पडण्याइतपत रशिया (किंवा पुतीन) अंदाधुंदीचा सर्व‌ेसर्वा आहे का?
Putin No Longer Seems Like a Master of Disinformation

गेल्या रविवारी अमेरिकेत सगळीकडे युक्रेनसाठी निदर्शनं झाली. शिकागोमधले काही फोटो.
युक्रेनचा झेंडा

युक्रेनचा झेंडा आणि पुतीन

'बीन'समोर युक्रेनला पाठिंबा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रतेक घटकाचा त्या मध्ये स्वार्थ असतो.
मीडिया ही कोणत्या ही देशाची असू ध्या ,गुलाम असतें
स्वतंत्र विचारांची मीडिया जगात कुठे च अस्तित्वात नाही
प्रतेक मीडिया हाऊस कोणाचे तरी गुलाम आहे.
युद्ध एकच आहे ,सत्य पण एकच आहे.
पण प्रतेक देशातील मीडिया नी अनेक सत्य निर्माण केले आहेत
रशिया मीडिया चे सत्य वेगळेच आहे.
अमेरिका वेगळेच सत्य सांगत आहे
भारतीय मीडिया तर मूर्ख च आहे ते हिशोबत च नाहीत.
सामान्य लोकांना स्व अनुभव असला तरी त्यांना कोणी विचारत नाही.
जे स्वतःला सामान्य नागरिक आहे म्हणून विचार व्यक्त करत असतें.ते व्ह्यूज वाढले की पैसे मिळतील हा विचार करून व्यक्त होत असतात
वाट पाहणे निकाल जो पर्यंत लागत नाही तो पर्यंत.
हेच शहाणपण.
सामान्य लोकांनी स्वतःची दुसऱ्या कोणी तरी दिलेल्या माहिती वर अक्कल पाजळू नये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जोकोविच काका,
तुम्ही युद्ध फॉलो करत असावेत. तर इथे अपडेट देत जाल का , रोज काही ?
रशियात मिळणारे चिखलयुक्त खनिज तेल म्हणजे काय ?
जरा माहिती सांगाल का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थोडे लेख वाचतो. हेतू वगैरे किंवा इतिहास दिलेला असतो.
युद्ध एक निमित्त आहे. परिणाम दूरवर जाणार आहेत.
-----
तेलाबद्दल थोडक्यात - ( यावर बरेच लेख सापडतील). आखाती देशांत, इतर ठिकाणी समुद्राच्या तळाखालचे तेल शोधून तिथपर्यंत नळे टाकून तेल बाहेर काढता येते. ते द्रव आणि वायूमिश्रीत आपल्याच जोराने वर येते. हवे तेवढेच काढून घ्यायचे. तर काही ठिकाणी तेलमिश्रीत चिखल आहे तै उपसून,पिळून तेल वेगळे करावे लागते. ते रशियात आहे. प्रक्रिया वेळखाऊ आणि खर्चिक आहे. तरी आता वापरात आहे. कारण गरज.

आता हळूहळू अर्थकारणाकडेच जात आहोत. माझ्याकडे काय आहे आणि त्याची इतरांना किती गरज आहे यावर मी, माझे कुटुंब,माझा जिल्हा, माझे राज्य, देश बलवान होणार. स्वयंनिर्भर हा फार मोठा व्यापक शब्द आहे. काही समुद्रातील बेटे पर्यटनावर अवलंबून आहेत. त्यांना आत्मनिर्भर राहायचे, टिकवायचे असेल तर त
यांचा निसर्ग जपायला हवा. दुसरा मार्ग नाही.
हे युद्ध एकप्रकारे आर्थिक महा,लघुसत्ता होण्याचा मार्ग कोणता य चा विचार करायला लावणारे प्रकरण आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चिखल पिळून वगैरे शब्द प्रयोगांच्यामुळे संकल्पना स्पष्ट झाली.
याबद्दल आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'Extract oil that is impregnated in the mud.'

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपल्या देशांत माणसांचाच चिखल आहे. कैक वर्षांनी आपण सारे जमिनीखाली गेलो तर असेच चिखलमिश्रित तेल तयार होईल का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असा प्रश्न अयोग्य आहे.

युक्रेन आणि रशिया पासून अमेरिका खूप लांब आहे.
येथील युद्ध आणि अमेरिका काय संबंध .
हा प्रश्न योग्य आहे .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चीन आणि ब्रिटन नी हा प्रयोग यशस्वी केला आहे.
खूप प्रचंड ऊर्जा अणू चे फ्युजन करून निर्माण केली आहे
भविष्यात खनिज तेल वापरण्याची खरे तर गरज पडली नाही पाहिजे
.
जे दावे संशोधक फ्युजन एनर्जी बद्धल व्यक्त करत आहेत त्या वरून वाटते
अजून कोळसा महत्वाचा असेल
खनिज तेल महत्वाचे असेल.
तर आपण नक्की काय प्रगती केली?
हा प्रश्न आ वासून उभा राहील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राजेशभाऊ आणि जोकोविच काका, तुम्हा दोघांना किती किती विषयातील माहीत असतं ?
तुम्हा दोघांचा व्यासंग बघून थक्क व्हायला होतं.
एवढे कधी आणि कसे वाचता तुम्ही ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट2
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

* focused*
मिळेल ते फुकट वाचत राहायचे. त्याचा आपल्याला उपयोग असो वा नसो.
बुद्धिमान हुशार लोकं तुरुंगात असले तरी विविध साहित्य लिहून काढतात याची उदाहरणं आहेतच.

बाकी ऐसीवर प्रमाणपत्र मिळणे अभिमानास्पदच आहे.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्याचे आम्हाला काहीच ज्ञान नाही .
त्या मुळे ठराविक हेतू मनी थरून लिहीत नाही.
जे सत्य वाटत तेच lihle जाते.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुतीनच्या तोंडी "डी-नाझीफिकेशन' हा शब्द अत्यंत विनोदी वाटतो, कारण रशियन ऑथोडॉक्स चर्च च्या अधिपत्याखाली जी पारंपरिक "बृहद-रशिया" ची निर्मिती त्यांना करायची आहे, तो अतिरेकी-राष्ट्र्रवादी प्रकारही नाझीवादाहून फारसा वेगळा नाही. सुप्त ज्यू-विरोध तर रशियात अनेक जागी टिकून असल्याचे इथले रशियन मित्र सांगतात.
अर्थात युक्रेनमध्येही अतिरेकी-राष्ट्रवादी भरपूर आहेत, सध्याच्या सरकारमध्येही ते शिरले आहेत, त्याबाबत युक्रेननेही कृती करण्याची गरज आहे. . त्यांच्या ध्वजावर नाझींचे "उलटे स्वस्तिक" ("Hakenkreuz", "TWISTED CROSS" ) असते.
https://www.opindia.com/2022/02/ukraine-dalliance-with-nazi-forces-probl...

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

अर्थात युक्रेनमध्येही अतिरेकी-राष्ट्रवादी भरपूर आहेत, सध्याच्या सरकारमध्येही ते शिरले आहेत, त्याबाबत युक्रेननेही कृती करण्याची गरज आहे. . त्यांच्या ध्वजावर नाझींचे "उलटे स्वस्तिक" ("Hakenkreuz", "TWISTED CROSS" ) असते.

पण… स्वतः झेलेन्सकीई यहुदी आहे ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फ्यूजन ; एक नवा, बिनधोक आणि कार्बन-प्रदूषण-मुक्त ऊर्जास्रोत: नवा तांत्रिक ब्रेक-थ्रू :

https://www.benzinga.com/pressreleases/22/03/n26074883/tokamak-energy-mo...
(फिजिक्स मध्ये शून्य "गती" असल्यामुळे (काय शब्द आहे! वाहवा!) यावर कॉमेंट करत नाही. )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

ते यूक्रेन नि ते रशिया दोघेही मरू देत तिथे युरोपात. काल “आपल्या” लोकांनी “त्यांच्या” हद्दीच्या सव्वाशे किलोमीटर आतपर्यंत वगैरे (“चुकून” म्हणे!) मिसाइल फेकले, त्याबद्दल काय म्हणणे आहे?

(अशा “चुका” होऊच कशा शकतात? की, मोदी है तो साला कुछ भी मुमकिन है?)

—————

(टीप: ‘साला’ हे येथे ‘(कुछ भी) मुमकिन’चे विशेषण आहे; मोदींचे नव्हे! (हल्ली हेसुद्धा स्पष्ट करावे लागते!))

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ती रंगीत तालीम असू शकेल. २०२४ च्या जरा आधी पीओके घेण्याची!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

…याला मूर्खपणा म्हणावा, की बेजबाबदारपणा, की दोन्ही, एवढाच संभ्रमाचा मुद्दा आहे.

भारतीय सैन्याबद्दल एके काळी एक अत्यंत चांगली, एका जबाबदार, प्रोफेशनल सैन्याची म्हणून एक इमेज निदान माझ्या मनात तरी होती. परंतु, गेली काही वर्षे (माझ्या अल्पमतीस अनुसरून) काही अनिष्ट पायंडे पडताना पाहातो आहे, त्याने अत्यंत वाईट वाटते.

उदाहरणार्थ, नुकतेच विमानअपघातात मरण पावलेले जनरल रावत. पाकिस्तानला इशारे वगैरे देणारी जाहीर विधाने वगैरे करायचे. आता, वास्तविक, अशा प्रकारची जाहीर, अधिकृत विधाने ही (१) पंतप्रधान, (२) पंतप्रधानांच्या कार्यालयाचा प्रवक्ता, (३) परराष्ट्रमंत्री, किंवा (४) परराष्ट्रमंत्रालयाचा प्रवक्ता, यांनीच करावीत; अन्य कोणीही करू नयेत. सैन्याच्या जनरलने, त्यातसुद्धा सेनाप्रमुखाने तर करू नयेतच नयेत. हे सेनाधिकाऱ्याचे काम नव्हे; हे सिविलियन सरकारातल्या काही निवडक अधिकृत व्यक्तींचे काम आहे. सेनाधिकाऱ्यांनी असली (किंवा कसलीही) जाहीर विधाने करणे हेच मुळात सिविलियन सरकाराच्या अधिकृत कार्यक्षेत्रावरील अतिक्रमण आहे. तसे करायला भारतीय सैन्य म्हणजे काय पाकिस्तानी सैन्य आहे काय, की ऊठसूट ज्यातत्यात आयएसपीआरच्या प्रवक्त्याने तोंड घुसडून जाहीर विधाने करावीत? परंतु, हे सर्रास चालले होते. पण लक्षात कोण घेतो?

(बादवे, आयएसपीआरच्या प्रवक्तेपदी नेहमी विदूषकच का नेमतात, कोण जाणे. परंतु, कितीही म्हटले, तरी हा पाकिस्तानी सैन्याचा अंतर्गत मामला आहे; आपण त्यात तोंड घालणे इष्ट नाही. मात्र, भारतीय सैन्यानेही तोच कित्ता गिरविण्यास डेस्परेट होण्याचेही काही कारण दिसत नाही.)

असो चालायचेच.

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पोलिसांकडून बंदूक साफ करत असताना कधीकधी बंदुकीतून गोळी उडते अशा बातम्या आपण वाचतो पण फार गंभीर चर्चा करतो का?
बडे बडे शहरोंमे ऐसी छोटी छोटी बाते होती रहेती है l

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा विनोद असावा, विधान औपरोधिक असून गंभीरपणे केलेले नसावे, अशी आशा आहे. इत्यलम्।

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डॉक्टर स्ट्रेंजलव्ह सिनेमासारखे काहीतरी झालेले असू शकते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारताचे एक missile फायर होवून पाकिस्तान च्या हद्धीत पडले.
त्या विषयीं भारत सरकारने दिलगिरी व्यक्त केली आहे.
तांत्रिक बिघाड " हे कारण त्या साठी दिले गेलेले आहे.
Missile कोणत्या तंत्रावर चालतात ते फायर होणे ,दिशा ठरणे,किंवा मध्येच दिशा बदलणे असे अनेक प्रकार त्या मध्ये असू शकतील
त्या तंत्र ज्ञान विषयी काहीच माहिती नसेल तर उलट सुलट मत व्यक्त करण्यात काही अर्थ नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

समजा, “त्यांचे” मिसाइल “चुकून” जर “आपल्या” हद्दीत येऊन पडले असते, तर हीच भूमिका घेतली असतीत काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

समजूतदार पना भूमिकेत असलाच पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रशियन अर्थव्यवस्था कितपत तग धरू शकेल? जर रशिया आपलं खनिज तेल विकू शकलं (जे होताना दिसत आहे), तर ते महसूल उत्पन्नातली तूट बर्‍याच काळासाठी भरून काढू शकतात. पण इतक्यासार्‍या देशांनी टाकलेल्या निर्बंधामुळे एकंदर अर्थव्यवस्थेवर भार इतका असेल की साधारण वर्षभारातच जीडीपी १०% ने कमी होईल. आणि लेखकाच्या मते ती अजून तळाला जातच राहील.
युद्धाच्या खर्चाचे आकडे पहाता (आणि यदाकदाचित युद्ध लांबले तर), कुठल्याही देशाला (खासकरून चीनला सुद्धा) अशी पावलं टाकताना शंभर वेळा विचार करावा लागेल.

दुर्दैव इतकेच की, बहुसंख्य रशियन लोकांना अजूनही याची जाणीवच नाही. बाकी, भारतीय माध्यमांबद्धल न बोललेच बरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या दुव्याबद्दल आभार. मला लेखातलं हे वाक्य समजलं नाही.

This includes an estimated $2.7 billion loss in GDP from the estimated 6,000 Russian casualties

.

माणशी साधारण काही मिलियम?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ह्युमन कॅपिटल मधला लॉस. (मारल्या गेलेल्या सैनिकांनी भविष्यात जीडीपी मध्ये भर घातली असती, असे समजून). पण तो जरी गृहीत धरला नाही, तरी आतापर्यंतचा अंदाचे खर्च ५० बिलियन डॉलर्स आहे. तसं बघायला गेलं तर रशियासारख्या देशासाठी "५० बिलियन डॉलर्स फक्त" एकवेळ खपूनही जातील. पण रशियन बहुसंख्यांकांच्या नजरेतून चालू असलेले हे "स्पेशल मिलिटरी ऑपरेशन" अजून अनिश्चिततेच्या कालावधिसाठी चालू राहिले, आणि लेखात म्हटल्याप्रमाणे निर्बंधांमुळे अर्थव्यवस्था आकुंचित पावली तर तो खर्च न पेलवणारा असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज न्यू यॉर्क टाईम्समध्ये एक मत वाचलं की युक्रेनी निर्वासितांमुळे पोलंड, आणि इतर पूर्व युरोपीय देशांवर खूप (असह्य) आर्थिक ताणही येऊ शकतो. ह्या संदर्भातलं काही तुमच्या वाचनात आलं का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नाही.

न्यूयॉर्क टाईम्स मध्येच अमेरिकन यादवीच्या काळात उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील राज्यांनी कशा पद्धतीने अर्थव्यवस्था कशी हाताळली यावर एक लेख वाचला तो आवडला.

युद्धाच्या काळात युनिअने कल्पकतेने करवाढ करून सरकारी महसूल काही पट वाढवला आणि युद्धाच खर्च सोसला. कॉन्फ्डरेटला करवाढ मान्य नव्हती त्यांनी नोटा छापल्या, परिणामी भाववाढ गगनाला भिडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

युद्ध म्हणजे दोन देशात नसते.
युध्दाची कारण जी सांगितली ती नसतात.
हा सर्व बुद्धीचा खेळ आहे.
युद्ध करणारे देश,युद्ध घडवून आणणारे देश
युध्दाची सामान्य लोकांच्या नजरेतून विश्लेषण करून फायदे तोटे सांगणारे बुद्धी वान लोक.
सर्व सुत्र्धार आहेत.
Covid काळात जगात अती श्रीमंत लोकांची संख्या वाढली
माझा पण अनुभव आहे माझ्या matual फंड मधील गुंतवणुकीची किंमत covid ची लाट आली की वाढते.
युद्ध चा फायदा घेवून जगाची संपत्ती काहीच लोक आपल्या ताब्यात घेत आहेत
खूप भयंकर आहे हा बुद्धीचा खेळ
आपण सामान्य लोक जसा विचार करतो तो एक भास आहे .
खरी स्थिती सूत्रधार काहीच लोक आणि त्या वर कला दाखवणारे abjo लोक ..
अशी काही शी अवस्था आहे
खूप भयंकर आहे है.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

युध्दाचा परिणाम म्हणून कोणत्या देशावर आर्थिक ताण पडेल हा प्रश्न निर्माण करणे हाच बुद्धिभेद आहे.
सरकार वर ताण पडेल म्हणजे सर्वसामान्य लोकांवर ताण पडेल
जो देश बाधित म्हणून सामान्य लोक समजतील त्या देशातील नेते ,उद्योग पती मात्र श्रीमंताच्या यादीत असतील

नीट चोफर विचार करा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0