बाळासाहेबांची शिवसेना‘ शिंदेंकडे, उद्धव यांना मिळाली स्वनामाची शिवसेना


खरी शिवसेना कोणाची याचा अंतिम निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ अशी नावे तात्पुरत्या स्वरूपात सोमवारी रात्री मंजूर केली. तसेच शिंदे गटाने हंगामी निवडणूक चिन्हासाठी सुचविलेले तिन्ही पर्याय अमान्य करून आयोगाने या गटाला नवे तीन पर्याय देण्यास सांगितले आहे. ठाकरे गटाने सुचविलेले हंगामी निवडणूक चिन्हाचे दोन पर्याय आयोगाने अमान्य केले असले तरी त्यापैकी ‘पेटती मशाल’ हे निवडणूक चिन्ह येत्या ३ नोव्हेंबर रोजी होणाºया अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत व वादाचा अंतिम निकाल होईपर्यंत तात्पुरते वापरण्याची मुभा दिली आहे.
आपलीच शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचे घोषित करून घेण्यासाठी शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे याचिका केली आहे. त्यात ८ ऑक्टोबर रोजी अंतरिम आदेश देताना आयोगाने शिंदे व ठाकरे या दोन्ही गटांना ‘शिवसेना’ हे मूळ पक्षाचे नाव जसेच्या तसे वापरण्यास तसेच त्या पक्षाचे ‘धनुष्य-बाण’ हे राखीव निवडणूक चिन्ह वापरण्यास मनाई केली होती. अंतिम निकाल होईपर्यंत वापरण्यासाठी दोन्ही गटांनी त्यांच्या पक्षासाठी प्रत्येकी तीन हंगामी नावे व तीन हंगामी निवडणूक चिन्हे कळवावी, असेही आयोगाने सांगितले होते. यासाठी आज १० ऑक्टोबरपर्यंतची मुदत होती. मात्र ठाकरे गटाने त्यांची तीन पर्यायी नावे व तीन पर्यायी निवडणूक चिन्हे ९ ऑक्टोबरलाच आयोगाला कळविली. शिंदे गटाने त्यांची पर्यायी नावे व पर्यायी चिन्हे आज सोमवारी कळविली. दोन्ही गटांकडून आलेल्या प्रस्तावांवर विचार करून आयोगाने वरीलप्रमाणे आपला निर्णय दोन्ही गटांना स्वतंत्र पत्रे पाठवून कळविला आहे.
उद्धव ठाकरे यांना आयोगाने कळविले आहे की, तुमच्या पक्षासाठी तुम्ही सुचविलेले ‘ शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) हे पहिल्या पसंतीचे नाव तुम्हाला देता येणार नाही, कारण प्रतिस्पर्धी शिंदे गटानेही त्यांच्या गटासाठीही याच नावाला पहिली पसंती दिली आहे. मात्र तुम्ही दिलेला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा नावाची दुसरा पर्याय आयोगाने मंजूर केला असून ते नाव तुमच्या गटाला देण्यात येत आहे.
ठाकरे गटाने ‘त्रिशुळ’, ‘उगवता सूर्य’ व ‘पेटती मशाल’ असे हंगामी निवडणूक चिन्हासाठी तीन पर्याय कळविले होते. त्यावर आयोगाने त्यांना कळविले की, तुम्ही सुचविलेली तिन्ही निवडणूक चिन्हे आयोगाने वाटपासाठी उपलब्ध असलेल्या खुल्या निवडणूक चिन्हांची जी यादी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध केली होती त्यांत नाहीत. ‘त्रिशुळ’ या चिन्हाला धार्मिक संदर्भ असल्याने व शिंदे गटानेही त्या चिन्हाला पहिली पसंती दिलेली असल्याने ते तुम्हाला देता येणार नाही. तसेच ‘उगवता सूर्य’ हे निवडणूक चिन्हही तुमच्या गटाला देता येणार नाही, कारण तमिळनाडूमधील ‘द्रविड मुनेत्र कझगम’ या मान्यताप्राप्त राज्य पक्षाला ते चिन्ह याआधीच राखीव चिन्ह म्हणून देण्यात आले आहे.
‘पेटती मशाल’ हे चिन्ह ठाकरे गटाला अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीपुरते वापरण्याची मुभा देताना आयोगाने पत्रात म्हटले की, खरे तर या चिन्हाचाही वाटपासाठी उपलब्ध असलेल्या खुल्या निडणूक चिन्हांच्या यादीत नाही. पूर्वीच्या समता पार्टीला ते राखीव चिन्ह म्हणूून देण्यात आले होते. परंतु सन २००४ मध्ये समता पार्टीची मान्यता रद्द झाली. त्यामुळे आता तुम्ही त्या चिन्हाची मागणी केलेली असल्याने आयोगाने ते चिन्ह पुन्हा खुले करण्याचे ठरविले आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत व वादाचा अंतिम निकाल होईपर्यंत तुम्ही ते चिन्ह वापरू शकता.
शिंदे गटाला आयोगाने कळविले आहे की, तुम्ही तुमच्या पक्षासाठी सुचविलेला ‘शिवसेना (बाळासाहेब ठाकरे)’ हा पहिला पर्याय मान्य करता येणार नाही कारण प्रतिस्पर्धी ठाकरे गटानेही हेच नाव त्यांच्या पक्षासाठी पहिल्या पसंतीचे नाव म्हणून सुचविले आहे. मात्र पक्षाच्या नावाचा तुम्ही दिलेला दुसरा पर्याय मान्य करून तुमच्या पक्षाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मंजूर करण्यात येत आहे.
शिंदे गटाने हंगामी निवडणूक चिन्हांसाठी ‘त्रिशुळ’, ‘उगवता सूर्य’ आणि ‘गदा’ असे तीन पर्याय दिले होते. ते तिन्ही अमान्य करून आयोगाने या गटास तीन नवे पर्याय उद्या ११ आॅक्टोबर, २०२२ रोजी सकाळी १० पर्यंत कळविण्यास सांगितले आहे. आयोगाने म्हटले की, शिंदे गटाने सुचविलेली तीन निवडणूक चिन्हे वाटपासाठी उपलब्ध असलेल्या खुल्या निवडणूक चिन्हांच्या यादीत नाहीत. शिवाय ‘त्रिशुळ’ व ‘गदा’ या चिन्हांना धार्मिक संदर्भ असल्याने ती नियमानुसार देता येणार नाहीत.
-

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अनाजी पंत लोकांना चांगले माहीत आहेत
फक्त अमराठी लोकांसाठी आनाजी पंत ची ओळख पक्ष कार्यकर्ते आणि पक्षाची यंत्रणा ह्यांनी करून द्यावी लागेल
थोडे कष्ट पडतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

पण कोण होता ते सगळ्यांना माहिती आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फेसबुकवर हे दिसलं -

आनंद दिघे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला वाटते पक्षांची नावे आता अशी ठेवली पाहिजे - गांधी परिवार पक्ष, मुलायम परिवार पक्ष, लालू परिवार पक्ष, करुणानिधी परिवार पक्ष, उध्दव परिवार पक्ष, इत्यादी. चिन्हाच्या जागी परिवार प्रमुखांचा फोटो असावा. निवडणूक आयोग आणि कोर्टाचे काम ही कमी होईल. मत देणाऱ्याला ही भ्रम होणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पूर्ण देशावर माझ्याच विचाराचे प्रभुत्व असावे असा
दृष्ट विचार असणारे सत्ताधारी राजकीय पक्ष खूप धोकादायक.
विचारांची विविधता ते नाकारतात.
धर्म ,जाती,रीती रिवाज,विविध संस्कृती,विविध भाषा ते नाकारतात..
ही जमात सर्वात जास्त धोका दायक.
हिटलर, मुसोलिनी.
किंवा जगातील बाकी हुकूम शाह हे घराणे शाही नी सत्तेवर नव्हते
पण मानव जाती चे दुश्मन होते.
शाहू महाराज हे घराणे शाही नी सत्ताधारी होते पण जनतेचे हीत जपणारे होते.
मुलायम,लालू,ठाकरे,पवार ही घराणी असतील आणि लोकांचे हीत जपत असतील तर काही वाईट नाही.
काही पक्षाला ल घराणे शाही नसेल पण त्यांची विचार धारा अनेक समूह साठी धोकादायक असेल तर ते जास्त धोकादायक आहे

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संघ परिवार पक्ष अखंड हिंदुस्थानचा फोटो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काबापासून अंकोरवटपर्यंत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे अनाजीपंत कोण असतात? फेसबुकवर फार नाव दिसतंय सध्या. इतिहासात कोण असतात, आणि आता कोण असतात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सत्तेच्या पदावर राहून सत्तेचा पूर्ण उपभोग घेणारे पण गुपचूप राजाशी प्रतारणा करणारे.राजाचा आणि राज्याचा विनाश दुश्मन लोकांशी संद्यान बांधून करणारे ते.
ही वृत्ती म्हणजे अण्णाजी पंत..
राजाशी विचार जुळत नसतील तर तडक तसे व्यक्त न करता कट कारस्थान करणाऱ्या वृत्ती ची लोक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अण्णाजी दत्तो. हे शिवरायांच्या अष्टप्रधानांपैकी एक होते. त्यांनी नंतर संभाजीला सिंहासनावरून हटवून राजारामाला बसवण्यासाठी कट केले, आणि त्याबद्दल संभाजीने त्यांना देहांत शासन केले.
टीव्हीवर आलेल्या संभाजी सीरियलमध्ये ह्यांचे चित्रीकरण व्हिलन म्हणून केले गेले. ब्रिगेडी लोकांपैकी बरेच जण अनाजीपंत हा शब्द सोशल मीडियावर ब्राह्मण/ब्राह्मणी वृत्ती/ विश्वासघातकीपणा ह्या अर्थाने वापरतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही व्यक्ती झाली ,शिवराय च्या अष्टप्रधान मध्ये होती म्हणजे खास च असणार.
पण त्यांनी जी वृत्ती नंतर दाखवली त्या वृत्ती लाच आणाजी पंत म्हणतात.
संभाजी राजांची टीप देणारे पण त्याच वृत्तीचे.
व्यक्ती म्हणून त्याचा अर्थ घेतला तर ब्राह्मण ही जात दोषी ठरते.
पण बाजी प्रभू Deshpande पासून अनेक शूर वीर आणि मुसद्धी लोक ही ब्राह्मण च होती त्यांनी स्वराज्याची सेवा केली.
त्या व्यक्ती आणि त्याची जात हा संदर्भ स्वार्थी लोक घेतात.
सामान्य लोक फक्त वृत्ती चा संदर्भ घेतात.
अण्णाजी पंत कोणत्या ही जाती धर्माचे असू शकतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाजीप्रभू ब्राह्मण नव्हते हो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

ब्राह्मण म्हटलं की कोकणस्थ, देशस्थ, कऱ्हाडे आणि गौड सारस्वत वगैरे येत होते कधीकाळी.
मग कायस्थ प्रभू वगैरेंच्या लोकांना पण ब्राह्मण म्हणून टाकायचे म्हणजे टार्गेट सोपे होते.
ते काहीही असो युरेशियनवासी ही संज्ञा मला भारी वाटते.
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

हां. तर फडणवीस म्हणजे अनाजीपंत! आता समजलं. थ्यँक्यू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जसवंत कोकाटे, जावळीचा मोरे, सूर्याजी पिसाळ, बाजी घोरपडे, खंडोजी खोपडे, मुधोळकर घोरपडे, गणोजी शिर्के, मंबाजी भोसले, निंबाळकर मामा असे कितीतरी लोक ब्राह्मण नव्हते म्हणून त्यांचा उल्लेख सहसा कोणत्याही ब्रिगेडींनी केला नाही.
वरील उल्लेखलेल्या लोकांनी काय काय भव्यदिव्य पराक्रम केले ते महाराजांचा इतिहास वाचणाऱ्या लोकांना चांगलेच माहिती आहे

मात्र ब्राह्मण लोकांना नावे ठेवली की पुरोगामी महाराष्ट्रात वैचारिक पुढारले पणा सिद्ध होत असावा म्हणून अणाजी पंत, कृष्णाजी भास्कर वगैरे बिरुदावली मिरवली जाते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शिंदे नी पक्ष सोडला त्यांच्या बरोबर ४० आमदार गेले.
शिव सेनेचे नुकसान झाले .
ह्या विषयी लोकांना काही देणे घेणे नाही पण ते bjp ल मदत करत आहेत ह्या वर लोकांना आक्षेप आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0