वर्ल्ड हर्बल एनसायक्लोपीडिया ( वनौषधी विश्वकोश) म्हणजे काय रे भाऊ

तब्बल चार वर्षांनंतर दिल्लीच्या पुस्तक मेळाव्याला भेट दिली. तीन-चार पुस्तके ही विकत घेतली. अचानक लक्ष अत्यंत सुंदर मुखपृष्ठ आणि उत्तम कागदावर छापील वर्ल्ड हर्बल एनसायक्लोपीडियावर गेले. माझ्या सारख्याला या पुस्तकातले काही एक कळणे शक्य नव्हते. तरीही वनस्पति विश्वकोशाची विवरणिका मागून घेतली. विवरणिकात वर्ल्ड हर्बल एनसायक्लोपीडियाची इत्यंभूत माहिती तर होती या शिवाय प्रत्येक खंडाची वेगळी माहिती होती. जगात पहिल्यांदाच हे कार्य ते ही भारतातील एक संस्था करत आहे, हे वाचून गर्व झाला. विवरणिका आणि यू ट्यूब वरून ही माहिती मिळविली. त्या आधारावर हा लेख.

वर्ल्ड हर्बल एनसायक्लोपीडिया हा औषधी वनस्पतींचा एक बहु-विपुल संग्रह आहे. जगभरात सर्वत्र विखुरलेल्या सर्व पारंपरिक औषधी वनस्पतींचे ज्ञान आणि त्यांचा व्यापक उपयोग एकाच पुस्तकात एकत्रित करणे हा या विश्वकोशाचा उदेश्य आहे. जगभरात एकूण 3.6 लाख वनस्पतींची विविधता उपलब्ध आहे. आणि, यापैकी अंदाजे 60,000 वनस्पती जगातील पारंपरिक औषधी प्रणालींत वापरल्या जातात. भविष्यात या वनौषधींचा मानव जातीच्या हितासाठी आधुनिक वैज्ञानिक रीतीने अनुसंधान करून विविध रोगांवर औषधी निर्मित केली जाऊ शकते. याशिवाय भारतीय पारंपरिक औषधी ज्ञानाला पेटंट चोरांपासून वाचविणे हा ही एक उद्देश्य आहे.

या विश्वकोशात जगभरात बोलल्या जाणार्‍या सुमारे 1,700 प्रादेशिक भाषांमध्ये जगातील सुमारे 60,000 औषधी वनस्पती, 7500 वनस्पति वंश 50000 वनस्पति प्रजाती ज्यात 6 फायलोजेंनिक गट, 1024 टेरिओडोफाइट्स, 850 बुरशी, 274 ब्रायोफाइट्स, 378 शैवाल, 44794 एंजियोस्पर्म्स, 536 जिम्नोस्पर्म आहेत. यात व 6 लाख Bibliographic sources, 2.5 लाख वनस्पतींचे समानार्थक शब्द, 12 लक्ष स्थानिक नावे, 1300 ज्ञात रोगांवर 2200 हून अधिक औषधींचे वर्णन आहे. या शिवाय औषधी वनस्पतींची प्रामाणिक 30500 कॉनव्हास चित्रे, 35000 रेखाचित्रे ही आहेत. या शिवाय यात यूरोपियन, अमेरिकन, आफ्रिकन, ऑस्ट्रेलियन आणि एशिया खंडातील औषधी प्रणाली आणि त्यात वापरणार्‍या औषधिंसाठी वेग-वेगळे खंड ही आहेत. शेवटच्या खंडात उपसंहार आहे.

हा विश्वकोश 109 खंडात पूर्ण होणार आहे. या विश्कोशाच्या निर्मितीत 900 शास्त्रज्ञ ज्यात भारतीय, विदेशी 25 पोस्ट डॉक्टरेट, 50 पीएचडी धारक, क्लिनिकल संशोधक, वनस्पति शास्त्रज्ञ, वर्गीकरण शास्त्रज्ञ, सूष्म जीव शास्त्रज्ञ, biotechnologist आणि इतर शास्त्रज्ञ. या शिवाय 31 आयटी विशेषज्ञ आणि इतर 120 आयुर्वेदिक डॉक्टर, 40 भाषा शास्त्री. या सर्वांचा समन्वय साधणारे शेकडो निस्वार्थी कार्यकर्ता आणि कर्मचार्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे अधिकान्श शास्त्रज्ञांनी अल्प मानधनात किंवा सेवा भावनेने कार्य केले आहे. अन्यथा हे कार्य पूर्ण करणे असंभव होते. या विश्वकोशाचे आज पर्यन्त 70 खंड प्रकाशित झाले आहे. पहिल्या खंडाचे प्रकाशन माननीय प्रधान मंत्री श्री नरेंद्र मोदींच्या हस्ते 3 मे 2017ला झाले होते.

15 वर्षांपूर्वी हे कार्य करण्याचा संकल्प आचार्य बालकृष्ण यांनी केला होता. पण हे कार्य हिमालय पर्वत सर करण्यापेक्षा ही कठीण होते. विषय वेगळा आहे पण आचार्य बालकृष्ण यांनी हिमालयातील 25000 फूट उंच पर्वत शिखर बिना ऑक्सीजन सर केले आहे. हिमालय पुत्र असल्याने त्यांच्यासाठी हे कार्य कठीण नव्हते. त्यांची 15 हून जास्त वर्षांची तपस्या आणि जगभर पसरलेल्या वनस्पति क्षेत्रांत कार्य करणार्‍या संस्थांच्या मदतीने हे महत्त कार्य पूर्णत्वेच्या मार्गावर आहे.

एक-एक टप्प्याने या कार्याची सुरवात झाली होती. पहिले कार्य आयुर्वेदात वापरल्या जाणार्‍या वनस्पतींचा शोध घेणे. आज 700च्या जवळ वनौषधींचा वापर आयुर्वेदात होत आहे. पण औषधींची वास्तविक संख्या जाणण्यासाठी आयुर्वेदात वापरल्या जाणार्‍या औषधींचा शोध घेणे गरजेचे होते. या साठी देश विदेशांत सुरक्षित पांडुलिपींचा शोध घेणे आणि त्यांचे डिजिटली करण्याचे कार्य हाती घेतले. 60000 हून जास्त पांडुलिपी ज्यात 50801 ताडपत्री पांडुलिपी सहित 63 लाखाहून जास्त पानांचे डिजिटलीकरण केले. यात आयुर्वेद सहित 18 विषय आहेत. दोन डझनहून जास्त प्राचीन आयुर्वेदिक पुस्तकांचे प्रकाशन ही केले. या पुस्तकांचा लाभ आयुर्वेदिक शिक्षक, विद्यार्थी सहित औषधी निर्मात्यांना ही होणार. या शिवाय पेटेंट सुरक्षित करण्यात ही मदत मिळेल. हे कार्य अद्याप ही सुरूच आहे. भारतात सापडणार्‍या 20000 वनस्पतींपैकी जवळपास 1000 हून जास्त वनौषधींचा वापर भारतातील विभिन्न पारंपरिक चिकित्सा पद्धतीत होतो. आचार्य बाळकृष्णाच्या मते भारतातील अजून 5 ते 7 हजार वनस्पतींचा वनौषधींच्या रूपाने होऊ शकतो. त्यासाठी अनुसंधानाची गरज आहे.

पतंजली हर्बल गार्डनची स्थापना करण्यात आली. या हर्बल गार्डनचा मुख्य उद्देश्य भारतात उपलब्ध औषधी वनस्पतींचे जतन करणे आणि त्यांचा प्रसार करणे. संपूर्ण भारतातील 1,000 हून अधिक औषधी वनस्पती, झुडपे, झाडे, लता, ह्या सर्वांचा उपयोग वैज्ञानिक समुदाय आणि सामान्य जनता या दोघांनाही होत आहे.

पतंजली रिसर्च फाउंडेशन हर्बेरियम (PRFH)ला न्यूयॉर्क बोटॅनिकल गार्डन, यूएसए द्वारे मान्यता प्राप्त आहे. भारताच्या विविध भागातून पूर्व आणि पश्चिम हिमालय आणि उच्च गंगेच्या मैदानातील टेरिडोफाइट्स, जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्सचे 10,000 वनस्पती 2,000 हर्बेरियम शीट्स वर आहेत. नाममात्र शुल्क देऊन विद्यार्थी आणि संशोधक दोघेही येथे वनस्पती ओळखीचे प्रमाणपत्र मिळवू शकतात.

वैदिक नामकरण पद्धती: जगात ३.६ लाख वनस्पती प्रजाती आहेत आणि त्यांच्या वैज्ञानिक नावांची संख्या जवळपास १३ लाखांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे भ्रम निर्मिती होते. या शिवाय वनस्पति शास्त्रज्ञांना वनस्पतींची नावे लक्षात ठेवणे ही कठीण होते. संस्कृत एक वैज्ञानिक भाषा आहे. भाषातज्ञ आणि आयुर्वेदिक दिग्गजांच्या सहाय्याने "वैदिक नामकरण पद्धती" विकसित केली. वैदिक नामकरण वनस्पतींच्या बाह्य आणि शारीरिक वैशिष्ट्यांवर जोर देते आणि अशा अर्थपूर्ण पद्धतीने क्युरेट केले गेले जेणेकरून वनस्पतींचे लिंग आणि फायलोफजेनिक गट निर्दिष्ट करण्या बरोबरच कोणत्याही विशेष उपकरणाचा वापर न करता वनस्पतींचे आयडेटिफिकेशन करता येईल. या शिवाय भविष्यात सापडलेल्या वनस्पतींना देखील नाव दिले जाऊ शकते, अशा प्रकारे वैज्ञानिक समुदायासाठी एक सुलभ डेटाबेस तयार केला जाऊ शकतो. वनौषधी विश्वकोश हा पहिला ग्रंथ आहे ज्यात जगातील सुमारे ६०,००० औषधी वनस्पतींना संपूर्णपणे नवीन संस्कृत नामावली (द्विपदी नमुन्यात) कुटूंबापासून ते वंश आणि प्रजाती स्तरापर्यंत देण्यात आली आहे, ज्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीने नामकरणाच्या उत्पत्तीचा आधार आहे. वैदिक नामकरण पद्धतीने ठेवलेल्या नावांचा वापर अंतराष्ट्रीय दर्जाच्या शोध पत्रांनी ही स्वीकृत केला आहे.

औषधी वनस्पतींच्या चित्रांचे संग्रहालाय: विश्वकोशच्या निर्मितीत सर्वात मोठी समस्या वनस्पतींच्या चित्रांची होती. अधिकान्श उपलब्ध फोटो किंवा चित्रांचे कॉपी राइट असण्याची संभावना होती. या शिवाय त्यांच्या प्रमाणिकते वर ही प्रश्न चिन्ह येऊ शकत होते. यासाठी नव्याने जगातील सर्व वनस्पतींचे कॅनव्हास पेंटिंग्ज नव्याने काढण्याचा निश्चिय केला. अनेक वनस्पति शास्त्री आणि चित्रकारांच्या मदतीने औषधी वनस्पतींचे 35000 कॅनव्हास पेंटिंग्ज आणि 30000 रेखाचित्रे नव्याने काढण्यात आली. या कार्यात ही अनेक वर्ष लागले. या चित्रांचा वापर वनौषधी विश्वकोश मध्ये केला आहे. हे संग्रहालाय वनौषधींचे जगातील सर्वात मोठे संग्रहालाय आहे.

या वनस्पति विश्वकोशाचा उपयोग वनस्पती शास्त्रज्ञ, पारंपरिक डॉक्टर/ वैद्यांना होणार आहे.जगातील विभिन्न वांनौषधींवर अनुसंधानाचा नवीन मार्ग ही उघडेल. वाढत्या हर्बल औषधी उद्योगाला याचा लाभ मिळणार. वर्ल्ड हर्बल एनसायक्लोपीडियाचा प्रत्येक खंड 800 ते 1000 पानाचा आहे. प्रत्येक खंडाची किंमत ही जवळपास 7000 रु आहे. यावर प्रश्न विचारल्या वर उत्तर मिळाले, विश्वकोशच्या निर्मितीत लागणारा वेळ, मनुष्य बळ आणि खर्च पाहता, ही किंमत अत्यंत कमी आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

विषय वेगळा आहे पण आचार्य बालकृष्ण यांनी हिमालयातील 25000 फूट उंच पर्वत शिखर बिना ऑक्सीजन सर केले आहे.

हो हो. आचार्य बालकृष्ण हिमालयात एक टांग वर करून ध्यान लावून राहिले आहेत, नि तिकडे वाघीण एक टांग वर करून त्यांच्या कमंडलूत दूध घालीत आहे, असा फोटो आहे ‘पतञ्जलि’च्या मुख्यालयात.

हिमालय पुत्र असल्याने त्यांच्यासाठी हे कार्य कठीण नव्हते.

बोले तो, हिमालय यांच्या घरी आला होता, की यांची आई हिमालयाकडे गेली होती?

पतंजली रिसर्च फाउंडेशन हर्बेरियम (PRFH)ला न्यूयॉर्क बोटॅनिकल गार्डन, यूएसए द्वारे मान्यता प्राप्त आहे.

म्हणजे यांनासुद्धा शेवटी म्लेंच्छांची मान्यता लागते तर! केवढा हा परधार्जिणेपणा!

नाममात्र शुल्क देऊन विद्यार्थी आणि संशोधक दोघेही येथे वनस्पती ओळखीचे प्रमाणपत्र मिळवू शकतात.

अरे वा! पैसा फेको, सर्टिफिकिट लो।

वनौषधी विश्वकोश हा पहिला ग्रंथ आहे ज्यात जगातील सुमारे ६०,००० औषधी वनस्पतींना संपूर्णपणे नवीन संस्कृत नामावली (द्विपदी नमुन्यात) कुटूंबापासून ते वंश आणि प्रजाती स्तरापर्यंत देण्यात आली आहे, ज्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीने नामकरणाच्या उत्पत्तीचा आधार आहे

सुमारे दोनशेसत्तर वर्षांपूर्वी लिनेअसबाबाने असले उपद्व्याप लॅटिनमध्ये केले होते. (त्याने नुसत्या वनस्पतींचीच नव्हे, तर प्राण्यांचीसुद्धा नामावली केली होती; परंतु, जाऊ दे, ‘पतञ्जलि’वाले कदाचित शाकाहारी असतील, म्हणून सोडून देऊ.) आज इतक्या शतकांनंतर त्याची कॉपी मारण्यात नक्की काय हशील आहे, नि कोणाला?

बरे, देशी भाषांतूनच जर असले उपद्व्याप करायचे होते, तर संस्कृतात कशाला? (लोकांना समजेल अशा) मराठी किंवा कन्नडसारख्या (किंवा अगदी हिंदीसारख्यासुद्धा) लोकभाषेत का नाही? ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका रचली, यापेक्षासुद्धा, त्याद्वारे गीता (तत्कालीन) लोकभाषेत आणली, ही त्यांची महती. (भले आजमितीस त्यातील शब्दाचासुद्धा अर्थबोध होत नसला, तरीही. तेव्हाच्या आम जनतेस समजल्याशी मतलब.)

(आता, यावर, लिनेअसबाबाने तरी आपली द्विपदनामावली लॅटिनमध्येच प्रसिद्ध केली ना, असा आक्षेप येईलच. पहिले म्हणजे, लिनेअसबाबाने आपली द्विपदनामावली स्वीडिश, स्वाहिली, किंवा मलयाळममध्ये प्रसिद्ध केली असती, तर त्यास आमचा काही आक्षेप नसता. दुसरे म्हणजे, कितीही म्हटले, तरी लिनेअसबाबा पडला विद्वान, अर्थात उच्चभ्रू! इतर विद्वानांत मान्यता मिळवायची, तर, तत्कालीन पद्धतीस अनुसरून आपली द्विपदनामावली लॅटिनमध्ये प्रसिद्ध करणे त्याला भागच होते; न करून सांगतो कोणाला? आचार्य बालकृष्णांवर असले काही दडपण होते काय?)

वर्ल्ड हर्बल एनसायक्लोपीडियाचा प्रत्येक खंड 800 ते 1000 पानाचा आहे. प्रत्येक खंडाची किंमत ही जवळपास 7000 रु आहे.

७००० रुपये गुणिले १०९ खंड, बोले तो ७,६३,००० रुपये. इतके रुपये खर्च करून इतकी अडगळ कोण कशाला घरात ठेवील? (तुम्ही का नाही विकत घेतलात मग, आख्खा संच?) घरातली किती जागा अडवेल, माहित्येय?

हं, शासकीय ग्रंथालयांच्या वगैरे गळ्यात मारून पैसे काढणे शक्य आहे. अब की बार, मुमकिन है।

——————————

असो. एकंदरीत, लेख म्हणजे, ‘सहज दृष्टीस पडलेल्या’ पुस्तकाच्या ‘परिचया’च्या नावाखाली, ‘पतञ्जलि’च्या छुप्या उघडउघड प्रचाराचा प्रकार वाटला. नाही म्हणजे, ‘अभिव्यक्तिस्वातंत्र्य’ वगैरे ठीक आहे, परंतु, ‘ऐसीअक्षरे’वर असल्या प्रचारकी लिखाणास स्थान असावे काय? (नपक्षी, ख्रिस्ती पाद्र्यांससुद्धा आपापला रतीब घालण्यास येथे पाचारण का करू नये? प्रचारच चालवायचा आहे, तर तो एकतरफी का?)

असो चालायचेच.

 • ‌मार्मिक5
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विभिन्न स्त्रोतांकडून पूर्ण माहिती घेऊन हा लेख लिहाला आहे. तसे ही मी कधीही माहीत घेतल्या शिवाय टंकत नाही. हे कार्य प्रत्येक भारतीयाला गर्व करण्या सारखे आहे.

नवी बाजू तुमची दूषित मानसिकता आणि अज्ञान असले शेंडा न बुड असलेले प्रतिसाद येतात. " लिहाणार्‍याला ही माहीत नसेल तो काय लिहातो बाकी मराठी भाषा ही कळात नाही हे ही दिसले.
हो हो. आचार्य बालकृष्ण हिमालयात एक टांग वर करून ध्यान लावून राहिले आहेत, नि तिकडे वाघीण एक टांग वर करून त्यांच्या कमंडलूत दूध घालीत आहे, असा फोटो आहे ‘पतञ्जलि’च्या मुख्यालयात.हिमालय पुत्र असल्याने त्यांच्यासाठी हे कार्य कठीण नव्हते. बोले तो, हिमालय यांच्या घरी आला होता, की यांची आई हिमालयाकडे गेली होती?"

रक्तवर्ण हिमाद्रि अभियानाचे मुख्य उद्देश्य त्या क्षेत्रातील वनस्पतींना शोधणे, त्याना जिओ टॅग करणे. त्यांचे संवर्धन करणे . या शिवाय कधी ही विजित न झालेल्या पर्वत शिखरांना विजित करणे आणि त्यांचे नाम करण करणे होते. (पूर्वीचे अनेक अभियान असफल झाले होते) खालील विडियो पाहून खात्री करून घ्या.

https://www.youtube.com/watch?v=3EIKQEHfDXo

आज पासून 100 वर्षांपूर्वी ही कुणालाही जगातील वनौषधींची माहिती असणे शक्यच नव्हते. हे कार्य पहिल्यांदाच झालेले आहे. या पूर्वी कुणीही केलेले नाही.

जागतिक मान्यता देण्याकरता कुठली तरी संस्था अधिकृत असते. त्याशिवाय भारतीय लोक विश्वास ठेवत नाही. वनस्पति क्षेत्रांत कार्य करणारे इथे येतात. शंभर दीडशे रुपये फी जगात सर्वात कमी आहे. विश्वास नसेल तर दुसरी कडे विचारपूस करून खात्री करून घ्या.

ज्या कार्यात 18 ते 20 वर्ष लागणार. अब्जावधी पेक्षा जास्त खर्च येणार. त्या हिशोबाने किंमत फार कमी आहे. बाकी डॉलर मध्ये वनस्पति पुस्तकांच्या किंमती पहा आणि तुलना करा. या शिवाय पेटेन्ट चोरांपासून भारतीय हित ही सुरक्षित राहतील.
बाकी ग्रंथ कोण विकत घेईल याची तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. जगातिल वनस्पति क्षेत्रांत कार्य करणार्‍या प्रत्येक संस्थेत हा विश्वकोश निश्चित दिसेल.

बाकी तुम्हाला कदाचित माहीत नसेल आचार्य बाळकृष्ण यांचा आयुर्वेद सिद्धांत रहस्य या ग्रंथाचा जगातील 75 भाषेत अनुवाद होऊन चुकला आहे. (पतंजलि ने फक्त 5 भारतीय भाषेत अनुवाद केला होता).

बाकी माहिती घेऊन प्रतिसात देत जा. उगाच अज्ञान प्रदर्शित करण्याची हौस ठेऊ नका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहज दृष्टीस पडलेल्या’ पुस्तकाच्या ‘परिचया’च्या नावाखाली, ‘पतञ्जलि’च्या छुप्या उघडउघड प्रचाराचा प्रकार वाटला. नाही म्हणजे, ‘अभिव्यक्तिस्वातंत्र्य’ वगैरे ठीक आहे, परंतु, ‘ऐसीअक्षरे’वर असल्या प्रचारकी लिखाणास स्थान असावे काय? (नपक्षी, ख्रिस्ती पाद्र्यांससुद्धा आपापला रतीब घालण्यास येथे पाचारण का करू नये? प्रचारच चालवायचा आहे, तर तो एकतरफी का?)

इथे अनेक पुस्तकांच्या माहिती वाचायला मिळतात. ती पुस्तके खिश्याला परवडणारी असतात. त्यालाही प्रचार म्हणता येईल. पण माहिती मिळाल्यावर पुस्तक विकत घ्यावे की नाही हे ठरवायला मदत मिळते. बाकी हे विश्वकोश फक्त वनस्पति क्षेत्रांत काम करणारे घेतील. आणि ते इथला लेख वाचून निश्चित घेणार नाही. हे जागतिक दर्जाचे कार्य आहे, त्याची माहिती सांगणे प्रचार. तुम्ही जो प्रतिसाद दिला आहे तो देण्याची स्वतंत्रता ही इथे आहे. त्याला माझा मुळीच आक्षेप नाही.

बाकी जी संस्था आपला अधिकान्श नफा अनुसंधान वर खर्च करते, तिची प्रशंसा करण्यात काय चूक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पतंजली नी सर्व वनस्पती न माहिती काढून त्याचे वर्गीकरण केले असेल,त्यांचे औषधी गुण काय आहेत ह्याची माहिती अभ्यास करून पुस्तक रुपात प्रसिद्ध केली असेल तर आक्षेप घेण्या सारखे काय आहे.
ह्या कामासाठी लागणारे पैसे त्यांनी स्वतः खर्च केले आहेत.
सरकार नी त्य साठी निधी दिलेला नाही.
त्या माहिती रुपी पुस्तकाची किंमत काय असावी हा त्यांचा प्रश्न आहे.
इथे ही माहिती द्यावी का?
जगभरातील सायन्स magzine मधील माहिती आपण इथे शेअर करतोच ना.
मग ह्यांनी केली तर काय बिघडले .

त्या पुस्तकात दिलेली माहिती चूक आहे दिशाभूल करणारी आहे असे अभ्यासातून कोणाला माहीत असेल तर नक्कीच आक्षेप घेतला पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जगात वनस्पति क्षेत्रात सर्वप्रथम हे कार्य झाले आहे. त्याचा प्रत्येक भारतीयाला गर्व वाटला पाहिजे. या विश्वकोशमुळे हर्बल औषधी क्षेत्रांत भारताला निश्चित लाभ होणार. वनस्पति क्षेत्रांत कार्य करणार्‍या शास्त्रज्ञांना आणि विद्यार्थ्यांना ही याचा लाभ होणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नेत्राचे अनियंत्रित आकुंचन झटके पूर्णपणे बरे करणारी वनस्पती आहे का हो ह्या खंडात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यासाठी एका bacteria पासून मिळवलेले विष अत्यंत कमी मात्रेत वापरले जाते. (नैसर्गिकच म्हणावे लागेल). अर्थात, यामुळे नेत्रांचे झटके पूर्णपणे बरे होत नाहीत, पण कमी नक्कीच होतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

औषध जरी नैसर्गिक असले तरी ते शरीरात पिचकारीने (कृत्रिम )टोचून घ्यावे लागेल. त्रस्त व्यक्ती कृत्रिमच काय नैसर्गिक पिचकारीही शरीरात टोचून घ्यायच्या विरोधात आहे असं ऐकून आहे. खरं खोटं आचार्यच जाणो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आयिर्वेदवाल्यांना एनिमा चालतो बहुतेक. एकूणच शरीराला त्रास देणंही भारतीय पद्धतीत नसतं, त्यामुळे इंजेक्शनंही बसवून घ्यायला हरकत नसावी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

औषध जरी नैसर्गिक असले तरी ते शरीरात पिचकारीने (कृत्रिम )टोचून घ्यावे लागेल.

या वाक्याला, का, कोण जाणे, परंतु, अश्लीलतेचा वास येतो आहे.

त्रस्त व्यक्ती कृत्रिमच काय नैसर्गिक पिचकारीही शरीरात टोचून घ्यायच्या विरोधात आहे असं ऐकून आहे.

अरे बापरे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0