प्रसिद्ध झाले आहे! प्रसिद्ध झाले आहे! प्रसिद्ध झाले आहे!
प्राणायामात नवीन काय शिकायचे?
प्राणायाम म्हणजे नक्की काय? त्याचे फायदे नेमके कोणते आणि ते कसे होतात, या प्रश्नांची विज्ञानसिद्ध उत्तरे आपल्याला न मिळाल्याने काहीजण एकतर त्याकडे पूर्ण कानाडोळा करतात किंवा फाजील प्रचारामुळे अतिप्रभावित होतात. प्राणायामाकडे संतुलित दृष्टिकोन ठेवून बघता यावे यासाठी आधुनिक संशोधनाचा परामर्ष या लेखनात घेतलेला आहे.
प्राणायामाबद्दल आपल्या मनात अनेक प्रश्न असतात. प्राणायामाने कर्करोग बरा होतो का? रक्तदाब कमी करण्यासाठी किंवा प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्राणायाम उपयोगी पडेल का? नैराश्य दूर होऊन जीवनविषयक दृष्टिकोन बदलण्यासाठी प्राणायाम मदत करेल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे, प्राणायामाविषयी उत्सुकता असलेल्यांसाठी, या लेखनात आधुनिक संशोधनाच्या आधारे नमूद करण्याचा प्रयत्न केला आहे.
टीप- या पुस्तिकेच्या विक्रीतून मिळणारे सर्व उत्पन्न लेखकद्वयांकडून आय० आय० टी० मुंबई या संस्थेला (भारत सरकारच्या ८० जी या नियमाला अनुसरून) देणगी दिले जाणार आहे.
प्रतिक्रिया
https://www.amazon.in/%E0%A4
https://www.amazon.in/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A...
माझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या